अध्याय १३ वा.—प्रभूंत आनंद करणे
- अनिक्रमणिका
-
- अध्याय २ रा.—पापी मनुष्याला ख्रिस्ताची आवश्यकता
-
- अध्याय ४ था.—पापस्वीकार
- अध्याय ५ वा.—आत्मनिवेदन
-
- अध्याय ७ वा.—शिष्यत्वाची पारख
- अध्याय ८ वा—ख्रिस्तांत वाढ
- अध्याय ९ वा.—कार्य आणि जीवनक्रम
- अध्याय १० वा.—ईश्वराविषयीं ज्ञान
- अध्याय ११ वा.—प्रार्थनेचा हक्क
- अध्याय १२ वा—संशयाचें काय करावयाचें
- अध्याय १३ वा.—प्रभूंत आनंद करणे
Search Results
- Results
- Related
- Featured
- Weighted Relevancy
- Content Sequence
- Relevancy
- Earliest First
- Latest First
- Exact Match First, Root Words Second
- Exact word match
- Root word match
- EGW Collections
- All collections
- Lifetime Works (1845-1917)
- Compilations (1918-present)
- Adventist Pioneer Library
- My Bible
- Dictionary
- Reference
- Short
- Long
- Paragraph
No results.
EGW Extras
Directory
अध्याय १३ वा.—प्रभूंत आनंद करणे
प्रभू ख्रिस्ताच्या चांगुलपणा व दयाळूपणा जगाला दाखवून त्याचे प्रतिनिधी होण्यासाठीं ईश्वराच्या लेकरांस पाचारण केले आहे. बापाचे खरें शील ज्याप्रमाणें प्रभू येशूनें आपणांस प्रगत केलें त्याचप्रमाणे आपणहि त्याचा ममताळूपणा व दयापूर्ण प्रीती ज्या ठिकाणीं माहित नाहींत त्या ठिकाणीं लोकांस प्रगट करावयाचीं आहेत. प्रभू येशूनें म्हटलें होतें, “ जसें तूं मला जगांत पाठविलें, तसें मींहि त्यांस जगांत पाठविलें,” “ मी त्यामध्यें व तूं मजमध्ये; यासाठीं कीं, ते एक होऊन पूर्ण व्हावे ; आणि त्यावरून जगानें जाणावें, कीं तूं मला पाठविलें,”1योहान१७: १८, २३ .. प्रभु येशूच्या शिष्यांस पौल सांगत आहे, “तुम्ही ख्रिस्ताचे सर्वांनी जाणलेलें व वाचलेलें पत्र असे आहां.”2२करिंथ३:३,२. त्याच्या लेकरांपैकी प्रत्येकांत प्रभू येशू आपलें पत्र जगाला पाठवितो. तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहांत, तर तो तुमच्या कुटुंबांस, गावांस, रस्त्यातील लोकांस, ज्या ज्या ठिकाणीं तुम्ही असाल, त्या त्या ठिकाणच्या लोकांस तो पत्र पाठवितो. तो तुमच्याठायीं वास्तव्य करून ज्यांस त्याची माहिती नाही त्यांच्या अंतरात्मायाशीं बोलतो. ते कदाचित शास्त्र वाचीत नसतील,अगर त्या शास्त्राच्या पानांत असलेला त्याचा शब्द ते ऎकत नसतील, कदाचित त्यांस त्यांच्या कार्यामधून ईश्वराचे प्रेम दिसून येत नसेल, तथापि तुम्ही जर ख्रिस्ताचे प्रतिनिधी असाल तर तुमच्या मार्फत त्यांस ख्रिस्ताच्या दयाळूपणाविषयी कांहीशी माहिती होईल व त्यावरून ते त्याजवर प्रेम करून त्याची सेवा करावयास लागतील.WG 109.1
ख्रिस्ती लोकांस स्वर्गाच्या मार्गांतील मशालजी असें म्हटलें आहे. त्यांजवर पडणारा ख्रिस्ताचा प्रकाश त्यांनी सर्व जगास द्यावयाचा आहे. त्यांना आयुष्यक्रम व त्यांचें शील अशीं असलीं पाहिजेत, कीं तीं इतरांस ख्रिस्ताचीं बरोबर कल्पना व त्याची सेवा हीं दाखवून देतील.WG 109.2
आपण ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहोंत, तर त्याची सेवा आपण ती खरोखरच आहे त्याप्रमाणें मनोवेधक करून दाखवूं. जे ख्रिस्ती लोक आपल्या आत्म्यास उदासीनतेनें, दु:खानें, कुरकुरीनें,तक्रारीने व्याप्त करून टाकितात, ते देवाचें व ख्रिस्ती जिण्याचें खोटें प्रदर्शन इतरांपुढें मांडीतात. मनुष्याने सुखी असावे ह्यांत देवास संतोष नाहीं,असा लोकांचे मनावर ते परिणाम करितात, व अशा रीतीनें आपल्या स्वर्गीय पित्याविरुद्ध साक्ष देतात.WG 110.1
ईश्वराच्या लेकरांस अविश्वासाच्या व निराशेच्या मार्गांत नेण्यांत सैतानास आनंद होतो. ईश्वराविषयीं आपल्याठायीं अविश्वास व त्याच्या आपणांस वांचविण्याच्या खुशीविषयीं व सामर्थ्याविषयी संशय उत्पन्न झालेला पाहण्यांत तो आनंद मानितो. ईश्वराच्या कृती आपणांस हानिकारक होतील असें भासविणें सैतानास आवडतें. कृपादृष्टी व द्या हीं प्रभूचेठायीं नाहींत असें दाखविणें हेंहि सैतानाचेंच काम आहे. ईश्वराविषयीच्या खऱ्या गोष्टी तो अगदी उलट भासवितो. त्याच्याविषयीं खोट्या कल्पना तोच मनात भरवून देतो. त्या स्वर्गीय पित्याविषयीच्या खऱ्या गोष्टींवर लक्ष देण्याऐवजीं आपण बहुतेक प्रसंगी सैतानानें भासाविलेल्या खोट्या गोष्टींकडे लक्ष देतों व अशा रीतीनें त्याजविषयी अविश्वासू होत्साते त्याजविरुद्ध आपण कुरकुर करुं लागतों. सैतान हा नेहमीं धार्मिक जिणें उदासवाणे करावयास लावतो. तें कष्टमय व दुस्तर आहे. असें आपणांस भासाविण्याची त्याची इच्छा असते. व जेव्हां ख्रिस्ती मनुष्य आपले धर्मसंबंधी विचार आपल्या आयुष्यक्रमांत दाखवितो, तेव्हां तो आपल्या अविश्वासानें सैतानाच्या खोडसाळ कृतीस पुष्टि देतो.WG 110.2
बरेच लोक आपला आयुष्यक्रम कंठीत असतां त्यांनीं केलेल्या चुका, त्यांत आलेली अपयशें,व त्यांच्या झालेल्या निराशा हीच घेऊन घोकीत बसतात, व त्यामुळें त्यांचे अंत:करण दु:खाने व निरुत्साहानें व्याप्त होऊन गेलेली असतें. मी एकदा युरोपांत असतांना वर सांगितल्याप्रमाणें अंतः- कारण फार कष्टी होऊन गेलेल्या एका बाईनें आपल्या मनाचे सांत्वन करण्याविषयीं कांही तरी करा असें मला लिहिलें. ज्या दिवशी हें पत्र मला पोहोंचाले त्याच रात्रीं मी एका बागेत गेलें असून त्या बागेचा मालक मला बागेंतील हिंडण्याचा मार्ग दाखवीत मजपुढें चालला आहे, व ती पत्र लिहिणारी बाई मजजवळ आहे असे स्वप्न पडलें. बागेतील फुलें जमा करून त्यांचा सुवास घेत घेत इकडे तिकडे हिंडत असतां त्या बाईने तिच्या वाटेत आलेल्या कात्यंकडे लक्ष देण्यास मला सांगितले. ते कांटे पाहून त्या बैल फारच वाईट वाटले. मालकाच्या मागोमाग ती बाई चालली होती, परंतु काटे पडलेल्या मार्गाने जात होती. जात असतां दु:खाने ती म्हणाली असल्या ह्या सुंदर बागेंत काटेरी झुडपे, काटे वगैरे पडून तिची खराबी व्हावी ही मोठ्या दु:खाची गोष्ट न्हावे काय ? त्यावर तो बागेचा धनी म्हणाला, “काटे बाजूला ठेवून द्या.गुलाब, जाई, मोगरा वगैरे खुडून घ्या म्हणजे झालें.”WG 110.3
तुमच्या अनुभवांत काही चांगल्या गोष्टी नाहींत काय ? ईश्वरी आत्म्याला दिलेल्या प्रत्युत्तारादाखलच्या काही आनंदकारक गोष्टीनी तुमचे अंत:करण केव्हां तरी भरलें होतें असें काही मौल्यवान प्रसंग तुमच्याजवळ नाहींत काय ? आपल्या आयुष्यक्रमांतील मागील काळाकडे पाहाल तेव्हां काही दिवस सुखाचे गेलेले तुम्हांस आढळत नाही काय? सुवासिक पुष्पाप्रमाणें ईश्वराचीं वचने तुमच्या दोहों बाजूंस नाहींत काय? त्यांच्या सौंदर्यानें व माधुर्यानें तुम्हीं आपलें अंत:करण भरून टाकणार नाही काय?WG 111.1
काटे व काटेरी झाडें तुम्हांला जखमां करून दु:ख मात्र देतील. तुम्ही तीच जमा कराल व दुसऱ्यांस द्याल, तर ईश्वराच्या चांगुलपणा स्वतां न अनुभवता दुसऱ्यांस त्यांच्या आयुष्यक्रमात तो अनुभवण्यास अडथळा करीत नाही काय?WG 111.2
गत काळातील दुख:कारक गोष्टी, म्हणजे अडचणी व निराशा त्या अगदीं तुम्हांस निरुत्साही करून तुम्ही शोक करीपर्यंत, आठवीत बसणे हें शहाणपणाचें काम नाहीं, निरुत्साही आत्मा अंधकाराने व्याप्त झालेला असतो. तो स्वःतां ईश्वराचा प्रकाश न मिळवितां दुसऱ्यांच्या मार्गावरहि त्या अंधाराची छाया पसरून देतो. ईश्वरानें ह्या सृष्टीत दिलेल्या सुंदर देखाव्यांबद्दल त्याचे आभार माना. त्याच्या प्रेमाबद्दलच्या वचनांकडे सतत पाहावें म्हणून आपण तीं एकत्र करूं या. ईश्वराचा पुत्र आपल्या बापाचे आगमन सोडून, मनुष्य रूपानें देवरूपावर पांघरून घालून मनुष्यांस सैतानाच्या तावडींतून मुक्त करण्यास आला. आपल्या वतीनें त्यानें सैतानावर मिळविलेला जय मनुष्यांस स्वर्गाचे दर खुले करून देऊन ज्या ठिकाणीं देवानें आपलें वैभव प्रगत केलें आहे असें स्थळ प्रगत करितो. पापामुळें पतित लोक नाशाच्या दरींत पडले होते,त्यांस वर काढून त्यानें ईश्वराशीं पुन्हा ऐक्य घडवून आणिलें, ताराकाच्या ठिकाणीं असलेल्या श्रद्धेमुळे दैवी कसोटीस टिकून ख्रिस्ताचें नितीमात्वा त्यांनी पांघरले व त्यामुळें त्याच्या आसनाइतके उंच झाले, ह्या चित्रांचे, देखाव्यांचे आपण मनन करावें अशी ईश्वराची इच्छा आहे.WG 111.3
ईश्वराच्या प्रेमाविषयीं आपण संशय घेतों, व त्याच्या वचनांविषयी अविश्वास धरतों, तेव्हां आपण त्याचा अपमान करितों,व त्याच्या पवित्र आत्म्यास दु:ख देतों. एखादी आई आपल्या लेकरांचे कल्याण व्हावे म्हणू प्रयत्न करीत असली, व तिची मुले, जणू काय तिच्या मनांत आपलें बरें करावयाचें नाही, अशी समजूत करून घेऊन तिजविरुद्ध कुरकुर करूं लागलीं, तर त्या आईस की वाटेल बरे ? कल्पना करा, कीं तीं तिच्या प्रेमाबद्दल संशय घेऊ लागली; तर तिचे अंतःकरण त्यामुळे दुभाग होऊन जाईल. मुलांनी अशा रीतीने वागविलेल्या आईबापांस काय बरें वाटेल ? प्रेषितानें म्हटले आहे, “ज्यानें आपला पुत्र राखून ठेविला नाही, तर आम्हां सर्वांसाठीं दिला तो त्यासहित आम्हांला सर्व काहीं कसा देणार नाहीं ?” १ असें असतां कितीसे लोक, आपल्या शब्दानें जरी नव्हे, तरी आपल्या कृतीनें “ईश्वर हें माझ्यासाठीं करीत नाहीं त्याचें कदाचित दुसर्यावर प्रेम असेल: मजवर नाही,” असें म्हणत आहेत.WG 112.1
ह्या सर्व गोष्टी तुमच्या आत्माची हानी करितात. कारण तुम्हीं उच्चारलेल्या संशयाचा प्रत्येक शब्द सैतानाच्या मोहास बोलावीत असतो, संशय घेण्याकडे तुमची प्रवृत्ती अधिकाधिक दृढ करितो व सेवा करणाऱ्या देवदूतांस दु:ख देतो. सैतान तुम्हांस मोह पाडतो त्यावेळी संशयाचा अगर अज्ञानाचा एक शब्दहि उच्चारूं नका. त्याच्या सूचनांस तुम्ही अंत:करणांत थर द्याल तर तो तुचे मन अविश्वासाने व ईश्वराविरुद्ध असलेल्या प्रश्नांनी भरून टाकील. तुम्ही आपल्या भावना बाहेर बोलून दाखवाल, तर तुम्ही उच्चारलेले प्रत्येक संशय तुमच्या मनावरच विरुद्ध कार्य करून राहतील असे नाही, तर दुसऱ्यांच्या अंतःकरणात विषवृक्षांचे बीज पेरून पुढे त्या वृक्षांस फुलें व फळें येतील. तुमच्या त्या संशयाच्या शब्दांनी उत्पन्न केलेल्या त्यांच्या मनांवरील परिणामास नाहीसें करणें मग दुरापास्त होईल. सैतानाच्या मोहांतून व पाशांतून मुक्त होण्यास तुम्ही समरत व्हाल, परंतु तुमच्यामुळें दुसऱ्यांच्या मनावर जो परिणाम झालेला असतो त्यापासून दुसऱ्यांस मुक्त होता येत नाही. म्हणून तुम्ही, जेणेंकरून आत्मीक सामर्थ्य व आत्मीक जिणें प्राप्त होईल अशाच गोष्टी बोलणें किती महत्वाचें आहे ?WG 113.1
तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याविषयीं जगाला काय निरोप देतां हे देवदूत लक्षपूर्वक पाहत आहेत. त्या स्वर्गीय पित्याविषयी जगाला काय निरोप देतां हे देवदूत लक्षपूर्वक पाहात आहेत. त्या स्वर्गीय बापापुढें तुमच्यासाठीं मध्यस्थी करण्याकरितां ज्यानें जन्म घेतला, त्या ख्रिस्ताविषयींच तुमचें संभाषण असूं द्या. मित्राचा हात धरीत असतां तुमच्या मुखांतून व अंतःकरणांतून ईश्वराची स्तुती निघूं द्या: अशाने त्या मित्राचे विचार प्रभू ख्रिस्ताकडे वळतील. प्रतिकार करण्यास कठीण अशा मोहांच्या व दुःसह दुःखें व अडचणी आपल्या बंधूंस कळवूं नका. तर प्रार्थनेने ईश्वरास कळवा. संशयाचा अगर निरुत्साहाचा एकहि शब्द उच्चारावयाचा नाहीं असा नियम करून टाका. आशेच्या व पवित्रबळकटी आणाल. मोहानें पगडा बसविलेले व “स्व” विरुद्ध व पापाविरुद्ध होणाऱ्या झटापटींत बहुतेक बेहोष होऊन गेलेले बरेच धैर्याचे आत्मे असतात. अशा एकाही आत्म्यास, मोहाशीं त्याचा झगडा चालला असतां घाबरवूं नका. धैर्याच्या व आशेच्या शब्दांनी उलट त्यास आनंद द्या. ह्याप्रमाणे ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यामधून प्रकाशवा. “आम्हांतील कोणी आपणाकरितां जगात नाही.”1रोमेकर१४:७ . आम्हांस समजून न येणाऱ्या वजनानें दुसऱ्यांस धैर्य देऊन ते बळकट होतील अगर त्यांचे धैर्य खचून ते ख्रिस्तापासून व सत्यापासून दुरावतील.WG 113.2
ख्रिस्ताच्या जिण्याची व शिलाची चुकीची कल्पना बाळगणारे बरेच लोक आहेत. त्यांस वाटतें, कीं तो निष्ठुर, कडक व आनंदरहित असा आहे. अशा तऱ्हेच्या वाईट विचारांनी धर्माचा सर्व अनुभव ज्यांचा बिघडलेला आहे असे बरेच लोक आहेत.WG 114.1
वारंवार असें सांगण्यात येतें कीं, प्रभू येशु नेहमी रडत असे व हसणें कसें तें त्यास माहीतच नव्हते. तो तारक प्रभू दु:खसाही होता खरा व दु:ख त्यास झालेहिं. याचें कारण त्यानें आपल्या अंत:करणात लोकांची दु:खे सांठविली. त्याचें जिनें स्वनाकाराचें, दु:खाची व काळजीची छाया पडलेलें होतें खरें, तथापि त्याचा आत्मा त्यामुळें चेंगरून गेला नाही. दु:खाची छटाहि त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली नव्हती, तर उलट शांतपणा व गांभीर्य दिसून येत होतीं. त्याचें अंतःकरण म्हणजे जीवनाच्या विहारीचा झराच होतें. व ज्या ज्या ठिकाणी तो जाई त्या त्या ठिकाणी शांतता, आनंद व सुख हीं तो आपल्याबरोबर नेई.WG 114.2
आपला तारक अतिशय गंभीर व उत्सुक होता, तथापि उदास नव्हता, जे त्याचे अनुकरण करितात, त्यांचे जिणें उत्साहाचें असेल, त्यांस आपली जबाबदारी काय आहे, हे समजेल. स्वभावाचा चंचलपणा नाहीसा होईल. परिणामीं अहितकारक होईल अशी करमणूक, थट्टामस्करी त्या ठिकाणी नसेल; तर एखाद्या नदीप्रमाणें प्रभू येशूचा धर्म शांतता देईल. असें जिणें आनंदाचा दिवा मालवणार नाहीं. त्यास प्रतिबंध करणार नाहीं, हास्ययुक्त चेहऱ्यावर कसल्याही प्रकारच्या दु:खाची छटा आणणार नाहीं. ख्रिस्त सेवा करून घेण्यास नव्हे, तर सेवा करावयास आला. अंत:करणात त्याचे प्रेम दाटेल, तेव्हां आपण त्याचा कित्ता गिरवूं.WG 114.3
दुसऱ्यांच्या निर्दयपणाच्या व अन्यायाच्या गोष्टी सतत आपण मनात वागवूं, तर ख्रिस्तानें ज्याप्रमाणें आपणावर प्रेम केलें त्याप्रमाणें आपणांस त्यांच्यावर करता येणार नाहीं. परंतु जर आपले विचार ख्रिस्ताच्या आश्चर्यकारक प्रेमाविषयी व दयेविषयी असतील,तर आपल्याही आत्म्यातून तीं दुसऱ्यांकडे वाहतील. जीं आपणांस दिसून आल्याशिवाय राहात नाहीत अशी इतरांची व्यंगे व इतरंचे अपराध मनांत न आणितां आपण त्यांवर प्रेम करावें व त्यांस मान द्यावा. नम्रता व “स्व” वर अवलंबून बसण्याविषयींचा अविश्वास वाढवून, दुसऱ्यांच्या अपराधांकडे शांतपणे व ममताळूपणानें पाहावें. असें केल्यानें स्वार्थबुद्धी पार नाहीशी होऊन आपले अंतःकरण विस्तृत व दयाळू असे होईल.WG 115.1
गीतकर्त्यानें म्हटलें आहे, “परमेश्वरावर भार ठेव, व बरे कर, भूमीत वस्ती कर व सत्य पाळ.”1गति३७:३ .“ ईश्वरावर भार ठेव.” प्रत्येक दिवशी कांहीना कांहीतरी काळज्या, ओझी व अडचणी व परीक्षा ह्याविषयीं सांगण्यास आपण कितीतरी उत्सुक असतों. इतक्या उसन्या आणलेल्या अडचणी आपल्या मार्गात येतात, आपण इतकी भीति बाळगतो, इतकी विलक्षण काळजी दाखवितों कीं एखाद्यास सहज वाटेल कीं अशा मनुष्यावर द्या करणारा, प्रेम करणारा व त्याच्या विनंत्या ऐकणारा कोणी नाही.WG 115.2
कित्येक असे आहेत, कीं ते नेहमीच भीती व अडचणी आपणांवर ओढून घेतात. ईश्वराच्या प्रेमाची चिन्हें त्यांजभोवती असतांहि व त्याच्या औदार्यमुळे प्राप्त झालेल्या देणग्यांचा नेहमी उपभोग घेत असतांहि ते त्या सुखांकडे दुर्लक्ष करितात. भविष्यकाळीं येणाऱ्या असंतोषकारक गोष्टींवर त्यांचे मन सदोदित लागलेले असते, अगर एखाद्या खरोखरच येणाऱ्या क्षुल्लक अडचणीनें देखील त्यांचे डोळे-वास्तविक ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञताबुद्धी दाखवयास पाहिजे अशा गोष्टींबद्दल-अंध बनतात. ज्या अडचणींस ते तोंड देतात त्या, त्यांस देवाकडे वळविण्याच्या ऐवजी-जो त्यांच्या मदतीचा एकच मार्ग असतो-त्याजपासून दूर करितात;कारण त्यांमुळे त्यांच्या अंतःकरणांत असंतोष व गोंधळ झालेला असतो.WG 115.3
ह्याप्रमाणें अविश्वास धरून आपलें कल्याण होतें काय ? आपण कृतघ्न व अविश्वासू काय म्हणून असावें ? प्रभू येशू आपला मित्र आहे. सर्व स्वर्ग आपल्या कल्याणासाठीं झटत आहे. रोजच्या जिन्यांतील अडचणी व मनाची टोचणीं ह्यांस मन बिघडून जाईल म्हणून अंतःकरणात थर देतां कामा नये; व जर आपण देऊं तर हरहमेशा आपणांला काहींना काहींतरी मन खट्टू करणारें आढळेल. मनाला चिडविणारा व परीक्षेंत टिकण्यास मदत न करणारा, व त्रास देणारा असा एकांतवास आपण पत्करुंच नये.WG 116.1
कामधंद्यांत गोंधळून गेलेले तुम्ही असा, अगर तुमच्या आशा अंधुक होत जाऊन तुम्हंस अपयश येण्याची धास्ती पडो, परंतु धैर्य सोडूं नका. ईश्वरावर तुमच्या काळजीचा भार टाकून स्वस्थ व आनंदी राहा. तुमची कामें विचारपूर्वक चालविण्याविषयी शहाणपण मिळण्यास देवाची प्रार्थना करा. व अशा रीतीनें तोटा व पुढें येणारें संकट निवारा. परिणाम हितकारक व्हावा म्हणून तुमच्यानें करवेल तेवढा प्रयत्न करा. प्रभू येशूनें मदत करण्याबद्दल वाचन दिले आहे, परंतु तें आपण प्रयत्न केल्याशिवाय बरीक नव्हे. आपल्या मदत्गारावर विश्वास ठेऊन तेव्हां तुमच्या हातून होण्यासारखें असेल तें केल्यावर मग होईल तो परिणाम आनंदाने पत्कारा.WG 116.2
ईश्वराच्या लेकरांनी काळजीच्या भारानें वाकून जावें अशी त्याची इच्छा नाहीं. आपला प्रभू आपणांस फसवीत नाहीं. भिऊ नका; तुमच्या मार्गांत कोणत्याही अडचणी नाहींत असें तो म्हणत नाहीं. आपणांस परीक्षा, संकटें आहेत असें त्यास माहित आहे व तो अगदी सरळपणानें आपणांशी वागत आहे. पापी व दृष्ट अशा जगाबाहेर आपल्या लोकांस काढून नेण्याचें त्याच्या मनांत नाही, तर तो त्यांस कधीहि न चुकणारा असा आश्रय दाखवून देत आहे. आपली शिष्यांबद्दलची त्याची अशी प्रार्थना होती,कीं “तूं त्यांस जगांतून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही. तर तू त्यांस वाईटापासून राखावें अशी विनंती करितों. जगामध्यें तुम्हांस क्लेश होतील, तरी धीर धरा, मीं जगाला जिंकलें आहे.”1योहान१७:१५ ;१६:३३ .WG 116.3
डोंगरावरील आपल्या उपदेशात ख्रिस्ताने आपल्या शिष्यास ईश्वरावर विश्वास ठेवण्याच्या अगत्यासंबंधाने मौल्यवान धडे शिकविले होते. हे धडे ईश्वराच्या लेकरास सर्व काळी उत्तेजन येण्यासाठी योजलेले होते, व आज ते आमच्या हातात शिक्षणाने भरलेले व सुख देणारे असे पडले आहेत. काळजीच्या विचारांनी भारावून न गेलेले पक्षी आपली स्तुतीपार गाणी गात असतात, त्यांजकडे पाहण्यास त्या तारकाने आपल्या शिष्यास सांगितले; कारण “ते पेरीत नाहीत व पीकही काढीत नाहीत.” तथापि तो सर्वसमर्थ पिता त्यांच्या गरज भागवितो. तारकानें विचारले होतें, “तुम्ही त्यांच्यापेक्षां श्रेष्ट आहां कीं नाही?2मात्थि६:२६ निर्माण केलेल्या मनुष्यांस व पशुपक्ष्यांस पुरवठा करणारा ईश्वर आपला हात उघडून त्यांस सर्व गोष्टी पुरवितो. आकाशांतील पक्षी त्याच्या देखरेखीखालींच आहेत. तो त्यांच्या चोचींत अन्न टाकीत नाहीं, परंतु त्यांच्या गरज भागविण्याची तजवीज करितो. त्याने इकडे तिकडे पसरलेले दाने त्यांस गोल करून आणिले पाहिजेत. आपली लहानग्या घरट्यांसाठी काडीकुडी त्यांस जमा केली पाहिजे, आपल्या पिलांस खावूं घातले पाहिजे. आपल्या कामगिरीवर गात गात ते जातात; कारण “तुमचा स्वर्गीय पिता त्यांस चोरतो.” तुम्ही त्यांच्यापेक्षा थोर नाहीं काय? सुबुद्ध व आत्म्याने पूजा करणारे या नात्याने तुम्ही पक्ष्यांपेक्षा श्रेष्ट नाही काय? आपला उत्पन्नकर्ता, आपल्या जिवांचा रक्षणकर्ता, व आपल्या प्रतिमेप्रमाणें आपणांला बनविणारा ईश्वर, त्यावर आपण विश्वास ठेविला तर आपल्या गरज पुरविणार नाही काय ? असंख्य वाढणाऱ्या व स्वर्गीय पित्यानें दिलेल्या सुशोभित झालेल्या व मनुष्यावरील आपल्या प्रेमाचें निदर्शक म्हणून उत्पन्न केलेल्या शेतांतील फुलांकडे पहावयास ख्रिस्ताने आपल्या शिष्यास सांगितले. तो म्हणाला, “शेतांतील भुकमलें कशी वाढतात हें पहा.” ह्या नैसर्गिक फुलांचे सौंदर्य. व त्यांच्या साधेपणा हीं शालमोन राजाच्या वैभवापेक्षां कितीतरी थोर आहेत ? कौशल्यानें विणलेले वस्त्र, ईश्वराने निर्माण केलेल्या नैसर्गिक मनोहर व सुंदर फुलांच्या पासंगासही पुरणार नाही. प्रभू येशू म्हणतो, “जे रानांतले गावात आज आहे, व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी, तो तुम्हांस विशेषकरून पोषाक घालणार नाही काय?”1मात्थि६:३० . दैवी कारागीर ईश्वर एकाच दिवसांत कोमेजून जाणाऱ्या फुलांस मृदुपणा व रंगवैचित्र्य देतो, तर ज्यांस त्यानें आपल्या प्रतिमेपासून निर्माण केले आहे, त्यांस तो किती तरी अधिक देईल ? काळजीच्या भाराने वाकलेल्यांस, गोंधळ व संशय धरणारांस, व अविश्वासू अंत:करणाच्या मनुष्यांस प्रभूचे हें विचारानें आहे.WG 117.1
आपले पुत्र व आपल्या कन्या हीं सुखी, शांत व आज्ञाधारक असावीत अशी ईश्वराची इच्छा आहे. प्रभू येशु म्हणतो, “मी तुम्हांस आपली शांती देवू ठेवितों. जसें जग देतें तसें मी तुम्हंस देत नाही. तुमचे अंतःकारण घाबरू नये व भिऊं नये.” “माझा आनंद तुम्हांमध्ये असावा, व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत.”2 योहान१४:२७ , १५ : ११ कर्तव्याचा मार्ग विसरून स्वार्थवृत्तीनें शोधीलेले सुख समतोल नसून अविचाराचे व क्षणभंगुर असतें. असें सुख लौकर नाहीसें होऊन आत्मा उदासीनतेने व दु:खानें भरून जातो; परंतु ईश्वराच्या सेवेत आनंद व समाधान ही असतात. अनिश्चित अशा मार्गाने ख्रिस्ती मनुष्यानें जाण्याचें व व्यर्थ दु:ख व निराशा करून घेण्याचें त्याजवर सोपविलेलें नाहीं. ह्या आयुष्यक्रमांत सुखप्राप्ती झाली नाहीं,तरी पुढील जिण्यातील आयुष्यक्रमाकडे पाहून आपणही आनंद मानावयाचा आहे.WG 118.1
परंतु ह्याहि जगांत ख्रिस्ती लोकांस ख्रिस्ताशीं एक्या ठेवल्यापासून होणारा आनंद,त्याच्या प्रेमाचा प्रकाश व त्याच्या सततच्या सान्निध्यापासून होणारे सुख हीं प्राप्त होतील. आयुष्यमार्गातील प्रत्येक पायरी त्यांस अधिक ख्रिस्ताजवळ व शांतीच्या गृह जवळ आणील म्हणू त्यांनी विश्वास सोडूं नये, तर उलट तो पूर्वीपेक्षांही अधिक बाळगावा. “एथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे”?1१शमुवेल७:२. व अखेरपर्यंत तो आम्हांला मदत करील. चला तर मग आपण ज्या प्रभुनें आपणास सुख देण्याविषयी जें काही केलें व आपला नाश करणाराच्या हातून वाचविलें त्याची आठवण करून देणाऱ्या स्तंभांकडे दृष्टी लावू या. ईश्वराने ममताळूपणें जी कृपा आपणावर केली आहे --गरिबांचे जे अश्रू पुसले, जीं दु:खें व ज्या काळज्या निवारण केल्या, जे आशीर्वाद दिलें --ती लक्षात वागवूं, व आपल्या राहिलेल्या आयुष्यक्रमांत जे काही आपणांपुढे आहे, तें अरण्यास स्वतांस दृढ करून घेऊं.WG 118.2
पुढे येणाऱ्या अडचणींकडे लक्ष दिल्याशिवाय आपल्याच्याने राहवत नाहीं. तथापि आपण मागील काळाकडेहि पहिले पाहिजे, व पुढेहिं नजर दिली पाहिजे व म्हटले पाहिजे “एथपर्यंत ईश्वरानें आम्हांस मदत केली आहे.” “जसे तुझे दिवस तशी तुझी स्वस्थता होवो.”2अनुवाद३३: २५; सोसण्याचे सामर्थ्य आपणांस दिले आहे त्यापेक्षा अधिक खडतर अशी आपली संकटाची परीक्षा होणार नाही. म्हणून जेथे आपणांस काम सापडेल तेथे ते पाहूं व विश्वास धरूं, कीं कांही असले तरी संकटाच्या मानानें सामर्थ्यही आपणांस मिळेल.WG 119.1
ईश्वराच्या लेकरांचा प्रवेश होण्यासाठीं मग हळूहळू स्वर्गाचे दरवाजे उघडले जातील, व वैभवाच्या राजाकडून “आहो माझ्या बापाचे आशीर्वादित, या , जें राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरितां सिद्ध केलें तें वतन करून घ्या.”3मात्थि२५:३४. या मधुर गायनाप्रमाणें आशीर्वाद आपल्या कानांवर पडतील.WG 119.2
नंतर प्रभू येशूनें तयार केलेल्या घरी तारलेल्या आत्म्याचें स्वागत होईल. त्या ठिकाणी त्यांचे सोबती पृथ्वीवरील सोबत्याप्रमाणें नीच, खोटे बोलणारे, मूर्तिपूजक, अशुद्ध मनाचे व अविश्वासु असणार नाहीत. परंतु त्यांचा सहवास ज्यांनी सैतानास जिंकले आहे व ईश्वरी कृपादानानें ज्यांचें शील पूर्ण बनलें आहे, अशांशी होईल. त्या ठिकाणी पापाची प्रत्येक प्रवृत्ति, त्रासदायक प्रत्येक व्यंग ख्रिस्ताच्या रक्ताने नाहीशी झालेली असतात . व सूर्यापेक्षां फारच अधिक अशा त्याच्या वैभवाची उत्कृष्टता व ओजस्विता त्या आत्म्यास दिली जाते. ह्या बाहेरील सौंदर्यापेक्षां अधिक महत्वाचें नैतिक सौंदर्य व त्याच्या शीलाची पूर्णता हीं त्याच्याद्वारे प्रकाशमान होतात. ईश्वराच्या मोठ्या शुभ्र आसनापुढे देवदूतांचे वैभव व त्यांचे हक्क यांस सह भागीदार होऊन ते पापरहित उभे असतात.WG 119.3
जें देवांचें वैभव वारस या नात्याने मनुष्याकडे येणार त्या वारसा हक्काच्या दृष्टीने पाहतां “मनुष्य सर्व जग मिळवील आणि आपला जीव गमाविल तर त्याला की लाभ होईल?”1. तो गरीब का असेना, जगाला देत येणार नाही अशी संपत्ती व असें वैभव त्याच्या स्वतांच्याठायीच आहे. ज्याने सर्व सामर्थ्य ईश्वराच्या सेवेला अर्पण केलें आहे,अशा तारण झालेल्या व पापापासून शुद्ध झालेल्या आत्म्याची किमंत सर्वाहून अधिक आहे. ईश्वराच्या व देवदूतांच्या समक्ष स्वर्गात एका तारण झालेल्या आत्म्याबद्दल पवित्र व जयसुचक गायनांनी आनंद केला जातो.WG 120.1