Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    बुध्दी कौशल्य

    परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही आपल्या बुध्दीच्या वाढीसाठी प्रशिक्षण घ्यावे. जगिक लोकापेक्षा परमेश्वराच्या सेवकांना अधिक बुध्दी कौशल्य व चिकित्सकता प्राप्त व्हावी आणि जे कोणी अधिक निष्काळजीपणे वागतात किंवा जास्ती सुस्तपणे वागतात व कर्तबगार व सर्वज्ञ कामदार होत नाहीत. अशा लोकांबाबत परमेश्वराला संतोष वाटत नाही. परमेश्वर म्हणतो पूर्ण अंत:करणाने, पूर्ण मनाने व पूर्ण शक्तिने व बुध्दीने त्याजवर प्रिती करणे. यासाठी आम्हावर जबाबदारी येते की आम्ही आपली बुद्धिमत्ता संपूर्णपणे वाढविली पाहिजे. यासाठी की आपल्या पूर्ण मनाने व बुध्दीने आपणास आपल्या निर्माणकर्ता याजवर प्रिती करता येईल.COLMar 251.4

    आम्ही जर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालू तर आम्हास अधिक बुद्धिमत्ता वाढविता येईल व परमेश्वराची सेवा अधिक प्रभावी करिता येईल. जो मनुष्य अशिक्षित आहे पण त्याने परमेश्वराला समर्पण केले आहे व त्याला इच्छा आहे की त्याने इतरांना आशीर्वाद देणे शक्य व्हावे, परमेश्वर अशा लोकांचा त्याच्या सेवेत उपयोग करितो. परंतु जे लोक अशाच समर्पण प्रेरणेने पण अधिक पूर्ण शिक्षणाची संधी प्राप्त झाली. त्यांना ख्रिस्तासाठी अधिक विस्तृतपणे कार्य करिता येते. कारण सुशिक्षित लोक सोईस्कर जागेवर असतात.COLMar 251.5

    प्रभुची इच्छा आहे की आम्ही शक्यतो सर्व शिक्षण प्राप्त करून घ्यावे; पण त्यात हेतू हा असणे की जे ज्ञान प्राप्त होईल त्याची माहिती इतरांना द्यावी कारण परमेश्वरासाठी कोणाला कधी कोठे व कसे बोलावे यासाठी पाचारण केले जाईल हे माहीत नाही. आम्हा मानवाचे काय करावयाचे हे केवळ आपल्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. आमच्या पुढे किती तरी शक्य अशा गोष्टी आहेत त्या आपल्या दुबळया विश्वासाला दिसत नाहीत. आम्ही आपल्या मनाची एवढी तयारी केली पाहिजे की परमेश्वराचे सत्य वचन हे जगिक सर्वश्रेष्ठ अधिकारी यांच्यापुढे स्पष्ट माडणे व त्यामुळे स्वर्गीय परमेश्वराचे गौरव स्पष्ट माडणे व त्यामुळे स्वर्गीय परमेश्वराचे गौरव व्हावे. परमेश्वराची सेवा करणे यासाठी येणारी प्रत्येक संधी आपण वापरली पाहिजे व तेणेकरून परमेश्वराच्या सेवेत कर्तबगार कामदार होऊ.COLMar 252.1

    ज्या तरूणांना शिक्षणाची गरज आहे त्यांनी निश्चयपूर्वक शिक्षण संपादन करावे. एकादी संधी यावी वाट पाहत बसू नका तर तशी संधी स्वतः तयार करा. अशा संधीसाठी कोणतेही लहान साधन असो त्याचा उपयोग करा. पैशाचा खर्च काळजीपूर्वक करा. आपला पैसा खाणे-पिणे वा इतर चैनीसाठी खर्च करू नका. परमेश्वराने त्याच्या सवेसाठी तुमचा चांगला उपयोग करावा म्हणून तुम्ही तुमचे प्रत्येक काम विश्वासाने व पूर्णपणे करावे. तुमची बुद्धिमत्ता वाढणे यासाठी मिळणारी प्रत्येक संधी उपयोगात आणा. तुमचे पुस्तकी ज्ञान व हाताने काम करणे यांची जोड असू द्या; यात विश्वासूपणा, चिकाटी, दक्षता व वरून ज्ञान प्राप्तीसाठी प्रार्थना करणे हे ही चालू ठेवावे. याद्वारे तुम्हांस चौरस शिक्षण प्राप्त होईल, अशाप्रकारे तुमचे शीलसंवर्धन वाढेल, इतरांच्या मनावर चांगला पगडा पडेल. यासोबत तुम्ही त्यांना नीतिच्या व पवित्र मार्गाने नेणे यासाठी साहाय्यक व्हाल.COLMar 252.2

    आम्हांकडे येणारी संधी व प्रसंग यांचा आपण जर स्वत:च्या शिक्षणासाठी उपयोग केला तर आपणास अधिक ज्ञान प्राप्त होईल. खरे शिक्षण म्हणजे कॉलेजमध्ये जे शिक्षण मिळते त्याहून अधिक शास्त्रीय शिक्षणाची हेळसांड न करिता, अधिक प्रभावी प्रशिक्षण म्हणजे परमेश्वराशी जिव्हाळयाचा संबध ठेवणे. प्रत्येक विद्यार्थ्याने पवित्रशास्त्र घेवून स्वत:चा संबंध जो सर्वश्रेष्ठ शिक्षक त्याच्याशी संबंध ठेवणे. जीवनातील कठीण समस्या व संकटे यावर उपाय म्हणून परमेश्वराचे सत्यवचन काय आहे याचा शोध करणे यासाठी मनाला एक विशेष वळण व शिस्त लावणे.COLMar 252.3

    जे कोणी ज्ञानाचे भुकेले असतील यासाठी की त्यांच्यासह बांधवांना आशीर्वाद प्राप्त होईल, असे करीत असता स्वत:लाही आशीर्वाद परमेश्वरापासून प्राप्त होईल. परमेश्वराच्या वचनाच्या अभ्यासाद्वारे अधिक सेवा करावी अशी कळकळीची कार्यकारी इच्छा त्याना निर्माण होईल, अशा प्रकारे त्यांच्या सर्व बुध्दी कौशल्याची प्रगती वा कार्यक्षेत्राची वाढ होईल आणि त्यांचे मन अधिक सामर्थ्य व अधिक कर्तबगार असे होईल. COLMar 253.1

    जो कोणी परमेश्वराचा कामदार होऊ इच्छितो त्याने स्वत:ला शिस्त लावली पाहिजे. यामुळे अधिक प्रभावी भाषण वा अधिक हुशार देणगी यापेक्षा जादा कार्य केले जाईल. एकादा साधा मनुष्य पण पूर्ण शिस्तीने काम करणारा, याकरवी अधिक कार्य केले जाईल, पण दुसरा उच्च शिक्षणाचा अधिक दान असलेला पण त्याला शिस्त नाही वा स्वत:वर ताबा नाही तो कमी कार्य करू शकेल.COLMar 253.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents