Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
मोक्षमार्ग - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ८ वा—ख्रिस्तांत वाढ

    अंत:करणाचा जो पालट झाल्यानें आपण ईश्वराची लेकरें होतों, त्यास शास्‍त्रांत जन्म असें म्हतलें आहे. पुन्हा दुसर्‍या ठिकाणीं त्याची तुलना शेतकर्‍यानें पेरलेल्या चांगल्या बियांच्या कोंबाबरोबर केलेली आहे. त्याप्रमाणेंच प्रभु ख्रिस्‍ताकडे जे लोक नुकतेच वळलेले आहेत ते “नूतन जन्मलेले बालक”1१पेत्र२:२; इफिस. ४:१५. ख्रिस्‍तांत वाढणार्‍या स्त्रीपुरुषांच्या बांध्याप्रमाणें वाढावयाचें आहेत, अगर शेतांत पेरलेल्या चांगल्या बींप्रमाणें त्यांनीं वाढून चांगलीं फळें द्यावयाचीं आहेत. यशाया प्रवक्त्यानें म्हटलें आहे, कीं “त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांस न्यायाचे वृक्ष, परमेश्वराचें लावणें असें म्हणतील.”2यशाया६१:३. म्हणून आत्मिक जीवनांतील निगुढ सत्यतत्त्वें समजण्यास आपणांस मदत व्हावी याकरीतां सृस्ट पदार्थातील जीवनाची उदाहरणें प्रभूनें घेतलीं आहेत. सृष्‍टींतील अतिशय क्षुल्लक अशा पदार्थांत जीवन उत्पन्न करणें मनुष्याचें जीवन फक्‍त ईश्वरानें स्वतां दिलेल्या जीवनापासूनच आहे. त्याचप्रमाणें मनुष्याच्या अंत:करणांत आत्मिक जीवन उत्पन्न होतें, तें केवळ ईश्वरापासून मिळालेल्या जीवनापासूनच होते. मनुष्यास तो “वरून जन्मल्याशिवाय”3योहान्न३:३. प्रभु ख्रिस्‍त जें जीवन देण्यास आला, त्त्याचा भागीदार त्यास होता येत नाहीं.WG 62.1

    जीवनाप्रमाणेंच वाढीची गोष्‍ट आहे. कळीस फुलविणारा व फुलाचें फळ करणारा केवळ तो एक परमेश्वरच आहे. त्याच्याच सामर्थ्यानें बीं, “पहिल्यानें अंकूर, मग कणीस, मग कणसांत भरलेला दाणा,”4मार्क४:२८. अशा रीतीनें वाढत जातें. इस्त्राएली भविष्यवादी होशेहा यानें म्हटलें आहे, कीं “कमलिनीसारखा फुलेल.” “ते धान्यासारखें उत्पत्ति करतील व द्राक्षीप्रमाणें फुलतील.”5होशेय१४:५,७. प्रभु येशूची आपणांस आज्ञाआहे, कीं “भूकमलें कशी वाढतात हें लक्षांत आणा.”6लूक१२:२७ वनस्पती व फुलें हीं आपल्या स्वताम्च्या देखरेखीनें, काळजीनें अगर प्रयत्नानें वाढत नाहींत; तर त्यांचें जीवन चालविण्यास जें कांहीं ईश्वर देतो, त्याच्यायोगानें वाढतात, मूल आपल्या स्वताच्या काळजीनें अगर सामर्थ्यानें आपल्या शरीराच्या बांध्यांत भर टाकीत नाहीं. त्याचप्रमाणें तुम्हांसहि आपल्या काळजीनें अगर प्रयत्नानें आत्मिक वाढ संपादन करतां येत नाही. वनस्पति, मूल ही भोवतालच्या परिस्थितीपासून जें कांहीं हवा, सुर्यप्रकाश व अन्न-आपल्या जीवनाकरीतां घेतात, त्याच्यायोगानें वाढतात. सृष्‍टीच्या देणग्या जशा वनस्पतीस व प्राण्यास होत, तसाच ख्रिस्त हा जें त्याच्यावर विश्वास ठेवितात त्यांस होय. तो त्यांची “सर्वकालची प्रभा” “सूर्य व ढाल”1यशाया६०:१९; गीत८४:११. आहे. तो इस्त्राएलास “दहिंवरा”- सारखा होईल. “कापलेल्या गवतावर पावसाप्रमाणें तो उतरेल.” “तो जिवंत उदक व जी स्वर्गांतून उतरते, व जगाला जीवन देते ती देवाची भाकर”2होशेय१४:५; गीत७२:६; योहान्न६:३३. आहे.WG 63.1

    ईश्वरानें आपल्या पुत्ररुपी अतुल देणगीनें पृथ्वी सभोवतीम असलेल्या वातावरणाप्रमाणेंच सत्य असें वातावरण सर्व सृष्‍टीच्या भोंवतीं ठेविलें आहे. जें कोणी ह्या जीवन देणार्‍या वातावरणांत श्वासोच्छवास करण्याचें पसंत करतील, ते सर्व जगातील; व ख्रिस्‍तांत असणार्‍या स्त्रीपुरुषांइतके वाढतील.WG 64.1

    आपलें सौंदर्य व आकार पूर्नत्वास येंण्यास सूर्यकिरणांची मदत व्हावी म्हणुन ज्याप्रमाणें फूल सूर्याकडे वळते, त्याप्रमाणें स्वर्गाचा प्रकाश आपणांवर पडून आपणही प्रकाशित व्हावें व आपलें शिल ख्रिस्‍तासारखें होत जावें म्हणून नीतिमत्त्वाच्या सूर्याकडे आपण वळलें पाहिजें. “तुम्ही मजमध्यें रहा, आणि मी तुम्हांमध्यें जसें फांटा वेलांत राहिल्यावांचून तुमच्यानेंही देववत नाहीं.”3योहान्न१५:४,५.WG 64.2

    वाढीसाठीं व फळें येण्यासाठीं ज्याप्रमाणें खांदीस झाडाच्या बुंधावर अवलंबून राहावें लागतें, तसें तुम्हांस ख्रिस्‍तावर अवलंबून राहीले पाहिजे. त्याव्यतिरिक्त तुम्हांस जीवन नाहीं. मोहाच्या प्रतिकार करण्याचें, अगर कृपेनें व पवित्रपणानें वाढण्याचें सामर्थ्य तुमच्यापाशी नाहीं. त्या ख्रिस्तामध्यें असतांनाच केवळ तुमचा उत्कर्ष होणार आहे. तुम्हांस त्यापासून जीवन मिळाल्यामुळेम तुम्ही सुकून जाणार नाहीं, अगर निष्फळ होणार नाहीं. तर नद्यांनीं पोसलेल्या झाडांप्रमाणें तुम्ही व्हाल.WG 64.3

    पुष्कळांची अशी कल्पना असते, कीं जीवनक्रमांतील कांहीं कामें आपण एकटेच उरकूं. ते फक्त पापाच्या क्षमेबद्दल ख्रिस्‍तावर विश्वास ठेवितात; परंतु असे लोक स्वतांच्या प्रयत्नांनी चांगला जीवनक्रम चालविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न निष्फळ झालाच पाहिजे. प्रभु येशूम्हणतो, “माझ्याशिवाय तुमच्यानें कांहीं करवत नाहीं.” त्याच्या कृपेंत होणारी आपली वाढ, आपला आनंद, आपला उपयोग हीं सर्व आपल्या व ख्रिस्‍ताच्या संयोगावर अवलंबून आहेत. दररोज, नव्हे प्रत्येक तासास त्याशीं तादात्म्य पावल्यानें, त्याच्यांत राहिल्यानें आपणांस त्याच्या कृपेंत वाढायाचें आहे. आपल्या श्रद्धेचा तो केवळ उत्पादकच आहे, असें नव्हे, तर तिची परिपूर्ति करणाराहि आहे. तो ख्रिस्तच केवळ आरंभीं, शेवटी व सर्वकाळ आहे. आरंभीं व शेवटीं मात्र तो आपणांजवळ असायाचा असें नाहीं, तर आपल्या मार्गातील प्रत्येक पायरीवर तो आपनांसन्निध असणार. दाविदानें म्हटलें आहे “म्यां आपणापुढें परमेश्वर नित्य ठेविला आहे ; तो माझ्या उजव्या हाताकडे आहे , म्हणून मी ढळणार नाही.”1गीत१६:८. २कलस्सै.WG 65.1

    “आम्ही ख्रिस्तांत कसें राहावें” असें तुम्ही विचारता काय ? तर मी सांगतो जसें तुम्ही त्याला पहिल्यानें स्वीकारताम्ना राहिलेत, तसेच रहा. “तर ख्रिस्‍त येशू प्रभु असा तुम्ही स्वीकारीला त्यांतच चाला.” “माझा नीतिमान विश्वासानें जगेल.”2२:६; इब्री१०:३८. तुम्ही सर्वस्वी ईश्वराचे होण्यासाठीं, त्याची सेवा करण्यासाठीं, व त्याच्या आज्ञा पाळण्यासाठीं त्याला वाहून घेतलें आहे, व ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणुन पत्करलें आहे. तुम्हांला आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त घेता येत नव्हतें, अगर आपल्या अंत:करणाचा पालट करतां येत नव्हता, परंतु तुम्ही ईश्वराला वाहून घेतल्याकारणानें त्यानें केवळ ख्रिस्‍तामुळेंच तुमच्यासाठीं सर्व कांहीं केलें असा तुमचा विश्वास बसला. विश्वासाच्याद्वाराम तुम्ही ख्रिस्‍ताचे असे झालां, व विश्वासानेंच तुम्हांला त्याच्यांत वाढवयाचें आहे. पहिल्यानें देणें व नंतर घेणें. तुम्हांस आपलें सर्वस्व-अंत:करण, इच्छा, सेवा-द्यावयाचें आहे. त्याच्या इच्छेस मान देण्यासाठीं तुम्हांस स्वतांला त्याला अर्पण करावयाचें आहे. त्याचप्रमाणें तुम्हांस सर्व कांहीं द्यावयाचें आहे. सुखपरिपूर्ण अशा ख्रिस्तानें तुमच्याठायीं वास्तव्य करण्यासाठीं, तोच तुमचें सामर्थ्य होऊन राहण्यासाठीं, तुमचें नीतिमत्व होऊन राहण्यासाठीं, तुमचा सर्वकालचा मदतगार होऊन राहण्यासाठीं व तुम्हांस ईश्वराच्या आज्ञा पाळण्यास सामर्थ्य देण्यासाठीं तुम्हांला त्यास स्वीकारावयाचें आहे.WG 65.2

    सकाळींच तुम्ही आपणांला ईश्वराला वाहून घ्या, व हेंच तुमचें पहिलें काम असूं द्या. “हें प्रभो, मला सर्वस्वीं तुझा असा करून घे. माझे सर्व बेत तुझ्या चरणांशीं आणून वाहतों. तुझ्या सेवेंत आज माझा उपयोग करून घे. माझ्याबरोबर रहा व तुझ्यांतच माझीं सर्व कामें होऊं दे.” ही रोजची बाब. प्रत्येक दिवशीं सकाळीं त्या दिवसापुरते तुम्ही आपणांला ईश्वराला वाहून घ्या. तुमचे सर्व बेत सिद्धीस नेण्यासाठीं अगर त्यांचा त्याग करण्यासाठीं-जसें त्याच्या मर्जीला येईल त्याप्रमाणें-त्याच्या हवालीं करा. ह्याप्रमाणें रोजच्या रोज तुमचें जीवन त्याच्या हवाली केलें, म्हणजे तें ख्रिस्ताच्या जीवनाप्रमाणें बनविलें जाईल.WG 66.1

    ख्रिस्तांतील जिणें विश्वासाचें आहे. त्यांत परमानंद नसेल, परंतु स्थायिक व शांततायुक्‍त विश्वास आहे. तुमची आशा तुम्हांत नाहीं, परंतु ती ख्रिस्तांत आहे. तुमचा मानसिक अशक्तपणा त्याच्या मानसिक सामर्थ्याशीं अगदीं जखडलेली आहेत, म्हणून तुम्ही स्वतांकडेच न पहांता व स्वतावरच दृष्‍टि न ठेवितां तुम्हांला ख्रिस्‍ताकडे पहावयाचें आहे. त्याच्या प्रेमावर, त्याच्या शीलाच्या सौंदर्यावर व पूर्णतेवर तुमचें चित्त असू द्या; म्हणजे मग ख्रिस्त-त्याच्या स्वनाकाराच्या, पाण उतार्‍याच्या, शुद्धतेच्या व पवित्रपणाच्या स्थितींत असा-तुमच्या आत्म्याचा विषय होऊन राहतो. त्याच्या सादृश्यांत तुमचा पालट व्हावयाचा तो त्याजवर प्रेम केल्यानें, त्याचें अनुकरण केल्यानें व सर्वस्वी त्याजवर अवलंबून राहिल्यानें व्हावयाचा आहे.WG 66.2

    प्रभु येशूनें म्हटलें आहे. “मजमध्यें रहा.”1योहान्न१५:४. ह्या शब्दांत त्यानें विश्रांति, स्थिरता व विश्वास ही दर्शविलीं आहेत. पुन्हां एके ठिकाणीं तो म्हणतो, “मजकडे या म्हणजे मी तुम्हांस विश्रांति देईन.” गीतकर्त्याच्या शब्दांत-“परमेश्वरास स्वस्थपणें जप व त्याची स्थीर आशा धर.” हाच विचार सुचविलेला आहे. यशायानें निश्चयपूर्वक साम्गितलें आहे, कीं “शांति व भाव धरिला असतां तुमचें सामर्थ्य होइल.” ही विश्रांति तुमच्या निष्क्रियत्वांत सांपडणार नाहीं. कारण तारणार्‍या प्रभूच्या बोलावण्यांत तुमच्या श्रमाची व शांततेची सांगड घालून दिलेली आहे. “माझें जूं आपणांवर घ्या, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांति मिळेल.”2मत्तय११:२८, २९; गीत ३७:७; यशाया३०:१५. जें अंत:करण ख्रिस्तांत पूर्णपणें विश्रांति घेत असतें, तें सदा उत्सुक व त्याच्यासाठीं श्रम करणारें असतें.WG 67.1

    जेव्हां मन “स्व” चाच विचार करीत असतें तेव्हा तें सामर्थ्याचा व जीवनाचा उगम जो ख्रिस्‍त त्यापासून दुरावतें. म्हणुन त्या तारकापासून अंत:करण दूर राखण्याचा व तेणेंकरून आत्म्याचें ख्रिस्ताशीं ऎक्य व दळणवळण बंद करण्याचा सैतानाचा एकसारखा प्रयत्न चाललेला असतो. ऎहिक सुखें, जिवांच्या काळज्या, संशयीपणा व दु:खें, दुसर्‍यांचे अगर स्वतांचें अपराध व उणीवा ह्यापैकीं एखाद्याकडे अगर सर्वांकडे तो तुमचें लक्ष वेधण्याचा प्रयत्न करितो. तरी ह्या त्याच्या युक्त्यांनीं तुम्ही फसून जाऊं नका. जे खरे इमानी आहेत व जे, ईश्वराकरितांच जगण्याची केवळ इच्छा करितात, अशा पुष्कळ मनुष्यांस त्यांच्या अपराधांकडे व दुर्बलतेकडे त्यांचें चित्त लावून, व अशा रीतीनें त्याची ख्रिस्तापासून ताटातूट करुन तो (सैतान) आपला डाव साधण्याची इच्छा करितो. “स्व” हेंच आपल्या विचारांचें केंद्र असतां कामा नये, व आपलें तारण होईल किंवा नाहीं ह्याविषयी काळजी अगर भीति बाळगीत बसूं नये. ह्या अशा प्रकारच्या काळज्या आपल्या आत्म्याला सामर्थ्याचें मूळ जो ख्रिस्त त्यापासून दूर करितात. तुमचा आत्मा रक्षण करण्याचें ईश्वरावर सोंपवा व त्याजवरच विश्वास ठेवा. सदोदित येशूविषयींच बोला व विचार करा. तुमचें “स्व” त्याच्याचमध्यें विलीन होऊन जाऊं द्या. सर्व संशय व भीति सोडा, व साधु पौल जसें म्हणाला “मी जगतों, तो मी नाहीं, तर ख्रिस्त माझ्याठायीं जगतो; आणि आतां देहांत जें माझें जिणें आहे तें विश्वासांत आहे. ज्या देवाच्या पुत्रानें मजवर प्रीति केली व आपणांला मजकरितां दिलें, त्यावरील विश्वासांत तें आहे”1गलती२:२०. तसें म्हणा. ईश्वरावर विसंबून रहा. जें तुम्ही त्याच्या हातांत द्याल तर तो ज्यानें तुमच्यावर प्रेम केलें त्याचाद्वारें तुम्हांला जिंकणार्‍यापेक्षांहि अधिक विजयी करिल.WG 67.2

    ख्रिस्तानें मनुष्यस्वभाव धारण केला, तेव्हां त्यानें कसल्याहि सामर्थ्यानें कधींहि न तुटणार्‍या प्रेमबंधनानें ( मनुष्य स्वतांच तें पत्करण्यास नाकबूल असेल तर मात्र नव्हे ) आपणांस मनुष्यत्वाशीं जखडून घेतलें. तें बंधन तोडून टाकण्यास ( ख्रिस्तापासून दूर राहण्याचें पसंत करण्यास ) सैतान आपणांस वारंवार लालूच दाखवील; म्हणून याच सम्धीस सावधगिरीनें राहून एकसारखा प्रयत्न करायाचा व दुसरा धनी पत्करण्याचा मोह आम्हांस पडूं नये अशी प्रार्थना करावयाची. हें सर्व करण्याचें कारण वर सांगितलेंच आहे, दुसरा धनी पत्करणें अगर न पत्करणें हें आपल्या खुषीवर अवलंबून आहे; तर त्या तसल्या खुषीचा मोहहि आम्हांस नको. उलट आपण आपली दृष्‍टी एकसारखी ख्रिस्ताकडे लावावी, म्हणजे तोच आपलें रक्षण करील. त्याच्याचकडे आपली दृष्टी असतां आपण सुरक्षित राहूं, व मग कसलाहि मोह त्याच्यापासून आपली ताटातूट करण्यास समर्थ नाहीं. सतत त्याच्याचकडे पाहात असतां, आपण “प्रभु जो आत्मा त्याकडून रुपांतर पावून त्याच रुपाचे होतों.”2२करिंथ३:१७.WG 69.1

    ह्याच मार्गानें पूर्वकालांतील शिष्य प्रिय अशा तारकाप्रमाणें झाले. त्यांनीं प्रभूचें वचन ऎकलें, तेव्हां त्यांस त्याची गरज वाटली. त्यांनीं त्याला शोधिलें, तो सांपडलाहि व नंतर ते त्याच्यामागून गेले. घरीं, दारीं, एकांतीं, शेतांत, कोठेंहि शिष्य या नात्यानें त्याच्या तोडूंन निघणारे शुद्ध सत्याचें धडे शिकत ते त्याजबरोबर होते. आपापली कामगिरी समजण्यासाठीं नोकर ज्याप्रमाणें आपल्या धन्याकडे पाहातो त्त्याप्रमाणें ते प्रभूकडे पाहात असत. ते शिष्य “आमच्यासारख्या स्वभावांचेच मनुष्य होते.”1याकोब५:१७. आम्हांप्रमाणें त्यांसहि पापाशीं लढाई करायाची होती.WG 69.2

    प्रभूचा आवडता शिष्य योहान ह्यामध्यें जरी तारकाच्या शीलाचें बरेचसें प्रतिबिंब पडलें होतें, तरी त्यांच्याठिकाणी देखील प्रभूच्याइतकें शीलाचें सौंदर्य नव्हतें. तो आपलेंच थोडें पुढें ढकलणारा होता, इतकेंच नव्हें, तर उतावळा व रागीटहि होता, परंतु दैवी शील त्याच्या दृष्‍टीस पडलें तेव्हां त्याला आपली व्यंगें दिसून येऊन ज्ञान प्राप्‍त झाल्यामुळें त्याचा आत्मा कौतुकानें व प्रेमानें भरून गेला. आपल्या धन्याच्या प्रेमांत “स्व” ची भावना नष्‍ट होऊन जाईतोंपर्यंत रोजच्या रोज त्याचें अंत:करण ख्रिस्ताकडे ओढत गेलें शीलास अनुरुप आकार देणार्‍या ख्रिस्‍ताच्या शीलाला त्याचा ( योहानाचा ) रागीट व महत्वाकांक्षी स्वभाव वश होऊन गेला. शीलांत नवीनपणा आणण्याचें पवित्र आत्म्याचें जें सामर्थ्य त्यानेम त्याचें अंत:करण नवीन बनविलें, ख्रिस्ताच्या प्रेमाच्या सामर्थ्यानें त्याच्या शीलात फरक घडवून आणिला. ख्रिस्ताशी केलेल्या संयोगाचा हा निखालस परिणाम होय. अंत:करणांत ख्रिस्ताचें वास्तव्य होतें, तेव्हां सर्व स्वभाव पालटून जातो. त्याचा आत्मा व त्याचें प्रेम ही अंत:करण मृदु करुन मनुष्याच्या आत्म्याला वश करून घेतात, व ईश्वराविषयीं व स्वर्गाविषयी विचार व इच्छा उत्पन्न करितात. त्याचें स्वर्गारोहण झालें तरी तो अद्याप आपणांत हजर आहे, अशी भावना त्याच्या अनुयायांच्या ठिकाणीं होती. त्याचें साक्षांत अस्तित्व प्रेमाचें व प्रकाशमय होतें. जो त्यांजबरोबर बोलत चालत होता, प्रार्थना करीत होता, व त्यांशी आशेचे व सुखाचे शब्द बोलत होता. तो आपल्या शिष्यांस शांततेचा निरोप अगदीं देतां देतां स्वर्गांत गेला व “पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हांबरोबर आहे,”1मत्तय१८:२०. अशा प्रकारचे शब्द मेघदूत त्यास वर नेत असतां त्या शिष्यांच्या कानीं पडले. मनुष्याच्या रुपानेंच तो स्वर्गांत गेला. ईश्वराच्या सिंहासनासमोर तो आपला मित्र व तारक असा अद्यापपर्यंत आहे असें त्यांनीं जाणिलें. आपणांविषयीं पूर्वी असलेल्या त्याच्या सहानुभूतींत काडीमात्र फरक झाला नसून दु:खी मनुष्यांबरोबर तोहि दु:खी असा आहे असें त्यांनीं जाणिलें. आपण तारण केलेल्यांच्या भरपाईबद्दल जी किंमत दिली तिच्या स्मरणार्थ म्हणून त्यानें आपले जखमी झालेले हातपाय ईश्वरास दाखवून तो आपल्या अमूल्य रक्‍ताचे गुण त्याच्यापुढें ठेवीत होता. आपणांसाठीं तो स्वर्गांत जागा तयार करण्यास तो गेला आहे, व तो फिरुन परत येऊन आपणांस तिकडे घेऊन जाईल असें त्यांस माहीत होतें.WG 70.1

    तो स्वर्गात गेल्यानंतर जेव्हां तें एकत्र जमले, तेव्हां बापापाशीं आपले विनंति अर्ज प्रभू येशूच्या नावानें गुजरण्यास ते उत्सुक होते. “तुम्ही बापाजवळ कांहीं मागाल तर तें तो तुम्हांस माझ्या नावानें देईल. तुम्ही अजून माझ्या नावानें कांहीं मागितलें नाहीं, मगा म्हणजे तुम्हांस मिळेल, यासाठीं कीं तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.”2योहान्न१६:२३,२४. अशा तर्‍हेनें प्रभूनें दिलेलें भरंवशाचें वचन तोंडानें म्हणत ते प्रार्थनापूर्वक व गंभीरपणानें नमन करीत. “जी मेला इतकेंच नव्हें, तर मेलेल्यांतून उठविला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, आणि जो आम्हांसाठीं विनंति करितो,”3रोम. ८:३४. असा तो येशू आम्हांसाठीं मध्यस्थी करील ह्या थोर मुद्यावर ते आपला श्रद्धारुप हस्त अधिकाधिक पसरीत. आणि ज्या कैवार्‍याविषयीं ख्रिस्‍तानें सांगितलें होतें, तो पन्नासाव्या दिवशीं आला. तो आणखीहि म्हणाला होता, कीं “मी जावें हें तुम्हांस हितकारक आहे; कारण मी न गेलो तर कैवारी तुम्हांकडे येणार नाहीं. मी गेलों तर त्याला तुम्हांकडे पाठवीन.”4योहान्न१४:१७; १६:७. येथून पुढें ख्रिस्‍त लोकांच्या अंत:करणांत सतत राहणार होता. तो स्वतां मनुष्यरुपानें शिष्यांबरोबर होता, त्यापेक्षांहि आतां त्याचा त्याच्याशी अधिक संयोग होता. त्यांच्याठायीं ख्रिस्ताचें तेज, प्रेम व सामर्थ्य हीं पाहणारांस इतकी दिसून आलीं, कीं त्यास “आश्चर्य वाटून” “ते (शिष्य) येशूच्या संगती होते असें त्यांस ओळखलें.”1.WG 71.1

    ख्रिस्ताची अशी इच्छा आहे, कीं आपण जसें आपल्या पहिल्या शिष्यांस होतो, तसेच आजहि आपल्या लेकरांस असावें; कारण थोड्या शिष्यांसमवेत केलेल्या शेवटच्या प्रार्थनेंत तो असें म्हणाला, की “मीं त्यांच्यासाठीं केवळ नाहीं, तर त्यांच्या वचनांवरून जे मजवर विश्वास ठेवितात त्यांसाठीहि विनंती करतों.”2.WG 72.1

    येशूनें आपणांसाठीं प्रार्थना करून सांगितलें आहे, कीं जसा “मी बापामध्यें आहें तसे तुम्हीं मजमध्यें राहावें.” अहाहा ! कसला संयोग हा ! त्या तारकानें स्वतांविषयी असें सांगितलें आहे, कीं “पुत्राला आपल्या आपण कांहीं करतां येत नाही” “मजमध्यें राहाणारा बाप तो आपलीं कामें करीतो.” तर मग ख्रिस्ताचें आमच्या अंत:करणांत वास्तव्य असेल, तर “इच्छिणें व करणें हीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधण्याचें” ४ तो आम्हांमध्यें करिल. त्यानें काम केलें त्याप्रमाणें आम्हीहि आपलें काम करूं. आम्हीहि तोच उत्साह दाखवूं आणि ह्याप्रमाणें त्याच्यावर प्रेम करीत व त्यांत रहात आपणही “मस्तक जो ख्रिस्त त्याच्या मानानें सर्व प्रकारें वाढावें.”WG 72.2