‘पेरणाराचा दाखला यातील मुख्य भाग म्हणजे ज्या मातीत बी वाढले हा आहे. या दाखल्यात ख्रिस्त मुख्यतः जे ऐकणारे आहेत त्यांना सांगतो, तुम्ही तेथे तटस्थ उभा राहून ख्रिस्ताच्या कार्याविषयी टीका करणे, किंवा तुमच्या मताप्रमाणे जर होत नसेल तर टीका करू नये. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे सुवार्तिक यांना तुम्ही कशा प्रकारची वागणूक देता? तुम्ही त्यांचा स्विकार करीता किंवा नकार करीता यावर तुमचे सर्वकाळचे भवितव्य अवलंबून आहे. COLMar 21.1
वाटेकडेला पडलेले बी याचे स्पष्टीकरण तो म्हणाला “कोणी राज्याचे वचन ऐकतो पण समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंत:करणात पेरलेले ते हिरावून घेतो, वाटेवर पेरलेला तो आहे‘‘ मत्तय १३:१९. COLMar 21.2
वाटेवर पेरलेला तो असा आहे, तो वचन ऐकतो पण ऐकताना त्याचे दुर्लक्ष असते. लोकांचे जाणे येणे यामुळे वाट कठीण झालेली असते, त्या वाटेवर मनुष्य व प्राणी चालत असतात, जगाच्या व्यवहारासाठी ती वाट सतत चालू असते, त्या वाटेवर जगिक ख्याली खुशाली व पापे चालू असतात. स्वध्येय व पापी मार्गात ते गुग असतात. “पापाच्या फसवणुकीने तुम्हांतील कोणी ‘कठीण’ होऊ नये‘‘ इब्री ३:१३ आध्यात्मिक शक्ति दुबळी होते. मनुष्ये वचन ऐकतात पण त्यांना वचनाचा समज येत नाही. हे वचन त्यांच्या जीवनाला लागू आहे. हे ते कबूल करीत नाहीत. त्यांच्या जीवनातील गरज वा धोका ही त्यांना समजत नाही. त्यांना ख्रिस्ताच्या प्रितीची जाणीव होत नाही, ख्रिस्ताच्या कृपेचा संदेश याचा त्यांच्या जीवनाशी काहीच संबंध नाही असे समजून ते, त्या संदेशाकडे दुर्लक्ष करीतात. COLMar 21.3
वाटेवर पडलेले बी पक्षी येऊन चटकन् खाऊन टाकतात. तद्वत् सैतान येऊन त्यांच्या अंत:करणातून देवाचे वचन हे बी चटकन् घेऊन जातो. हे निष्काळजी लोक, परमेश्वराचे वचन ऐकून जागे होतील; त्यांच्या कठीण अंत:करणावर परिणाम होईल. अशी सैतानाला भिती वाटते म्हणून जेथे सुवार्ता गाजवितात तेथे सैतान व त्याचे दूत हजर असतात. स्वर्गीय देवदूत देवाचे वचन तेथील मनुष्याच्या अंत:करणावर परिणाम घडवू पाहतात तर शत्रू उलट कार्य करणेचा प्रयत्न करीतात. दुष्ट दूत अगदी द्वेषाने परमेश्वराच्या आत्म्याच्या कार्याला प्रतिकार करणेचा प्रयत्न करीतात. ख्रिस्त प्रितीने आत्म्याचे तारण करावे म्हणून त्यांना आकर्षित करीतो तर सैतान अशा लोकांचे मन दुसरीकडे आकर्षित करू पाहातो. यासाठी सैतान त्यांचे मन जगिक गोष्टीच्या योजना याकडे लावितो. सैतान त्यांना टीका करणेस चेतावितो, त्यांच्या मनात संशय व अविश्वास ही येऊ देतो. श्रोतेजणांना उपदेशकाची भाषा व पध्दत ही आवडणार नाहीत, त्यामुळे ते दोषावरच विचार करीत राहतील. ते अशा विचारात राहतील. त्यामुळे परमेश्वराने त्यांच्यासाठी जे कृपेचे सत्य पाठविले त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. COLMar 21.4
सैतानाला अशा प्रकारे मदत करणारे पुष्कळजण आहेत. जे लोक स्वत: ख्रिस्ती म्हणवितात ते अशा प्रकारे सैतानाला मदत करणारे बनतात व त्यांच्या अंत:करणातून देवाचे वचन बी हे काढून घेऊ देतात. जे देवाचे वचन उपासना मंदिरात ऐकतात ते घरी आले म्हणजे त्यावर टीका करीत बसतात. एखादा वक्ता वा एखादा राजकीय भाषणकार त्याच्या भाषणावर टीका करणे त्याप्रमाणे उपदेशकाच्या संदेशावर टीका करीत न्यायासनावर बसतात. उपदेशकाचा संदेश हा देवाचे वचन म्हणून स्विकारणे या ऐवजी ते, टीकात्मक विचार मांडतात. पाळकाचे शील, ध्येय, कार्ये व स्वभाव, तद्वत् मंडळीच्या सभासदाच्या स्वभाव यावर टीका केली जाते. त्यांच्याबाबत कडक न्याय निर्णय दिला जातो. निंदा पुन्हा पुन्हा केली जाते असे बोलणे म्हणजे मनाचा पूर्णपालट झालेला नाही असे दिसते. आईबाप असे वरील प्रमाणे बोलतात आणि त्यांची लेकरे ऐकत असतात. अशा प्रकारे पाळकांचा सन्मान राखला जात नाही व त्यांच्या संदेशाबाबतही आदर राहत नाही. अशा प्रकारे परमेश्वराचे वचन याबाबत मनातील आदर कमी होतो व त्यांना असेच शिक्षण मिळते. COLMar 22.1
पुष्कळदा ख्रिस्ती घरातील तरूण वरील वातावरणात वाढतात त्यामुळे ते नास्तिक होतात. नंतर आईबाप प्रश्न विचारतात आमची मुले सुवार्ता संदेशात गोडी का दाखवित नाहीत, व परिणामी पवित्र शास्त्राचे सत्य मानीत नाहीत. तर त्याबाबत संशय धरतात. नंतर याच मुलांमुलीनी नैतिक व धार्मिकपणे शिक्षण देणे कसे काय द्यावयाचे असा कठीण विचार करीत बसतात, पण त्यांच्या शीलाद्वारे मुलामुलींची अंत:करणे कठीण झालेली असतात. हे त्यांना समजून येत नाही. चांगले बी त्यांच्या अंत:करणावर पडलेले असते, त्या अंत:करणात ते सत्यवचनाचे बी रूजणे यासाठी योग्य भूमिका नसते, त्यामुळे सैतान येऊन ते देवाचे वचन घेऊन जातो. COLMar 22.2