Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ६२—शिमोनाच्या घरी मेजवानी

    मत्तय २६:६-१३; मार्क १४:३-११; लूक ७:३६-५०; योहान ११:५५-५७; १२:१-११.

    बेथानीचा शिमोन येशूचा शिष्य होता. तो एक परूशी असून उघडपणे ख्रिस्ताच्या अनुयायामध्ये सामील झाला होता. येशू शिक्षक आहे असे मानिले होते, तो मशिहा असू शकेल अशी आशा व्यक्त केली होती परंतु तो तारणारा, उद्धारक आहे असे त्याने मान्य केले नव्हते. त्याच्या शिलस्वभावाचे रूपांतर झाले नव्हते; त्याच्या मूलभूत तत्वप्रणालीत बदल झालेला नव्हता.DAMar 484.1

    शिमोनाचा कुष्ठरोग बरा करण्यात आला होता त्यामुळे तो येशूकडे आकर्षिला होता. कृतज्ञता व्यक्त करावी अशी त्याची फार उत्कट इच्छा होती, म्हणून त्याने बेथानीला दिलेल्या शेवटच्या भेटीच्यासमयी उद्धारक व शिष्य यांच्यासाठी मेजवानी आयोजीत केली होती. ह्या मेजवानीच्या समयी पुष्कळ यहूदी एकत्र आले होते. ह्यावेळी यरुशलेममध्ये फार खळबळ चालली होती. ख्रिस्त व त्याचे कार्य याच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक लक्ष देण्यात येत होते. सणासाठी आलेले त्याच्या हालचालीचे बारकाईने निरिक्षण करीत होते आणि त्यातले काही टीकात्मक दृष्टीने पाहात होते.DAMar 484.2

    येशू वल्हांडणाच्यापूर्वी सहा दिवस बेथानीस आला होता आणि त्याच्या परिपाठाप्रमाणे लाजारसाच्या घरी तो विसावा घेण्यासाठी गेला. शहराला जाणाऱ्या प्रवाशांनी तो यरुशलेमाला जात आहे आणि शब्बाथ दिवशी तो बेथानीला विसावा घेईल असे सांगितले. लोकांची उत्सुकता शीगेला गेली होती. पुष्कळजण बेथानीला गेले, काहीजन येशूला सहानुभूती दर्शविण्यासाठी आणि बाकीचे मरणातून उठलेल्याला पाहाण्याच्या जीज्ञासामुळे गेले होते. DAMar 484.3

    मेल्यानंतर पाहिलेल्या आश्चर्यकारक गोष्टीविषयी ऐकण्याचे काहीजण प्रतिक्षा करीत होते. त्याने काहीही न सांगितल्याबद्दल ते आश्चर्य करीत होते. सांगण्यासाठी त्याच्याजवळ काही नव्हते. शास्त्र विदित करते, “मृतास तर काहीच कळत नाही... त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवा दावा ही नष्ट होऊन गेली आहेत.’ उपदेशक ९:५, ६. परंतु ख्रिस्ताच्या कार्याविषयी अद्भुत साक्ष देण्यास लाजारस तयार होता. ह्या उद्दिष्टासाठी त्याला मरणातून उठविण्यात आले होते. खात्रीपूर्वक सामर्थ्याने त्याने प्रतिपादन केले की, येशू देवपुत्र होता.DAMar 484.4

    बेथानीहून परत गेलेल्या पाहुण्यांनी माहिती दिल्यावर यरुशलेमात जास्तच खळबळ उडाली. लोक येशूला पाहाण्यास व त्याचे ऐकण्यास फार आतुर झाले होते. यरुशलेमला येताना त्याच्याबरोबर लाजारस असणार काय आणि वल्हांडण सणाच्या समयी संदेष्ट्याचा राज्यारोहन होणार काय ह्या विचारणा करण्यात येत होत्या. याजक व अधिकारी यांचा लोकावरील प्रभाव आणखी कमी होत असलेला पाहून येशूवरील त्यांचा संताप अधिकच बळावला. त्यांच्या मार्गातून त्याचा एकदाचा नायनाट करण्याच्या संधीची ती अगदी आतुरतेने वाट पाहात होते. जस जसी वेळ जात होती तसतसे तो यरुशलेमाला येणार नाही असे त्यांना वाटत होते. वेळोवेळी त्याने त्यांचे हिंसात्मक इरादे निष्फळ ठरविले होते यांचे त्यांना स्मरण झाले. त्याच्याविषयीची त्यांची संकल्पना त्याने ओळखली असावी आणि त्यामुळे तो इकडे फिरकणार नाही असे त्यांना वाटले. त्यांची ही अस्वस्थता ते झाकून ठेऊ शकत नव्हते, ते एकमेकास म्हणू लागले, “तुम्हास कसे वाटते? तो सणास येणार नाही काय?”DAMar 485.1

    याजक व परूशी यांचे सल्लागार मंडळ बोलावले. लाजारसाला मरणातून उठविल्यापासून लोकांची सहानुभूती येशूला इतकी लाभली होती की त्याला उघडपणे पकडणे धोक्याचे होते. म्हणून त्याला गुप्तपणे पकडून त्याची चौकशी शांतपणे घाईघाईने करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. त्याची शिक्षा समजल्यावर जन मताची अस्थिर लाट त्यांच्या बाजूने राहील असे त्यांना वाटले.DAMar 485.2

    येशूचा नाश करण्याची योजना त्यांनी विचारासाठी मांडली. परंतु लाजारस जीवंत राहील तोपर्यंत याजक व धर्मगुरू यांना स्वतःची शाश्वती वाटत नव्हती. जो मनुष्य कबरेत चार दिवस होता आणि येशूच्या शब्दाने ज्याला पुनर्जीवन लाभले त्याच्या वास्तव्याने आता किंवा नंतर प्रतिक्रिया होण्यास कारण राहील. अशा प्रकारचा चमत्कार करणाऱ्याचा प्राण घेतल्याबद्दल लोक त्यांच्या पुढाऱ्यावर सूड घेतील. लाजरससूद्धा मेला पाहिजे असा निर्णय धर्मसभेने घेतला. द्वेष व दुराग्रह त्यांचे गुलाम ह्या थराला जातात. अनंत सामर्थ्याने ज्याला कबरेतून मुक्त करून जीवदान दिले त्याचा वध करण्यास यहूदी पुढाऱ्यांचा द्वेष आणि अश्रद्धा इतक्या विकोपास गेली होती.DAMar 485.3

    यरुशलेमात हा कट रचला जात होता तेव्हाच येशूला त्याच्या मित्रांसोबत शिमोनाने केलेल्या मेजवानीस बोलाविले होते. मेजावर येशूबरोबर टेबलाच्या एका बाजूला किळसवाण्या रोगापासून बरे केलेला शिमोन बसला होता व दुसऱ्या बाजूला मरणातून ज्याला उठविले होते तो लाजारस बसला होता. मार्था मेजावर वाढण्याचे काम करीत होती आणि मरीया येशूच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द ग्रहण करीत होती.DAMar 485.4

    येशूने आपल्या दयेनुसार तिची पापक्षमा केली होती, तिच्या प्रिय बंधुला कबरेतून उठविले होते आणि मरीयेचे अंतःकरण कृतज्ञतेने भरून गेले होते. त्याचे मरण लवकर होणार आहे असे येशूने काढिलेले उद्गार तिने ऐकिले होते आणि आपले दाट प्रेम व दुःख हे दर्शविण्यासाठी ती आतुरतेने वाट पाहात होती. मोठा स्वार्थत्याग करून “जटामांसीचे मोल्यवान सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी” त्याच्या अंगाला लावण्यासाठी तिने खरेदी केली. परंतु आता त्याचा राज्याभिषेक होणार असे अनेकजण घोषीत करीत होते. तिच्या दुःखाचे रूपांतर हर्षात झाले आणि तिच्या प्रभूचा सन्मान करण्यात ती प्रथम होण्यासाठी फार उत्सुक होती. तिने कुपी फोडून त्यातील सुगंधी तेल येशूच्या माथ्यावर व चरणावर ओतिले; नंतर गुडघे टेकून आसवांनी त्याचे पाय भिजवून आपल्या मस्तकाच्या लांब केसांनी ते पुसले.DAMar 486.1

    कोणी तिचे निरिक्षण करू नये म्हणून ती टाळत होती आणि तिची हालचाल कोणाच्या लक्षात आली नसेल, परंतु सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले होते आणि त्यामुळे तिची कृती तेथे हजर असलेल्या सर्वाच्या लक्ष्यात आली. यहूदाने त्या कृतीकडे तीव्र तिरस्काराने पाहिले. ह्या बाबतीत ख्रिस्ताचे काय म्हणणे आहे हे पाहाण्याअगोदर तो आपल्या सोबत्यांच्या कानात कुजबुजून गाहाणे सादर करीत होता आणि विनाकारण केलेल्या ह्या उधळपट्टीला आळ न घातल्याबद्दल ख्रिस्ताला ठपका दिला. असंतुष्टता निर्माण होईल अशा सूचना त्याने धूर्तपणाने मांडल्या.DAMar 486.2

    शिष्यांच्यासाठी यहूदा खजिनदार होता आणि त्यांच्या अल्पशा संचयातून आपल्या स्वतःसाठी तो गुप्तपणे काढून घेत असे त्यामुळे त्यांचा साठा अपुरा झाला होता. जे काही घेता येईल ते घेऊन डबीत भरण्यास तो फार उत्सुक होता. डबीतील पैशाचा उपयोग गरीबांच्या कल्याणासाठी करण्यात येत होता; खरेदी केलेली एकादी वस्तु यहूदाच्या दृष्टीने महत्त्वाची नसे तेव्हा तो म्हणत असे की, ही विनाकारण उधळपट्टी कशाला? मी गरीबांच्यासाठी जी डबी ठेविली आहे त्यात तीच रक्कम का टाकिली नाही? मरीयेचे हे कृत्य त्यांच्या स्वार्थीपणाच्या अगदी विरुद्ध होते त्यामुळे तो खजील झाला होता आणि त्याच्या संवयीप्रमाणे त्याने केलेल्या विरोधाच्या समर्थनार्थ तो हे योग्य निमित्त सादर करीत होता. शिष्यांच्याकडे वळून त्याने विचारिले, “हे सुगंधी तेल तीनशे रुपयास विकून ते गरीबास का दिले नाहीत? त्याला गरीबांची काळजी होती म्हणून तो म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात घेई ते तो चोरून घेई.” यहूदा गरीबांची पर्वा करीत नव्हता. मरीयेचे सुगंधी तेल विकले असते आणि आलेला पैसा त्याच्या हातात पडला असता तर गरीबांना त्याचा काही फायदा झाला नसता.DAMar 486.3

    यहूदाला स्वतःच्या शासन क्षमतेविषयी फार अभिमान होता. त्याच्या सोबतीच्या शिष्यांमध्ये अर्थव्यवस्थेचा तज्ञ म्हणून तो स्वतःला सरस समजत होता आणि त्यांनी त्याला तसे मानण्यास भाग पाडले होते. त्यांचा आत्मविश्वास त्याने संपादन केला होता आणि त्यांच्यावर तसे त्याचे वजनही होते. गरीबाविषयी दाखविलेल्या सहानुभूतीने त्यांची फसवणूक झाली होती. धूर्तपणाने पोटात शिरून मर्जी संपादन केल्यामुळे मरीयेची भावभक्ती त्यांना शंकेखोर, अविश्वासी वाटली. “कोणत्या कारणासाठी ही उधळपट्टी? हे सुगंधी तेल अधिक रूपयास विकून ते गोरगरीबास देता आले असते,” ही कुरकुर मेजासभोवती पसरली.DAMar 486.4

    मरीयेने हे टीकात्मक उद्गार ऐकिले. तिचे अंतःकरण द्रवून गेले. ह्या अपव्ययाबद्दल तिची बहीण तिची खरडपट्टी काढील म्हणून तिला भीती वाटली. प्रभूलासुद्धा ती उधळी आहे असे वाटेल. दिलगिरी व्यक्त न करिता किंवा काही निमित्त न सांगता ती मागे मागे राहाण्याच्या बेतात होती त्याचवेळी तिच्या कानावर प्रभूचे शब्द पडले, “तिच्या वाटेस जाऊ नका, तिला त्रास का देता?” त्याने तिला दुःखित झालेली व ओशाळलेली पाहिली. तिच्या पापाची क्षमा केल्याबद्दल आणि तिच्या मनाला सुख समाधान दिल्याबद्दल कृतज्ञतेने तिने हे कृत्य केले होते हे त्याला माहीत होते. टीकेचा आवाज होत असतांना त्याने मोठ्याने म्हटले, “हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हास त्यांचे बरे करिता येते; परंतु मी तुम्हाबरोबर नेहमीच असतो असे नाही. हिला जे काही करिता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लाविले आहे.” DAMar 487.1

    उद्धारकाच्या मृत शरीराला उत्तरक्रियेच्या वेळी लावावयाचे सुगंधीद्रव्य मरीयेने आताच त्याच्या जीवंत शरीराला लाविले. दफन विधीच्या वेळी त्यांचा सुगंध केवळ कबरेतच पसरू शकला असता, आता तिचा विश्वास आणि प्रीती यांच्यामुळे त्याचे अंतःकरण आनंदित झाले. अरिमथाईकर योसेफ आणि निकम यांनी त्यांचे प्रेमदान तो जीवंत असतांना वाहिले नाही. त्याच्या थंडगार बेशुद्ध शरीराला लावण्यासाठी मोल्यवान गंधरस व अगरू आणिले होते. ज्या स्त्रियांनी सुगंधी द्रवे आणिली होती ती निरर्थक ठरली कारण तो उठला होता. परंतु उद्धारक तिच्या भावभक्तीविषयी ज्ञात असताना तिने आपल्या प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर केला होता त्यावेळी मरीयेने ते त्याच्या उत्तरक्रियेसाठी केले होते. उद्धारलेल्या व्यक्तीने मनःपूर्वक वाहिलेल्या प्रेमकार्याची स्मृति घेऊन तो निष्ठुर चौकशीसाठी निघून गेला. DAMar 487.2

    मृतासाठी मूल्यवान भेटी आणणारे अनेकजण आहेत. थंडगार व शांत शवासभोवती जमून प्रेमोद्गाराचा ते वर्षाव करितात. जो पाहत नाही आणि ऐकत नाही त्याच्यावर गुणगौरवाचा, भावभक्तीचा आणि कोमल अंतःकरणाच्या स्मृतिसुमनाची उधळणी करण्यात येते. जो ऐकू शकत होता आणि ज्याच्या अंतःकरणात संवेदना, भावना जागृत होत्या त्या दमलेल्या भागलेल्या व्यक्तीला ह्यांची अत्यंत गरज होती तेव्हा हे उद्गार काढिले असते तर त्यांचा सुगंध किती मोल्यवान ठरला असता!DAMar 487.3

    मरीयेला तिच्या प्रेममय कृतीचा संपूर्ण अर्थ ज्ञात नव्हता. तिला दोष देणाऱ्यांना ती उत्तर देऊ शकत नव्हती. येशूला त्या घटकेस तेलाभ्यंग करण्याचे तिने का ठरविले त्याचे ती उत्तर देऊ शकत नव्हती. पवित्र आत्म्याने तिच्यासाठी ही योजना आखली होती आणि तिने ती प्रेरणा अंमलात आणिली. त्याचे उत्तर देण्यासाठी पवित्र आत्म्याने आपला दर्जा सोडला नाही. अदृश्य उपस्थितीत तो मन व आत्मा यांच्यावर कार्य करितो व कृती करण्यास उत्तेजन देतो. ते त्याचे स्वतःचे समर्थन आहे.DAMar 488.1

