Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय २६ वा—अन्यायाच्या धनाने मित्र

    लूक १६:१-९ यावर आधारीत

    “त्याने शिष्यांसही म्हटले, कोणी एक श्रीमत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता, त्याजवर हा तुमचे धन उडवितो, असा आरोप त्याकडे करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुजविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे; कारण यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही. मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी मजपासून कारभार काढून घेणार आहे, तर मी काय करूं? खणावयास मला शक्ति नाही; भीक मागावयास लाज वाटत. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलाविले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शभर मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा लेख घे आणि लवकर बसून यावर पन्नास मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे ? तो म्हणाला, शंभर खंडया गह. तो त्याला म्हणाला, हा तुझा लेख घे व ऐशी मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले यावरून धन्याने त्याची वाहवा केली; या युगाचे पुत्र स्वजातीविषयी प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा शहाणे असतात.”आणखी मी तुम्हांस सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा; हयासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांस सार्वकालिक वस्तीत घ्यावे. लूक १६:१-९.COLMar 281.1

    ख्रिस्ताचे येणे झाले त्यावेळी जागतिक परिस्थिती अति बिकट झाली होती. मनुष्य सार्वकालिक गोष्टीऐवजी ऐहिक गोष्टींत गुंतले होते, भावी गोष्टी ऐवजी तूर्तच्या गोष्टीवर त्यांची नजर होती. ते सर्व खरे सोडून बनावट वा खोटया गोष्टींच्या मागे लागले होते; तर काही जण खोटे ते खरे अशी बनावट करीत होते. त्यांना विश्वासाने अदृश्य भावी जग दिसत नव्हते. सैतानाने त्यांना या जगातील गोष्टी आकर्षक अशा सादर करीत या जीवनात गुंतविले व ते सर्वजण त्याच्या या मोहाना बळी पडले. COLMar 281.2

    वरील सर्व क्रम बदलून टाकण्यासाठी ख्रिस्त आला. मानव ज्या मोहाच्या जाळयांत पकडले होते ते नाहीसे करणेसाठी ख्रिस्त मार्ग शोधीत होता. येशू त्याच्या शिकवणीत स्वर्ग व पृथ्वी यांची मानवाविषयी जी अपेक्षा आहे ती सांगून तडजोड करीत होता, आणि मानवाचे विचार सध्याच्या काळांतून भावी काळाकडे नेत होता. लोक त्यांच्या काळात जो प्रयत्न करीत होते, त्यांतून त्यांनी सार्वकालिक तरतूद करावी असे आव्हान येशू करीत होता.COLMar 282.1

    “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता, त्याजवर हा तुमचे द्रव्य उडवितो, असा आरोप त्याकडे करण्यात आला.‘‘ त्या श्रीमंत मनुष्याने त्याची सर्व मालमत्ता त्याच्या कारभाऱ्याच्या हाती सोपविली होती; पण तो कारभारी अविश्वासू होता आणि धन्यास समजून आले की तो कारभारी पध्दतशीर धन्याची चोरी करीत होता, म्हणून धन्याने त्याला कामावरून काढून टाकणे हे ठरविले होते, आणि त्या कारभाऱ्याला सर्व हिशोब द्यावयास सांगितले. तो धनी म्हणाला, “तुजविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, “कारण यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही.”(लूक १६:१-२).COLMar 282.2

    कारभारी याने हिशोब दिला म्हणजे त्याच्यापुढे तीन मार्ग त्यातून त्याला निवड करावयाची होती. त्याने काम करावे, भिक्षा मागणे किंवा भुकेले राहाणे. मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी मजपासून कारभार काढून घेणार तर मी काय करूं? खणावयास तर मला शक्ति नाही, भीक मागावयास लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे. हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या देणेकऱ्यास बोलाविले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे ? तो म्हणाला शंभर मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा लेख घे आणि लवकर बसून यावर पन्नास माड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे ? तो म्हणाला, शंभर खंडया गहू. तो त्याला म्हणाला हा तुझा लेख घे व ऐशी मांड.”(लूक १६:३-८).COLMar 282.3

    या अविश्वासू कारभाऱ्यांने त्याच्या बरोबर इतरांना त्याच्या अप्रामाणिकपणाचे भागीदार केले. त्याच्या हितासाठी त्याने धन्याला फसविले, आणि या त्याच्या मदतीमुळे त्यांनी त्याला त्यांच्या घरी स्वीकार करणे हे भाग पडले.COLMar 282.4

    ‘अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरून धन्याने त्याची वाहवा केली”(लूक १६:८) ज्या मनुष्याने धन्यास फसविले त्याविषयी जगिक लोक त्याची वाहवा करीतात कारण तो किती हुशार होता. पण श्रीमंताने जी स्तुती केली तशी परमेश्वराची स्तुती नव्हती.COLMar 282.5

    ख्रिस्ताने त्या अनितीमान कारभाऱ्याची स्तुती केली नाही. तर त्या कारभाऱ्याने जे काही केले त्याचे उदाहरणावरून एका मुद्याचे स्पष्टीकरण करून धडा शिकविणे यासाठी त्याचा उपयोग केला. “अन्यायाच्या धनाने तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा; यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यानी तुम्हांस चिरकाल टिकणाऱ्या वस्तीत घ्यावे; (लूक १६:९).COLMar 283.1

    येशू जकातदार व पापी यांच्याबरोबर मिळून मिसळून राहातो म्हणून परूशी लोकांनी येशूवर टिका केली, निंदा केली. पण येशूची त्या लोकांवरील श्रध्दा कमी झाली नाही वा त्यांच्यासाठी कार्य करणे थांबविले नाही. येशूला दिसून आले की त्यांच्या नोकरीत त्यांना मोह आहे. त्यांच्या सभोवारचे वातावरण दुष्टतेचे होते. पहिले पाऊल चुकीचे होते, त्यानंतर ते अधिक अप्रामाणिकपणा व जादा गुन्हे अशा अधोगतीस वेगाने जाऊ लागले. ख्रिस्त त्यांना उच्च तत्त्व व ध्येय अशा जीवनात जिंकू पाहत होता. हा जो दाखला अन्यायी कारभारी याचा सांगितला त्यांत येशूचा वरील हेतु होता. या दाखल्यात उल्लेख केला त्याप्रमाणे काही जकातदार यांची गोष्ट तशीच होती, आणि ख्रिस्ताने जे वर्णन केले ते जणू काय काही जकातदारांचे होते. ते ऐकून ते जागृत झाले, आणि काहीजणांस त्यांच्या अप्रमाणिकपणाचे दृश्य दिसल व त्यापासून ते आध्यात्मिक धडा शिकले. COLMar 283.2

    हा दाखला प्रत्यक्षपणे शिष्यांना उद्देशून सांगितला. प्रथमतः शिष्यांना सत्याचे खमीर दिले. मग त्यांच्यापासून ते इतरांना द्यावयाचे होते. ख्रिस्ताची शिकवण प्रथमत: शिष्यांना समजली नाही, आणि जे सांगत असे ते बहधा शिष्य विसरून जात असत. पण पवित्र आत्म्याच्या प्रभावाने हे सत्य त्यांच्या स्मरणात येई व त्यांना त्यांतील सत्य स्पष्ट समजत असे. आणि शिष्याद्वारे मंडळींत नवीन सभासदांची भरती होत असे.COLMar 283.3

    “संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका‘‘ स्तोत्र ६२:१० ‘जे पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावी काय ? कारण गगनांत उडणाऱ्या गरूडासारखे पंख धन आपणांस लाविते.‘‘ नितीसुत्रे २३:५ ‘ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवितात; व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवितात. कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करीता येत नाही, किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी भरून देता येत नाही.‘‘ स्तोत्र ४९:६, ७.COLMar 283.4

    तारणारा येशू परूशी लोकांनाही बोलत होता. त्याच्या शब्दाचे सामर्थ्य त्याना दिसून येईल ही आशा येशूने सोडून दिली नव्हती. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली ते जसे वचन ऐकतील तो पुष्कळजण विश्वास ठेवितील; पुष्कळांचा पालट होईल, आणि किती तरी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे असे होतील.COLMar 283.5

    परूशी लोक येशूवर दोषारोप ठेवीत होते की हा जकातदार व पापी यांच्यात मिळून मिसळून राहतो. अशाप्रकारे त्याची अप्रतिष्ठा करू पाहत होते. तोच दोषारोप येशू परूशी लोकांविषयी सांगतो. हे जे दृश्य आहे या जकातदार लोकांत होते. त्याला कारण म्हणजे हे परूशी लोक आणि यावर उपाय केवळ परूशी लोकांनी त्यांच्या चुका दुरूस्त करणे.COLMar 284.1

    अविश्वासू कारभाऱ्यास त्याच्या धन्याची मालमत्ता देण्याचे कारण म्हणजे तिचा उपयोग उदारहस्ते करणे ; पण त्याने त्या मालमत्तेचा उपयोग केवळ स्वत:साठी केला. अशीच परिस्थिती इस्त्राएल लोकांची होती. परमेश्वराने अब्राहामाच्या संतानाची निवड केली. परमेश्वराने पराक्रमी हस्तवापरून इस्त्राएलांची मिसर देशांतील गुलमगिरीतून सुटका केली. जगाला आशिर्वाद प्राप्त व्हावा म्हणून इस्त्राएलांना आशिर्वादाचा संग्रह असे केले. इस्त्राएल लोकांनी प्रकाश देणे व सल्ला देणे असे व्हावे म्हणून त्यांना मानाचे स्थान दिले. पण परमेश्वराच्या कारभारी लोकांनी या सर्व देणगीचा उपयोग स्वत:चे हित व हुद्दा यासाठी करीत गेले. COLMar 284.2

    परमेश्वराने परूशी लोकांनी दिलेली संपत्ति व दान ही स्वत:साठी अयोग्य प्रकारे वापरून स्वधार्मिकता व स्वाभिमान यांनी ते वागू लागले व परमेश्वराचे गौरव व सेवा यासाठी संपत्ति व दान यांचा उपयोग केला नाही.COLMar 284.3

    या दाखल्यातील दासाने भवितव्यासाठी काही सोय केली नाही. जी धनसंपत्ति तिचा त्याने इतरांसाठी उपयोग करणे त्याऐवजी स्वत:साठी उपयोग केला; आणि त्याने केवळ सद्यपरिस्थितीचा विचार केला. जेव्हा त्याजपासून सर्व कारभार काढून घेतला जाईल तेव्हा त्याच्याजवळ त्याचे म्हणून काहीच नव्हते. पण त्याच्या धन्याची मालमत्ता अजून त्याच्या हातात होती, आणि त्यांतून आपल्या भवितव्यासाठी सुरक्षता म्हणून उपयोग करणे असा निश्चय त्याने केला. त्याने इतरांना द्यावयाचे होते अशाप्रकारे मित्र संपादन करणे म्हणजे जेव्हा त्याला कामावरून काढले जाईल त्यावेळी हेच मित्र त्याचा स्वीकार करतील. परूशी लोकांचे असेच होते. कारभारीपणाचे काम त्यांच्यापासून लवकरच काढून घेतले जाईल आणि त्यांना त्यांच्या भवितव्याचा विचार करावा लागेल. इतरांच्या चांगुलपणाचा विचार करणे याद्वारे त्यांना फायदा होणार होता. परमेश्वराने दिलेली देणगी हिचा सहभागीपणा करणे याद्वारे ते सार्वकालिक काळासाठी पुरवठा करू शकत होते. COLMar 284.4

    हा दाखला सांगितला त्यानंतर ख्रिस्त म्हणाला, ‘या युगाचे पुत्र स्वजातीविषयी प्रकाशाच्या पुत्रापेक्षा शहाणे असतात‘‘ (लूक १६:८) याचा अर्थ असा की, जगिक ज्ञानी लोक स्वत:ची सेवा उत्सुकपणे करणे याविषयी फार प्रयत्न करीतात व ख्रिस्ती लोक परमेश्वराची सेवा करणे हे त्याच्याहून कमी पडतात असे ख्रिस्ताच्या काळात चालत असे. आजही तसेच चालत आहे. जे जे ख्रिस्ती म्हणवितात त्यांच्या जीवनाकडे पाहा. परमेश्वराने त्याना किती तरी दाने दिली आहेत. कर्तबगारी, सामर्थ्य व पगडा व वर्चस्व, परमेश्वराने त्यांना धन दिले आहे यासाठी की त्यांनी परमेश्वराच्या तारणाच्या महान कार्यात सहकामदार व्हावे. परमेश्वराने जी जी देणगी दिली तिचा उपयोग मानवांना आशिर्वाद मिळावा यासाठी वापरावी, जे गरजू असतील त्यांच्या गरजा भागवून त्यांना साहाय्य करावे, जे भुकेले असतील त्यांना खावयास द्यावे, उघडे असतील त्यांना वस्त्र देणे, अनाथ म्हणजे ज्यांना आई बाप नाही त्याना वस्त्र देणे, जे निराश व हताश झाले असतील त्याची काळजी घेणे. जे निराश व हताश झाले असतील त्यांची काळजी घेणे. या जगात अशा प्रकारे दु:ख व निराशा पसरावी अशी परमेश्वराची इच्छा नाही. एका मनुष्याने जीवनाच्या सर्व सुखसोईचा उपभोग घेणे तर दुस-या मनुष्याने भाकरीसाठी भिकेची आरोळी मारणे, अशी परमेश्वराची योजना नाही. प्रत्येक मनुष्याची गरज भागली म्हणजे त्यानंतर जे काही शिल्लक राहते त्याचा उपयोग इतर मनुष्यांना मदत व आशिर्वाद अशा चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करणे. प्रभु म्हणतो ‘जे तुमचे आहे ते विकून दान धर्म करा’ लूक १२:३३ “चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे; दानशील, परोपकारी असावे‘‘ १ तिमथ्य ६:१८. तर तू मेजवानी करशील तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व अंधळे यास आमंत्रण कर‘‘ लूक १४:३३. “दुष्टतेच्या बेडया तोडाव्या, गँवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे. सगळे जोखंड मोडावे... तूं आपले अन्न भुकेल्यास वाटावे; तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये... दु:खग्रस्त जिवास तृप्त करावे‘‘ यशया ५८:६,७,१०. “सर्व जगात जावून संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा‘‘ मार्क १६:१५. या प्रभुच्या आज्ञा आहेत. महान ख्रिस्ती मंडळी हे कार्य करावे म्हणून प्रभुच्या आज्ञा पाळतात काय ?COLMar 284.5

    अरेरे, कितीजण परमेश्वराने त्यांना दिलेली प्रत्येक देणगींचा उपयोग स्वत:च्या हितासाठी करतात! कित्येकजण शेताला शेत व एका घराला दुसरे घर अशी जोड करीत आहेत. किती तरी लोक पैशाची उधळ त्यांच्या चैनीसाठी करीत आहेत; त्याना हे खावेसे तर ते खावेसे वाटते, घर असून अजून जादा घर हवे, घरात सुबक सामानसुमान पाहिजे व पोषाखही पाहिजेत. उलट त्यांचे सहसोबती दैन्यावस्था व गुन्हेगारीत पडले आहेत; कित्येक रोगाला बळी पडले आहेत तर काही मृत्यूमुखी पडले आहेत. अगणित लोकाकडे कोणी ढंकुनही पाहात नाही, कुणी त्याना दया दाखवित नाही, कुणी त्यांना समाधानाचा शब्द बोलत नाही वा हातभार लावीत नाही.COLMar 285.1

    लोक देवाची चोरी करतात म्हणून ते दोषी आहेत. जे जे लोक त्रासांत व संकटांत आहेत त्या त्या लोकांना मदत करणे याद्वारे परमेश्वराचे गौरव करणे व त्याचे प्रतिबिंब पाडून लोकांचे तारण करणे याऐवजी आपण आपल्या स्वार्थासाठी सर्व काही खर्च करू लागलो तर याही प्रकारे परमेश्वराची चोरी केली जाते. परमेश्वराने मानवास दिलेली ठेव याप्रकारे ते गिळंकृत करीतात. प्रभु सांगतो, “मी न्याय करावयास तुम्हांकडे येईन... मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ यांजवर जुलूम करणारे आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे यांच्याविरूध्द साक्ष देण्याची मी त्वरा करीन. “मनुष्य देवाला ठकवील काय ? तुम्ही तर मला ठकविले आहे; असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे ? दशमांश व अर्पणे यासंबंधाने. तुम्ही शापाने शापग्रस्त आहा, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे.’ मलाखी ३:५ ८,९.”अहो धनवानानो, जे कष्ट तुम्हाला होणार त्याविषयी आक्रोश करीत रडा. तुमचे धन नासले आहे, व तुमच्या वस्त्राला कसर लागली आहे. तुमचे सोने व रूपे यांस जंग चढला आहे, त्यांचा तो जग तुम्हांविरूध्द साक्ष होईल, आणि तो ‘अग्नी’ सारखा तुमचा देह खाईल. ‘तुमचे धन साठविणे, शेवटल्या दिवसांत झाले. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला आहे, “पाहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापिली आहेत त्यांची तुम्ही अडकवून ठेविलेली ‘मजुरी ओरडत आहे,“आणि कापणा-याच्या आरोळया सेनाधीश प्रभुच्या कानी गेल्या आहेत‘‘ याकोब ५:१-३,५,४.COLMar 286.1

    प्रत्येकास त्याला दिलेली देणगी याचा हिशोब द्यावा लागेल. शेवटच्या न्यायनिवाडा समयी मनुष्यांनी साठविलेली धनसंपत्ति ही व्यर्थ ठरली जाईल. त्यांचे स्वत:चे म्हणून त्यांच्याजवळ काहीच असणार नाही.COLMar 286.2

    जे कोणी त्यांचे सर्व जीवन जगिक धन संपत्ति साठविणेसाठी खर्च करीतात ते असे दाखवितात की त्याना कमी ज्ञान आहे, कमी विचार आहेत व त्याच्या सार्वकालिक जीवनासाठी कमी काळजी घेतात आणि त्या अन्यायी कारभाऱ्याने त्याच्या या पृथ्वीवरील संपत्तिबाबतीत असेच केले. जी प्रकाशाची मुले वा पुत्र आहेत त्याच्यापेक्षा जगिक पुत्र जादा हुशार आहेत. अशा लोकांविषयी संदेष्टयाने त्यांचा अखेरचा न्यायनिवाडा कसा होणार हे दृष्टांतात सांगितले, “मनुष्यांनी पुजण्यासाठी केलेल्या सोन्यारूप्याच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्री व वटवाघळे यापुढे टाकून देतील. परमेश्वर पृथ्वीस भयकंपीत करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून ते खडकांच्या गुहांत व दगडाच्या कपारीत शिरतील‘. यशया २ : २०,२१.COLMar 286.3

    ख्रिस्त म्हणतो, अन्यायाच्या धनाने तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा; यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास चिरकाल टिकणाऱ्या वस्तीत घ्यावे’ परमेश्वर व ख्रिस्त व देवदूत हे सर्व पिडीत, त्रस्त व पापी मानवाची सेवा करीतात. तुम्ही अशा सेवासाठी परमेश्वराला वाहन द्यावे, आणि परमेश्वरने दिलेली प्रत्येक देणगी याच सेवेच्या हेतुस्तव उपयोगात आणावी. त्यांच्या अंत:करणाशी तुमचे अंत:करण एकजीव होईल. तुमचे शील त्यांच्या शीलासारखे होईल. स्वर्गीय मंडपात राहणारे हे सर्वजण तुम्हांला परके असे वाटणार नाहीत. जेव्हा या पृथ्वीवरील सर्व गोष्टी लयास जातील, त्यावेळी हे पहारेकरी तुम्हांस स्वर्गीय वेशीतून प्रवेश करणेसाठी स्वागतार्थ तुम्हास आमंत्रण देतील.COLMar 287.1

    आणि ज्या गोष्टींचा उपयोग इतरांना आशिर्वाद म्हणून झाला त्या तुम्हांस आशिर्वाद असा होतील. ज्या धनसंपत्ति योग्य उपयोग केला त्याद्वारे महान कार्य केले जाईल. आत्मे ख्रिस्तासाठी जिकले जातील. आपल्या जीवनाची योजना ख्रिस्ताची अशी ज्याने अनुकरण केली त्यास परमेश्वराच्या राज्य दरबारांत, ज्या आत्म्यासाठी कार्य केले ते आत्मे तेथे दिसतील आणि ज्याच्यासाठी तुम्ही तारणाप्रित्यर्थ कार्य केले त्यांनाही तुमची आठवण येवून ओळख पटेल. आत्मे जिंकणे हे काम ज्यांनी विश्वासूपणे केले त्यांना स्वर्ग हे स्थान अत्यंत प्रिय व मौल्यवान असे वाटेल.COLMar 287.2

    या दाखल्यांतील बोधपर धडा सर्वांसाठी आहे. ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाला कृपा दिली आहे व त्याबाबत प्रत्येकाला जबाबदार धरले जाईल. आपले जीवन जगिक व ऐहिक गोष्टीत घालविणे हयापेक्षा ते फार मौल्यवान आहे. जे काही स्वर्गीय व अदृश्य आहे. त्याचा आपण इतरांशी संपर्क साधून सहभागीपणा करणे अशी प्रभूची इच्छ। आहे. COLMar 287.3

    प्रत्येक वर्षी कोटी कोटी लोक अर्थात आत्मे सार्वकाळात निघून जातात आणि त्यांना इशारा दिला जात नाही त्यामुळे ते विना तारलेले मरण पावतात. प्रत्येक घडीला आपणांस अनेक प्रसंग मिळतात की त्याद्वारे मानवास तारणदायी सुवार्ता सांगणेचा प्रसंग येतो. असे प्रसंग एकसारखे येत असतात व निघून जातात. परमेश्वराची इच्छा आहे की आपण अशा प्रसंगाचा उपयोग करून सुवार्ता सांगणे. दिवस, आठवडे व महिने हे निघून जातात; प्रभुची सेवा करणे यातून एक दिवस, एक आठवडा व एक महिना कमी होत आहे. जास्त झाले तर थोडी वर्षे आम्हाला दिली जातील व ज्या वाणीचा आम्हास धिक्कार करीता येणार नाही ती वाणी आम्हास ऐकू येईल. ‘तू आपल्या कारभारांचा हिशोब दे‘.COLMar 287.4

    ख्रिस्त म्हणतो याचा प्रत्येकाने विचार करणे आणि प्रामाणिकपणे हिशोब करा. एका पारडयांत तराजूचा येशू ठेवा, म्हणजे सार्वकालिक संपत्ति, सार्वकालिक जीवन, सत्य, स्वर्ग व ख्रिस्तासाठी आत्मे जिंकणेचा हर्ष; तराजूच्या दुसऱ्या पारड्यात जगातील जेवढे आकर्षक वाटेल तेवढे ठेवा तराजूंच्या एका पारडयांत तुमच्या आत्म्याचा नाश व तुमच्याद्वारे जे आत्मे तारण पावू शकले असते त्यांनाही एकत्र ठेवा, दुसऱ्या पारडयात तुमचे जीवन व परमेश्वराचे सामर्थ्यवान् जीवन ठेवा, त्याकडे पाहन ख्रिस्त म्हणतो, “कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ ? (मार्क ८:३६).COLMar 288.1

    परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही पृथ्वीवरील गोष्टी याऐवजी स्वर्गीय गोष्टींची निवड करावी. तो आम्हांसाठी स्वर्गीय भाडवलाचा पुरवठा करू शकतो. आमच्या ध्येयास तो उत्तेजन देतो, आमच्या निवड संपत्तीला संरक्षण देऊ शकतो. तो असे सांगतो, “पुरूष उत्कृष्ट दुर्मिळ करीन, मानव ओफीराच्या शुध्द सोन्याहन दर्मिळ करीन‘‘ यशया १३:१२. जेव्हा धनाला कसर खाऊन टाकील व जंग धन नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्ताचे अनुयायी स्वर्गीय भांडारात अर्थात स्वर्गीय गृही अक्षय धन असे राहतील.COLMar 288.2

    सर्व जगाशी मैत्री त्यापेक्षा ख्रिस्ताचे तारण पावलेले लोक यांच्याशी मैत्री ही चांगली आहे. जगातील राज घराणेचा हद्दा यापेक्षा प्रभु आम्हासाठी जे घर वा बगला तयार करावयास केला तोच चांगला आहे. या जगातील सर्व स्तुती त्यापेक्षा तारणारा येशूचे शब्द त्याच्या विश्वासू सेवकास, अहो माझ्या पित्याचे आशिर्वादीत हो या ; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरीता सिध्द केले ते वतन करून घ्या”मत्तय २५:३४.COLMar 288.3

    ज्यांनी परमेश्वराने दिलेली धन संपत्ति उधळून टाकली, त्यांना ख्रिस्त पुनः संधी देतो की स्वर्गीय अनंतकालिक संपत्ति प्राप्त व्हावी,’ द्या म्हणजे तुम्हांस दिले जाईल, ‘जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा, जीर्ण न होणा-या थैल्या, तसेच स्वर्गातील अक्षय धन, आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही‘‘ लूक ६:३८, १२:३३ ‘प्रस्तुत युगातील धनवानांस सांग की तू अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो सदाजिवी देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याजवर आशा ठेवावी ; चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे; दानशील, परोपकारी असावे. जे खरे जीवन ते मिळविण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असे साठवण आपणासाठी करावे‘‘ १ तिमथ्य ६:१७-१९. COLMar 288.4

    यानंतर तुमची मालमत्ता तुमच्यापुढे स्वर्गाला जावो, वा जाऊ द्या. परमेश्वराच्या राजासनाच्या पायाशी तुमची मालमत्ता ठेवा. ख्रिस्ताची जी अतुल संपत्ति, अवर्णनीय संपत्ति तिचे तुम्ही वारस झाला आहात याची खात्री करून घ्या‘‘ अन्यायाच्या धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा; यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांस चिरकाल टिकणाऱ्या वस्तीत घ्यावे’ लूक १६:९.COLMar 289.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents