Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    हरवलेले नाणे

    हरवलेले मेंढरू हा दाखला सांगितला त्यांनतर येशूने दुसरा सांगितला, “तसेच अशी स्त्री कोण आहे की तिच्याजवळ दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा लावून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही?‘‘ लूक १५ : ८ COLMar 135.1

    पुर्व देशातील गरीबांचे घर म्हणजे एक खोली, खिडकी नाही त्यामुळे घरात अंधार असतो. ते घर झाडलेले नव्हते म्हणून पडलेली पावली कदाचित कचरा व धुळीत झाकली गेली असावी. यासाठी दिवसा दिवा लावून ते घर झाडून काढले जाते. COLMar 135.2

    घरधनीन हिच्या लग्नसमयी तिला मिळालेले पैसे ती काळजीपूर्वक जपून ठेवीते, यासाठी की तिच्या मुलीच्या लग्नसमयी मुलीस देण्यासाठी. तेव्हा त्या पैशातून एक नाणे हरविले गेले म्हणजे एक मोठी आपत्ती असे वाटत असे, आणि ते नाणे पुन: सापडले म्हणजे मोठा आनंद होत असे, या आनंदात शेजारच्या भगिनीही येवून सहभागी होत असत.COLMar 135.3

    ख्रिस्त म्हणाला, “ते सापडल्यावर ती मैत्रिणीस व शेजाऱ्यास बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या (परमेश्वर) दूतासमोर आनंद होतो, हे मी तुम्हास सांगतो”COLMar 135.4

    या दाखल्यातही पहिल्या दाखल्याप्रमाणे प्रथम हरवले व त्याचा शोध केल्यावर ते सापडले आणि त्यामुळे मोठा आनंद केला गेला. पण या दोन्ही दाखल्यात दोन वेगवेगळे वर्ग आहेत. जे हरवलेले मेंढरू त्याला समजत होते की ते हरवले आहे. ते मेंढरू त्याचा कळप व मेंढपाळ यांच्यापासून दूर आले आहे, परंतु त्याला स्वत: परतीचा मार्ग सापडत नाही. हे हरवलेले मेंढरू म्हणजे असे काही लोक आहेत की ते परमेश्वरापासून बहकले आहेत व मोठया चिंतेत पडलेले असतात, अगदी टाकावू परिस्थितीत व मोहात गुरफटून जातात. हरवलेले नाणे म्हणजे असे लोक की ते गुन्हे व पाप यात गुंतले जावून राहतात तरी त्यांना त्याची कल्पना नाही. ते परमेश्वरापासून बहकले आहेत. त्यांना त्याचा समज नाही. त्यांचे आत्मे संकटात आहेत, त्यांना त्याचा समज नाही आणि ते विचारही करीत नाहीत. ख्रिस्त या दाखल्यात हे शिकवू पाहातो की जे कोणी ख्रिस्ताच्या वचनाविषयी दुर्लक्ष करीतात तेही त्याच्या प्रितीचे ध्येय असे आहेत.COLMar 135.5

    “माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांस भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांस बहकविले आहे; ते पहाडापहाडातून भटकले आहेत; ते आपले विश्रांतिस्थान विसरले आहेत.”यिर्मया ५० : ६. “हरविलेल्या मेंढरासारखा मी हरवलों आहे; आपल्या दासाचा शोध कर ; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलों नाही.” स्तोत्र ११९ : १७६.COLMar 136.1

    मेंढरू कळप सोडून बहकून गेले. ते मेंढरू जंगलात वा डोंगरात बहकले गेले; ते नाणे घरात हरवले गेले; ते हाताशी होते तरी ते शोधले तरच सापडणार होते. COLMar 136.2

    हा दाखला विशेषतः कुटुंबासाठी बोधपर आहे. घरातील जी माणसे मुले-मुली आहेत त्यांच्याबाबत आपण निष्काळजी आहोत. आपल्यातील एकजण कदाचित परमेश्वरापासून बहकला असेल पण अशासाठी आपण किती थोडा विचार करीतो कारण परमेश्वराने दिलेले हे दान (लेकरू) आमच्या हातून हरवले जाईल असा धोका पत्करू नये.COLMar 136.3

    नाणे जरी धूळ व कचरा यात पडले होते तरी ते चांदीचे होते. मालक ते नाणे शोधून काढतो कारण ते मौल्यवान होते. तद्वत्च प्रत्येक आत्मा हा कितीही पापी असला तरी परमेश्वराच्या दृष्टीने मौल्यवान आहे. नाण्यावर जसा सत्ताधारी याचा शिक्का असतो तद्वत् मानवावर परमेश्वर निर्माता असा शिक्का आहे, जरी मानवावर पापाचा परिणाम झाला आहे त्यामुळे तेज कमी झाले आहे. परमेश्वराबरोबर असलेला संबंध तुटला गेला, तरी मानवाच्या आत्म्यावर परमेश्वर मालकीच्या खुणा दिसतात. मानवाठायी परमेश्वराचे जे प्रतिरूप व आत्म्याची ती धार्मिकता व पवित्रता ही पुर्नस्थापित करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. COLMar 136.4

    दाखल्यातील ती स्त्री तिचे हरवलेले नाणे लक्षपूर्वक शोधीत असते. ती दिवा लावते व सर्व घर झाडून काढते. शोधण्यात अडखळण नको म्हणून घरातील वस्तु बाजुला काढते. जरी तिचे एक नाणे हरवले होते तरी ती ते सापडेपर्यंत विसावा घेत नाही. तद्वत् घरातील एक व्यक्ति हरवली असेल तर घरातील सर्वांनी शोधण्याचा प्रयत्न करून त्या व्यक्तिला परमेश्वराकडे परत आणावे. यासाठी प्रत्येकांनी काळजीपूर्वक, चिकाटीने स्वत:ची परीक्षा करणेची गरज आहे. आपल्या जीवनात धार्मिकता सतत राहावी यासाठी स्वत: काळजी घेणे. आपले वागणे, आपला कारभार यात काय चुकले का हे पाहावे म्हणजे कोणाचेही मन दुखविले जाणार नाही.COLMar 137.1

    जर आपल्या कुटुंबात एक मुलगा वा मुलगी यास जर त्यांच्या पापी जीवनाची जाणीव नसेल तर आईबापानी स्वस्थ बसू नये. दिवा जरूर लावणे, पवित्रशास्त्राचा शोध करणे व त्यातून परमेश्वराचे वचन पाहाणे, आणि त्या वचनाद्वारे घरातील सर्व काही कसे काय चालले आहे याचे परीक्षण करावे व तो/ती अशा परिस्थितीत का गेली असावी हे शोधा! आई बापांनी त्यांच्या अंत:करणाचे परीक्षण करावे, त्यांच्या जीवनाच्या सवयी व रितीरिवाज याचे परीक्षण करावे. मुले ही परमेश्वराचे संतान (वतन) अशी आहेत, आणि परमेश्वराने आम्हास दिलेली ही मुले ही परमेश्वराची मालमत्ता आहे आणि आम्ही याचा कारभार कसा केला, याचा जबाब आपणास परमेश्वराला देणे आहे.COLMar 137.2

    काही आई वडीलांची अशी इच्छा असते की त्यानी परदेशात कार्य करावे, असे काही ख्रिस्ती लोक आहेत की त्यांचे कार्य कुटुंबाच्या बाहेर असते, आणि त्यांची स्वत:ची मुले तारणारा व त्याची प्रिती याबाबत अज्ञानी आहेत. आपल्या लेकरांना ख्रिस्ताकडे आणणे हे कार्य आईबाप, मडळीचे पाळक व शब्बाथ शाळेचे शिक्षक यांच्याकडे सोपवून देतात व परमेश्वराने त्यांना ही जी जबाबदारी दिली आहे त्याबाबत ते निष्काळजी राहतात. आपली लेकरे ख्रिस्ती होणे यासाठी शिक्षण देणे व प्रशिक्षण देणे ही परमेश्वराप्रित्यर्थ ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. या कार्यासाठी सतत परिश्रम करावे लागतात. याबाबत जर आपण निष्काळजीपणा केला तर आम्ही अविश्वासु कारभारी आहोत. यासाठी परमेश्वर कोणतेही निमित्त स्विकारणार नाही.COLMar 137.3

    ज्या कोणाकडून अशाप्रकारे हयगय व निष्काळजीपणा झाला असेल त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. ज्या स्त्रीचे नाणे हरवले तिने ते नाणे सापडेपर्यंत शोध केला. तद्वत् तुम्हीही प्रिती, विश्वास व प्रार्थना याद्वारे तुमच्या घराण्यातील कोण हरवले असतील त्यांचा शोध करा आणि तुम्ही हर्षाने परमेश्वराकडे येवून म्हणाल, “पाहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले.’ यशया ८: १८.COLMar 137.4

    येशूने तर बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका; कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्याचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतों, जो कोणी बाळकांप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. (लूक १८: १६, १७)COLMar 138.1

    हे खरे मिशनरी कार्य आहे, आणि जे हे कार्य करीतात व ज्यांच्यासाठी हे कार्य केले अशा दोघांसाठी हे कार्य साहाय्यक आहे. आम्ही आमच्या घरातील लोकांशी विश्वास कार्य करणे त्याद्वारे प्रभूच्या मंडळीतील जे आहेत त्यांच्याशी कार्य करणे म्हणजे ख्रिस्ताशी प्रामाणिक राहाणे त्यामुळे आम्ही सार्वकालिक युगात जीवंत राहू. आम्ही जसे घरात एकमेव भाऊ व बहिणी यांच्यात जशी गोडी दाखवितो तशीच गोडी ख्रिस्तांतील भाऊ बहिणीशी दाखवावी. COLMar 138.2

    अशा प्रकारे काम करणे याद्वारे परमेश्वर आम्हास आणखी दुसऱ्या कामाशी लायक करीतो. आपल्या सहानुभूतीचा विस्तार वाढतो. त्यासोबत आपली प्रिती वाढते, आणि आम्हास आमचे कार्यक्षेत्र सर्वत्र दिसेल. परमेश्वराचे कुटुंब हे जागतिक कुटुब आहे आणि या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला ओलांडून जाता येत नाही वा त्या व्यक्तिची हेळसांड करीता येत नाही.COLMar 138.3

    आम्ही कोठेही असलो तर तेथे हरवलेले नाणे आमचे वाट पाहाते की आम्ही त्याला शोधावे आम्ही ते नाणे शोधीत आहोत काय ? जे लोक धार्मिक बाबींत गोडी घेत नाहीत अशा लोकाना आपण दिवसेंदिवस भेटतो, आम्ही त्याच्याबरोबर बोलतो, आम्ही त्यांच्या भेटी घेतो, आम्ही त्यांच्या धार्मिक जीवनाविषयी गोडी दाखवितो काय ? ख्रिस्त हा त्याचा पापक्षमा करणारा तारणारा आहे हे त्यांना आम्ही सांगतो काय ? ख्रिस्ताच्या प्रितीने आम्ही उत्तेजीत झालो आहोत, या प्रितीचा अनुभव आम्ही त्यांना सांगतो काय ? आम्ही जर त्यांना सांगत नाही तर हे सार्वकालिक हरवलेले आत्मे, जेव्हा आम्हास न्यायासनासमोर परमेश्वरासमोर भेटतील तेव्हा आम्ही त्यांना कसे काय तोंड दाखवू?COLMar 138.4

    एका आत्म्याचे मोल कोण करू शकेल? तुम्हाला त्या आत्म्याचे मोल पाहावयाचे असेल तर गेथशेमने बागेत ख्रिस्त किती वेदना सोशीत होता हे पाहा, त्यावेळी घामाप्रमाणे रक्ताचे थेंब पडत होते. तारणारा ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला पाहा. येशूची ती आक्रोशवाणी ऐका “माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? “मार्क १५:३४ त्याच्या डोक्यावरील जखमा पाहा, त्याच्या कुशीत भाला भोसकिला, त्याच्या पायी खिळे ठोकीले. ख्रिस्ताने हे सर्व काही सहन केले याचे स्मरण ठेवा. आमच्या तारणासाठी स्वर्ग येशूने धोक्यात घातला. वधस्तंभाच्या पायथ्याशी एका पापी मनुष्याची आठवण करून येशूने त्या एका पापी मनुष्यासाठी त्याचा (येशू) प्राण वधस्तंभावर दिला असता यावर तुम्हांला एका आत्म्याचे मोल समजू शकते.COLMar 138.5

    जर तुम्ही ख्रिस्ताशी सम्पर्क ठेवाल तर प्रत्येक मानवाचे मोल ख्रिस्त करीतो तेच मोल तुम्हीही कराल. ख्रिस्ताने तुम्हांला जी भावना वा प्रिती दाखविली त्याचप्रमाणे तुम्हालाही इतराविषयी प्रिती भासेल. ज्या लोकांसाठी ख्रिस्त मरण पावला त्या लोकांना तुम्ही प्रितीने आकर्षित कराल, त्याना कधीही हाकूलन लावणार नाही वा विरोध करणार नाही. ख्रिस्ताने जर पापी लोकांसाठी त्याचा प्राण अर्पण केला नसता तर परमेश्वराकडे कोणीही येवू शकले नसते, वा आम्ही सुवार्तेद्वारे त्यांना आणू शकलो नसतो. आम्ही केवळ वैयक्तिक सेवेद्वारे प्रत्येक आत्म्याची सुटका करू शकतो. जेव्हा तुम्ही लोकांना मरणाच्या खाईत जाताना पाहाता तेव्हा तुम्ही शात बसणार नाही वा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. जो जो त्यांचे पाप अधिक तो तो त्यांचे दु:ख वा शिक्षा अधिक आणि त्यांची सुटका व्हावी म्हणून तुम्ही अधिक कळकळीने, अधिक प्रयत्न कराल. जे लोक दुःखात व त्रासात आहेत त्यांची गरज तुम्ही पाहाल, जे परमेश्वराविरूध्द पाप करीतात, व जे पापदोषाचे गुलाम झाले आहेत अशांच्या गरजा तुम्हांस दिसतील. तुमच्या अंत:करणात त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण होईल व तुम्ही त्यांच्या मदतीसाठी तुमची पराकाष्ठा कराल. तुमच्या अंत:करणातील विश्वास व प्रिती यामुळे तुम्ही त्यांना ख्रिस्ताकडे हाताशी धरून आणाल. तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवाल, त्यांना उत्तेजन द्याल, तुमची सहानुभूती व विश्वास ते कधी पतन पावणार नाहीत तर विश्वासात खंबीर राहतील.COLMar 139.1

    या अशा कार्यात स्वर्गीय देवदूत सहकार्य करावयास सदा सिध्द असतात. जे कोणी हरवलेले आहेत अशा लोकाचे तारणाप्रित्यर्थ जे कोणी प्रयत्न करीतात त्यांच्यासाठी सारा स्वर्गीय संग्रहीत आशिर्वाद पाठीशी आहे. जे अतिनिष्काळजी व अति कठोर आहेत अशांना मदत कशी करावयाची यासाठी देवदूत साहाय्य करावयास सज आहेत. आणि जेव्हा अशी एक व्यक्ति परमेश्वराकडे परत आणिली जाते तेव्हा सारा स्वर्ग हर्षित होतो; सराफीम व थुमीम हे त्यांच्या सोनेरी वीणेवर परमेश्वराचे हर्षगीत गातात, कोकऱ्याचे गीत गातात त्यात कृपा-प्रिती व दया ही मानवावर किती ओतप्रोत आहे असे गातात !COLMar 139.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents