“खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो, व तत्काळ ते आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे सकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो’ मत्तय १३:२०,२१. COLMar 23.1
खडकाळीवर जे बी पेरलेले असते तेथे थोडीशीच माती असते. ते बी तेथे लवकर रूजते पण खडकात मूळ खोलवर जाऊन वाढीसाठी अन्न शोषण करू शकत नाही, त्यामुळे ते रोप लवकरच वाळून जाते. ते लोक धर्माचा दांभिकपणा दाखवितात. त्यांची तुलना खडकाळीवर पेरलेले अशांबरोबर केली जाते. त्याच्या जीवनातील सर्व चागले हेतू व ध्येय यांच्या मुळाशी स्वार्थीपणा आहे म्हणजे खडकाळ जमीन आहे. त्यांच्यातील पापी स्वभाव त्यांना दिसून येत नाही, पाप दोषामुळे त्याचे मन नम्र होणे ऐवजी कठीण झालेले असते. अशा प्रकारच्या लोकांचा लवकर पालट होतो. ते चागले, भावी सभासद होतील असे वाटते, पण त्यांचे हे सर्व काही वरपांगी धार्मिकता असे असते. COLMar 23.2
या लोकांचे पतन होते याचे कारण म्हणजे ते लोक परमेश्वराचे वचन त्वरीत स्विकारतात व त्या वचनात ते आनंदीत असतात असे नव्हे. मत्तयाने येशूचे पाचारणाची हाक ऐकून, तो लगेच उठला, सर्वस्वी तेथेच सोडले व येशूचा अनुयायी झाला. परमेश्वराचे वचन आम्ही ऐकताच आपण ते स्विकारावे व ते आनंदाने स्विकारावे. “पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल‘‘ लूक १५:७ जो जीवात्मा परमेश्वरावर भाव ठेवितो त्याच्या जीवनात आनंद होईल. पण या दाखल्यात सागितलेले “देवाचे वचन स्विकारतात ते, वचनाचे मोल समजून घेत नाहीत. परमेश्वराच्या वचनासाठी त्याना किती किंमत द्यावी लागते याचा ते विचार करीत नाहीत. त्याच्या जीवनातील सवयी याबाबत ते तोंड देत नाहीत तर त्यांच्या सवयीला ते बळी पडतात. COLMar 23.3
रोपाचे मूळ हे जमिनीत खोलवर जाते व तेथून वनस्पतीला अन्नाचा पुरवठा शोषण करीत असते. अशाच प्रकारे ख्रिस्ती मनुष्य अदृश्यपणे ख्रिस्ताशी संघटित होतो व विश्वासाने आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त करून घेतो. पण खडकाळीवरील लोक हे ख्रिस्तावर अवलंबून राहणे ऐवजी स्वत:वर अवलंबून राहतात. असे लोक स्वत:ची चांगले कामे, चांगल्या भावना व स्वधार्मिकता यावर जादा भर देतात. प्रभू व प्रभूचे सामर्थ्य यामध्ये ते जादा भक्कम नाहीत असे लोक ‘याचे मूळ खोलवर नसते’ कारण त्यांचा संबंध ख्रिस्ताशी जोडलेला नसतो. COLMar 23.4
उन्हाळयातील उन्हामुळे धान्य वाळून कडक होते. फुले पिकतात व ज्या रोपाना खोलवर मुळे नसतात ती वाळून जातात. अशाच प्रकारे जो कोणी स्वत: खोल वा टिकावू नाही तो “थोडा वेळ टिकतो‘‘ “जेव्हा वचनामुळे छळ होतो व संकटे येतात तेव्हा त्यांचा अपमान होतो.”पुष्कळजण सुर्वार्तेचा स्विकार करतात. पापापासून सुटका म्हणून नव्हे तर त्रास व संकटे यापासून सुटका व्हावी हा विचार करीत असतात जीवनातील त्रास व अडचणी यातून सुटका होणे एवढया अवधी पुरती धर्माचा स्विकार करीतात. जीवन सर्व व्यवस्थित चालते तोवर त्यांचे ख्रिस्ती जीवन समपातळीत असते. पण मोहाचे प्रतिकार होवू लागताच ते मूच्छित होतात. ख्रिस्तासाठी त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन होत नाही. जेव्हा पवित्र शास्त्राद्वारे त्यांच्या जीवनातील एकादे पाप दाखविले जाते किंवा त्यांना स्वार्पण वा स्वार्थत्याग करावा लागतो तेव्हा तो त्यांना करणे अवघड जाते. कारण याद्वारे त्यांच्या जीवनात बराच फरक घडणे याची त्यांना किंमत मोजावी लागेल. सध्या होणारी अडचण, छळ ही ते पाहतात आणि भावी काळी सार्वकालिक होणारा लाभ याकडे ते दुर्लक्ष देतात. ज्या शिष्यांनी येशूला सोडून दिले व शिष्याप्रमाणे ते लोक असे म्हणावयास तयार आहेत. “हे वचन कठीण आहे, हे कोणाच्याने ऐकवेल ?.”योहान ६:६०. COLMar 24.1
पुष्कळजण म्हणतात की ते परमेश्वराची सेवा करीत आहेत पण त्यांना परमेश्वराचा प्रत्यक्ष अनुभव आलेला नाही. ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीतात ते केवळ भावनाप्रधान होऊन, तर त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य वा त्यांचा पालट झाला याद्वारे ते कार्य करीत नाहीत. परमेश्वराच्या नियमानुसार त्याचे वागणे यात साम्य दिसत नाही. ते येशू ख्रिस्ताला त्याचा तारणारा म्हणून तोंडाने स्विकारतात पण येशू त्यांना सामर्थ्य देऊन त्यांच्या पापावर जय मिळवून देईल यावर त्यांचा विश्वास नाही. तारणारा जीवंत येशू याच्याबरोबर ते व्यक्तिगत संबंध ठेवीत नाहीत, आणि त्यांच्या जीवनात वंश परंपरा असलेली व त्याना पत्करलेली अशी पापे दिसतात. COLMar 24.2
पवित्र आत्मा याची सर्वसाधारणपणे कबुली करणे आणि पवित्र आत्मा आमची पापे दाखवितो त्या पापांचा पश्चात्ताप करून सोडून देणे हे जे पवित्र आत्म्याचे कार्य आहे याचा स्विकार करणे पुष्कळ परमेश्वरापासून बहकले आहेत हे त्यांना समजते. ते पापाचे व ‘स्व’ चे गुलाम झाले आहेत, पण यातून सुटका होणे यासाठी ते काहीही करीत नाहीत. ते ‘स्व’ ला वधस्तंभी देत नाहीत. ते सर्वस्वी ख्रिस्ताला समर्पण करीत नाहीत, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणे यासाठी त्याच्या सामर्थ्याची अपेक्षा करीत नाहीत. परमेश्वराच्या प्रतिमेचे आपले शील व्हावे यासाठी काहीही करीत नाहीत. सामान्यतः त्यांना त्यांची उणीव समजते पण ते त्यांची पापे सोडावयास तयार नसतात. त्यांची प्रत्येक म्हणजे त्याचा जुना स्वभाव त्यांच्या जीवनावर पक्कड बसवितो. COLMar 24.3
