“काटेरी झाडांमध्ये जो पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात, आणि तो निष्फळ होतो’ मत्तय १३:२२. COLMar 26.1
सुवार्ता बी बहुधा काटेरी व विषारी झाडा-झुडुपात पडते. जर मानवी जीवनात नितीमत्ता येत नाही, जुने मनुष्यपणाच्या सवयी, चालीरिती व पापे सोडीत नाही, आध्यात्मिक जीवनातून सैतानाचा स्वभाव काढून टाकला जात नाही तर गव्हाचे पीक खुटले जाईल. काटेरी झुडुपाची जास्त वाढ होवून गव्हाची वाढ होऊ देणार नाही. COLMar 26.2
सत्यासाठी जो आत्मा उत्सक असतो त्याच आत्म्यांत कपेची वाढ होते पापाची काटेरी कोठेही वाढू शकतात त्याला मेहनत केलेले शेत हवे असे नाही, पण कृपेसाठी मात्र मेहनत केलेले शेत हवे असते. काटेरी व विषारी झाडे कोठेही उगवतात व वाढतात पण शुध्दीकरणाचे कार्य हे सतत चालले पाहिजे. जर आपले मन परमेश्वराच्या ताब्यात ठेविले नाही, जर पवित्र आत्म्याद्वारे आपले शील व शुध्द व कर्तबगार होत नाही, तर आमच्या जीवनातील जुन्या सवयी आपोआप येतील. लोक सुवार्तेवर त्याचा विश्वास आहे असे सांगतील, पण त्यांचे जीवनात पवित्रीकरण दिसत नाही तर सुवार्तेवरील त्यांचा विश्वास हा काहीच नाही. जर ते लोक त्याच्या पापावर विजय मिळवील. त्या काटेरी झाडावरील काटे कदाचित कापून टाकली असतील पण काटेरी झाड उपटून टाकले नाही, परिणामी त्या झाडाने आत्म्यावर काटेरी छाया केली. COLMar 26.3
ख्रिस्ताने, आत्म्यासाठी ज्या गोष्टी धोकादायक आहेत त्यांची नोंद केली. संत मार्क याने लिहिले त्याप्रमाणे येशूने सांगितले. या संसाराची चिंता, द्रव्याचा मोह व इतर विषयांचा लोभ‘‘ मार्क ४:१९ लूक सांगतो, “संसाराची चिंता, धन व विषयसुखे यात आयुष्यभ्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत‘‘ लूक ८:१४ या सर्वामुळे वचनाची वाढ खुंटते, त्याला अध्यात्मिक फळे येत नाहीत. लोक ख्रिस्तापासून आध्यात्मिक अन्न घेत नाहीत. त्यामुळे लोक अध्यात्मिक दृष्टिने मरण पावतात. COLMar 26.4
“संसाराची चिंता‘‘ संसाराची चिंता ही सर्वाना आहे. गरीबांना, कष्ट व बेरोजगारी, नुकसान याचे भय व चिंता वाटते. श्रीमंतः धनाचे नुकसान इतर अनेक चिंता व भय वाटते. राज्यातील भूकमळे पाहा व त्या पासून बोध घ्या असे येशूने सांगितले. हे ख्रिस्ताचे अनुयायी विसरतात. परमेश्वर सर्वदा काळजी घेतो यावर ते विश्वास ठेवीत नाहीत. लोक त्यांची चिंता प्रभूवर टाकीत नाही म्हणून प्रभू त्याचे ओझे वाहू शकत नाही. यामुळे संसाराची चिंता त्या लोकांनी मदतीसाठी ख्रिस्ताकडे जाणे, मदत घेणे व समाधान पावणे पण ते लोक तसे करीत नाहीत म्हणून तारणारा येशूपासून ते विभक्त होतात. COLMar 27.1
परमेश्वराच्या सेवेत जे लोक किती फलदायी होती लते लोक धनवान कसे व्हावे अशा प्रयत्नात लागतात. धंदा करणे यामध्ये ते त्यांची सर्व शक्ति खर्च करीत असतात. आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, त्या प्रित्यर्थ ते दुर्लक्ष करीतात. अशाप्रकारे ते स्वत:ला परमेश्वरापासून विभक्त करीतात. आम्हांस पवित्रशास्त्रात “आस्थेविषयी मंद नसणारे‘‘ रोम १२:११ जे लोक गरजू आहेत त्याची गरज भागावी यासाठी आम्ही काय केले पाहिजे. ख्रिस्ती लोकांनी काम धंदा उद्योग हे केलेच पाहिजेत पण हे करीत असता त्यांनी कोणत्याही पापाला बळी पडू नये. परंतु कित्येक ख्रिस्ती लोक त्यांच्या उद्योग धंदयात इतके गुंग होतात की त्यांना प्रार्थना व उपासना करावयास अजिबात वेळ मिळत नाही. पवित्रशास्त्राचा अभ्यास करावयास वेळ मिळत नाही, परमेश्वराचा शोध करणे व सेवा करणे, यासाठी ही वेळ मिळत नाही. कधी कधी त्यांच्या आत्म्याची ओढ, आतुरता, पवित्रता व स्वर्गाकडे लागते, पण त्यांच्या धंदा उद्योगातील आवाज, गोंगाट, जगिक संबंध यामुळे स्वर्गीय राजकीय पवित्र आत्म्याची आकर्षक वाणी ही कानी पडतच नाही. सार्वकालिक गोष्टींना दुसरा दर्जा दिला जातो, व जगातील गोष्टीला प्रथम दर्जा दिला जातो. अशा परिस्थितीत देवाचे वचन वाढून त्याला फळ येणे अशक्य आहे. कारण त्या भूमीतील जीवनसत्त्व जीवनी वचनाला मिळणे ऐवजी ते काटेरी झाडे व विषारी झाडे यांना देण्यात आले. अर्थात जगिक गोष्टीला पुरवठा केला गेला. COLMar 27.2
पुष्कळजण वेगवेगळया हेतुस्तव काम करीत आहेत आणि ते सर्वजण एकच चूक करीत आहेत. ते इतरांचे भले व्हावे म्हणून काम करीतात, त्यांच्या कामाचा पसारा वाढत आहे, त्यांच्यावर कितीतरी जबाबदारीचा बोजा वाढत आहे, आणि परिणामी यामुळे या सर्वांमुळे त्यांच्या उपासनेचा वेळ घेतला जातो. पवित्रशास्त्राचा अभ्यास व प्रार्थना याद्वारे परमेश्वराशी दळणवळण यात निष्काळजीपणा केला जातो. ‘मजपासून वेगळे असल्यास तुम्हांस काही करीता येत नाही’ योहान १५:५ असे येशूने सांगितले होते. यांचा त्यांना विसर पडला होता. ते ख्रिस्ताला सोडून चालू पाहतात. त्यांचे जीवन हे ख्रिस्ताच्या कृपेने व्यापलेले नाही, तर त्याचा स्वार्थीपणा प्रगट केला जातो. त्यांच्या सेवतील अडखळणे, त्यांना सर्व सत्ताधिकार हवा, त्यांचे अंत:करणात कठोर, प्रितीचा लवलेश नाही तर उलट हटटी अंत:करण अशा स्वभावाचे ते आहेत. ख्रिस्ती कार्यात अपयश का येते. त्यांची ही वरील कारणे आहेत आणि म्हणून त्यांना सुवार्ता सेवेत अपुरे यश मिळते. त्याचीही हीच कारणे आहेत. COLMar 27.3
“द्रव्याचा मोह‘‘ द्रव्याची हाव धरणे, हा एक मोठा मोह आहे, हा फसविणारा मोह आहे. या जगात ज्या लोकांजवळ पुष्कळ धनसंपत्ती आहे ते लोक हा मुद्दा विसरतात. परमेश्वराच्या सामर्थ्याने त्यांना धनप्राप्ती होत असते. ते म्हणतात “... हे धन माझ्याच सामर्थ्याने व भुजबलाने मला प्राप्त झाले आहे’ अनुवाद ८:१७ धन प्राप्तीमुळे त्यांना परमेश्वराची उपकारस्तुति करणे त्याऐवजी ते स्वत:ची फुशारकी मारतात. परमेश्वरावर अवलंबून राहणे व आपला सहबंधु यांना मदत करणे याची त्यांना जाणीव राहत नाही. धन हे परमेश्वराने दिलेले दान आहे आणि या धनाचा उपयोग परमेश्वराचे गौरव करणे व पतित मानवांचा उध्दार करणे यासाठी करावा, असे करणे याऐवजी ते त्या धनाचा उपयोग स्वत:च्या सुखसोईसाठी करीतात. वरीलप्रमाणे असा जर संपत्तीचा उपयोग केला तर त्याचे शील परमेश्वराच्या शीलाप्रमाणे होणे याऐवजी सैतानी वृत्तीचे शील होईल. असे होणे म्हणजे देवाचे (परमेश्वर) वचन काटेरी झाडामुळे खुंटले जाते. COLMar 28.1
“विषयांचा लोभ’ स्वत:ची करमणुक व्हावी अशा करमणुकीत धोका आहे. मन गोंधळत राहणे, आध्यात्मिक दृष्टीकोन मंदावणे वा बोथट होणे आणि अशा हया, “जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा’ १ पेत्र २:१२. COLMar 28.2
“आणि इतर गोष्टींचा लोभ’ या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यात पापी असे काही नाही, पण त्या गोष्टीला प्राधान्य देणे याऐवजी परमेश्वराच्या राज्याला प्राधान्य द्यावयास हवे. कोणत्याही गोष्टीमुळे आपले मन परमेश्वरापासून दुसरीकडे आकर्षक केले जाते. ख्रिस्तावर प्रिती करणे ऐवजी आम्ही इतर कशावर प्रिती करू लागलो तर ते आपल्या आत्म्याचा शत्रू आहे असे समजणे. COLMar 28.3
जेव्हा मनुष्य तारूण्यांत असतो, जोमात असतो व भरभराटीकडे त्याची प्रवृत्ती असते तेव्हा ध्येयवादी विचार असतात त्यामुळे स्वत:चा जादा विचार असतो. जर जगिक गोष्टी विजयी दिसतील तर सद्विवेकाकडे जादा लक्ष दिले जात नाही व ज्यामुळे आपले शील बनले जाते अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा अशा वाढीसाठी परिस्थिती साथ देते, पण देवाचे वचन आड येते. COLMar 28.4
लेकरांच्या अशा प्रकारच्या जीवन नमुना यावेळी आईबापाची महान जबाबदारी असते. अशावेळी त्यांच्या तरूण मुलामुलींचे वातावरण कसे आहे याचा अभ्यास करणे व त्यांच्या जीवनावर योग्य पगडा (प्रभाव) पाडणे म्हणजे त्यामुळे त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजून ते त्यांच्या जीवनांत खरे विजयी होतील. याऐवजी किती तरी आईबाप प्रथमत: त्यांच्या मुलांमुलींना जगिक बाबतीत भरभराटीस यावे असाच प्रथमत: हेतू धरीतात. वरील हेतू धरूनच त्यांचे सर्व संपर्क साधले जातात आणि त्या लोकांकडून त्यांना जगिक बाबींत प्रोत्साहन प्राप्त होते व त्यातच त्यांना अभिमान वाटतो. अशा वातावरणात मन व शरीर यांची वाढ खुटली जाते. जगिक स्वार्थाने, स्वर्गीय राज्याचे वारीस होणे व परमेश्वराचे पुत्र व कन्या होणे या भागाच्या विचारास प्रतिबंध केला जातो. COLMar 29.1
पुष्कळ आईबाप त्यांच्या मुलांची करमणुक करणे यातच भाग घेतात व यातच त्यांना आनंद वाटतो. यासाठी मुलामुलींनी खेळात भाग घ्यावा म्हणून त्यांना परवानगी देतात, मेजवानीस जावू देतात व या सर्वाच त्यांना आनंद उपभोगता यावा म्हणून पैसेही देतात. अशाप्रकारे चैनीची आशा वाढत जाते आणि पुढे त्या तरूणांना वाटते जीवनात अशा प्रकारे आनंद हेच जीवनाचे ध्येय आहे. यामुळे ते तरूण आळशी बनतात व स्वार्थात गुरफटून जातात आणि पुढे असे तरूण ख्रिस्ती जीवनात कधीच स्थिरावले जात नाहीत. COLMar 29.2
मंडळीत तरूणांना सत्याचे शिक्षण देवून खंबीर व स्थिर करावयास हवे, पण मंडळीत स्वार्थी प्रिती व ख्यालीखुशाली ही चालते. धार्मिक कार्यासाठी जेव्हा पैसे उभारणे अर्थात फंड गोळा करणे यासाठी धार्मिक मंडळीत कोणकोणते प्रकार चालतात ? बाजार भरविणे, मेजवानी करणे, करमणुकीचे कार्यक्रम करणे, लॉटरी काढणे व यासारखे इतर कार्यभाग करणे. चर्च वा उपसना मदिरात केवळ भक्ति भरविणे पण तेथे मेजवानी, मद्य पिणे, खरेदी-विक्री करणे, चैनबाजी करणे असे प्रकार चालतात. त्यामुळे परमेश्वराचे उपासना मंदिर याविषयीचा आदर सत्कार तरूणांच्या मनात कमी होतो. आत्मसंयमन कमी होते, कमकुवत होते. स्वार्थीपणा, भूक, थाटमाटाची हौस आणि त्यात ते भाग घेत असता त्यांची हाव अधिकच वाढत जाते. COLMar 29.3
शहरात चैनीची व करमणुकीची केंद्रे स्थापन करणेचा प्रयत्न करणे, पुष्कळजण त्यांच्या लेकरांसाठी शहरातच घरे बांधतात, कारण त्यामुळे लेकरांना फायदा होईल, पण असे केले म्हणून त्यांना निराशा वाटेल व त्यांची चूक दुरूस्त करणे यात फार उशीर झाला असे दिसून येईल. सध्याची शहरे पुर्वीच्या सदोम व गमोरा या शहरासारखी दुष्टतेने भरलेली दिसून येत आहेत. पुष्कळ सुट्टीचे दिवस केवळ आळसाचे प्रोत्साहन देतात. सध्याचे खेळ, सिनेमास जाणे, घोडा-शर्यती, पत्ते व आकडा खेळणे, लॉटरी खेळणे, दारू पिणे यावरून एक दिसून येते की, या सवयीमुळे मनोविकार वाढत जातात व लोकस्तुती प्रवाहात तरूण वाहत जात आहेत. जे कोणी स्वत:ची लालसा भागविणे यासाठी करमणुकीचे कार्यक्रमावर जादा प्रिती करीतात ते स्वत:साठी मोहाचे दार खुले करोतात. ते सामाजिक मौज व विचारीहीन मौज याद्वारे अशा प्रकारे त्यांच्या मनावर दुष्परिणाम होतात आणि त्यांची एकामागून एक अशी फसवणूक होत जाते व अखेर जीवनात उपयोगी व हितकारक काय हे समजणेची इच्छा व कुवत राहत नाही. त्यांचे धार्मिक विचार थंडावले जातात, त्यांचे आध्यात्मिक जीवन अंधकारमय होते. आत्म्याची सर्व उच्च ध्येये व आत्म्याचे सर्व संबंध जगापासून तोडले जातात. COLMar 29.4
काही जण त्यांच्या चुकांची कबुली करून पश्चाताप करीतील. परमेश्वर त्यांची क्षमा करील. पण त्यानी त्यांच्या आत्म्यास दु:ख दिले व त्यामुळे त्यांच्या सर्व जीवनावर दुष्परिणाम व अनर्थ घडवून आणिला. बरे व वाईट समजणे ही सद्विवेक शक्ति त्यांची बहतांशी नाहीशी झाली वा केली गेली. पवित्र आत्म्याची वाणी त्याना मार्गदर्शन करीत असते. हे त्याना लवकर समजत नाही. जीवनातील धोक्याच्या प्रसंगी ते मोहाला बळी पडतात व ते परमेश्वरापासून दुरावले जातात. त्याचे हे ख्यालीखुशालीचे जीवन याचा या जगात नाश झालाच झाला पण येणारे जग त्यापासून हे विभक्त झाले. त्यामुळेही नाश झाला असे समजणे. COLMar 30.1
मानवी आत्म्याशी खेळ खेळणे यासाठी सैतान या जगाची चिंता, श्रीमंती व ख्यालीखुशाली अशा साधनांचा उपयोग करितो. याबाबत इशारा दिला जातो. “जगावर व जगातील गोष्टीवर प्रिती करू नका. जर कोणी जगावर प्रिती करीतो तर त्याच्या ठायी पित्याची प्रिती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळयांची वासना व संसाराची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.’ १ योहान २:१५,१६. जो परमेश्वर मानवाची अंत:करणे एकाद्या उघड पुस्तकांप्रमाणे वाचतो: “तुम्ही आपणास सभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंत:करणे जड होऊन तो दिवस ‘पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हांवर येईल‘‘ लूक २१:३४ आणि प्रेषित पौल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहितो‘, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पाशांत आणि मनुष्यांस नाशात व विश्वासात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटांचे मूळ आहे, त्यांच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत, आणि त्यांनी स्वत:स फार खेदानी भोसकून घेतले आहे’ १ तिमथ्य ६:९, १० COLMar 30.2