“ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन भूमि खणिली, व तीत आपल्या धन्याचा पैका लपविला.” COLMar 271.2
ज्याला एक अगदी लहान देणगी मिळाली होती तिचा त्याने उपयोग केला नाही. याद्वारे एक इशारा दिला आहे ज्या कोणाला अगदी लहान देणगी मिळाली आणि म्हणून असे निमित्त सांगून ते ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्या देणगीचा उपयोग करीत नाहीत. जर त्यांना एकादी महान गोष्ट वा कार्य दिले असते तर ते त्यांनी किती आनंदाने केले असते ; पण त्यांना एका लहान देणगीची सेवा करावयास दिली म्हणून ते, काहीच करीत नाहीत हा त्यांचा निर्णय त्यांना योग्य वाटतो. पण असे काहीच कार्य न करणे यात ते चूक करितात. प्रभुने त्यांना जे जे वाटप करून दिले त्याद्वारे तो त्यांच्या शीलाची परीक्षा घेतो. जो मनुष्य त्याला दिलेली देणगी वापरू शकत नाही तर तो अविश्वास कामदार गणला जातो. ज्याला एक दान दिले व ते त्याने जमिनीत पुरले त्याच मनुष्याला पाच दाने दिली असती तरी त्याने तसेच केले असते. ज्याला एक देणगी दिली त्याने स्वर्गीय देणगीचा नकार केला दुरूपयोग केला. COLMar 271.3
‘जो अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासु तो पुष्कळविषयी विश्वासु आहे‘‘ लूक १६ : १० अल्प वा लहान गोष्टींचे महत्त्व हे कमी समजले जाते कारण त्या अल्प वा लहान आहेत म्हणून पण त्यामुळेच आपल्या जीवनाला शिस्त लागली जाते आणि ख्रिस्ती जीवनात खरे पाहता सर्व काही महत्त्वाचे आहे. आम्ही जर अल्प वा लहान गोष्टीला कमी समजू लागलो तर ख्रिस्ती शीलसंवर्धनात किती तरी संकटे येतील. COLMar 271.4
“जो अगदी अल्प गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळविषयी ही अन्यायी आहे”लूक १६ : १०. मनुष्य जेव्हा लहान गोष्टींत अविश्वासुपणा दाखवितो तो मनुष्य निर्माता परमेश्वराची सेवा करीत नाही कारण मानवाने परमेश्वराची सेवा करावयाची आहे आणि ती सेवा न करणे म्हणजे चोरी करणे. या अविश्वासूपणाचा परिणाम त्याच मनुष्याला भोगणे भाग पडते. त्या मनुष्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होत नाही; सामर्थ्य नाही, शीलसंवर्धन नाही, ही सर्व परमेश्वराला शरण जाणे यामुळे प्राप्त झाली असती. तो मनुष्य ख्रिस्तापासून अलग जीवन जगतो त्यामुळे तो सैतानाच्या मोहाला बळी पडतो, आणि ख्रिस्ताची सेवा करीत असता चुका करितो. कारण अल्प गोष्टीविषयी परमेश्वराची धर्म-तत्त्वे मान्य करीत नाही, त्यामुळे तो महान कार्य करीत असतांना परमेश्वराची आज्ञा पाळणे यात पराभूत होतो. अल्प गोष्टींचे जीवनातील महत्त्व जाणत नाही आणि त्यामुळे जीवनातील महत्त्व जाणत नाही आणि त्यामुळे जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीतही तसेच करितो. जे त्याच्या अंगी वळण पडले त्याप्रमाणे तो करीत असतो. अशा प्रकारे कृतिपासून संवयी जडतात व संवयीपासून शील घडते आणि आपले शील यावरून आपले या काळातील व सार्वकालिक जीवनातील स्थान कोणते हे ठरविले जाते. COLMar 272.1
लहान वा अल्प गोष्टीत विश्वासूपणाने राहाणे तो सत्य शिक्षणाचे अनुकरण करणे याद्वारे महान गोष्टींची जबाबदारी घेता येते. परमेश्वराने दानीएल व त्याचे सोबती यांचा परिचय बाबेलोन येथील महान लोकांशी आणिला. यासाठी त्या विधर्मी लोकांना खऱ्या धर्माची तत्त्वे समजली जावी. त्या मूर्तीपूजक राष्ट्रांत दानीएलास परमेश्वराच्या खरेपणाचा प्रतिनिधी असे व्हावयाचे होते, दानीएल त्या मोठ्या पदासाठी व सन्मानासाठी कसा काय योग्य ठरला गेला? दानीएल हा लहान गोष्टींत विश्वासू राहिला. त्यामुळे तो अधिक उठावदार व खरेपणाचा दिसून आला. दानीएलाने त्याच्या लहान कार्यातही परमेश्वराचा सन्मान केला, आणि परमेश्वराने दानीएलाशी सहकार्य केले. “दानीएल व त्याच्या सोबत्यास परमेश्वराने सर्व विद्या व ज्ञान यात निपुण व प्रवीण केले, दानीएल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने याचा उलगडा करण्यात तरबेज झाला‘‘ दानीएल १:१७. COLMar 272.2
जसे परमेश्वराने दानीएलास बाबेलोनांत साक्ष देणेसाठी पाचारण केले. तसेच आम्ही या जगात साक्षीदार व्हावे म्हणून परमेश्वर आम्हास पाचारण करीत आहे. परमेश्वराच्या राज्याची तत्त्वे लहान वा मोठ्या कार्यात आम्ही इतरांना प्रगट करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. COLMar 272.3
ख्रिस्त या पृथ्वीवर असताना त्याने बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिले. हा धडा त्याने आम्हांस शिकविला. तारण कार्याचे मोठे ओझे येशूच्या अंत:करणावर होते. येशू लोकांना शिक्षण देणे व बरे करणे हे कार्य करीत असताना तो प्रत्येक कार्य पूर्ण मनाने व पूर्ण शक्तिने करीत असे, हे कार्य करीत असता जीवनातील व निसर्गातील साध्या गोष्टीकडे त्याने लक्ष दिले. येशूने जे बोधपर धडे दिले ते निसर्गातील साधी उदाहरणे वा गोष्टी यावरून स्पष्टिकरण केले व स्वर्गीय राज्याचे महान सत्य शिकविले. येशूने त्याच्या नम्र सेविकांच्या गरजा याकडे दुर्लक्ष केले नाही. येशूने प्रत्येक गरजू मनुष्याची प्रार्थना ऐकली. त्या गरजू स्त्रीने येशूला लोक समुदायात स्पर्श केला तो येशूला जाणवला, तिने विश्वासाने गोंडयाला केलेला स्पर्श त्यांसाठी येशू थांबला व प्रतिउत्तर दिले. जेव्हा येशूने याईराच्या कन्येस मरणातून उठविले, तेव्हा येशू म्हणला, तिला काही तरी खावयास देणे. येशू महासामर्थ्याने मरणानंतर तीन दिवसांनी पुनरूत्थित झाला; त्यानंतर त्याने, त्यास गुंडाळलेली वस्त्रे घडी करून व्यवस्थित ठेविली. COLMar 273.1
आम्ही ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताबरोबर सहकार्य करून आत्म्यांचे तारण करावे यासाठी काम करणे हे पाचारण केले आहे. ख्रिस्ताबरोबर काम करणे हा करार आपण केलेला आहे. या कामाची हेळसांड वा निष्काळजीपणा करणे म्हणजे आम्ही ख्रिस्ताशी अप्रमाणिक असे गणले जातो. हे कार्य आम्हांस करावयाचे तर आम्ही विश्वासूपणे सद्विवेकाने ख्रिस्ताचे अनुकरण करावे व बारीक सारीक गोष्टीचीही काळजी घ्यावी. ख्रिस्ती जीवनाचा प्रभाव प्रत्येक कार्यभागातील यशाचे गूढ हेच आहे. COLMar 273.2
परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी यशाच्या टोकाला जावे; परमेश्वराचे गौरव करावे व त्यासाठी ख्रिस्त जी जी दाने देईल त्यांचा उपयोग करणे परमश्वराच्या कृपेने आम्हासाठी सर्व काही चांगल्या प्रकारे योजना व कार्ये आहेत आणि जगापेक्षा चांगली आहेत. आम्ही परमेश्वरावर भाव ठेवितो, त्याच्या सामर्थ्याने मानवांच्या अंत:करणावर कार्य करितो त्याप्रित्यर्थ आम्हांकडे चांगले ज्ञान, समस्यांचा समज, कलाकौशल्य व माहिती ही आहेत. COLMar 273.3
पण ज्यांना अधिक देणगीचा वर्षाव नाही त्यांनी निराश होणेचे कारण नाही. परमेश्वराने त्यांना जी देणगी दिली तिचा विश्वासूपणे उपयोग करणे, त्याच्या जीवनातील कमकुवत गुण परमेश्वर कृपेने काढून जीवन भक्कम करणे. आमच्या प्रत्येक कृतित विश्वासूपणा व प्रमाणिकपणा ही विणत जाणे व त्याद्वारे परमेश्वराने जे काम दिले ते पूर्ण करणे. COLMar 273.4
निष्काळजीपणा या संवयीवर निश्चयपूर्वक विजय मिळविणे. पुष्कळजण त्यांच्या कितीतरी चुका होतात. त्याविषयी एकच कारण सांगतात की ते विसरले. पण इतरांना जरी बुद्धिमत्ता आहे तशी त्यांनाही नाही काय? मग त्यांनी त्याची स्मरणशक्ति वाढवावी. विसरणे हे एक पाप आहे, निष्काळजीपणा हे ही पाप आहे. जर तुम्हास निष्काळजीपणाची सवय लागली तर तुम्ही एका वेळी तुमच्या तारणाविषयी विसरून जाल आणि शेवटी तम्हास असे समजेल की स्वर्गीय राज्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयारी केली नाही. COLMar 274.1
महान गोष्टींचा समावेश लहान गोष्टीत करणे. आपल्या जीवनातील लहान गोष्टीतही आपण आपले धर्मपालन केले पाहिजे. कोणाही मनुष्याचा महान गुणधर्म म्हणजे परमेश्वराची आज्ञा निमुटपणे पाळणे. COLMar 274.2
काही लोकांना असे वाटते की धार्मिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही म्हणून त्यांचे जीवन हे निरूपयोगी आहे; आणि परमेश्वराच्या स्वर्गीय राज्याची वाढ व्हावी यासाठी ते काही करीत नाहीत. पण हे चुकीचे आहे. जर त्यांचे काम दुसरा करीत असेल तर त्यांनी स्वतः असा कधीही दोष देऊ नये की परमेश्वराच्या महान मंदिरात ते निरूपयोगी आहेत. जी नम्र लहानशी का सेवा असो तिच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कोणतेही काम प्रामाणिकपणे केले तर ते आशीर्वादीत आहे आणि ते विश्वासूपणे केले वा करणे म्हणजे अधिक जबाबदारीचे प्रशिक्षण असे आहे. COLMar 274.3
परमेश्वरासाठी केलेले कोणतेही साधे काम त्यात आम्ही ‘स्व’ ला समर्पण करून परमेश्वराला मान्य असे केले ते काम सर्वश्रेष्ठ सेवा आहे. परमेश्वराला जे अर्पण आनंदाने व खऱ्या अंत:करणाने दिले ते केव्हाही अल्पदान समजले जात नाही. COLMar 274.4
आम्ही कोठेही असो आम्हांस ख्रिस्त त्यांचे कार्य करावयास पाचारण करितो. जर हे काम घरी करणे आहे तर ते घरकाम आनंदाने व प्रेमाने करा व घर आकर्षक ठेवा. जर तुम्ही आई-माता असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना ख्रिस्तासाठी शिक्षण द्या. तुम्ही हे कार्य परमेश्वरासाठी करीत आहात आणि या कार्याची तुलना वा महत्त्व व्यासपीठावर संदेश देणारा पाळक याजबरोबर आहे. जर तुमचे काम स्वयंपाक घरात असेल तर ते पूर्ण आहार करणे यासाठी प्राविण्य दाखवा. अन्न असे तयार करा की ते आरोग्यदायी, पौष्टिक व खावेसे वाटणारे. तुम्ही भोजन तयार करीत असताना जे जे पदार्थ वापरणार ते विचारपूर्वक वापरा. जर तुम्ही शेतात काम करीत असाल किंवा कोणताही धंदा वा व्यापार करीत असाल त्यात तुम्ही यश मिळवा. तुम्ही जे काम करीत आहात त्यात तुमचे मनही घालणे. तुमच्या सर्व कामात तुम्ही ख्रिस्ताचे प्रतिनिधी असे कार्य करा. जर ख्रिस्त तुमच्या जागी असता व त्याने ते काम कसे केले असते. तसे तुम्ही कर।. COLMar 274.5
तुमची देणगी कितीही लहान असो, पण परमेश्वराने तिच्यासाठी स्थान ठेविले आहे. ते एक दान वा देणगी सुजाणपणाने जर उपयोग केला तर त्याद्वारे त्याचे नेमलेले काम पूर्ण होईल. लहान कामात विश्वासूपणे काम करणे म्हणजे कार्याची वाढ बेरीज पध्दतीने होणे, आणि त्यानंतर परमेश्वर आम्हासाठी त्या योजनेत गुणाकार पध्दतीने वाढ करील. परमेश्वराच्या कार्यात ही एक लहान देणगी त्याच्या कार्याच्या वाढीसाठी मौल्यवान् प्रभावी साधन होईल. COLMar 275.1
जीवत विश्वास जणू काय सोनेरी धागा याप्रमाणे प्रत्येक लहान कार्यात गोविला जावो. असे झाले म्हणजे दररोजच्या प्रत्येक कामात ख्रिस्ती वाढ होईल. आम्ही सतत ख्रिस्ताकडे पाहात राहू. आम्ही जे जे काम हाती घेऊ त्यामध्ये ख्रिस्तासाठी प्रिती ही शक्ति आम्हास प्राप्त होईल. अशा प्रकारे आम्ही आमच्या देणगीच्या योग्य उपयोगाद्वारे ही जी सोनेरी साखळी हिने आम्ही स्वर्गीय जगाशी संबंधीत होऊ. हेच खरे पवित्रीकरण आहे, पवित्रीकरणात समावेश दररोज आपले कार्य हसतमुखाने करीत असताना त्यात परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आज्ञापालन करणे. COLMar 275.2
परंतु कित्येक ख्रिस्ती लोक, काही विशेष काम त्याच्याकडे यावे म्हणून वाट पाहात बसतात. कारण त्यांच्या ध्येयाप्रमाणे त्याना समाधानी काम दिसत नाही, त्याच्या समोर येणारी लहानसहान कामे ते, विश्वासूपणे करीत नाहीत. कारण अशा कामात त्यांना गोडी भासत नाही. परमेश्वराप्रित्यर्थ विश्वासूपणे काम करणेची दिवसेंदिवस येणारी संधी ते दवडतात. अशाप्रकारे ते महान कार्याची वाट पाहात असता आयुष्य संपत असते, आयुष्याचा जो हेतू आहे तो अपूर्ण राहातो व काम अपुरे राहाते. COLMar 275.3