Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ४ था—निदण (तण)

    मत्तय १३:२४-३०, ३७-४३ यावर आधारीत

    “त्याने (येशू) त्यांस दुसरा दाखला दिला की ज्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्यासारीखे स्वर्गाचे राज्य आहे, लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण (तण) पेरून गेला, पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतात चागले बी पेरीले ना ? मग त्यात निदण कोठून आले ? तो त्यांस म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निदण जमा करीताना त्याबरोबर कदाचित गहही उपटाल. कापणीपर्यत दोन्ही बरोबर वाद द्या, मग कापणीच्या वळस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढया बांधा आणि गह माझ्या कोठारात साठवा”मत्तय १३:२४-३०.COLMar 41.1

    ख्रिस्त म्हणाला “शेत हे जग आहे”पण याचा अर्थ लाक्षणिक अर्थाने ख्रिस्ताची मंडळी या जगत असणे हा दाखला स्वर्गीय राज्याचे वर्णन असा आहे, त्याचे कार्य म्हणजे मानवाचे तारण करणे, आणि ते कार्य मंडळीच्याद्वारे करणे होय. हे खरे आहे की, पवित्रआत्मा सर्व जगभर पाठविला गेला, पवित्रआत्मा सर्वत्र जावून मानवांच्या अंत:करणावर कार्य करीत आहे, परंतु आम्ही मंडळीमध्ये राहून, वाढून व फलदायी होवून मग कापणीसाठी तयार होणे.COLMar 41.2

    “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र (येशू) आहे... चांगले बी हे राज्याचे पुत्र ओहत, परंतु निदण हे त्या दृष्टाचे पुत्र आहेत.‘‘ (मत्तय १३:३८) चांगले बी हे म्हणजे परमेश्वराचे सत्य वचन यापासून जन्म पावले आहेत ते आहेत. निदन याचे दर्शक म्हणजे जे कोणी खोटी तत्त्वे व चुका यापासून झालेले आहेत. ते ‘ते पेरणारा वैरी हा सैतान आहे’ (मत्तय १३:३९) परमेश्वर व त्याचे देवदूत यांनी कोणीही निदणाची पेरणी केली नाही’ निदणाची पेरणी करणारा सैतान हा, परमेश्वर व मानव यांचा शत्रु आहे.COLMar 41.3

    पुर्वेकडील देशात लोक शत्रुवर द्वेष यामुळे शत्रुच्या नुकतेच पेरलेले शेतात जाऊन त्यात निदण फेकूण देतात, हे निदण प्रथमत: गव्हाच्या पीकाप्रमाणे दिसते. निदण जसे जसे वाढत जाते तसे तसे ते मुळ पिकाला त्रासदायक होते व पुढे पीक कमी येते. अशाच प्रकारे ख्रिस्ताचा शत्रु सैतान त्याचे दुष्ट दास, स्वर्गीय राज्याचे जे चांगले पुत्र यांच्यामध्ये पाठवून देतो. सैतान, बी पेरतो व त्याचा परिणाम वा संबंध परमेश्वराचा पुत्र यांच्याशी जोडतो. मंडळीमध्ये ख्रिस्ताचे नाव पत्करणारे लोकांना आणणे पण तेच लोक ख्रिस्ताच्या शीलाचा नकार करीतात, दुष्टांना मडळीत आणणे आणि असे लोक परमेश्वराच्या नामाला काळीमा लावतील, तारणाच्या कामाचे ते योग्य प्रतिनिधीत्व करणार नाहीत आणि अशा प्रकारे इतर आत्मे धोक्यात आणले जातात.COLMar 42.1

    जेव्हा मंडळीत विश्वासक खरे सभासद व खोटे सभासद एकत्र राहतात हे पाहून ख्रिस्ताच्या सेवकांना दुःख होते. मंडळीतील अशा परिस्थितीचे शुध्दीकरणासाठी काही तरी करावे असे त्याना वाटते आणि त्या शेताच्या चाकराप्रमाणे ते निदण उपटणेची तयारी दर्शवितात. पण ख्रिस्त त्यांना म्हणतो, नाही, तुम्ही निदण जमा करीताना त्याबरोबर कदाचित् गहूही उपटाल’ कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या‘. (मत्तय १३:२९,३०).COLMar 42.2

    जे कोणी उघडपणे पाप करीतात अशाना मंडळीतून बाहेर काढावे याविषयी ख्रिस्ताने स्पष्ट शिक्षण दिले आहे, पण ख्रिस्ताने आम्हांस त्यांचा न्याय करणे हे काम दिले नाही, त्यांचे शील व हेतू यांचाही न्याय करू नये. आमचा स्वभाव येशूला माहित आहे म्हणून त्याने आम्हास हे कार्य करावयास दिले नाही. जे कोणी बनावट ख्रिस्ती आहेत अशांना आपण मंडळीतून बहिष्कृत करणेचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच चूक करू. ज्या लोकांना आपण नालायक समजू अशाच लोकांना ख्रिस्त त्याच्या सान्निध्यात घेतो. मग आम्ही आमच्या अपूर्ण न्यायातून अशा लोकाचा न्याय करणे म्हणजे त्यांच्या ठायी असलेली अखेरची आशा आपण विझवितो असे होईल. पुष्कळजण स्वतः ख्रिस्ती आहोत असे म्हणत असतील आणि असेच कदाचित उणे भरतील. पुष्कळजण स्वर्गात असतील आणि यांच्याबाबत शेजारी म्हणत असावेत की ते स्वर्गात कधीही जाणार नाहीत. पुष्कळजण बलात्कारी गोष्टीवरून न्याय करीतात पण परमेश्वर हा, अंत:करणे पाहून न्याय करीतो. निदण व गह ही कापणीच्या वेळेपर्यत एकत्र वाढू दिली पाहिजेत आणि कापणी म्हणजे कृपेच्या काळाचा शेवट आहे.COLMar 42.3

    तारणारा येशू याचा सल्ला यामध्ये आणखी एक बोधपर धडा आहे आणि आम्ही कोमल प्रितीने सर्व काही सहन करणे. निदणाची मुळे ही गव्हाच्या मुळात जशी गुंतलेली असतात तद्वत जे खोटे विश्वासक यांच्या मंडळीतील खरे विश्वासू शिष्य यांच्याशी नातेसंबंधाने एक झालेले असू शकतील. हे जे दाभिक ख्रिस्ती यांचा स्वभाव अजून म्हणावा तसा पूर्णपणे प्रकट झालेला नसावा. अशा लोकांना तुम्ही जर मंडळीतून काढले तर इतर सभासदाना अडखळण होईल, आम्ही जर थोडेसे सहन केले तर न जाणे हेच लोक पुढे खंबीर सभासद होतील. COLMar 43.1

    या दाखल्याचे स्पष्टीकरण व शिकवण हवी असेल तर स्वतः परमेश्वराने मानव व देवदूत यांना कसे काय वागविले हे पाहा. सैतान हा फसविणारा आहे. जेव्हा सैतानाने स्वर्गात पाप केले तो विश्वासू देवदूतांना सैतानाचा स्वभाव कळून आला नाही. याच कारणाने परमेश्वराने सैतानाचा त्वरीत नाश केला नाही. परमेश्वराने जर तसे केले असते तर परमेश्वराची प्रिती व न्यायीपण ही पवित्र देवदूतांना समजली नसती. परमेश्वराचा चांगुलपणा यावर संशय धरणे हे दुष्ट बी याचा परिणाम म्हणून पाप व शाप ही फळे आली असती. म्हणून दृष्टांचा अधिपती याला विभक्त केले व त्याचे शील कसे काय आहे हे दिसावे म्हणून त्याची पूर्ण वाढ होवू दिली. किती कितीतरी वर्षे परमेश्वराने दृष्टतेची कृत्ये सहन केली, परमेश्वराने एकमेव देणगी कॅलव्हरीवर दिली, यासाठी की, दुष्टतेने कोणीही फसविले जाऊ नये, निदण उपटणे म्हणजे गव्हाच्या पिकाला त्रास होणे, आपले जे सहसभासद यांच्याशी आम्ही सहनशीलतेने वागू नये का ? परमेश्वर, आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता सैतानाशी कसा सहनशीलतेने वागला तसे आम्हीही वागू नये काय?COLMar 43.2

    ख्रिस्ती मंडळीत अप्रामाणिक सभासद आहेत व खोटे बंधू आहेत म्हणून ख्रिस्ती धर्माचे सत्य याबाबत जगाला संशय धरणे हे कारण अजिबात नसावे. पूर्वीची प्रथम मंडळी हिचे कसे काय होते? हनन्या व सप्पीरा हे शिष्यास येऊन मिळाले. शिमोन जादुगाराचा बाप्तिस्मा झाला, देमास हा पौलास सोडून गेला तरी तो विश्वासकामध्ये गणला. यहुदा इस्कार्योत याची प्रेषितामध्ये गणणा झाली. तारणारा येशू यास एकही आत्मा हरवला जावा असे वाटत नाही. येशूचा यहदाबरोबर जो अनुभव आला त्याची नोंद केली आहे यासाठी की मानवी स्वभावाबाबत येशू किती सहनशील आहे आणि येशूने जसे सहन केले तसे आम्हीही सहन करावे, असे तो आम्हास सांगतो. येशू म्हणाला मंडळीत खोटे सभासद काळाच्या शेवटपर्यंत असतील.COLMar 43.3

    ख्रिस्ताने दिलेला इशारा याप्रमाणे लोकांनी धीर न धरता निदण उपटणेचा प्रयत्न केला. जे कोणी दुष्ट कृत्ये करीत होते त्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून मंडळीने कोर्टात जाऊन सरकारी सत्तेची मदत घेतली. जे कोणी धर्मतत्त्वांबाबत वेगळया मताचे वाटले. त्यांना तुरूंगवास केला, काहीचा छळ केला तर कित्येकांना ठार मारले, कारण काही अधिकारी लोकांना वाटले की ते ख्रिस्ताच्या अधिकाराने हे करीत आहेत. परंतु असे करणे म्हणजे ही सैतानी वृत्ती आहे, ख्रिस्ताची वृत्ती नव्हे, कारण हे त्यांच्या कृतीवरून दिसून येते. सैतान या पध्दतीने हे जग त्याच्या सत्तेखाली आणू पाहतो. जे लोक पाखंडी मताचे आहेत अशा लोकाबरोबर मंडळीने कर्मठपणाने वागणे म्हणजे परमेश्वराचे प्रतिनिधीत्व अयोग्य प्रदर्शित करणे होय.COLMar 43.4

    इतरांचा न्याय न करणे व दोष न देणे पण आपली नम्रता व ‘स्व’ वरील विश्वास बाजूला ठेवणे हेच ख्रिस्ताच्या दाखल्यात शिकविले आहे. शेतात सर्व काही चागले बी पेरले गेले नव्हते. मनुष्य हे मंडळीत आहेत म्हणून ते चांगले आहेत असे नाही. COLMar 44.1

    गहु व निदण प्रथमावस्थेत एकदल पाने आकाराने सारखीच दिसतात. परंतु पीक परिपक्व झाले. तेव्हा कणीस आले आणि गव्हाच्या ओंब्या व निदण यांच्यातील फरक दिसून आला. जे पापी लोक, धार्मिकतेचा ढोंगीपणा करून काही वेळ मंडळीतील खरे ख्रिस्ती लोकांत मिळून मिसळून चालतात, आणि अशा प्रकारे ख्रिस्तीपणाचा सारखेपणा आणून पुष्कळांना फसवू पाहतात, पण काळाच्या शेवटी कापणी येईल तेव्हा धार्मिक व दुष्ट यात साम्य वा ढोगीपणा अजिबात राहणार नाही. मग त्यावेळी जे मंडळीत सभासद म्हणून आले पण ते ख्रिस्तात आले नाहीत, असे लोक त्यावेळी उघड होतील.COLMar 44.2

    निदणास गव्हामध्ये वाढू दिले, पाऊस व सुर्यप्रकाश याचाही फायदा घेऊ दिला, परंतु कापणीच्या वेळी “मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दृष्ट यांच्यातला आणि देवाची (परमेश्वर) सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल’ मलाखी ३:१८ स्वर्गीय कुटुंबात रहावयास कोण लायक आहे हे ख्रिस्त स्वतः ठरवील. प्रत्येक मनुष्याचे शब्द व कृती यांचा न्याय ख्रिस्त करील. परमेश्वराच्या तराजूमध्ये पदवी व धंदा ही काहीच नाहीत. मनुष्याचे शील यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते.COLMar 44.3

    भावी काळी सर्व निदणाचा गह होईल असे तारणारा येशूने कधीच सांगितले नाही. तर गहु व निदण हे जगाच्या अती कापणीपर्यत एकत्र वाढत राहतील. त्यानंतर निदणाच्या जाळण्यासाठी पेंढया बांधतील व सर्व गहु कोठारात साठविला जाईल. ‘तेव्हा धार्मिक’ जण आपल्या पित्याच्या राज्यात सुर्यासारीखे आकाशातील मग मनुष्याचा पुत्र (येशु) आपल्या देवदूतास पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांस व अधर्म करणाऱ्यास त्याच्या राज्यातून जमा करून त्यांस अग्निच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल’ मत्तय १३:४३, ४१-४२.COLMar 44.4