तसेच, अशी स्त्री कोण आहे की तिच्याजवळ दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा लावून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींस व शेजाऱ्यास बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या (परमेश्वर) दुतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांस सांगतो”. (लूक १५:१ - १०) COLMar 128.2
ख्रिस्ताच्या सभोवार ‘जकातदार व पापी लोक’ जमले होते तेव्हा शास्त्री लोकांनी कुरकुर केली. “हा मनुष्य पापी लोकाचा स्विकार करून त्याजबरोबर जेवतो.” COLMar 128.3
त्यांनी ख्रिस्तावर असा आरोप केला की त्याला पापी व दुष्ट यांच्याशी सहवास ठेवणे आवडते, आणि त्या लोकांच्या दुष्टतेची येशूला कल्पना नाही असे सुचवित होते. येशूविषयी शास्त्री लोक निराश होते. जे लोक येशुच्या रितीरिवाज व शिक्षणाचे पालन करीत होते. अशा शास्त्री लोकांच्या सहवासात येशू का राहत नव्हता ? येशू बाकी लोकाकडे जणू काय लक्षच नाही असे दाखवून येशू सर्व लोकात कसा काय कार्य करीत होता? जर येशू खरा संदेष्टा असता तर त्याने शास्त्री लोकांशी सहमत होवून जकातदार व पापी यांना त्यांच्या परी वागविले असते. शास्त्री लोक हे समाजाचे रक्षक मानले जाणारे अशाबरोबर येशूचा वादविवाद होत असे, येशूच्या शुध्द जीवनाने त्यांना धक्का दिला जात असे. शिवाय येशू समाज बहिष्कृत लोकांशी सहानुभूतीने वागत असे. शास्त्री लोकांना येशूची ही पध्दत आवडली नाही. कारण ते स्वत:ला सुशिक्षित, सुधारक, धार्मिक समजत असत, पण येशूचे उदाहरण याद्वारे त्याचा स्वार्थ उघड झाला. COLMar 129.1
ज्या लोकांना शास्त्री लोक आवडत असत त्या लोकांना राग पुढील दृश्य पाहन आला जे लोक सभागृहात कधी दिसत नव्हते ते येशू सभोवती गोळा होवून एकाचित्ताने येशूचा संदेश ऐकत होते. येशूच्या शुध्द सहवासात शास्त्री व परूशी यांना अपमान वाटत होता, त्या येशूकडे जकातदार व पापी हे कसे काय आकर्षित झालेत? COLMar 129.2
“हा मनुष्य पापी लोकांचा स्विकार करीतो या त्यांच्या तिरस्कारणीय शब्दातच स्पष्टीकरण आहे हे त्याना समजले होते. जो पापी आत्मा येशूच्या सान्निध्यात आला होता त्या मनुष्याला समजले की, पापाच्या खाचेतून वर येण्याचा मार्ग होता. पण परूशी लोक पापी लोकांना केवळ दोष देणे व तिरस्कार करणे एवढेच होते पण येशूने त्यांना परेश्वराची लेकरे म्हणून त्यांचे स्वागत केले, जरी ते स्वर्गीय पित्याच्या गृहापासून दूर बहकलेले होते तरी ते, पित्याच्या अंत:करणातून ते विसरलेले नव्हते. त्यांची दुर्दशा व पाप यामुळे ते परमेश्वराच्या दयेला अधिक कारणीभूत झाले. ते परमेश्वरापासून बहकून गेले तसतसे परमेश्वर त्यांची अधिक आतुरता करू लागला व त्यांची सुटका व्हावी यासाठी तो अधिक अर्पण करणे ठरला गेला. COLMar 129.3
हे इस्त्राएलांचे शिक्षक व माहिती देणारे असे अभिमानाने सांगत असत. त्यांनी हे सर्व शिक्षण त्यांच्या पवित्र धर्मग्रंथातून शिकावयाचे होते. दावीदाने हे लिहीले नव्हते काय ? दावीद हा महापापात पडला होता “हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; आपल्या दासाचा शोध कर, “स्तोत्रसंहिता ११९: १७६ मीखाने, पापी लोकांना परमेश्वराची प्रिती दाखविली नाही काय ? तो म्हणतो, “तुजसमान देव (परमेश्वर) कोण आहे ? तू अधर्माची क्षमा करीतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकीतोस, तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.‘‘ मीखा ७:१८. COLMar 129.4