लूक १५:१ - १० यावर आधारीत
सर्व ‘जकातदार व पापी लोक’ त्याचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परूशी व शास्त्री या उभयतांनी अशी कुरकुर केली की ‘हा पापी लोकांचा स्विकार करून त्यांजबरोबर जेवतो‘. मग त्याने त्यास हा दाखला सांगितला. तुम्हांमध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले, तर ती नव्याण्णव रानात सोडून देवून हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध करीत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांदयावर घेतो आणि घरी येवून मित्रांस व शेजाऱ्यांस बोलावून त्यांस म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यास पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांस सांगतो. COLMar 128.1