अशा हतभागी आत्म्यास एकच आशा म्हणजे ख्रिस्ताने निकदेमास सांगितले. सत्य समजून घेणे “तुम्हांस नव्याने जन्मले पाहिजे‘‘ “नव्याने जन्मल्यावाचून (वरून जन्मल्यावाचून) कोणालाही देवाचे (परमेश्वर) राज्य पाहता येत नाही”योहान ३:७, ३. COLMar 25.1
खरी पवित्रता म्हणजे परमेश्वराच्या सेवेत संपूर्ण असणे खरे ख्रिस्ती जीवन जगणे याची ही अट आहे. ख्रिस्ताची मागणी “एकाग्र मनाची सेवा व संपूर्ण आत्मसमर्पण‘‘ आपले अंत:करण, आपले मन, आपला आत्मा व आपली सर्व शक्ति यांची मागणी ख्रिस्त करीतो. आपल्या मनात स्वार्थ अजिबात बाळगू नये. जो कोणी स्वत:साठी जगतो तो मनुष्य ख्रिस्ती नाही. COLMar 25.2
आपल्या सर्व कार्याचे तत्त्व प्रिती ही असावी. परमेश्वराचे राज्य स्वर्गात व पृथ्वीवर आहे. त्याचा पाया प्रिती आहे आणि प्रिती हाच पाया ख्रिस्ती शीलाचा असावा. केवळ याद्वारे तो ख्रिस्ती मनुष्य उभारला जाईल व टिकून राहील केवळ याचद्वारे तो त्या ख्रिस्ती मनुष्याला त्याच्या जीवनातील मोह व छळ यांना तोंड देता येईल. COLMar 25.3
प्रिती ही स्वार्थत्यागात दिसून येईल. अशा स्वार्थ, त्यागी सेवेत तारणाची योजना उभारली हा स्वार्थत्याग इतका रूंद, इतका खोल व इतका उंच आहे की त्याचे मोजमाप करणे अशक्य आहे. ख्रिस्ताने आम्हांसाठी सर्वस्व दिले आणि जे कोणी ख्रिस्ताला स्विकारतील त्याच्यासाठी सर्व काही द्यावयास मागे पुढे पाहणार नाहीत. प्रथमत: ख्रिस्ताचा मान व गौरव ही त्यांच्यापुढे येतील व त्यानंतर बाकी काय असेल ते करणे आणि ते ही ख्रिस्ताच्या गौरवासाठी करणे. COLMar 25.4
आम्ही जर ख्रिस्तावर प्रिती करीतो तर आम्ही त्याच्यासाठीच जीवन जगू, आम्ही आमचे उपकारस्तुतीचे ख्रिस्ताला व त्याच्या कार्यासाठी देऊ. त्यामुळे ते कार्य भारी वाटणार नाही. आम्ही ख्रिस्तासाठी दु:ख सहन करू, कष्ट करीत राह व सेवेत स्वार्थत्याग करू. इतर मानवाचे तारण व्हावे ही जी ख्रिस्ताची कळकळ आहे त्यात आपण सहभागी होऊन सेवा करू. प्रत्येक आत्म्याविषयी ख्रिस्तात जो कळवळा होता तोच कळवळा आत्म्यासाठी दाखवू. COLMar 25.5
हाच तो ख्रिस्ताचा धर्म आहे. याहून जे काही उणे असेल ती फसवेगिरी आहे. केवळ सत्य-तत्त्वज्ञान सांगणे नव्हे किंवा शिष्यत्त्वाचा ढोंगीपणा दाखविणे, यामुळे आत्म्यांचे तारण होत नाही. आम्ही जेव्हा सर्वस्वी ख्रिस्ताचे तेव्हाच आम्ही ख्रिस्ताचे होऊ शकतो. जे ख्रिस्ती अर्धे इकडे व अर्धे तिकडे असे असतात त्यांच्या जीवनाचे हेतू भक्कम नसतात, त्यांचे विचार आचार सदा बदलत राहतात. जो मनुष्य स्वत:चा हेतू पूर्ण करणे व ख्रिस्ताची सेवा करणे असे दुहेरी तत्त्वाने चालतात ते खडकाळीवर पेरलेला असा आहे आणि त्याच्या जीवनात जेव्हा संकटे व परीक्षा येतील तेव्हा तो टिकून राहणार नाही. COLMar 25.6