Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आजची मंडळी

    द्राक्षमळयाचा दाखला केवळ यहुदी राष्ट्रासाठीच नाही. त्यापासून आम्हासही बोध आहे. या पिढीतील मंडळीवर परमेश्वराने महान संधी व आशीर्वाद पाठविले आहेत आणि त्यानुसार परमेश्वर मंडळीपासून कार्याची अपेक्षा करीतो.COLMar 222.2

    आमची सुटका अधिक मोलाने झाली आहे आणि केवळ या महान मोलामुळेच आम्हाला परिणामाचे महान महत्त्व समजले जाणार आहे. या पृथ्वीवरील जमिनीवर परमेश्वराच्या पुत्राचे अश्रु व रक्त पडून ती जमीन भिजली गेली आणि त्यामळे स्वर्गीय नंदनवनाची मौल्यवान फळे आलेली आहेत. जे परमेश्वराचे लोक आहेत त्यांच्या जीवनात पवित्र वचनाद्वारे परमेश्वराचे गौरव व सार्वभौम सत्ता ही दाखविली पाहिजेत. ख्रिस्ताचे शील व स्वर्गीय राज्याची तत्त्वे ही केवळ ख्रिस्ताच्या लोकांद्वारे प्रदर्शित केली पाहिजेत.COLMar 222.3

    सैतान परमेश्वराच्या कामाची नक्कल करू पाहातो आणि तो सर्व मनुष्यांना सतत सांगतो की त्याच्या वरील तत्त्वाचे अनुकरण करावे. सैतान, परमेश्वराच्या लोकांना त्याचे फसवेगिरी करणारे असे वापरू इच्छितो. तो बांधवाना दोषी ठरविणारा असा आहे आणि जे परमेश्वराच्या धार्मिक कार्यात आहेत त्याच्यावर तो दोषारोप आणीत असतो. सैतानाच्या या दोषारोपास उत्तर देणे यासाठी परमेश्वराची अशी इच्छा आहे की धार्मिक तत्त्वांचे आज्ञापालन करणे व त्याचा होणारा परिणाम याद्वारे सैतानाला उत्तर देणे.COLMar 222.4

    परमेश्वराने आज्ञापालनाचे हे जे तत्त्व दिले आहे याचा उपयोग प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिने, प्रत्येक कुटुंबाने, मंडळीत व प्रत्येक संस्था की जी परमेश्वराच्या सेवेसाठी स्थापन झाली या सर्वांनी करावयास पाहिजे. जगासाठी काय करणे आहे याचे सर्वजण दर्शक आहेत. तारणदायी सुवार्ता सत्याचे ते प्रत्येकजण दर्शक आहेत. मानवासाठी परमेश्वराची कृपा प्रसारित करणारे हे प्रत्येकजण साधन व हस्तक आहेत.COLMar 223.1

    यहुदी पुढारी त्यांच्या भव्य मंदिराकडे पाहून अभिमान दर्शवित व ते मंदिरातील धार्मिक सेवा व विधी करीत असता जरा अधिक अभिमान बाळगीत असत पण परमेश्वराचा न्याय, कृपा व प्रिती ही उणीव होती. मंदिराचे वैभव वा उपासना विधीचा अभिमान यामुळे त्याची परमेश्वरासमोर धार्मिकतेची शिफारस होत नव्हती; केवळ जे काही परमेश्वराच्या दृष्टीने अमोल होते ते म्हणजे त्यांनी त्यांचा नम्र व अनुतप्त आत्मा ही आणिली नाहीत. जेव्हा परमेश्वराच्या राज्याचे महान तत्त्व जेव्हा हरवले जाते तेव्हा लोकसंख्या वाढते व लोक उधळे होतात. जेव्हा शील संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते, जेव्हा आत्म्याची उन्नती ही उणीव दिसते; देवभिरूपणाचा साधेपणा नाहीसा वा हरविला जातो; त्यानंतर अभिमान गर्व यांचा पसारा वाढतो, मदिराचे वैभव याकडे लक्ष जाते व विधींची यादी व काळजी घेतली जाते. पण या सर्वांद्वार परमेश्वराचा सन्मान केला जात नाही. जे कोणी परिपाठाचा धर्म व त्यातील विधींचा अनुक्रम पाळणे असा दांभिकपणा व प्रदर्शन मांडतात हे सर्व परमेश्वराला मान्य नाही. या सर्व सेवेला स्वर्गीय संदेशवाहक प्रत्युत्तर देत नाहीत.COLMar 223.2

    परमेश्वराच्या दृष्टिने मंडळी अत्यंत महत्त्वाची आहे. मंडळीचा बाह्य देखावा याद्वारे तिचे मोल परमेश्वर ठरवित नसून तर मंडळीच्या अंत:करणाचा प्रामाणिकपणा हा जगापासून वेगळा आहे यावर परमेश्वर मंडळीचे मोल करितो. ती मंडळी ख्रिस्ताच्या ज्ञानात किती वाढलेली आहे व आत्मिक अनुभवात मंडळीची किती व कशी काय वाढ आहे यावर मंडळीचे मोल, परमेश्वर करितो.COLMar 223.3

    ख्रिस्त त्याच्या द्राक्षमळयांतून पवित्रता व निस्वार्थीपणाच्या फळाचा भुकेला असा झाला आहे. येशू त्यांच्याकडून प्रिती व चांगुलपणाच्या तत्त्वांची अपेक्षा करीतो. जे कोणी ख्रिस्ताचे प्रतिनिधी असतील त्यांच्या शीलाद्वारे प्रगट केलेले सौंदर्य याची तुलना जगातील कोणत्याही सौंदर्याशी केली जाणार नाही. विश्वासकाच्या सभोवार कृपेचे वातावरण असते, पवित्र आत्मा त्याचे मन व अंत:करणावर कार्य करून त्याला तारणादायी जीवनाचे जीवन देणे व परमेश्वर त्याच्या कार्यावर आशीवाद पाठवितो.COLMar 223.4

    मंडळीचे सभासद तसे पाहू जाता त्या भागातील दरिद्री असू शकतील; त्यांच्या राहणीमानाने ते इतर लोकाना आकर्षक वाटणार नाहीत; पण जर त्या सभासदामध्ये ख्रिस्ताच्या तत्त्वानुसार शील असेल, तर त्यांच्या अंत:करणात आनंद असेल. त्यांच्या उपासनेत देवदूत सहभागी होतील. त्या सभासदाच्या अंत:करणातून स्तुति व उपकारस्तुति ही स्वर्गीय राजा परमेश्वरापर्यंत सुंगधी धुपाप्रमाणे वर वर जातील.COLMar 224.1

    परमेश्वराची ईच्छा आहे की त्याचा चागुलपणा व त्याचे सामर्थ्य यांची घोषणा करावी. आम्ही परमेश्वराची स्तुती व उपकारस्तुती करणे याद्वारे त्याचा सन्मान करितो. परमेश्वर म्हणतो, “जो आभाररूपी यज्ञ करितो तो माझे गौरव करीतो’ स्तोत्र ५०:२३ इस्त्राएल लोक अरण्यातून प्रवास करीत असताना ते परमेश्वराची स्तुति पवित्र गीते गावून करीत होते. परमेश्वराच्या आज्ञा व अभिवचने ही गायनाद्वारे रचिली गेली होती. ती गीते सर्व प्रवासी त्यांच्या प्रवासांत गात होते. कनान देशात पवित्र विधीसाठी ते लोक परमेश्वराची अद्भुत कार्ये यांची उजळणी करणे व आभारपूर्वक उपकारस्तुति करीत त्याच्या नामाचे गौरव करणे. परमेश्वराची ईच्छा होती की त्या सर्व लोकांचे जीवन परमेश्वराची स्तुति करणे असे असावे. याप्रमाणे पृथ्वीवर “परमेश्वराचा मार्ग कळावा.‘‘ “त्याचे सिध्द केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे.‘‘ स्तोत्र ६७ : २.COLMar 224.2

    सध्याही असेच असावयास पाहिजे. या जगाचे लोक खोटया देवतांची पूजा करितात. अशा खोटया दैवतावर दोष लादून आपण त्यांचा पालट करू नये वा करू शकत नाही तर त्याना आपण चांगले ते दाखविले पाहिजे. आम्ही त्यांना परमेश्वराचा चांगुलपणा दाखविला पाहिजे. “तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता; म्हणून तुम्ही माझे साक्षी आहा व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो.‘‘ यशया ४३:१२.COLMar 224.3

    परमेश्वराची इच्छा आहे की आपण तारणाची योजना ही सन्माननीय मानली पाहिजे, आणि आम्ही परमेश्वराची लेकरे या दृष्टिने आपण त्याच्या मार्गात आज्ञापालनाने वागणे व उपकारस्तुति करीत जीवन मार्गावर चालणे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण जीवनाच्या नाविन्यांत चालावे, सेवा करावी व ती ही आनंदाने करावी. आमची नावे जीवनी वहीत लिहिली आहेत म्हणून आपण सतत उपकारस्तुति करीत राहाणे, कारण जो आपल्या जीवनाची संपूर्ण काळजी घेतो त्याजवर आपण आपली सर्व काळजीचा भार टाकणे. परमेश्वर म्हणतो आम्ही आनंद करावा कारण आम्ही परमेश्वराचे वतन आहोत; कारण आम्ही संत व्हावे म्हणून आम्हास ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा शुभ्र झगा दिला आहे, कारण आम्हास आर्शिवादीत आशा म्हणजे लवकर तारणारा येशू येणार आहे, ही आहे.COLMar 224.4

    आपण जितकी प्रार्थना करितो तितकीच आपण पूर्णपणे व मन:पूर्वक परमेश्वराची उपकारस्तुति करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही जगाला व स्वर्गीय देवदूतांना हे दाखवून द्यावे की, आम्हास परमेश्वराची अद्भुत प्रिती ही आवडते, जाणवते आणि आम्हा पतित मानवास त्या प्रेमळ पित्या परमेश्वरापासून अजून अधिकाअधिक प्रितीची गरज आहे. आमच्या जीवनातील हे प्रिती अनुभवाचे अध्याय यावर आपण अधिकाधिक बोलणेची गरज आहे. आम्हांवर पवित्र आत्म्याचा खास वर्षाव झाला म्हणजे त्यानंतर प्रभुमध्ये आमचा आनंद, आमची सेवा अधिक प्रभावी होईल, आम्ही प्रभुच्या लेकरांची जो जो सेवा करीत जावू तो तो आम्हास अधिकाधिक प्रभुच्या गुणांचा अनुभव येईल व प्रभुसेवा द्विगुणित होत जाईल. COLMar 225.1

    अशाप्रकारे कार्य करीत गेलो म्हणजे सैतानी सत्ता पराभूत होईल. त्यांच्यातील कुरकुर करणारा स्वभाव, गा-हाणे करणे बंद होईल व त्यांच्यातील राग नाहीसा होईल. अशा प्रकारे या पृथ्वीवरील रहिवासी स्वर्गीयगृही राहणेस लायक होतील अशी तयारी करतील.COLMar 225.2

    अशा प्रकारच्या स्वभावाचा पगडा इतरांच्याही जीवनावर होईल. यामुळे ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणे यासाठी इतर साधनाचा उपयोग केला जाणार नाही.COLMar 225.3

    आपण प्रत्यक्षपणे परमेश्वराचे गौरव केले पाहिजे, परमेश्वराच्या नामाचे गौरव व्हावे यासाठी व ते गौरव वाढावे म्हणून आपण सर्वस्वी कार्य करावे. आम्ही द्यावे म्हणून परमेश्वर आम्हांस त्याची देणगी देतो, अशाप्रकारे आपण परमेश्वराचे शील जगाला प्रगट केले पाहिजे. यहुदी अर्थव्यवस्थेत देणगी व अर्पण देणे यांचा परमेश्वराच्या उपासनेत मोठा भाग आहे. इस्त्राएल लोकांनी त्यांच्या उत्पनाचा सर्व दशमांश निवास मंडपाच्या कार्यासाठी द्यावा असे शिक्षण त्यांना दिले होते. यासोबत त्यांनी पापार्पण, स्वइच्छेने देणगी देणे व उपकारस्तुतिचे अर्पण ही ही आणावयाची होती. त्या काळात सुवार्ता कार्याला अशाप्रकारे मदत केली जात असे. परमेश्वराने पूर्वजापासून जी अपेक्षा केली त्याहून आम्हांपासून परमेश्वर कमी अपेक्षा करीत नाही. आत्म्यांचे तारण हे सुवार्ता कार्य पुढे चालू ठेविले पाहिजे. दशाश, देणगी व अर्पण देणे यांत परमेश्वराने सुवार्ता कामाची सोय केली आहे. अशाप्रकारे सुवार्ता कामाची सोय केली आहे. अशा प्रकारे सुवार्ता कार्य टिकून राहील. अशी परमेश्वराची अपेक्षा आहे. परमेश्वर त्याच्या हक्काचा दशमांश मागतो आणि तो परमेश्वराच्या कामासाठी त्यांच्या भांडारात पवित्र समजून सुरक्षित ठेवावा. आम्हांस परमेश्वर देणगी, स्वअर्पण व उपकार स्तुतिचे अर्पण यांची मागणी करितो. या सर्व अर्पणांचा उपयोग पृथ्वीच्या सर्व दिशांना सुवार्ता प्रसार करणे यासाठी समर्पित करणे.COLMar 225.4

    परमेश्वराची सेवा यांत वैयक्तिक सेवा करणे हिचा समावेश आहे. जगाचे तारण कार्य यासाठी वैयक्तिक सेवा करून आपण परमेश्वराशी सहभागी झाले पाहिजे. ख्रिस्ताने आज्ञापिले, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टिला सुवार्तेची घोषणा करा”(मार्क १६:१५) हे प्रत्येक अनुयायास सांगितले आहे. जे कोणी ख्रिस्तांच्या जीवनात दीक्षित झाले आहेत; त्यांना सुवार्ता कार्यासाठी दीक्षित केले आहे, कारण त्यांनी मानवाच्या तारणासाठी कार्य केले पाहिजे. सुवार्तिकांची अंत:करणे ख्रिस्ताच्या हृदयाशी एकरूप होऊन स्फुदन करतील. आत्म्यासाठी ख्रिस्ताची जी आतुरता होती तिच आतुरता सुवार्तिकामध्येहि येईल व ते ती प्रदर्शित करतील. सर्वांना एकाच कार्यात काम करिता येणार नाही पण सर्वांना काम करणे यासाठी जागा आहे.COLMar 225.5

    प्राचीन काळी अब्राहाम, इसाक, याकोब, मोशे याने त्याच्या ज्ञानाने व नम्रतेने आणि यहोशवाने हर एक कौशल्याने यांची परमेश्वराचे सेवक म्हणून यादी केली. मिर्यमने रचिलेली कवणे-गीते, दबोराचे धैर्य व धार्मिकता, रूथची प्रेमळ प्रिती, शमुवेलाचे विश्वासु आज्ञापालन, एलियाची सत्यभक्ति, अलीशाच्या प्रेमळ व नम्र स्वभावाचा पगडा या सर्वाची गरज होती. तद्वत् आता ज्यांच्यावर प्रभुसेवेचा आशीर्वादीत कार्यभागाची जबाबदारी आली आहे त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष सेवा त्यांच्या कर्तबगारीप्रमाणे, विश्वासुपणे करणे संधी आहे; आम्हांस दिलेली प्रत्येक देणगी प्रभुच्या कार्याची वाढ व प्रभुचे गौरव यासाठी खर्च करावी.COLMar 226.1

    ज्या कोणी ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारले आहे त्यांनी सुवार्ता सत्य व सुवार्ता सामर्थ्य यांचा परिणाम जीवनावर काय झाला हे प्रात्यक्षिक दाखवून द्यावे. परमेश्वर पूर्तता केली तर आमच्या करवी मागणी करितो. परमेश्वर ज्या कशाची अपेक्षा वा मागणी करितो ते आम्हास प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने संपादन करिता येते. स्वर्गीय संपूर्ण साठा परमेश्वराच्या लोकांच्याद्वारे प्रकट करिता आला पाहिजे. ख्रिस्त म्हणतो, “तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.‘‘ योहान १४:८.COLMar 226.2

    परमेश्वर म्हणतो सर्व पृथ्वी त्याचा द्राक्षमळा आहे. जरी ती आता बळकवणारा याच्या हाती आहे तरी ती परमेश्वराच्या मालकीची आहे. ही पृथ्वी परमेश्वराने निर्माण केली व तिचे तारण केले म्हणून तिजवर दोनदा हक्क आहे. कारण या पृथ्वीसाठी अर्थात् जगासाठी ख्रिस्ताने प्रायचित्त केले. “देवाने जगावर एवढी प्रिती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ‘ योहान ३:१६ येशू हा एक देणगी की त्याच्याद्वारे मानवासाठी सर्व काही दिले आहे. प्रत्येक दिवशी या जगास परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात. पावसाचा प्रत्येक थेंब, सूर्याचा प्रत्येक किरण आम्हास कृतघ्न मानवास दिला जातो. झाडाचे प्रत्येक पान, फुल व फळ ही परमेश्वराची महान प्रिती व सहनशीलता यांची साक्ष देतात.COLMar 226.3

    आम्हास सर्व काही देणारा परमेश्वर यास आम्ही परत काय देतो? परमेश्वर जे मागतो त्याविषयी लोक कसे काय वागतात ? अखिल मानव प्राणी हे कोणाची सेवा करीत आहेत ? ते सर्व धनदेवता हिची सेवा करीत आहेत. जगातील संपत्ति, हुद्दा, ख्यालीखुशाली हेच तेवढे त्यांचे ध्येय आहे. केवळ मानव धनसंपत्ति चोरीद्वारे संपादन करू पाहतात पण परमेश्वराचे लोकही तसेच करितात. परमेश्वराने दिलेली देणगी स्वत:च्या सुखसोईसाठी वापरतात. त्याना जे काही मिळविता येईल ते घेतात आणि त्याचा आधाशीपणा व स्वत:ची ख्यालीखुशाली यासाठी वापरतात.COLMar 227.1

    आजच्या जगाचे जे पाप आहे त्या पापाने इस्त्राएल लोकावर नाश आणिला. परमेश्वराच्या उपकाराची जाणीव न करणे, परमेश्वराने दिलेली संधी व आशीर्वाद यांचा निष्काळजीपणा, परमेश्वराची देणगी याचे भांडवल स्वार्थासाठी करणे. इस्त्राएल लोकांवर ज्या पापाचा क्रोध झाला त्यात वरील गोष्टींचा समावेश आहे. याच गोष्टी आजच्या जगावर अनर्थ आणीत आहेत.COLMar 227.2

    जैतून डोंगरावरून यरूशलेमाकडे पाहात असता येशूने जे अश्रू गाळले ते केवळ यरूशलेमाची दुर्दशा वा अनर्थ या विषयींच नव्हते तर त्यात सर्व जगाच्या नाशाचेही चित्र ख्रिस्ताला दिसत होते. COLMar 227.3

    “जर तु ही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते ! परंतु आता त्या तुझ्या दृष्टिपासून गुप्त केल्या आहेत.’ लूक १९:४२. COLMar 227.4

    “या दिवशी‘‘ हा दिवस शेवटास पोहचत आहे. कृपेचा काळ व संधी ही जवळ जवळ संपत आहेत. सूड घेणारे ढग एकत्र होत आहेत. परमेश्वर कृपा नाकारणे अशा लोकांसाठी नाश सर्वकाळचा हा त्वरेने येत आहे.COLMar 227.5

    असे असूनही जग गाढ झोपेत आहे. देवापासून येणारी ही भयानक शिक्षेची वेळ लोकांना माहीत नाही. COLMar 227.6

    जगाची अशी भयानक दुर्देवी अवस्था असताना, मंडळीचे स्थान कोठे आहे ? परमेश्वराने मंडळीच्या सभासदांना दिलेले कार्य ते करीत आहेत काय ? परमेश्वराचे सुवार्ता कार्य ते करीत ते पूर्ण करीत आहेत काय ? व जगाला परमेश्वराच्या स्वभावाचे प्रतिनिधी म्हणून वागतात काय ? आपल्या सहबाधवाना ते विनवणी प्रितीचा संदेश देत, कृपेचा काळ संपत आहे असा इशारा देतात काय ? .COLMar 227.7

    मनुष्ये धोक्यात आहेत. लोकांचे थवेच्या थवे नाश पावत आहेत. मग अशा लोकांसाठी ख्रिस्ताचे किती अनुयायो नाश पावणारे लोकांचा विचार करीत आहेत ? जगाचा शेवट नाश तराजूत मोजला जात आहे; पण ज्या लोकांना सत्य समजले आहे ते लोक ; लोकांचा नाश याचा तिळभर तरी विचार करितात काय ? ज्या प्रितीमुळे ख्रिस्ताने स्वर्ग सोडला; मानवासाठी मानवी देह धारण केला यासाठी की मानव होऊन मानवास समजून, मानवास देवाकडे आकर्षित करणे, परमेश्वराचे लोकात मोह व निर्बुध्दी आलेली आहे, त्यामुळे परमेश्वराने त्यांना दिलेले कार्य हे त्यांना समजून येत नाही. COLMar 227.8

    जेव्हा इस्त्राएल लोक कनान देशात गेले तेव्हा परमेश्वराने त्यांना सांगितले होते की त्यांनी संपूर्ण कनान देशाचा ताबा घेणे पण त्यांनी तसे केले नाही. त्या देशातील काही भाग त्यांनी काबीज केला आणि त्या देशावर जय मिळविला म्हणून ते ख्यालीखुशालीत राहू लागले. त्या देशातील ताबा घेतला तेवढया भागातच ते एकत्र राहू लागले कारण ते अविश्वासक राहून अखिल देश काबीज करणे हे विसरले गेले. अशाप्रकारे ते लोक परमेश्वरापासून बहकुन गेले. परमेश्वराचा हेतू ते पार पाडणे यात पराभूत झाले त्यामुळे परमेश्वरास त्यांची अभिवचनाप्रमाणे आशीर्वाद देणे अशक्य झाले. सध्याची मंडळी हेच करीत नाही काय? सर्व जगाला सुवार्तेची गरज आहे, असे असताना सुवार्तिक आहे त्याच ठिकाणी गर्दी करून ख्रिस्ती म्हणविणारे लोकांत राहत आहेत, व सुवार्ता साधनांचा उपभोग घेत आहेत. आपण नवीन क्षेत्रांत जावून सुवार्ता सांगणे ही कल्पनाच त्यांना येत नाही, ज्यांना तारणाचा संदेश माहित नाही त्यांना सांगणे ही परमेश्वराची आज्ञा पाळणे, त्यांची ध्यानीमनी येत नाही. सर्व जगात जावून संपूर्ण सृष्टिला सुवार्तेची घोषणा करा.”मार्क १६ : १५. यहुदी मंडळी याहुन या मंडळीचे सभासद कमी दोषी आहेत का?COLMar 228.1

    स्वर्गीय देवदूतासमोर दांभिक ख्रिस्ती लोकांचा न्याय केला जाईल, पण त्यांच्या जीवनातील निष्क्रियता, निरूत्साह व देवाच्या सेवेत दांभिक राहणे म्हणजे ते अविश्वासू असे गणले जातील. ते जर त्यांना दिलेल्या कार्यात पराकाष्ठा करीत राहतील तर त्यांच्यावर येणारा दोषारोप काढून टाकला जाईल; तेव्हा त्यांनी जर सेवा कार्यात मन घातले तर ते अधिक कार्य करू शकतील. प्रभुचा वधस्तंभ घेऊन चालणे यात मोठा स्वार्थत्याग आहे हे त्यांनाही माहित आहे व जगालाही माहित आहे. जीवनी पुस्तकांत ज्याच्या नावाविरूध्द असे लिहिले जाईल की त्यांनी काही फलदायी कार्य केले नाही तर ते केवळ खादाड असे होते. पुष्कळजण ख्रिस्ताचे नाव धारण करतील; पण त्याचे गौरव करणार नाहीत; ख्रिस्ताच्या सौंदर्यावर पडदा टाकतील आणि ख्रिस्ताचा सन्मान हा आवरून धरतील. COLMar 228.2

    पुष्कळांची नावे मंडळीच्या पुस्तकावर असतील पण ते ख्रिस्ताच्या नियमानुसार चालणारे नसतील. ते ख्रिस्ताचा सल्ला मानीत नाहीत व त्यानुसार कार्य करीत नाहीत. यामुळे ते सैतानाच्या ताब्यात असतील. त्यांच्या हातून कोणतेही चांगले कार्य होत नाही ; यामुळे ते भारी नुकसान करितात. कारण त्यांच्या जीवनाचा पगडा हा जीवनास तारणदायी जीवन नसून उलट ती मारक व मरणास कारणीभूत होतो.COLMar 228.3

    परमेश्वर म्हणतो, “याबद्दल मी नाही का समाचार घेणार ?‘‘ इस्त्राएल लोक हे परमेश्वराचा हेतू पूर्ण करणे यात पराभूत झाले म्हणून त्यांना अर्थात इस्त्राएल लोकांना बाजूला काढले आणि परमेश्वराने त्याच्या कार्यासाठी असलेले पाचारण इतरांकडे पाठविले आणि तेही जर पाचारणाविषयी अविश्वासू झाले तर त्यांनाही इस्त्राएल लोकांप्रमाणे नाकारले जाणार नाही काय ?COLMar 229.1

    द्राक्षमळयाचा दाखला यांतील माळ्यावर परमेश्वराने दोषारोप केला. त्या द्राक्षमळयाचे फळ त्या मालकास द्यावयाचे ते त्यांनी नाकारले. यहुदी राष्ट्रातील याजक व शास्त्री यांनी लोकांना खोटे मार्गदर्शन केले अशाप्रकारे त्यांनी परमेश्वराची सेवा करणे यात चोरी केली. त्यांनी ही सेवा करणे हा परमेश्वराचा हक्क होता.COLMar 229.2

    ख्रिस्ताने परमेश्वराचे नियमशास्त्र यांत मानवी चालीरितीचा समावेश न करिता आज्ञापालनाचे हा श्रेष्ठ दर्जा असे शिक्षण दिले. यामुळे शास्त्री यांनी येशूशी वैर धरिले. कारण शास्त्री यांनी परमेश्वराची आज्ञा यापेक्षा मानवी शिक्षण उंचावले, व मानवास परमेश्वराच्या आज्ञापासून दूर नेले. परमेश्वराची आज्ञा पाळणे यासाठी ते, मानवांनी जे नियम केले ते, सोडावयास ते तयार नव्हते. जे सत्यासाठी, त्यांचा अभिमान सारासार विचारांची मानवी स्तुति ही सोडावयास ते तयार नव्हते. जेव्हा ख्रिस्त आला आणि राष्ट्रांना परमेश्वराचे नियम सांगू लागला. तेव्हा शास्त्री लोकानी येशुला अडखळण केले आणि त्यांना व लोकांना स्पष्टिकरण करणे यात अडखळण केले. येशू त्यांना दोषारोप देवून इशारे देत होता. त्याचा ते स्वीकार करीत नव्हते. उलट लोकांना येशूविरूध्द बहकविले व येशूचा नाश कसा करावा हा बेत रचू लागले.COLMar 229.3

    त्यांनी ख्रिस्ताचा नकार केला. त्याचा परिणाम त्याविषयी ते जबाबदार होते. राष्ट्रांचा नाश व राष्ट्रांचे पाप याला कारण म्हणजे धार्मिक पढारी होते.COLMar 229.4

    आमच्या सध्याच्या काळातही अशाच प्रकारची कारणे व परिस्थिती नाही काय? सध्याही इस्त्राएलाचे पुढारी यांच्याप्रमाणे पुष्कळजण प्रभुच्या द्राक्षमळयात असेच कार्यकारी म्हणून वागत नाहीत काय ? परमेश्वराचे साधे वचन व सोपी शिकवण यापासून धार्मिक शिक्षक लोकांना बहकवीत नाहीत काय ? परमेश्वराचे नियम याचे आज्ञा पालन करणेस शिकविणे ऐवजी ते आज्ञाभंग करणेस शिकवित नाहीत काय ? पुष्कळ मंडळीतील उपासना व्यासपीठावरून असे शिक्षण दिले जाते की परमेश्वराच्या नियमाचे मानवी जीवनावर बंधन नाही. मानवी चालीरिती, विधी व परंपरा यांचे शिक्षण देवून उंचावले जातात. परमेश्वराची देणगी याचा गर्व व स्वाभिमान मनात बाळगणे पण परमेश्वराची जी मागणी व हक्क आहे त्याकडे दुर्लक्ष करणे.COLMar 229.5

    जेव्हा मानव परमेश्वराचे नियम बाजूला ठेवतात. तेव्हा ते काय करितात हे त्यांना समजत नाही. परमेश्वराचे नियम हे परमेश्वराचा स्वभावाचा लेखी उतारा आहे. त्या नियमात परमेश्वराच्या राज्याचे नियम तत्त्वे आहेत. जो कोणी हे नाकारतो तो जेथे परमेश्वराच्या आशीर्वादाचा प्रवाह वाहातो, त्यात न राहणे हे पत्करितो.COLMar 230.1

    इस्त्राएल लोकांपढे जे काही गौरवी व शक्य असे ठेविले त्याची शक्यता केवळ परमेश्वराची आज्ञा पाळणे त्याद्वारेच होणार होती. इस्त्राएल लोकांना जे काही दिले तेच शीलसंवर्धन, तोच आशीर्वादाचा समृध्दीसंग्रह म्हणजे आमचे मन व आत्मा यावर आशीर्वाद आमच्या सध्या जीवनावर व भावी जीवनावर आशीर्वाद येणे या सर्व आशीर्वादांची शक्यता आम्हांस प्राप्त होणे यासाठी आम्ही आज्ञापालन केले पाहिजे.COLMar 230.2

    नैसर्गिक जगात तसेच आत्मिक जीवनात व कार्यक्षेत्रात परमेश्वराच्या नियमाचे आज्ञापालन करणे या अटीवर फळे दिसून येतील. जेव्हा लोक, इतरांना शिक्षण देतील की परमेश्वराचे नियम आता बाजूला करा तेव्हा ते परमेश्वराच्या गौरवाची फळे यापासून लोकांना प्रतिबंध करितात. परमेश्वराच्या द्राक्षमळयात त्या वेलींनी फळे देऊ नयेत असे ते बंधनाचे कार्य करतील. COLMar 230.3

    परमेश्वराचे संदेशवाहक आमच्याकडे प्रभुच्या हुकूमावरून येतात. ख्रिस्त म्हणतो; परमेश्वराच्या वचनाचे आज्ञापालन करा आणि सुवार्तिक प्रभुचे सेवक हीच मागणी करितात. परमेश्वराचा हक्क त्याच्या द्राक्षमळयात वेलींनी फळे द्यावीत; ती फळे प्रिती, नम्रता व निस्वार्थीपणाची सेवा ही आहेत. या दाखल्यातील यहदी पुढारी द्राक्षमळयाचे कामदार रागाने भरले नव्हते काय ? वा नाहीत काय ? जेव्हा या लोकांवर परमेश्वराच्या आज्ञाविषयी मागणी ठेविली जाते त्यावेळी हे शिक्षक लोक, पुढारी लोक त्यांचा पगडा, वर्चस्वाने लोकांना परमेश्वराच्या आज्ञा नाकारणेस भाग पाडतात असे होत नाही काय? अशा शिक्षकांना परमेश्वर अविश्वासू चाकर असे पुकारतो.COLMar 230.4

    परमेश्वराच्या वचनाचा गंभीर इशारा प्राचीन इस्त्राएल व सध्याच्या काळातील मंडळी व तिचे शिक्षक यांनाही आहे. इस्त्राएल लोकांविषयी प्रभु म्हणाला, “मी त्यांच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखों आज्ञा लिहिल्या तरी त्याला त्या परक्याच वाटतात‘‘ होशेय ८:१२, आणि याजक व शास्त्री वा शिक्षक यांना त्याने लिहून इशारा दिला “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मी ही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात् मी याजकांचे काम तुला करू देणार नाही; तु आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मी ही तुझ्या मुलांस विसरेन.‘‘ होशेय ४:६.COLMar 230.5

    परमेश्वराच्या या शास्त्रवचनाचा आम्ही काहीच विचार करू नये काय ? आम्हास दिलेली सेवा आम्ही कर्तबगारीने करू नये काय ? जगाची निंदा, आम्ही ज्ञानी म्हणून आमची विचारसरणी, आमचे मानवी संस्कार अर्थात् चालीरिती व वंशपरंपरा यामुळे आम्ही प्रभु सेवकांनी सेवा करणे यांतून पराभूत वा पराभव असे व्हावे काय ? यहुदी पुढाऱ्यांनी असा ख्रिस्ताचा नकार केला तसा परमेश्वराच्या सेवकांनी परमेश्वराच्या वचनाचा नकार करावा काय ? त्या इस्त्राएल लोकांच्या पापाचा परिणाम आम्हांपुढे आहे. आजची मंडळी परमेश्वराचा इशारा याची दक्षता घेईल काय ? COLMar 231.1

    “आता जर काही फांद्या तोडून टाकल्या आणि तू रानजैतून असता त्याच्या जागी कलमरूपे लाविला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मूळाचा भागीदार झालास; तर फांद्यातून मी अधिक आहे अशी बढाई करू नको... अविश्वासामुळे त्या तोडून टाकिल्या आणि विश्वासने तुझी स्थिती अशी झाली; तर अहंकारी न होता प्रिती बाळग कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही. देवाची दया व तीव्रता पाहा; पतन झालेल्या विषयी तीव्रता आणि तुजविषयी देवाची दया; पण तू त्याच्या दयेत राहशील तर; नाही तर तूही छेदून टाकिला जाशील.’ रोम ११:१७-२२.COLMar 231.2