Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ६ वा—पेरणी करणारा यापासून आणखी बोध

    पेरणी करणारा व बीयापासून वनस्पतीची वाढ यातून आपल्या कुटुंबात व शाळेत बोधपर धडे शिकता येतील. लहान मुले व तरूणांनी नैसर्गिक गोष्टीमध्ये परमेश्वर निर्माता याचे सामर्थ्य किती आहे हे त्यांनी शिकावे व विश्वासाने त्यांतील अदृश्य फायदे त्यांना समजून येतील. परमेश्वर त्याच्या महान मानवी कुटुंबाच्या सर्व गरजा किती अद्भुतपणे पुरवितो हे मानवास समजून आले नंतर मानवांनी परमेश्वराशी कसे काय सहकार्य करावे. यामुळे परमेश्वरावर त्यांचा अधिक विश्वास वाढेल आणि त्यांच्या दररोजच्या जीवनात परमेश्वराचे सामर्थ्य याची त्यांना जाणीव होईल. COLMar 49.1

    परमेश्वराने त्याच्या शब्दाने पृथ्वी निर्माण केली. त्याचप्रकारे बी ही निर्माण केले. परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने बी वाढणे व त्यापासून अधिक उत्पन्न वाढावे हे सामर्थ्य दिले. परमेश्वर म्हणाला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळ झाडे भूमि आपल्यावर उपजवो आणि तसे झाले... देवाने पाहिले की हे चांगले आहे‘‘ उत्पत्ति १:११, १२ सध्या बीयांची जी वाढ होते त्याला कारण म्हणजे परमेश्वराच्या शब्दाद्वारे मिळालेली शक्ति होय. प्रत्येक बीयाच्या वनस्पतींतून निघणारे हिरवेगार पानाचे पाते सूर्यप्रकाशात परमेश्वराच्या अद्भुत शक्तिची घोषणा करीते, ‘तो (परमेश्वर) बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले‘‘ स्तोत्र ३३:९.COLMar 49.2

    ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविली, “आमची रोजची भाकर आज आम्हास दे‘‘ मत्तय ६:११ येशूने रानातील भुकमळे दाखवून त्याना आश्वासन दिले, “जे रानातले गवत त्याला जर देव असा पोशाख घालतो. तर तो विशेष करून तुम्हास पोशाख घालणार नाही काय?‘‘ मत्तय ६:३० हया प्रार्थनेचे उत्तर द्यावे म्हणून ख्रिस्त सतत काम करीत आहे व त्याचे आश्वासन चांगले परिपूर्ण करीत आहे. मानवाचे सेवक म्हणून एक अदृश्य सामर्थ्य सतत कार्य करून मानवास खावयास देणे व पेहराव देणे हे कार्य करीत आहे. एक बी केवळ निरूपयोगी पण परमेश्वर त्या बीयाच्याद्वारे एक सजीव वनस्पती वाढावी यासाठी प्रभुच्या कितीतरी कार्यकारी शक्तिसेवा करीत आहेत आणि त्या वनस्पतीपासून योग्य हगामी पीक यावे म्हणून वनस्पतीला जे काही लागेल ते योग्य प्रमाणात पुरविले जाते. स्तोत्रसंहिता यातील सुंदर असे वर्णन :COLMar 49.3

    “तु पृथ्वीचा सामाचार घेवून ती भिजविली आहे,
    तु तिला बहुत फलद्रुप करीतोस,
    देवाची नदी जलपूर्ण आहे,
    भुमि तयार करून तु मनुष्यास धान्य पुरवितोस,
    तिच्या तासास तू भरपूर पाणी देतोस,
    तिचे ऊंचवटे सपाट करीतोस,
    तिला पावसाच्या सरींनी मऊ करीतोस,
    तीत उगवलेले अंकुर सफल करीतोस,
    तुं आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतोस,
    आणि तुझे मार्ग समृध्दीमय झाले आहेत”
    COLMar 50.1

    स्तोत्रसंहिता ६५:९-११.

    हे भौतिक जग परमेश्वराच्या ताब्यात आहे. निसर्गाचे नियम निसर्गाच्या नियमानेच पालन केले पाहिजेत जे काही बोलले व कार्य केले जाते ते निर्माणकर्ता परमेश्वर यांच्या इच्छेनुसार केले जाते. मेघ व सुर्यप्रकाश दव व पाऊस, वारा व वादळ ही सर्व काही परमेश्वराच्या हुकूमाप्रमाणे चालतात आणि ती सर्व परमेश्वराची आज्ञा पाळतात. परमेश्वराच्या आज्ञानुसार बी रूजते: ‘पहिल्याने अंकुर, मग कणीस मग कणसात भरलेला दाणा‘‘ मार्क ४:२८. परमेश्वर हे सर्व हंगामानुसार पायरी पायरीने उगवू देतो, यासाठी की ते, परमेश्वराच्या कामात अडखळण आणीत नाहीत. मग असे असताना, जो मनुष्य परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केला, ज्याला सद्विवेक व बोलणेची कला दिली त्याने असे त्याच्या देणगीबाबत कृतघ्न व परमेश्वराच्या आज्ञेबाबत आज्ञाभजक असावे काय? आपल्या या जगात जो त्रास, गोंधळ चालला आहे त्याला कारण केवळ मानव हाच असावा काय ?COLMar 50.2

    मानवाच्या जीवनास जे काही सहाय्यक दिसते. त्यात मानव प्रयत्न हे परमेश्वराच्या मताशी एकमत असावे. मानवाने प्रयत्न करून पेरणी केली नाही तर कापणी नसणार. परमेश्वराचे सहाय्यक सूर्यप्रकाश, पाऊस, दव, मेघ हे नसतील तर भरभराट ही नसणार. याप्रकारे प्रत्येक उद्योगधंदा, प्रत्येक अभ्यास व शास्त्रीय कार्यात असेच आहे आणि हेच तत्त्व आध्यात्मिक जीवन, शीलसंवर्धन व प्रत्येक ख्रिस्ती कार्यात यशस्वी करीते. या कार्यात आम्हांस आमचा कार्यभाग करावयाचा आहे, पण याला परमेश्वराच्या सामर्थ्याची साथ हवी. नाहीतर आपले सर्व प्रयत्न निरर्थक होतील.COLMar 50.3

    मानव जेव्हा काही एका कार्यात यशस्वी होतो, मग ते आध्यात्मिक असो वा ऐहिक असो तेव्हा मानवाने हे लक्षात ठेवावे की तो जे करीतो ते उत्पन्नकर्ता याच्या सहकार्यानेच करीतो. आम्ही सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून आहोत हे समजणे याची आम्हास फार गरज आहे. एखादया मनुष्यावर जादा भरवसा ठेवणे व जादा मानवी सशोधनावर अवलंबून राहणे यामुळे परमेश्वर आम्हांस सामर्थ्य देणेस तयार असतो त्यावर आपण जादा भर देत नाही. “कारण आम्ही देवाचे सहकारी आहो’ १ करिथ ३:९ आम्ही अतिशय कमी प्रतिचे आहोत हे समजून ख्रिस्ताच्या देवत्त्वाशी जर आम्ही एकरूप झालो, तर आम्ही सर्व काही करावयास सामर्थ्यवान होतो कारण ख्रिस्ताची शक्ति आम्हांमध्ये कार्यकारी होते.COLMar 51.1

    बीयापासून क्रमाक्रमाने वनस्पतीची वाढ होणे अशाच प्रकारे बालपणापासून मुलामुलींचे शिक्षण व्हावे हा बोध आपण घेणे. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा‘‘ (मार्क ४:२८) ज्या येशूने हा दाखला सांगितला त्याने हे छोटेसे बी निर्माण केले, त्यातील सर्व गुणधर्म आणि त्या बीयाच्या वाढीचे नियमही त्यानेच दिक्षित केले. या दाखल्यापासून जो सत्य बोध शिकविला जातो तो त्याने (येशू) त्याच्या जीवनात खरा करून दाखविला. येशूने त्याच्या शारीरिक व आध्यात्मिक जीवनात वनस्पतीच्या वाढीसाठी जी परमेश्वराची आज्ञा होती ती प्रगट केली आणि अशाच प्रकारे सर्व तरूणानी करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. जरी येशू स्वर्गीय राजा होता, गौरवी राजा होता तरी तो या पृथ्वीवर प्रारंभीच्या जीवनात आईच्या हातावर बेथलेहेमात जन्मलेले असाहाय्यक बालक असा होता. येशूने बालपणी सर्व कामे आज्ञाधारकपणे केली व त्याने सर्व काही बोलणे व काम प्रौढ मनुष्याप्रमाणे नव्हे तर मुलाप्रमाणे केले. आईबापाचा मान राखला व त्यांच्या आज्ञा पाळणे यात साहाय्य केले आणि त्याच्या शक्तिनुसार त्याने काम केले. येशू, त्याच्या जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत ते परिपूर्ण होता, साधे राहणे, नैसर्गिक, कृपाळू व पापविरहीत जीवन जगला. येशूचे बालपणाची नोंद”तो बालक (येशू) वाढीस लागला आणि ज्ञानाने पूर्ण होत असता बलवान झाला, त्याजवर देवाची कृपा होती.”आणि येशूच्या तरूणपणाची नोंद अशी “येशू हा ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.’ लूक २:४०,५२.COLMar 51.2

    आईबाप व शिक्षकांनी कोणते कार्य करावे याविषयी येथे सांगितले आहे. ज्याप्रमाणे वनस्पतीची वाढ बागेत क्रमाक्रमाने होत असते. तद्वत् प्रत्येक तरूणाची वाढ क्रमाक्रमाने केली पाहिजे. त्यांच्या जीवनात नैसर्गिकपणा त्या त्या वयोमानाप्रमाणे आला पाहिजे व त्यांनी तद्वत् कार्य केले पाहिजे. COLMar 51.3

    जी लेकरे नैसर्गिकपणे वाढत आहेत. ज्यांच्यावर कुठलाही दुष्परिणाम झाला नाही ती लेकरे आकर्षक वाटतात. अशा लेकरासमोर त्यांच्या चांगुलपणाची विशेष वाहवा करणे. शहाणपणाचे नाही. ती किती सुंदर दिसतात यांचे वर्णन करू नये कारण सौंदर्य टिकत नाही, त्याचे बोलणे व वागणे याची ही जादा स्तुति करू नये. लेकराना अती किंमतीचा वा दिखाऊ पोषाख घालावयास देऊ नये. कारण यामुळे त्यांच्यामध्ये गर्व येतो व त्यांचा सोबती यांच्याविषयी तिरस्काराची भावना मनात येते. COLMar 52.1

    अशा बालकांची काळजी साधेपणाने घ्यावी. त्यांना जे साधे काम दिले त्यात त्यांनी समाधान मानावे, कामात साहाय्य कसे करावे याचा आनंद व अनुभव हा त्यांना प्राप्त व्हावा. वनस्पतीला प्रथम पाते वा पान येते असे बालपण आहे, या पानाचे सौंदर्य हे एक विशेष असे असते. लेकरांना अकाली प्रौढ असे केव्हाही करू नये तर त्यांच्या बाळपणाचा ताजेतवाना व सौंदर्य ही तशीच राहू देणे.COLMar 52.2

    ही लहान लेकरे त्यांच्या वयातील अनुभवाप्रमाणे ख्रिस्ती असू शकतात. परमेश्वराची त्यांच्यापासून हिच अपेक्षा आहे. आध्यात्मिक बाबीत त्याना शिक्षण दिले पाहिजे, आई बापांनी त्याना हे शिक्षण दिले पाहिजे व ख्रिस्ताच्या शीलाप्रमाणे त्यांचेही शील झाले पाहिजे.COLMar 52.3

    निसर्गाविषयी परमेश्वराचे जे नियम आहेत, त्यात प्रथम कारण व त्याचा परिणाम ही निश्चयी होतो. जे काही पेरले त्याचीच कापणी केली जाईल. आळशाची परीक्षा त्याच्या कामावरून केली जाते. व त्याच्या शेताची कापणी त्याजविषयी साक्ष देते. आध्यात्मिक बाबीत असेच आहे. प्रत्येक विश्वासू कामदाराचे मोजमाप त्याच्या कामावरून केले जाते. त्याचे काम आळसी वा चाणाक्ष होते की नाही हे त्याच्या पीकाची कापणी यावरून समजते. अशाच प्रकारे त्याच्या जीवनाबाबत सार्वकालिक शेवट याचा निर्णय घेतला जातो.COLMar 52.4

    प्रत्येक बी पेरले जाते आणि त्या प्रकारची कापणी केली जाते. मानवी जीवनातही अशाच पध्दतीचे आहे. आम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रिती, सहानुभूती व दया अशा बीयांची पेरणी करावी कारण आपण जे काही पेरणी करू त्याचीच कापणी केली जाईल. आपल्या जीवनातील स्वार्थीपणा, स्वप्रेम, स्व-बढाई व स्वत:ची ख्यालीखुशाली यांची पेरणी झाली तर अशाच प्रकारे कापणीही केली जाईल. जो कोणी स्वत:साठी जगतो तो ऐहिकाची पेरणी करीतो आणि ऐहिकापासून मिळणारे पीक वा कापणी ही नाशवंत असते.COLMar 52.5

    परमेश्वर कोणाही मानवाचा नाश करीत नाही. ज्या कोणाचा नाश होईल तो त्याचाच नाश करून घेईल. जो कोणी त्याच्या जीवनात ध्येयाच्या सूत्राने चालतो तो अविश्वासाचे बी पेरितो, आणि त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात कापणी केली जाईल. परमेश्वरापासून प्रथम आलेला इशारा जो कोणी नाकारीतो, फारोने अशाच प्रकारे हट्टीपणाचे बी पेरले व त्याला हट्टीपणाची कापणी करावी लागली. फारोने अविश्वासू व्हावे यासाठी परमेश्वराने फारोवर काय दबाव आणला नाही. फारोने अविश्वासाच्या बीयांची पेरणी केली आणि तशाच प्रकारची कापणी त्याने केली. अशा प्रकारे फारो विरोध करीत राहीला. परिणामी शेवटी त्याला त्याच्या ओसाड देशाकडे पाहावे लागले, त्याचे प्रथम जन्मलेले त्यांचा मृत्यु पाहावा लागला, त्याच्या साम्राज्यातील सर्वघरांतील व त्याच्या राजवाडयांतील प्रथम जन्मलेले मृत देह पाहिले, शेवटी त्याचे शूर लढवय्ये, घोडे व रथही समुद्रातील पाण्यात गडप झाले. फारोच्या इतिहासातील भयानक सत्याचे स्पष्टीकरण “कारण मनुष्य जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल”. गलती ६:७ जर का हे मनुष्याच्या लक्षात आले तर मनुष्य कोणत्या प्रकारची पेरणी करीतात याबाबत ते दक्षता घेतील.COLMar 53.1

    जशी पेरणी करीतात तशी कापणी केली जाते. नंतर पेरणी बहसंख्येने होते व कापणीही विपुलतेने होते. आम्ही इतराशी संबंध ठेवितो त्यामध्ये हे सत्य अनुभविले जाते. प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द ही एकेक बी असून त्याद्वारे फलप्राप्ती होईल. प्रत्येक दयाळ विचारी कार्य, आज्ञाधारक वा निस्वार्थीपणा यांचा इतरावर परीणाम होऊन ते फलदायी होईल, पुढे अशा लोकांचा इतरांवर परिणाम होऊन ही संख्या वाढतच जाईल. प्रत्येक हेवादावा, दुष्टता व भाडण ही ‘कडूपणाच्या मुलाने अंकुरित’ होतात (इब्री १२:१५). याप्रकारे पुष्कळजण विटाळले जातील आणि अशा प्रकारे ‘कितीजण’ विषारी होतील. अशाप्रकारे चागले व वाईट पेरणे हे कार्य आता व सदासर्वकाळ चालु असेल.COLMar 53.2

    आध्यात्मिक व दैहिक पेरणीचे स्वातंत्र्य आहे हे या बी पेरणी या धडयात शिकविले आहे. प्रभु म्हणतो, “जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करीता ते तुम्ही धन्य’ यशया ३२:२०. ‘हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील.‘‘२करिथ ९:६. सर्व पाण्यालगत पेरणी करणे म्हणजे परमेश्वराची जी दाने वा देणगी आम्हांस दिली आहे ती इतरांना देत राहाणे. परमेश्वराच्या कार्याप्रित्यर्थ देणे व जेथे मानवाच्या गरजेसाठी देणे आहे तेथे देत राहणे वा देणगीचा उपयोग करणे. यामुळे दारिद्रय कधीही येणार नाही. जो कोणी सढळ हाताने कापणी करीतो तो सढळ म्हणजे विपुल कापणी करेल’ “पेरणारा बी पेरितो त्याद्वारे बी हे द्विगुणीत होत जाते वा संख्यावृध्दि होते. जे कोणी परमेश्वराची देणगी याबाबत पेरणी करीतात त्यांचे असेच द्विगुणीत होते. ते जेव्हा देणगीचा सेवेसाठी उपयोग करीतात तेव्हा त्यांच्यासाठी आशीर्वादही द्विगुणित होतो. परमेश्वराने अभिवचन दिले आहे की ते जसे देत राहतील वा सेवेसाठी उपयोग करतील तो तो परमेश्वर त्यांना आशिर्वाद देत राहील.‘‘ द्या म्हणजे तुम्हांस दिले जाईल, चांगले माप दडपून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील‘‘. लूक ६:३८. COLMar 53.3

    पेरणी व कापणी करणे यामध्ये याहून अधिक काही आहे. ज्याप्रकारे आम्ही परमेश्वराचे आशिर्वाद ज्यामध्ये आम्हांप्रीत्यर्थ परमेश्वराची प्रिती व सहानुभूती ही जागृत होतात. त्यामानाने आम्ही परमेश्वराचे आभार मानणे व कृतज्ञता ही दर्शवितो. सत्याचे बी आमच्या मनोभूमीत रूजावे यासाठी आम्ही अशाप्रकारे तयारी करीत असतो आणि जो परमेश्वर पेरणारा यांस बी पुरवितो, तोच (परमेश्वर) त्या बीयास अंकुर येवून त्याला पुढे कणीस फळ म्हणजे सार्वकालिक जीवन हे देईल. COLMar 54.1

    बी भूमीत टाकले जाणे यावरून दर्शक ख्रिस्ताने स्वतः मानवाच्या तारणाप्रित्यर्थ किती महान अर्पण केले. येशू म्हणाला, “गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो आणि मेला तर बहुत पीक देतो‘‘ योहान १२:२४ अशाच प्रकारे ख्रिस्ताचे मरण यामुळे स्वर्गीय राज्यांत विपुल फळे येतील. वनस्पतीचे घटक या नियमाप्रमाणे, येशुच्या मरणाने जीवन प्राप्त होते.COLMar 54.2

    जे कोणी ख्रिस्तासह कामदार होवून फळ देऊ पाहतात त्यांनी प्रथमत: जमिनीत बीयाप्रमाणे पडून मरणे हे अवश्य आहे. जगाच्या गरजा या तासात त्यांनी स्वत:चे जीवन घातले पाहिजे. स्वप्रेम व स्वार्थ ही नाहिशी झाली पाहिजेत. पण स्वत:चे सेवेसाठी समर्पण करणे म्हणजे स्वत:चे सरक्षण करणे हा नियम आहे. जे बी जमिनीत पेरले जाते तेच फळ देते, पुढे त्या फळापासून बी घेवून नंतर ते पुन्हा पेरले जाते. अशाप्रकारे कापणी ही वारंवार होवून बहुगुणित होते. पेरणारा बी पेरितो त्यामुळे बी टाकले जाते. मानवी जीवनांतही असेच आहे. जीव देणे म्हणजे जीव जगणे. जे जीवन परमेश्वर व मानव यांच्या स्वतंत्र्यपणे सेवेसाठी दिले जाते तेच जीवन सुरक्षित राहते. जे कोणी या जगात ख्रिस्तासाठी त्यांचे जीवन देतो त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल याद्वारे वा अशाप्रकारे त्यांचे जीवन सुरक्षित राखले जाते.COLMar 54.3

    बी जमिनीत पेरले जाते त्याला नवीन अंकुर येतो आणि अशाप्रकारे आम्हांस पुनरूत्थानाचा धडा शिकावयास मिळतो. जे सर्व कोणी परमेश्वरावर प्रिती करतील. त्यांना पुन्हा नवीन एदेन बागेत रहावयास मिळेल. मानवाचा देह मरणानंतर कबरेत ठेविला जातो. त्याविषयी परमेश्वर म्हणतो:.... “विनाशीपणात पेरले जाते ; अविनाशीपणात उठविले जाते. अपमानात पेरले जाते, गौरवांत उठविले जाते, अशक्त पणात पेरले जाते, सामर्थ्यात उठविले जाते.‘‘ १ करिंथ १५:४२, ४३.COLMar 54.4

    निसर्गातील दाखले पेरणारा व बी असे अनेक सजीव दाखले घेवून कितीतरी बोधपर धडे शिकविले जातील. आईबाप व शिक्षक या दृष्टीने हे दाखले व त्यातील कार्ये सर्व काही व्यावहारिक असे शिकवावे. मुलामुलींनी शेत वा वाफे तयार करून स्वतः बी पेरावे. ते वाफ्यांची मेहनत करीत असता त्यांच्या स्वत:च्या अंत:करणाविषयी अशीच मेहनत करणे जरूरीचे आहे, त्यात चांगले वा वाईट बी पेरणे याबाबत दक्षता घ्यावी आणि हे वाफे तयार करीत असता सत्याचे बी आपल्या अंत:करणात पेरणे यासाठीही तयारी करावी लागते. हे त्याना समजून सांगा बी जसे जमिनीत पेरले जाते ख्रिस्ताचे मरणापासून बोधपर धडा शिकविणे, अंकुर फुटून पाते बाहेर पडते. तद्वत ख्रिस्ताचे पुनरूत्थान हे सत्य शिकवावे, जशी त्या वनस्पतीची वाढ होईल त्याप्रमाणे नैसर्गिक वाढ व आध्यात्मिक वाढ ही समान शिकवीत राहावे.COLMar 55.1

    तरूणांना अशाच प्रकारे शिक्षण द्यावे. तरूणांनीही शेतात मेहनत करण्यास शिकावे, जर प्रत्येक शाळेत छोटीशी शेती असावी म्हणजे तेथे प्रात्यक्षिक कामे केली जातील. अशी शालेय शेती म्हणजे परमेश्वराचा शालेय वर्ग समजणे, निसर्गातील सर्व गोष्टी म्हणजे शालेय क्रमिक पुस्तक आणि त्यातून परमेश्वराच्या लेकरानी अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे व त्यामुळे त्यांच्या आत्म्यांची वाढ होवू शकते.COLMar 55.2

    जमिनीची मशागत करणे, शिष्यत्वाची कसोटी व शेताची काळजी घेणे ही समान गेली पाहिजेत. एकादे पडीक शेत घेणे व त्यात पेरणी करणे व त्यातून चांगले पीक मिळेल अशी अपेक्षा कोणीही करू नये. शेताची मेहनत करणे यात काळजीपूर्वक व सतत मेहनत करणेची गरज आहे व त्यानंतर बी पेरणे, मानवी अंत:करणाचे बाबतीत अशीच दक्षता घेवून अध्यात्मिक पेरणीची गरज आहे. जे कोणी अशाप्रकारे अत:करणाची तयारी करतील त्यानी परमेश्वराचे वचन त्यांच्या अंत:करणात घेऊन जावे. यामुळे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त होवून कठीण अत:करणे मऊ होतील व वचन स्विकारतील. अशाप्रकारे कठीण अंत:करणे मऊ होवून पीकाच्या कापणीस तयार होतील. पवित्र आत्म्याने अंत:करण नम्र केले जाते, शिस्तबध्द होते व त्यानंतर परमेश्वराच्या गौरवार्थ विपुल पीक देते.COLMar 55.3

    जर आपण शेताची मशागत घाईने केली तर त्यातून म्हणावे तसे पीक येणार नाही. त्यासाठी त्या शेतात काळजीपूर्वक व दररोज काम केले पाहिजे. शेताची चांगली खोलवर नांगरणी करणे की त्यामुळे निदण वा तण अजिबात राहणार नाही. मेहनतीने शेताला कस वा पोत येते व बी चांगली उगविते. जे कोणी अशा प्रकारे शेताची मेहनत करीतात त्यांना चांगली सुगी वा कापणी प्राप्त होते. असे काम, मेहनत करीत शेतावर आम्ही राहीलो तर आम्हाला आशाहीन व अभागी असे कधीच राहावे लागणार नाही. COLMar 55.4

    जे कोणी निसर्गातून प्राप्त होणारे वर्षाव यासाठी शेतावर मेहनत करीत राहतील त्यांना स्वास्थ आशिर्वाद प्राप्त होतील. शेताची मेहनत करीत असता कसला खजिना प्राप्त होईल याची कल्पना येणार नाही. पण पुर्वीच्या लोकांना जो अनुभव आला त्याचा फायदा घेणे, तो अनुभव नाकारू नये, कारण त्या लोकांनी कष्टाने, अनुभवाने व बुध्दीने माहिती मिळविली आहे, ती आपणास बोधपर धडे अशी आहेत. त्यामुळे आपल्यास शेतीचे व कामाचे प्रशिक्षण प्राप्त होते. शेताची मेहनत करणे यापासून त्यांच्या आत्म्यासाठी शिक्षण प्राप्त होते.COLMar 56.1

    जो (परमेश्वर) बीयापासून अंकुर येऊ देतो, जो (परमेश्वर) रात्रंदिवस त्या पीकाची वाढ करीतो, त्याला सामर्थ्य देतो, तोच परमेश्वर आपलाही सपादक आहे, स्वर्गीय राजा आहे, आणि त्याच्या लेकरांची तो (परमेश्वर) अधिक काळजी घेतो. आपले पृथ्वीवरील जीवनासाठी मानवी पेरणारा पेरणी करीतो, त्यांची काळजी घेतो, तर स्वर्गीय पेरणारा आमच्या अंत:करणात असे सत्य बी पेरितो की त्यापासून सार्वकालिक जीवन प्राप्त होते.COLMar 56.2