या दाखल्यात ख्रिस्त पेरणारा याचे दर्शक असून तो प्रत्येक जमिनीत बी पेरितो आणि त्या त्या जमिनीच्या प्रकाराप्रमाणे पीक येते. प्रत्येक जमिनीत पेरणारा व बी हे एकच आहेत. यावरून आम्हास धडा शिकावयाचा म्हणजे बी जर योग्य पीक देत नसेल तर त्याला कारण म्हणजे आमची अंत:करणरूपी जमीन आणि म्हणून त्याचे कारण आपल्या अत:करणात शोधून काढणे. जे कारण असेल ते काय आपल्या आवाक्यापलीकडे असू शकणार नाही. खरे पाहता आम्ही आपले अंत:करण याचा पालट करू शकणार नाही पण चागली निवड करणे हे आपल्या मनावर असणार, आणि आम्ही काय निवडणे हेही आपल्यावर अवलंबून असणार. वाटेवर खडकाळ व काटेरी जमीन अशाप्रकारे असावे असे काही नाही जगिक मोहाद्वारे मनुष्य गुरफटून जातात अशा लोकांची सुटका व्हावी म्हणून पवित्र आत्मा शोधीत असतो व त्या लोकाना स्वर्गीय संपत्तीची आशा प्राप्ती याकडे त्यांचे लक्ष वेधून घेतो. पवित्र आत्म्याला विरोध करणे यामुळे ते लोक परमेश्वराचे वचनाकडे दुर्लक्ष देतात व वचन ऐकत नाहीत. ते स्वतः त्यांच्या अंत:करणाच्या कठीणपणास जबाबदार आहेत, यामुळे देवाचे वचन त्यांच्या अंत:करणात दुष्ट कृत्यांची वाढ होऊन वचनाची वाढ खुंटविली जाते. COLMar 31.1
अंत:करणरूपी बागेची मेहनत केली पाहिजे. पापाचा पश्चाताप यामुळे मनमाती खणून काढणेची गरज आहे. सैतानाने लावलेली विषारी झाडे उपटून काढून बाजूला टाकणे. ज्या मनोभूमीत पूर्वी काटेकुसळे आली त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला असेल त्यासाठी मेहनत करणे व खत घालणे ही गरज आहे. अंत:करणाच्या दुष्ट भावना यावर विजय केवळ येशूच्या नामाने व चिकाटीने मिळविणे प्रभु त्याच्या संदेशाद्वारे म्हणतो, “आपली पडीत जमीन नागरा, काटयामध्ये पेरू नका‘‘ यिर्मया ४:३. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेराणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल”होशेय १०:१२. आम्ही हे कार्य करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे व या कार्यात आपण परमेश्वराशी सहकार्य करावे ही त्याची अपेक्षा आहे. COLMar 31.2
जो पेरणारा आहे त्याने लोकाच्या अंत:करणाची तयारी करावी म्हणजे ते सुवार्ता स्विकारतील. सुवार्ता कार्यात अधिक उपदेश केला जातो व अंत:करणाचा अंत:करणाशी संबंध हे कार्य कमी केले जाते. जे बहकलेले लोक आहेत त्यांच्याशी वैयक्तिक संबंध ठेवणे फार गरजेचे आहे. ख्रिस्ताच्या सहानुभूतीने आम्ही लोकांशी वैयक्तिक संपर्क साधावा व त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनाच्या गोष्टींची गोडी निर्माण करावी. वाटेप्रमाणे त्यांचे अंत:करण कठीण असू शकेल, आणि त्यांना तारणारा येशूची माहिती सांगणे हे निरर्थक वाटेल, त्यांना सुवार्ता सांगणे याबाबत युक्तिवाद चालणार नाही, वाद, संवाद करून त्यांचा पालट होणार नाही, पण आपल्या वैयक्तिक सेवेतील ख्रिस्ताची प्रिती प्रकट केली तर त्यामुळे त्यांचे कठीण वा कठोर अंत:करण हे मऊ वा विचारी होवून सत्याचे वचनरूपी बी रूजू लागेल. COLMar 31.3
पेरणाराने करावयाचे काम: मातीचा उथळपणा यामुळे रोप वाळून जाऊ नये, किंवा काटेरी झाडामुळे वाढ खुंटू नये, यासाठी प्रत्येक ख्रिस्ती जीवनाच्या वाढीसाठी जी तत्त्वे आहेत. त्यांचे पूर्ण शिक्षण दिले पाहिजे. ख्रिस्ताच्या बलीदानाने मानवाचे तारण होते एवढेच त्याला शिकविणेची गरज नाही तर ख्रिस्ताचे शील हे तो तारण पावलेला इसम याचे शील व्हावे व ख्रिस्ताचे जीवन हे त्याचे जीवन व्हावे. सर्वानी हे लक्षात ठेवावे की त्याना ख्रिस्ताच्या ओझ्याचे सहभागीदार होणे आणि पापवृत्तीचा नकार करणे, ख्रिस्ता प्रित्यर्थ काम करणे यात किती आशिर्वाद आहे. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणजे किती स्वार्थ त्याग करणे व ख्रिस्ताचा शूर शिपाई म्हणून किती कठीण प्रसंगाला तोंड देणे हे त्यांना समजून येऊ द्या. ख्रिस्तावर प्रिती करणे व त्यांची सर्व काळजी त्याजवर टाकणे हे त्यांनी शिकले पाहिजे. ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणेचा आनंद याचा अनुभव त्यांना येऊ द्या. जे आत्मे हरवलेले आहेत त्यांच्यावर प्रिती करणे, त्यांच्या जीवनाबाबतची काळजी घेणे याऐवजी परमेश्वरावर विश्वास ठेवणे व त्याजवर अवलंबून राहणे हे त्यांनी शिकावे. याद्वारे इतरांसाठी काम करीत असता ते स्वत:ला विसरून जातील. जागिक चैनबाजीची त्यांच्यावर सत्ता चालणार नाही व त्याना त्रासही होणार नाही. सत्याचा नांगर चागली खोलवर नांगरणी करील. पडीक शेत चांगले नांगरले जाईल. नांगरणी केली त्यामुळे काटेरी व विषारी झुडुपांची छाटणी होईल असे नव्हे तर त्या सर्व झुडुपांना मुळासह काढून टाकले जाईल. COLMar 32.1