Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १२ वा—देणे यासाठी मागणे

    लूक ११:१-१३ यावर आधारीत

    “मग असे झाले की तो एके ठिकाणी प्रार्थना करीत होता, आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, प्रभुजी, जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना करावयास शिकविले तसे आपणही आम्हास शिकवा. तो त्यांस म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा.(मत्तय ६:९-१३)COLMar 91.1

    “मग त्याने त्यांस म्हटले, तुम्हामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याजकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, गडया, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहन मजकडे आला आहे आणि त्याला वाढावयास मजजवळ काही नाही, आणि तो आतून उत्तर देईल, मला श्रम देऊ नको, आता दार लाविले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, माझ्याने उठून तुला देववत नाही. मी तुम्हांस सांगतो, तो त्याचा मित्र आहे यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे जे काही पाहिजे ते उठून त्याला देईल. मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडले जाईल, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधितो त्याला सापडते, जो कोणी ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाते, तुम्हांमध्ये असा कोण बाप आहे की त्याच्याजवळ त्याच्या मुलाने भाकर मागितली असता तो त्याला धोंडा देईल ? अगर मासा मागितला असता मासा न देता त्याला साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल ? तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलाला चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?‘‘लूक ११:५- १३.COLMar 91.2

    “खिस्त सतत परमेश्वराशी दळणवळण ठेवून सामर्थ्य प्राप्त करून घेत होता यासाठी की आम्हाशी सतत संपर्क साधता यावा. येशू म्हणाला जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे.‘‘ योहान १४:२४. “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास... आला‘‘ मत्तय २०:२८ जीवन जगणे, विचार करणे व प्रार्थना करणे हे येशूने स्वत:साठी नसून इतरांसाठी केले. येशू दररोज सकाळी प्रार्थनेत वेळ खर्च करून मानवास स्वर्गीय प्रकाश आणीत असे. प्रतिदिनी येशू पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेत असे. येशू प्रात:काळी उठून दररोज त्याचे ओठ व आत्मा यांचे समर्पण कृपेने करीत असे, यासाठी की इतरांना कृपा देता यावी. जे निराश्रित व दुःखीत असतील अशांना योग्य शब्द बोलता यावे म्हणून येशूला स्वर्गातून दररोज उत्साही शब्द मिळत असत. प्रभु म्हणाला, “शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभु परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे, तो रोज रोज सकाळी मला जागे करीतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडीतो.‘‘ यशया ५०:४.COLMar 91.3

    ख्रिस्ताचा परमेश्वराशी दळणवळणाचा संबंध व प्रार्थना यामुळे ख्रिस्ताचे शिष्य भारावून गेले होते. एके दिवशी येशू त्याच्यामध्ये नव्हता आणि शिष्यांना शोधित असताना असे दिसून आले की येशू प्रार्थना करीत असताना दिसला. येशूच्या जवळ शिष्य आहेत हे येशूला माहित नव्हते त्यावेळी येशू मोठयाने प्रार्थना करीत होता. ते शब्द ऐकून शिष्यांची अंत:करणे मंत्रमुग्ध झाली. येशूने प्रार्थना करणे थांबविले, त्यावेळी शिष्यांनी विनविले, “प्रभुजी, आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा‘‘.COLMar 92.1

    येशुने त्यांची विनंती ऐकून, डोंगरावरील प्रवचन यातील “प्रभुची प्रार्थना ही बोलून दाखविली आणि यापासून कोणता बोध घ्यावा यासाठी येशूने संबंधीत दाखला सांगितला.”COLMar 92.2

    येशू म्हणाला, “तुम्हामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याजकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, गडया, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहन मजकडे आला आहे, आणि त्याला वाढावयास मजजवळ काही नाही, आणि तो आतून उत्तर देईल, मला श्रम देऊ नको, आता दार लाविले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, माझ्याने उठून तुला देववत नाही. मी तुम्हांस सांगतो, तो त्याचा मित्र आहे यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे जे काही पाहिजे ते उठन त्याला देईल.”COLMar 92.3

    येथे ख्रिस्त मागणाऱ्याचा प्रतिनिधी आहे, जे कोणी पुन्हा पुन्हा आर्जव करीतात त्यांना दिले जाईल. भाकरी, ही ख्रिस्ताकडून संपादन केली पाहिजे तेव्हाच त्याला थकलेल्या, उशीरा व भटकलेल्या फार काळ भटकलेल्या जीवाला आधार देता येईल. जरी शेजारी त्रास घेणार नाही, पण येशू आपली विनंती ऐकून कधीच थाबणार नाही, येशू मित्राची काळजी घेईल, त्याची विनंती मान्य करून जे हवे ते देईल, COLMar 92.4

    शिष्यानी अशाच प्रकारे परमेश्वरापासून आशिर्वाद प्राप्त करून घ्यावयाचा होता. डोंगरावरील उपदेश व लोक समुदायास भोजन देणे याद्वारे ख्रिस्ताचे कार्य त्याच्या शिष्यांनी करावयाचे होते हे दाखविले. शिष्यांनी लोकांना जीवनी भाकर द्यावयाची होती. शिष्यांना हे काम दिले होते. त्यात त्यांची कितीदा तरी परीक्षा झाली. ते अचानक गंभीर परिस्थितीत येत व त्यावेळी त्यांची मानवी कमतरता दिसून येत असे. जीवनी भाकरीसाठी भुकेले लोक त्यांच्याकडे येत असत आणि शिष्य हताश व कंगाल असत. यासाठी त्यांनी आध्यात्मिक अन्न संपादन करावे नाहीतर लोकाना देण्यास त्यांच्याजवळ काहीच नसणार. शिष्यांनी एकाही आत्म्यास भुकेला असे पाठवावयाचे नव्हते. कारण ख्रिस्ताने त्यांना सर्व गोष्टींचा उगम दाखविला होता. ज्या मनुष्याचा मित्र मध्यरात्री अयोग्य वेळी आला होता तरीही त्याला रिकामे पाठविले नाही. स्वत:जवळ नव्हते तरी तो मित्राकडे गेला आणि मित्राकडून आणून गरज भागविली. ज्या परमेश्वराने त्याच्या सेवकांना पाठविले की, त्यांनी जावून भुकेले असतील त्यांची तृप्ती करावी परमेश्वर खात्रीने सर्व काही पुरवठा करील!COLMar 93.1

    या दाखल्यातील स्वार्थी शेजारी हा परमेश्वराच्या शीलाचा प्रतिनिधी होवू शकत नाही. यामध्ये घ्यावयाचा धडा साम्य याद्वारे नव्हे तर फरक याद्वारे घेणे. स्वार्थी मनुष्य त्या मित्राची गरज भागवितो त्याचे कारण म्हणजे त्या मित्राने त्याच्या झोपेत त्याला त्रास देवू नये. पण परमेश्वर आपली गरज आनंदाने भागवितो. परमेश्वर फार कृपाळू आहे आणि जे कोणी त्याजकडे विश्वासाने प्रार्थनेद्वारे मागतात अशांच्या गरजा परमेश्वर मान्य करीतो. परमेश्वर आम्हास अशासाठी देतो की आम्ही इतरांची सेवा करावी आणि आमचा स्वभाव परमेश्वरासारखा व्हावा.COLMar 93.2

    ख्रिस्त सांगतो, “मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्यास उघडले जाईल‘‘ मत्तय ७-७,८:COLMar 93.3

    तारणारा येशू पुढे म्हणाला, “आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे ? यास्तव तुम्ही वाईट असता आपल्या मुलांस चांगल्या देणग्या देण्याचे समजता, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल.?‘‘ मत्तय ७:९-११.COLMar 93.4

    परमेश्वरावरील आपला विश्वास बळकट व्हावा यासाठी आम्ही ख्रिस्ताला नवीन नावाने हाक मारणे आणि ते नाव द्विअर्थी असे आहे आणि ते मानवी अंत:करणाला हदयस्पर्शी असे संबंधीत असणार. एकमेव परमेश्वराला आम्ही पिता या नामाने हाक मारणे ही संधी देतो. हे नाम व या नामाने आम्ही हाक मारणे ही प्रितीची संधी आहे, याद्वारे विश्वास दर्शविला जातो, परमेश्वराचे राज्य हा सन्मान व आम्हांशी कोणते नाते आहे हे प्रकट केले जाते. जेव्हा आम्ही पिता या नावाचा उच्चार करीतो व त्याद्वारे आम्हांस आशिर्वाद वा मेहरबानी मागतो तेव्हा पित्याला जणु काय मधुर गाणे ऐकतो असे वाटत असते. आम्ही पिता या नावाने हाक मारतो ही कल्पना नव्हे, त्याने आम्हास सांगितले की आम्ही पिता या नामाशी परिचय करून घ्यावा.COLMar 93.5

    परमेश्वर आम्हास त्याची लेकरे असे मानतो. या निष्काळजी जगातून त्याने आम्हांस निवडून राजकीय कुटुंबाचे सभासद असे केले आहे. स्वर्गीय राज्याचे पुत्र व कन्या! आमचा जगिक पिता याजवरील विश्वासापेक्षा आम्ही आमचा विश्वास स्वर्गीय पिता यावर अधिक भक्कम व खोलवर ठेवावा. आईबाप त्यांच्या लेकरांवर प्रिती करीतात पण परमेश्वराची आम्हावरील प्रिती ही, मानवी प्रितीच्या खोल, विस्तृत, महान अशी आहे. ती प्रिती अमाप आहे. जर जगिक आई-बापास समजते की त्यांच्या लेकरांस चांगली देणगी द्यावी तर मग आमचा स्वर्गीय पिता जे त्याजकडे मागणी करतील त्याना पवित्र आत्मा किती विशेष करून देईल?COLMar 94.1

    प्रार्थनेच्या बाबत येशू आम्हांस जे धडे देवू इच्छितो त्याचा आपण काळजीपूर्वक विचार करावा. प्रार्थना करणे यात ईश्वरी विज्ञानशास्त्र आहे व यातील सर्व सिध्दांत आम्हांस पूर्णपणे समजले पाहिजेत. प्रार्थनेबाबत आत्म्याचा खरापणा कोणता हे ही दाखविले जाते. परमेश्वरापाशी आपली विनवणी एकसारखी सांगत राहणे, याद्वारे परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो व उत्तर देऊ इच्छितो याची तो खात्री देतो.COLMar 94.2

    आमच्या प्रार्थनेत स्वार्थी मागणे व केवळ स्वत:साठी असे काही नसावे. आम्ही असे मागावे की त्याद्वारे आम्हांस देता यावे. ख्रिस्ताच्या जीवनाचे जे तत्त्व तेच आमच्या जीवनाचे तत्त्व असावे. येशू त्याच्या शिष्याबाबत म्हणाला, “मी त्यांच्यासाठी स्वत:ला समर्पित करीतो‘‘ योहान १७: १९ परमेश्वराचे वचन याद्वारे तेच समर्पण, तेच स्वार्पण व तेच शरण जाणे, आणि ख्रिस्ताने हा कित्ता घालून दाखविले, तेच त्याच्या प्रत्येक शिष्यात दिसले पाहिजे. आपले प्रथम कर्तव्य स्वत:ची गरज हे नव्हे, तर आम्ही परमेश्वराचे गौरव व त्याची सेवा करणे म्हणजे पापी लोकांच्या तारण कार्यात सहकार्य करणे. आम्ही इतरांशी दळणवळण ठेवावे, म्हणून यासाठी परमेश्वरापासून आशिर्वाद मागणे ज्या प्रमाणात आम्ही देत राहू त्या प्रमाणात आम्हास आशिर्वाद प्राप्त होईल. आम्ही इतरांना जर देत नाही तर आम्हास स्वर्गीय संपत्ति केव्हाही प्राप्त होणार नाही.COLMar 94.3

    दाखल्यात विनंती करणारा गृहस्थ एक सारखा मागणी करीत राहीला, त्याने त्याचा हेतू सोडला नाही. कधी कधी अशा प्रकारे आपल्या प्रार्थनेचे उत्तर ताबडतोब मिळत नाही, म्हणून ख्रिस्त आम्हास धडा शिकवू इच्छितो की आम्ही निरंतर प्रार्थना करावी. प्रार्थनेने परमेश्वरामध्ये काही फरक होत नाही, तर प्रार्थना ही आम्हांस परमेश्वराशी सुसंगत करीते. जेव्हा आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करीतो तेव्हा आम्ही आमचे अंत:करण पडताळून पाहाणे व पापाबद्दल पश्चात्ताप करण्याची गरज आहे. यासाठी परमेश्वर आम्हास संकटे व त्रास यातून नेत असतो, तो त्यामुळे आम्हास नम्र करीतो, यामुळे पवित्र आत्म्याला कार्य करण्यास कशाचे अडखळण आहे हे दिसून येते.COLMar 95.1

    परमेश्वराला त्याचे अभिवचन पूर्ण करणे यासाठी काही अटी आहेत, प्रार्थना ही, आपल्या कर्तव्याची जागा घेऊ शकत नाही. ख्रिस्त म्हणतो, “मजवर तुमची प्रिती असली तर माझ्या आज्ञा पाळाल‘‘ ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच मजवर प्रिती करणारा आहे, आणि जो मजवर प्रिती करीतो त्याजवर माझा पिता प्रिती करील, मी ही त्याजवर प्रिती करीन व स्वत: त्याला प्रगट होईन’ योहान १४:१५, २१ जे कोणी परमेश्वराची प्रार्थना करीतात व त्याच्या अभिवचनाची अपेक्षा करीतात त्याचवेळी परमेश्वराच्या ज्या अटी वा आज्ञा मानीत नाहीत असे लोक यहोवाचा अपमान करीतात. प्रार्थनेसाठी ख्रिस्ताचे अभिवचन अधिकार वाणीने सांगतात पण ज्या कृत्तीने ख्रिस्ताची प्रिती व विश्वास प्रकट होईल त्या गोष्टी ते करीत नाहीत.COLMar 95.2

    परमेश्वराने आपला स्विकार करावा या अटीचा काहीजण त्यांच्या अपराधामुळे प्रसंग गमावतात. परमेश्वराच्या सानिध्यांत जाण्याचा जी विश्वासाची कार्य संधी आहे याबाबत आपण बारकाईने परीक्षण करावे. आम्ही जर आज्ञाभंजक असू तर आम्ही असा चेक अर्थात् धनादेश प्रभुकडे आणीत आहोत की त्यावरील अटी आपण पूर्ण करीत नाहीत आणि त्यापासून आपणांस पैसे मिळणार नाहीत. आम्ही परमेश्वरापुढे त्याची अभिवचने सादर करीतो व परमेश्वराला म्हणतो की या वचनांची पूर्तता करावी, असे करणे म्हणजे आम्ही परमेश्वराच्या नामाचा अपमान करीतो.COLMar 95.3

    अभिवचन ते हे “तुम्ही मजमध्ये राहीला व माझी वचने तुम्हांमध्ये राहीली तर जे काही तुम्हांस पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांस प्राप्त होईल‘‘ योहान १५: ७ आणि योहान म्हणतो, “आपण त्याच्या आज्ञा पाळिल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते. मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याचे वचन पाळीतो त्याच्यामध्ये देवाची प्रिती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी आहो‘‘ १ योहान २:३-५.COLMar 95.4

    ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना एक शेवटची आज्ञा दिली, “जशी मी तुम्हांवर प्रिती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रिती करावी’ योहान १३:३४. आम्ही ही आज्ञा पाळीतो काय किंवा ख्रिस्त शील, कठोर नसलेले शील जीवन जगतो काय? जर आम्ही कोणाला दु:खविले असेल किंवा दोष दिला असेल तर आपले कर्तव्य हे आहे की आपण आपला दोष कबल करणे व समेट करणे. आम्ही विश्वासाने परमेश्वरापुढे येणे व त्याजपासून आशिर्वाद मागणे यासाठी वरील प्रमाणे तयारी करावी लागते.COLMar 96.1

    जे प्रभुकडे प्रार्थना करावयास येतात त्याच्यामध्ये अजून एक चूक आहे. तुम्ही परमेश्वराशी प्रामाणिक आहात काय ? मलाखी संदेष्टा याच्याद्वारे परमेश्वर सांगतो, “तुमच्या पुर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळीले नाहीत. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हांकडे वळेन, अस सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकवील काय ? तुम्ही तर मला ठकविले आहे, असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे ? दशमांश व अर्पणे या संबंधाने.’ मलाखी ३ : ७,८.COLMar 96.2

