Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ५१ वें - आरोग्य- सुधारणेंविषयीं निष्ठा

    (टिप : आरोग्य सुधारणेतील जिव्हाळ्याच्या मुद्याविषयींचा हा संदेश श्रीमती व्हाईट” १९०९ सालीं भरलेल्या जनरल कॉन्फरन्समध्ये दिलेला होता व ती त्यांची शेवटची कॉन्फरन्स होती- संपादक)CChMara 308.1

    आरोग्य-सुधारणा या विषयावर मी सर्व लोकांना संदेश द्यावा अशी मला सूचना देण्यांत आलेली आहे. कारण या सुधारणेसंबंधी आपली जी पूर्वीची निष्ठा होती तिच्यापासून पुष्कळजण परावृत्त झालेले आहेत. CChMara 308.2

    ख्रिस्तामध्यें आहे त्या पूर्णत्वास जाऊन पोहंचेपर्यंत पुरुषांनी व स्त्रियांनी प्रगत होत जावे, असा आपल्या लोकांविषयी देवाचा उद्देश आहे. हा साध्य करण्यासाठी त्यांनी आपल्या मनाच्या, अंतर्यामाच्या व शरीराच्या प्रत्येक शक्तीचा यथायोग्य विनियोग करावयास पाहिजे. आपल्या कोणत्याही मानसिक अगर शारीरिक शक्तीचा त्यांनी दुरुपयोग करता कामा नये. CChMara 308.3

    आपलें आरोग्य संरक्षण कसे करावे हा एक आद्य महत्वाचा प्रश्न आहे. देवाचे सद्भय मनी बाळगून जर आम्ही या प्रश्नाकडे पाहिलें तर आम्हांला कळून चुकेल कीं आपल्या शारीरिक व आत्मिक प्रगतीसाठी आमच्या खाण्यापिण्यात साधेपणा ठेवण्यात यावा. शांत मनाने आपण ह्या प्रश्नाचा विचार करुं या. या प्रकरणी चतुराईने वागण्यासाठी आम्हांला ज्ञानबुद्धी व न्यायबुद्धि असावयास पाहिजे. नैसर्गिक कायद्याचे उल्लघन न करिता त्याचे अवलंबन केले पाहिजें.CChMara 308.4

    मांसाहार, चहा, कॉफी, मिष्ठान्न व अपायकारक खाद्य पदार्थ यांत काय धोके आहेत. याविषयीं ज्याना शिक्षण मिळालेले आहे व ज्यांनी ईश्वर करार करण्याचा निर्धार केलेला आहे तें, अन्न निरोगी नाहीं असें समजत असतां भूकेच्या फदात पडणार नाहींत. आपली भूक निर्मळ असावी व स्वनाकार करून अनिष्ट गोष्टीपासून आपण दूर राहावे अशी देवाची मागणी आहे.पूर्ण लोक म्हणून परमेश्वरासमोर उभे राहाण्यापूर्वीच ह्या सर्व गोष्टी त्याच्या लोकांनी साध्य करावयास पाहिजेत. CChMara 308.5

    परमेश्वराचे अवाशिष्ट लोक नवीन अंत:करणाचे झालेले पाहिजेत. ह्या संदेशाने आत्म्यांचे रूपांतर व पवित्रकरण घडून आलें पाहिजे. या चळवळींमध्ये ईश्वरी आत्म्याची शक्ति आम्हांस दिसून यावयास पाहिजे हा एक अद्भुत व निश्चित संदेश आहे. यांत ऐकणाच्यासाठी सर्व कांहीं आहे व हा संदेश जोरदार शब्दांनी प्रगट करावयाचा आहे. तो काळाच्या अखेरीपर्यंत वाढत्या महत्त्वानें प्रगत होत राहील असा आमचा निर्भेळ व चिरस्थायी विश्वास असावयास पाहिजे. CChMara 308.6

    असें काहीं नामधारी ख्रिस्ती लोक आहेत कीं तें टेस्टिमोनीज (धर्मततत्त्वांचे प्रतिज्ञापुस्तक) यांतील कांही भाग ईश्वरी संदेश म्हणून मान्य करितात, परंतु त्यांच्या ढगरुपी आवडींचा निषेध करणारे काहीं विभाग त्यांना मान्य नसतात. असल्या लोकांची वागणूक त्यांच्या स्वत:च्या हिताला विरोधक असतें. प्रकाश आहे तोंवर आम्ही प्रकाशात चालावे हें आवश्य होय. आरोग्य सुधारणेवर आमचा विश्वास आहे असें तोंडाने बोलणार्‍य लोकांनी आपल्या रोजच्या व्यवहारांत तिच्या मुलभूत तत्त्वांच्या उलटे वागावे, यांत तर तें आपल्या स्वत:च्या आत्म्याचा घात करितात व त्याशिवाय विश्वासणारे व अविश्वासणारे यांच्या मनावर दुष्परिणाम घडवून आणतात.CChMara 309.1