Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ताचे बोधमय दाखले - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ३ रा—पहिल्याने अंकुर, मग कणीस

    मार्क ४:२६-२९ यावर आधारित

    “आणखी त्याने (येशू) म्हटले, देवाचे (परमेश्वर) राज्य असे आहे की, जणू काय एकाद्या मनुष्याने बी टाकल्यावर त्याने रात्री दिवसा निजावे उठावे, आणि ते बी रूजावे वाढावे, पण त्याला काही कळू नये. भूमि आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. दाणा पिकल्यावर तो लागलाच ‘विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे”. मार्क ४:२६-२९COLMar 36.1

    पेरणारा या दाखल्यामुळे पुष्कळ प्रश्न उद्भवले. ज्या ज्या लोकांनी हा दाखला ऐकला त्यांनी असे अनुमान काढले की, ख्रिस्त या पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापन करणार नाही, याविषयी पुष्कळांना आतुरता व चिंता वाटत होती, येशूने लोकांची ती अवस्था पाहिली की ते चिंतातूर आहेत म्हणून येशूने दुसरे स्पष्टीकरण दिले. अशासाठी की या जगिक राज्याची आशा यापासून त्यांचे विचार परमेश्वराच्या कृपेचे कार्य त्यांच्या आत्म्यासाठी कोणते आहे याचा त्यांनी विचार करावयास हवा होता.COLMar 36.2

    मार्क ४:२६:२९ हा दाखला वर दिलाच आहे. कापणी करणारा विळा घालतो. कारण कापणीची वेळ आली आहे. हा कापणी करणारा दुसरा कोणी नसून ख्रिस्त हाच आहे. कारण हाच येशू या पृथ्वीच्या शेवटच्या काळी महान दिवशी कापणी करणार आहे. पण पेरणी करणारे हे ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहेत. ते बी जमिनीत पडले त्यानंतर रूजते व उगवते हे कसे काय, हे समजत नाही, पण परमेश्वराचा पुत्र याच्याबाबत असे नाही. ख्रिस्त येशू त्याच्या कामावर असताना कधी झोप घेत नाही, तर रात्रदिवस जागरण करून त्याची देखरेख करीतो. बी कसे रूजते, उगवते व वाढते याची ख्रिस्ताला माहिती आहे.COLMar 36.3

    हा बी पेरणीचा दाखला यामध्ये निसर्गाचे कार्य चालू असते त्यातच परमेश्वराचे कार्य चालू असते. बी रूजणे व उगवणे हे परमेश्वराने त्या बियात अगोदरच अंकुराद्वारे पायरी पायरीचे कार्य ठेविले आहे, तरीपण ‘बी’ कशाशी संबंध न येता पडू दिले तर ते तसेच राहील, आणि त्यांच्यात स्वत:हून रूजणे प्रक्रिया होणार नाही ते बी वाढावे म्हणून मनुष्याला त्याला त्याचा भाग करणे भाग आहे. मनुष्याने जमिनीची चांगली मेहनत करणे व मग त्यात बी पेरणे. त्यानंतर त्या पीकाची देखभाल करणे, पण मनुष्याच्या कार्यालाही मर्यादा आहे. मनुष्याचे ज्ञान व शक्ति ही किती जरी वाढली तरी त्याला बियापासून झाड वा वनस्पती वाढविता येत नाही. मनुष्याने बी पेरणे एवढा भाग केला म्हणजे त्यानंतर बी रूजणे व वाढणे व त्याला पीक येणे हे सर्वसमर्थ परमेश्वर याच्या सामर्थ्याचे कार्य आहे व मनुष्याला त्यासाठी परमेश्वरावर अवलंबून राहावे लागते.COLMar 36.4

    बी यात जीवन आहे आणि जमिनीत सामर्थ्य आहे पण एकमेव परमेश्वराचे सामर्थ्य रात्रंदिवस कार्य करील तेव्हाच कुठे पीक फलदायी होते. तृषार्थ जमिनीला परमेश्वराने पाऊसाद्वारे कार्य करणे भाग आहे, सुर्याने उष्णता ही दिलीच पाहिजे, जे बी पेरले गेले त्याला वीजेचा पुरवठा केला पाहिजे. बियामध्ये परमेश्वराने जी शक्ति व जीवन घातले आहे त्यापासून दुसरे जीवन केवळ परमेश्वरच निर्माण करू शकतो. प्रत्येक बी उगवतो, प्रत्येक वनस्पती वाढते, हे सर्व परमेश्वराच्या सामर्थ्याद्वारेच कार्य होते.COLMar 37.1

    “कारण भूमि जशी आपले अंकुर उगविते, मला जसा आपणात पेरेलेले बीज उगवेसे करीतो, तसा प्रभु परमेश्वर सर्व राष्ट्रादेखत धार्मिकता व किर्ती अंकुरीत करील‘‘ यशया ६१:११. जसे निर्सगात तसे आध्यात्मिक बाबतीत पेरणे अवश्य आहे, सत्य शिक्षकाने मानवी मनोभूमीची पुर्व तयारी केली पाहिजे, त्यानंतर त्याने बी पेरले पाहिजे, पण त्यानंतर बीयास अंकुर फुटणे यासाठी जे काही सामर्थ्य लागते ते केवळ परमेश्वरापासून प्राप्त होते. मानवास ठराविक कार्य करीता येते त्यानंतर मानवी प्रयत्न निष्फळ ठरतात. आम्ही सत्याचे वचन सांगणे एवढे करू शकतो, पण जेणेकरून त्या आत्म्यांत धार्मिकता व परमेश्वराची स्तुती ही प्रेरीत होतील असे सामर्थ्य आम्ही देऊ शकत नाही. सत्य वचनाचा प्रचार होत असता त्यासोबत मानवी शक्तिबाहय अशा शक्तीने कार्य करणे अवश्य आहे. केवळ पवित्र आत्म्याच्याद्वारे सत्य वचन तो ऐकणारा याच्या ठायी जीवत वचन होऊन ते सामर्थ्याने कार्य करून त्या मनुष्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करून देईल. ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना हे शिक्षण देणेचा प्रयत्न केला. शिष्यांच्या कार्यास यश येईल असे त्याच्यामध्ये काही नाही, तर परमेश्वराची अद्भुत कार्य करणारी शक्ति यामुळे सत्य वचनाची कार्यक्षमता येईल.COLMar 37.2

    पेरणारा याचे काम म्हणजे विश्वासूपणे काम करणे अंकुराची वाढ व फळ येणे हे कार्य अभ्युत आहे. हे मानवास समजू शकत नाही. परंतु परमेश्वर या सर्व वनस्पतींची वाढ करीतो असा मानवाचा विश्वास आहे. जे बी जमिनीत पेरीतो ते धान्य त्यामुळे त्याच्या कुटुंबास भाकर झाली असती. परंतु सध्याचा हा चांगला हेतू बाजूला ठेवून अधिक पीक मिळणे त्या हेतूने तो पेरणी करीत असतो. तो बी पेरितो यासाठी की हगामात त्याला अधिक कितीतरी पटीने जादा पीक मिळावे. अशाच प्रकारे ख्रिस्ताच्या सेवकांनी कार्य करावे, ते जे सत्य वचनाची पेरणी करीतात त्यापासून त्याना मोठी कापणी करीता यावी.COLMar 37.3

    चांगले बी एकाद्या मनुष्याच्या निरूत्तर, स्वार्थी, जगिक मनाचा आणि वचनाने त्याच्या अंतकरणात मूळ धरले आहे असे न दर्शविणारा अशाच्या मनात सत्य वचन बी पडले असेल, पण नंतर जेव्हा परमेश्वराचा पवित्र आत्मा त्या मनुष्यावर फुकर घालील, तेव्हा त्या सत्य वचन बीयास अंकुर फुटतो व शेवटी परमेश्वराच्या गौरवासाठी फळे दिसतात. आमच्या हयातीत आम्हांस समजणार नाही. कोणते वाढेल हे किंवा ते या प्रश्नाचे उत्तर आम्हांकडे नाही. आम्ही आपले कार्य करणे व त्याचा परिणाम परमेश्वराकडे सोपून देणे. “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको, कारण त्यातून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील. हे तुला ठाऊक नसते‘‘ उपदेशक ११:६ “पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी... ही व्हावयाची राहणार नाहीत‘‘ उत्पत्ति ८:२२ या अभिवचनावरील विश्वासाने पेरणारा चाकर हा जमिनीची मेहनत करीतो व पेरणी करीतो. आम्हीही तसाच विश्वास धरून आध्यात्मिक कार्य करावे. सत्य वचन पेरावे व परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवावा. “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरीता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही‘‘ यशया ५५:११ “जो रडत रडत पाभर धारितो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढया घेवून येईल.”स्तोत्र. १२६:६.COLMar 38.1

    अंकुराची वाढ सुरू होणे म्हणजे आध्यात्मिक जीवन सुरू होणे, आणि वनस्पतीची वाढ म्हणजे ख्रिस्ती जीवनाची सुंदर सुरूवात होय. जसे निसर्गात तसे कृपेच्या बाबतीत आहे, वाढीशिवाय जीवन नाही, वनस्पतीची एकतर वाढ झाली पाहिजे नाहीतर ती मरून गेली पाहिजे. वनस्पतीची वाढ शांतपणे व अतिसूक्ष्म पण सतत चालू असते, अशीच वाढ ख्रिस्ती जीवनाची असते. प्रत्येक पायरीस आमचे जीवन परीपूर्ण असावे, आणि अशाप्रकारे परमेश्वराचा हेतू जर पूर्ण केला तर आपल्या ख्रिस्ती जीवनाची वाढ सतत होत राहील. पवित्रीकरण हे कार्य जीवनभराचे आहे. जशी आपली संधी वाढेल त्याप्रमाणे आपले अनुभव वाढतील, आणि त्यासोबत आपले ज्ञानही वाढेल. आम्हावरील जबाबदारी संभाळणेस आम्ही भक्कम होऊ आणि आपला प्रौढपणा व आपली संधी ही सर्व त्या प्रमाणाप्रमाणे असतील.COLMar 38.2

    वनस्पतीच्या वाढीसाठी परमेश्वराने जो पुरवठा केला आहे त्यामुळे वनस्पती वाढते. वनस्पतीची मूळे जमिनीत खोलवर जातात. वनस्पती दव, पाऊस व सूर्यप्रकाश यांचे प्राशन करीते. हवेतून ज्या प्राण - घटकांची गरज आहे त्या घेते. अशाच प्रकारे ख्रिस्ती मनुष्याने परमेश्वराने जे काही दिले त्याशी संघटित होऊन ख्रिस्ती जीवनात वाढ करावी. आपली असहाय्यता समजून, आपणास अनुभव यावा यासाठी जे जे प्रसंग वा संधी येईल त्यांचा आम्ही उपयोग करून घ्यावा व वनस्पतीची मुळे जमीनीत जशी खोलवर जातात तद्वत् आम्ही ख्रिस्तात मुळावले जावे. वनस्पती जशी सूर्यप्रकाश, दव व पाऊस यांचा स्विकार करीते तसा आम्ही पवित्र आत्मा याचा स्विकार करावा आणि हे कार्य करणे म्हणजे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिध्दी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो”जख-या ४:६ आम्ही जर आपले मन ख्रिस्तावर केंद्रीत केले तर ख्रिस्त आम्हाकडे येईल, “... आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास झटू, त्याचा उदय अरूणोदयाप्रमाणे निश्चित आहे, तो पर्जन्याप्रमाणे, भूमि शिंपणा-या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल‘‘ होशेय ६:३. “पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणरे त्या तुम्हांवर न्यायात्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्या ठायी आरोग्य असेल....”मलाखी ४:२आम्ही सर्व ... भुकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील... ते त्याच्या छायेत राहतील, ते धान्यासारखे पुनर्जीवीत होतील व द्राक्षीप्रमाणे फळे देतील.‘‘ होय १४:६,७. आम्हीही जर सतत ख्रिस्तावर आपला प्रमुख तारणारा म्हणून अवलंबून राहिलो, तर आम्ही ख्रिस्तांत वाढून सर्वस्वी त्याच्या सारखे होऊ.COLMar 39.1

    गव्हाचे पीक अशाप्रकारे वाढते, “पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसांत भरलेला दाणा‘‘ पेरणारा चाकर याचा हेतू, गव्हाच्या पीकाची वाढ होऊन धान्य येणे या सर्वाचा हेतू एकच आहे. यात त्यांची इच्छा म्हणजे जे भूकेले असतील त्याना अन्न व पुढील पेरणीच्या समयी बी असणे. त्याचप्रमाणे स्वर्गीय मालक त्याच्या कार्याची कापणी व त्याच्या प्रायश्चित्ताचे फळ त्याला मिळावे हा हेतू असतो. मानवाच्या अंत:करणात ख्रिस्ताची प्रतिमा निर्माण व्हावी यासाठी ख्रिस्त प्रयत्न वा शोध करीत आहे, आणि जे ख्रिस्तावर विश्वास ठेवितात त्यांच्याद्वारे हे कार्य मी करू इच्छितो. ख्रिस्ती जीवनाचा हेतू फळ देणे, विश्वासकांमध्ये ख्रिस्ताचे शील दिसून येणे, यासाठी की त्यांच्याद्वारे इतरांमध्ये शील दिसावे. COLMar 39.2

    वनस्पतीचे कार्य अंकुर, वाढ वा फळ देणे ही सर्व वनस्पती स्वत: करीत नाही, पण ‘पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत’ यशया ५५:१० तद्वत् कोणीही मनुष्य स्वत:साठी जगू शकत नाही. ख्रिस्ती मनुष्य, या जगात ख्रिस्ताचा प्रतिनिधी राहतो व मानवी आत्म्यासाठी तारण दर्शवितो.COLMar 39.3

    जे जीवन ‘स्व’ केंद्रित झालेले असते ते जीवन वाढत नाही व फलदायी होत नाही. तुम्ही जर ख्रिस्ताला तुमचा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्विकार केला असेल तर तुम्ही ‘स्व’ ला विसरले पाहिजे, व इतरांना मदत करणेचा प्रयत्न करावा. ख्रिस्ताच्या प्रितीविषयी बोलावे, येशूचा चांगुलपणा सांगणे, प्रत्येक काम जबाबदारीने करावे. आत्म्याचे ओझे आपल्या अंत:करणावर घ्या आणि हर प्रकारे प्रयत्न करून हरवलेले आत्मे जिंकणेचा प्रयत्न करीत राहा. ज्या प्रमाणात तुम्हास ख्रिस्ताचा आत्मा मिळाला त्या प्रमाणात निस्वार्थी प्रितीने व परिश्रमाने इतरासाठी कार्य करणे याद्वारे तुमची वाढ होत राहील व तुम्ही फळ देत राहाल. कृपादानाची फळे तुमच्या स्वभावात पक्व होतील. तुमचा विश्वास वाढत राहीत, तुम्ही खात्रीपूर्वक कार्य कराल, तमची प्रिती पूर्णावस्थेत पोहोचेल. ख्रिस्ताच्या शीलाशी समरूप असणारे, शुध्द, उदात्त व प्रेमळ अशा प्रकारचे शील तुम्ही प्रतिबिंबीत करीत राहाल. COLMar 40.1

    पवित्र आत्म्याची फलप्राप्ति, प्रिती, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, सौम्यता, इंद्रियदमन ही आहे‘‘ गलती ५:२२,२३. ही फलप्राप्ति कधीही नाहीशी होणार नाही, तर आपआपल्या परी फळे देत राहून शेवटी सार्वकालिक जीवन ही कापणी केली जाईल.COLMar 40.2

    “दाणा पिकल्यावर तो लागलाच ‘विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे‘‘ ख्रिस्त स्वत: त्याच्या मंडळीत प्रकट व्हावे यासाठी कितीतरी आतुरतेने अपेक्षा करीत आहे. जेव्हा ख्रिस्ती लोकांत, ख्रिस्ताचे शील प्रकट वा पूर्णपणे प्रतिबिबीत केले जाईल तेव्हाच ख्रिस्त ख्रिस्ती लोकांना त्याचे स्वत:चे लोक म्हणून हक्काने स्विकारावयास येईल.COLMar 40.3

    प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याने केवळ ख्रिस्ताचे दुसरे येणेची वाट पाहणे एवढीच संधी नसून आपला प्रभु येशू ख्रिस्त याचे आगमन लवकर व्हावे म्हणून खटपट करीत राहावे (२ पेत्र ३:११) जे कोणी ख्रिस्ती आहेत त्यांनी ख्रिस्ताच्या गौरवार्थ फलदायी जीवन जगले, तर सुवार्ता संदेशाची पेरणी सर्व जगभर किती लवकर होईल. त्यानंतर पीक लवकर परिपक्व होईल आणि हंगामात योग्य वेळी कापणी करून मौल्यवान पीक गोळा करावयास ख्रिस्त लवकरच येईल.COLMar 40.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents