Go to full page →

द्रव्य लोभापासून पारमार्थिक तोटे COLMar 302

“तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, मी तुम्हांस खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. आणखी तुम्हांस सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होवून म्हणाले, तर मग कोण तरेल? येशूने त्याजकडे न्याहाळून पाहून म्हटले, हे मनुष्याला अशक्य आहे, ‘देवाला तर सर्व शक्य आहे, तेव्हा पेत्राने त्याला म्हटले पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हांस काय मिळणार आहे ? येशूने त्यांस म्हटले, मी तुम्हांस खचित सांगतो, पुनरूत्पर्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे चालत आलेले तुम्हीही बारा राजासनावर बसून इस्त्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नामाकरिता सोडिली आहेत, त्याला शंभरपट मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल, परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल‘‘ मत्तय १९:१६३०. COLMar 302.2