Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    नैतिक बळ वा वजन

    ख्रिस्ताचे जीवन फार विस्तृत असे होते, त्याच्या जीवनाचा प्रभाव सर्वत्र होता, परमेश्वर व मानव या दोन्ही कुटुंबाचा संबंध ख्रिस्ताने जोडला. परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे मानवावर जो पगडा पाडला त्यामुळे मानवास एकलकोंडे जीवन केव्हाच जगता येत नाही. व्यक्तिवाचक आम्ही आपल्यासह बांधवाशी संबंध येतो. शिवाय परमेश्वराचे हे जे महान कुटुंब त्याचा आपण एक भाग आहोत. त्यामुळे आम्हांस एकमेकांचे साहाय्य करणे हे कर्तव्य आहे. कोणी मनुष्य एकटा असा नाही. तर एकमेकांच्या जीवनाचा परस्परावर परिणाम होत असतो. प्रत्येकाने दुसऱ्याचे हित पाहावे व त्यांचे बरे करावे हा परमेश्वराचा हेतू आहे.COLMar 257.1

    प्रत्येक आत्म्याच्या सभोवर असे वातावरण आहे त्यात जीवनदायी विश्वासाचे सामर्थ्य, धैर्य व आशा व त्यात प्रितीच्या सुगंधाने भरले आहे. तसे नसेल तर थंड व जड असमाधानी अंधकारमय व स्वार्थी वा विषारी पापाचा डाग लागला जाईल. आमच्या या जीवनी वातावरणाने ज्या मनष्याशी आमचा संबंध येईल त्याचा परिणाम होतो ही जाणीव आपणास होवो न होवो.COLMar 257.2

    या जबाबदारीपासून आपण मुक्त होऊ शकत नाही. आमचा पोषाख, आमची कृती, आमचे शब्द, आमची वागणुक, आमची दृष्टी या सर्वांचा पगडा-प्रभाव पडतो. अशाप्रकारे आपण जो पगडा पाडतो त्याचा परिणाम चांगले वा वाईट यासाठी होतो याचे कोणी मोजमाप केले काय ! अशाप्रकारे मनाने घेतलेली एकेक उचल वा प्रवेश हे जणू काय पेरणी केली असे होवून त्याची निश्चयी कापणी होणार मानवी घडामोडीतील ही एक साखळी आहे, ती कोणावर असेल ते ठाऊक नाही. आम्ही एकाद्यास चांगली मदत केली व आमच्या उदाहरणाने हा चांगला कित्ता घातला, तर त्यांनीही मदत करावी असे सामर्थ्य आपण जागृत करितो. त्यानंतर ते लोक इतरांवर चागुलपणचा पगडा पाडतात, त्यानंतर दुसरे तिसऱ्यावर चांगुलपणाचा पगडा पाडतात. अशी एकमेकांस साहाय्य करणे या साखळीने हजारो लोकांचे हित वा आशीर्वाद याचा पगडा पाडीला जातो. COLMar 257.3

    तळयातील पाण्यात तुम्ही एक खडा टाकला तर लाटाच्या लहरी एकामागून एक अशा निर्माण होतात; त्या लाटांची संख्या जशी वाढत जाते त्या सोबत त्यांचा आकार वा वर्तुळे ही मोठी होतात, व तळे वा सरोवरांच्या कडेला जावून पोहचतात. अशाच प्रकारे आपले वर्चस्व वा पगडा वा वजन याविषयी आहे. आम्हाला कल्पना नाही. त्या पलीकडे आपला पगडा वा वर्चस्व ही लोकांना आशीर्वादयुक्त होतात.COLMar 257.4

    स्वभाव हा सामर्थ्य आहे, ते शांतपणे साक्ष देत असते. जेव्हा आम्ही ख्रिस्ताचे शील आमच्या जीवनात प्रगट करितो तेव्हा आम्ही जे आत्मे जिंकण्याचे काम असते त्यात सहभागी होतो. आमच्या जीवनात ख्रिस्ताचे शील प्रगट करणे केवळ याद्वारे आपण ख्रिस्ताचे बरोबर सहकारी होतो. आपल्या जीवनाचा पसारा व वर्तुळ जों जो मोठा तो तो आपण चांगुलपणाचा पसारा करितो. जेव्हा लोक परमेश्वराची सेवा करणेसाठी ख्रिस्ताचे अनुकरण करतील, नियमशास्त्रातील तत्त्वे त्यांच्या दररोजच्या जीवनात आणतील; जेव्हा त्यांच्या प्रत्येक कृतीवरून साक्ष दिली जाईल की ते संपूर्णपणे त्याचा देव परमेश्वर याजवर सर्वश्रेष्ठ प्रिती करतील व जशी स्वत:वर तशी त्यांच्या शेजाऱ्यावरही करितात, तेव्हा मंडळीला सामर्थ्य प्राप्त होऊन सर्वजग प्रकाशमय करणेस हालविले जाईल.COLMar 258.1

    पण हे ही कधी विसरू नये की वर्चस्व, वजन यांचा पगडा वाईटासाठीही पडतो. आपला स्वत:चा आत्मा गमावणे ही आयुष्यातील अत्यंत दुःखद घटना आहे; पण त्याहन दुःखद घटना म्हणजे दुसऱ्याच्या आत्म्याच्या नाशाला कारण होणे. आमच्या जीवनाचा पगडा वा वर्चस्व यामुळे एकाद्याच्या मरणाला कारण होणे हा विचार होणे अत्यंत दु:खद व गंभीर असा आहे, आणि असे होणे शक्य आहे. पुष्कळजण ख्रिस्ताबरोबर हंगामात गोळा करणे असा दाभिकपणा दाखवितात आणि खरे पाहता ते लोकांना ख्रिस्तापासून विभक्त करितात. यामुळे मंडळी फार कमकुवत झाली आहे. पुष्कळजण टीका करणे व दोष दाखविणे हे कार्य मनमोकळेपणाने करितात. असे करणेचे प्रकार चेहऱ्यावरील संशयी भाव दाखविणे, द्वेष, व असमाधान याद्वारे हे लोक सैतानाचे हत्यार होवून बसतात. ते काय करितात ते त्यांना समजणे पूर्वी सैतानाने त्यांच्या द्वारे त्याचा हेतू साध्य केलेला असतो. वाईटाची छाप पाडला गेला, सावली पडली गेली आणि सैतानाच्या बाणाला निशाणा मिळाला. अविश्वास, भरवसा नसणे, नास्तिकपणा यांनी त्यांना जखडून टाकले नाही तर त्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला असता ज्या लोकाना संशयवृत्तीकडे वळविणे व त्यांनी विनवणी व दोष सुधारणा याकडे पाठ फिरविली अशा लोकाविषयी सैतानाचे कामदार प्रसन्न आहेत. अशा लोकांबरोबर ते तुलना करितात व स्वस्तुति करितात की धार्मिक व गुणवंत आहेत. पण त्यांची ही करणी म्हणजे लगाम नसलेली जीभ व बंडखोर वृत्तीचे अंत:करण असे शील म्हणजे जीवनाश नाश आहे ही दुःखद परिस्थिती त्याना दिसत नाही. हे मोठे दुर्भाग्य आहे. त्यांच्या वर्तनाचा पगडा, वर्चस्व यामुळे लोक मोहाला बळी पडतात व पतन पावतात. COLMar 258.2

    निष्काळजीपणे भेदभाव, अनावर स्वार्थीपणा व छिचोरीपणा अशा प्रकारचे ख्रिस्ती लोकांचे वागणे यामुळे पुष्कळ आत्मे जीवनी मार्गावरून दुसरीकडे जात आहेत. पुष्कळजण असे आहेत की त्यांना परमेश्वराच्या न्यायासनापुढे उभे राहणेस भय वाटेल कारण त्यांनी त्याच्या जीवनाचा योग्य प्रकारे पगडा, वर्चस्व वा वजन पाडले नाही. COLMar 259.1

    परमेश्वराने आम्हाला हे जे वजन-स्वभाव-शील वर्चस्वी वा पगडा दान दिले आहे त्याचा आम्ही परमेश्वराच्या कृपेने योग्य तो उपयोग करणे. आमच्या ठायी चांगले असे काही नाही की त्यामुळे आपण त्याचा इतरावर पगडा पाडू शकतो. आम्हास परमेश्वराचे सामर्थ्य हवे हे जर हवे असेल तर प्रथम आम्हांस आमची दुर्बलता समजली पाहिजे. आमची गरज कोणती हे समजले पाहिजे. आपल्या जीवनातील दिवस, घटका वा क्षण यात काय घडेल हे आम्हास माहित नाही म्हणून आम्ही आमच्या दिवसातील कार्यक्रमाला सुरूवात करणेपूर्वी आपल्या स्वर्गीय पित्याला सर्वस्वी समर्पण करावे. परमेश्वर त्याचे देवदूत आमचे संरक्षक नेमितो, आणि आम्ही जर त्यांच्या संरक्षणाखाली राहिलो तर ज्या ज्या वेळी संकटे येतील त्या त्या वेळी देवदूत आमच्या मदतीला राहतील. जेव्हा आम्ही न जाणून चुकीचे वजन, पगडा पडेल अशी परिस्थितीत येऊ तेव्हा आम्हास देवदूत येवून साहाय्य करून चांगल्या मार्गाने नेतील, आम्हास योग्य शब्द बोलणेसाठी सुचना देतील व त्यामुळे आमच्या शीलाचा योग्य पगडा पडला जाईल. अशाप्रकारे आपल्या स्वभावाचा पगडा-वर्चस्व ही शांतपणे न समजता म्हणजे लोकांमध्ये गाजावाजा न करिता, इतराना ख्रिस्ताकडे व स्वर्गीय राज्याकडे महान सामर्थ्याने नेतील!COLMar 259.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents