Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    देणगी परत केली

    “मग बहुत काळानंतर त्या दासाचा धनी आला, व त्यांचा हिशेब घेऊ लागला”(मत्तय २५: १९) जेव्हा प्रभु त्याच्या दासापासून हिशेब घेऊ लागतो, तेव्हा प्रत्येक देणगीचा त्यांना हिशेब द्यावा लागेल व प्रभु त्यांची कसून तपासणी करील. जे काम केले त्यावरून त्या दासाचा स्वभाव समजून येईल.COLMar 275.4

    ज्यांना पाच रूपये व दोन रूपये दिले त्यांनी दिलेली रक्कम दुप्पट केली व प्रभुला परत आणून दिली. याबाबत त्यांनी श्रेय स्वतःला दिले नाही. जे दान होते त्यानुसार त्यांना देण्यात आले, त्यांनी अधिक दान प्राप्त केले, पण त्यांना जर भाडवल वा मुद्दल नसते तर जादा व नफा हा आलाच नसता. त्यांनी केवळ त्यांचे कर्तव्य केले. मूळ भांडवल हे प्रभुचे होते; आणि वाढ करणे हे ही प्रभुकडून आहे. जर तारणारा येशूने त्याच्यावर त्याची प्रिती व कृपा ठेवली नसती तर त्यांचे सदासर्वकाळाचे दिवाळे निघाले असते.COLMar 275.5

    जेव्हा प्रभु त्यांच्याकडून त्या दानांचा स्वीकार करितो तेव्हा तो त्यांना शाबासकी देतो व बक्षिस वा वेतन देतो; जणू काय ते सर्व त्या कामदाराचेच आहे. त्यावेळी प्रभुचा चेहरा ते पाहून आनंदी व समाधानी दिसतो. प्रभु त्यांना अशा प्रकारे कार्याबाबत आशीर्वाद देतो म्हणून प्रभुला आनंद वाटतो. प्रत्येक सेवाकार्य व स्वार्थपणा याविषयी प्रभु त्यांना बक्षिस देतो, त्यांनी कर्ज परत केले म्हणून त्यासाठी नाही, तर त्यांची प्रिती व कनवाळू हृदय ही पाहून त्यांचे अंत:करण भरून जाते.COLMar 276.1

    धन्याने म्हटले, “शाब्बास, भल्या व विश्वासू दासा. तू थोडक्याविषयी विश्वासू झालास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; आपल्या धन्याचे सुख भोगावयास ये.”(मत्तय २५:२१)COLMar 276.2

    परमेश्वराची मान्यता जिकणे यासाठी विश्वासूपणा, प्रामाणिकपणा व प्रेमळपणे परमेश्वराची सेवा करणे. परमेश्वराकडे व चांगली सेवा करणे यासाठी पवित्र आत्मा क्षणोक्षणी मार्गदर्शन करील, प्रोत्साहन देईल या सर्वांची नोंद स्वर्गीय पुस्तकांत केली जाईल व न्यायनिवाड्या दिवशी ज्या कामगारांनी जे जे काम केले त्यानुसार त्यांना वेतन दिले जाईल.COLMar 276.3

    ज्या ज्या लोकांना तारणाप्रित्यर्थ कामदारांनी साहाय्य केले; त्या लोकांना स्वर्गीय राज्यात प्रवेश करिताना पाहतील तेव्हा प्रभुबरोबर आनंद करतील. स्वर्गातील कार्यात भाग घेण्यास त्यांना संधी दिली जाते कारण येथे असताना त्यांनी प्रभुसाठी कार्य-लायकी दाखविली, व कार्यात भाग घेतला होता. आम्ही आता शील व पवित्र सेवा यात कसे आहोत याचे प्रतिबिंब स्वर्गात दिसले जाईल. ख्रिस्ताने स्वत:विषयी म्हटले, “याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आला‘‘ मत्तय २०:२८. येशूने हे काम या पृथ्वीवर केले व हेच काम तो स्वर्गात करितो आणि या पृथ्वीवर ख्रिस्ताबरोबर काम करणे याचे बक्षिस म्हणजे आम्हास नवीन पृथ्वीवर महान सामर्थ्य व विस्तृत सेवा कार्य करणे.COLMar 276.4

    “मग ज्याला एक हजार मिळाले होते तोही येवून म्हणाला, ‘महाराज, आपण कठोर मनुष्य आहां ; जेथे आपण पेरिले नाही तेथे कापणी करिता ; व जेथे पसरिले नाही तेथून जमा करिता, असे मला आपणांविषयी कळले; म्हणून मी भिऊन आपले हजार रूपये भूमित लपवून ठेविले होते.‘‘ मत्तय २५:२४,२५.COLMar 276.5

    मनुष्य अशा प्रकारे परमेश्वराने दिलेली देणगी निरूपयोगी आहे अशा प्रकारच्या सबबी देतात. परमेश्वर जणू काय हेर आहे व त्यांच्या चुका पाहातो व त्यांच्यावर न्यायाचा निकाल देतो असा दृष्टिने एक देणगी मिळालेले लोक पाहतात. परमेश्वराने दिले नाही त्याची तो अपेक्षा करितो व जेथे पेरिले नाही तेथून पीकांची आशा धारितो असा आरोप ते परमेश्वरावर करितात.COLMar 276.6

    पुष्कळजण त्यांच्या अंत:करणात परमेश्वराला कठोर धनी समजतात कारण परमेश्वर त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगतो व त्यांच्यापासून सेवेची अपेक्षा करितो, पण आम्ही हे समजणे की जे काही आहे ते सर्व परमेश्वराचे आहे आणि आम्ही आमचे म्हणून काही परमेश्वरास देऊ शकत नाही. दावीद राजा म्हणाला, “सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते ; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत; १ इतिहास २९: १४. परमेश्वर निर्माणकर्ता व तारणारा आहे या दोन्ही दृष्टिने सर्व काही परमेश्वराचे आहे. या जीवनांतील व भावी जीवनातील सर्व आशीर्वादावर कॅलव्हरी वरील वधस्तंभाचा शिक्का मारलेला आहे म्हणून ते म्हणतात की परमेश्वर हा कठोर धनी आहे व जेथे पेरले नाही तेथे तो कापणी करितो हे त्यांचे म्हणणे साफ खोटे आहे.COLMar 277.1

    त्या दुष्ट चाकराचे गा-हाणे धनी नाकारीत नाही, मग ते किती तरी चुकीचे आहे, धनी त्याला त्याच्या विधानावरून दाखवून देतो की त्याचे म्हणणे किती निष्कारण आहे. धन्याने त्याला नफा दाखविणे यासाठी मार्ग व साधने यांचा पुरवठा केला. धनी म्हणाला, “तर माझे द्रव्य सावकारांकडे ठेवावयाचे असते म्हणजे मी आल्यावर माझे मला सव्याज मिळाले असते‘‘ (मत्तय २५:२७).COLMar 277.2

    स्वर्गीय परमेश्वराने आम्हास जी देणगी दिली त्यांहन अधिक वा उणे असे परमेश्वर मागत नाही. आम्ही जेवढे कार्य करू तेवढीच जबाबदारी परमेश्वर आम्हांवर देतो. “कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो ते तो लक्षात ठेवितो’ स्तोत्र १०३: १४. परमेश्वर आम्हापासून जी अपेक्षा करितो ती सर्व आपण त्याच्या कृपेने पार पाडू शकतो. COLMar 277.3

    “ज्या कोणाला फार दिले त्याजजवळून फार मागण्यात येईल‘‘ लूक १२:४८. परमेश्वराने आम्हांस जी देणगी दिली त्याप्रमाणे कर्तबगारी करणे यासाठी आम्हास जबाबदार धरले जाईल. त्याच्या सेवेसाठी आम्ही काय करणे शक्य व त्यानुसार आम्ही किती तंतोतंत कार्य केले याचे मोजमाप परमेश्वर घेईल. ज्या देणगीची आम्ही वाढ केली व ज्या देणगीचा उपयोग केला नाही. अशा दोन्हीही देणग्यांचा आम्हास हिशेब द्यावयाचा आहे. आमच्या देणग्यांच्या योग्य उपयोगाद्वारे आम्ही जे काही कार्य करू त्याविषयी परमेश्वर आम्हांस जबाबदार धरणार आहे. आम्ही काय करावयास हवे होते. त्यावरून आपला न्यायनिवाडा केला जाईल पण जे काही कार्य करावयाचे ते कार्य करणे यासाठी आम्ही आमच्या सामर्थ्याचा उपयोग परमेश्वराचे गौरव यासाठी केला नाही. जरी आम्ही आत्मा गमावला नाही तरी आम्ही आमच्या देणगीचा उपयोग केला नाही. याचा परिणाम सर्वकाळात दिसून येईल. आम्ही सर्व ज्ञान व कर्तबगारी ही संपादन केली असती पण केली नाही ; परिणामी सर्वकाळाचा तोटा झाला हे दिसून येईल.COLMar 277.4

    जेव्हा आम्ही सर्वस्वी परमेश्वराला वाहून देतो व आमच्या कामात परमेश्वराचे मार्गदर्शन मानतो, तेव्हा त्या कामाच्या पूर्ततेची जबाबदारी परमेश्वरावर असते. आमच्या या कार्यातील, प्रामाणिक प्रयत्नांनी यशाबाबत काही तर्क करण्याचे कारण नाही. पराभवाचा आपण एकदाही विचार करू नये. ज्या परमेश्वराला पराभव हा शब्द माहीत नाही त्याजबरोबर आपण सहकार्य करावे.COLMar 278.1

    आम्ही आमची कमकुवता व कार्यक्षमता याविषयी बोलू नये. याद्वारे आम्ही परमेश्वराच्या वचनाचा नाकार करितो व परमेश्वरावर विश्वास ठेवित नाही. आम्हांवर जे कार्याचे ओझे दिले त्यामुळे आम्ही कुरकुर करितो किंवा आम्हास दिलेली जबाबदारी आम्ही नाकारितो याद्वारे आम्ही असे म्हणतो की धनी कठार मनाचा करावयास सांगतो. COLMar 278.2

    आळशी वृत्तीच्या मनुष्याला आपण आनंदाने म्हणतो की तो नम्रवृत्तीचा आहे. पण खरी नम्रता याचा अर्थ विस्तृत आहे. आम्ही नम्रता धारण केली याचा अर्थ असा नव्हे; आपण बुद्धिने बोथट आहोत, ध्येय गाठणे यात कमकुवत आहोत, आमचे जीवन भित्रेपणाने जगतो व आपल्यावरील जबाबदारी आपणास पार पाडता येणार नाही म्हणून अंग काढून घेणे. खरी नम्रता परमेश्वराचा हेतू परमेश्वराच्या सामर्थ्याने पूर्ण करिते.COLMar 278.3

    परमेश्वर त्याचे कार्य त्याची ईच्छा असेल त्याच्याकडून करून घेतो. परमेश्वर कधी कधी एकाद्या नम्र मनुष्याद्वारे त्याचे सर्वश्रेष्ठ काम करून घेतो. कारण परमेश्वराचे सामर्थ्य एका अशक्त मानवाद्वारे प्रगट केले जाते. आम्ही आमचा दर्जा त्याप्रमाणे एक गोष्ट मोठी व दुसरी गोष्ट लहान आहे असे जाहीर करितो, पण परमेश्वर त्या गोष्टीचे मोल आमच्या नियमाप्रमाणे ठरवित नाही. आम्ही असे केव्हाही समजू नये की जे आम्हाला मोठे वाटते ते परमेश्वराला मोठे वाटले पाहिजे व जे आम्हाला लहान वाटले ते परमेश्वरालाही लहान वाटले पाहिजे. आमचे दान वा देणगी याबाबत आम्ही न्यायनिवाडा करू शकत नाही किंवा आम्ही आमच्या कामाची निवड करू शकत नाही. परमेश्वराने आम्हांसाठी ज्या कामाची निवड केली ते आम्ही घ्यावे, ते परमेश्वरासाठी स्वीकारावे आणि परमेश्वरासाठी करीत राहावे. आमचे कोणतेही काम असो, आम्ही ते काम पूर्ण अंत:करणाने व हर्षाने सेवा म्हणून करावे. जेव्हा आम्हास दिलेले काम आम्ही कृतज्ञतेने, आनंदाने व परमेश्वराने आम्हास या कामात सहकामदार निवडले हा थोरपणा समजणे अशा प्रवृत्तीने आमची सेवा यामुळे परमेश्वर संतुष्ट होतो.COLMar 278.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents