Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पवित्रशास्त्राच्या अभ्यासावरील प्रेम स्वाभाविक नाहीं

    तरुण व वृद्ध पवित्रशास्त्राच्या अभ्यासाचा कंटाळा करतात तें त्याचा अभ्यास करीत नाहींत व आपल्या जीविताचा नियम बनवीत नाहींत. विशेषे करुन जे तरुण आहेत तें याचा कंटाळा करण्याच्या बाबतींत दोषी आहेत. पुष्कळजण इतर पुस्तके वाचण्यात व्यर्थ वेळ गमावतात. पण सार्वकालिक जीवनाचा मार्ग दर्शविणाच्या पुस्तकाचा रोज अभ्यास केला जात नाहीं. व्यर्थ गोष्टी वाचण्यात येतात. पवित्रशास्त्राचा नाकार करण्यांत येतो. हा ग्रंथ आपल्या उच्च व पवित्र जीवनासाठी मार्गदर्शक आहे त्यांनी असत्य गोष्टी वाचून त्याच्या कल्पना चुकीच्या मार्गाला गेल्या नसत्या तर तरुणांनी शास्त्र में मनोरंजक पुस्तक आहे असा उल्लेख केला असतां. 10CT 138, 139;CChMara 154.1

    ज्यांच्याजवळ मोठा प्रकाश आहे असें लोक या नात्याने आम्ही आपल्या संवयांत स्वत:ला उंचावले पाहिजे. आमच्या शब्दांत, आमच्या घरगुती जीवनात व आपल्या वागण्यांत स्वत:ला उंचवावे. घरात मार्गदर्शन म्हणून देवाच्या शब्दाला त्याचे स्थान द्या. प्रत्येक अडचणींत आम्ही त्याला आपला सल्लागार मानावे. तो प्रत्येक वागणुकीचा दर्जा असावा. माझ्या भावा बहिणींची अशी खात्री होईल कीं आपल्या कुटुंबात देवाचे सत्य, धार्मिकतेचे ज्ञान असल्याशिवाय कोणत्याही आत्म्याची वाढ होणार नाही. आईबापानी देवाची प्रत्येक उपासना एक ओझे आहे असें भासविणार्‍य आळशी सवयापासून आपले मन वर काढले पाहिजे. गृहात सत्याचे सामर्थ्य हें पवित्रकरणाचे साधन बनले पाहिजे. 11CG 508-509;CChMara 154.2

    पापाच्या डागापासून शुद्ध करण्यास येशू समर्थ आहे व देवाच्या आज्ञेची आवश्यकता आहे असें लहानपणीं मुलांना शिकवावे. हा विश्वास रोज रोज उदाहरणाने व नियमाने शिकवावा. 125T 329;CChMara 154.3