“त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकांनी, त्याला, ज्या गालीलकारांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते, त्यांजविषयी सांगितले. मग त्याने त्यास उत्तर दिले, या गालीलकरांनी असे दुःख भोगिले यावरून दुसऱ्या सर्व गालीलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हांस वाटते काय? मी तुम्हांस सांगतो, नव्हते; तरी पण तुम्ही पश्चात्ताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहांतील बुरूज पडून त्यांचा घात झाला, ते यरूशलोमांत राहणाऱ्या सर्व मनुष्यापेक्षा अपराधी होते असे तुम्हांस वाटते काय? मी तुम्हांस सांगतो, नव्हते; तरी पण तुम्ही पश्चात्ताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल.” COLMar 152.1
निष्फळ अंजिराच्या झाडाच्या दृष्टांतात त्याने हा दाखला सांगितला, कोणाएकाचे द्राक्ष मळयात लाविलेले अजिराचे एक झाड होते, त्यावर तो फळ पाहावयास आला परंतु त्याला मिळाले नाही. तेव्हा त्याने माळयाला म्हटले, पाहा, मी आज तीन वर्षे या अजिरावर फळ पाहावयास येतो परंतु मला काही आढळत नाही, ते तोडून टाक, भूमीला उगाच भार तरी का असावा? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदोचेही वर्ष ते असू दया, म्हणजे मी त्याच्याभोवते खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे’ लूक १३: १-९. COLMar 152.2
ख्रिस्ताने त्याची शिकवण व न्याय काळाचे कृपेचे आमंत्रण यांच्या संबंध जोडला. येशू म्हणाला, “कारण मनुष्याचा पुत्र माणसाच्या प्राणांचा नाश करावयास आला नाही, तर तारावयास आला‘‘ मत्तय १८: ११. “देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले”योहान ३ : १७. येशूचे कृपेचे कार्य याचा संबंध परमेश्वराचा न्याय व न्यायनिवाडा याचे स्पष्टीकरण निष्फळ आंजिराचे झाड या दाखल्यात स्पष्ट केलेले आहे. COLMar 152.3
परमेश्वराच्या राज्याचे येणे याचा इशारा येशू लोकांना देत होता आणि याबाबत लोकांचे अज्ञान व गैरसमज याचा येशूने धिक्कार केला. आकाशात वातावरणाची चिन्हे ही लोकांना लवकर समजतात. परंतु काळाची चिन्हे यावरून येशूचे कार्य व येणे ही दर्शवितात ती लोकांना समजत नाहीत. COLMar 152.4
पण त्याकाळी लोक असे म्हणत असत की, आम्ही स्वर्गीय राज्यासाठी सज्ज आहोत पण इशारा देणारा जो संदेश आहे तो दुसऱ्यासाठी आहे असेच सध्याचेही लोक म्हणतात. तूर्तच एका घटनेने लोकांत खळबळ उडाली आहे असे येशूला सांगितले. यहुदी प्रांताचा राज्यपाल पंतय पिलाताने लोकांना अपमानास्पद वागविले. यरूशलेमातील लोकांत मोठी खळबळ उडाली तरीही पिलाताने त्याला बंडाळीचे स्वरूप दिले. एका प्रसंगी तर तेथील शिपायांनी मदिराचा ताबा घेतला आणि गालीलकरांची कत्तल केली. यहदी लोकांनी याचा अर्थ असा केला की, “त्याच्या पापांची त्यांना न्यायी शिक्षा मिळाली आणि ज्यांनी ही बातमी सांगितली त्यांना ही गोष्ट पवित्र व समाधानाची वाटली. त्यांच्या स्वदृष्टीने त्यांचे वागणे त्यांना परमेश्वराची पसती असे वाटले आणि त्यापेक्षा गालील लोकांची घटना दुर्घट होती. त्या लोकांसाठी येशूपासून कोणता धिक्काराचा संदेश मिळतो हे लोकांना ऐकावयाचे होते. गालीलकरापेक्षा त्या यहुदी लोकांना अधिक आतुरता लागली होती. या लोकांचा धिक्कार होऊन त्यांच्यावर शिक्षा ठोठावली जाईल असे उद्गार येशूपासून ऐकणे ही अपेक्षा यहद्यांची होती. COLMar 153.1
येशूचे मत काय आहे हे ऐकणे त्यानंतरच शिष्य त्यांचे विचार मांडणार होते. दुसऱ्या मनुष्याचा न्याय करणे याविषयी येशूने त्यांना धडा दिला होता. ज्याचा त्याचा न्याय प्रायचित्ताप्रमाणे केला जाईल. तरीपण या लोकांना इतर लोकानी अधिक पापी आहेत असे येशूने पुकारावे अशी येशूपासून त्यांची अपेक्षा होती. येशूने उत्तर दिले त्यामुळे ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. COLMar 153.2
लोकसमुदायाकडे वळून येशू तारणारा म्हणाला, “या गालीलकरांनी असे दु:ख भोगिले यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरापेक्षा ते पापी होते असे तुम्हांस वाटते काय ? मी तुम्हांस सांगतो, नव्हते; तरी पण तुम्ही पश्चात्ताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल‘‘ या घटनावरून त्यांनी विचार करून नम्र मनाने पापाविषयी पश्चात्ताप करणेची गरज हा धडा शिकावयाचा होता. त्या लोकावर द्वेषाचे वादळ येत होते; म्हणून त्यांनी ख्रिस्तात सुरक्षित आश्रय घेण्याची आवश्यकता होती. COLMar 153.3
येशू व शिष्य लोकांशी बोलत असता येशूला भविष्यात असे दिसले की यरूशलेमास सैन्याने वेढा दिलेला. या निवडलेल्या शहरावर शिपायांचा हल्ला व त्यात हजारों लोक त्या वेढयांत मृत पावले जातील. त्या गालीली लोकाप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यांत यहुदी अर्पणाचा विधी करीत असताना ठार मारले जातील. तेथील लोकांवर जो आत्मघाताचा हल्ला झाला हा इशारा परमेश्वरापासून सर्व राष्ट्रास दिला जात होता. येशू म्हणाला, “तरी पण तुम्ही पश्चात्ताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल’ केवळ त्यांच्यासाठी कृपेचा काळ थोडा वेळ रेंगाळला. त्यांच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टींची गरज होती हे त्यांना समजणेसाठी अद्यापि वेळ होती. COLMar 153.4
ख्रिस्ताने पुढे सांगितले, “कोणाएकाचे द्राक्ष मळयात लाविलेले अंजिराचे एक झाड होते, त्यावर तो फळ पाहावयास आला परंतु त्याला मिळाले नाही. तेव्हा त्याने माळयाला म्हटले, पाहा, मी आज तीन वर्षे या अजीरावर फळ पाहावयास येतो परंतु मला काही आढळत नाही ते तोडून टाक; भूमीला उगाच भार तरी का असावा ? COLMar 154.1
ख्रिस्ताने हा दाखला सांगितला त्याच्या अर्थाविषयी ऐकणाऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये. इस्त्राएल हा द्राक्षवेल मिसर देशातून आणिला आहे असे गीत दावीदाने गाईले होते. यशयाने लिहिले होते, “सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्त्राएलांचे घराणे ; त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक. “यशया ५:७. येशू ज्या पिढीसाठी आला ते लोक म्हणजे परमेश्वराच्या द्राक्षमळयांत लावलेले अजीराचे झाड ते लोक त्याचे खास लोक व आशिर्वादीत असे आहेत. COLMar 154.2
परमेश्वराचा त्याच्या लोकांसाठी हेतू व त्यांच्यासाठी गौरवी शक्यता यांचे वर्णन सुंदर शब्दात केलेले आहे. परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांस धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लाविलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने त्यास मला पाठविले आहे”यशया ६१:३ याकोब मरणावस्थेत असता, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रेरित होऊन त्याचा आवडता पुत्र त्याजविषयी म्हणाला, “योसेफ हा फलावती एक शाखाच आहे ;... त्याच्या डहाळया भिंतीवर चढून पसरल्या आहेत आणि तो म्हणाला, “तुझे साहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्वसमर्थ देव याजकडून हे होईल, वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तुला तो देईल‘‘ उत्पत्ति ४९:२२,२५ यास्तव परमेश्वराने इस्त्राएल हा चांगला वेल जीवनाच्या विहीरीपाशी लाविला आहे. त्याने त्याचा द्राक्षमळा त्या टेकडयाच्या भागात फलदायी केला आहे. द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक भागावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकिले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलांची लागवड केली, आणि त्यात एक बुरूज बांधिला.‘‘ यशया ५: १२. COLMar 154.3
मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, तो त्याने रानद्राक्षे दिली.”यशया ५:२ यहुदी लोकापेक्षा ख्रिस्ताच्या काळातील लोकांनी धार्मिकतेचा आव अधिकार दर्शविला ते लोक परमेश्वराच्या आत्म्याची कृपा याबाबत ते कंगाल होते. योसेफाच्या जीवनातील शीलाची मौल्यवान फळे सुवासिक व शोभिवंत होती. ती, यहुदी राष्ट्रात दिसून आली नाही. COLMar 154.4
परमेश्वर त्याच्या पुत्राच्या ठायी फळाचा शोध करीत होता, पण त्याला काही मिळाले नाही. इस्त्राएल हे, जमीनीला केवळ भार होते. त्यांचे अस्तित्व केवळ शाप होते, कारण जेथे फलदायी द्राक्षवेल आले असते ती जागा या निष्फळ झाडाने घेतली होती. परमेश्वर जो आशिर्वाद जगाला देऊ इच्छित होता ती जागा चोरली गेली. सर्व राष्ट्रांत इस्त्राएलाने परमेश्वराचे प्रतिनिधीत्व अयोग्यरितीने केले. ते केवळ निरर्थक नव्हते तर मोठे अडखळण झाले होते. त्याचा धर्म अयोग्य मार्गदर्शक होता आणि लोकांना आर्शिवादाऐवजी तो नाशकारक झाला. COLMar 155.1
द्राक्षमळा या दाखल्यातील माळयाला, मालक म्हणतो हे झाड निष्फळ आहे ते तोडून टाकावे याबाबत काही वाद करीत नाही; पण ते निष्फळ झाड त्याला फळ यावे ही जी मालकाची इच्छा आहे त्याविषयी सहभागी होतो. त्या झाडाची वाढ व त्याला फळ येणे यासारिखा दुसरा मोठा आनंद कोणताच नव्हता. मालकाला प्रत्युत्तर म्हणून माळी म्हणतो, “महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्यासभोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे,‘‘. COLMar 155.2
त्या निष्फळ झाडाची मशागत करणे याचा नकार त्या माळयाने केला नाही. माळी त्या झाडाची अधिक काळजी घेणेसाठी तयार झाला. COLMar 155.3
“तर आता यरूशलेमकरानो व यहदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळयाचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षीच्या मळयात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले ? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली ? यशया ५:३,४‘. COLMar 155.4
तो तेथील सर्व वातावरण सहाय्यक करील व त्यावर सर्व लक्ष केंद्रीत करील. COLMar 155.5
त्या द्राक्षमळयाचा मालक व माळी दोघेही त्या अंजीराच्या झाडाबाबत गोडी दाखवितात. त्याचप्रमाणे पिता व पुत्र हे दोघेही प्रितीने त्यांच्या निवडलेल्या लोकांसाठी कार्य करीत आहेत. ख्रिस्त, त्याचा संदेश ऐकणारे यांना अधिक संधी देण्यात येईल. प्रेमळ परमेश्वर प्रत्येक साधनाद्वारे प्रत्येक झाड हे धार्मिकतेचे झाड होवून फळे देत राहील व ती फळे जगाला आशीर्वादीत अशी होतील. COLMar 155.6
माळयाच्या कामाचा शेवटी काय परिणाम होईल हे येशूने सांगितले नाही. त्या मुद्यावर ती गोष्ट संपविली. ज्या पिढीने येशूचे शब्द ऐकले त्यांच्यावर त्या दाखल्याचा साराश सोपवून दिला. त्या लोकांना गंभीर इशारा दिला होता. “नाहीतर आपण ते तोडून टाकावे‘‘ बदलता न येणारे असे शब्द आता बोलावते किंवा नाही हे त्यांच्यावर अवलंबून होते. क्रोधाचा दिवस नजीक येत होता. इस्त्राएल लोकांवर आपत्ति येत होती, त्या द्राक्षमळयाचा मालक त्या लोकांवर कृपेने त्यांची कानउघडणी करीत होता कारण ते त्या निष्फळ अजीराच्या झाडाप्रमाणे झाले होते. COLMar 155.7
तो इशाऱ्याचा संदेश असाच खालपर्यंत आमच्या पिढयापर्यंत येत आहे. प्रभुच्या द्राक्षमळयात तुम्ही निष्फळ झाड वा निष्कळजी अंत:करणाचे आहा काय ? ते नशाप्रत शब्द तुम्हांलाही लवकर बोलले जावेत काय? परमेश्वराची देणगी तुम्हास कधी प्राप्त झाली? त्या प्रितीची भरपाई वा फेड म्हणून प्रभुने किती वेळ तुमची वाट पाहावी ? प्रभुच्या द्राक्षमळयात लावणी केली, माळी तुमची देखरेख करीत आला, तुम्हांस ही किती महान संधी प्राप्त होत गेली! सुवार्ता संदेश ऐकून तुमचे अंत:करण कितीतरी कोमल झाले! तुम्ही ख्रिस्ताचे नाव धारण केले, ख्रिस्ताचे शरीर त्याची मंडळी हिचे तुम्ही बाहयात्कारी सभासद झाला, आणि असे असून ख्रिस्ताच्या प्रेमळ प्रितीशी तुम्ही सजीव संबंध असा ठेवावा असे तुम्हास वाटले नाही. ख्रिस्ताच्या जीवनाचा प्रवाह तुमच्या जीवनात वहात नाही. ख्रिस्ती शीलाची कृपामय कृपेची फळे “आत्म्याची फळे’ ही तुमच्या जीवनात दिसली नाहीत. COLMar 156.1
त्या निष्फळ झाडाला पाऊस सूर्यप्रकाश व माळयाची देखरेख ही सर्व मिळाली. त्या झाडाला जमिनीतून पोषक द्रव्ये मिळाली पण त्या झाडाच्या निष्फळ फांद्या यांनी केवळ जमिनीवर सावली पाडून अधार केला, यामुळे फळ देणारी वनस्पती त्या अधारी छायेत फलदायी होऊ शकत नाही. तद्वत् परमेश्वराची कृपा तुजवर कितीतरी झाली, पण त्यापासून इतरांना आशिर्वाद प्राप्त झाला नाही. जी संधी तुम्हाला मिळाली तीच इतरांना मिळू शकली असती पण तुम्ही त्या संधीची चोरी करीत आहात. COLMar 156.2
तुम्ही जरी याबाबत अंधुक असे विचार करीत असाल, तरीपण तुम्ही जमिनीला केवळ भार असे आहात असे असूनही परमेश्वराने त्याच्या कृपेमुळे तुम्हास तोडून टाकिले नाही. परमेश्वर तुम्हाकडे निराशेने पाहात नाही. परमेश्वर तुम्हापासून निराशेने मागे फिरत नाही, किंवा तुम्हांस नाशाप्रत सोडून जात नाही. परमेश्वर तुम्हाकडे पाहून ओरडतो व आक्रोश करतो व असेच कित्येक शतकापूर्वी इस्त्राएलाबाबत उद्वार काढले, “हे एफ्राईमा मी तुला कसा सोडून देईन ? हे इस्त्राएला, मी तुला कसे बहकू देईन ?...मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमाचा नाश करण्याकरीता मागे फिरणार नाही; कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे‘‘ होशेय ११:८,९ प्रेमळ तारणारा येशू तुम्हांविषयी म्हणतो, यंदाचेही वर्ष ते राहू द्या; मी त्याला खणून, खत घालीन, काळजी घेईन. COLMar 156.3
इस्त्राएल लोकांना हा जो अधिक कृपेचा काळ प्राप्त झाला आहे त्यात ख्रिस्ताने अविश्रांत व अपार प्रितीने त्यांची सेवा केली. ख्रिस्ताने वधस्तंभावर प्रार्थना केली, “हे बापा, हयांना क्षमा कर, कारण हे काय करितात हे हयास समजत नाही‘‘ येशूचे स्वर्गारोहण झाले त्यानंतर प्रथमतः सुवार्ता यरूशलेमात सांगितली. त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. तेथील प्रथम सुवार्ता मंडळीने पुनरूत्थित येशूचे सामर्थ्य प्रकट केले. तेथे स्तेफन, “त्याचे मुख देवदूताच्या मुखासारिखे दिसले‘‘ प्रे.कृ. ६ : १५ त्यांनी अशी साक्ष दिली आणि तो झोपी गेला. सारा स्वर्ग जे काही देऊ शकेल ते सर्व त्याच्या जीवनावर सोपविले. ख्रिस्त म्हणाला, “माझ्या द्राक्षीच्या मळयात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले?’ “ख्रिस्त तुमची काळजी घेणे व तुम्हांसाठी कार्य करणे यात काहीही कमी पडू देत नाही, तर उलट जादा कार्य करितो. ख्रिस्त आणखी सांगतो, “त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर ; मी त्यास घडोघडी पाणी घालितो, त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रदिवस राखण करितो,“यशया २७:३. COLMar 157.1