Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मंद विष तंबाखू

    तंबाखूचे विष मंदपणे व न कळत चढणारे असतें तरी तें अत्यंत घातकी होय तें कोणत्याही स्वरुपात आरोग्याला विघातक असतें. त्याचे परिणाम हळूहळू व प्रथम दर्शनी क्वचितच समजून येणार असल्यामुळे तें अत्यंत धोक्याचे असतात तें चेतनाकारक असतें व नंतर पुढे तें मज्जातंतूंना अत्यंत दुर्बल करिते. बुद्धालाही हीनता आणून तिच्यांत अस्थिरता उत्पन्न करिते. मद्यपेयापेक्षाही तें मज्जातंतुवर अधिक जोराने आघात करिते. त्याचे परिणाम सहसा ध्यानात येत नसले तरी तें नाहींसे करता येत नाहींत. ह्या व्यसनाने दारूची आवड आकर्षक वाटते व पुष्कळदा मद्यपानाच्या संवयीचा जणू काय पायाच घालीत असतें.CChMara 319.4

    धुम्रपान गैरसोयीचें, खर्चाचे व घाणेरडे असतें. व्यसनीला तें गचाळ बनविते व इतरांना तें तिरस्कारणीय वाटतें.CChMara 319.5

    तंबाखुचा उपयोग मुलासाठी व तरुणासाठी अपरिमित अपायकारक होतो. भले तर फार लहानपणापासनच तंबाखु पिऊं लागतात. अशा रितीने सवय जडली म्हणजे विशेषतः शरीरावर व मनावर परिणाम घडण्यासारखा असतो. त्यानें शारीरिक बळ कमजोर होतें. आकाराने खुजटपणा येतो, मन मूढ होतें व नैतिक वर्तन भ्रष्ट होतें. १२ परंपरेने आली नसली तर निसर्गत: तंबाखूची स्वभावधर्मात कांही गोडी नसते. 12MH 327-329;CChMara 319.6