    ख्रिस्ताने मरीयेला तिच्या कृतीचा अर्थ सांगितला आणि त्यामध्ये त्याला जे मिळाले त्यापेक्षा अधिक त्याने दिले. त्याने म्हटले, “हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लाविले आहे.’ जशी अलाबास्टर कुपी फोडल्यावर सुगंधाने सगळे घर भरून जाते तसे ख्रिस्ताला भरावयाचे होते, त्याचे शरीर मोडावयाचे होते; परंतु तो कबरेतून उठणार होता आणि त्याच्या जीवनाचा सुगंध सर्व पृथ्वीवर दरवळणार होता. “ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले.” इफिस. ५:२.DAMar 488.2

    ख्रिस्ताने प्रतिपादले, “सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.’ भविष्याकडे दृष्टीक्षेप करून उद्धारकाने खात्रीने सुवार्तेविषयी सांगितले. सर्व जगात तीची घोषणा करावयाची होती. जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे मरीयेच्या देणगीचा सुगंध दखळेल आणि तिच्या स्वाभाविक कृतीद्वारे कृपाप्रसाद लाभेल. राज्य उदय पावतील व पतन पावतील; राजे आणि विजेते यांची नावे विसरली जातील; परंतु ह्या स्त्रीची कृती पवित्र इतिहासाच्या पानावर अजरामर राहील. कालावधी संपुष्टात येईल तोपर्यंत ही फोडलेली अलाबास्टर कुपी पतित मनुष्यजातीवरील देवाच्या अपरिमित प्रीतीची गोष्ट सांगेल.DAMar 488.3

    यहूदा जी कृती करणार होता त्या संबंधात मरीयेची कृती अगदी विरुद्ध होती. ज्याने दुष्ट विचारांचे व कडक टीकांचे बी शिष्यांच्या मनात पेरले होते त्याला ख्रिस्ताने धारदार मर्मभेदक पाठ दिला असता! दोष लावण्याऱ्याला दूषण देणे कसे न्याय्य आहे! जो प्रत्येकाच्या अंतःकरणातील हेतू समजतो आणि प्रत्येक कृती जाणतो त्याने मेजवानीच्या वेळी हजर असलेल्यांच्या समोर यहूदाच्या अनुभवातील अंधकाराचा अध्याय उघडा केला असता. पोकळ बनावणी करून विश्वासघातक्याने आपल्या शब्दांचे समर्थन केले ती उघड करण्यात आली असती; कारण गोरगरीबांना सहानुभूती दाखविण्याच्या ऐवजी त्यांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेला पैसा तो लुबाडत होता. विधवा, पोरके आणि मजुरदार यांची गांजणूक केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध तिरस्कारयुक्त क्रोध भडकला असता. परंतु ख्रिस्ताने त्याचे खरे स्वरूप, अंतरंग दाखविले असते तर विश्वासघात करण्यास ह्या कारणाचा आग्रह धरिला असता. जरी चोरीचा आक्षेप त्याच्यावर लादला असता तरी शिष्यांच्यामध्ये सुद्धा त्याला सहानुभूती मिळाली असती. उद्धारकाने त्याला दूषण दिले नाही त्यामुळे त्याच्या विश्वासाघातकी कृत्यासाठी देण्यात येणारे निमित्त टळले.DAMar 488.4

    येशूने यहदाकडे निरखून पाहिल्यावर त्याला समजून आले की, उद्धारकाला त्याच्या ढोंगाचे आकलन, त्याचा नीच आणि तिरस्कारणीय स्वभाव कळून आला आहे. दोषी ठरविलेल्या मरीयेच्या कृतीची प्रशंसा करून ख्रिस्ताने यहृदाची कान उघाडणी केली. ह्याच्या अगोदर पूर्वी कधी उद्धारकाने त्याला असा प्रत्यक्ष दोष दिला नव्हता. ही धमकी त्याला चांगली टोचली. त्याचा सूड घेण्याचा त्याने निर्धार केला. मेजावरून उठून तो थेट मुख्य याजकाच्या हवेलीकडे गेला. तेथे त्यांची धर्मसभा चालू होती आणि त्यांच्या हातात येशूला धरून देण्याची तयारी दाखविली.DAMar 489.1

    याजकांना अति हर्ष झाला. पैशाविना, कसलीही किंमत न देता ख्रिस्ताचा उद्धारक म्हणून स्वीकार करण्याचा विशेष हक्क ह्या इस्राएलातील पुढाऱ्यांना देण्यात आला होता. परंतु त्यांनी ह्या मोल्यवान देणगीचा नाकार केला. सुवर्णापेक्षा अधिक मोलाचे तारण स्वीकारण्याचे त्यांनी नाकारिले आणि त्याच्या प्रभूला त्यांनी तीस रुपयाला विकत घेतले.DAMar 489.2

    यहूदा इतका लोभी झाला होता की त्याच्या स्वभावातील प्रत्येक सद्गुणावर त्याने मात केली. ख्रिस्ताला दिलेल्या दानाबद्दल तो आकसाने कुरकुर करीत होता. त्याचे अंतःकरण द्वेषाने फणफणत होते. पृथ्वीच्या सम्राटाच्या दर्जाची देणगी तारणाऱ्याला मिळायला पाहिजे असे त्याला वाटत होते. सुगंधी द्रव्याच्या कुपीची किंमत होती तिच्यापेक्षा कितीतरी कमी मोलाने त्याने आपल्या प्रभूचा विश्वासघात केला.DAMar 489.3

    शिष्य यहूदासारखे नव्हते. उद्धारकावर त्यांचे प्रेम होते. परंतु त्याच्या उदात्त शीलस्वभावाचे मोल त्यांना उमजले नव्हते. त्यांच्यासाठी त्याने जे काही केले होते त्याची त्यांना जाणीव झाली असती तर त्याला जे अर्पण केले होते ते निरर्थक होणार नव्हते असे त्यांना वाटले असते. पूर्वेकडून आलेल्या मागी लोकांना येशूविषयी फारच थोडे माहीत होते तरी त्याला द्यावयाच्या मानाने त्यांनी खरे गुणग्रहण केले होते. गोठ्यामधील पाळण्यामध्ये लहान बाळ असताना त्यांनी मोल्यवान भेट आणून सत्काराप्रित्यर्थ वाकून त्याला नमन केले.DAMar 489.4

    मनापासून केलेली सभ्यतेची कृती ख्रिस्ताला मोल्यवान वाटते. त्याच्यावर उपकार करणाऱ्याला त्याने आशीर्वाद दिला. लहान बालकाने फूल तोडून त्याला प्रेमाने दिल्यावर त्याने त्याचा स्वीकार केला. लहान मुलांनी दिलेल्या दानाचा स्वीकार करून त्यांना त्याने आशीर्वाद दिला आणि त्यांचे नाव जीवनी पुस्तकात लिहिले. पवित्र शास्त्रामध्ये येशूला मरीयेने केलेल्या तेलाभ्यंगाचा उल्लेख करून इतर मरीयापासून तिला वेगळे केले आहे. ख्रिस्तासाठी केलेल्या प्रेमाची व पूज्यबुद्धीची कृती देवपुत्रावरील विश्वासाचे चिन्ह आहे. ख्रिस्तावर एकनिष्ठा असलेल्या महिलाच्या पुराव्याचा उल्लेख पवित्र आत्मा करितोः “जिने पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागविली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यास अनुसरली असेल.’ १ तिमथ्य. ५:१०.DAMar 489.5

    प्रभूच्या इच्छेचे मनापासून पालन करण्यास मरीयेला अत्यानंद होत होता. पवित्र प्रेमाने दिलेले धन त्याने स्वीकारिले आणि हे शिष्यांना समजले नाही, समजणार नाही. ज्या भावभक्तीने मरीयेने हे आपल्या प्रभूसाठी केले ते जगातील मोल्यवान सुगंधी तेलापेक्षा फार मोल्यवान ख्रिस्ताला वाटले कारण त्याद्वारे जगाच्या उद्धारकाचे गुणग्रहण केले होते. ख्रिस्त प्रेमाने ते करण्यास ती उद्युक्त, प्रेरीत झाली. ख्रिस्ताच्या अतुल्य शीलस्वभावाने तिचे अंतःकरण भरून गेले. ते सुगंध द्रव्य देणाऱ्याच्या अंतःकरणाची खूण होती. स्वर्गीय निर्झरातून भरून वाहाणाऱ्या प्रेमाचे ते बाह्य प्रमाण होते.DAMar 490.1

    शिष्यांनी त्यांचे ख्रिस्तावरील प्रेम व्यक्त करून त्याला आनंद द्यावा ह्यासाठी मरीयेचे कार्य हा एक त्यांना धडा होता. त्याच्यावर त्यांची सर्व भीस्त होती. लवकरच त्याच्यापासून त्याचे अस्तित्व नाहिसे होणार आणि त्यांची कृतज्ञता त्याच्या प्रेमळ कृत्याबद्दल व्यक्त करण्यास त्यांना प्रसंग मिळणार नाही ह्याची त्यांना जाणीव नव्हती. ख्रिस्ताचा एकाकीपणा, स्वर्गापासून दूर झालेला, मानवतेचे जीवन जगणारा ह्या सर्वांचा शिष्यांना पूर्ण समज झाला नव्हता आणि त्याचे महत्त्व कळले नव्हते. अपेक्षेप्रमाणे शिष्याकडून न मिळाल्यामुळे तो अनेक वेळा दुःखी झाला होता. त्याला माहीत होते की त्याच्याबरोबर असलेल्या देवदूतांच्या प्रभावाखाली ते जर असते तर अंतःकरणातून प्रसव पावलेली आत्मिक ममता ह्याच्यापेक्षा दुसरे दान मोलाचे नव्हते हे त्यांना समजले असते.DAMar 490.2

    तो त्यांच्यापासून गेल्यानंतर त्याचे प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुष्कळशा गोष्टी ते त्याच्यासाठी करू शकले असते ह्याचे ज्ञान त्यांना झाले. येशू प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर नव्हता आणि ते मेंढपाळाविणा मेंढरे असे होते त्यावेळी काय केल्याने त्याच्या मनाला समाधान झाले असते हे त्यांना समजून आले. मरीयेला दोष न देता आता स्वतःला देत होते. ख्रिस्तापेक्षा गोरगरीब देणगीसाठी पात्र आहेत ही विचारसरणी त्यांनी मागे घेतली असती तर काय झाले असते! वधस्तंभावरून प्रभूचे खरचटलेले शरीर खाली काढिले तेव्हा त्यांच्यावर ठेवलेला ठपका त्याच्या अतःकरणाला झोबला.DAMar 490.3

    आजसुद्धा जगात त्याचीच फार गरज आहे. परंतु थोडक्यानाच ख्रिस्ताचे महत्त्व वाटते. महत्त्व वाटले तर मरीयेसारखे महान प्रेम व्यक्त केले जाईल. तेलाभ्यंग मनमोकळेपणाने करण्यात येईल. भारी किमतीचे सुगंधी तेल नासाडी म्हणण्यात येणार नाही. ख्रिस्ताला अर्पण केलेले कोणतेही दान फार किंमतीचे वाटणार नाही, त्याच्यासाठी कोणताही स्वःनाकार किंवा स्वार्थत्याग फार मोठा मानला जाणार नाही.DAMar 490.4

    “ही कशासाठी नासाडी’ क्रोधाने काढिलेल्या ह्या शब्दामुळे त्याने केलेला महान यज्ञ - पतन पावलेल्या जगाच्या प्रायश्चितासाठी स्वतःचा केलेला यज्ञबली त्याच्या समोर उभा राहिला. मानवाच्या कुटुंबासाठी तो इतका समृद्ध होता की त्यामुळे आणखी काही उणीव वाटत नव्हती. येशूच्या देणगीमध्ये देवाने सर्व स्वर्ग अर्पण केला. मनुष्याच्या विचारसरणीत ही केवळ वायफळ उधळपट्टी होती. मनुष्याच्या विचारसरणीप्रमाणे तारणाची संपूर्ण योजना करुणा व तरणोपाय यांची वायफळ उधळपट्टी आहे. पाहा, स्वःनाकार आणि मनःपूर्वक सेवा आम्हाला सर्वत्र आढळते. ख्रिस्तामध्ये व्यक्त केलेल्या अपरिमित प्रेमाने उद्धार करून समृद्ध होण्यास नकार देणाऱ्या मानवाच्या कुटुंबाकडे स्वर्गीय गण आश्चर्याने पाहातो. कदाचित ते उद्गारतील, ही मोठी नासाडी कशासाठी?DAMar 491.1

    हरवलेल्या जगासाठी केलेले प्रायश्चित पूर्ण, समृद्ध आणि शेवटास नेलेले होते. निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी ख्रिस्ताचा यज्ञ अत्यंत समृद्ध होता. त्या यज्ञाचा स्वीकार करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा निर्बंध नव्हता. सर्वांचे तारण होत नाही; तथापि त्याच्या औदार्याप्रमाणे साध्य होत नाही म्हणून तारणाची योजना वायफळ नासाडी नाही. तेथे भरपूर आणि जादा असणे आवश्यक आहे.DAMar 491.2

    यहूदाच्या मरीयेवरील दोषारोपाचा परिणाम शिमोनावर झाला होता आणि येशूच्या वर्तणुकीने त्याला आश्चर्य वाटले होते. त्याचा परूशी अभिमान दुखावला होता. मेजवानीस आलेल्या पुष्कळ पाहुण्यांना येशूची वर्तणूक असंतोषाची आणि शंकेची वाटली हे त्याला माहीत होते. शिमोन मनात म्हणाला, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते.” DAMar 491.3

    कुष्ठरोगापासून शिमोनाला बरे करून त्याला जीवंत मृत्यूपासून ख्रिस्ताने वाचविले होते. परंतु आता ख्रिस्त संदेष्टा आहे की नाही असा तो प्रश्न विचारीत होता. त्या स्त्रिला भेटण्यास त्याने परवानगी दिली म्हणून, तिची पापे इतकी मोठी आहेत की त्यांची क्षमा करता येत नाही म्हणून, ती पापी आहे असे त्याला समजले नाही म्हणून तो संदेष्टा नाही असे त्याला वाटण्याचा मोह झाला. त्याला वाटले की ह्या स्त्रीविषयी ख्रिस्ताला काहीच ठाऊक नव्हते म्हणून त्याने तिला स्पर्श करण्यास परवानगी दिली.DAMar 491.4

    देव आणि ख्रिस्त यांच्याविषयीच्या शिमोनाच्या अज्ञानपणामुळे त्याची विचारसरणी तशी होती. देवाचा पुत्र देवासारखा म्हणजे सदयतेने, कनवाळूपणे आणि सौम्यतेने वागला पाहिजे ह्याची जाणीव त्याला झाली नव्हती. मरीयेच्या अनुतप्त सेवेकडे दुर्लक्ष करावे असे शिमोनाला वाटत होते. ख्रिस्त चरणाचे मुक्के घेऊन तेलांभ्यग केलेल्या मरीयेच्या कृतीने तो खिजला होता. त्याला वाटले ख्रिस्त जर संदेष्टा असता तर त्याने पाप्यांना ओळखून त्यांना धमकाविले असते.DAMar 491.5

    व्यक्त न केलेल्या ह्या विचाराला उद्धारकाने उत्तर दिले: “शिमोना, मला तुझ्याबरोबर काही बोलावयाचे आहे... एका सावकाराचे दोन कर्जदार होते, एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते. देणे फेडावयास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघास सोडिले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील? शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडिले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरविले.”DAMar 492.1

    नाथानाने दावीदाला केले त्याप्रमाणे ख्रिस्ताने आपला शाब्दिक हल्ला दाखल्याच्या रूपात झाकून ठेविला. स्वतःला शिक्षा जाहीर करण्याचे काम त्याच्या यजमानावर सोपविले. जिचा तो तिरस्कार करीत होता त्या बाईला शिमोनाने पापांत पाडिले होते. त्याने तिच्यावर अत्याचार केला होता. दाखल्यातील दोन कर्जदार शिमोन व ती स्त्री ही होती. दोघांनी वेगवेगळ्या दोन प्रमाणानी ऋण फेडावे असे येशू ख्रिस्त येथे शिकवीत नाही कारण प्रत्येकजण कृतज्ञतेचे ऋणी आहोत आणि त्याची भरपाई केव्हाही होणार नाही. परंतु शिमोन मरीयेपेक्षा धार्मिक असल्याचे दाखवीत होता आणि त्याचे पाप किती मोठे आहे हे त्याने पाहावे अशी येशूची अपेक्षा होती. पन्नास रुपयाच्या कर्जदारापेक्षा पाचशे रुपयाच्या कर्जदारासारखे त्याचे पाप त्या स्त्रीपेक्षा मोठे होते ते त्याला तो दाखवीत होता.DAMar 492.2

    शिमोन आता स्वतःला नवीन दृष्टीकोनातून पाहात होता. संदेष्ट्यापेक्षा अधिक असणाऱ्याने मरीयेकडे कसे पाहिले हे त्याला आता समजले. ख्रिस्ताने तिचे प्रेमळ अंतःकरण व भक्तीभाव जाणला हे त्याला समजले. तो फार खजील झाला आणि तो परात्पराच्या समोर असल्याचे त्याला भान झाले. DAMar 492.3

    ख्रिस्ताने पुढे म्हटले, “मी तुमच्या घरी आलो तो तुम्ही मला पाय धूण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु प्रेमप्रेरित पश्चात्तापदग्ध अधूने मरीयेने माझे पाय धुतले आणि आपल्या मस्तकाच्या लांब केसांनी पुसले. “तुम्ही माझा मुक्का घेतला नाही, परंतु ह्या स्त्रीने, जिचा तुम्ही तिरस्कार करिता, मी आत आल्यापासून माझ्या पायाचे मुक्के घेण्याचे थांबविले नाही.’ प्रभूवरील प्रेम व्यक्त करण्याची शिमोनाला मिळालेल्या संधीचे आणि त्याच्यावर केलेल्या कृपाप्रसादाबद्दल गुणग्रहण करण्याच्या प्रसंगांचे ख्रिस्ताने तपशीलवार कथन केले. प्रेममय उक्ती व कृती यांच्याद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्यास जेव्हा त्याचे लोक हेळसांड करितात तेव्हा त्याचे अंतःकरण दुःखाने व्यथित होते हे उद्धारकाने त्याच्या शिष्यांना स्पष्टपणे पण सभ्यपणाने सांगितले.DAMar 492.4

    अंतःकरणाचा शोध घेणाऱ्याने मरीयेच्या कृतीतील उद्देश जाणला आणि शिमोनाच्या वक्तव्यातील प्रेरक शक्तीही त्याने ओळखली. त्याने त्याला म्हटले, “ही बाई तू पाहातोस काय?” ती पापी आहे. “मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करितो.”DAMar 492.5

    उद्धारकाबद्दल शिमोनाचा निरुत्साह आणि निष्काळजीपणा यावरून त्याच्यावर दाखविलेल्या करुणेचचे गुणग्रहण त्याने किती केले हे दिसून येते. घरी येण्यास येशूला आमंत्रण देऊन त्याचा सत्कार केला असे त्याला वाटले. परंतु त्याचे खरे स्वरूप त्याला आता दिसले. त्याला वाटले की तो पाहुण्याला चांगला ओळखून घेत होता परंतु पाहुणाही त्याला ओळखून घेत होता. त्याच्या विषयीचे ख्रिस्ताचे मत कसे खरे होते ते त्याने पाहिले. त्याचा धर्म परूश्यांचा पेहराव होता. त्याने येशूची दया तुच्छ लेखली होती. तो देवाचा प्रतिनिधी आहे असे त्याने मान्य केले नव्हते. पापी मरीयेला पापक्षमा लाभली परंतु पापी शिमोनाला पापक्षमा लाभली नाही. तिच्याविरुद्ध नीताचे कडक नियम लादण्याच्या प्रयत्नात त्याने स्वतःलाच दोषी ठरविले.DAMar 493.1

    पाहण्यांच्यासमोर उघडपणे त्याची कान उघाडणी न करण्यामधील त्याच्या दयेमुळे शिमोनाचे अंतःकरण द्रवले. मरीयेला जशी वागणूक द्यावी असे त्याला वाटले होते तशी वागणूक त्याला मिळाली नव्हती. त्याचे दोष दुसऱ्यांच्यासमोर उघड करण्याची येशूची इच्छा नव्हती परंतु वस्तुस्थितीवरील सत्य विधानाने त्याच्या मनाची खात्री करणे व दयाळू कृतीने त्याचे अंतःकरण नम्र करणे ही येशूची धारणा होती हे त्याच्या लक्ष्यात आले. कडक दोषारोपाने अनुताप करण्यास शिमोनाचे अंतःकरण कठीण झाले असते परंतु सहनशीलतेच्या उपदेशपर बोलाने त्याची चुकी त्याला समजून आली. त्याच्यावरील प्रभूच्या ऋणाचे परिणाम किती मोठे आहे हे त्याने पाहिले. त्याचा अहंकार उतरला, त्याने पश्चात्ताप केला आणि गर्विष्ठ परूशी नम्र, स्वार्थत्यागी शिष्य बनला. DAMar 493.2

    मरीया फार पापी बाई होती असे समजण्यात आले होते, परंतु ज्या परिस्थितीने तिचे जीवन असे बनले होते ते ख्रिस्ताला माहीत होते. तिच्या जीवनातील आशेचा प्रत्येक किरण त्याने मालविला असता परंतु त्याने ते केले नाही. निराशा आणि नाश यांच्यातून त्यानेच तिला वर उचलेले होते. तिच्या मनावर व अंतःकरणावर ताबा मिळविणाऱ्या दुरात्म्याला सात वेळा त्याने दिलेली धमकी तिने ऐकिली होती. तिच्यासाठी पित्याजवळ त्याने आग्रहाने केलेली विनवणी तिने ऐकिली होती. पाप त्याच्या निष्कलंक पावित्र्याला अपमानकारक आहे हे तिला माहीत होते, आणि त्याच्या सामर्थ्याने ती विजयी झाली होती.DAMar 493.3

    मानवी दृष्टीला तिची वस्तुस्थिती टाकाऊ, आशाहीन वाटली परंतु ख्रिस्ताने तिच्यामध्ये सात्त्विकतेची क्षमता पाहिली. तिच्या शीलस्वभावातील सात्त्विक गुण त्याने पाहिले. तारणाच्या योजनेने मानवतेला प्रचंड शक्यतेने संपन्न केले आहे आणि मरीयेमध्ये ही शक्यता पाहिली पाहिजे होती. त्याच्या कृपेद्वारे दिव्य स्वभावाची ती सहभागीदार झाली. जी पापात पडली आणि जिचे मन दुरात्म्याचे वस्तीगृह झाले तिला उद्धारकाच्या संगतीत व सेवेत आणण्यात आले. उद्धारकाच्या चरणी बसून मरीयेने त्याचे ग्रहण केले. मरीयेनेच त्याच्या चरणाला तेलांभ्यग केला आणि मस्तकावर सुगंधीद्रव्य ओतीले आणि अधूंनी त्याचे पाय धुतले. मरीया वधस्तंभावजळ उभी राहिली आणि कबरेकडे गेली. पुनरुत्थानानंतर कबरेकडे जाणारी प्रथम मरीया होती. पुनरुत्थित उद्धारकाची घोषणा मरीयेनेच प्रथम केली.DAMar 493.4

    प्रत्येक आत्म्याची परिस्थिती येशू जाणतो. कदाचित तुम्ही म्हणाल की मी पापी आहे, फार पापी आहे. कदाचित तुम्ही तसे असाल; परंतु जितके अधिक तुम्ही पापी तितक्या अधिक प्रमाणात तुम्हाला येशूची गरज आहे. अश्रू ढाळणाऱ्यांना आणि भग्न हृदयांना तो घालवून देत नाही. त्याला जे काही प्रगट करायचे ते तो कोणाला सांगत नाही परंतु कंप पावणाऱ्या प्रत्येक आत्म्याला धीर धरण्यास तो सांगतो. पापक्षमेसाठी व पुनर्स्थापनेसाठी त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांची तो पापक्षमा करितो.DAMar 494.1

    देवाचा द्वेष करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी देव स्वर्गातील दूतांना पृथ्वीवर त्याच्या क्रोधाच्या वाट्या ओतण्यासाठी अधिकार देईल. त्याच्या विश्वासातील हा काळा डाग तो पुसून टाकू शकेल. परंतु तो हे करीत नाही. तो आज धूपवेदीजवळ उभे राहून मदतीची अपेक्षा करणाऱ्यांच्यासाठी पित्याजवळ प्रार्थना करीत आहे.DAMar 494.2

    आश्रयासाठी त्याच्याकडे येणाऱ्यांना येशू दोष देणारे व झगडा करणारे यांच्यापासून उचलून घेतो. कोणीही मनुष्य किंवा दुष्ट दूत ह्यांच्यावर आरोप करू शकत नाही किंवा संशय व्यक्त करू शकत नाही. ख्रिस्त त्यांना त्याच्या स्वतःच्या दैवी-मानवी स्वभावाशी एकजीव करून घेतो. देवाच्या सिंहासनापासून प्रकाशणाऱ्या प्रकाशाच्या झोतात पाप वाहणाऱ्याच्या बाजूला ते उभे राहातात. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे, तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे.’ रोम. ८:३३, ३४.DAMar 494.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents