Go to full page →

अध्याय १४ वा—परमेश्वर त्याच्या लोकांचा न्याय करणार नाही काय? COLMar 114

लूक १८:१-८ यावर आधारीत

येशू त्याच्या येण्याच्या नजीकच्या काळाविषयी बोलत होता, आणि त्या काळात त्याच्या लोकांना कोणत्या संकटातून जावे लागत होते हे ही सांगत होता. त्या काळासाठी खास माहिती म्हणून येशूने खाली नमूद केलेला दाखला सांगितला व म्हणाला, “त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये.” COLMar 114.1

“कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाचे भय धरीत नसे व मनुष्याची पर्वा करीत नसे आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याजकडे वारंवार येवून म्हणत असे की माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा. तरी बराच काळपर्यंत तो ते करीना, परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्याची पर्वा करीत नाही तरी ही विधवा मला त्रास देते म्हणूनच मी तिचा न्याय करीन नाहीतर ती नेहमी येवून मला अगदी रंजीस करून टाकील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्याचविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांस सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? लूक १८:१-८. COLMar 114.2

ज्या लोकांना खरेपणाबाबत सन्मान नाही व जे दुःख सहन करीतात त्यांच्याबाबत दया नाही अशा लोकांचा प्रतिनिधी तो न्यायाधीश आहे. विधवा तिची विनंती वारंवार न्यायाधीशाकडे येवून करीत होती. ती पुनः पुनः येत होती, न्यायाधीशाकडे येत असे व तो तिला रागाने घालवून देत असे. न्यायाधीशास माहित होते की, तिची विनंती योग्य आहे आणि त्याने लगेच न्याय द्यावयाचा होता पण त्याने तसे केले नाही. न्यायाधीशाला त्याची जुलमी सत्ता दाखवावयाची होती, त्या विधवेने येवून वारंवार विनंती करावी व ती विनंती व्यर्थ झाली हे पाहाणे यात त्या न्यायाधीशला समाधान वाटत होते. ती विधवा कधी निराश झाली नाही किंवा न्याय मागणे थांबविले नाही. न्यायाधीशाने कितीही भेदभाव दाखविला, कितीही कठोर वागविले तरीही ती तिला न्याय मिळेपर्यंत न्यायाधीशाकडे जावून विनंती करीत असे. तो म्हणाला, “जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्याची पर्वा करीत नाही. तरी ही विधवा मला त्रास देते म्हणूनच मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी नेहमी येवून मला अगदी रंजीस करून टाकील‘‘ न्यायाधीश त्याचे नावे राखणे यासाठी व एकपक्षी न्याय होवू नये म्हणून त्याने त्या विधवा बाईचा न्यायनिवाडा केला. COLMar 114.3

“तेव्हा प्रभुने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले रात्र-दिवस त्याला हाका मारीतात त्याचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्याच्याविषयी तो विलंब लावील काय ? “अन्यायी न्यायाधीश व परमेश्वर यांच्यामध्ये किती मोठा फरक आहे हे ख्रिस्त येथे दाखवून देतो. त्या न्यायाधीशाने त्या विधवेची विनंती स्वार्थी हेतूने मान्य केली कारण तिने त्याला वारंवार येवून त्रास देवू नये. त्या विधवेची त्या न्यायाधीशाला कीव किवा दया आली नाही, तिला होणारे दु:ख त्याची त्याला काहीच पर्वा नव्हती. पण जे कोणी परमेश्वराकडे धाव घेतात त्यांच्याबाबत परमेश्वराची प्रवृत्ती किती वेगळी आहे. जे गरजू व त्रस्त असतील अशाची विनवणी परमेश्वर कितीतरी प्रेमळपणे ऐकतो. COLMar 115.1

जी विधवा न्यायाधीशाकडे न्याय मागत होती तिचा नवरा मरण पावला होता. त्या दरिद्री, मित्रहीन विधवेस तिचे विस्कळीत जीवन पुर्ववत व्हावे यासाठी तिच्याकडे काहीही साधन नव्हते. मानवाने पाप केले व सर्व काही हरवले गेले. मानवाचा परमेश्वराशी संबध तुटला गेला अशी मानवाची स्थिती झाली होती. मानवाकडे स्वत:चे तारण व्हावे असे काहीच नव्हते पण ख्रिस्ताद्वारे आपला, पित्याशी पुनः संपर्क आला गेला. जे निवडले आहेत ते परमेश्वराचे अगदी आवडते झाले. परमेश्वराने त्यांना अंधारातून त्याच्या अद्भुत प्रकाशात बोलाविले आहे, त्यांनी परमेश्वराचे गौरव करणे व जगाच्या अंधारी ठिकाणी परमेश्वराचा प्रकाश पाडणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्या कठोर अन्यायी न्यायाधीशाला त्या विधवेची दया आली नाही पण तिची ती विनवणी त्याला त्रासदायक वाटत होती म्हणून त्याने तिची विनंती मान्य केली, न्याय केला व एकदाचा त्याचा त्रास मिटविला. पण परमेश्वर त्याच्या लेकरांवर अतोनात प्रिती करीतो. परमेश्वराला या पृथ्वीवर अत्यंत प्रिय वस्तु म्हणजे त्याची मंडळी होय. COLMar 115.2

“कारण परमेश्वराचे लोक हाच त्यांचा वाटा, याकोब हा त्याचा नेमिलेला वतनभाग. तो त्यास अरण्यात, शून्य व थोर अशा मरूभुमीत आढळला, त्याने त्याच्या आसपास राहून त्याची निगा केली, डोळयाच्या बाहुलीप्रमाणे त्याचे रक्षण केले‘‘ अनुवाद ३२: ९,१०. “ज्या राष्ट्रांनी तुम्हांस लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे, जो कोणी तुम्हांस स्पर्श करील तो त्याच्या डोळयाच्या बुबुळालाच स्पर्श करील, कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”जख-या २: ८. COLMar 116.1

त्या विधवेची विनंती, “माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवादयापासून सोडवा‘‘ ही प्रार्थना म्हणजे परमेश्वराच्या लेकारांची प्रार्थनेचे दर्शक आहे. सैतान हा आमचा प्रतिवादी आहे. “तो (सैतान) आमच्या बंधंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांजवर दोषारोप करणारा‘‘ (प्रकटीकरण १२ : १०) परमेश्वराच्या लोकांना सतत दोष देणे, खोटे आरोप लादणे, त्यांना फसविणे व त्यांचा नाश करणे अशी कामे सैतान करीत असतो आणि सैतानाची अशा प्रकारे जी सत्ता आहे त्यातून त्यांची सुटका व्हावी, सैतानाचे जे एजंट असतील त्याच्याही ताब्यात राहू नये असा बोध या दाखल्याद्वारे ख्रिस्त शिकवीत आहे की शिष्यांनी खरंच प्रार्थना करणे हाच उपाय आहे. COLMar 116.2

जखऱ्याच्या भविष्यात हे लक्षात आणून दिले आहे की, सैतान कसा आरोप करीतो व ख्रिस्त त्याच्या लोकांवरील आरोपाचा विरोध करीतो. भविष्यवादी म्हणतो, “तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखविले. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो, यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो हा अग्नीतून काढिलेले कोलीत नव्हे काय ? यहोशवा मलीन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतापुढे उभा होता”जखऱ्या ३: १-३. COLMar 116.3

परमेश्वराच्या लोकांवर खटला त्यामध्ये ते आरोपी आहेत असे दर्शक दाखविले आहे. हे लोक महान संकटात आहेत आणि यहोशवा प्रमुख्य याजक त्याच्यासाठी आशिर्वादाची प्रार्थना वा शोध करीत आहे. यहोशवा अशाप्रकारे विनवणी परमेश्वराकडे करीत असता सैतान उजवीकडे उभा राहून विरोध करीत आहे. परमेश्वराच्या लोकांवर दोषारोप लादून त्यांचे जीवन वा खटला सैतान अधिक कडक करू पाहतो. परमेश्वराच्या लोकांची दुष्ट कार्ये व त्यांचे दोष ही परमेश्वरापुढे सादर करीतो. अशा प्रकारे सैतान परमेश्वराच्या लोकांचे वर्तन सादर करीतो की हे लोक किती तरी पापी आहेत हे पाहून ख्रिस्त त्यांना मदत करणार नाही व त्यांच्या गरजा पुरविणार नाही. यहोशवा मलीन वस्त्रे, परिधान करीतो म्हणजे त्याजवर परमेश्वराच्या लोकांचे आरोप लादलेले असतात. असा प्रतिनिधी म्हणून उभा राहतो. त्या लोकांच्या पापांची त्याला जाणीव झालेली असते. त्यांच्या पापाने तो भारावलेला असतो, निराश होतो. सैतान त्यांच्यावर पापाचा अपमान, दोष लादून त्यांना शेवटी असहाय करीतो. अशा प्रसंगी सैतानाला विरोधक म्हणून एकजण उभा राहतो. COLMar 116.4

सैतानाचे कार्य दोष देणे या कार्याची सुरूवात स्वर्गात झाली. मानवाचे पतन झाले तेव्हापासून सैतानाने या पृथ्वीवर असे दोषारोप देणे कार्य सुरू केले आणि या जगाचा शेवट जसा जवळ येईल तसे हे कार्य तो खास प्रकारे करून दोष देणे करीत राहणार. सैतानास माहित आहे की आता त्याचा वेळ थोडा राहिला आहे त्यामुळे अधिक लोकांना दोष देणे व त्यांचा नाश करणे हे कार्य प्रभावीपणे करीत राहील. जे लोक पापी व कमकुवत असून परमेश्वराला व त्याच्या नियमास सन्मान देतो अशा लोकाचा सैतानाला खूप राग येतो म्हणून सैतान निश्चय करीतो की, या लोकांनी परमेश्वराच्या नियमाचे पालन करू नये. त्या लोकांनी आज्ञाभंजक बनून पाप करावे यात सैतानास आनंद वाटतो, यासाठी प्रत्येक आत्म्यासाठी वेगवेगळी युक्ति तयार करीतो, यासाठी की सर्वानी त्याच्या मोहात पडावे व परमेश्वरापासून विभक्त व्हावे. जे कोणी परमेश्वराची योजना या जगात परमेश्वराची कृपा, प्रिती व क्षमा ही प्रचार करू पाहतात त्यांच्यावर सैतान जास्त दोषारोप करीतो व परमेश्वरालाही दोष देतो. COLMar 117.1

परमेश्वर त्याच्या लोकांसाठी सामर्थ्याची कार्ये करीतो त्यामुळे सैतानाच्या मनात वैरभाव अधिक येतो. जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांसाठी कार्य करीतो त्यावेळी सैतान त्याचे दूत घेवून देवाच्या लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न जोमाने करीतो. जे कोणी ख्रिस्ताच्या सामर्थ्याने कार्ये करू पाहतात त्याचा सैतानाला हेवा वाटतो. सैतानाचा हेतू म्हणजे वाईट गोष्टीला चिथावणी देणे व त्यात सैतानाला यश मिळाले म्हणजे जे कोणी त्याच्या मोहाला बळी पडतात त्यांच्यावर दोषारोप लादणे. यानंतर सैतान त्यांच्या मलीन धार्मिक वस्त्राकडे लक्ष वेधून घेतो, त्यांच्या जीवनातील दोष दाखवितो. त्याच्या जीवनातील कमकुवतपणा व चुका दाखवितो, त्यांचे जीवन उपकार न जाणणारे असे पापी, त्यांच्या जीवनात ख्रिस्तीपणा नाही, त्यामुळे तारणारा येशूचा अवमान होतो. मानवाच्या जीवनात असे दोष आहेत म्हणून सैतान म्हणतो अशा मानवाच्या जीवनात कार्ये करण्याचा त्याचा हक्क असून, मानव केवळ नाशाप्रत होण्यासाठीच योग्य आहे. मानवाचे जीवन हे काही कामाचे नाही असे भय सैतान निर्माण करीतो व त्यांच्या जीवनात काही आशा नाही आणि त्यांच्या पापाचा डाग हा कधीच काढला जाणार नाही. सैतानाची अशी आशा आहे की मानव हे त्यांचा परमेश्वरावरील विश्वास नाहीसा करतील व सैतानाच्या मोहाला बळी पडतील. COLMar 117.2

परमेश्वराचे लोक त्यांच्या सामर्थ्याने सैतानाच्या आरोपास प्रत्युत्तर देऊ शकणार नाहीत. मानव स्वत:कडे सध्याच्या परिस्थितीत पाहाता नाश पावत आहे. पण मानव, ख्रिस्त कैवारी, वकील यांच्याकडे धाव घेतात. तारणारा येशू याच्या सामर्थ्याची मागणी करीतात. परमेश्वर हा, “आपण नितीमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नितीमान ठरविणारे असावे‘‘ रोम ३:२६. परमेश्वराची लेकरे विश्वासाने, हाक मारीतात व सैतानाचे सर्व दोष नाहीसे करावयास व त्याच्या सर्व युक्त्या कुंठीत करावयास सांगतात व प्रार्थना करीतात, “मजवर जो दोषारोप करीतो त्याला बंधन घालून माझा न्याय करावा, आणि ख्रिस्त येशू वधस्तंभाचे महान सामर्थ्य याद्वारे सैतानाचे सर्व दोषारोप नाहीसे करीतो. COLMar 118.1

“मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो, यरूशलेम आपलेसे करणारा परमेश्वर तुला धमकी देवो, हा अग्नीतून काढिलेले कोलीत नव्हे काय’ ? जेव्हा सैतान परमेश्वराच्या लोकांना काळी कृत्ये आणि दोषी ठरवून त्यांचा नाश करू पाहातो, तेव्हा ख्रिस्त मध्यस्थीचे कार्य करीतो. जरी लोकांनी पाप केले आहे, तरी ख्रिस्त पापी लोकांसाठी आला व त्या पापी लोकांची पापे स्वत: ख्रिस्ताने पत्कारीली आणि त्या लोकांचा बचाव अग्नीतील कोलीत काढतात त्याप्रमाणे केला. ख्रिस्ताने मानवी देहधारण करून मानवाशी निकट संबंध जोडला, तर ख्रिस्त देव त्यामुळे त्याचा परमेश्वराशी संबंध आहे. अशाप्रकारे जे मानव नाशाप्रत आहेत. त्यांना ख्रिस्ताद्वारे मदत मिळू शकते आणि त्यामुळे सैतानाला अशी धमकी दिली गेली. COLMar 118.2

“यहोशवा मलीन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दुतापुढे उभा होता. त्याच्यासमोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पाहा, मी तुझा अधर्म तुजपासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालीत आहे. मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोशाख घातला, आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता. नंतर जे परमेश्वराचे प्रतिनिधी होते त्या लोकाशी परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशवा याजबरोबर गांभीर्याची प्रतिज्ञा केली. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपविलेले सर्व सांभाळिले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व येथे उभा असणाऱ्यांत तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. (जख-या ३:३-७). COLMar 118.3

परमेश्वराच्या लोकांचा पराभव पाहून, ख्रिस्त त्या लोकांची काळजी घेणे यापासून माघार घेत नाही. त्या लोकांची वस्त्रे शुध्द करावयास ख्रिस्त समर्थ आहे. जे कोणी पश्चात्तापी आहेत, विश्वास ठेवीतात त्यांच्या अंगावरील घाणेरडी वस्त्रे ख्रिस्त काढून घेतो व त्याचा धार्मिकतेचा झगा त्यांना पांघरणेस देतो व स्वर्गीय वहीत नोंद करीतो की अशा लोकांच्या पापांची क्षमा झाली आहे. अखिल विश्व व स्वर्गात येशू जाहीर करीतो हे लोक त्याचे आहेत. सैतान हा या लोकांवर दोष देणारा व गुन्हेगार आहे. परमेश्वर त्याचे जे निवडलेले लोक आहेत त्यांचा न्याय करील. COLMar 119.1

“माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा’ ही जी प्रार्थना आहे ती केवळ सैतान हा प्रतिवादी याजविषयीची आहे असे नव्हे, तर सैतान त्याच्या खोटया एजंटाना तो, लोकांना मोहात पाडतो, त्यांच्याद्वारे परमेश्वराच्या लोकांचा नाश करीतो अशांच्या साठीही ही प्रार्थना आहे. जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हा निश्चय करीतात त्यांना अनुभवावरून समजून येईल की, त्यांना विरोध करणारे सत्ताधिकारी या पृथ्वीवरील आहेत. अशा प्रकारे हल्ला करणारे लोक ख्रिस्तावरही हल्ला करू पाहतात आणि याची कल्पना कुणाही मानवाला येत नाही. ख्रिस्ताच्या शिष्यावर त्यांच्या धन्याप्रमाणे सतत मोहाचे हल्ले होत असतात. COLMar 119.2

ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापूर्वी जगाची परिस्थिती कशी असेल याचे वर्णन पवित्रशास्त्रात केले आहे. लोकांचा अधाशीपणा व लोकाचा छळ करणे याचे वर्णन प्रेषित याकोब करीतो. तो म्हणतो, “अहो धनवानांनो... तुमचे धन साठविणे शेवटल्या दिवसात झाले. पाहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली आहेत त्यांची तुम्ही अडकवून ठेविलेली मजुरी ओरडत आहे, आणि कापणाऱ्यांच्या आरोळया ‘सेनाधीश प्रभुच्या कानी’ गेल्या आहेत. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला आहे, ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली आहे. धार्मिकास तुम्ही दोषी ठरविले, त्यांचा घात केला, तो तुम्हांस ‘अडवीत नाही‘‘ याकोब ५:१-६. COLMar 119.3

“न्यायाला मागे ढकलले आहे, धार्मिकता लाब उभी आहे, तेथे सरळतेचा प्रवेशच होत नाही. सत्याचा अगदी अभाव झाला आहे, दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो.‘‘ यशया ५९: १४, १५. येशू या पृथ्वीवर असताना त्याच्या बाबतीत वरील वचनाची पूर्णता झाली. येशू परमेश्वराच्या आज्ञा पाळणे यात प्रामाणिक होता, त्याने मानवी चालीरिती, रूढी व संस्कार ही सर्व बाजूला ठेविली. येशूने असे केले म्हणून लोक त्याचा हेवा करू लागले, त्याचा छळ करू लागले. अशा प्रकारे इतिहासाची पुनरावृत्ती होत गेली. परमेश्वराचे नियम यापेक्षा मानवाचे नियम व रूढी यांना प्राधान्य दिले गेले आणि जे कोणी परमेश्वराच्या नियमांचे पालन करीत त्याचा धिक्कार केला व छळ केला. ख्रिस्त, परमेश्वराच्या आज्ञा पाळणे यात विश्वासू होता म्हणून त्याच्यावर दोषारोप करून तो शब्बाथ पालन करीत नाही हाही दोष दिला. येशूला भूत लागले असे ते म्हणत असत व बालजबूल असा उघड दोष दिला. त्याचप्रमाणे येशूच्या शिष्यांवर दोषारोप व खोटे आरोप केले. अशा प्रकारे सैतान त्यांना पापात नेणेचा प्रयत्न करून परमेश्वराच्या नामाचा अपमान करू पाहातो. COLMar 119.4

ख्रिस्ताने अन्यायी न्यायाधीयाचा दाखला सांगितला, तो न्यायाधीश परमेश्वराचे व मनुष्याचेही भय धरीत नसे, यावरून त्यावेळी कशाप्रकारचे न्यायाधीश होते व लवकरच ख्रिस्ताचा न्याय केला जाईल त्यावेळी असाच प्रकार होईल असे सांगितले. आपल्या संकट समयी परमेश्वराच्या लोकांना पृथ्वीवरील अधिकारी व न्यायाधीश यांच्यावर किती अल्प प्रमाणात अवलंबून राहावे लागले जे न्यायाधीश परमेश्वराचे वचन याचे मार्गदर्शन व सल्ला मानीत नाहीत, तर त्यांच्या मानाचे विचार याप्रमाणे ते न्याय देतील अशा लोकासमोर परमेश्वराचे निवडलेले लोक यांना उभे राहणेचा प्रसंग येईल. COLMar 120.1

“या दाखल्यातील अन्यायी न्यायाधीश याबाबतीत आपण काय करावे हे ख्रिस्ताने सांगितले आहे. तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारीतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय?‘‘ ख्रिस्त, आमचा कित्ता त्याने त्याची बाजू समर्थ आहे वा स्वत:ची सुटका करावी यासाठी काहीही केले नाही. येशूने त्याचा खटला परमेश्वराच्या स्वाधीन केला. तद्वत् येशूचे अनुयायी यांनी दोष देऊ नये किंवा कोणताही दबाव आणू नये जेणेकरून त्याची सुटका केली जाईल. COLMar 120.2

जेव्हा आमच्यावर एखादा छळवादी प्रसंग येतो व त्याचे कारण समजत नाही तेव्हा आम्ही आमची शांतता भंग होऊ देऊ नये. जरी आम्हांस अन्यायाने वागविले तरी आपण भावनाप्रधान होऊ नये. आम्ही सूड भावनेने वागतो तेव्हा आम्ही स्वत:लाच दुःख देतो. आम्ही परमेश्वरावरील आमच्या विश्वासाचा नाश करीतो व पवित्र आत्म्याला खिन्न करीतो. आमच्या बाजूने स्वर्गीय संदेशवाहक आहे, तो आमची बाजू घेऊन शत्रुविरूध्द साक्ष देईल. धार्मिकतेचा सूर्य जो येशू त्याच्या प्रकाशात आम्हांस सुरक्षित ठेवतो. तेथे सैतानाचे काहीही चालणार नाही. त्या पवित्र प्रकाशात सैतानाला कधीही प्रवेश करीता येणार नाही. COLMar 120.3

सर्व जग दुष्टतेत वाढत आहे अशा वेळी, आम्ही कोणीही म्हणू नये की आम्हांवर कधीही अडचणीचे प्रसंग येणार नाहीत. परंतु याच अडचणी आम्हास परमपरमेश्वराच्या सान्निध्यांत आणतात. जो सर्वज्ञ परमेश्वर त्याजकडे आम्ही ज्ञानासाठी मागणी करीतो. COLMar 120.4

प्रभू म्हणतो, “संकटसमयी माझा धावा कर‘‘ स्तोत्र ५०: १५ प्रभु आम्हास सांगतो की, आमची चिंता, आपल्या गरजा व परमेश्वराच्या मदतीची गरज ही आम्ही त्याला कळवावी. प्रभू सांगतो की प्रार्थनेत तप्तर असा आम्हांवर अडचणी व संकट येताच आम्ही परेश्वराकडे आग्रहाची कळकळीची प्रार्थना करावी. आपल्या अशा प्रकारे प्रार्थना याद्वारे आपण आपला विश्वास परमेश्वरावर आहे हे विदित करीतो. आपल्या गरजांची जाणीव यामुळे आम्ही परमेश्वराकडे कळकळीची प्रार्थना करीतो, आणि आपल्या अशा प्रार्थना ऐकून आपला स्वर्गीय पिता याला आपला कळवळा येतो. COLMar 121.1

विश्वासामुळे ज्या कोणाचा छळ होणे वा दोषारोप केला जातो अशावेळी असा विचार येतो की परमेश्वर आम्हास विसरला आहे. मानवाच्या दृष्टीने आपण कदाचित् अल्पसंखेने असू. आपले शत्रू आपल्यावर जय मिळवितात असे दिसू शकेल. पण काही झाले तरी आपला सद्विवेक ढळू न देणे. ज्या परमेश्वराने आमच्यासाठी दु:ख सहन केले, आमचे क्लेश व आपत्ती ज्याने वाहिली तो आम्हांस कधीही विसरणार नाही. COLMar 121.2

परमेश्वराची लेकरे यांना एकटे व निराश्रित असे कधीच सोडले जात नाही. प्रार्थनेद्वारे सर्वसमर्थ परमेश्वराचा हात कार्यसिध्द होतो. प्रार्थनेमुळे “राज्ये जिंकली, धार्मिकतेचे वर्तन केले, वचने मिळविली, सिहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ति नाहीशी केली, “जे हतात्मे त्यांच्या विश्वासासाठी मरण पावले त्यांचा अर्थ काय हे आपण त्याच्या अहवालावरून ऐकू-त्यांनी परक्यांची सैन्ये पळविली‘‘ इब्री ११:३३,३४. COLMar 121.3

जर आम्ही आमचे जीवन परमेश्वराची सेवा करणे यासाठी समर्पित केले असेल तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत आलो तरी परमेश्वराने तेथे साहाय्याची योजना केलेली असेल. आम्हांपुढे कसलीही परिस्थिती असली तरी परमेश्वराचा वाटाडया तेथे आहे तो आम्हास मार्ग दाखविल, आमच्या जीवनात कितीही गंभीर काळजी येवो परमेश्वर आमचे समाधन करील, आमचे कसलेही दुःख असो, मृत्युमुळे झालेला वियोग असो किंवा आज्ञानाने झालेली चूक अशा परिस्थितीत ख्रिस्त आम्हांस सोडून देत नाही. येशूची वाणी स्पष्टपणे ऐकू येते : “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, योहान १४ : ६ “कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, याला तो सोडवील‘‘ स्तोत्रसंहिता ७२: १२. COLMar 121.4

जे कोणी प्रभुच्या सान्निध्यात येतात व प्रभुची विश्वासूपणे सेवा करीतात ते प्रभूचा सन्मान करीतात असे प्रभु सांगतो. “ज्यांचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांति देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो.‘‘ यशया २६:३ सर्वसमर्थ प्रभुचा हात आम्हास पुढे न्यावयास सदा पुढे दाखविलेला असतो. प्रभु म्हणतो, पुढे चला, मी तुम्हास मदत पाठवीन. माझ्या गौरवासाठी माझ्या नामाने मागा म्हणजे तुम्हास प्राप्त होईल. जे तुमच्या पराभवाची वाट पाहतात त्यांच्यासमोर तुमचा विजय होईल व त्याद्वारे प्रभुचे गौरव होईल, वचन किती गौरवाने विजयी झाले हे त्याना दिसून येईल. “तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल‘‘ मत्तय २१:२२. COLMar 121.5

ज्या कोणाचा छळ केला गेला वा अन्यायाने वागविले त्यांनी परमेश्वराकडे आरोळी करावी. जे तुम्हांशी कठोरपणाने वागतात त्याच्यापासून मागे फिरा व तुमचा निर्माता परमेश्वर त्याजकडे तुमची विनंती सादर करा. जे कोणी पश्चात्तापी अंत:करणाने परमेश्वराकडे येतात त्यांना परमेश्वर कधीही परत लावून देत नाही. प्रत्येक कळकळीची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. स्वर्गीय संगीत, समूहगीत देवदूतांचे चालेल असता, परमेश्वराला अगदी अशक्त मानवाची दीनवाणी ऐकू येते. आम्ही आपल्या खोलीत प्रार्थनेद्वारे आपले अंत:करण परमेश्वरापुढे खुले करीत असतो. आम्ही रस्त्याने चाललो असता आमच्या मुखातून प्रार्थनेचे शब्द निघतात आणि अशाप्रकारे केलेली प्रार्थना अखिल विश्वाचा राजाधिराज याच्या सिहासनापर्यंत पोहचतात. आमच्या प्रार्थना कणाही मानवास ऐकू येणार नाहीत, त्या प्रार्थना अशा हवेत अंतर्धान पावत नाहीत किंवा या जगातील जे धामधुमीचे व्यवहार चालले आहेत त्यात प्रार्थना हरवली जात नाही. आत्म्याची प्रार्थनेतील इच्छा कधीही बुडविली जात नाही. समाजाचा गलबला त्यातून ती वर येते, समाजाच्या गोंधळांतून वर उचावली जाते, व ती स्वर्गीय दरबारात जावून पोहचते. आम्ही प्रार्थना करीतो म्हणजे आम्ही परमेश्वराशी बोलतो आणि परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. COLMar 122.1

ज्या तुम्हास वाटते की तुम्ही अगदी टाकाऊ व पापी आहात, तरीपण तुमची परिस्थिती परमेश्वरापुढे सादर करणे याबाबत भिती बाळगू नका. जेव्हा जगाच्या पापासाठी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये स्वत:ला दिले त्यावेळीच प्रत्येक पापी मनुष्याची बाजू परमेश्वराने स्विकारली आहे “ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेविता आपणा सर्वांकरीता त्याला दिले तो त्याजसहीत आपल्याला सर्व काही कसे देणार नाही ?’ रोम ८:३२ ही जी कृपा वचने दिली आहेत ती तो पूर्ण करून आम्हास उत्तेजन व सामर्थ्य देणार नाही काय? COLMar 122.2

सैतानाच्या सत्तेतून, ख्रिस्ताचे लोक जे त्याचे वतन-वंशज आहेत त्यांची सुटका करणे यासारखी ख्रिस्ताची दुसरी इच्छा कोणतीच नाही. आपण, सैतानाच्या सत्तेतून सुटका व्हावी त्यापूर्वी आम्ही त्याची आम्हांवर जी सत्ता आहे त्यापासून मुक्त होणे हे अत्यंत गरजेचे आहे. आमची जगिक गोष्टीपासून, स्वार्थापासून, कठोर व ख्रिस्तविरहीत स्वभावापासून सुटका व्हावी म्हणून प्रभू आम्हांवर संकटे येऊ देतो व आम्हांस शुध्द करीतो. येशू खिस्त आम्हांवर संकटाचा प्रवाह वाहू देतो व तो प्रवाह आम्हांवरून जातो यासाठी की तारणारा येशू ख्रिस्त याची आम्हांस ओळख व खात्री व्हावी, येशू संकटे येऊ देतो त्यामुळे आम्हांमध्ये शुध्दतेची आतुरता लागणे व त्या सकट प्रवाहातून आम्ही शुध्द, पवित्र व हर्ष करीत बाहेर निघावे. आम्ही संकटात भट्टीतून जात असता बहुधा आमचे आत्मे अंधकारमय व स्वार्थी असतात, पण जर आम्ही सर्व सहन करीत त्या परीक्षेत पार पडलो तर आमचे जीवन देवाच्या स्वभावाचे प्रतिबिंब देत राहील. जेव्हा त्याचा संकटे आणणेचा हेतु पूर्ण होईल तेव्हा, “तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रगट करील‘‘ स्त्रोतसहिता ३७ : ६. COLMar 122.3

परमेश्वर त्याच्या लोकांच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करील असा धोका कधीच होणार नाही. धोका हा आहे की मोह व संकटे यामध्ये ते लोक निराश होतील व प्रार्थना करणेची चिकाटी धरणार नाहीत. COLMar 123.1

स्त्रीला येशुने त्याची सहानुभूती दाखविली. येशुला तिचे दुःख पाहून कींव आली. त्या विधवेची प्रार्थना ऐकून तिला लगेच आश्वासन द्यावे असे येशुला वाटले, पण येशुला त्याच्या शिष्यांना एक बोध शिकवावयाचा होता की, म्हणून येशुने थोडा वेळ तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. जेव्हा त्या बाईने तिचा विश्वास प्रगट केला आणि येशुने तिची विनंती मान्य करून तिला जो न्याय हवा तो दिला. शिष्य हा बोधपर धडा कधीही विसरले नाहीत. प्रार्थना निरंतर, चिकटीने व विश्वासाने याचे प्रतिफळ मिळते. COLMar 123.2

ख्रिस्तानेच त्या बाईच्या अंत:करणात चिकाटीने विनंती करीत राहणेस सुचविले आणि ती तसे करीत राहिली. न्यायाधीशासमोर जाणेचे धैर्य व निश्चय हे ही ख्रिस्तानेच पुरविले. कितीतरी शतकापूर्वी याकोबाची जी झोंबी झाली त्यासाठी दीर्घप्रयत्न करणेस ख्रिस्तानेच याकोबास प्रेरीत केले. यामुळे ख्रिस्ताने याकोबात ज्या विश्वासाचे रोपण वा लावणी केली त्यामुळे याकोबाला वेतन मिळाले. COLMar 123.3

जो परमेश्वर स्वर्गीय पवित्र स्थानात राहतो तो धार्मिकतेने न्याय करील. परमेश्वराची गोडी त्याच्या लोकांच्या जीवनात आहे, जे लोक या पापी जगात मोहाशी झगडतात, त्यांच्या जीवनाचे काय होते ते पाहाणे व त्यांना मदत करणे यात परमेश्वर गोडी दाखवितो, जरी त्याची सेवा करावयास त्याच्या सिंहासनासभोवार असंख्य देवदूत आहेत त्यापेक्षा मानवाचे भवितव्य हीच त्याची गोडी आहे. COLMar 123.4

या अखिल विश्वाचे लक्ष या पृथ्वीकडे लागलेले आहे. कारण या पृथ्वीवरील मानवासाठी ख्रिस्ताने एकमेव किंमत दिली आहे. जगाचा तारणारा ख्रिस्त याने सुवार्तेद्वारे स्वर्ग व पृथ्वी ही एकत्र बांधिली आहेत. स्वर्गीय देवदुत जसे अब्राहाम व मोशे यांच्याशी बोलले व चालले तसे स्वर्गीय देवदूत या पृथ्वीवर येवून भेट देतात. शहरातील गजबजलेली बाजाराची ठिकाणे, धंदा, व्यापार पेठा व खेळाची मैदाने यात लोक त्यांच्या जीवनात हेच काय ते समजतात आणि अशा लोकांत फारच थोडे लोक पवित्र गोष्टीचा विचार करीतात, तरी परमेश्वर सर्वावर देखरेख करीतो. मानवाचे प्रत्येक कृत्त्य व विचार यावर देवदुताचे लक्ष आहे. प्रत्येक व्यापाराच्या ठिकाणी वा करमणकीच्या सभेत, प्रत्येक धार्मिक सभेला, आपल्याला दिसत नाहीत असे देवदुत कितीतरी हजर असतात. हे देवदूत पडदा बाजुला करून आम्हांस अदृश्य जग दाखवितात यासाठी की आपले विचार, या जगातील धामधूम, गोंधळ यापासून स्वर्गीय गोष्टीकडे लागावे म्हणून आपले कृत्त्य व शब्द याकडे आम्ही लक्ष दयावे कारण देवदूत साक्षीदार आहेत. COLMar 124.1

आम्हास भेट देणाऱ्या देवदूतांचे कार्य आम्हास चांगले समजले पाहिजे. आमच्या सर्व कार्यात मदत करणे व काळजी घेणे व साहाय्य करणे यासाठी हे स्वर्गीय देवदूत आहेत हे आम्हास समजले पाहिजे. जे सौम्य व नम्रजण परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवितात व त्याची मागणी करीतात अशांची सेवा करावयास ते प्रकाशधारक, सामर्थ्यवान व अदृश्य सैन्य साहाय्यास असते. करूब व सेराफीम हे दोन देवदूत परमेश्वराच्या उजव्या बाजूला सेवा करावयास उभे असतात त्यांची शक्ति व सामर्थ्य ही दहा हजाराहून हजारोहजार देवदूतपेक्षाही जादा आहे, असे दोन देवदूत “ते सर्व वारशाने तारणप्राप्ती होत असलेल्यासाठी सेवा करावयास पाठविलेले असे परिचारक आत्मे नाहीत काय ?‘‘ इब्री १: १४. COLMar 124.2

असे हजारोहजारों देवदूत विश्वासूपणे मानवाच्या शब्दांची व कृत्त्यांची नोंद करीतात. प्रत्येक क्रूर कृत्त्य, परमेश्वराच्या लोकांचा केलेला अन्याय, वाईट कामदारांच्याद्वारे त्यांना जो जो त्रास सोसावा लागला त्या प्रत्येकाची स्वर्गीय रजिस्टर वहीत नोंद केली जाते. COLMar 124.3

“तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारीतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय ? मी तुम्हांस सांगतो परमेश्वर त्याचा न्याय त्वरीत करील? . COLMar 124.4

“यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्यापासून मोठे प्रतिफळ आहे. तुम्हास सहनशक्तिचे अगत्य आहे, यासाठी की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनफळ प्राप्त करून घ्यावे. कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे, जो येणार तो येईल, उशीर करणार नाही.”इब्री १०:३५-३७ “अहो बंधुनो, प्रभुच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकांची वाट पाहत असता, त्यास ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरीतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंत:करणे स्थिर करा, कारण प्रभुचे आगमन जवळ आले आहे. याकोब ५:७, ८. COLMar 124.5

परमेश्वराची सहनशीलता अद्भुत आहे. कृपा ही पापी मानवाला विनती करीत असताना न्यायीपणा ही आतुरतेने वाट पाहात राहते. कारण “निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा आधार आहेत‘‘ स्तोत्रसंहिता ९७:२ “परमेश्वर मदक्रोध आहे, व महापराक्रमी आहे, तरी तो पाप्यास शासन केल्यावाचून राहणार नाही, परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत‘‘ नहम १:३. COLMar 125.1

या जगातील लोक परमेश्वाचे नियमशास्त्राचे उल्लंघन करणे यात धीट झाले आहेत. परमेश्वर मानवाचे सर्व काही सहन करीतो त्यामुळे मानव परमेश्वराची सत्ता झुगारून देतो. परमेश्वराचे जे लोक वतन आहेत त्यांचा क्रूरपणे छळ करणे व गुलामगिरी करणे यात ते एकमेकांचे अर्थात त्यांच्या साथीदारास मदत करीतात, व म्हणतात, “देवाला कसे समजणार ? परात्पराला काय ज्ञान आहे ?”स्त्रोतसहिता ७३: ११ पण परमेश्वराने एक मर्यादा घालून दिली आहे ती मानवास ओलांडता येत नाही. अशी एक वेळ येत आहे की, मानवाला ठराविक मर्यादेपलीकडे जाता येणार नाही. सध्या मानवाने परमेश्वराच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली आहे, परमेश्वराच्या कृपेची मर्यादा, परमेश्वराच्या दयेची मर्यादा हि ही ओलांडली आहेत. परमेश्वर, त्याच्या लोकांची मध्यस्थी करील, त्याचे सामर्थ्य प्रकट करून अधार्मिकांची सत्ता नाहीशी करील व त्याच्या लोकांची सुटका करणे यात विजयी होईल. COLMar 125.2

नोहाच्या दिवसातील लोकांनी परमेश्वराचे नियम, परमेश्वर हा निर्माणकर्ता हे अजिबात विसरून गेले होते. त्या लोकांची अनिती व पाप इतकी उंचावली की त्यामुळे परमेश्वराने सर्व पृथ्वीवर जलप्रलय आणला आणि त्या दुष्टांचा नायनाट केला. COLMar 125.3

परमेश्वर प्रत्येक युगात कसे काय कार्य करीतो. हे त्याने प्रगट केले. जेव्हा संकटे आली, तेव्हा परमेश्वर प्रगट झाला व सैतानाचे जे हानिकारक कार्य होते त्याला बंधन घातले. परमेश्वराने संकटे येऊ दिली. राष्ट्रांवर, कुटबावर व व्यक्तिवर यासाठी की त्या संकटावर परमेश्वराचा ताबा आहे व ती तो थांबवू शकतो. त्यानंतर परमेश्वर हा इस्त्राएलामध्ये आहे, आणि हे इस्त्राएल लोक हे त्याचे नियम पाळतील व ते त्याचे लोक असे असतील. COLMar 125.4

सध्याच्या पातकी काळामध्ये अखेरच्या भयंकर घटना नजीक येत आहेत हे आम्हांस समजले पाहिजे. जेव्हा परमेश्वराचे नियम याविरूध्द कार्यभाग विश्वव्यापी होईल, जेव्हा त्याच्या लोकांचा छळ होईल व गुलाम केले जाईल सहसोबती यांच्याद्वारे, त्यावेळी प्रभु त्याच्या लोकासाठी मध्यस्थी करील. COLMar 126.1

जेव्हा प्रभु असे म्हणेल ती वेळ नजीक आली आहे, “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यत थोडावेळ लपून राहा. कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाश्यांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रगट करील, वधिलेल्यांस ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही‘‘ यशया २६:२०,२१ जे लोक सध्या आपणास ख्रिस्ती म्हणवितात तेच लोक, फसविणे व गरीबांचा छळ करीतात, ते अनाथ व विधवा यांची चोरी करीतात, परमेश्वराच्या लोकाच्या सद्विवेकावर त्यांचा ताबा राहत नाही म्हणून ते त्यांची सैतानी वृत्ती यामुळे, त्याना त्रास देतील, पण या सर्वाबाबत परमेश्वर त्यांचा न्याय करील. ‘कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल’ (याकोब२:१३) ते सर्वजण लवकरच या जगाच्या न्यायाधीशापुढे उभे राहतील व परमेश्वराचे जे वतन-लोक-संतान त्यांना यांनी त्याच्या शरीराला व मनाला त्रास दिला त्याचा त्यांना हिशोब द्यावा लागेल. आता ते लोक खोटे आरोप करतील, परमेश्वराने ज्या लोकांना त्याचे कार्य करावयास नेमिले त्यांचा ते उपहास करणे, परमेश्वरावर जे विश्वास ठेवितात त्यांना तुरूंगात घालणे, त्यांना बेडया घालणे, त्यांना हद्दपार करणे व त्यांना ठार मारणे, पण त्यांनी जे प्रत्येक दुःख दिले, प्रत्येक अश्रु ढाळावयास कारणीभूत झाले. या सर्वाचा त्यांना जबाब द्यावा लागेल. त्यांच्या पापाचे वेतन परमेश्वर त्यांना दुप्पट देईल. बाबेलोन धर्मभ्रष्ट मंडळीचे दर्शक, त्या मंडळीचे जे पालक आहेत त्यांच्यावरील न्याय असा आहे, “कारण तिच्या पापांचा ढीग स्वर्गापर्यंत पोहचला आहे, आणि तिच्या अधर्माची आठवण देवाने केली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट दया, तिने प्याल्यांत जितके ओतिले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता”प्रकटीकरण १८: ५,६. COLMar 126.2

हिंदुस्तान, आफ्रिका, चीन, समुद्रातील बेटे व ख्रिस्ती देशातील पायाखाली चिरडलेले कोटी कोटी लोकांची शोकवाणी परमेश्वराकडे जात आहे. त्या शोकवाणीकडे परमेश्वर लक्ष देवून लवकरच उत्तर देईल. परमेश्वर या पृथ्वीवरील अनिती काढून शुध्द करील. नोहाच्या दिवसात जसा जलप्रलय आणून नाश केला अर्थात शुध्दता केली तशी अग्नीचा वर्षाव करून या पृथ्वीची शुध्दता करील. COLMar 126.3

“त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल, कोणेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल, तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील‘‘ दानीएल १२ : १. COLMar 127.1

पोटमाळा, झोपडी, अंधार कोठडी, गुन्हेगारांचा अड्डा, डोंगरमाथा, गुहा, दरी, कपारी व वाळवंटी प्रदेशातून ख्रिस्त स्वतः त्यांच्या लेकराना एकत्र करील. वरील लोक पृथ्वीवर निराश्रीत, पिडीत व संकटात होते. कोटी कोटी लोक दुर्देवाने मरणोन्मखी पडले कारण त्यांनी सैतानाच्या फसवेगिरीला बळी पडणेचे नाकारले. मानवी न्यायाधीशानी, परमेश्वराच्या लोकांचा मोठे गुन्हेगार म्हणून निकाल दिला. पण एक दिवस नजीक येत आहे कारण “देव-परमेश्वर स्वत: न्याय करणार आहे”(स्तोत्र ५०:६) त्यानंतर या पृथ्वीवरील सर्व न्याय निकाल उलट केले जातील. प्रभु परमेश्वर सर्वाच्या मुखावरील अश्रू पुसितो, तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो‘‘ यशया २५:८. “प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात येईल.‘‘ (प्रकटी ६:११) “पवित्र लोक, परमेश्वराने उध्दारलेले लोक असे त्यास म्हणतील‘‘ यशया ६२:१२. COLMar 127.2

जे काही अडखळण वा वधस्तंभ त्यांना वाहावयास लागले, त्यांना जे काही नुकसान सोसावे लागेल, जो काही छळ त्यांना सोसावा लागला कदाचित त्याचा प्राणही त्यांना गमविण्यास भाग पडले असावे, परमेश्वराच्या लोकांची भरपूर भरपाई केली जाईल. “ते त्याचे मख पाहतील व त्याचे नाम त्यांच्या कपाळावर असेल.”(प्रकटीकरण २२:४) COLMar 127.3