Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आज्ञांकितपणांतील सामथ्र्य

    ज्यांना सत्याची जाणीव आहे त्यांच्यावर अशी एक गंभीर जबाबदारी असतें कीं त्यांची सर्व कामे त्यांच्या विश्वासाशो सुसंगत असावयास पाहिजेत, त्यांची जीवनचरित्रे सुधारलेली व पवित्र केलेली असावीत आणि संदेशाच्या अखेरच्या दिवसांत जे कार्य झपाट्यानें पार पाडावयाचे आहे तें करावयास त्यांची तयारी असावयास पाहिजे. भुकेची तृप्ति करण्यासाठी त्याना फुरसत व शक्ति नसावी. पुढील शब्द मोठ्या तातडीच्या उत्साहाने आमच्यापुढे आलें पाहिजेत: “तुमच पापें पुसून टाकिली जावी म्हणून पश्चात्ताप करा व मागें वळा, अशासाठीं कीं विश्रांति मिळण्याचे समय प्रभूजवळून यावे.” प्रेषित ३:१९. आम्हामध्ये पुष्कळजण असें आहेत कीं तें आत्मिकतेत उणे आहेत व तें पुर्णत: रूपांतरीत झाले नाहीत तर तें खात्रीने नष्ट होतील. असल्या धोक्यांत तुम्हांला पडावेसे वाटते काय ? CChMara 309.2

    आपल्या लोकांनी एकसारखे प्रागतिक असावे अशी देवाची अपेक्षा आहे. मानसिक सुधारणेसाठी व आत्मिक पवित्रतेसाठ फाजील भूक हें एक अत्यंत भारी अडखळण आहे. आरोग्यसुधारणेचे भरपूर ज्ञान असूनही आम्हांपैकी पुष्कळजण अयोग्य खाणे खात असतात. शारीरिक व मानसिक दुर्बलतेचे लाड पुरविणारे भूक हें फार मोठे कारण आहे व तें शक्तिहीनतेचा व अवेळीं मरणाचा पुष्कळ अशीं पायाच असतें. आत्मिकतेच्या शुद्धतेसाठी जो प्रयत्न करीत आहे अशा प्रत्येकाने लक्षात ठेवावें कीं, भुला आटोक्यात आणण्यासाठी ख्रिस्तामध्ये सामर्थ्यसंग्रह आहे.CChMara 309.3

    मांसाहाच्या लालसेने जर आमचा कांहीं फायदा झाला असतां, तर मी तुम्हांला अशी विनंती केली नसती. परंतु त्यांत कांहीं हित नाही हें मला ठाऊक आहे. शरीरप्रकृतीला तें विघातक आहे म्हणून त्याशिवाय राहाण्याचे आम्हीं शिकावे. शाकाहारी जेवण जेथे उपलब्ध आहे. परंतु जेथे खाण्यापिण्याची आवडनिवड लहरीखातर करण्यांत येते तेथें हळूहळू प्रभूच्या शिक्षणाविषयी बेपरवाई वाढत राहील व सत्याविषयींची त्यांची दृष्टि नाहींशीं होऊन जाईल तें जसे पेरतील तशीच तें खात्रीने कापणीही करतील.CChMara 309.4

    आमच्या शाळांतून विद्यार्थ्यांना मासान्न अगर जे अन्न आरोग्याला अपायकारक आहे, तें त्यांना देण्यांत येत नाही असें मला सागितले आहे. ज्या अन्नानें चेतना उत्पन्न होईल असें कसलेही अन्न देण्यांत येऊ नये. वयस्कर व तरुण आणि मध्यमवयी यांना माझी विनंती आहे. जें तुम्हांला अपायकारक आहे त्याविषर्यांची भफका मारून टाका-रचनाकार करून प्रभूची सेवा करा. CChMara 309.5

    मांसाहाराखेरीज आमचे चालणार नाहीं असें पुष्कळांना वाटत असेल. परंतु जर तें प्रभूकडे येऊन त्याच्या मार्गाचे निश्चयपूर्वक अवलंबन करितील तर दानएलाला व त्याच्या संवगड्यांना जी शक्ति व शहाणपण मिळाले तें त्यांनाही मिळून जाईल. प्रभूकडून त्यांना समतोल बुद्धि मिळेल. हें त्यांना आढळून येईल. रचनाकार करून प्रभूच्या कार्यासाठी किती तरी बचत करिता येते, हें पाहून पुष्कळजण आश्चर्यचकित होतील. रचनाकार न करिता दिलेल्या मोठ मोठ्या रकमापेक्षा तो करून बचत केलेल्या लहान रकमाकडून ईश्वरीकार्याच्या उभारणीसाठी अधिक भारी कार्य करता येईल.CChMara 310.1