    परमेश्वर सर्व आशिर्वादाचा दाता आहे म्हणून आम्हास जे काही प्राप्त होते. त्याचा काही भाग परमेश्वराच्या मालकी हक्काचा आहे. या ठराविक भागाचा उपयोग सुवार्ता कार्यासाठी केला जातो. आम्ही हा ठराविक भाग परमेश्वराला परत देतो याद्वारे त्याने जे काही आम्हाला दिले त्याबाबत आम्ही आमचे आभार प्रदर्शन करीतो. पण जर आम्ही परमेश्वराच्या मालकीचा हक्क स्वत:ला राखून ठेवितो तर आपण त्याच्या सर्व देणग्याबाबत आभार प्रदर्शन कसे काय दाखवू शकतो? जर आम्ही या पृथ्वीवरील धनाबाबत अविश्वासू कारभारी दाखवितो, तर मग प्रभु, आम्हांस स्वर्गीय गोष्टीबाबत कसा काय विश्वासू कारभारी समजेल ? कदाचित आपल्या गुप्त प्रार्थनेचे उत्तर यांतच असावे !COLMar 96.3

    परंतु प्रेमळ परमेश्वर आमची क्षमा करणेस राजी आहे आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशिर्वाद तुम्हांकरीता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पाहा. “तुमच्या भूमीच्या पिकांची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हांसाठी धमकावीन, तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हांला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमि मनोरम होईल, असे सेनाधिश परमेश्वर म्हणतो‘‘ मलाखी ३: १०-१२.COLMar 96.4

    परमेश्वराच्या ज्या सर्व आज्ञा आहेत त्याबाबत असेच आहे. परमेश्वराच्या सर्व देणग्याचे अभिवचन आज्ञापालन या अटीवर अवलंबून आहे. जे कोणी परमेश्वराशी सहकार्य देतील त्या सर्वांसाठी स्वर्गातील सर्व आशिर्वाद उपलब्ध आहेत. जे कोणी विश्वासूपणे परमेश्वराची आज्ञा मान्य करून पालन करतील त्यांना अभिवचनाप्रमाणे आशिर्वाद दिले जातील.COLMar 97.1

    आम्ही आपला भक्कम व एकनिष्ठ विश्वास परमेश्वरावर ठेविला पाहिजे. आपल्या विश्वासाची परीक्षा पाहाणे व आपली मागणी किती जिज्ञास आहे हे पाहावे यासाठी परमेश्वर आपल्या प्रार्थनेचे उत्तर उशीरा देतो. आम्ही जेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मागतो तेव्हा आम्ही परमेश्वराच्या अभिवचनाप्रमाणे मागावे. मागणी निश्चयपूर्वक असावी, म्हणजे त्यात दिरंगाई होणार नाही.COLMar 97.2

    परमेश्वर असे कधी म्हणत नाही की, तुम्ही एकदा मागा आणि तुम्हांस मिळेल. परमेश्वर आम्हास सांगतो मागत राहा. निराश न होता मागत राहा अर्थात प्रार्थना करा. एकसारखे मागत राहाणे यामुळे आमची गरज दिसून येते व आपल्या प्रार्थनेची खरी गरज दिसून येते. लाजारसाच्या कबरेजवळ येशू ख्रिस्त मार्थास म्हणाला, “तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील.”योहान ११: ४०.COLMar 97.3

    पण पुष्कळांचा जीवंत विश्वास नाही. यामुळे त्याना परमेश्वराचे गौरव दिसून येत नाही. त्यांच्या अविश्वासाचा परिणाम हा त्यांचा अशक्तपणा वा कमकुवतपणा होय. परमेश्वराच्या कार्यापेक्षा त्यांच्या कार्यावर त्यांचा जादा विश्वास आहे. ते स्वत:कडेच पाहात राहतात. ते योजना करीतात, युक्ति करीतात पण कमी प्रार्थना करीतात व परमेश्वरावर थोडासा विश्वास ठेवीतात. त्यांना वाटते ते विश्वास ठेवितात पण ते भावनाप्रधान असतात. परमेश्वर त्यांना देऊ इच्छितो यात किंवा त्याची गरज त्यांना समजत नाही. यामुळे ते परमेश्वरापुढे चिकाटीने प्रार्थना करीत नाहीत.COLMar 97.4

    त्या मित्राने मध्यरात्री भाकरीची कळकळीने मागणी केली तशी आम्ही आमची प्रार्थना कळकळीने व एकनिष्ठेने करावी. आम्ही कळकळीने व सतत प्रार्थना करावी. यामुळे आम्ही ख्रिस्ताच्या जीवनाशी अधिक एकजीव होत जाऊ. आमचा विश्वास वाढत जाईल त्यामुळे आम्हास अधिक आशिर्वाद प्राप्त होईल.COLMar 97.5

    आमचा भाग म्हणजे आम्ही प्रार्थना करणे व विश्वास ठेवणे. प्रार्थना करा व जागृत राहा. जागृत राहा, विश्वास ठेवा, प्रार्थना ऐकणारात परमेश्वर याजबरोबर सहकार्य करा आणि हे लक्षात ठेवा, “कारण आम्ही देवाचे सहकारी आहो’ १ करिथ ३:९. तुमच्या प्रार्थनाशी समरूप होतील असे बोला व वागा. तुमच्या जीवनातील सकटे व त्रास यावरून समजून येईल की तुमचा विश्वास हा खरोखर आहे किंवा तुमच्या प्रार्थना केवळ एक शिष्टाचार आहे.COLMar 97.6

    जेव्हा जीवनात काळजीचे प्रसंग येतात, अडचणी घेराव घालतात, तेव्हा मानवी मदतीची अपेक्षा करू नका. तर सर्वस्वी परमेश्वरावर विश्वास ठेवा. आम्ही जेव्हा आमच्या अडचणी इतरांना सांगतो तेव्हा आम्ही आमचा सशक्तपणा दाखवितो, आणि अशाप्रकारे आम्हास सामर्थ्य प्राप्त होत नाही. तुमच्या आध्यात्मिकपणाचे ओझे त्यांच्यावर पडले जाते आणि त्याबाबत ते काहीही करू शकत नाहीत, जे चकणारे मानव, मर्यादित मानव अशाकडे आपण मागणी करीतो खरे पाहाता जो अमर्यादित व सर्वसमर्थ परमेश्वर याजकडे आपण आपली मागणी करावी.COLMar 98.1

    ज्ञानी परमेश्वर तुमच्याजवळ असताना तुम्हास पृथ्वीच्या टोकास जाणेची काहीच गरज नाही, तर तुम्ही जेथे आहा तेथून मागा म्हणजे मिळेल. तुमच्या कला व कर्तबगारी याद्वारे विजय प्राप्त होणार नाही. तर परमेश्वर तुम्हासाठी जे काही करीतो त्याद्वारे आशिर्वाद व यश प्राप्त होते. मानव काय करीतो यावर कमी विश्वास ठेवणे. यापेक्षा प्रत्येक विश्वासणाऱ्याने परमेश्वरावर अधिक विश्वास ठेवावा. आम्ही विश्वासाने परमेश्वराकडे यावे अशी त्याची आतुरता आहे. ऐहिक व आध्यात्मिक ज्ञानाची तुम्हांस देणगी देण्यास परमेश्वर आतुर आहे आणि या सर्व गोष्टी परमेश्वरापासून तुम्हांस प्राप्त होऊन तुम्ही आशिर्वादीत व्हावे अशीही त्याची आतुरता आहे. परमेश्वर तुमची बुध्दी चाणाक्ष करीतो. तो तुम्हास युक्ती व कौशल्य देऊ शकतो. तुमचे कौशल्य, बुध्दी ही सर्व परमेश्वराच्या कार्यास लावा, ज्ञानाची मागणी परमेश्वराकडे करा आणि परमेश्वर तुम्हाला ज्ञानाचा पुरवठा करील.COLMar 98.2

    ख्रिस्ताच्या शब्दावर भरवसा ठेवा. ख्रिस्ताने तुम्हास पाचारण केले नाही काय ? केव्हाही निराशेचे व आशाहीन शब्दांचा उच्चार करू नका. जर तुम्ही असे बोलत राहाल तर तुमचा फार पराभव होईल. जेव्हा तुम्हावर संकटे व त्रास येतील तेव्हा तुम्ही नाराजी व विश्वासाचा कमकुवतपणा दाखवू नका. तुमचा अदृश्य विश्वास तुमचे बोलणे व कृत्ती याद्वारे प्रकट करा. परमेश्वराची संपत्ति अलोट आहे, परमेश्वर अखिल विश्वाचा जगाचा मालक आहे. आपली विश्वासरूपी दृष्टी स्वर्गाकडे लावा. परमेश्वर हा प्रकाश, सामर्थ्य व सर्व कर्तबगार आहे त्याजकडे पाहात राहा.COLMar 98.3

