Go to full page →

येशू ख्रिस्‍ताची लीनता WG 7

आपल्या तारणासाठींच प्रभु येशूनें जगांत वास्‍तव्य केलें, दु:ख सोंसलें व तो मरण पावला. आपण चिरकालिन् सुखाचे वाटेकरी व्हावें म्हणून तो “दु:खसाही मनुष्य” झाला. ईश्वरानें आपल्या परम प्रिय, कृपाळू व सत्यपरिपूर्ण अशा पुत्राला स्वर्गलोकींचें अवर्णनीय वैभव सोडून पापानें स्तंभित झालेल्या, व मृत्यूची छाया व शाप यांनीं अंध:कारमय झालेल्या अशा जगांत येऊं दिलें. त्यानें त्यास, तें प्रीतीचें केंद्र व देवदूतांकडून मिळणारा सन्मान यांचा त्याग करून लज्‍जा, अपमान, पाण उतारा, द्वेष व मरण हीं सोसूं दिलीं. “त्यावर आमची कुशल साधाण्याची शिक्षा होती; आणि त्यांस मारलेल्या फटक्यांच्या घावाकडून आम्हांस आरोग्य झालें आहे.”1यशाय५३:५. त्याला रानामध्यें, गेथसेमनेंत खांबीं दिलेला पहा. निष्कलंक अशा देवाच्या पुत्रानें पापाचें ओंझें आपणावर घेतलें आहे. देव आणि तो एक असूनहि त्याच्या आत्म्याला, देवाची व मनुष्याची भयंकर ताटातूट व्हावी ह्याचें वाईट वाटलें. ह्यामुळें त्याच्या मुखावाटे “माझ्या देवा, माझ्या देवा, तूं कां माझा त्याग केलास”2मत्तय२७:४६. अशी दु:खाची आरोळी निघाली. हेंच तें पापाचें ओंझें, हीच त्या पापाच्या भयंकर यातनांची जाणीव, हीच त्या पापाची ईश्वरापासून ताटातूट, व ह्यामुळें देवाच्या पुत्राचें अंत:करण दुभंग होऊन गेलें. WG 7.1