Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    दहा कुमारींचा दृष्टांत

    तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारीसारखे होईल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यांत पांच मूर्ख होत्या व पांच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणांबरोबर तेल घेतले नाही; शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलहि घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वास डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिव नीट करु लागल्या; तेव्हा मूर्खानी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत; पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित् आम्हांस व तुम्हांस पुरणार नाही; तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वत:करिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झालेली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दसऱ्याहि कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभुजी, प्रभुजी, आम्हांसाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांस खचित सांगतो, मी तुम्हांस ओळखीत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांस तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”मत्तय २५:११३.COLMar 317.1

    येशू ख्रिस्त आपल्या शिष्याबरोबर जैतूनाच्या डोंगरावर बसला आहे. डोंगराच्या मागे सूर्यास्त झाला असून, सायंकाळच्या रंगाने आकाश भरले आहे. समोरच रहाते घर प्रकाशाने झगमगत आहे, जणू एखादा सण आहे. उघडया दारा खिडक्यातून प्रकाशाचा झोत बाहेर पडत असून असे दिसून येते की लग्नास आलेले पाहुणे वरातीच्या सुरूवातीची प्रतिक्षा करीत आहेत. पूर्वेकडील बऱ्याच देशात लग्न-समारभाचा सोहळा सध्याकाळी होत असतो. नवरा मुलगा नवरीच्या घरी जावून तिला आपल्या घरी घेवून येत असे. दिवटयाच्या प्रकाशात ही वरात मुलीच्या बापाच्या घरापासून नवऱ्या मुलाच्या घरी जात असे. जेथे एका मोठया मेजवानीची तरतूद असे. ख्रिस्त जो देखावा पहात होता त्यामध्ये असे दिसून आले की या मिरवणुकीत सामील होण्यासाठी वधुकडील मंडळी थांबली आहे.COLMar 317.2

    नवऱ्या मुलाच्या घराजवळ शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या दहा कुमारी घटमळत आहेत. प्रत्येकीच्या हातात पेटलेले दिवे व तेलाचे भाडे आहे. सर्व वर येण्याची वाट पाहात आहेत पण वराला विलंब झाला. तासन् तास निघून गेले; वाट पाहणारे थकले व झोपी गेले. मध्यरात्री अशी हाक आली की, “पाहा वर आला आहे, त्याला सामोरे चला’ झोपलेले खडखडून जागे झाले व उठून उभे राहिले. त्यांनी पाहिले की मिरवणुक सुरू झाली आहे. प्रकाशाने झगमगलेली व संगीताने बहरलेली. त्यांनी वराचा व वधुचा आवाज ऐकला. दहा कुमारीनी आपले दिवे घेतले व नीट करू लागल्या कारण त्यांना मिरवणुकीत लवकरच सामील व्हावयाचे होते. पण पाच जणीनी आपल्या भाडयात तेल घेतले नव्हते. इतका उशीर होईल असे त्यांना वाटले नव्हते व अशा प्रसंगासाठी त्यांनी तयारी केली नव्हती. दु:खाने त्या आपल्या शहाण्या कुमारीस म्हणाल्या की, “आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे विझु लागले आहेत‘‘ परंतु त्या पाच शहाण्या कुमारींनी आपले दिवे नीट केले व त्यामध्ये भाडयामधील तेल भरले. त्यांच्याकडे अधिक तेल राहिले नाही. त्यांनी उत्तर दिले की, “कदाचित आम्हांला व तुम्हाला पुरणार नाही, तुम्ही विकणऱ्याकडे जावून स्वत:करिता विकत घ्यावे हे बरे‘‘. COLMar 318.1

    त्या मूर्ख कुमारी तेल विकत घ्यावयास गेल्या असता वर आला व त्याना सोडून मिरवणूक निघून गेली. ज्या दुसऱ्या पाच ज्याचे दिवे पेटलेले होते त्या मिरवणूकीबरोबर वराच्या घरी पोहचल्या व दार बंद झाले. जेव्हा मुर्ख कुमारी मेजवानीच्या दालनात आल्या तेव्हा त्याना अनपेक्षित नकार ऐकावयास मिळाला. मेजवानीच्या कारभाऱ्याने त्यांना सांगितले की, “मी तुम्हांस ओळखीत नाही”अधाऱ्या रात्री, एकात रस्त्यावर त्याना उभे रहावे लागले.COLMar 318.2

    वराच्या येण्याची प्रतिक्षा करणाऱ्या पाहण्यांना पाहन ख्रिस्ताने दहा कुमारीचा दाखला शिष्यांना सांगितला व त्याच्या अनुभवावरून त्यांना येशूच्या द्वितीय आगमनाच्या अगोदर पृथ्वीवरील मंडळीची स्थिती कशी असेल याची कल्पना दिली.COLMar 318.3

    जे दोन गट प्रतिक्षा करीत आहेत ते दोन प्रकारचे लोक ख्रिस्ताची वाट पाहात आहेत त्याचे दर्शक आहेत. त्याना कुमारी म्हटले आहे कारण ते आपला विश्वास शुध्द आहे असा दावा करतात. दिवे हे देवाच्या वचनाचे दर्शक आहे. स्तोत्रकर्ता म्हणतात की, “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे’ स्तोत्रसंहिता ११९:१०५ तेल हे पवित्र आत्म्याचे दर्शक आहे. जखऱ्याच्या भविष्यवाणीमध्ये पवित्र आत्मा अशाप्रकारे दर्शविला आहे”तेव्हा मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मजकडे परत आला “तो पुढे म्हणतो,‘‘ व जसे झोपेतून एखादयास जागे करितात तसे त्याने मला जागे केले. त्याने मला विचारले, तुझ्या दृष्टीस काय पडते? मी म्हणालो, माझ्या दृष्टीस असे पडते की एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळया आहेत; आणि त्याच्या जवळ कटोऱ्याला उजव्या व डाव्या बाजूस दोन जैतुनाची झाडे आहेत. तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या देवदूताला मी विचारिले, माझ्या प्रभो ही काय आहेत ?... तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरूबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिध्दी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो... मी त्याला विचारले या दोन सुवर्णाच्या तोटयाजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्त्रवणाऱ्या हया दोन जैतुनाच्या फांदया काय आहेत ?... तेव्हा तो म्हणला, आखिल पृथ्वीच्या प्रभुजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत‘‘ जखऱ्या ४:१-१४.COLMar 318.4

    दोन जैतुनाच्या झाडातून सुवर्ण नळयाद्वारे, सुवर्णरूपी तेलाचा प्रवाह दीपवृक्षाच्या एका कटोऱ्यामध्ये जमा होतो व त्यानंतर सोनेरी दिव्याद्वारे पवित्रस्थानाला प्रकाश मिळतो. अशाप्रकारे जे पवित्र परमेश्वराच्या सान्निध्यात उभे आहेत त्याच्याकडून परमेश्वराचा आत्मा जे परमेश्वराच्या कार्याला वाहून दिले आहेत त्यांना दिला जातो. हे जे दोन अभिषिक्त आहेत त्याचे हे कार्य आहे की ती स्वर्गीय कृपा जे देवाचे लोक त्याना देणे कारण तीच कृपा त्यांना देवाचे वचन त्यांच्या पावलाकरिता दिव्यासारखे व त्याच्या मार्गावर प्रकाशासारखे होईल. “बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिध्दी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.‘‘ जखऱ्या ४:६.COLMar 319.1

    या दाखल्यामध्ये सर्व दहा कुमारी वराला सामोरे जाण्यास गेल्या. प्रत्येकी जवळ दिवे व तेलासाठी भांडी होती. त्या दोन गटात सुरूवातीला काहीच फरक दिसला नाही. त्याचप्रकारे येशूच्या द्वितीय अगमना अगोदरची जी मंडळी आहे त्यांना पवित्र वचनाचे ज्ञान आहे. प्रत्येकाने ख्रिस्ताच्या येण्याची सुवार्ता ऐकली आहे व ते ख्रिस्ताच्या येण्याची अपेक्षा विश्वासाने करीत आहेत पण दाखल्यात सांगितल्या प्रकारची स्थिती आहे. वाट पाहण्याची वेळ मध्ये येते, विश्वासाची परीक्षा होते; आणि जेव्हा अशी हाक येते पाहा, वर आला आहे त्याला सामोरे चला, “तेव्हा पुष्कळ तयार नाहीत. त्याच्या भाडयात व दिव्यात तेल नाही. ते पवित्र आत्मा नसलेले असे आहेत.COLMar 319.2

    परमेश्वराच्या आत्म्याविना त्याच्या वचनाची माहिती असणे व्यर्थ आहे. सत्याच्या सोबतीला जर पवित्र आत्मा नाही तर आत्मा जिवंत होणार नाही किंवा अंत:करण पवित्र होणार नाही. एखादयाला दहा आज्ञाची पवित्र शास्त्रातील आश्वासनाची कल्पना असेल; पण जोपर्यंत त्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा नाही तर त्याच्या वर्तणुकीत बदल होणार नाही. जो पर्यंत आत्म्याची माहिती मिळत नाही तो पर्यंत माणसाला सत्य व असत्य यामधील फरक समजणार नाही व ते सैतानाच्या मोहात सापडतील.COLMar 320.1

    ज्या गटाचे दर्शक मुर्ख कुमारी आहेत ते लोक ढोंगी नाहीत. ते सत्याचा आदर करतात, त्यांनी सत्याचे समर्थन केले आहे; ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडे ते आकर्षिले होते. परंतु पवित्र आत्म्याच्या कार्याला ते शरण गेले नाहीत. ते स्वत:हन येशू ख्रिस्त जो “खडक’ आहे त्यावर पडून आपल्या जुन्या वृतीला ते मुकले नाहीत. हा गट खडकाळ जमिनीप्रमाणे असलेल्या अंत:करणप्रमाणे आहे. ते तत्परतेने सत्याचा स्वीकार करतात पण ते सत्य ते आत्मसात करीत नाहीत. त्याचा परिणाम कायम राहत नाही. मनुष्याच्या अनुमतीने व इच्छेने त्याच्यावर पवित्र आत्म्याचे कार्य होते व त्याची वर्तणूक बदलून जाते. पण मुर्ख कुमारी ज्या वर्गाचे दर्शक आहेत तो वर्ग वरवरच्या देखाव्यात समाधानी आहे. ते देवाला ओळखीत नाहीत. देवाच्या स्वभावाचा त्यांनी अभ्यास केला नाही; देवाबरोबर त्यांनी संबंध ठेवला नाही; त्यामुळे भाव कसा ठेवावा, कसे पहावे व कसे जगावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या सेवेचा हास होतो व ती एक औपचारिकता होवून जाते. “जनसभेतल्याप्रमाणे ते तुजकडे येवून माझ्या लोकांच्या रितीप्रमाणे तुजपुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडानि गोड गोड गोष्टी बोलतात पण त्यांचे मन लोभवश झाले आहे‘‘ यहेज्केल ३३:३१. प्रेषित पौल सांगतो येशू ख्रिस्ताच्या द्वितीय अगमना अगोदर जे राहतील त्याची स्थिती अगदी अशी होणार आहे. “शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी... देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी; सुभक्तीचे केवळ बाहयरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील‘‘ तीमथ्याला दुसरे पत्र ३:१-५.COLMar 320.2

    हाच वर्ग जो संकटसमयी शांती व संरक्षण म्हणून ओरडेल. ते स्वत:ला सुरक्षित आहोत याची हमी देतात व त्यांना धोक्याची कल्पना येत नाही. जेव्हा ते आपल्या गुगीतून दचकून उठतील तेव्हा आपण किती कंगाल झाली आहोत हे ते ओळखतील, तेव्हा आपल्या कमतरतेची भरपाई दुसऱ्याने करावी म्हणून विनंती करतील, पण आध्यात्मिक बाबीमध्ये एक दुसऱ्याची भरपाई करू शकत नाही. प्रत्येकाला प्रभुची कृपा मोफत देण्यात आली आहे. सुवार्तेचा संदेश जाहीर केलेला आहे. “तान्हेले येवो ; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो’ प्रकटीकरण २२: १७. एखाद्याचा स्वभाव दुसऱ्याला देता येत नाही. दुसऱ्यासाठी कोणी विश्वास धरू शकत नाही. आत्म्याचा स्वीकार कोण दुसऱ्यासाठी करू शकत नाही. आत्म्याच्या कार्यामुळे जो स्वभाव एखाद्यामध्ये आला आहे तो स्वभाव कोणी दुसऱ्याला देवू शकत नाही. “तर प्रभु परमेश्वर म्हणतो माझ्या जीवीताची शपथ, नोहा, दानीएल व ईयोब हे त्यात (प्रदेशात) असले तरी त्यांस पुत्रांचा किंवा कन्यांचा बचाव करिता येणार नाही; ते आपल्या धार्मिकतेमुळे फार तर आपला जीव वाचवतील.‘‘यहेज्केल १४:२०.COLMar 320.3

    संकटसमयीच वर्तणुकीची परिक्षा होते. मध्यरात्री जेव्हा हाक आली, “पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला, आणि झोपलेल्या कुमारी जेव्हा जाग्या झाल्या तेव्हाच दिसून आले की या प्रसगासाठी कोणी तयारी केली आहे. दोन्हीही गट बेसावध होते, तरी हया आणीबाणीसाठी एका गटाने तयारी केली होती तर दसऱ्याने तयारी केली नव्हती. मग आता, अचानक व ज्याची अपेक्षा केली नव्हती असा प्रसंग ज्याद्वारे मरणासमोर उभे रहावे लागले व त्यावरून समजून येते की त्यांचा विश्वास परमेश्वराच्या आश्वासनावर होता किंवा नाही. त्यावरून दिसून येईल की, आत्म्याला परमेश्वराकडून सामर्थ्य मिळते का नाही. मानवाच्या उमेदवारीची मुदत संपण्याच्या वेळी शेवटची महान परीक्षा येईल व अशा वेळी आत्म्याची गरज भागविण्याची वेळ निघून जाईल.COLMar 321.1

    दहा कुमारी या जगाच्या इतिहासाच्या सायकाळी प्रतिक्षा करत आहेत. त्या सर्व स्वत:ला ख्रिस्ती समजतात. प्रत्येकीला आदेश आला आहे; त्याना नाव व दिवा आहे व त्या परमेश्वराचे कार्य करत आहेत. येशूच्या येण्याची वाट प्रत्येकजण पाहात आहे पण पाच तयार नाहीत. पाच जणीला आश्चर्याचा धक्का बसेल व मेजवानीच्या दालनाबाहेर त्यांची त्रेधा उडेल.COLMar 321.2

    शेवटच्या दिवशी येशूच्या राज्यात प्रवेशाबद्दल काही लोक अधिकार वाणीने सांगतील, “प्रभो, आम्ही तुझ्या बरोबर जेवलो, पाणी प्यालो, आणि आमच्या गावात तु आम्हाला शिकवण दिलीस‘‘ “प्रभो, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय ? पण त्यांना उत्तर मिळेल की, “मला तुमची कधीच ओळख नव्हती... माझ्यापुढून निघून जा‘‘ लूक १३:२६.२७; मत्तय ७:२२, या जीवनामध्ये त्यांनी ख्रिस्ताबरोबर संबध ठेवला नव्हता; म्हणून त्यांना स्वर्गीय भाषा समजत नाही, आनंदाला ते मुकले आहेत. “मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्यावाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही’ १ करिंथ २:११.COLMar 321.3

    मर्त्य मानवाच्या कानावर अति दुःखद शब्द कोणते पडत असतील ते ते नाशाचे असतील. ते म्हणजे, “मी तुम्हाला ओळखीत नाही‘‘ आत्म्याची संगत जिचा तुम्ही अनादर केला आहे केवळ तीच, लग्न मेजवानीच्या प्रसंगी तुम्हाला आनंद देणार आहे. त्या मेजवानीत तुम्ही भाग घेवू शकणार नाही. त्याचा प्रकाश तुमच्या बंद डोळयावर, त्याचे मधुर संगीत बहिऱ्या कानावर पडेल. या बाधीत झालेल्या जगात त्याचे प्रेम व आनंद हर्ष देणार नाही. या स्वर्गीय सहवासापासून तुम्ही तुमच्या चुकीमुळे अलीप्त राहाल.COLMar 322.1

    “वर आला आहे’ अशी हाक आल्यावर उठून आपले रिकामे दिवे भरून प्रभुला भेटण्याची तयारी करू शकत नाही. इथे आपण ख्रिस्ताला आपणापासून दूर ठेवून स्वर्गामध्ये त्याचा सहवास लाभण्याची अपेक्षा करू शकत नाही.COLMar 322.2

    या दाखल्यामधील शहाण्या कमारी बरोबर दिवा व त्याच्या भाडयामध्ये तेल होते. वराची वाट पहात असलेल्या रात्री त्याचे दिवे जळत होते. त्या प्रकाशामुळे वराच्या घरात प्रकाश वाढला व त्याचा मान सुध्दा वाढला. त्या अंधाऱ्या रात्री त्याच्या दिव्यामुळे नवरदेवाच्या घरी जेथे लग्नाची मेजवानी होती तिकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रकाश पडला होता.COLMar 322.3

    त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या अनुयायानी या अंधाऱ्या जगात प्रकाश पाडावयाचा आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराचे वचन प्रकाश आहे व ते ज्यांना मिळते त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणते. परमेश्वराचे वचन त्यांच्या हृदयात बिंबविल्याद्वारे पवित्र आत्मा त्यांच्यात परमेश्वराचे विशेष गुणधर्म वाढवितो. परमेश्वराच्या गौरवाचा प्रकाश व त्याची वर्तणूक त्याच्या अनुयायामध्ये चमकते. त्याद्वारे ते वराच्या घरी म्हणजे देवाची नगरी जेथे कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी होणार तो रस्ता प्रकाशमान करून ते देवाचे गौरव करतील.COLMar 322.4

    वराचे येणे अगदी मध्यरात्री अति अंधाराच्या समयी होणार म्हणजे या पृथ्वीच्या इतिहासातील अती अंधाऱ्या समयी ख्रिस्ताचे येणे हाईल मनुष्याच्या पुत्राच्या येण्या अगोदरच्या दिवसाचे वर्णन नोहाच्या व लोटाच्या दिवसाच्या वर्णनाने करता येईल. या दिवसाबद्दल सांगत असता पवित्र शास्त्र सांगते की, सैतान सर्व शक्तिनिशी आणि “सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट हयांनी युक्त असे त्या अनितीमानाचे” कार्य करील. (२ थेस्सलनी २:९,१०) सैतानाच्या कार्याचे प्रकटीकरण वाढणारा अंधार, वाढणाऱ्या चुका, थोतांड विचार व भ्रम यामुळे होईल. सैतान हया पृथ्वीला नुसता कैद करीत नसून तो फसवून आजच्या ख्रिस्ताच्या मंडळयांना बिघडवून टाकीत आहे. ती धर्मभ्रष्टता अंधाऱ्या रात्रीच्या मध्यान्हीप्रमाणे वाढेल. लोकराच्या गोणपाटाप्रमाणे अभेद्य होईल. देवाच्या लोकासाठी ती परीक्षेची रात्र, शोकाची रात्र व सत्यासाठी छळाची रात्र होईल. पण त्या अंधाऱ्या रात्रीतून परमेश्वराचा प्रकाश चमकेल.COLMar 322.5

    परमेश्वर “अंधारातून उजेड प्रकाशित‘‘ करतो (२ करिंथ ४:६) जेव्हा, “पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता‘‘ उत्पत्ति १:२,३ म्हणून आध्यात्मिक अंध:काराच्या वेळी परमेश्वराचे वचन सांगते, “प्रकाश होवो’ आपल्या लोकाना परमेश्वर सांगतो, “उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुजकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुजवर उदय पावले आहे‘‘ यशया ६०:१. COLMar 323.1

    पवित्रशास्त्र सागते, “पाहा, अंध:कार पृथ्वीला झाकीत आहे; निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे; पण तुजवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुजवर दिसत आहे.‘‘ यशया ६०:२.COLMar 323.2

    परमेश्वराबद्दलचा चुकीचा समज जगाला झाकीत आहे. परमेश्वराच्या वर्तणुकीचे ज्ञान लोक विसरत आहेत. त्यांचा गैरसमज झाला आहे. ते परमेश्वराबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. अशा वेळेला परमेश्वराच्या संदेशाची घोषणा केली पाहिजे, जो संदेश प्रकाश पाडणारा व तारणाची शक्ति असलेला असावा. त्या संदेशाची लोकांना कल्पना यावी. या अंधाऱ्या जगामध्ये परमेश्वराच्या गौरवाचा, त्याच्या चांगुलपणाचा, दयेचा व सत्याचा प्रकाश पडावा.COLMar 323.3

    या कामाची रूपरेषा यशया संदेष्टयाने खालील शब्दात दिली आहे. “यरूशलेमेस सुवार्ता सांगणाऱ्या आपला स्वर जोरात उंच कर, भिऊ नको, यहुदाच्या नगरास म्हण, तुमचा देव पाहा. पाहा प्रभु परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याजजवळ आहे व प्रतिफळ त्याच्या हाती आहे. यशया ४०:९,१०.COLMar 323.4

    जे वराची वाट पाहात आहेत ते लोकास म्हणतील, “तुमचा देव पाहा’ दयेच्या प्रकाशाचे शेवटचे किरण, जगाला देणारा शेवटचा कृपेचा संदेश, परमेश्वराच्या प्रितीचे दर्शन आहे. देवाच्या लेकरांनी परमेश्वराचे गौरव प्रदर्शित करावयाचे आहे. परमेश्वराच्या दयेने त्याच्यासाठी जे काही केले आहे ते त्याच्या जीवनावरून व वर्तणुकीतून दिसून यावे.COLMar 323.5

    नीतिमत्वाच्या सूर्याचा प्रकाश त्याच्या चांगल्या कामात, सत्य वचनात व पवित्र कत्यात दिसून यावा.COLMar 324.1

    येशू ख्रिस्त जो परमेश्वराच्या गौरवाची शोभा अधिक वाढवितो तो या पृथ्वीवर प्रकाश म्हणून आला. तो परमेश्वराचा मानव जातीला परमेश्वराचा प्रतिनिधी होता. त्याच्याबद्दल असे लिहिले आहे की नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला व तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वाना बरे करीत फिरला. प्रे.कृ. १०:३८. नासरेथांतील सभास्थानात तो म्हणाला होता, “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केले आहे. त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्याची सुटका व आंधळयास पुन्हा दृष्टीचा लाभ हयाची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षावाची घोषणा करावी”. लूक ४:१८,१९. आणि हेच काम ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना करावयास सांगितले.”तुम्ही जगाचा प्रकाश आहा,’ तो म्हणाला “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यानी तुमची सत्कर्मे पाहन तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे‘‘ मत्तय ५:१४, १६. COLMar 324.2

    याच कार्याचे वर्णन यशया संदेष्टा खालील शब्दात करतो,“तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय ? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुझे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल’ यशया ५८:७,८.COLMar 324.3

    अशाप्रकारे आध्यात्मिक अंधाऱ्या रात्री परमेश्वराचे गौरव त्याच्या मंडळीद्वारे असे चमकावे की जे वाकले आहेत त्यांनी उभे राहावे व जे शोक करतात त्याचे सांत्वन व्हावे.COLMar 324.4

    आपल्या सभोवती जगिक दुःखाचे रडणे ऐकू येत आहे. प्रत्येक बाजूला गरजा व दु:ख पसरले आहे. त्यांच्या जीवनातील कठिनाई व दःख कमी करणे हे आपले कर्तव्य आहे.COLMar 324.5

    केवळ उपदेश करण्यापेक्षा कृती केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल. जे भुकेले आहेत त्यांना अन्न, नग्न आहेत त्यांना वस्त्र व जे बेघर आहेत त्यांना आसरा आपण दिला पाहिजे. यापेक्षाही अधिक करण्याचे आव्हान आपणास आहे. आत्म्यातील कमी केवळ ख्रिस्ताच्या प्रितीनेच भरून निघेल. जर आपणामध्ये ख्रिस्त वास करीत असेल तर आपणामध्ये दैवी सहानुभूती भरलेली असेल. आपणामध्ये असलेल्या ख्रिस्तासारख्या प्रेमाचा झरा सुप्त असेल तर तो जिवंत होईल.COLMar 324.6

    गरजुसाठी परमेश्वर आपणाकडून केवळ देणग्या देण्याचीच अपेक्षा करीत नाही तर आपल्या हासऱ्या चेहऱ्याची, आपल्या आशेच्या शब्दाची व आपल्या प्रेमळ आलिंगनाची अपेक्षा करतो. जेव्हा ख्रिस्ताने रोग्यांना बरे केले तेव्हा त्याने आपला हात त्यांच्यावर ठेवला. म्हणून आपण ज्यांचा फायदा करू इच्छितो त्याच्या जवळ येवून त्यांना स्पर्श करावा.COLMar 325.1

    असे बरेच आहेत ज्यांच्यापासून आशा निघून गेली आहे. त्यांना आशेची किरणे आणा. काही जणांचे साहस कमी झाले आहे. त्यांच्याबरोबर आनंद खुशीचे शब्द बोला. त्यांच्या बरोबर प्रार्थना करा. काही जणांना जीवनी भाकर हवी आहे. त्याच्यासाठी पवित्र शास्त्रातून वचने वाचा. कित्येकाचा आत्मा दु:खी आहे त्यावर जगिक मलमाचा किंवा वैद्याचा उपाय चालणार नाही. त्या आत्म्यासाठी प्रार्थना करा, त्यांना ख्रिस्ताकडे आणा. त्यांना सागा की, गिलादामध्ये त्याच्यासाठी मलम आहे. त्यांच्यासाठी तेथे वैद्य आहे.COLMar 325.2

    प्रकाश आशिर्वाद आहे, जागतिक आशिर्वाद जो या अपकारिक, अपवित्र नितीभ्रष्ट पृथ्वीवर आपले सर्वस्व ओतत आहे. हीच गोष्ट धार्मिकतेचा पुत्र यांच्या बाबतीत आहे. ही संपूर्ण पृथ्वी पापांच्या, दु:खाच्या व यातनाच्या अधाराने व्यापली गेली आहे. तिला परमेश्वराच्या प्रितीच्या ज्ञानाने प्रकाशित करावयाची आहे. स्वर्गीय सिंहासनापासून येणारा प्रकाश कोणत्याही संप्रदायाने, वर्गाने किंवा जातीने वगळून टाकू नये. COLMar 325.3

    जगाच्या कानाकोपऱ्यात आशेचा व दयेचा संदेश सांगावयाचा आहे. ज्याची ज्यांची इच्छा आहे ते पुढे येतील, ‘परमेश्वराचे सामर्थ्य प्राप्त करतील आणि परमेश्वराशी शाती प्रस्तापित करतील. मध्यरात्रीच्या अंधारात विदेशी कदापी चाचपडत राहणार नाहीत. धार्मिकतेचा सूर्य याच्या प्रकाशापुढून अंध:कार पळून जाईल. नरकाच्या सामर्थ्यावर विजय मिळविला आहे.COLMar 325.4

    परंतु ज्याला प्राप्तच झाले नाही ते तो दुसऱ्याला देवू शकत नाही. परमेश्वराच्या कार्यांत मानवजात काही साध्य करू शकत नाही. कोणीही मनुष्य आपल्या स्वत:च्या सामर्थ्याने देवासाठी प्रकाश वाहक होऊ शकत नाही. स्वर्गीय संदेश वाहकाने सुवर्णरूपी तेल, सुवर्णनळयाद्वारे, सोनेरी कटोरीतून पवित्र स्थानाच्या दिव्यात ओतले जाते व त्यामुळे पवित्र स्थानाला सदोदित चमकणारा शुभ्र प्रकाश मिळतो. देवाची प्रिती जी मानवात येते तीच दुसऱ्याला प्रकाश देवू शकते.COLMar 325.5

    जे विश्वासाने प्रभूमध्ये एक झाले आहेत त्यांच्या हदयांत प्रितीचे सुवर्णरूपी तेल वहाते व तेथून ते चांगल्या सेवेच्या रूपात, सत्य व परमेश्वराच्या चांगल्या सेवेद्वारे बाहेर वाहते.COLMar 326.1

    पवित्र आत्म्याच्या महान व अमोल देणगीमध्ये सर्व स्वर्गीय साधनांचा समावेश आहे. परमेश्वराच्या बंधनामुळे त्याच्या कृपेची संपत्ति पृथ्वीपर्यंत वाहात नाही असे नाही. जर ते मिळण्याची सर्वाची इच्छा असेल ते त्याच्या आत्म्याने सर्व भरून जातील.COLMar 326.2

    या जगाला परमेश्वराच्या कृपेची सामुग्री व ख्रिस्ताची महान संपती पुरविण्याचा, जिवंत मार्ग बनण्याची सूवर्ण संधी प्रत्येक आत्म्याला आहे. जगाला परमेश्वराचा आत्मा व त्याची वागणुक दाखवून देणारा प्रतिनिधी व्हावे यापेक्षा अधिक अपेक्षा परमेश्वराची नाही. मनुष्याद्वारे परमेश्वराच्या प्रेमाचे दर्शन जगाला घडवून आणणे यापेक्षा अधिक कार्याची गरज जगाला तुमच्या करवी नाही. ज्या मार्गाद्वारे सुवर्णरूपी तेल ओतले जाईल व त्याद्वारे मानवी अंत:करणाला आनंद व आशिर्वाद मिळेल तो मार्ग तुम्ही व्हावा म्हणून सर्व स्वर्ग थांबला आहे.COLMar 326.3

    आपल्या मंडळीचे शारीरिक परिवर्तन व्हावे या जगाचा प्रकाश ख्रिस्त याच्या प्रकाशाने प्रकाशित व्हावे व इम्मानुएलाचे गौरव मिळवावे यासाठी ख्रिस्ताने सर्व व्यवस्था केली आहे. प्रत्येक विश्वासक आध्यात्मिक प्रकाशाच्या वातावरणाने व शांतीने गुंडाळला जावा अशी ख्रिस्ताची नितात इच्छा आहे. आपल्या जीवनात त्याचा आनंद प्रदर्शित व्हावा अशी परमेश्वराची इच्छा आहे.COLMar 326.4

    आपल्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो हे आपल्यामधून वाहणाऱ्या स्वर्गीय प्रितीद्वारे दिसून येते. स्वर्गीय पूर्णता समर्पित व्यक्तितून वाहात जाईल व दुसऱ्याला त्याचा लाभ होईल.COLMar 326.5

    धार्मिकतेचा सूर्य “याच्या पंखाच्या ठायी आरोग्य असेल‘‘ मलाखी ४:२; म्हणून प्रत्येक खऱ्या शिष्यातून जीवन, धैर्य व मदत करण्याची इच्छा यासाठी नैतिक बळाचा प्रसार होणार आहे.COLMar 326.6

    ख्रिस्ताची धार्मिकता ही पाप क्षमेपेक्षा अधिक असून तिचा हा अर्थ आहे की आपले पाप काढून घेवून त्या पोकळीमध्ये पवित्र आत्म्याची कृपा भरणे. तसेच त्याचा असा अर्थ होतो की, स्वर्गीय प्रकाश पाडणे व ख्रिस्तात आनंद करणे. त्याचा अर्थ स्वप्नापासून अंत:करण मोकळे करणे व त्यामध्ये ख्रिस्ताचे वास्तव्य भरणे. जेव्हा आत्म्यावर ख्रिस्ताचे राज्य असते तेव्हा आत्म्यात शुध्दता व पापापासून मुक्ती याचे वास्तव्य असते. गौरव, परिपूर्णता व सुवार्तेच्या योजनेची समाप्ती आपल्या जीवनात पूर्ण होते. तारणाऱ्याचा स्वीकार केल्यावर पूर्ण शांति, पूर्ण प्रिती व पूर्ण शाश्वती मिळेल. ख्रिस्ताच्या जीवनाचे सौंदर्य व त्यांची वागणूक आपल्या जीवनात प्रदर्शित केल्यामुळे परमेश्वराने आपल्या पुत्राला आमचा तारणारा म्हणून पाठविले होते, त्याचा पुरावा मिळतो.COLMar 326.7

    प्रकाशमान होण्यासाठी आपल्या अनुयायांनी आटोकाट प्रयत्न करावा असे सांगत नाही. तुमचा प्रकाश पडो. जर तुम्हाला परमेश्वराची कृपा मिळाली आहे तर तुमच्यामध्ये प्रकाश आहे. तुमच्यातील अडथळे दूर करा व तुमच्यातील देवाचे गौरव दिसून येईल. अंधकार नाहीसा करण्यासाठी परमेश्वराचा प्रकाश शिरकाव करेल आणि तुमच्या कार्याच्या परिसरात तुम्ही चमकण्याचे थांबणार नाही.COLMar 327.1

    मानव रूपात त्याच्या स्वत:च्या गौरवाचे प्रकटीकरण, स्वर्ग इतका नजीक आणेल की जे सौंदर्य त्याच्या हदयाच्या मंदिराला शोभा देत आहे ते प्रत्येक आत्म्यात जेथे जेथे परमेश्वर विराजमान आहे तेथे दिसून येईल. त्यामध्ये वास करणाऱ्या ख्रिस्ताचे गौरव पाहून मानव चकीत होईल. गौरवाच्या व उपकारस्तुतीच्या प्रवाहामध्ये जे ख्रिस्ताने जिंकलेल्या अनेक आत्म्याकडून ते गौरव देणाऱ्या परमेश्वराकडे परत वाहत जाईल.COLMar 327.2

    “उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुजकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुजवर उदय पावले आहे.‘‘ यशया ६०:१ जे वराला सामोरे जात आहेत त्यांना एक संदेश दिला आहे. ख्रिस्त सामर्थ्याने व वैभवाने येत आहे. तो स्वत:च्या गौरवात व आपल्या पित्याच्या गौरवात येत आहे. आपल्या बरोबर असलेल्या सर्व पवित्र देवदूताबरोबर तो येत आहे. सर्व पृथ्वी अधकारामध्ये डुबली असता प्रत्येक संताच्या गृहात प्रकाश असणार. ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाचा पहिला प्रकाश या संताना मिळेल. त्यांच्या सौंदर्याचा शुध्द प्रकाश चकाकेल व ज्यानी ज्यानी ख्रिस्ताची सेवा केली सर्व तारणाऱ्या ख्रिस्ताची प्रशंसा करतील. दुष्ट ख्रिस्ताच्या सान्निध्यातून पळ काढत असता ख्रिस्ताचे अनुयायी हर्ष करतील. येशू ख्रिस्ताच्या द्वितीय अगमनाकडे पाहून कुलपिता ईयोब म्हणाला होता,“त्याला मी स्वतः पाहीन, अन्यायाने नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील‘‘ ईयोब १९:२७. जे आपल्या विश्वासू अनुयायासाठी ख्रिस्त रोजचा सहकारी व मित्र झाला आहे. ते परमेश्वराच्या अती नजीक राहतात व सदैव सहभागित्व करतात. त्याच्यावर परमेश्वराचे गौरव प्रगट झाले आहे. त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानचा प्रकाश, ख्रिस्ताच्या मुखावर प्रतिबिंबीत झाला आहे. वैभवशाली राजाच्या गौरवात व अंधुक न होणाऱ्या प्रकाशात ते हर्ष पावत आहेत. स्वर्गाच्या सहभागासाठी त्याची तयारी झाली आहे कारण त्यांच्या अंत:करणात स्वर्ग आहे.COLMar 327.3

    उंचावलेली अंत:करणे घेवून, धार्मिकतेच्या सूर्याच्या प्रकाशमान किरणाने चमकत, त्यांचा तारणारा लवकर येत आहेत म्हणून हर्ष करीत, ते अशी गर्जना करीत ते वराला भेटावयास सामोरे जातात, “हा आमचा देव! त्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील’ यशया २५:९.COLMar 328.1

    “तेव्हा जणू काय मोठया समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहाचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणालाः हालेल्या, कारण सर्वसमर्थ आमचा प्रभु देव हयाने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वत:ला सजविले आहे... तेव्हा तो मला म्हणाला : हे लिहि की, कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य‘‘ “... तो प्रभुंचा प्रभु आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासु आहेत.‘‘ प्रकटी १९:६-९; प्रकटी १७:१४.COLMar 328.2

    “कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे,
    परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो
    जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
    COLMar 328.3

    स्तोत्र ८४:११.

    “बधूजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो;
    तुम्हांस पूर्णता लाभो; समाधान मिळो,
    तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे
    प्रितीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील’
    COLMar 328.4

    २ करिंथ १३:११.

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents