Go to full page →

द्राक्षमळयांतील कामकऱ्यांचा दृष्टांत मत्तय २० : १ - १९ COLMar 303

“स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे; तो आपल्या द्राक्षमळयांत मोलाने कामकरी लावावयास मोठया सकाळी बाहेर गेला; आणि त्याने कामकऱ्यांस रोजचा रूपया ठरवून त्यांस आपल्या द्राक्षमळयात पाठविले. मग तो तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने अड्डयावर कित्येकांस रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यास म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळयात जा, जे योग्य ते मी तुम्हांस देईन आणि ते गेले. पुन: सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जावून तसेच केले. नंतर अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांस त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहा ? ते त्याला म्हणाले, आम्हांस कोणी कामावर लाविले नाही म्हणून. त्याने त्यांस म्हटले, तुम्हीही द्राक्षमळयांत जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळयाचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यास बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांस मजुरी दे. तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यांस रूपया, रूपया मिळाला. मग पहिले आले, आणि आपणास अधिक मिळेल असे त्यांना वाटले तरी त्यासही रूपया रूपयाच मिळाली. ती त्यांनी घेतल्यावर घर धन्याविरूध्द कुरकुर करून म्हटले, या शेवटच्यांनी एकच तास काम केले, आणि आम्ही दिवसभर उन्हातान्हांत कष्ट केले, त्या आम्हास व त्यास तुम्ही सारिखे लेखिले आहे. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गडया मी तुझा अन्याय करीत नाही; तू मजबरोबर रूपयाचा करार केला की नाही? तू आपले घेवून चालावयाला लाग, जसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मी मुखत्यार नाही काय? अगर मी उदार आहे हे तुझ्या डोळयांत सलते काय? याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील’ मत्तय २०:१-१६. COLMar 303.1

परमेश्वराच्या मोफत कृपेचे सत्य हे यहदी लोकांच्या दृष्टीतून नाहीसे झाले होते. परमेश्वराची कृपा ही मानवाने संपादन करून घेतली पाहिजे हे शास्त्री शिकवीत होते. धार्मिकतेचे फळ त्याच्या कृतीने प्राप्त होवू शकते अशी त्यांची आशा होती. अशा प्रकारे त्यांची उपासना वा आराधना स्वार्थी आशेने चालली होती. अशा वृत्तीपासून येशूचे शिष्यही दूर नव्हते, आणि शिष्याची प्रत्येक चूक दुरूस्त करावी अशी संधी येशू पाहात व त्याची चूक दाखवून देत असत. हा द्राक्षमळयांतील चाकराचा दाखला देणे पूर्वी एक घटना घडली आणि त्यामुळे योग्य तत्त्व प्रकट करणेची संधी ख्रिस्ताला प्राप्त झाली. COLMar 304.1

येशू रस्त्याने चालला तो एकाने धावत येवून व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरूजी सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्यास मी काय करावे ?”(मार्क १०:१७). COLMar 304.2

अधिकाऱ्यांनी ख्रिस्ताला शास्त्री म्हणून सन्मान दिला; पण येशूला देवाचा पुत्र असे ओळखले नाही. तारणारा म्हणाला, “मला उत्तम का म्हणतास? एक म्हणजे देव, त्याजवाचून कोणी उत्तम नाही‘‘ तू मला कोणत्या आधाराने उत्तम म्हणतोस ? केवळ परमेश्वरच चांगला आहे. जर तू मला तसे समजतोस तर तू मला परमेश्वराचा पुत्र व त्याचा प्रतिनिधी म्हणून स्वीकार कर. COLMar 304.3

येशूने आणखी सांगितले, ‘जर तू जीवनास प्रवेश करू पाहतोस तर देवाच्या आज्ञा पाळ‘‘ परमेश्वराचे शील त्याच्या नियमांत प्रकट केले आहे; आणि परमेश्वराशी तुझे जीवन सुसंगत व्हावे यासाठी परमेश्वराच्या नियमाशी तुझे जीवन सुसंगत होवून त्यातून प्रत्येक कार्यास प्रेरणा प्राप्त व्हावी. COLMar 304.4

ख्रिस्त नियमाबाबत पालन अजिबात कमी करीत नाही. अगदी स्पष्ट भाषेत ख्रिस्त सांगतो सार्वकालिक जीवनासाठी अट म्हणजे आज्ञापालन करणे. हीच अट आदामास त्याचे पतन होणेपूर्वी सांगितली होती. त्या एदेन बागेतील मानवापासून परमेश्वराने जी अपेक्षा केली तीच अपेक्षा परमेश्वर आम्हापासून करितो; पूर्ण आज्ञापालन, पवित्र धार्मिकता. एदेन बागेत मानवापासून जी अपेक्षा होती तीच अपेक्षा कृपेच्या करारांतही केली आहे; परमेश्वराचे नियम हे पवित्र, न्यायी व चागले आहेत याविषयी आपले जीवन सुसंगत असावे. COLMar 304.5

येशूने सांगितले, “आज्ञा पाळ‘‘ तेव्हा तरूणाने उत्तर दिले, “कोणत्या?”त्याला वाटले विधी नियमशास्त्राविषयी सांगतो की काय परंतु ख्रिस्त सिनाय पर्वतावर ज्या दहा आज्ञा दिल्या त्याविषयी बोलत होता. दहा आज्ञांचा दुसरा भाग यातील आज्ञाचा ख्रिस्ताने उल्लेख केला आणि त्या सर्वांचा साराश म्हणून एका आज्ञेत समावेश केला, “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रिती कर‘. COLMar 305.1

त्या तरूणाने त्वरीत उत्तर दिले, “मी आपल्या बालपणापासून हे सर्व पाळिले आहे; माझ्याठायी अजून काय उणे आहे?‘‘ त्या तरूणाची नियमाविषयीची कल्पना वरपांगी व बाहयात्कारी होती. मानवी दृष्टीने पाहाता तो निर्दोष आहे असे समजत होता. त्याचे बाहयात्कारी जीवन पुष्कळ बाबतीत बहुतांशी निर्दोष असे होते. त्यामुळे त्याला वाटत होते की त्याचे आज्ञापालनाचे जीवन हे ही निर्दोष असे होते. तरीपण त्याच्या अंत:करणात एक गुप्त भय होते तेः त्याच्या जीवनातील सर्व काही त्याचे जीवन व परमेश्वर यामध्ये योग्य असे नव्हते. यामुळे त्याच्या मनातून प्रश्न उच्चारला, “अद्यापि माझ्यामध्ये काय उणे आहे‘‘ ? COLMar 305.2

ख्रिस्त म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, आपली मालमत्ता विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये; पण ही गोष्ट ऐकून तो तरूण खिन्न होवून निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती.‘‘ (मत्तय १९:२१-२२). COLMar 305.3

‘स्वत:वर प्रिती करणारा हा नियमाचे उल्लंघन करणारा आहे. येशूने त्या तरूणाला हे प्रकट करून दाखविले, आणि त्याच्या जीवनांत किती स्वार्थीपणा आहे हा समजणे यासाठी त्याला येशूने परीक्षा दिली, त्याच्या जीवनातील रोग वा शीलातील डाग त्याला दाखवून दिला. यानंतर त्या तरूणाला पुढील स्पष्टिकरणाची गरज भासली नाही. त्या तरूणाच्या जीवनांत मूर्ती होती आणि ती मूर्ती म्हणजे जग हे होते. तो आज्ञा पालन करीत होता असे सांगत होता पण त्या आज्ञा पालनात आत्मिकता व जीवन नव्हते. परमेश्वर व मानवासाठी त्या तरूणाच्या ठायी खरी प्रिती नव्हती. ही गरज आणि या गरजेमुळे त्याला स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळणेसाठी लायकी प्राप्त होणार होती. COLMar 305.4

जेव्हा हा तरूण अधिकारी ख्रिस्ताकडे आला तेव्हा त्याचा प्रामाणिकपणा व उत्सुकता यामुळे ख्रिस्ताचे मन जिंकले गेले. ‘येशूने त्याजकडे न्याहाळून पाहून त्याजवर प्रिती केली‘‘ (मार्क १०:११) हा तरूण धार्मिकतेचा संदेशवाहक अशी सेवा करील असे येशूला त्या तरूणांत दिसले. ज्या कोळी लोकांनी येशूचे अनुकरण केले तद्वत हाही तरूण कर्तबगारीने व त्वरीत स्वीकार केला असता, त्या तरूणाने त्याची सर्व कर्तबगारी आत्मे जिंकणे कार्यात जर खर्च केली असती तर तो ख्रिस्तासाठी प्रभावी व विजयी कामदार झाला असता. COLMar 305.5

पण प्रथमत: त्याने शिष्यत्त्वाची जी अट आहे तिचा स्वीकार करावयाचा होता. तारणारा येशू याने पाचारण केले तेव्हा योहान, पेत्र, मत्तय व इतर ‘ते सर्व सोडून त्याच्याच मागे उठून गेले’ (लूक ५:२८) त्याच प्रकारचे आत्मसमर्पण या तरूणांचे पाहिजे होते. येशूने स्वत: जे समर्पण केले त्याहून अधिक समर्पण त्या तरूणापासून मागणी करीत नव्हता. ‘तो (येशू) धनवान असता तुम्हांकरिता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्रयाने तुम्ही धनवान व्हावे”२ करिंथ ८:९. जेथे कोठे ख्रिस्त मार्ग दाखविल त्याप्रमाणे अनुकरण करणे एवढेच त्या तरूणाला करावयाचे होते. COLMar 306.1

ख्रिस्ताने त्या तरूणाकडे पाहिले आणि त्याच्या आत्म्याविषयी ओढ लागली. त्या तरूणाला मानवाचा तारणदायी आशिर्वाद असे पाठवावे अशी ख्रिस्ताला ओढ लागली. त्या तरूणाने येशूला शरण येणे याऐवजी त्या तरूणाने ख्रिस्ताबरोबर सहसोबतीने कार्य करावे म्हणून ख्रिस्ताने त्याला पाचारण केले. येशू म्हणाला. “माझ्या मागे ये”अशा संधीत पेत्र, याकोब व योहान यांना आनंद वाटला. तो तरूणही ख्रिस्ताकडे आकर्षित झाला पण ख्रिस्ताचे जे तत्त्व होते, स्वार्थत्याग करणे याचा तो स्वीकार करावयास मान्य नव्हता. येशू ऐवजी त्याने त्याच्या संपत्तिची निवड केली. त्या तरूणाला सार्वकालिक जीवन पाहिजे होते, पण नि:स्वार्थी प्रिती स्वीकारणे हे त्याला अवघड गेले, कारण त्या प्रितीत जीवन होते; आणि तो दुःखी अंत:करणाने ख्रिस्तापासून मागे फिरला आणि निघून गेला. COLMar 306.2

तो तरूण निघून जात असताना येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला,“ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! (मत्तय १८:२५) हे शब्द ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. श्रीमंत लोक म्हणजे परमेश्वराची मान्यता असलेले असे त्यांना शिकविले गेले. जागतिक सत्ता व संपत्ति असलेले अशाना मशीहाच्या राज्याची प्रवेश अशी आशा होती; जर परमेश्वराच्या राज्यात जाण्यास श्रीमंत लायक नाहीत वा ते पराभूत झाले तर मग इतर मनुष्यांना कोणती आशा असणार होती? COLMar 306.3

येशूने त्यांस पुन: म्हटले, मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे ! धनवानाने देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाने सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे आणि ते हे ऐकून अत्यंत विस्मित झाले. (मार्क १०:२४-२६) आता त्यांना समजले की येशूने हा जो गभीर इशारा दिला त्यामध्ये त्यांचाही समावेश आहे. तारणारा जे प्रकाशमय शब्द बोलला त्यात त्यांना सत्ता व संपत्तीची जी गुप्त ओढ होती ती ही प्रकट केली. त्यांना येशूच्या विधानाचा अर्थ समजत नाही. अशा दाभिकपणे त्यांनीही विचारले, “तर मग कोणाचे तारण होईल?‘‘ (मार्क १०:२६). COLMar 306.4

“येशूने त्याजकडे न्याहाळून पाहून म्हटले, मनुष्यास हे असाध्य आहे, परंतु देवाला नाही ; देवाला सर्व काही साध्य आहे’ (मार्क १०:२७). COLMar 307.1

धनवान त्याचे धन आपल्या सोबत घेऊन स्वर्गात जाऊ शकत नाही. जे स्वर्गीय संत प्रकाशित आहेत त्यांच्याबरोबर धनवानास केवळ धनिक आहे म्हणन वारसा हक्क मिळू शकत नाही. केवळ ख्रिस्ताच्या कृपेने कोणाही मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळू शकतो. COLMar 307.2

श्रीमंत व दरिद्री या दोघांना पवित्र आत्म्याचे शब्द समान असे आहेत. “तुमचे शरीर, तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळाला आहे त्याचे मदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही आपले नव्हे, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा‘‘ (१ करिंथ ६:१९, २०). जेव्हा मनुष्य वरील विधानावर विश्वास ठेवितो, तेव्हा त्याची सर्व मालमत्ता परमेश्वराच्या इच्छेनुसार वापरली जाते, तिचा उपयोग लोकांच्या तारणासाठी केला जातो, व दीन-दुबळे याची सेवा करणेसाठी केला जातो. मानवास हे अशक्य कारण मानव सपत्ति धरून ठेवितो; अंत:करण वा मन पृथ्वीवर गोष्टीशी जडून गेलेले असते. ज्याचे मन धनसंपत्तिची सेवा करणे याशी जखडून गेले आहे. त्या आत्म्याला, त्या मानवाला मानवी गरजेची हाक केव्हाही ऐकू येत नाही. पण परमेश्वराबरोबर सर्व काही शक्य आहे. आम्ही ख्रिस्ताच्या अतुल्य प्रितीकडे पाहत राहणे त्याद्वारे, स्वार्थी अंत:करण वितळन जाईल व ते नम्र होईल. परूशी शौल जसे म्हणाला तसे श्रीमताला म्हणणे भाग पडेल, “तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजले आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभु, याजविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्त्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व वस्तुची हानी सोशिली, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा’ फिलिप्पै ३:७,८. यानंतर ते त्यांचे असे काही म्हणणार नाहीत. तर ते परमेश्वराच्या कृपेचे कारभारी असे समजून आणि त्याच्या सेवेस्तव सर्व मानवाचे सेवक यात ते आनंद मानतील. COLMar 307.3

तारणारा येशूचे ते शब्द त्यामुळे प्रथमत: पेत्राला ती पवित्र जाणीव झाली व पालट झाला. त्याने व त्याच्या बांधवांनी ख्रिस्तासाठी काय काय व किती स्वार्थत्याग केला याचा विचार केला व समाधान प्राप्त झाले. पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहो, तर आम्हास काय मिळणार आहे ? येशूने त्या तरूणाला सशर्त अभिवचन दिले होते याची आठवण आली, “तुला स्वर्गात संपत्ति प्राप्त होईल”त्याने आता त्याला व त्याच्या सोबत्याला, त्यांच्या स्वार्थत्यागाबाबत काय वेतन मिळणार हे त्याने विचारले. COLMar 307.4

तारणारा येशूचे उत्तर ऐकून त्या गालिलकर कोळयाची अंत:करणे आनंदाने कपित झाली. त्याचे जे स्वप्न होते त्याचे ते उच्च प्रतीचे सन्मानदर्शक चित्र होते. “मी तुम्हास खचित सांगतो, पुनरूत्पतीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे चालत आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्त्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नामाकरिता सोडिली आहेत, त्याला शंभरपट मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल‘‘ मत्तय १९:२८-२९. COLMar 308.1

“प्रभुपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांस मिळेल हे तुम्हास माहित आहे; प्रभु ख्रिस्त याची चाकरी करा. अन्याय करणाऱ्याने केलेला अन्याय त्याजकडे परत येईल; पक्षपात होणार नाही‘‘ कलसै. ३:२३,२४, ‘पाहा, ‘मी’ लवकर येतो; आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे‘‘प्रकटीकरण २२:१२ COLMar 308.2

परंतु पेत्राने प्रश्न केला, “तर आम्हांस काय मिळणार आहे?‘‘ पेत्राच्या या प्रश्नाद्वारे त्याची जी प्रवृत्ती होती ती मजुराची होती; या प्रवृत्तीची जर दुरूस्ती केली नाही तर ते शिष्य ख्रिस्तासाठी सेवा करावयास लायक नव्हते. ते शिष्य ख्रिस्ताच्या प्रितीने सेवेसाठी आकर्षित झाले होते म्हणून ते काय परूशी वृत्तीपासून मोकळे झालेले नव्हते. त्यांनी ज्या प्रमाणात काम केले त्याच प्रमाणात त्यांना वेतन पाहिजे होते. अशा प्रवृत्तीने ते काम करीत होते. ते स्व बढती व स्वसंतोष व त्यांच्यामधील एकमेकांशी तुलना करीत होते. जेव्हा त्याच्यातील कोणी पराभूत होत असे तेव्हा ते बाकीचे स्वत:चा चागुलपणा यावर बोलत असत. COLMar 308.3

सुवार्तेचे तत्त्व शिष्यांच्या दृष्टिआड होवू नये, म्हणून ख्रिस्ताने हा दाखला सांगितला: त्यांत परमेश्वर त्याच्या चाकराशी कशा प्रकारे वागणूक करितो, आणि त्याच्या शिष्यांनी ख्रिस्ताची सेवा कोणत्या प्रवृत्तीने करावी हे ही दाखवून दिले. COLMar 308.4

येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे’ तो आपल्या द्राक्षमळयांत मोलाने कामकरी लावावयास मोठया सकाळी बाहेर गेला”(मत्तय २०:१). त्याकाळी कामकरी मजूर-अडडा येथे कामासाठी थांबत असत, आणि तेथे धनी येवून कामकरी कामाला लावीत असते. या दाखल्यांतील घरधनी कामकरी यांना कामाला लावणे यासाठी वेगवेगळया वासाला गेलेला होता. जे अगदी सकाळीच कामावर गेले त्यांना ठराविक मजुरी ठरलेली होती; त्यानंतर काही तासांनी ज्यांना काम दिले त्यांचीही मजुरी ठरली होती, जे सायंकाळच्या तासाला कामावर गेले ते त्यांची मजुरी मालकाच्या मर्जीवर अवलंबून राहिले व कामावर गेले. COLMar 308.5

‘मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळयाचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकांस बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यास मजुरी दे. तेव्हा ते अकराव्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यास रूपया रूपया मिळाला. मग पाहिले आले, आणि आपणांस अधिक मिळेल असे त्यांना वाटले तरी त्यांसही रूपया रूपयाचा मिळाला. (मत्तय २०:८-१०). COLMar 309.1

द्राक्ष मळयातील कामकरी यांची मजुरी देणारा घरधनी म्हणजे मानवी कुटुंबाशी देवघेव करणारा परमेश्वर आहे. मानवाचे जे व्यवहार चालतात त्याहन ही व्यवहारित वेगळी आहे. जगिक व्यापारात वा व्यवहारात कामाप्रमाणे मोबदला दिला जातो. कामदार ज्या प्रमाणात मालाचे उत्पादन देतो त्या प्रमाणात त्याला मजुरी दिली जाते. पण या दाखल्यातील तत्त्व ख्रिस्त त्याच्या राज्याच्या तत्त्वानुसार स्पष्ट करीत होता या जगातील राज्य तत्त्वाप्रमाणे नव्हे. ख्रिस्त, कोणत्याही मानवी तत्त्वाने चालत नाही. प्रभु म्हणतो, “कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत; माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत... कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत‘‘ यशया ५५:८,९. COLMar 309.2

पहिले कामकरी ठरलेली मजुरीप्रमाणे काम करणे यासाठी मान्य झाले, त्यांनी काम केले आणि त्याप्रमाणे त्यांना मजुरी दिली, जादा दिली नाही. त्यानंतर जे कोणी उशीरा कामाला लागले ते एका मुद्यावर “जे काही योग्य ते तुम्हाला दिले जाईल‘‘ त्या कामकऱ्यांनी त्यांचा विश्वास धनी यावर ठेविला म्हणजे मजुरीचा प्रश्न विचारला नाही. धनी न्यायीपणाने व समानपणे वागवील अशा विश्वासाने त्यांनी सेवा वा काम केले. त्या कामकऱ्यांना जे वेतन दिले ते त्यांनी किती काम केले यावर दिले नाही तर त्याचा जो उदारपणा व हेतू होता त्याप्रमाणे वेतन दिले. COLMar 309.3

जे कोणी देवभिरू नाहीत अशांना परमेश्वर नितिमान करतो कारण त्यांनी परमेश्वरावर भाव ठेविला आहे. परमेश्वराने त्यांना वेतन देतो ते त्यांच्या गुणाकडे पाहून देत नाही तर परमेश्वराचा हेतू त्याप्रमाणे वेतन देतो. ‘जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या प्रभु ख्रिस्त येशूमध्ये केला‘‘ इफिस ३:११. ‘तेव्हा आपण केलेल्या नितिच्या कर्मांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान (बाप्तिस्मा) व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण त्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिले,’ तीत ३:५. आणि जे कोणी त्याजवर भाव ठेवतील त्याच्यासाठी तो ‘आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करितो त्यापेक्षा आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या शक्तिने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे’ इफिस ३:२०. COLMar 309.4

किती काम केले याला महत्त्व नाही किंवा त्याचा दुश्य परिणाम किती झाला याला महत्त्व नाही, तर काम कोणत्या आत्म्याने वा प्रवृत्तीने केले याला परमेश्वर महत्त्व देतो. द्राक्षमळयात काम करावयास जे अकराव्या तासाला आले त्याना परमेश्वरासाठी काम करणेची संधी मिळाली याविषयी त्यांना मोठेपणा वा आनंद वाटला व स्वत:ला धन्य समजले. ज्याने त्यांचा स्वीकार केला त्यांचे त्यांनी अंत:करणपूर्वक आभार मानले; आणि दिवसाच्या शेवटी जेव्हा द्राक्षमळयाचा धन्याने त्यांना पूर्ण दिवसाची मजुरी दिली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना माहीत होते की त्यांनी दिवसभर काम केले नाही. पण पूर्ण दिवसाची मजुरी पाहून त्यांनी त्यांच्या धन्याकडे पाहिले तो त्याचा चेहरा दयाळूपणाने मजुराकडे पाहात होता. त्यामुळे मजुर अजून हर्षित झाले. त्या धन्याची औदार्यवृत्ती व चांगुलपणा हे, ते मजूर कधीच विसरले नाहीत. अशाच प्रकारे जो पापी ख्रिस्ताच्या कृपेवर विश्वास ठेवितो, त्याची असहाय्यता समजतो व ख्रिस्ताचा सहकामदार म्हणून सदा कृतज्ञ राहतो. अशा प्रवृत्तीच्या लोकांचा परमेश्वर सन्मान करितो. COLMar 310.1

प्रभुची इच्छा आहे की आम्हाला काय प्रमाणात बक्षिस वा वेतन मिळणार याविषयी आपण एकही प्रश्न न विचारता प्रभुवर अवलंबून राहावे. जेव्हा ख्रिस्ताची आम्हांठायी वस्ती होते तेव्हा वेतनाचा विचार हा प्रमुख विषय होत नाही. कारण वेतन हा आपल्या सेवेचा अंतिम हेतू नाही. आपल्या कामाप्रित्यर्थ आपणास वेतन मिळाले पाहिजे हा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे. परमेश्वराने जी आशिर्वादीत आश्वासने दिली आहेत त्याबाबत आपण परमेश्वराचे आभार मानने योग्य आहे. पण आम्ही केवळ वेतनाची आतुरतेने अपेक्षा करावी असे नव्हे वा आपल्या प्रत्येक कामाबद्दल परमेश्वराने वेतन द्यावे हि ही अपेक्षा करू नये. आम्हांला वेतन मिळो वा न मिळो तर आपण जे योग्य तेच करीत राहाणे आपले ध्येय म्हणजे परमेश्वरावर प्रिती करणे व आपल्या सह बाधवावर प्रिती करणे. COLMar 310.2

यास्तव लावणारा काही नाही, आणि पाणी घालणाराही काही नाही; तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा... घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त त्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही... तर बाधाणाऱ्या प्रत्येकांचे काम उघड होईल; प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नि करील. ज्या कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल?’ १ करिंथ ७-१४. COLMar 310.3

ज्या लोकांनी कामाला जावे म्हणून पहिल्यांदा ऐकले त्यांना क्षमा करीत नाही असे नाही तर ज्यांनी द्राक्षमळयांत कामाला जाणे याविषयी निष्काळजीपणा केला त्यांना जाब विचारला जाईल. जेव्हा घरधनी कामाचा मजूर अड्डा येथे गेला आणि अकराव्या तासाला लोक वा मजुर बसलेले पाहिले त्यांना तो म्हणाला, “तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहा? ते म्हणाले, आम्हास कोणी कामावर लाविले नाही म्हणून जे लोक उशीरा कामावर घेतले त्यांच्यापैकी सकाळी कोणी हजर नव्हते. त्यांनी कामावर जाणे हे नाकारले नव्हते. जे प्रथमत: नकार करितात व नंतर पश्चात्ताप करितात ते चांगला पश्चात्ताप करीतात; पण प्रथमत: आलेले कृपेचे पाचारण याचा नकार करणे हे चांगले नव्हे. COLMar 311.1

जेव्हा द्राक्षमळयांत काम करणारे “प्रत्येकाला वेतन रूपया मिळाला तेव्हा ज्यांनी सकाळी कामाला सुरूवात केली त्यांना रूपया मजुरी याबाबत अपमान वाटला. त्यांनी बारा तास काम केले नाही काय ? त्यांनी असा विचार केला, की जे लोक शेवटी आले व एक तास थंड हवेत काम केले त्यांच्यापेक्षा आम्ही सकळापासून काम करणारे आम्हांस जादा वेतन मिळावयाचे होते, नाही का? ते म्हणाले, “या शेवटल्यांनी एकच तास काम केले, आणि आम्ही दिवसभर उन्हातान्हांत कष्ट केले, त्या आम्हास व त्यांस तुम्ही सारखे लेखले आहे‘‘ (मत्तय २०:१२). COLMar 311.2

“तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गडया मी तुझा अन्याय करीत नाही; तू मजबरोबर रूपयाचा करार केला की नाही? तू आपले घेवून चालावयाला लाग जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मी मुखत्यार नाही काय? अगर मी उदार आहे हे तुझ्या डोळयांत सलते काय ? (मत्तय २०:१३-१५). COLMar 311.3

“याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील”(मत्तय २०:१६). COLMar 311.4

द्राक्षमळयात जे प्रथम कामाला आले ते म्हणजे जे लोक प्रथमतः सेवेत आले ते नंतर आलेले कामदारापेक्षा आधी प्राधान्य मागतात. ते त्यांचे काम स्वत:च्या हितासाठी पाहतात आणि त्यांच्या सेवेत स्वनाकार व स्वार्थत्याग हे आणीत नाहीत. त्यांनी त्यांच्या सर्व आयुष्यभर परमेश्वराची सेवा करणेची वृत्ती दाखविली असेल, त्यानी सेवेत फार कष्ट केले असावे, छळ सोसला असेल, उपासमार झाली असेल. यामुळे त्यांना वाटत असेल की त्यांना मोठे बक्षिस वा वेतन मिळाले पाहिजे. ते ख्रिस्ताचा सेवक यापेक्षा त्यांना कोणते वेतन मिळणार याचा ते जादा विचार करितात. त्यांच्यामते त्यांना वाटते त्यांचे काम व स्वार्थत्याग याबाबत त्यांचा इतरापेक्षा जादा सन्मान झाला पाहिजे आणि अशाप्रकारे घडले नाही म्हणून त्यांचा अपमान झाला असे त्यांना वाटते. त्यांनी सेवेमध्ये प्रथम राहावे म्हणून त्यांनी सेवा करीत असताना प्रिती, विश्वास यांचा समावेश केला का? पण त्यांची भांडखोर प्रवृत्ती, कुरकुर करणे ही ख्रिस्ताविरोधी अशी होती, आणि यावरून ते अविश्वासू असे गणले वा पटले गेले. यावरून असे दिसते की, त्यांना स्व बढती हवी, त्यांचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्यांची प्रवृत्ती त्यांच्या बाधवाविरूध्द द्वेषभावना व हेवादावा अशी होती. परमेश्वराचा चांगलपणा व दानशूरपणा ही पाहन ते अजून करकर करीत असत. यामुळे ते असे दाखवितात की परमेश्वर व त्यांच्या जीवनाचा काही संबंध नाही. प्रभु सेवेचा आनंद व प्रभुचा सहकामदार यात किती आनंद आहे हे त्यांना माहित नाही. COLMar 311.5

आपल्यातील सकोचित वृत्ती व ‘स्व’ ची काळजी यामुळे परमेश्वराचा जितका अपमान होतो तेवढा अपमान दुसऱ्या कशाने होत नाही. ज्या कोणा ठायी वरील गुण आहेत त्यांच्याबरोबर परमेश्वर कार्य करू शकत नाही. अशा लोकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची त्याच्या कार्यात जाणीव होत नाही. COLMar 312.1

प्रभुच्या द्राक्षमळयात प्रथमत: यहुदी यांना पाचारण केले होते आणि यामुळे ते अभिमानी व स्वधार्मिक झाले होते. त्यांनी केलेली बहुत वर्षे सेवा यामुळे इतरापेक्षा त्यांना जादा वेतन वा बक्षिस पाहिजे होते असा त्यांचा हक्काचा दावा होता. परमेश्वराच्या गोष्टीमध्ये विदेशी यांना यहूदी लोकांबरोबर समान हक्क दिला जातो ही माहिती समजली याचा यहुदी लोकांना संताप आला. COLMar 312.2

शिष्यांना ख्रिस्ताने त्याचे अनुयायी व्हावे म्हणून प्रथम आले. त्यांना इशारा दिला की यहुदी लोकाप्रमाणे त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा वाईट गुण येईल. ख्रिस्ताने पाहिले मंडळीतील हा कमकुवतपणा, स्वधार्मिकता मंडळीत एक प्रकारचा शाप अशी येतील. लोकांना वाटेल की स्वर्गीय राज्य प्राप्तीसाठी त्यांना काही कार्य करावे लागेल. त्यांनी कल्पना केली की जर त्यांनी ठराविक प्रगती केली तर प्रभु त्यांच्या मदतीस येईल. अशा प्रकारे कार्य केले म्हणजे ‘स्व’ चे कार्य विपुल होईल व ख्रिस्ताचे कार्य थोडेसे असेल. ज्या कोणी थोडीशी प्रगती केली ते गर्वाने फुगून, इतरांपेक्षा स्वत:ला अधिक चांगले समजतील. ते जादा स्व स्तुती करतील, द्वेष भावना येईल, शिवाय स्वत:ला जादा महत्त्वाचे समजतील. हे जे असे धोके आहेत यापासून त्याच्या शिष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी येशू इशारा देतो. COLMar 312.3

आपल्या स्वत:च्या गुणाची स्तुती करणे याला स्थान नाही. “परमेश्वर म्हणतो, ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये; बाळगावयाचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा; यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो”यिर्मया ९:२३, २४. COLMar 313.1

वेतन वा बक्षिस हे कामाबद्दलचे नाही; म्हणून याविषयी कोणी अभिमान धरू नये तर हे सर्व कृपेमुळे आहे “तर मग आपला पूर्वज अब्राहाम याने देहस्वभावाने काय मिळविले म्हणून म्हणावे ? अब्राहाम कर्मानी नितिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असते; तरी देवासमोर नसते. शास्त्र काय सांगते ? अब्राहामाने देवावर विश्वास ठेविला, आणि हे त्याला नितिमत्त्व असे मोजण्यात आले. आता मजुराची मजुरी, ऋण अशी गणली जाते; मेहरबानगी अशी नाही; पण कर्म न करीता अधाला नितिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणा-याचा विश्वास नितिमत्त्व असा मोजण्यात येतो‘‘ रोम ४:१-५. यामुळे कोणालाही कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला दुसऱ्यापेक्षा मोठेपणा वा गौरवाचे कारण नाही किंवा दुसऱ्यावर आपण उगीच नाखुष असण्याचे कारण नाही. कुणालाही दुसऱ्यापेक्षा अधिक प्रसंग वा संधी दिली गेली असे नाही किंवा कोणीही आपल्याला वेतन वा बक्षिस हा हक्क समजू नये. COLMar 313.2

“परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो... तो तुला पुरे पारितोषिक देवो’ रूथ २ : १२. “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते. “स्तोत्र ५८ : ११. “जो नितीचे बीजारोपण करितो त्याचे वेतन खात्रीचे असते.”निती ११ : १८. COLMar 313.3

सार्वकालिक वेतनात पाहिले व शेवटले या दोघानीही सहभागिपणा करणे, आणि जे प्रथमत: आले त्यांनी आनंदाने शेवटी आलेले कामदारांचे स्वागत करणे. जे कोणी इतरांना वेतन दिले म्हणून तक्रार करीत त्यांनी ही लक्षात ठेवावे की त्यांचे तारण केवळ कृपेने झालेले आहे. हा मजुरांचा दाखला दिला आहे. यात द्वेष व संशयीवृत्ती यांचा धिक्कार केला आहे. प्रिती सत्याविषयी आनंद करते आणि द्वेषभावनेने तुलना करणे याला थारा देत नाही. ज्याच्या ठायी प्रिती आहे तो केवळ ख्रिस्ताच्या प्रितीची तुलना करतो व त्याचे स्वत:चे शील किती उणे आहे हे पाहात असतो. COLMar 313.4

सर्व मजुरांना हा दाखला इशारा असा आहे. मग त्याची सेवा कितीही वर्षे झालेली असो, मग त्यांनी कितीही महान कार्ये केलेली असोत, त्या सेवेत बंधुप्रिती नाही ; परमेश्वराची सेवा नम्रपणे केली नाही तर ते सर्व काहीच नाही. जर त्यांनी ‘स्व’ ला विराजमान केले असेल तर अशा सेवेत धर्म नाही. जो कोणी सेवा करीत असताना स्वत:चे गौरव पाहात असेल तर त्याच्या ख्रिस्ताची कृपा त्याला समर्थ करणारी ती नसल्यामुळे तो कंगाल राहिल. जेव्हा ‘स्व’ व गर्व ही कामात येतात तेव्हा कामाला अडखळण येते. COLMar 313.5

आम्ही किती वर्षे सेवा वा काम केले याला महत्त्व नाही तर आपण ते काम किती स्वईच्छेने केले व किती इमानीपणाने केले त्यामळे ते परमेश्वराला मान्य होते. आमच्या सर्व कामात वा सेवेत आम्ही पूर्ण समर्पण केले पाहिजे. ‘स्व’ ला स्थान देवून केलेली महान सेवा यापेक्षा परमेश्वरासाठी केलेले लहान कार्य पूर्ण स्व:ला नाकारून व विश्वासूपणे करणे यामुळे ते काम वा सेवा परमेश्वराला पसंत वाटते. आमच्या कार्यात ख्रिस्तासारखा आत्मा किती पूर्णपणे भरलेला आहे, त्या कार्यात ख्रिस्त समानतेचा भाग कितीसा आहे हे ही पाहतात. आम्ही जी सेवा करितो त्या सेवेत परमेश्वर हे पाहातो की प्रिती व विश्वासूपणा किती आहे, आम्ही जादा काम करितो हे परमेश्वर पाहत नाही. COLMar 314.1

जेव्हा स्वार्थपणाचा मृत्यू होईल, जेव्हा वर्चस्वासाठी स्पर्धा नाहीशी होईल, जेव्हा अंत:करण हे कृतज्ञतेने भरून जाईल, जीवनात प्रितीचा सुगंध दरवळला जाईल-त्यानंतरच त्या अंत:करणात ख्रिस्ताची वस्ती होईल आणि आम्ही परमेश्वराच्या कार्यात सहकामदार असे गणले जाऊ. COLMar 314.2

काम कितीही कष्टाचे असो खरा कामदार ते काम त्रासदायक काम असे समजणार नाही. ते खर्च करणे वा खर्ची पडणे यासाठी तयार होते, पण ते काम आनंदी असे होते, आणि ते आनंदाने करणे. परमेश्वराच्या ठायी आनंद व्यक्त करणे आणि तो केवळ ख्रिस्ताद्वारे व्यक्त करणे त्यांच्या जीवनाचा आनंद हा ख्रिस्ताच्या मताप्रमाणे आनंद आहे असे समजणे. येशू त्यांस म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्यांचे कार्य सिध्दीस न्यावे हेच माझे अन्न आहे”योहान ४:३४. ते गौरवी प्रभु बरोबर एकीने सहकार्याने काम करतात. या विचाराने सर्व कामात गोडी वाटते, त्यामुळे ईच्छा दृढ होते, जीवनात कसलाही प्रसंग आला तर आत्मा उत्सुक राहातो. नि:स्वार्थी मनाने कार्य करणे, ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी होणेस लायक, ख्रिस्ताच्या सहानुभूतीचा सहभागीपणा करणे, त्याच्या दु:खात आपण भाग उचलणे, त्याच्या कार्यात सहकार्य करणे यामुळे असे कामदार ख्रिस्ताच्या आनंदाला पूर आणीत असतात आणि प्रभु येशूच्या नामाला स्तुती, गौरव व सन्मान देतात. COLMar 314.3

परमेश्वराची खरी सेवा तिचे हे स्वरूप आहे. जर कोणी सेवेत असे उणे भरतील तर ते जर पहिले असे वाटतील तरी ते शेवटले असे गणले जातील. पण जो कोणी जरी शेवटला असला पण प्रभुची सेवा खरेपणाने, देवाचे गौरव अशा मनोभावाने करील तो प्रथम असा होईल. COLMar 315.1

पुष्कळ लोकांनी ख्रिस्ताला वाहून दिले आहे, तरीपण ख्रिस्तासाठी महान कार्य करणे अशी दृष्टी त्यांना नाही किंवा ख्रिस्ताच्या सेवेत महान समर्पण करावे हे ही त्यांना समजत नाही. अशा लोकांच्या मनात एक समाधानी विचार येईल तो असा की जो हुतात्मा त्याने स्वार्थत्याग करून कार्य केले असेल ते परमेश्वराला सर्वश्रेष्ठ असे वाटत असेल; ज्या मिशनरीने प्रतिदिनी जीव धोक्यात घालून वा मरण पत्करून सेवा केली असेल त्याचे नाव स्वर्गीय यादीत सर्वश्रेष्ठ असेल. जो ख्रिस्ती अशा प्रकारे खाजगी जीवन जगातो, दररोज ‘स्व’ ला प्रभुचरणी वाहून देतो, जो त्याचे हेतू खरेपणाने व विचार शुध्द ठेवितो, अपमान प्रसंगी शांत व नम्र राहातो, जो विश्वासू व धार्मिक वत्तीचे शील ठेवितो, लहान गोष्टीत प्रामाणिकपणा राखणे, गृहजीवनातही जो ख्रिस्ताच्या शीलाचे दर्शक म्हणून वागतो असा मनुष्य परमेश्वराच्या दृष्टीने फार मौल्यवान आहे एवढेच नव्हे तर जगप्रसिध्द मिशनरी वा ख्रिस्ती हुतात्मा यांच्याहून श्रेष्ठ आहे. COLMar 315.2

अहा ! पहा, शीलाचा दर्जा मोजणे याचे परिमाण परमेश्वर व मानव हे किती वेगळे आहे. मानवाला कोणते मोह येतात हे केवळ परमेश्वराला दिसते, जगाला व नजीकचा मित्र यांना त्या मोहाची कल्पनाही नसते. घरातील व मनात येणारे मोह असे अनेक असतात. मानवाच्या कमकुवत जीवनात तो किती नम्र आहे व मनात येणारे दष्ट विचार याविषयी तो किती प्रामाणिकपणे पश्चात्ताप करीतो हे ही परमेश्वराला समजते. परमेश्वराची आराधना व सेवा किती एकाग्र मनाने करीतो हे परमेश्वर पाहातो, त्या मनुष्याने पापाशी किती निकराचा लढा दिला व ‘स्व’ वर विजय मिळविला हे ही परमेश्वराला दिसते. हे सर्व काही परमेश्वर व त्याचे देवदूत याना समजते वा माहित आहे. जे कोणी परमेश्वराचे भय धरीतात व त्याच्या नामाचा विचार करीतात अशांचे सर्व काही स्मरण वहीत लिहिले जाते. COLMar 315.3

आपल्या शिक्षणांत नाही, आपल्या हुद्यांत नाही, आपल्याला किती देणगी वा कला यात नाही, आपल्या इच्छेतही मानवी जीवनाच्या विजयाचे गूढ नाही. आमची अकार्यक्षमता समजून आपण ख्रिस्ताचा विचार करणे, आणि जो ख्रिस्त सर्वसमर्थ व सामर्थ्याचा उगम, सर्व विचारांचा विचार, अशा ख्रिस्ताचे आपण जर स्वईच्छेने आज्ञापालन केले तर आम्हांस विजयावर विजय प्राप्त होईल. COLMar 315.4

यानंतर मग आपली सेवा कितीही थोडी वा नम्र कार्य असो, ते जर आम्ही साधा विश्वास धरून ख्रिस्ताचे अनुकरण केले तर त्या आम्हांस अपयश वा निराशा येणार नाही तर वेतन वा बक्षिस मिळेलच. या बाबतीत जो महान व शहाणा याला हे प्राप्त करीता येणार नाही, पण जो कमकुवत व नम्र त्याला ते प्राप्त होईल. जो कोणी स्वत:ला उंचावू पाहिल त्याला स्वर्गाचे सोनेरी दार उघडले जाणार नाही. जो मनाने गर्विष्ठ असेल त्यासाठी स्वर्गीय दार उघडले जाणार नाही. पण जो बालक त्याच्या अशक्त हाताने तो दरवाजा उघडू पाहिल त्याला तो स्वर्गीय दरवाजा उघडला जाईल. जे कोणी साधेपणाने विश्वासधरून व प्रितीने परमेश्वरासाठी कार्य करतील त्यांना कृपेचे वेतन दिले जाईल ते धन्य व आशिर्वादीत असे होतील! COLMar 316.1