Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय २४—“हा योसेफाचा पुत्र ना?”

    लूक ४:१६-३०.

    गालीलीमध्ये ख्रिस्ताच्या कार्याच्या दृष्टीने उजळ दिवस चाललेले असताना धूसर अंधाराचे त्याला गालबोट लागले होते. नासरेथकरांनी नापसंत म्हणून त्याचा नाकार केला होता. ते म्हणाले, “हा योसेफाचा (सुताराचा) पुत्र ना?”DAMar 191.1

    त्याच्या बालपणात व तरुणपणात नासरेथ येथील उपासना मंदिरात येशूने त्याच्या बांधवाबरोबर उपासना केली होती. त्याने आपल्या सेवाकार्याला सुरूवात केल्यापासून तो त्यांच्यापासून विभक्त झाला होता तरी त्या अवधीत त्याच्यावर काय गुदरले होते याविषयी ते अजाण नव्हते. पुन्हा त्याला पाहिल्यावर त्यांची आवड व अपेक्षा अधिक उंचावल्या. बाळपणापासून परिचित असलेले चेहरे त्याच्यापुढे त्याला दिसले. त्याची माता, बहीण भाऊ हे सर्वजण तेथे होते आणि शब्बाथ दिवशी उपासना करण्यास तो सभागृहात गेल्यावर सर्वांचे नेत्र त्याच्यावर खिळिले.DAMar 191.2

    त्या दिवशी नेहमीच्या सभेत वडीलाने शास्त्रभाग संदेष्ट्याच्या ग्रंथातून वाचला आणि येणाऱ्याविषयी आशा धरा असा सल्ला दिला, तो येऊन वैभवी राज्य स्थापन करील आणि सर्व जुलूम घालवून देईल. मशीहाचे आगमन अगदी नजीक आहे असे सांगून श्रोतेजनाला उत्तेजन दिले. त्याने त्याच्या येण्याच्या वैभवाविषयी स्पष्टीकरण केले आणि इस्राएल जनतेची मुक्तता करण्यासाठी तो लष्कराचे पुढारीपण करील असे म्हटले. DAMar 191.3

    सभागृहात धर्मगुरू हजर असल्यावर तो उपदेश करीत असे आणि इस्राएलातील कोणीही संदेष्ट्याच्या ग्रंथातून शास्त्र वाचन करीत असे. ह्या शब्बाथी सभेत भाग घेण्यास येशूला विनंती केली होती. “वाचण्यासाठी तो उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला दिले.” लूक ४:१६, १७. जो शास्त्रभाग त्याने वाचिला तो मशीहाला उद्देशून होताःDAMar 191.4

    “प्रभूचा आत्मा मजवर आला आहे,
    कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला.
    धरून नेलेल्याची सुटका व अंधळ्यास दृष्टी
    ही विदित करावयास,
    ठेचलेल्यास मोकळे करावयास
    त्याने मला पाठविले आहे.
    DAMar 191.5

    ” “मग पुस्तक गुंडाळून ते सेवकास परत दिले... आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याजकडे लागली... तेव्हा सर्वांनी त्याजविषयी आपली मान्यता दाखविली आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघाली त्याविषयी आश्चर्य केले.’ लूक ४:२०-२२. DAMar 192.1

    स्वतःविषयी केलेल्या भाकीतावर स्पष्टीकरण करणारा येशू लोकांच्यासमोर उभे होता. वाचलेला शास्त्राभ्यासावर विवरण करताना त्याने मशीहाच्या कार्याविषयी सांगितले, आणि म्हटले, तो धरून नेलेल्यांची सुटका करणारा, ठेचलेल्यास मोकळे करणारा, अंधळ्यास दृष्टी देणारा, आणि जगाला सत्यप्रकाश व्यक्त करणारा होता. त्याच्या सत्यवचनाने व ते मांडण्यातील त्याचा शिष्टाचार यांनी श्रोतेजनाच्या भावना उंचबळल्या आणि त्याच्या सामर्थ्याचा प्रभाव त्यांना जाणवला. दिव्य प्रभावाने सर्व विघ्ने, अटकाव नाहीसे झाले; मोशेप्रमाणे त्यांना अदृश्याचे दर्शन झाले. पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांची अंत:करणे जशी उद्दीपित झाली तसा त्याचा प्रतिसाद आवेशी तथास्तूने आणि प्रभूच्या स्तुतीने झाला.DAMar 192.2

    परंतु येशूने जेव्हा घोषीत केले की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे,” तेव्हा ते आकस्मात स्वतःचा आणि प्रबोधनकाराचा विचार करू लागले. ते इस्राएल लोक, आब्राहामाची मुले बंदिस्त असल्याचे समजत होते. ते बंदिवान असून अंधारातून सत्य प्रकाशात जाण्याची गरज असल्याप्रमाणे त्यांना दुष्टाईच्या सत्तेतून मुक्त होण्याची इच्छा होती. त्यांचा अभिमान दुखावला होता, आणि त्यांची धास्ती जागृत झाली होती. येशूचे उद्गार त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे होते. त्यांच्या कृतीचे बारकाईने परीक्षण करण्यात येईल. विधिनियम अति कडकरित्या पाळण्यामध्ये ते पाहाणाऱ्यांच्या दृष्टीत कमी भरले.DAMar 192.3

    हा येशू कोण आहे? असा त्यांनी प्रश्न विचारिला. तो मशीहाचे वैभव आहे असे जाहीर करणारा सुताराचा पुत्र होता आणि पित्याबरोबर त्याने दुकानात सुताराचे काम केले होते. टेकड्यावर कष्ट करतांना त्यांनी त्याला पाहिले होते, त्याच्या बहीण भावांची त्यांना चागली ओळख होती आणि त्याचे जीवन व कष्ट त्यांना माहीत होते. बालपणापासून तरुणपणापर्यंत आणि नंतर प्रोढावस्था प्राप्त होईपर्यंत त्याला त्यांनी पाहिले होते. जरी त्याचे जीवन निष्कलंक होते तरी तो आश्वासित आहे असा त्यांचा विश्वास नव्हता.DAMar 192.4

    नवीन राज्यासंबंधाने त्यांच्या वडीलजणांची शिकवण आणि त्याची शिकवण यामध्ये किती तफावत होती! रोमी सत्तेपासून त्यांची सुटका करण्यात येईल याविषयी येशूने चकार शब्दही काढिला नव्हता. त्यांनी त्या चमत्काराविषयी ऐकिले होते आणि त्यांच्या फायद्यासाठी त्या शक्तीचा उपयोग करण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा होती परंतु त्यासाठी काही हालचाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले नव्हते.DAMar 192.5

    त्यांच्या मनात संशयाने मूळ धरायला सुरूवात केली तेव्हा मृदु झालेले त्यांचे अंतःकरण कठोर झाले. त्या दिवशी अंध झालेले डोळे उघडू नयेत आणि बंदिस्तांची मुक्तता होऊ नये हे पाहाण्यात सैतान महत्वाकांक्षी होता. त्यांची शंका दृढ करण्यासाठी त्याने अटोकाट जारीचे प्रयत्न केले. त्यांना उपदेश करणारा त्यांचा उद्धारक आहे अशी त्यांची मनापासून खात्री झाली होती त्याचे त्याना भान राहिले नाही, त्यांनी पर्वा केली नाही.DAMar 193.1

    परंतु त्यांच्या मनातील गुप्त विचार प्रगट करून येशूने आपल्या देवत्वाचा पुरावा दिला. “त्याने त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लावाल, हे वैद्या, तू आपणालाच बरे कर; कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकिले त्या येथेही आपल्या देशात कर. तो म्हणाला, मी तुम्हास खचीत सांगतो, कोणताही संदेष्टा आपल्या देशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हास सत्य सांगतो एलीयाच्या काळात साडेतीन वर्षेपर्यंत आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या; तरी सीद्दोनाच्या प्रदेशातील सारकथ येथील एका विधवेशिवाय त्यातील कोणा एकीकडेही एलीयाला पाठविले नाही. तसेच अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी सुरीय नामान याच्याशिवाय त्यातील कोणीही शुद्ध झाला नाही.’ लूक ४:२३-२७.DAMar 193.2

    संदेष्ट्यांच्या जीवनातील घटनांचा संबंध दाखवून येशूने प्रश्न विचारणाऱ्या श्रोतेजनाला उत्तर दिले. विशेष कार्य करण्यासाठी निवडलेल्या सेवकांना कठोर अंतःकरणाच्या अश्रद्धावंताच्यासाठी काम करण्यास देवाने परवानगी दिली नाही. परंतु विश्वासच ठेवणाऱ्यांच्यासाठी संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्या सामर्थ्याच्या पुराव्याने सहाय्य केले होते. एलीयाच्या काळांत इस्राएल लोक देवापासून बहकले होते, ते पापाला चिकटले होते आणि देवाच्या निरोप्याद्वारे दिलेला इशारा त्यांनी झिडकारला होता. अशा प्रकारे देवाचा कृपाप्रसाद येणारा मार्गच त्यांनी तोडून टाकिला होता. इस्राएल लोकांची वसाहत ओलांडून विदेशी देशातील विधवेच्या घरी देवाने सेवकाला आसरा दाखविला. ती निवडलेल्या लोकामधली नव्हती. परंतु मिळालेल्या प्रकाशाप्रमाणे चालणारी ती बाई असून संदेष्ट्याद्वारे देवाने पाठविलेला महान प्रकाश स्वीकारण्यासाठी तिचे अंतःकरण मोकळे होते.DAMar 193.3

    ह्याच कारणासाठी अलीशाच्या काळी इस्राएलातील कुष्ठरोग्यांना ओलांडून पुढे जाण्यात आले होते. परंतु विदेशी अधिकारी नामान त्याच्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे विश्वासू होता आणि अधिक मदतीची तो अपेक्षा करीत होता. देवाचे कृपादान अंगिकरण्याच्या मनस्थितीत तो होता. त्यामुळे त्याचा केवळ कुष्ठरोगच बरा झाला नाही तर खऱ्या देवाच्या ज्ञानाचे त्याला वरदान मिळाले होते.DAMar 193.4

    मिळालेल्या प्रकाशाच्या प्रमाणावर देवाच्या समोरील आमची योग्यता, दर्जा अवलंबून नाही परंतु जे काही जवळ आहे त्याचा आम्ही कसा उपयोग करितो यावर अवलंबून आहे. शक्यतो योग्य फरक करून निवड केलेल्या विदेशी लोकांचे देवासमोरील स्थान, ज्यांना अधिक प्रकाश मिळाला आहे आणि देवाची सेवा करण्याचे विदित करितात परंतु दैनदीन व्यवहारात ते प्रकाशाचा अवमान करितात, त्यांच्यापेक्षा अधिक अनुकूल आहे.DAMar 194.1

    येशूच्या वचनाने उपासना मंदिरातील श्रोत्यांच्या ढोंगाच्या मूळावरच हल्ला केला, आणि देवापासून ते बहकले असून त्याचे निवडलेले लोक म्हणण्याचा मान त्यांनी गमावला आहे हे त्यांच्या निदर्शनास त्याने आणून दिले. त्यांची खरी स्थिती त्यांच्यापुढे मांडताना प्रत्येक शब्द धारदार चाकूप्रमाणे त्यांना प्रहार करीत होता. ज्या विश्वासाने प्रथम त्यांना प्रेरणा दिली त्याचा त्यांना आता तिसस्कार वाटत होता. गरीबीतून वर आलेला तो सामान्य मनुष्याशिवाय दुसरा नाही हे ते कबूल करण्यास तयार नव्हते.DAMar 194.2

    त्यांच्या अश्रद्धेने द्वेषाचा उपज झाला. सैतानाने त्यांचा ताबा घेतला आणि क्रोधयुक्त होऊन ते उद्धारकाविरूद्ध ओरडले. जो त्यांना बरे करून प्रस्थापित करीत होता त्याच्याविरुद्ध ते उठले आणि तो उध्वस्त करणारा आहे असे ते म्हणू लागले.DAMar 194.3

    त्याचा कृपाप्रसाद विदेश्याना दिला होता असा निर्देश येशूने केल्यावर श्रोतेजनांचा राष्ट्रीय अभिमान जागृत झाला आणि त्यांच्या ओरडण्यात गोंधळात त्याचे शब्द विरून गेले. ह्या लोकांना आज्ञापालनात अभिमान वाटत होता, परंतु आता त्यांची कलुषित मने दुःखावली होती, खून करण्यास ते तयार होते. सभा संपली, आणि येशूला धरून त्यांनी त्याला मंदिराबाहेर खेचले आणि नगराबाहेर हाकलले. त्याचा समूळ नाश करण्यास सर्वजन उत्सुक होते. डोंगराच्या कड्यावरून सरळ त्याला खाली लोटून देण्यासाठी त्याला टोकावर नेले. शापग्रस्त उद्गार आणि आरडाओरड यांनी सर्व वातावरण भरून गेले. काहीजण त्याला दगडमार करीत होते त्याचवेळी त्याच्यामधून तो आकस्मिक अदृश्य झाला. मंदिरामध्ये त्याच्या बाजूला जे दिव्यदूत होते ते त्या खवळलेल्या समुदायात त्याच्याबरोबर होते. त्यांनी त्याला शत्रूपासून सुरक्षीत ठेविले आणि सुरक्षीत ठिकाणी नेले.DAMar 194.4

    सदोम शहरातून लोटाला दूतांनी बाहेर काढून सुरक्षीत ठिकाणी नेले. डोंगरातील लहानशा शहरात अलीशाला दुतांनी संरक्षण दिले. डोंगराच्या सभोवती सीरीयाच्या राजाचे रथ आणि घोडेस्वार आणि मोठे लष्कर यांनी वेढा दिला होता त्याचवेळी अलीशाने, देवाच्या लष्कराने घोडेस्वार, अग्नीचे रथ यांनी देवाच्या सेवकासभोवती गराडा केला होता, हे पाहिले होते. DAMar 194.5

    अशा प्रकारे सर्व युगामध्ये ख्रिस्ताच्या श्रद्धावंत सेवकाबरोबर देवदूत राहिले. विजयी होणाऱ्याच्याविरूद्ध दुष्टाईने संगनमत करून मोठा कट रचिला होता; परंतु त्यांची मुक्तता करणाऱ्या अदृश्य गोष्टीकडे आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्याभोवती उभे असलेल्या सैनिकाकडे आम्ही पाहावे अशी ख्रिस्ताची अपेक्षा आहे. दृश्य आणि अदृश्य धोक्यापासून दूतांच्या मध्यस्थीने आम्हाला सुरक्षित ठेवण्यात आले आहे. हे आम्हाला आता कळणार नाही परंतु देवाच्या ह्या तरतूदीची कल्पना सनातन प्रकाशात येईल. त्यानंतर आम्हाला समजून येईल की स्वर्गातील संपूर्णगण पृथ्वीवरील सर्वाच्यामध्ये गोडी घेत आहे आणि देवाचे दूत आमच्या मार्गावर दररोज पहारा ठेवीत आहे.DAMar 194.6

    येशू मंदिरात संदेष्ट्याच्या ग्रंथातून वाचत असताना मशीहाच्या कार्याविषयी ठराविक माहिती देण्याच्या अगोदर तो थांबला. “परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष’ हे वाचल्यानंतर “व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस’ हा भाग त्याने गाळला. यशया ६१:२. भाकीतातील पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भागही महत्वाचे सत्य होते., आणि ते गाळल्यामुळे त्याने सत्याचा अव्हेर केला नाही. श्रोतेजनाला शेवटचा भाग फार आवडला आणि त्याची सिद्धता व्हावी अशी त्यांची फार इच्छा होती. विदेश्यावरील ईश्वरी कोपाबद्दल त्यांना दोषी ठरविले परंतु त्यांचा स्वतःचा अपराध इतरापेक्षा अधिक आहे हे त्यांना समजत नव्हते. विदेश्याना आवश्यक असलेल्या दयेची अधिक गरज त्यांना होती. मंदिरात येशू जेव्हा उभे राहिला होता त्याचवेळी दिव्य पाचारणचा स्वीकार करण्याची त्यांना सुसंधि होती. “ज्याला दया करण्यात आनंद वाटतो” (मीखा ७:१८) त्याला, पापात पडणाऱ्यांना मुक्त करण्यास अति हर्ष झाला असता.DAMar 195.1

    अनुतप्त होण्यासाठी आणखी एकदे पाचारण केल्याशिवाय त्याच्या मनाची शांती होणार नव्हती. गालीली येथील त्याच्या सेवाकार्याच्या अखेरीस पुन्हा त्याने आपल्या बाळपणातील गृहाला भेट दिली. त्या ठिकाणी त्याचा अव्हेर केल्यापासून त्याच्या उपदेशाची आणि चमत्कारांची कीर्ति, लौकिक सर्व देशात पसरला होता. त्याच्याठायी मानवी शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्य आहे हे कोणी नाकारीत नव्हते. तो सत्कर्मे करीत होता आणि सैतानाने पछाडलेल्याना बरे करीत होता हे नासरेथ येथील लोकांना पूर्णपणे माहीत होते. त्या सबंध खेड्यामध्ये कोणी दुखणाईत नव्हता कारण त्याने प्रत्येक गृहाला भेट देऊन त्यांचा आजार बरा केला होता. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्त केलेली दया, त्याचा दिव्य पवित्र अभिषेक झाल्याची साक्ष देते.DAMar 195.2

    नासरेथकर रहिवाश्यांनी पुन्हा त्याचे प्रवचन ऐकल्यावर त्यांच्यावर दिव्य आत्म्याचा प्रभाव पडला आणि त्यांच्या भावना उद्दीपित झाल्या. तरीसुद्धा त्यांच्यात वाढलेला हा मनुष्य त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा विश्वास ठेवण्यास ते धजले नाहीत. इस्राएल लोकाबरोबर वाटा देण्याचे नाकारिले होते ही कडू आठवण त्यांच्या मनात सलत होती, आणि त्याचसमयी तो स्वतःला आश्वासित आहे असे घोषीत करीत होता, कारण विदेशी स्त्री-पुरुषापेक्षा ते देवाच्या उपकारासाठी कमी पात्र आहेत असे त्याने त्यास दाखविले होते. त्यामुळे त्यांनी प्रश्न केला की, “त्याला इतके महान ज्ञान कोठून आणि ही महतकृत्ये तो कशी करितो?” त्याला देवाचा अभिषिक्त (ख्रिस्त) म्हणून स्वीकारण्यास ते तयार नव्हते. त्यांच्या अश्रद्धेमुळे उद्धारक अनेक अद्भुत चमत्कार करू शकला नाही. केवळ थोड्याच जनांनी त्याच्या कृपाप्रसादाचा अनुभव घेतला आणि तेथून तो नाराज होऊन नाखुषीने निघून गेला आणि पुन्हा परत आला नाही.DAMar 195.3

    मनात एकदा अश्रद्धा जतन करून ठेविली म्हणजे ती पुढे आपले प्राबल्य चालू ठेवण्याचा प्रयत्न करिते, आणि तीच गोष्ट नासरेथकर रहिवाश्यांची झाली. सहाजिकपणे तिने धर्मसभा व पर्यायाने राष्ट्रावर प्रबल प्रभाव पाडिला. याजक व जनता यांनी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अव्हेर प्रथम केला आणि तो अखेरच्या कार्याचा प्रारंभ ठरला. त्यांचे हे करणे रास्त आहे पटविण्यासाठी ख्रिस्ताच्या कृपावचनात क्षुल्लक दोष काढायला त्यांनी सपाटा लावला. कॅलव्हरील वधस्तंभ, त्यांच्या नगराचा विध्वंस, राष्ट्राची दाणादाण ही सर्व पराकाष्ठा देवाच्या आत्म्याचा अव्हेर केल्याची निष्पति आहे.DAMar 196.1

    सत्याचा खजिना इस्राएलांच्या समोर उघडा करायला ख्रिस्त किती उत्सुक होता! परंतु त्यांचे आध्यात्मिक अंधत्व इतके घनदाट होते की त्याच्या राज्याविषयीची सत्य त्यांना प्रगट करणे अशक्य झाले होते. त्यांनी आपली मानलेली तत्त्वे, परिणामशून्य संप्रदाय व विधिनियम यांना घट्ट अलिंगन दिले होते, आणि देवाच्या सत्याचा त्यांनी स्वीकार केला नव्हता. जीवनी भाकर त्यांच्या आवाक्यात असताना टरफल आणि भुसकट यावर ते आपला पैसा खर्च करीत होते. त्याची चुकी आहे की नाही हे पाहाण्यासाठी देवाच्या वचनात ते परिश्रम करून शोधून का पाहात नव्हते? ख्रिस्ताच्या सेवाकार्याविषयी जुना करारात अगदी सविस्तर माहिती देण्यात आली आहे, आणि वारंवार त्याने संदेष्ट्याच्या ग्रंथपटातून उतारे देऊन जाहीर केले की, “हा शास्त्रलेख तुम्ही ऐकत असताना आज पूर्ण झाला आहे.’ त्यांनी प्रामाणिकपणे शास्त्रशोध करून देवाच्या वचनाशी त्यांच्या तात्त्विक भूमिका तुलनात्मकदृष्ट्या पडताळून पाहिल्या असत्या तर त्यांच्या हट्टी, अपश्चातापी वृत्तीबद्दल येशूला रडण्याची काही गरज नव्हती. “तुमचे घर तुम्हाकरिता ओसाड असे पडले आहे’ असे त्याने जाहीर केले नसते. लूक १३:३५. मशीहाविषयी त्यांची चांगली ओळख झाली असती आणि अभिमान वाटणाऱ्या त्यांच्या नगरीचा नाश होण्याची विपत्ती टळली असती. परंतु हटवादी, फाजील धर्माभिमानामुळे यहूद्यांची मने संकुचित झाली होती. ख्रिस्ताने दिलेल्या पाठांनी त्यांच्या स्वभावातील उणीवा दाखविल्या गेल्या आणि अनुतापी होण्याचा आदेश देण्यात आला. त्याची शिकवण त्यांनी स्वीकारली असती तर त्यांच्या व्यवहारी जीवनात बदल झाला असता आणि जतन करून ठेविलेल्या आशा अपेक्षांचा त्याग केला असता. स्वर्गाचा सन्मान लाभदायक करून घेण्यासाठी मनुष्यांच्या सन्मानाचा त्याग केला पाहिजे. ह्या नवीन धर्मगुरूचे आज्ञापालन करण्यासाठी त्या काळचे विद्धान आणि अध्यापक यांच्या मताविरूद्ध त्यांनी स्थान घेतले पाहिजे होते.DAMar 196.2

    ख्रिस्ताच्या काळात सत्य लोकप्रिय नव्हते. आजही आमच्या काळात ते अप्रिय आहे. आत्मस्तुती करण्यास लावणारी दंतकथा सादर करून सैतानाने प्रथमच मनुष्याला सत्याऐवजी असत्य दिले त्यावेळेपासून ते अप्रिय आहेत. देवाच्या वचनामध्ये पायाभूत आधार नसलेले सिद्धांत, तात्त्विक भूमिका आणि तत्त्वे यांना आज आपणाला तोंड द्यावे लागत नाही काय? यहृदी जसे प्रथा, सांप्रदाय यांना चिकटून राहिले तसेच मनुष्य आजही आपल्या सिद्धांताला चिकटून राहात आहेत.DAMar 196.3

    यहूदी पुढाऱ्यांच्याठायी धार्मिक अभिमान, अहंपणा होता. मंदिरामधील सेवा कार्यामध्ये सुद्धा आत्मस्तुती करून घेण्याची इच्छा प्रगट होत होती. धर्मसभेमध्ये प्रतिष्ठित उच्च स्थानावर बसण्यास त्यांना भूषण वाटत होते, आणि लोकांनी त्यांच्या पदाचा उच्चार केल्यावर त्यांना संतोष होत असे. खऱ्या पावित्र्याचा जसा हास झाला तसे ते त्यांचे सांप्रदाय आणि विधि यांच्याविषयी अधिक जागरूक राहिले.DAMar 197.1

    त्यांच्या कलुषित मनामुळे त्यांची ग्रहणशक्ती मंदावली, गोंधळलेली झाली. मनावर छाप पाडणारे खात्रीदायक वचन आणि त्याचे विनम्र जीवन यांचा मेळ ते बसवू शकत नव्हते. बाह्यात्कारी भपका, डामडौल यामध्ये खरा मोठेपणा नाही ही विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. तो मशीहा असल्याची त्याची घोषणा त्याच्या दारिद्राशी जुळत नाही, त्यात सुसंगती नाही असे त्यांना वाटले. त्यानी प्रश्न केला की, त्याच्या घोषणेप्रमाणे तो जर होता तर तो एवढा नम्र का? लष्करी बळाविना तो जर समाधानी होता तर राष्ट्राचे काय होईल? फार दिवसापासून अपेक्षा केल्याप्रमाणे सामर्थ्य व वैभव यांच्याद्वारे यहद्यांच्या नगरीला इतर राष्ट्रे ताबेदार कसे बनतील? पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांवर इस्राएल अंमल गाजवील असे याजकांनी शिक्षण दिले नव्हते काय? आणि महान धार्मिक शिक्षकांच्या चुका होणे शक्य होते काय?DAMar 197.2

    केवळ त्याच्या जीवनात बाह्य वैभव न दिसल्यामुळेच यहूद्यांनी येशूचा नाकार केला नव्हता. तो पावित्र्याची प्रत्यक्ष प्रतिमा होता आणि ते अपवित्र, अशुद्ध होते. निष्कलंक प्रामाणिकपणाचा तो नमुनेदार आदर्श म्हणून लोकात राहिला. त्याच्या निष्कलंक जीवनाचा प्रकाश त्यांच्या अंतःकरणावर चमकला. त्याच्या प्रामाणिकपणाने त्यांचा अप्रामाणिकपणा उघड केला. त्याद्वारे त्यांच्या आढ्यताखोर पावित्र्याची पोकळी प्रगट करण्यात आली आणि त्यांच्या किळसवाण्या स्वभावामध्ये अनीती आढळून आली. अशा प्रकारच्या प्रकाशाचे हार्दिक स्वागत झाले नाही.DAMar 197.3

    ख्रिस्ताने परुश्यांच्याकडे लक्ष वेधून त्यांचे ज्ञान व धार्मिकता, यांची मनापासून वाखाणणी केली असती तर हर्षाने त्यांनी त्याचे उदे उदे करून स्वागत केले असते. परंतु देवाचे राज्य अखिल मानवजातीसाठी दयेचे दान आहे असे सांगताना तो धर्माची एक बाजू मांडीत होता आणि ते ती सहन करू शकत नव्हते. त्यांचे स्वतःचे उदाहरण व त्यांची शिकवण अशी होती की त्याद्वारे देवाची सेवा करणे उचीत आहे असे वाटत नव्हते. त्यांना द्वेषजनक व तिरस्कारणीय वाटणाऱ्या भागावर येशू जोर देत आहे असे पाहिल्यावर त्यांची अहंकारी अंतःकरणे भावनेने उदिप्त झाली. “यहूदा वंशाचा सिंह’ याच्या अंमलाखाली सर्व राष्ट्रांमध्ये इस्राएलांची उन्नती होईल ही जरी त्यांची फुशारकी होती तरी त्यामध्ये झालेली निराशा त्यांनी सहन केली असती परंतु त्यांच्या पापाबद्दल ख्रिस्ताने त्यांची केलेली कानउघाडणी आणि त्याच्या पवित्र समक्षतेत त्यांच्यावर आलेला ठपका किंवा दूषण ते सहन करू शकत नव्हते.DAMar 197.4