Go to full page →

सार्वकालिक जीवनाप्रित्यर्थ काय करावे असा श्रीमंत तरूणाचा प्रश्न COLMar 302

“नतर, पाहा, एकजण येऊन त्याला म्हणाला, गुरूजी, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कार्य करावे? त्याने त्याला म्हटले, मला चांगल्याविषयी कां विचारितोस ? चांगला असा एकच आहे; तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर देवाच्या आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशूने त्याला म्हटले, ‘मनुष्यहत्या करू नको, व्याभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर‘, आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रिती कर’ तो तरूण त्याला म्हणाला, मी हे अवघे पाळिले आहे; माझ्या ठायी अजून काय उणे आहे? येशूने त्याला म्हटले, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, आपली मालमत्ता विकून दरिद्व्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरूण खिन्न होवून निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती. COLMar 302.1