Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १० वा—जाळे

    मत्तय १३:४७-५० यावर आधारीत

    “आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या ज्या जाळयांत सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात, त्यासारीखे आहे; ते भरल्यावर माणसांनी काठाकडे ओढिले आणि त्यांनी बसून जे चांगले ते भांडयात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येवून धार्मिकातून दुष्टास वेगळे करीतील, आणि त्यास अग्नीच्या भटटीत टाकतील, तेथे रडणे व दातखाणे चालेल”मत्तय १३:४७-५०.COLMar 80.1

    स्वर्गाचे राज्य एकादे जाळे यासारिखे आहे, ते जाळे समुद्रात टाकले व सर्व प्रकारचे जीव जमा केले गेले आणि ते भरले, त्यानंतर ते काठावर ओढून आणले, लोक खाली बसले आणि चांगले भाडयांत गोळा केले व वाईट ते फेकून दिले. अशाच प्रकारे जगाच्या शेवटी होईल आणि देवदूत येवून धार्मिकापासून दुष्टास वेगळे करीतील व त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”COLMar 80.2

    जाळे समुद्रात टाकणे म्हणजे सुवार्ता प्रसार करणे आणि अशा प्रकारे मंडळीत बरे व वाईट असे लोक एकत्र जमतात. जेव्हा सुवार्ता प्रचाराचे कार्य संपले जाईल त्यानंतर न्याय करणे व त्याद्वारे वेगवेगळे करणेचे काम केले जाईल. ख्रिस्ताने पाहिले की मंडळीत खोटे बंधू येतील आणि त्यांच्यामुळे सत्याच्या मार्गाविषयी वाईट बोलले जाईल. जग सर्वातेला नावे ठेवतील कारण विसंगत वा विरोधी, दांभिक खोटे जीवन जगणारे लोक मंडळीत असतील. जे लोक ख्रिस्ती झाले आहेत अर्थात त्यांनी ख्रिस्ताच्या नामाचा स्विकार केला आहे त्यांचे जीवन पवित्र आत्म्याच्या शक्तिनुसार चाललेले दिसत नाही त्यामुळे ख्रिस्ती झालेले लोक हे पाहून ठेचा खातील असे पापी लोक मंडळीत होते म्हणून लोक धोकादायक विचार करीत होते की परमेश्वराने त्याची पापक्षमा केली असावी. यास्तव ख्रिस्त भविष्यांत पाहावे म्हणून पडदा उंचावतो व म्हणतो मानवाच्या भवितव्याचा निर्णय मानवाचा हुद्दा यावर नसून त्याचे शीलसंवर्धन यावर अवलंबून आहे.COLMar 80.3

    निदण व जाळे या दोन्ही दाखल्यावरून हे स्पष्ट समजते एकदा न्यायसमय आला की दुष्टांना परमेश्वराकडे येण्याची संधी नाही. कापणीच्या वेळेपर्यंत गहु व निदण ही एकत्र वाढली जातात. चांगले व वाईट मासे जाळयांतून काठावर ओढून आणेपर्यत व वेगळे करेपर्यंत एकत्र असतात.COLMar 81.1

    पुन्हा या दोन्ही दाखल्यावरून समजले जाते की न्याय समयानंतर दुसरा पुन: कृपेचा काळ नाही. जेव्हा सुवार्ता प्रसाराचे कार्य पूर्ण केले जाईल त्या नंतर त्वरीत चांगले व वाईट हे वेगळे केले जाईल. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गाचा निर्णय हा कायमचा ठरविला जाईल.COLMar 81.2

    कोणाचा नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नाही, “प्रभु परमेश्वर म्हणतो, माझ्या जीवितांची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे, फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा, इस्त्राएल वंशजहो, तुम्ही का मारता?’ यहज्केल ३३:११ संपूर्ण कृपेच्या काळात पवित्र आत्मा मानवास विनवणी करीत आहे की, मानवाने सार्वकालिक जीवनाची देणगी स्विकारावी. जे कोणी ही विनवणी नाकारतील ते नाश पावतील. परमेश्वराने हे जाहीर केले आहे की, विश्वांतील जी दुष्ट अर्थात पाप ही मोडकळीप्रमाणे नाश पावतील. जे कोणी पापाला चिकटून राहतील ते पापाबरोबर नाश पावतील.COLMar 81.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents