Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    आरोग्य

    आरोग्य हा आशीर्वाद आहे आणि यावर आपली बौद्धिक व शारीरिक सामर्थ्य वा शक्ति अवलंबून आहे हे फार थोडे लोक समजून घेतात. आपल्या भावना व इच्छा याना शरीरात स्थान आहे व त्यासाठी आपले शरीर हे उत्तम स्थितीत ठेवावे शिवाय ते आध्यात्मिक जोराच्या खाली ठेवावे म्हणजे आपल्या सर्व देणगीचा पूर्णपणे उपयोग होईल. COLMar 263.3

    आपले शरीराची शक्ति जेणेकडून कमकुवत केली जाईल त्यामुळे आपले मनही कमी कर्तबगार होवून बरे वा वाईट यातील फरक समजणेस कमी पडते. पुढे पुढे आपण चांगले निवडणे यात कमकुमवत होतो व चांगले करणेसाठी जी इच्छ। शक्ति आहे ती ही कमी पडते.COLMar 263.4

    आम्ही आपल्या शरीराच्या शक्तिचा दुरूपयोग केला म्हणजे आयुष्यमान कमी होते की ज्यात आम्ही परमेश्वराचे गौरव करावयाचे आहे. आणि परमेश्वराने आम्हांस जे कार्य करावयास दिले त्यात आम्ही नापसंत होतो. आम्ही चुकीच्या सवयीच्या आहारी पडतो, जागरण जादा करितो, आरोग्याचा विचार न करिता आपण आवडेल ते खातो. यामुळे आपल्यास शरीराचा कमकुवतपणा येतो. आम्ही शारीरिक व्यायामाकडे दुर्लक्ष करितो. आम्ही आपल्या मनावर व शरीरावर कामाचा ताण जादा देतो त्यामुळे आपल्या मज्जातंतु संस्थेला आस्थिरता प्राप्त होते, वा समतोलपणा राहत नाही. जे कोणी अशा प्रकारे त्यांचे जीवनातील आयुष्यमान कमी करितात व निसर्गाचे नियम न पाळता सेवेला व कामाला उणे पडतात ते परमेश्वराची चोरी हा गुन्हा करितात आणि ते त्यांच्या सहबांधवांचीही चोरी करितात. आम्ही इतरांना आशीर्वादाची सेवा करावी ही जो परमेश्वराने दिलेली संधी, आमच्या शरीराच्या कमकुवतपणाने करिता येत नाही हा दोष आम्हावर राहणार आहे. त्यांचे जर आरोग्य चांगले सखोल असते तर त्यांना थोड्या दिवसात चांगले कार्य करता आले असते. आम्ही स्वत:ला चुकीच्या संवयीमुळे कमकुवत करितो व जगाला मिळणारा आशीर्वाद त्यांच्यापासून हिरावून घेतो तेव्हा परमेश्वर आम्हाला दोषी धरितो.COLMar 263.5

    शारीरिक आरोग्याचा नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे आध्यात्मिक आज्ञाचे उल्लंघन करणे होय. कारण परमेश्वर हा, आरोग्याचे नियम व आध्यात्मिक नियम या दोन्हींचा खरा अधिकारी आहे. कारण परमेश्वराने त्याचे नियम त्याच्या बोटाने प्रत्येक मज्जातंतु, प्रत्येक स्नायुतंतु प्रत्येक शरीरसंस्था यावर लिहिलेले आहेत व ही सर्व काही मानवास कारभारीपणा म्हणून दिली आहेत आणि म्हणून जर का आम्ही वरीलपैकी एका नियमाचा आपल्या शरीरात आज्ञाभंग झाला तर परमेश्वर आम्हांस जबाबदार धरणार आहे.COLMar 264.1

    प्रत्येकाला शरीर रचना व क्रियेची माहिती असावी, यासाठी की शरीराचे आरोग्य राखले जाईल व परमेश्वराचे कार्य उत्तम प्रकारे करता येईल. आम्ही आमचे शारीरिक जीवन उत्तम प्रकारे राखणे व कार्य करणे म्हणजे परमेश्वराचे गौरव योग्य प्रकारे करता येवून परमेश्वराचे गुणही प्रकट करता येतील. शारीरिक आरोग्य व आध्यात्मिक जीवन यांचा संबंध दाखविणारे शिक्षण फार महत्त्वाचे आहे. अशा संबंधाचे काळजीपूर्वक शिक्षण देणे यासाठी घरातील व शाळेतील लोकांनी काळजी घेतली पाहिजे. सर्वांना शारीरिक आरोग्याचे नियम माहीत असावेत, त्यासोबत निसर्गाचे नियंत्रण करणारे नियम यांचा संबंध काय आहे हे ही समजावे. जो कोणी शारीरिक आरोग्याचे नियमाविषयी अज्ञानी असतो व त्यामुळे त्या आज्ञांचे उल्लंघन करितो तो मनुष्य परमेश्वराविरूध्द पाप करितो. सर्वांनी त्यांची प्रवृत्ती व आरोग्य यांचा संबंध चांगला ठेवून त्यानी त्याचे जीवन उत्तम प्रकारे जगणे. आपल्या सर्व सवयी आपल्या मनाच्या ताब्यात पाहिजेत व आपले मन हे परमेश्वराच्या ताब्यात असावे.COLMar 264.2

    प्रेषित पौल म्हणतो, “तुमचे शरीर, तुम्हांमध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही आपले नव्हे; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहा; यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.‘‘ १ करिंथ ६:१९,२०.COLMar 264.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents