Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १३ वा—दोन उपासक

    लूक १८:९-१४ यावर आधारीत

    “आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वास तुच्छ मानीत होते. त्यासही त्याने हा दाखला सांगितला, तो असा : एक परूशी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करावयास मंदिरात वर गेले, परूश्याने उभे राहन आपल्या मनात अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर मनुष्ये अपहारी, अधर्मी, व्यभिचारी अशी आहेत, त्यासारीखा किंवा या जकातदारासारखाहि मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवडयातून दोनदा उपास करीतो, जे मला मिळते त्या सर्वाचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहन वर स्वर्गाकडे दृष्टी लावावयासही न धजता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पापी मनुष्यावर दया कर. मी तुम्हांस सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा निर्दोषी ठरून खाली आपल्या घरी गेला, कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नीच करीतो तो उंच केला जाईल’ लूक १८:९-१४.COLMar 102.1

    “आपण धार्मिक आहो असा कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत होते, अशा लोकांसाठी ख्रिस्ताने परूशी व जकातदार हा दाखला सांगितला. परूशी मंदिरात उपासना करावयास गेला तो काय पापी समजून त्याला पापक्षमा पाहिजे या भावनेने गेला नाही, तर धार्मिक समजून गेला व त्याला स्तुतिची भावना होती. तो जी उपासना करीत होता ती धार्मिकतेत गणली जाऊन परमेश्वराकडे ती एक शिफारस होईल असे वाटते. यामुळे लोकांत त्याची धार्मिकतेबाबत वाहवा होईल. परमेश्वराची व मानव या दोघांची मर्जी त्याला संपादन करणे आहे. तो जी उपासना करीत होता ती स्वत:ची बढाई अशी होती.COLMar 102.2

    परूश्याचे सर्व शब्द स्व स्तुतीचे आहेत. त्याचे पाहाणे तसे, त्याचे चालणे त्या ढंगाचे व त्याची प्रार्थनाही तशाच प्रकारची. तो इतरापासून विभक्त राहून जणू काय असे म्हणतो, “ते म्हणतात, हा! जवळ येऊ नको, तुजहून मी पवित्र आहे, (यशया ६५: ५) तो उभा राहतो आणि प्रार्थना करीतो ‘स्व स्तुतीची’ जणु काय स्वमध्ये तो पूर्ण बुडून गेलेला आहे. त्याला वाटते परमेश्वर व मानव हे त्याच्याप्रमाणे त्याची स्वस्तुती करीत असावेत.COLMar 102.3

    “हे देवा इतर मनुष्ये अपहारी, अधर्मी, व्यभिचारी अशी आहेत, त्यासारीखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो’ असे परूशी म्हणाला परूशी त्याच्या शीलाची परीक्षा परमेश्वराच्या शीलानुरूप करीत नाही तर इतर लोकांचे शील यांच्याशी तुलना करीतो. त्याचे मन परमेश्वराकडून वळून मानवाकडे वळले गेले. मानवास स्वत:चे समाधान करावयाचे असेल तर वरीलप्रमाणे करणे हे गूढ आहे. COLMar 103.1

    तो अजून त्याच्या चांगल्या गोष्टी सांगू लागला, मी आठवडयातून दोनदा उपास करीतो, जे मला मिळते त्या सर्वाचा दशांश देतो. “परूशी लोकांचा धर्म हा आत्मिक असा नव्हता. ज्या अंत:करणात दया व प्रिती भरलेली असते असे देवभिरू शील याकडे त्याचे लक्ष नव्हते. परूशी केवळ वरपगी धर्मात गोडी दाखवीत होता. त्याची धार्मिकता त्याच्या मताप्रमाणे होती, त्याच्या कर्माप्रमाणे फलदायी वाटत होती व त्या धार्मिकतेचे मोजमाप मानवी दृष्टीकोनातून होते.COLMar 103.2

    जो कोणी स्वत:ला धार्मिक समजतो तो इतराना दोषी ठरवितो. परूशी इतरांचा न्याय त्याच्या धार्मिकतेद्वारा करीतो तद्वत् व इतरांच्या कर्माकडे पाहून त्याचा न्याय करीतो. ते स्वतः स्वत:च्या धार्मिकतेचे मोल व मोजमाप ठरवितात व आपणास इतराहून अधिक धार्मिक ठरवितात हा दुःखद भाग आहेत. स्वधार्मिकता यामुळे तो इतराना दोषी ठरवितो की ते लोक परमेश्वराची आज्ञा मोडतात. याप्रकारे ते सैतानाची प्रवृत्ती दाखवितात कारण सैतानही इतरांना दोष देतो. अशा प्रकारची वृत्ती असली तर परमेश्वराशी दळणवळण करणे अगदी अशक्य आहे. यामुळे तो मनुष्य परमेश्वराचे आशिर्वाद प्राप्त न होता कंगाल असा त्याच्या घरी जातो.COLMar 103.3

    जकातदारही इतर लोकासह उपासना करावयास मंदिरात जातो, पण त्या लोकासह उपासना करावयास स्वत: लायक नाही असे समजून तो त्यांच्यापासून बाजुला होतो. “तो दूर उभा राहतो, वर स्वर्गाकडे दृष्टी लावावयासही न धजता आपल्या उरावर मारून घेवून’ अगदी दुःखी मनाने स्वत:ला दोषी ठरवितो. तो समजला की त्याने परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यामुळे तो पापी व दोषी आहे. सभोवारचे लोक त्याजकडे तिरस्काराने पाहात होते म्हणून तोही त्यांच्याकडे पाहात नव्हता. जकातदारास यामुळे समजले की परमेश्वराची स्तुती करणेसाठी त्याच्याजवळ काहीच नाही आणि अगदी हताश व निराश होऊन तो म्हणाला, “हे देवा मज पापी मनुष्यावर दया कर‘‘ त्या जकातदाराने इतराबरोबर स्वत:ची तुलना केली नाही, स्वत:वरील दोषामुळे तो परमेश्वरापुढे स्तब्ध राहीला. त्याची केवळ एकच सदिच्छा होती, परमेश्वराने त्याची क्षमा करावी व त्याला शांति मिळावी, त्याची विनंती की परमेश्वराने त्याजवर दया करावी आणि त्याला आशिर्वाद प्राप्त झाला. ख्रिस्त म्हणाला, “मी तुम्हास सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा निर्दोषी ठरून खाली आपल्या घरी गेला‘‘ लूक १८: १४.COLMar 103.4

    परूशी व जकातदार हे, जे लोक परमेश्वराची उपासना करावयास येतात त्या लोकांचे दोन वर्गीकरण असे आहेत. या दोन लोकांचे प्रतिनिधी आदामास झालेले दोन पुत्र होते. काईन स्वतःस धार्मिक असा समजत होता आणि त्याने परमेश्वरास केवळ उपकार स्तुतीचे अर्पण अर्पिले. काईनाने पाप कबुली केली नाही, आणि त्याला परमेश्वराच्या दयेची, कृपेची गरज वाटली नाही. पण हाबेलाने कोंकरा अर्पण केला त्याद्वारे ‘देवाचा कोंकरा’ याजवरील विश्वास दर्शविला. हाबेल पापी म्हणून परमेश्वराकडे आला आणि आपण एक हरविलेला पापी आहोत अशी कबुली केली. परमेश्वर।ने हाबेलाच्या अर्पणाचा स्वीकार केला पण काईनाच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही. आमची गरज, आमचे दारिद्र्य वा दैन्यावस्था व पाप ही पाहून परमेश्वर आमचा स्वीकार करीतो. “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे‘‘ मत्तय ५:३. COLMar 104.1

    परूशी व जकातदार हे दोन वर्गाचे प्रतिक आहेत. हे पेत्र इतिहासाद्वारे आम्हांस शिकवीत आहे. प्रथमतः पेत्राला स्वत:विषयी फार खात्री वाटत असे. परूशी म्हणाला “की तो त्या मनुष्यासारीखा नाही‘‘ ज्या रात्री ख्रिस्ताला धरावयास लोक आले त्यावेळी पेत्र खात्रीने म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळाल... जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही‘‘ मार्क १४:२७, २९. पेत्राला स्वत:चा धोका समजत नव्हता. त्याच्या आत्मविश्वासाने त्याला बहकविले. त्याला वाटले तो मोहाला तोंड देईल, आणि थोडयाच वेळाने परीक्षेची वेळ आली, आणि पेत्राने शपथा घेऊन व धिक्कार करून त्याने येशूचा नकार केला.COLMar 104.2

    जेव्हा पहाटे कोंबडा आरवला त्यावेळी पेत्राला ख्रिस्ताने काय सांगितले होते त्याची आठवण आली आणि पेत्राने काय केले याचे त्याला आश्चर्य वाटले आणि मागे वळून पाहातो तो प्रभुची व पेत्राची एक नजर झाली. त्यावेळी ख्रिस्ताने पेत्राकडे पाहिले नी त्या नजरेत दु:ख, कळवळा व प्रिती ही सर्व दिसून आली आणि पेत्राला समजून आले. त्यामुळे तो तेथून बाहेर पडला व खूप दु:खी अंत:करणाने रडला. ख्रिस्ताच्या त्या नजरेने पेत्राचे अंत:करण भगले वा फुटले. पेत्राने त्याच्या त्या पापाचा पश्चात्ताप केला हा त्याच्या जीवनातील पालटाचा क्षण झाला ! त्या जकातदाराप्रमाणे पेत्राने पश्चात्ताप केला व पेत्राला कृपा प्राप्त झाली. पुन: ख्रिस्ताच्या त्या नजरेत पेत्राला क्षमेचे आश्वासन दिसले.COLMar 104.3

    आता त्याचा स्वत:वरचा आत्मविश्वास नाहीसा झाला आणि पुन: पेत्राने अशा प्रकारचे शब्द कधीही काढले नाहीत.COLMar 105.1

    ख्रिस्ताने त्याचे पुनरूत्थान झाले त्यानंतर पेत्राची तीनदा परीक्षा घेतली. येशूने शिमोन पेत्राला म्हटले, ‘योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू मजवर अधिक प्रिती करीतोस काय?’ यावेळी पेत्राने स्वत:ला त्याच्या इतर बांधवापेक्षा अधिक उंचावले नाही. प्रभु अंत:करण जाणता आहे म्हणून त्याजकडे विनवणी केली, “प्रभो, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखिले आहे‘‘ योहान २१: १५,१७.COLMar 105.2

    यानंतर पेत्राची देवाच्या कार्यावर नेमणूक केली. पेत्राला दिलेले कार्य फार विस्तृत, नाजुक व जबाबदारीचे होते. ख्रिस्ताने पेत्रास सांगितले की मेंढरास व कोकरास चार, ज्या आत्म्यासाठी ख्रिस्ताने प्राण दिला होता त्यांची पूर्ववत कारभारीपणाची जबाबदारी म्हणजे ख्रिस्ताचा पेत्रावर किती महान खात्रीपूर्वक विश्वास दाखविला हे समजून येते. पेत्र पुर्वी उतावळा, गर्विष्ठ, आत्मविश्वास असणारा शिष्य होता तर आता तो पश्चात्तापी व नम्र झाला. यापुढे पेत्राने स्वनाकार व स्वार्थत्याग असे जीवन जगला. पेत्र हा ख्रिस्ताच्या द:खाचा वाटेकरी झाला, आणि जेव्हा ख्रिस्त, गौरवी राजासनावर बसेल त्यावेळी पेत्रालाही त्याचा सहभागीपणा मिळेल.COLMar 105.3

    ज्या दुष्ट गोष्टीमुळे पेत्राचे पतन झाले व परूशी लोकाना परमेश्वराशी दळणवळण करता आले नाही त्यांच्याप्रमाणेच सध्याही हजारो लोकांची अशीच परिस्थिती आहे. आपला गर्व व जादा आत्मविश्वास ही मानवी आत्म्यासाठी किती घातक आहेत, धोकादायक आहेत आणि याच्यासारखी दुसरी घातक कोणतीही नाहीत आणि ही वरील दोन पातके फार आशाहीन आहेत व यावर काहीच उपाय नाही.COLMar 105.4

    पेत्राचे पतन काय एकाएकी झाले नाही तर ते क्रमवार होत गेले. त्याचा आत्मविश्वास होता की, त्याचे तारण झालेले आहे, आणि या विचाराने तो एक एक पायरी खाली खाली चालला होता. इतक्या थराला तो पोहचला की त्याने येशुचा नकार केला. आम्ही असा कधीही आत्मविश्वास आणू शकत नाही व अशी भावनाही आणू नये, कारण जोवर आपण स्वर्गीय दाराच्या बाहेर आहोत तोवर व मोहावर जय मिळत नाही तोवर तरी आत्मविश्वासाला जागा देऊ नये. जे कोणी तारणारा येशु याजवर विश्वास ठेवितात, त्यांचा खरेपणाने पालट झालेला असेल तरीपण त्यानी असे म्हणू नये वा मनात आणू नये की, ते तारलेले आहेत. यामुळे त्यांचा गैरसमज होईल. प्रत्येकांनी विश्वास व आशा धरावी, आम्ही ख्रिस्ताला समर्पण करीतो व ख्रिस्ताची आम्हांस माहिती आहे की ख्रिस्त आमचा स्वीकार करीतो, तरीपण आपण मोहपाशापासून मुक्त वा दुर नाही. परमेश्वराचे वचन सांगते, “पुष्कळ लोक आपणांस शुध्द व शुभ्र करतील‘‘ दानीएल १२: १० ‘जो’ मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण..... जीवनी मुगुट परीक्षेस उतरल्यावर त्याला मिळेल‘‘ (याकोब १: १२).COLMar 105.5

    जे कोणी पहिल्यांदाच विश्वास ठेवून ख्रिस्ताचा स्वीकार करीतात व म्हणतात, माझे तारण झाले आहे असे म्हणून स्वत:वर विश्वास ठेवितात ते लोक धोक्यात आहेत. ते स्वत:चा कमकुवतपणा विसरतात आणि त्यांना परमेश्वरापासून सतत सामर्थ्य पाहिजे हे त्यांनी विसरू नये. सैतानाचे मोह व कुकल्पना यासाठी ते तयारी करीत नाहीत. कारण मोहाला पेत्रासारखे बळी पडले व भारी पाप केले म्हणून आम्हास असा सल्ला दिला जातो, “यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.’ १ करिंथ १०: १२ आपण सतत सुरक्षित राहावे म्हणून ‘स्व’ वर अवलंबून राहू नये आणि ख्रिस्तावर सतत अवलंबून राहावे.COLMar 106.1

    पेत्राचे कोणते दोष आहेत हे पेत्राने समजून घ्यावयाचे असते आणि त्याची गरज म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य व कृपा ही आहेत. पेत्रावर येणारी संकटे यापासून प्रभु त्याचा बचाव करू शकत नव्हता पण त्याचा पराभव होऊ नये यापासून बचाव करू शकत होता. ख्रिस्ताने दिलेला इशारा जर पेत्राने लक्षात ठेविला असता तर पेत्र प्रार्थना करीत जागृत राहीला असता. तो जीवनात अडखळू नये म्हणून जपून चालला असता, ठेचाळला नसता. पेत्राला परमेश्वरापासून सामर्थ्य प्राप्त झाले असते आणि सैतानाला पेत्रावर विजय मिळाला नसता.COLMar 106.2

    पेत्राने स्वत:बाबत जादा खात्री बाळगली म्हणून तो पराभूत झाला, आणि पुन: त्याने पश्चात्ताप केला व तो नम्र झाला यामुळे त्याला पुन: स्थान प्राप्त झाले. पेत्राचा जो अनुभव नमूद केला आहे. त्यात प्रत्येक पश्चात्तापी मनुष्याला उत्तेजन मिळते. जरी पेत्राने गंभीर पाप केले, तरी त्याला विसरण्यांत आले नव्हते. ख्रिस्ताचे शब्द त्याच्या अंत:करणावर लिहिलेले होते, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे,’ लूक २२:३२. पेत्राचे पाप म्हणजे त्याने येशूचा नकार केला त्यानंतर किती दु:खात होता त्यासमयी येशूने त्याजसाठी वरील केलेली प्रार्थना, ख्रिस्ताची प्रितीची नजर व दया यामुळे पेत्राला आशा प्राप्त झाली. ख्रिस्ताला त्याचे पुनरूत्थान झाल्यानंतर पेत्राची आठवण आली आणि देवदुताद्वारे त्या स्त्रियांना निरोप सांगितला, “जा, त्याच्या शिष्यास व पेत्राला सांगा की तो तुमच्यापूर्वी गालीलात जात आहे, त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल‘‘ मार्क १६:७ तारणारा व पापक्षमा करणारा येशु याने पेत्राच्या पश्चात्तापाचा स्वीकार केला.COLMar 106.3

    जी प्रभु कृपा पेत्राची सुटका करावयास पोहचली तीच प्रभु कृपा प्रत्येक पश्चात्तापी पतित मानवास दाखविली जाईल. सैतानाचे साधन काय आहे तर मानवास पापात पाडणे, व तेथेच पडू देणे, तेथे मानवाने हताश व भीत, थरथर कापत पापक्षमेची वाट पाहात बसणे, पण आम्ही भयभीत का व्हावे, कारण परमेश्वर म्हणाला आहे, “पण त्याने माझा आश्रय धरावा, त्याने मजबरोबर दोस्ती करावी,“यशया २७:५. आपल्या कमजोरपणासाठी व्यवस्था केली आहे. ख्रिस्ताकडे यावे म्हणून आम्हाला उत्तेजन देण्यात येत आहे.COLMar 107.1

    ख्रिस्ताने त्याचा मोडलेला देह देऊन परमेश्वराचा वंश-वतन (मानव) परत विकत घेतला आहे आणि मानवास पुन: दुसरी संधी दिली आहे. हयामुळे हयाच्याद्वारे देवाजवळ जाणा-यास हा पूर्णपणे तारण्यास हा सर्वदा जीवंत आहे‘‘ इब्री ७ : २५ येशूचे निष्कलंक जीवन, त्याचा आज्ञाधारकपणा, कॅलव्हरी येथे त्याचे वधस्तंभावरील मरण, ख्रिस्ताची हरवलेले लोकांसाठी मध्यस्थीचे कार्य, आणि आता तो आपला केवळ मध्यस्थीचा कप्तान व तारणारा म्हणून नव्हे तर सर्वस्वी विजयी म्हणून आहे. येशूने केलेले कार्य परीपूर्ण आहे आणि तो आता आमचा मध्यस्थ म्हणून कार्य करीत आहे, व त्याने अर्पण केला तो धूप परमेश्वरापुढे सादर करीत आहे, त्या धुपात ख्रिस्ताचे निष्कलंक जीवन, लोकांच्या प्रार्थना, पाप कबुली व उपकारस्तुती याचा समावेश आहे. धूपातून निघणारा स्वाद यात ख्रिस्ताची धार्मिकता, परमेश्वराकडे सुगंधाप्रमाणे वर जाते. हे अर्पण पूर्णपणे स्वीकारले जाते व पापक्षमेमुळे सर्व पाप व अपराध यावर झाकण घातले जाते.COLMar 107.2

    ख्रिस्त, आमच्यासाठी जामीन व आमचा बदली झाला असून तो कोणाबद्दल निष्काळजीपणा करीत नाही. येशूला मानवाचा सार्वकालिक नाश व्हावा हे पाहता येईना म्हणून मानवाच्या तारणासाठी येशूने मरण पत्करले, मानवास स्वत:स तारण करीता येत नाही अशा मानवाकडे येशू दयेने व प्रितीने पाहातो.COLMar 107.3

    जो कोणी प्रभुकडे विनवणी करील त्याला तो कधीही पुनरूत्थित केल्याविना राहणार नाही. अखिल मानवासाठी ख्रिस्ताने त्याच्या प्रायश्चिात्ताद्वारे अमाप नैतिक सामर्थ्याचा पुरवठा केला, ते सामर्थ्य तो आम्हांलाही पुरवू शकतो. ख्रिस्ताची आम्हांवर प्रिती आहे म्हणून आपण आपली पापे व सर्व दु:ख संकटे त्याच्या चरणी नेऊ या. ख्रिस्ताची प्रेमळ वाणी व दृष्टी आम्हाकडे आहे आम्ही त्याजवर विश्वास ठेवू या. ख्रिस्त त्याच्या प्रतिमेप्रमाणे आमचे शील तयार करील.COLMar 107.4

    जो कोणी साधा विश्वास ख्रिस्तावर टाकील त्या आत्म्याला सैतानाची कोणतीही शक्ति काबीज करू शकणार नाही. “तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो‘‘ यशया ४०:२९.COLMar 108.1

    “जर आपण स्वत:ची पापे पदरी घेतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुध्द करील‘‘ प्रभु म्हणतो, “तू आपला देव परमेश्वर याजपासून पतन पावून...... माझा शब्द ऐकला नाही, हा आपला दोष मात्र पदरी घे, “मी तुम्हांवर शुध्द पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुध्द व्हाल, तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ति यापासून मी तुमची शुध्दी करीन’ १ योहान १:९, यिर्मया ३: १३, यहेज्केल ३६:२५. COLMar 108.2

    आम्हाला स्वत:ला आमच्या पापी जीवनाची जाणीव झाली पाहिजे म्हणजे पश्चात्तापाची गरज भासेल व त्यामुळे आम्हास पाप क्षमेची व शांतीची गरज लागेल. परूशी लोकांना त्यांच्या पापांची जाणीव झाली नाही. त्याचा आत्मा स्वधार्मिकतेच्या चिलखतात बंद होता. त्यामुळे परमेश्वराच्या देवदुतांच्या बाणाचा त्या आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही. जो पापी आहे असे समजतो त्यालाच ख्रिस्ताची गरज भासते. येशूच्या येण्याचा हेतू “कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळयास दृष्टी ही विदित करावयास, ठेचलेल्यांस मोकळे करावयास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करावयास त्याने मला पाठविले आहे’ लूक ४: १८.COLMar 108.3

    निरोग्यास वैद्याची गरज नाही, तर दुखणाइतास आहे’ लूक ५:३१ आम्हाला आमची खरी परिस्थिती समजली तरच आम्हांला ख्रिस्ताच्या मदतीची गरज लागेल. आमच्या जीवनात किती मोठा धोका आहे हा समजला म्हणजेच आम्ही आश्रयास धाव घेऊ. आपल्या आजाराचे दु:ख समजले तरच आम्ही औषधाची मागणी करू.COLMar 108.4

    प्रभु म्हणतो “मी धनवान आहे, मी धन मिळविले आहे. व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरीद्री, अंधळा व उघडावाघडा आहेत, हे तुला कळत नाही. हयाकरीता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुध्द केलेले सोने मजपासून विकत घे, तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे, आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळयांत घालण्यास अंजन विकत घे’ प्रकटीकरण ३: १७,१८. अग्नीने शुध्द केलेले सोने म्हणजे प्रितीने कार्य करणारा विश्वास आहे. केवळ यामुळे आपण परमेश्वराशी समरूप होऊ शकतो आम्ही कार्य करीत असून आम्ही अधिक कार्य करू, पण त्या कार्यात ख्रिस्ताच्या अंत:करणातील प्रिती नसेल तर आमची गणना स्वगीय कुटुंबात केली जाणार नाही. COLMar 108.5

    कोणाही मनुष्याला स्वत:च्या चुका दिसून येत नाहीत. “हदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्याचा भेद कोणास समजतो?’ यिर्मया १७:९ ओठाने आत्म्याचे दारिद्र्य सांगता येते पण अंत:करणास काही समजत नाही. आम्ही आमच्या आत्मिक दारिद्र्याविषयी परमेश्वराकडे बोलत असू, त्याचवेळी आपले मन वा अंत:करण आपली अधिक सौम्यता व उच्च धार्मिकता याचा अभिमान बाळगीत असावे. आपली स्वधार्मिकता पहावयाची असेल तर त्याला एकच मार्ग आहे. आम्ही ख्रिस्ताकडे पाहावे! आम्हाला ख्रिस्ताविषयी माहिती नाही म्हणूनच आम्ही आमच्या धार्मिकतेची बढाई सागत असतो. जेव्हा आम्ही ख्रिस्ताची शुध्दता - पवित्रता पाहातो, तेव्हा कुठे आम्हाला आमचा कमकुवतपणा, आमचे दोष व आमचे दारिद्र्य दिसते. इतर पापी लोक जसे हरवलेले आहेत तसे आपणही पांघरूण पांघरलेले असे दिसून येऊ. जर आमचे तारण झाले व व्हावयाचे असेल तर ते आमच्या सत्कृत्यामुळे नव्हे तर केवळ परमेश्वराच्या महान कृपेमुळे झालेले असेल.COLMar 109.1

    जकातदाराची प्रार्थना ऐकण्यात आली कारण त्याची श्रध्दा सर्वसमर्थ परमेश्वरावर दर्शविली. जकातदाराला स्वत:लाच लाज वाटली. जे कोणी परमेश्वराकडे प्राथनेद्वारे जाऊ इच्छितात त्यांना अशाच प्रकारे स्वत:विषयी वाटले पाहिजे. विश्वासाने आपला स्वत:वरील विश्वास नाकारला पाहिजे. प्रत्येक गरजु व्यक्तिने सर्वसमर्थ परमेश्वर याजवर अवलंबून राहावे.COLMar 109.2

    आपला साधा विश्वास व ‘स्व’ चा सर्वस्वी त्याग करणे याची जागा कोणताही बाहयविधी घेऊ शकत नाही. स्वत:हून कोणालाही ‘स्व’ ला काढून टाकता येत नाही. हे कार्य केवळ आम्ही ख्रिस्ताच्या सहाय्यानेच करू शकतो. यानंतर त्या आत्म्याची प्रार्थना अशी असेल. प्रभू तू माझ्या जीवनाकडे पाह नको. कारण माझे जीवन कमकुवत ख्रिस्ताविना स्वार्थी आहे, तरीपण तू माझे तारण करावे. हे प्रभु मी माझे असले जीवन तुला देऊ शकत नाही तर तूच हे घ्यावे. कारण मी माझा नसून तुझीच मालमत्ता आहे. मला माझे जीवन शुध्द राखणे अशक्य आहे तेव्हा तूच हे जीवन शुध्द राखावे. माझ्या जीवनास आकर्षकता व माझ्या ठायी नवा आत्मा ओतीव, शुध्द व पवित्र वातावरणात मला वाढीव, त्यामुळे तुझ्या (येशू) जीवनातील पवित्र सामर्थ्य माझ्या जीवनात येईल.COLMar 109.3

    ख्रिस्ती जीवनाच्या प्रारंभीच आपण ‘स्व’ चा त्याग करणे असे नसावे. स्वर्गीय मार्गाच्या प्रत्येक पावलानुसार आपण ‘स्व’ चा त्याग करीत चालावे. आम्हाला वरून जे सामर्थ्य प्राप्त होते त्यामुळेच आपल्या हातातून चांगली कामे होतात. यासाठी आपण सतत परमेश्वराकडे मागणी करावी आणि पाप कबुली करणे व परमेश्वरापुढे नम्र राहावे. ‘स्व’ चा त्याग करणे व ख्रिस्तावर अवलंबून राहाणे याद्वारेच आपण जीवनाच्या वाटेवर सुरक्षित चालू शकतो. COLMar 109.4

    आम्ही जो जो येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात येऊ तो तो आपणास येशूची पवित्र शील व धार्मिकता दिसेल, आणि आपण किती पापी आहोत हे समजून येईल आणि परिणामी आम्ही कधीही ‘स्व’ ला उंचावणार नाही. जे कोणी स्वर्गीय राज्यात प्रवेश करतील ते केव्हाही स्वत्त्व:ची बढाई करणार नाहीत. पेत्र हा ख्रिस्ताचा विश्वासू सेवक झाला, पत्राला स्वर्गीय सामर्थ्य व प्रकाश देऊन त्याचा महान सन्मान केला, ख्रिस्ताच्या मंडळीची स्थापना करणे यात पेत्राने स्वत: कार्य केले, असे असता व हे कार्य करीत असता पेत्राला जो नम्रतेचा धडा प्रभुने शिकविला तो, पेत्र कधी विसरला नाही, पेत्राच्या पापाची क्षमा केली गेली, तरी पेत्रास हे माहित होते की त्याच्या जीवनातील कमकुवतपणा यामुळे त्याचे जे पतन झाले होते त्यातून तो वाचविला गेला हे केवळ ख्रिस्ताच्या कृपेनेच ! पेत्राला स्वत:मध्ये प्रौढ व गौरव घेण्याचे असे काहीच नव्हते हे त्याला समजले.COLMar 110.1

    संदेष्टे व प्रेषित यापैकी कोणीही म्हणाले नाहीत की त्यांनी कधी पाप केले नाही. जी मनुष्ये परमेश्वराच्या सान्निध्यात राहिली, ज्या मनुष्यांनी पाप वा एकादी चुकीची गोष्ट न करणे ऐवजी प्राण द्यावे लागले तरी पर्वा केली नाही, परमेश्वराने ज्या लोकांना दैवी प्रकाश व सामर्थ्य देऊन सन्मान केला त्या मनुष्यांनी त्यांच्या पापी स्वभावाची कबुली दिली. त्या लोकांनी त्यांच्या दैहिक जीवनावर विश्वास ठेविला नाही, त्यांनी त्यांची धार्मिकता कधीही पुकारली नाही, तर त्यांनी ख्रिस्ताच्या धार्मिकतेवर पूर्ण विश्वास ठेविला. जे कोणी ख्रिस्ताकडे पाहात राहतील त्या सर्वाचे जीवन वरील प्रमाणे असेल!COLMar 110.2

    ख्रिस्ती अनुभवाच्या प्रत्येक पावलानुसार आपला ख्रिस्ती अनुभव अधिक वाढता होईल. परमेश्वराने ज्यांची क्षमा केली आहे, ज्यांना परमेश्वराने त्याचे लोक म्हणून मान्यता दिली आहे अशा लोकांना तो म्हणतो, “तुम्हांस आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल, तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये यामुळे तुमचा तुम्हांलाच वीट वाटेल”यहेज्केल ३६:३१. आणखी तो म्हणतो, “मी तुजबरोबर आपला करार स्थापित करीन तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे, तू जे सर्व केले त्याची मी क्षमा करीन, म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन: आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभु परमेश्वर म्हणतो. यहेज्केल १६:६२, ६३ यानंतर आपले तोंड कधीही स्वस्तुती करणार नाही. आम्हास समजून येईल की आमचा भरपूर पुरवठा केवळ ख्रिस्तांत आहे. प्रेषितांनी जी कबुली दिली ती कबुली आपणही करू या”कारण मला ठाऊक आहे की माझ्याठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही‘‘ रोम ७ : १८ “आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्या वधस्तभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो, त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे‘‘ गलती ६:१४.COLMar 110.3

    या अनुभवास अनुरूपशी आज्ञा दिली आहे. “यास्तव माझ्या प्रिय बंधुनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहां ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या, कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे‘‘ फिलिपै २: १२,१३. परमेश्वर त्याचे अभिवचन पाळणे यात पराभूत होईल, त्याची सहनशीलता संपून जाईल किंवा त्याची दया उणी पडेल या सर्वाबाबत तुम्ही निर्भय राहा. तुमची इच्छा ख्रिस्ताच्या इच्छेशी मान्यता देणार नाही याबाबत भिती बाळगा, तुमचा स्वभाव व परपेरचा गुणधर्म ही तुमच्या मनावर ताबा घेतील याबाबत दक्षता घ्या. ‘कारण इच्छा करणे व कृत्ती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्सकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे’ तुमचा आत्मा व तुमचा परमेश्वर यात तुम्हीच अडखळण होणार नाही याची दक्षता घ्या, परमेश्वराला त्याचा उदात्त हेतू पार पाडणे यात तुमची स्वइच्छा आड येईल याचे भय धरा, तम्ही परमेश्वराचा हात सोडून देऊन ख्रिस्ताच्या समक्षतेशिवाय जीवन मार्गावर एकटेच चालणे अशी घोडचूक होऊ नये म्हणून भय बाळगा.COLMar 111.1

    आपल्या जीवनात स्वकर्तबगारी व गर्व येईल असे होऊ देवू नये, म्हणून आपण केव्हाही स्तुती व वाहवा करू नये. सैतान हा वाहवा वा स्तुती करतो. सैतान स्वत:ची करीतो व दोष देणे व टीका करणे हे ही करीतो. अशा प्रकारे सैतान आत्म्याचा नाश करू पाहातो. जे कोणी मानवाची स्तुती करीतात ते सैतानाचे एजंट आहेत. जे ख्रिस्ताचे कामदार आहेत त्यांनी अशा प्रकारची स्तुती यापासून दूर राहावे. ‘स्व’ ला कुठेच थारा देऊ नये. केवळ ख्रिस्तालाच उंचवावे व त्याची स्तुती करावी. ‘ज्याने स्वरूधिराने तुम्हा आम्हाला आपल्या पातकापासून मुक्त केले‘‘ (प्रकटी १ : ५).COLMar 111.2

    ज्या अंत:कणात प्रभूची प्रिती आहे तो मनुष्य कधीही कष्टी व दःखी दिसणार नाही. ज्याच्या जीवनात ख्रिस्त नाही त्याचा चेहरा दुःखी दिसेल व तो प्रवाशाप्रमाणे उसासे टाकीत चालेल. जे कोणी स्वसंतोषी व स्वखुशालीचे जीवन जगतात त्यांना ख्रिस्ताच्या जीवनाशी सुसंगत जीवन जगावे अशी गरज कधीच भासणार नाही. जो जीवात्मा ख्रिस्त खडकावर पडला नाही तो स्वत: पूर्ण गविष्ठ असतो. मानवास मानाचा धर्म पाहिजे. मनुष्याला त्याच्या धर्माची वाट इतकी रूंद हवी की त्याद्वारे त्याला त्याचे सर्व गुणधर्मासह चालता येईल. त्याची स्वस्तुती, लोकांनी केलेली स्तुती, नावलौकीक, अशा गणांचा हमरस्ता त्यांना पाहिजे, परंतु अशा अंत:करणाच्या मार्गात ख्रिस्त नसतो, अशा मनात ख्रिस्त प्रवेशच करीत नाही म्हणून त्यांचे जीवन दु:खी व कष्टी असे असते. पण ज्या अंत:करणात ख्रिस्त राहतो तेथे उफळत्या आनंदाचा झरा असतो. कारण जे कोणी ख्रिस्ताचा स्वीकार करीतात त्यांना परमेश्वराच्या हर्षाची किल्ली सापडलेली असते. COLMar 111.3

    “कारण तो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करीतो, ज्याचे नाम पवित्र प्रभु आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुत्तापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो, तेणेकरून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे ह्यदय उत्तेजीत करीतो‘‘ यशया ५७ : १५...COLMar 112.1

    जेव्हा मोशेला खडकाच्या कपारीत लपविले होते तेथे त्याला परमेश्वराचे गौरव दिसले. जेव्हा आम्हांला ख्रिस्त या खडकांत लपविल तेव्हा ख्रिस्त आम्हांस त्याच्या जखमी हाताने कवटाळून घेईल. तेव्हा आम्हाला आणि परमेश्वर त्याच्या चाकरास काय म्हणतो हे आपण त्यावेळी ऐकू. मोशेला जसे प्रकट केले तसे आम्हांलाही प्रकट केले जाईल. परमेश्वर दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अधर्म, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा...‘‘ निर्गम ३४:६,७.COLMar 112.2

    तारणाच्या कार्याचा परिणाम होतो त्याचा समज मानवास येणे हे कठीण आहे. “डोळयांने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही, व माणसाच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रिती करणाऱ्यासाठी देवाने सिध्द केले आहे’ १ करिंथ २:९. ख्रिस्ताच्या सामर्थ्याने पापी मनुष्य वधस्तंभाकडे आकर्षित केला जातो, वधस्तंभापुढे दंडवत घालतो अर्थात पालथा पडून शरण येतो त्यावेळी तो मनुष्य नवा असा होतो. त्या मनुष्याला नवीन अंत:करण दिले जाते.तो मनुष्य ख्रिस्तात नवी उत्पत्ति होतो. पवित्रीकरणामुळे त्यांच्यात कसलीच उणीव भासत नाही, परमेश्वर स्वत: “येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नितीमान ठरविणारे असावे.”रोम ३:२६, आणि “ज्यांस पाचारण केले त्यास त्याने नितीमान ठरविले आणि ज्यास नितीमान ठरविले त्याचे त्याने गौरव केले’ रोम ८:३० पापामुळे होणारे पतन हे किती लाजीरवाणे असते, पण त्याहून उंच करणारी तारणदायी प्रिती असते. जो मानव देवाच्या शीलाप्रमाणे व्हावे म्हणून प्रयत्न करीत असतो त्यांना स्वर्गीय खजिन्यातून सामर्थ्याचा पुरवठा केला जातो, अशा मानवास जे देवदूत पतन पावले नाहीत त्यांच्याहून उंचावले जाईल.COLMar 112.3

    “ज्याला माणसे तुच्छ लेखितात, ज्याला लोक अमंगळ मानितात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्त्राएलाचा उध्दारकर्ता, इस्त्राएलाचा पवित्र प्रभु जो परमेश्वर, तो म्हणतो, राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील, परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्त्राएलाचा पवित्र प्रभु आहे, त्याने तुला निवडुन घेतले आहे म्हणून असे होईल‘‘ यशया ४९: ७...COLMar 113.1

    “कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नीच करीतो तो उंच केला जाईल‘लूक १८: १४.COLMar 113.2