“तेव्हा मोठा लोक समुदाय एकत्र जमत असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देवून बोलला. एक पेरणारा आपले बी पेरावयास निघाला, आणि तो पेरीत असता काही वाटेवर पडले, ते तुडवून गेले व आकाशातील पाखरानी खावून टाकिले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले, काटेरी झाडे त्याबरोबर वाढल्यामुळे त्याची वाढ खंटन गेली. काही चांगल्या मातीत पडले, ते उगवून शंभरपट पीक आले. असे म्हटल्यावर तो मोठयाने बोलला ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐका”. COLMar 13.1
तेव्हा तो दाखला काय असावा, असे त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले. तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु इतरास ती दाखल्यांनी सांगितली आहेत, अशासाठी की, त्यांनी पाहत असता पाह नये व ऐकत असता समजू नये’ हा दाखला असा आहेः बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की ते ऐकतात. नंतर त्यांनी विश्वास धरून त्यांस तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येवून त्यांच्या अंत:करणातून वचन काढून घेतो. खडकाळी असलेले हे आहेत की हे ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करीतात, पण त्यास मूळ नसते, ते काही वेळपर्यंत विश्वास धरीतात व परीक्षेच्या वेळी भ्रष्ट होतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुखे यात आयष्यक्रमण करीत असता त्यांची वाढ खंटते व ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंत:करणात धरून ठेवीतात आणि धीराने फळ देत जातात’ लूक ८:४-१५. COLMar 13.2
पेरणारा व बी -पेरणाऱ्याचा दाखला याद्वारे ख्रिस्त स्वर्गीय राज्याचे कार्य व ख्रिस्ताचे त्याच्या लोकांसाठी करावयाचे कार्य हे सांगतो. पेरणारा शेतात पेरणी करीतो त्याप्रमाणे ख्रिस्त स्वर्गीय सत्य-बी पेरावयास आला. दाखले याद्वारे अमोल सत्य व कृपेचे बी पेरले गेले. दाखला अगदी साधेपणाने दिला म्हणून त्याचे महत्त्व वाटत नव्हते. पेरणी नंतर पीक येणे म्हणजे मनुष्याने परमेश्वराकडे प्रामाणिकपणे येणे, लहान बी पेरणे व त्यामुळे जे पीक येते तोच परिणाम स्वर्गीय पेरणारा सत्य पेरतो त्याद्वारे होतो. COLMar 14.1
गालील समुद्राच्या काठी येशू सभोवती आतूर लोकसमुदाय वचन ऐकावयास जमला होता. तेथे आजारी लोक त्याच्या चादरीवर पडून होते व येशू कधी बरे करील याची वाट पाहत होते. त्या पापी लोकांना बरे करणेचा अधिकार पित्याने येशूला दिला होता. येशूने रोगास धमकाविले व त्या आजाऱ्यांना आरोग्यदायी जीवन शांति दिली. COLMar 14.2
जेव्हा लोकांचे थवे ख्रिस्ताजवळ जमले तेंव्हा त्यांना बसण्यास जागा मिळेना. तेव्हा जो मचवा ख्रिस्ताला समुद्राच्या पलीकडे नेण्यासाठी थांबला होता त्यामध्ये ख्रिस्त बसला. मचवा किनाऱ्यापासून थोडा आत पाण्यात ढकलण्यासाठी त्याने शिष्यांना सांगितले. तेव्हा किनाऱ्यावर बसलेल्या लोकांशी ख्रिस्त बोलू लागला. COLMar 14.3
समुद्र किनाऱ्याच्या आसपास गनेसरेताची सपाट जमीन व टेकडया होत्या. त्या भागात शेतकरी पेरणी करीत होते, तर कुणी अगोदरच्या पीकांची कापणी करीत होते. ते दृश्य पाहून ख्रिस्ताने पेरणारा याचा दाखला दिला. (लूक ८:४-१५) COLMar 14.4
येशू ख्रिस्त याची सेवा व कार्य त्या काळातील लोकांना समजले नाही. यहुदी लोकांच्या मताप्रमाणे येशूचे येणे झाले नाही. यहुदी लोकांची शिकवण व अर्थशास्त्राचा पाया येशू ख्रिस्त होता. येशूची सेवा स्वर्गीय नेमणूक होती. यहुदी जे विधी करीत होते त्याद्वारे येशूचे येणे दर्शविले जात होते पण यहुदी लोकांनी केवळ विधी व संस्कार यांनाच उंचावून धरून तेच करीत राहिले. परंपराचे संस्कार, नितीवचन, कायदा व नियम यांचा हेतू काय हे विसरून ते केवळ संस्कारच करीत राहिले. उलट खरा धर्म पालन यासाठी वरील सर्व अडखळण होऊ लागले. या रितीरिवाजात ते इतके गुंतले की येशूचे येणे दर्शविणारी नितीवचने, नियम, येशू प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये आला असतांही, नितीवचने व नियमांची पूर्णता करणार। येशू असा त्याचा त्या यहुदी लोकांनी स्विकार केला नाही. ते केवळ ते संस्कार, विधी, नितीवचने व नियम यांनाच धरून बसले व व्यक्तिशः आलेला येशू ख्रिस्त नाकारला आणि म्हणून येशू आला असताही येण्याचे चिन्ह विचारू लागले म्हणून त्यांना संदेश दिला: “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे‘‘ मत्तय ३:२ त्या लोकांनी चमत्काराची अपेक्षा केली. अशा लोकांना सुवार्ता ही तारणदायी ऐवजी अडखळण अशी झाली. मशीहाने त्याचे राज्य या पृथ्वीवर स्थापन करावे व त्याचे सामर्थ्य दाखवावे अशी त्याची अपेक्षा होती. येशूने त्यांच्या या अपेक्षेचे उत्तर पेरणारा पेरणी करावयास गेला. या दाखल्याद्वारे दिले. युध्द शस्त्राने नव्हे, हल्ला करून नव्हे, याद्वारे परमेश्वराचे राज्य प्रस्थापित केले नाही तर मानवाच्या अंत:करणात नवीन तत्त्वज्ञान शिकवणीने अस्थापित करणे.’ COLMar 14.5
“चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र (येशू) आहे.’ मत्तय १३:३७. ख्रिस्त, जगिक राजा म्हणून आला नसून पेरणारा म्हणून आला, राज्याची उलाढाल उध्वस्त करणे नव्हे तर बी पेरावयास आला, येशू त्याच्या अनुयायी यांना जगिक राज्यातील जय, राष्ट्रीय पुरस्कार ही द्यावयास आला नाही, पण मोठया कष्टाने कापणी करणे, निराश परिस्थिती सहन करून पीक गोळा करणे या कार्यासाठी पाचारण केले. COLMar 15.1
ख्रिस्ताच्या दाखल्याचा भावार्थ परूशी लोकांना समजला, पण त्यातील बोध त्यांनी नाकारला. त्यानी असे दाखविले की त्यांना जणू काहीच समजले नाही. ज्या लोकसमुदायास याचा अर्थ समजला ते त्याच येशू गुरूजी याच्याबाबत फार निराश झाले व त्याचे ध्येय गाठले जाणार नाही हा कडूपणा त्यांना समजला. येशूच्या शिष्यांना हा दाखला समजला नाही, पण त्यांची गोड जागृत झाली. शिष्य, येशूकडे खाजगी एकांत आले व त्यांनी या दाखल्याचे स्पष्टीकरण विचारले. COLMar 15.2
शिष्यामध्ये ही जागृत्ती व्हावी दाखल्याचा अर्थ विचारावा व येशूने त्यांना अर्थ स्पष्टपणे सागणे. जे कोणी प्रामाणिकपणे अर्थ समजणेची अपेक्षा करीतात त्याना येशू त्याचे वचन स्पष्ट करीतो. जे पवित्र शास्त्राचा अभ्यास करीतात व खरेपणाने वचनाचा अर्थ माहित हवा असतो तेव्हा पवित्र आत्मा त्या लोकांना अंधारात ठेवीत नाही. ख्रिस्त म्हणाला, “त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास कोणी मनात आणिल्यास हया शिकवणीविषयी त्याला समजेल की ही देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो‘‘ योहान ७:१७. जे कोणी ख्रिस्ताकडे सत्याचे खरे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून येतील त्यांना ते प्राप्त होईल. त्यांना स्वर्गीय राज्याचे रहस्य व सत्याचे रहस्य ही समजली जातील. त्या आत्मारूपी मंदिरात स्वर्गीय सत्याची ज्योत प्रकाशित राहील आणि जे कोणी अंधारात चालत असतील त्यांच्या मार्गावर सत्याचा प्रकाश पडेल. COLMar 15.3
‘पेरणारा पेरणी करावयास गेला’ पूर्व भागात पूर्वीच्या काळी जीवन धोक्याचे होते म्हणून लोक नगरास सुरक्षितपणासाठी कोट बांधीत असत. पेरणारा शेतावर असे सुरक्षित घर सोडून दररोज शेतावर काम करावयास जात असे. अशाच प्रकारे ख्रिस्त स्वर्गीय पेरणारा पेरणी करावयास या पृथ्वीवर आला. स्वर्गीय गृह सुरक्षित, शांतीमय व गौरवी होते, ते येशूने स्वर्गीय सिंहासन हे ही सोडली. या पृथ्वीवर कष्ट, एकान्त जीवन, मोह असलेले जीवन सोसणे, कष्टाने बी पेरणे, त्याच्या जीवनाचे बी पेरणे व त्याच्या रक्ताचे पाणी घालणे व हरवलेले जग यास तारण प्राप्त करून देणे यासाठी येशू आला. COLMar 15.4
याप्रमाणे ख्रिस्ताच्या सेवकांनी सुवार्ता बी पेरावयास जावे, सत्याचे बी पेरावे म्हणून अब्राहामास पाचारण केले. “परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखविन त्या देशात जा‘‘ उत्पत्ति १२:१ “अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला‘‘ इब्री ११:८ प्रेषित पौल, यरूशलेम येथील उपासना मंदीरात प्रार्थना करीत असता परमेश्वराकडून त्यास संदेश आला, “जा मी तूला विदेशी लोकांकडे दूर पाठवितो‘‘ प्रे. कृ. २२:२१. जे कोणी ख्रिस्ताशी एकनिष्ठ होऊ पाहतात त्यांनी त्यांचे सर्वस्वी सोडून ख्रिस्ताचे अनुयायी व्हावे. जुने संबंध सोडणे, जीवनाच्या योजना असतील त्या सोडणे, पृथ्वीवरील आशाबाबत शरणागती पत्कारणे, सत्य बी पेरणे यासाठी कष्ट करणे, एकांतवासात काम करणे व स्वार्थ त्याग करणे. COLMar 16.1
येशू ख्रिस्त या पृथ्वीवर सत्याची पेरणी करावयास आला. मानवाचे पतन झाले तेव्हापासून सैतान अनीतीचे बी पेरीत आहे. सैतानाने प्रथमतः लबाडी करून मानवाचा ताबा घेतला आणि अद्यापही सैतान असे कार्य करून परमेश्वराचे राज्य उलथून टाकावे व मानवास ताब्यात घ्यावे असे कार्य करीत आहे. ख्रिस्त, परमेश्वराच्या सभेत होता, सार्वकालिक पवित्रस्थानात होता तेथून मानवासाठी सत्याची शिकवण आणली. मानवाचे पतन झाले तेव्हापासून ख्रिस्त सत्याचा प्रकटीकरणकर्ता असा या जगात आला. येशूच्याद्वारे अविनाशी बीजापासून म्हणजे ‘देवाच्या सदाजीवी व टिकणा-या वचनाच्याद्वारे’ हे मानवास देण्यात दळणवळणास देण्यात आले’ १ पेत्र १:२३. आपल्या पतित पूर्वजास एदेन बागेत जे प्रथम अभिवचन दिले त्याद्वारे ख्रिस्त सुवार्ता सत्याचे बी पेरीत होता. पण ‘पेरणारा पेरणी करावयास गेला’ हा दाखला ख्रिस्ताने दिला तो मानवात त्याची सेवा व त्याच्या कार्याची स्थापना यासाठी हा दाखला दिला आहे. COLMar 16.2
परमेश्वराचे वचन हे बी आहे. प्रत्येक बियात अंकुर असून उगवून येणे ही क्रिया असते. तद्वत देवाच्या वचनात जीवन आहे. ख्रिस्त म्हणतो, ‘जिवंत करणारा तो आत्माच आहे, देहापासून काही लाभ होत नाही, मी जी वचने तुम्हांस सांगितली आहेत ती आत्मा व जीवन आहेत.’ योहान ६:६३. “जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याजवर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे”योहान ५:२४. परमेश्वराची प्रत्येक आज्ञा व प्रत्येक अभिवचन यात सामर्थ्य व परमेश्वराची शक्ति आहे, त्याद्वारे आज्ञेचे पालन केले जाईल व अभिवचन समजले जाईल. जो कोणी विश्वासाने वचनाचा स्विकार करीतो त्यास विश्वासाने परमेश्वराचे सामर्थ्य व शील ही प्राप्त होतात. COLMar 16.3
प्रत्येक बी जसे बी तसे फळ देते. योग्य प्रकारे बी पेरणी करा आणि योग्य तहेचे झाड येवून त्यास फळ येईल. जो आत्मविश्वास अविनाशी सत्यरूपी बी स्विकारील, त्याद्वारे त्या मनुष्याचे शील परमेश्वराच्या स्वरूपाचे शील येईल. COLMar 17.1
इस्त्राएलाचे शिक्षक परमेश्वराच्या वचनाचे बी पेरीत नव्हते. त्या काळाचे शास्त्री व सत्यवचनाचा शिक्षक ख्रिस्त यांच्या कार्यात फरक होता. शास्त्री रूढी, संस्कार व मानवी संकल्प यावर शिक्षण देत होते. वचनाचे शिक्षण देणे ऐवजी शास्त्री मानवाचे वचनाबाबत विचार मांडत होते. अशा शिक्षणात आत्म्यास सामर्थ्य प्राप्त होत नव्हते. ख्रिस्ताच्या शिकवणीचा व संदेशाचा विषय परमेश्वराचे वचन हे होते. “येशूला प्रश्न विचारीत असत त्यांना उत्तर पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे”‘पवित्र शास्त्र काय सांगते’ तुम्ही शास्त्रात काय वाचता ? प्रत्येक प्रसंगी मित्र वा शत्रू यांनी प्रश्न विचारला त्यावेळी येशूने गोडी निर्माण केली व सत्य वचन बी पेरले. येशू जो मार्ग, सत्य व जीवन येशू स्वत: जीवंत वचन असून पवित्र शास्त्राकडे लोकांचे लक्ष वेधून घेतले व म्हणाला “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, तेच मजविषयी साक्ष देणारे आहेत.‘‘ मग त्याने (ख्रिस्ताने) मोशे व सर्व संदेष्टे याजपासून आरंभ करून सगळया शास्त्रांतील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांस सांगितला.‘‘ योहान ५:३९, लूक २४:२७. COLMar 17.2
ख्रिस्ताच्या सेवकानींही हीच सेवा करावयाची आहे. पूर्वीप्रमाणे आमच्याही काळात परमेश्वराचे वचन बाजूला ठेवून मानवी तत्त्वज्ञान व संकल्प मांडले जातात. पुष्कळ सुवार्ता सांगणारे सुवार्तिक, संपूर्ण पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरीत आहे असे मानीत नाहीत. एक शहाणा मनुष्य पवित्र शास्त्राचा एक भाग नाकारतो. दुसरा एकजण दुसऱ्या भागाबाबत प्रश्न मांडतो. पवित्र शास्त्राच्या वचनाला त्यांच्या मताचा दुजोरा देतात व पवित्र शास्त्र काय शिक्षण देते याला ते त्यांच्या मताचा आधार व अधिकार दाखवितात. परमेश्वराचे सामर्थ्य ते नाहीसे करू पाहतात. अशा प्रकारे नास्तिकपणाचे बी सर्वत्र पसरले अर्थात पेरले जाते परिणामी लोकांची मने गोंधळून जातात व कशावर विश्वास ठेवावा हे समजत नाही. उलट इतके विश्वास पंथ झाले आहेत की कोणता पंथ स्विकारा असा मनात गोंधळ झाला आहे. शास्त्री लोकांनी शास्त्रवचनावर बरीच बंधने रचिली आहेत. परमेश्वराच्या वचनाने त्यांच्या ज्या रूढी आहेत त्याचा प्रभाव कमी केला. सध्याही असेच घडत आहे. परमेश्वराचे वचन इतके गुंतागुंतीचे करतात की ते पाळता येत नाही असे निमित्त लोक सांगतात. ख्रिस्ताने अशा प्रकारास त्याच्या काळात बंधन घातले. ख्रिस्ताने, परमेश्वराचे वचन हे सर्वाना समजेल इतके असे सोपे करून शिकविले. पवित्रशास्त्र हा आधार पुरावा इतका भक्कम दिला की, त्यामुळे सारे निरूतर झाले आणि आम्हीही अशाच प्रकारे पवित्रशास्त्राचे शिक्षण द्यावे. पवित्रशास्त्र हे एकमेव वचन, परमेश्वराने दिलेले आहे, त्यामुळे कोणताही वाद उत्पन्न होणार नाही व सर्व विश्वासाचा पाया पवित्रशास्त्र आहे. COLMar 17.3
पवित्रशास्त्राच्या सामर्थ्याची अशा प्रकारे चोरी केली गेली आहे आणि परिणामी आध्यात्मिक दर्जा खालावला गेला आहे. व्यासपिठावर दिले जाणारे संदेश त्याद्वारे सद्विवेक जागृत्ती केली जात नाही व आत्म्यांत संजीवनही आणले जात नाही आणि त्यामुळे श्रोते म्हणत नाहीत “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपले अंत:करण आतल्या आत उकळत नव्हते काय ? लूक २४:३२. आज कितीतरी लोक जिवंत परमेश्वरासाठी आक्रोश करीत आहेत, परमेश्वराच्या सान्निध्याची अपेक्षा करीत आहेत. तत्त्वज्ञान व उत्कृष्ट भाषण, ही कितीजरी अलंकारीक असले तरी त्यामुळे आत्म्याची तृप्ती होत नाही. मनुष्याचे ठाममत व संशोधन याना काही किंमत नाही. तर परमेश्वराचे वचन मानवाच्या अंत:करणाशी बोलले पाहिजे. ज्या लोकांनी आज मानवाची रूढी, चालीरिती व संस्कार ऐकले असेल आता त्यांना परमेश्वराची वाणी वचनाद्वारे ऐकू द्या. त्याद्वारे त्यांचा पालट होईल व त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. COLMar 18.1
ख्रिस्ताचा आवडता विषय म्हणजे बापाची कोमल प्रिती व परमेश्वराची अगाध कृपा हे आहेत, येशूने त्याचे पवित्र शील व पवित्र नियम यावर जोर दिला. येशूने लोकांना स्वतः मार्ग सत्य व जीवन असे प्रकट केले. ख्रिस्ती धर्म उपदेशकांनी असे विषय लोकांपुढे मांडले पाहिजेत. येशूने व येशूमध्ये जे सत्य आहे तेच लोकांना प्रकट करा. नियम व सुवार्ता याबाबत सर्वागी माहिती द्या. ख्रिस्ताच्या जीवनातील स्वार्थत्याग व समर्पण ही लोकांना उकलून सांगा, त्याने किती सहनशीलतेने छळ सोसला व मरण पत्करले. ख्रिस्ताचे पुनरूत्थान व स्वर्गारोहण, आम्हांसाठी स्वर्गीय न्यायालयातील वकीलाची सेवा व त्याचे अभिवचन “मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुनः येवून आपल्याजवळ घेईन.‘‘ योहान १४:३. COLMar 18.2
मानवी तत्त्वज्ञानातील चुका, सुवार्ताचे विरोधक यांच्याबरोबर वाद करीत बसणे या ऐवजी ख्रिस्ताचे अनुकरण करा. परमेश्वराच्या वचन खजिन्यातून नवीन सत्याचा प्रकाश तुमच्या जीवनात पडू द्या “वचनाची घोषणा कर।”२ तिमथ्य ४:२. सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करा’ यशया ३२:२० ‘सुवेळी अवेळी तयार राहा’ ‘माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगा गव्हापुढे पेंढा (भसा) तो काय असे परमेश्वर म्हणतो’ ‘ईश्वराचे प्रत्येक वचन शुध्द आहे, त्याच्या वचनात तू काही भर घालू नको. घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील‘‘ २ तिमय्य ४:२, यशया ३२:२० यिर्मया २३:२८, नितीसूत्रे ३०:५,६. COLMar 18.3
‘पेरणारा पेरणी करावयास गेला. सर्व शैक्षणिक कार्यातील जे महान तत्त्व ते यामध्ये सांगितले आहे. ‘हे परमेश्वराचे वचन आहे, परंतु आपल्या बहुतेक शाळांतून परमेश्वराचे वचन हे बाजूला काढले आहे. इतर विषयांनी विद्यार्थ्यांची मने भरून गेली आहेत. जे नास्तिक लोक आहेत त्यांची पुस्तके शालेय भूमिका पुस्तकात जास्ती आहेत. विज्ञान शास्त्राचे संशोधन यामुळे विद्यार्थी बहकत आहेत, त्याचे संशोधनाबाबत चुकीची माहिती दिली जाते. शास्त्रीय विज्ञान व परमेश्वराचे वचन यांची तुलना केली जाते व ती अनिश्चित व बिना आधार असे परमेश्वराचे वचनाबाबत केले जाते. अशा प्रकारे तरूणांच्या मनात संशयाचे बी पेरले जाते, यामुळे पुढे ते मोहाला बळी पडतात. जेव्हा, परमेश्वराच्या वचनावरील विश्वास नाहीसा होतो, मग त्या ‘आत्म्यास मार्गदर्शन राहात नाही, त्याला संरक्षण नाही पुढे हे तरूण परमेश्वरापासून व सार्वकालिक जीवनापासून दूर बहकून जातात. COLMar 19.1
आज आपल्या जगात जी दुष्टता व पाप ही माजली आहेत त्याला कारण वरील गोष्टी प्रामुख्याने आहेत. जेव्हा परमेश्वराचे वचन बाजूला केले जाते तेव्हा त्याचे सामर्थ्य बाजूला केले जाते आणि केवळ हेच सामर्थ्य दुष्टता रोखू शकते. याच सामर्थ्याने दुष्ट प्रवृत्तीवर आळा बसतो. मनुष्य नाशवंत पेरतात व कापणीही नाशवंत व दुर्वतन, अनाचार, अशुध्दता व लाचखाऊपणा ही दिसून येतात. COLMar 19.2
आपल्या मानवी जीवनात बौध्दीक कमकुवतपणा व अकार्यक्षमता यांचे कारण म्हणजे पवित्र शास्त्राची शिकवण बाजूला ठेविली आहे. परमेश्वराचे वचन यापासून वळून मनुष्यांनी जे लिहीले त्याकडे वळणे यामुळे मन खुजट होते व त्याची किंमत फोल ठरते. यामुळे मानवी मन सखोल विचार अफाट व सार्वकालिक सत्य यांचा विचार करीत नाहीत. यामुळे सभोवार जे दिसते त्यावरच विचार मर्यादित राहतात. अशा मर्यादित गोष्टींचा विचार केला म्हणजे पुढे मनाला विस्तार येत नाही म्हणून विचार मर्यादित राहतात, विस्तृत होत नाहीत. COLMar 19.3
अशा प्रकारे परिणामकारक असणारे सर्व शिक्षण हे खोटे शिक्षण आहे. जे प्रेरित सत्य आहे अशा सत्याशी तरूणाच्या मनाची सांगड घालणे हे प्रत्येक शिक्षकाचे काम आहे. अशा प्रकारचे शिक्षण प्रत्येक तरूणाच्या आजच्या व भावी जीवनासाठी उपयोगी असणारे त्याची मुख्य गरज आहे. COLMar 20.1
अशा प्रकारे शिक्षण दिले तर विज्ञान शास्त्राचा अभ्यास करणेस अडखळण होईल किंवा यामुळे शिक्षणाचा दर्जा कमी होईल असा विचार कोणीही करू नये. परमेश्वराविषयी माहिती घेणे ही आकाशाइतकी उंच व विश्वाइतकी अफाट आहे. आपले सार्वकालिक जीवन यासारखा उदात्त व सामर्थ्यवान् दुसरा कोणताही विषय नाही. परमेश्वराने हे जे सत्य दिले आहे याचा तरूणांनी अभ्यास करावा व यामध्ये त्यांचे मन भक्कम होऊन वाढत जाईल. जे विद्यार्थी या वचनाप्रमाणे वागतील त्यांचे विचार विस्तृत होतील व जो सार्वकालिक संपत्तीचा साठा आहे तो त्यांना प्राप्त होईल. COLMar 20.2
पवित्र शास्त्राचा अभ्यास करून तारणाची योजना शोधणे हे व्यावहारिक ज्ञान आहे. अशा प्रकारचे शिक्षणाने आपल्या मनात परमेश्वराची मूर्ती स्थापन होईल. यामुळे आपले मन समर्थ होईल व ते कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही आणि असा विद्यार्थी या जगात ख्रिस्त कृपेचा संदेश देणे यासाठी ख्रिस्ताचा सहकामदार होईल. तो स्वर्गीय कुटुंबाचा सभासद होईल, आणि जे प्रकाशित संत त्यांच्याबरोबर स्वर्गीय वतनाचा सहभागीदार होईल. COLMar 20.3
पण हा सत्याचा शिक्षक, त्याला जे व्यावहारीक ज्ञान प्राप्त झाले तेच इतरांना देऊ शकेल. ‘पेरणारा त्याचे बी पेरावयास गेला.’ ख्रिस्ताने सत्य शिकविले कारण ख्रिस्त सत्य होता व आहे. ख्रिस्ताच्या सर्व शिकवणीत त्याचे स्वत:चे विचार, त्याचे शील, त्याचा स्वत:चा अनुभव ही सर्व ओतप्रोत भरलेली होती. तद्वत् येशूचे सहकामदारांनी येशूचे वचन शिकवीत असता त्याचा स्वानुभव याद्वारे ते द्यावे. ख्रिस्ताद्वारे ज्ञान, धार्मिकता, पवित्रीकरण व तारण प्राप्त होणे म्हणजे काय हे त्यांना माहित असले पाहिजे. परमेश्वराचे वचन इतरांना शिकवीत असता, समजा, कदाचित् असे असे झाले असावे असे शब्द त्यांनी केव्हाही वापरू नयेत. पेत्र जसा म्हणाला त्याच्याप्रमाणे त्यांनी म्हणावे, “कारण चार्तुयाने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन हयासंबंधाने तुम्हांस कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे महत्त्व प्रत्यक्ष पाहणारे होतो‘‘ २ पेत्र १:१६ येशूचा प्रत्येक शिक्षक व पालक यांनी आवडता योहान याजबरोबर असे म्हणावे ‘जे आरंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळयांनी पाहिले आहे. जे आम्ही न्याहाळीले व स्वहस्ते चाचपिले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष देतो, ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हांस प्रकट झाले, हे तुम्हांस कळवितो.‘‘ १ योहान १:१,२. COLMar 20.4