    आपला खरा विश्वास हा उल्हासी, खंबीर तत्त्वाचा असतो, आणि त्याचा खबीरपणा हा वेळ, काळ व परिस्थिती यामुळे बदलत नाही. “तरूण थकतात, भागतात, भरज्वानीतले ठेचा खातात, तरी ते परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करतील, ते गरूडांप्रमाणे पखानी वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत‘‘ यशया ४०:३०,३१.COLMar 98.4

    पुष्कळांना वाटते की त्यांनी इतरांना मदत करावी पण त्यांना आध्यात्मिक शक्ति नाही किंवा इतरांना देणेस सत्याचा प्रकाश नाही. अशा व्यक्तिनी त्यांच्या या परिस्थितीविषयी परमेश्वराकडे प्रार्थना करावी. पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करावी. परमेश्वर जे काही अभिवचन देतो ते पूर्ण करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. पवित्रशास्त्र तुम्ही हाती घ्या आणि म्हणा, हे प्रभो, तुझ्या सांगणेप्रमाणे मला जे काही करीता आले ते मी केले आणि आता मी तुझे अभिवचन तुजपुढे ठेवितो, “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडले जाईल, मत्तय ७: ७.COLMar 99.1

    आम्ही केवळ ख्रिस्ताच्या नामाने प्रार्थना करू नये तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करावी. याचे स्पष्टीकरण म्हणजे असे, “तसेच पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणांत आपल्याला हातभार लावितो, प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा कण्हण्याने स्वत: अनिर्वाच्य आपल्यासाठी विनती करीतो,‘‘ रोम ८:२६ अशा प्रार्थना ऐकणे यात परमेश्वराला हर्ष वाटतो. जेव्हा आम्ही अगदी कळकळीने व आग्रहाने व ख्रिस्ताच्या नामाने प्रार्थना करीतो तेव्हा त्या प्रत्येक प्रार्थनेबाबत परमेश्वरांचे ध्येय असे असते की त्या प्रार्थनेचे उत्तर येणेप्रमाणे. “आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे’ इफिस ३:२०.COLMar 99.2

    ख्रिस्त म्हणाला आहे, “यास्तव मी तुम्हास सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल‘‘ मार्क ११:२४. “तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल ते मी करीन, यासाठी की पत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे”योहान १४:१३ आवडता योहान पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने अगदी साधी सोपी भाषा वापरून अभिवचन सांगतो‘‘ त्याविषयी आपल्याला जो भरवसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल, आपण मागतो त्याविषयी तो आपले ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ मागितल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हे ही आपल्याला ठाऊक आहे‘‘ १ योहान ५:१४, १५ म्हणून तुमची मागणी येशूच्या नामाने पित्याकडे आर्जव करीत राहा. परमेश्वर येशूच्या नामाचा सन्मान करील. COLMar 99.3

    परमेश्वराच्या सिंहासनासभोवार जो धनुष्य आहे त्याचा साक्षात्कार परमेश्वर खरा आहे, परमेश्वर हा बदलणारा नाही, तो एकदा दिलेले अभिवचन त्या पासून माघार घेत नाही. आम्ही पाप केले आहे आणि आम्ही परमेश्वराच्या कृपेस लायक नाही, तरीपण स्वत: परमेश्वराने आमच्या मुखात हे अद्भुत शब्द घातले आहेत “तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नको, आम्हाशी केलेला करार स्मर, तो मोडू नको.’ यिर्मया १४:२१ जेव्हा आम्ही परमेश्वराकडे येऊन आपली पापे व आमची दुष्टता कबुल करीतो, तेव्हा परमेश्वर आपली वाणी ऐकतो. परमेश्वराने दिलेले वचन पाळणे हाच त्याच्या सिंहासनाचा सन्मान आहे. COLMar 99.4

    अहरोन प्रमुख याजक असताना उरस्त्राणांवर बार। वंशाची नावे घालून पवित्र स्थानांत जात असे तद्वत् ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्या सर्व लोकांची नावे त्यांच्या अंत:करणावर घेऊन पवित्र स्थानात आहे. आपला प्रमुख याजक याने आम्हास जी जी उत्तेजक अभिवचने दिली आहेत ती ती सर्व त्याच्या स्मरणात आहेत आणि आपल्या प्रार्थना समयी त्यांची तो पुर्तता करील. या अभिवचानाची पुर्तता करणे हेच त्याच्या सिंहासनाचे गौरव व भूषण आहे.COLMar 100.1

    जे कोणी त्याचा शोध करीतात त्यांना ख्रिस्त सापडेल. जे कोणी त्याच्या दारावर ठोठावतील त्यांना तो दार उघडील. मला आता त्रास देऊ नका, आता दार बंद आहे, मी ते उघडू इच्छित नाही अशा प्रकारची निमित्ते कधीही सांगितली जागणार नाही. मी तुला मदत करू शकत नाही असे येशू कोणालाही म्हणणार नाही. भुकेलेल्या लोकांसाठी जे कोणी येशूकडे मध्यरात्री हाक मारतील व भाकरी मागतील त्यांना दार उघडून भाकरी दिली जाईल.COLMar 100.2

    या दाखल्यात, जो कोणी परकीय गृहस्थासाठी भाकरीची मागणी करीतो त्याला “जेवढे पाहिजे तेवढे देण्यात येईल‘‘ असे जर आहे तर मग आम्ही इतराना द्यावे यासाठी परमेश्वर कोणत्या मापाने व किती देईल याचा काय हिशोब आहे का ? “... आपल्या प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपा दिली आहे‘‘ इफिस ४:७ आम्ही मानव इतर मानवाशी कसे वागतो हे देवदूत अगदी निक्षून पाहात आहेत. जेव्हा एकादा मनुष्य चुकतो आणि दुसरा मनुष्य ख्रिस्ताप्रमाणे सहानुभूतीने बोलतो तेव्हा तो देवदूत बोलणारा इसम याच्याशी नजीक येऊन त्या मनुष्याला जीवनी भाकर असे शब्द सुचवितो. अशाप्रकारे “माझा देव (परमेश्वर) आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशुमध्ये गौरवाने पुरवतील, फिलिप्पै ४:१९ तुमची कळकळीची व खरी साक्ष परमेश्वर सामर्थ्यवान करील व येणाऱ्या जीवनांतही सामर्थ्य पुरवील. तुमच्या मुखातील शब्द सत्य व धार्मिकतेचे असे असतील.COLMar 100.3

    आम्ही जेव्हा इतरांसाठी काम करावयास जातो त्यापुर्वी गुप्त प्रार्थना व्हावी, कारण आत्म्याचे तारण हे विज्ञान अगोदर समजले पाहिजे. इतराबरोबर दळणवळण करणे या अगोदर तुम्ही परमेश्वराशी दळणवळण करा. स्वर्गीय कृपेच्या सिंहासनापासून लोकांची सेवा कशी करावयाची हे समजून घ्या व कृपा प्राप्त करून घ्या.COLMar 100.4

    तुमच्या अंत:करणात जीवंत परमेश्वरासाठी कळकळ व आतुरता ही लागू द्या. ख्रिस्ताने मानवी देहात येऊन देवाच्या सामर्थ्याने सेवा करीता येते हे दाखवून दिले. परमेश्वरापासून ख्रिस्ताला जे काही मिळाले ते आम्हालाही मिळू शकते. यासाठी मागा म्हणजे मिळेल, याकोबाप्रमाणे चिकाटीने प्रार्थना करा, एलीयाप्रमाणे थकून न जाता परमेश्वराची आराधना करणे, परमेश्वराने जी काही वचने दिली आहेत त्या सर्वाप्रमाणे मागणी करीत राहा. COLMar 101.1

    परमेश्वराचा गौरवी हेतू तुमच्या जीवनात राहो. तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये व ख्रिस्ताच्या जीवनाशी संबंधीत होऊ देणे. ज्या परमेश्वराने आज्ञा केली व अंधारातून प्रकाश निर्माण झाला तो परमेश्वर तुमच्या अंत:करणात प्रकाश पाडावयास समर्थ आहे, यासोबत ख्रिस्त येशूच्या ज्ञानाचा गौरवी प्रकाश तुमच्या जीवनात तो देऊ शकतो. पवित्र आत्मा, परमेश्वराच्या गोष्टी घेईल आणि जे आज्ञाधारक आहेत अशाना जीवनी सामर्थ्य असे करील. परमेश्वराच्या सान्निध्यांत ख्रिस्त तुम्हांस नेईल. त्या पडद्या पलिकडील गौरव तुम्हास दिसेल, आणि येशू किती सर्वसमर्थ आहे हे दाखवून देईल, आणि येशू आपल्यासाठी सतत मध्यस्थीचे कार्य करील असा संबंध तुम्ही जोडून देऊ शकता !COLMar 101.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents