Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ४५—वधस्तंभाचे आगाऊ चिन्ह

    मत्तय १६:१३-२८; मार्क ८:२७-३८; लूक ९:१८-२७.

    पृथ्वीवरील ख्रिस्ताचे कार्य लवकरच समाप्त होणार होते. ठळकपणे त्याचा रोख कुठे होता त्याचे चित्र दिसत होते. हरवलेल्यांचा उद्धार करण्यासाठी जो मार्ग त्याला क्रमण करायचा होता त्याचे संपूर्ण चित्र मानवता धारण करण्याच्या अगोदर त्याने पाहिले होते. राजाला शोभणारा पेहराव व मुकुट बाजूला काढून ठेवण्याअगोदर आणि त्याच्या देवत्वावर मानवतेचे आवरण परिधान करण्याअगोदर, अंतःकरण फाडून टाकणारी प्रत्येक तीव्र व्यथा, त्याची झालेली प्रत्येक मानहानी, उपमर्द; सोसावी लागणारी प्रत्येक हालअपेष्टा त्याच्यासमोर खुली होती. गोठ्यापासूनचा तो कॅलव्हरीपर्यंतचा सर्व मार्ग त्याच्या नजरेसमोर होता. त्याच्यावर येणाऱ्या यातना, अपरिमित दुःख ह्याची जाणीव त्याला होती. हे सर्व त्याला ज्ञात होते तथापि त्याने म्हटले, “पाहा, मी आलो आहे; ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेविले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” स्तोत्र. ४०:७, ८.DAMar 356.1

    त्याच्या कार्याची निष्पती सतत त्याच्या नजरेसमोर होती. पृथ्वीवरील त्याचे जीवन कष्टाचे व आत्मत्यागाचे जरी होते तरी हे सर्व निरर्थक नव्हते म्हणून त्याला सुख समाधान वाटत होते. मनुष्यांच्या जीवनासाठी स्वतःचा प्राण देऊन देवावर एकनिष्ठा व्यक्त करण्यास जगाला प्रेरित करीत होता. जरी रुधिराच्या बाप्तिस्माचा अनुभव प्रथम घ्यावा लागला; जरी जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले; जरी वर्णनातीत अनर्थ अरिष्टांचे सावट त्याच्यावर येत होते: तरी त्याच्यासमोर जो हर्ष ठेवला होता त्यामुळे त्याने वधस्तंभाचा अनुभव घेतला आणि अप्रतिष्ठा तुच्छ लेखली. DAMar 356.2

    त्याच्यासमोर असलेले हे दृश्य त्याच्या निवडलेल्या सोबत्यापासून अजून गुपित ठेविले होते; परंतु त्यांनी त्याचे प्राणांतिक दुःख पाहाण्याची वेळ आली होती. ज्याच्यावर त्यांनी प्रेम करून विश्वास दर्शविला त्याला शत्रूच्या हातात दिलेला व वधस्तंभावर खिळिलेला त्यांनी पाहिले पाहिजे होते. त्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय जगाला तोंड देण्यास त्यांना तो लवकरच सोडून देणार होता. द्वेष, मत्सर आणि अश्रद्धा ह्यामुळे त्याचा लवकरच छळ होणार होता आणि त्यासाठी त्यांना सज करायची त्याची मनीषा होती.DAMar 356.3

    येशूला त्याचे शिष्य आता फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागातील एका गावात आले होते. ते गालीलीच्या सरहद्दीपासून दूर होते आणि तेथे मूर्तिपूजा सर्रास चालत असे. यहूदी लोकांच्या वर्चस्वापासून अलग करून त्यांना विधर्मी लोकांच्या मूर्तिपूजक संपर्कात आणिले होते. सर्व जगात अस्तित्वात असलेला लोकभ्रम (आज्ञाताबद्दल असलेली वेडगळ कल्पना) त्यांच्या आजूबाजूला होता. हे दृश्य पाहून ह्या विधर्मी लोकासंबंधीची त्यांची जबाबदारी त्यांना समजून येईल असे येशूला वाटले होते. ह्या भागातील वास्तव्यात त्याने लोकांना प्रबोधन करण्याचे सोडून शिष्यांच्याबरोबर अधिक वेळ घालविण्याचे ठरविले होते.DAMar 357.1

    त्याच्यावर येणाऱ्या व्यथेविषयी त्यांना सांगण्याच्या मनस्थितीत तो होता. परंतु प्रथम बाजूला जाऊन बोललेले शब्द स्वीकारण्यास त्यांच्या अंतःकरणाची तयारी होण्यासाठी त्याने प्रार्थना केली. परतल्यावर जे सांगायचे ते ताबडतोब त्यांना सांगितले नाही. ते करण्याअगोदर येणाऱ्या छळाला, कसोटीला तोंड देण्यासाठी सज्ज राहाण्यास पूरक होईल म्हणून त्याने त्याच्यावरील त्यांचा विश्वास प्रगट करण्यास संधि दिली. त्याने विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”DAMar 357.2

    तो मशीहा आहे हे इस्राएल लोकांनी मान्य केले नाही हे शिष्यांनी दु:खाने कबूल केले. त्याचे चमत्कार पाहून तो दावीदाचा पुत्र आहे असे अनेकांनी जाहीर केले. बेथसैदा येथे मोठ्या ज्या लोकसमुदायाला भोजन दिले होते ते त्याला इस्राएलाचा राजा म्हणून घोषीत करण्याच्या विचारात होते. अनेकजण त्याला संदेष्टा म्हणून स्वीकारण्यास तयार होते; परंतु तो मशीहा असल्याचा त्यांचा विश्वास नव्हता.DAMar 357.3

    येशूने दुसरा प्रश्न शिष्यांना उद्देशून विचारिलाः “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त जीवंत देवाचे पुत्र आहा.”DAMar 357.4

    येशू मशीहा असल्याचा विश्वास पेत्राने प्रारंभापासून व्यक्त केला होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या उपदेशामुळे खात्री होऊन ख्रिस्ताचा ज्यांनी स्वीकार केला होता ते आता योहानाला तुरुंगात घालून त्याचा वध केल्याचे पाहून योहानाच्या कार्यासंबंधी संशय घेऊ लागले; आता दीर्घ काळापासून अपेक्षित असलेला येशू हा मशीहा आहे या विषयीही ते शंका घेऊ लागले. दावीदाच्या सिंहासनावर येशूने आरोहन करावे ह्याविषयी जे आग्रही होते ते येशूला तसे करण्याची इच्छा नाही हे पाहून त्याच्यापासून निघून गेले. परंतु पेत्र व त्याचे सोबती त्याच्यावरील निष्ठेपासून कचरले नाहीत. काल स्तुती केली आणि आज दोष दिला ह्या धरसोडीच्या वृत्तीने येशूच्या खऱ्या अनुयायांचा विश्वास भंग पावला नव्हता. पेत्राने उद्घोषीत केले, “आपण ख्रिस्त, जीवंत देवाचे पुत्र आहा.” आपल्या प्रभूच्या शिरी मुकुट घालण्यासाठी तो राजेशाही मान सन्मानासाठी वाट पाहात थांबला नाही, परंतु त्याच्या विनम्र दशेत त्याने त्याचा स्वीकार केला.DAMar 357.5

    पेत्राने बारा जणांची एकनिष्ठा व्यक्त केली. तथापि ख्रिस्ताच्या कार्याविषयी शिष्यांना अजून अल्पसे ज्ञान झाले नव्हते. याजक व अधिकारी यांचा ख्रिस्ताला होत असलेला कडवा विरोध आणि विपर्यास करून सांगण्याची त्यांची वृत्ती यांच्यामुळे त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला होता. त्यांचा मार्ग त्यांना स्पष्ट दिसत नव्हता. अगोदर मिळालेल्या शिक्षणाचा त्यांच्यावर झालेला परिणाम, धर्मगुरूंची शिकवण, सांप्रदायाचे वर्चस्व ह्या सर्वांच्यामुळे सत्याविषयीच्या त्यांच्या विचारात अटकाव होत होता. वेळोवेळी येशूपासून आलेल्या प्रकाशाचे किरण त्यांच्यावर चमकत होते तथापि अंधारात चाचपडत असलेल्या मनुष्याप्रमाणे वारंवार ते दिसले. परंतु त्या दिवशी प्रत्यक्ष त्यांच्या विश्वासाची तीव्र कसोटी होण्याअगोदर पवित्र आत्मा सामर्थ्यानिशी त्यांच्यावर आला. थोड्या वेळासाठी त्यांचे नेत्र “दृश्य गोष्टीवरून अदृश्य गोष्टीकडे वळले.’ २ करिंथ. ४:१८. मानवतेमध्ये त्यांनी देवपुत्राचे वैभव पाहिले.DAMar 358.1

    येशूने पेत्राला उत्तर देऊन म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे.’DAMar 358.2

    पेत्राने सादर केलेले सत्य श्रद्धावंताच्या विश्वासाचा पाया आहे. ह्यालाच ख्रिस्ताने स्वतः अनंतकालीक जीवन म्हटले आहे. परंतु ह्या ज्ञान संपादनामुळे आत्मप्रौढीसाठी आधार सापडत नाही. स्वतःच्या चांगुलपणामुळे किंवा सुज्ञपणामुळे पेत्राला हे प्रगट करण्यात आले नव्हते. केवळ मानवतेद्वारे देवत्वाचे ज्ञान केव्हाही होऊ शकत नाही. “ते गगनाइतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय मिळणार?” ईयोब ११:८. केवळ स्वीकारणीय वृत्तीमुळेच देवाच्या गहन गोष्टी आम्हाला प्रगट करण्यात येतात. “डोळ्याने पाहिले नाही, कानानी ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही” “ते देवाने आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो.” १ करिंथ. २:९, १०. “परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते;” आणि पेत्राने ख्रिस्ताचे वैभव पाहिले हा “देवाने त्याला शिक्षण दिले होते’ ह्याचा तो पुरावा आहे. स्तोत्र. २५:१४; योहान ६:४५. खरोखर, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त यांनी तुला हे प्रगट केले नाही.”DAMar 358.3

    येशू पुढे म्हणाला, “तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.’ पेत्र ह्याचा अर्थ खडक - वाटोळा खडक. पेत्र ह्या खडकावर मंडळीची रचना केली नव्हती. शपथ आणि शाप देऊन प्रभूचा त्याने नाकार केला तेव्हा अधोलोकांच्या द्वारांचे त्याच्याविरुद्ध वर्चस्व चालले. अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही अशा व्यक्तीवरच मंडळीची प्रतिष्ठापना करण्यात आली.DAMar 358.4

    उद्धारकाच्या आगमनापूर्वी शेकडो वर्ष अगोदर इस्राएलाच्या उद्धाराचा खडक मोशेने दाखवून दिला होता. “माझा शक्तीवर्धक खडक” असे स्तोत्रकर्त्याने गाईले होते. यशया संदेष्ट्याने लिहिले, “ह्यास्तव प्रभु परमेश्वर म्हणतोः पाहा, सीयोनात पायाचा दगड बसविणारा मी आहे; तो पारखलेला दगड आहे; पायाला योग्य अशी मजबूत व मोल्यवान ती कोनशिला आहे.” अनुवाद ३२:४; स्तोत्र. ६२:७; यशया २८:१६. आत्म्याने प्रेरित होऊन लिहिताना पेत्राने स्वतः हे भाकीत येशूसंबंधी असल्याचे सांगितले. तो म्हणतो, “प्रभु कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर मनुष्यांनी नाकारलेला, देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जीवंत धोंडा त्याजवळ आल्याने, तुम्हीही देवाने निवडलेले, मूल्यवान, जीवंत धोंडे आध्यात्मिक मंदिरावर रचलेले व्हाल.” १ पेत्र २:३-५.DAMar 359.1

    “घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त त्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.” १ करिंथ. ३:११. येशूने म्हटले, “ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन.” देव, दिव्य बुद्धिवंत यांच्या उपस्थितीत आणि अधोलोकाच्या अदृश्य सैन्याच्या उपस्थितीत ख्रिस्ताने जीवंत खडकावर आपल्या मंडळीची स्थापना केली. तो खडक तो स्वतः आहे, - आमच्यासाठी ठेचलेले व मोडलेले त्याचे स्वतःचे शरीर. ह्या पायावर बांधलेल्या मंडळीच्याविरुद्ध अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.DAMar 359.2

    ख्रिस्ताने काढलेल्या ह्या उद्गाराच्यावेळी मंडळी किती अशक्त, दुर्बल होती! त्यावेळी फक्त मुठभर श्रद्धावंत होते आणि त्यांच्या विरुद्ध सैतानी शक्तींचा आणि दुष्ट मनुष्यांचा मारा रोखला होता; तथापि ख्रिस्ताचे अनुयायी भीणार नव्हते. त्यांच्या बलाचा दुर्ग याच्यावर स्थापीत झालेले त्यांचा ते पाडाव करू शकत नव्हते.DAMar 359.3

    सहा हजार वर्षे विश्वासाने ख्रिस्तावर बांधणी करण्यात आली आहे. सहा हजार वर्षे आमच्या तारणाचा दुर्ग याच्यावर सैतानी क्रोध कृत्यांचा पूर व वादळाचे तडाखे येत आहेत; परंतु ते स्थीर राहाते.DAMar 359.4

    पेत्राने सत्य निःसंदिग्धपणे व्यक्त केले आहे आणि मंडळीच्या विश्वासाचा तो पाया आहे. समग्र विश्वासकांच्या मंडळीचा तो प्रतिनिधी आहे म्हणून येशूने आता त्याचा सन्मान केला. त्याने म्हटले, “मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”DAMar 359.5

    “स्वर्गाच्या राजाच्या किल्ल्या’ म्हणजे ख्रिस्ताची वचने. पवित्र शास्त्रातील सर्व वचने त्याची असून त्याचा समावेश ह्यामध्ये करण्यात आला आहे. स्वर्ग उघडे करणे किंवा बंद करणे हे सामर्थ्य ह्या वचनामध्ये आहे. माणसांचा स्वीकार करणे किंवा नाकार करणे ह्यांच्या अटी त्यामध्ये व्यक्त केल्या आहेत. म्हणून देवाच्या वचनावर प्रवचन करणाऱ्यांचे काम जीवनाचा सुगंध किंवा मरण होईल. त्यांच्या कार्याचा निकाल शाश्वत राहील.DAMar 359.6

    सुवार्ता प्रसाराचे काम उद्धारकाने पेत्रालाच व्यक्तीशःदिले नव्हते. पुढे काही दिवसानी पेत्राला बोललेल्या शब्दांचा पुनरुच्चार करून त्याने ते मंडळीला उद्देशून काढिले. त्याच अर्थाने त्याचा उपयोग त्याने बारा जणांच्यासाठी समग्र विश्वासकांच्या मंडळीचे प्रतिनिधी म्हणून करण्यात आला. जर येशूने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ स्थान दिले असते तर त्यांच्यात श्रेष्ठ कोण ही चढाओढ चालली नसती. एकाद्याला श्रेष्ठ स्थान दिले असते तर त्याचा मान राखून प्रभूच्या इच्छेप्रमाणे त्यांनी केले असते.DAMar 360.1

    त्यांच्यातील एकाला मुख्य नेमण्याऐवजी ख्रिस्ताने शिष्यांना म्हटले, “तुम्ही तरी आपणास गुरूजी म्हणूनच घेऊ नका;” “तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय.” मत्तय २३:८, १०.DAMar 360.2

    “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे.” ज्या देवाने उद्धारकाच्या पायाखाली सर्व काही राखून ठेविले, त्यानेच “त्याला सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले, हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्व काही भरितो त्याने ती भरलेली आहे.” २ करिंथ ११:३; इफिस १:२२, २३. ख्रिस्त पाया आहे आणि त्याच्यावर मंडळी उभारली आहे; आणि मंडळीचा मुख्य म्हणून ख्रिस्ताचे आज्ञापालन केले पाहिजे. मनुष्यावर अवलंबून राहायाचे नाही किंवा त्याच्या वर्चस्वाखाली यायचे नाही. अनेकांची अशी विचारसरणी आहे की, मंडळीमध्ये प्राप्त झालेला दर्जा किंवा अधिकार ह्याच्यामुळे कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि कोणत्या गोष्टी कराव्या ह्या बाबतीत ते दुसऱ्याला आज्ञा देऊ शकतात. देव ही विचारसरणी मान्य करीत नाही. उद्धारक उद्गारला, “तुम्ही सर्वजण भाऊ भाऊ आहा.’ प्रत्येकावर मोह येतात आणि चुका होण्याचा संभव आहे. मार्गदर्शनासाठी कोणाही मानवावर अवलंबून राहू शकत नाही. मंडळीमधील ख्रिस्ताची जीवंत उपस्थिती हा विश्वासाचा दुर्ग आहे. अति निर्बल ह्याच्यावर अवलंबून राहू शकतो आणि स्वतःला बलवान समजणारे ख्रिस्ताचा कार्यक्षम म्हणून स्वीकार करणार नाहीत तर ते अति निर्बल बनतील. “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहु करितो तो शापीत आहे.” प्रभु “दुर्ग आहे; त्याची कृती अव्यंग आहे.” “त्याला शरण जाणारे सारे धन्य होत.” यिर्मया १७:५; अनुवाद ३२:४; स्तोत्र. २:१२.DAMar 360.3

    पेत्राने स्पष्ट जाहीर केल्यानंतर येशूने शिष्यांना निक्षूण सांगितले की मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. शास्त्री आणि परूशी निश्चयाने त्याला विरोध करीत होते म्हणून तसे निक्षूण सांगण्यात आले होते. ह्या व्यतिरिक्त लोक आणि शिष्य यांनासुद्धा मशीहा संबंधी खोटी चुकीची कल्पना होती आणि त्याच्याविषयी जाहीर खबर जरी दिली तरी त्याचा शीलस्वभाव किंवा कार्य ह्यासंबंधी त्याना खरी कल्पना येणार नव्हती. परंतु दररोज हळूहळू तो स्वतःला उद्धारक म्हणून प्रगट करीत होता, आणि अशा रीतीने तो स्वतः मशीहा असल्याचे खरे ज्ञान त्यांना देत होता.DAMar 360.4

    तथापि ख्रिस्ताने ह्या जगाचा युवराज म्हणून राज्य करावे अशी शिष्यांची अपेक्षा होती. आतापर्यंत त्याने आपल्या मनातील योजना जरी गुप्त ठेविली होती तरी तो नेहमीच दारिद्रात आणि अप्रसिद्ध राहाणार नाही असा त्यांचा विश्वास होता. त्याच्या राज्याची प्रतिष्ठापना करण्याची वेळ जवळ आली होती. धर्मगुरू आणि याजक यांचा द्वेष कदापीही निकामी होणार नाही, स्वतःचे राष्ट्र त्याचा त्याग करील, दगलबाज म्हणून त्याला दोष देतील आणि गुन्हेगार म्हणून वधस्तंभावर खिळतील, - असले विचार शिष्यांनी कधी मनात आणले नव्हते. परंतु अंधारी सत्तेचे प्राबल्य जवळ येत होते आणि त्यांच्यासमोर उभे ठाकलेला संघर्ष येशूने शिष्यांना सांगणे आवश्यक होते. ह्या कसोटीच्या अपेक्षेने तो खिन्न झाला होता.DAMar 361.1

    आतापर्यंत त्याचे दुःख, व्यथा आणि मरण ह्याविषयी आपल्या शिष्यांच्याजवळ स्पष्टोद्गार काढण्याचे टाळिले होते. निकदेमस याच्याबरोबर झालेल्या संभाषणात त्याने म्हटले, “जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१४, १५. परंतु शिष्यांनी ते ऐकले नाही आणि जरी ऐकले असते तरी त्याचा त्यांना अर्थबोध झाला नसता. परंतु आता ते ख्रिस्त समवेत होते, त्याचे वचन ऐकत होते, त्याची कृत्ये पाहात होते. त्याच्या आसमंतातील विनम्रता आणि याजक व लोक यांचा विरोध, असतानासुद्धा ते पेत्राच्या साक्षीचे सहभागी होऊ शकत होते, “आपण ख्रिस्त, जीवंत देवाचे पुत्र आहा.” भविष्यकाळ दृष्टीआड करणारा पडदा बाजूला सारण्याची आता वेळ आली आहे. “तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याद्वारे पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारिले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे ह्याचे अगत्य आहे.’ DAMar 361.2

    दुःख व आत्यंतिक आश्चर्याने मुग्ध होऊन शिष्यांनी त्याचे श्रवण केले. तू देवपुत्र आहेस पेत्राने काढलेले हे शब्द ख्रिस्ताने स्वीकारिले आहेत; आता त्याच्या दुःख, व्यथा आणि मरण ह्याविषयी काढलेले उद्गार दुर्बोध, आकलन न होणारे होते. पेत्र मुकाट्याने बसला नव्हता. तो उठला आणि प्रभूला धरून जणू काय आगामी नाशापासून मागे ओढीत आहे असे दाखवून उद्गारला, “प्रभूजी, असे आपल्याला होणारच नाही, आपणावर दया असो.”DAMar 361.3

    पेत्राचा प्रभूवर फार जीव होता; परंतु दुःखापासून त्याला आवरून धरण्याची जी इच्छा त्याने प्रगट केली तिची येशूने प्रशंसा केली नाही. त्याच्यासमोर उभे असलेल्या कसोटीच्या प्रसंगी पेत्राचे ते शब्द येशूला सहाय्य किंवा समाधान देणारे नव्हते. वंचित झालेल्या, हरवलेल्या जगासाठी देवाच्या कृपामय उद्देश्याशी ते शब्द मेळ घालीत नव्हते आणि प्रत्यक्ष स्वतःच्या उदाहरणाने आत्मत्यागाचा धडा देण्यास येशू आला होता त्याच्याशीही त्याचा जम बसत नव्हता. ख्रिस्ताच्या कार्यात वधस्तंभ पाहाण्याची पेत्राची इच्छा नव्हती. त्याच्या अनुयायांवर जो छाप ख्रिस्ताला पाडावयाचा होता त्याच्या अगदी विरुद्ध पेत्राच्या उद्गाराचा परिणाम होणार होता. त्यामुळे येशूने त्याला कडक शब्दात सुनाविले. असे शब्द आतापर्यंत त्याच्या मुखातून बाहेर पडले नव्हते. त्याने पेत्राला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे.’DAMar 361.4

    ह्या उदात्त जीवित कार्यापासून परावृत होण्यास सैतान येशूला प्रोत्साहन देत होता; आणि पेत्र अंधश्रद्धेने त्या मोहाला दुजोरा देत होता. ह्या घटनेतील विचाराचा जनक दुष्टाईचा अधिपती होता. त्या भावनाविवश विनवणीमागे त्याची चिथावणी, फूस होती. विनम्र आणि आत्मत्यागाचा मार्ग सोडण्याच्या अटीवर अरण्यात सैतानाने येशूला जगाचे राज्य देऊ केले होते. आता तोच मोह ख्रिस्ताच्या शिष्यांच्यापुढे सादर करीत आहे. पेत्राची नजर जगीक वैभवावर केंद्रित करण्याचा तो अट्टाहास करीत होता. त्यामुळे येशूचा वधस्तंभ त्याला दिसणार नाही अशी त्याची धारणा होती. परंतु येशूही त्याला वधस्तंभ दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. पेत्राद्वारे सैतान पुन्हा येशूवर मोह जारीने आणण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु उद्धारकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा विचार शिष्यांच्यासाठी होता. पेत्र आणि त्याचा प्रभु यांच्यामध्ये सैतानाने अडथळा आणिला होता अशासाठी की येशूची विनम्रता पाहून शिष्याचे अंतःकरण द्रवून जाऊ नये. ख्रिस्ताने उद्गारलेले शब्द पेत्रासाठी नव्हते तर जो त्याला त्याच्या उद्धारकापासून अलग, वेगळा करण्याचा प्रयत्न करीत होता त्याच्यासाठी ते होते. “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा.’ मी आणि माझा चुकणारा सेवक ह्यांच्यामध्ये तू पडू नको. मला पेत्रासमोर येऊ दे आणि मी त्याला माझ्या प्रेमाचे रहस्य प्रगट करीन.DAMar 362.1

    पेत्रासाठी हा धडा अति कडवट होता परंतु तो त्याने हळूहळू आत्मसात केला. पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या मार्गात प्राणांतिक दुःख आणि विकृष्ट विनम्र जीवनाने ठाण मांडून ठेविले आहे. दुःखाच्या समयी प्रभूबरोबर जोडीदारी करण्याचे शिष्याने टाळले. परंतु अग्नीच्या भट्टीतील उष्णतेत त्याला आशीर्वादाचा धडा शिकायचा होता. फार वर्षानंतर कष्टी जीवनाने शरीर थकल्यावर त्याने लिहिले, “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका; ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहा त्याअर्थी आनंद करा; म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल.’ १ पेत्र ४:१२, १३.DAMar 362.2

    त्याचे स्वतःचे परित्यागाचे जीवन त्यांचे जीवन घडण्यास नमुना आहे असे येशूने त्याच्या शिष्यांना समजाऊन सांगितले. त्याच्याभोवती घुटमळत असलेल्या लोकांना शिष्यांच्याबरोबर जवळ बोलावून त्याने म्हटले, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.’ वधस्तंभाचा संबंध रोमी सत्तेशी होता. निष्ठूर आणि मानखंडना, पाणउतारा करण्याच्या मरणासाठी त्या साधनाचा वापर केला जात होता. नीच्चावस्थेतील गुन्हेगारांना हा वधस्तंभ शासन देण्याच्या स्थानापर्यत वागवावा लागत असे; आणि तो त्यांच्या खांद्यावर ठेवला जात होता. तो खांद्यावर न घेण्यासाठी ते अट्टाहास करीत असत परंतु शेवटी त्यांना जेरीस आणूस तो वाहाण्यास भाग पाडत होते. येशूने आपला वधस्तंभ घेऊन त्याच्यामागे येण्यास सांगितले. शिष्यांना त्याचे हे उद्गार अंधुकरित्या समजले परंतु त्याचा आशय हा होता की मानखंडना होण्याच्या अनुभवाला आणि मृत्यूला शिष्यांनी मान तुकविली पाहिजे. उद्धारकाच्या उद्गारात संपूर्ण शरणगतीचे चित्र रेखाटले आहे. परंतु हे सर्व त्याने त्यांच्यासाठी अंगिकारिले आहे. आमची अधोगती झाल्यावर आम्ही स्वर्गाच्या अस्तीत्वाची अपेक्षा करावी हा ख्रिस्ताचा मानस नव्हता. पाणउतारा, मानखंडना, नालस्ती आणि निच्चावस्थेतील मरण यांच्या अनुभवांचे जीवन जगण्यासाठी ख्रिस्ताने स्वर्गीय दरबार सोडला. स्वर्गातील मोल्यवान धनाने जो श्रीमंत होता तो दरिद्री झाला, हेतू हा की त्याच्या दारिद्माने आम्ही धनवान व्हावे. त्याने मार्गक्रमण केलेल्या मार्गावरूनच आम्हाला गेले पाहिजे.DAMar 362.3

    लोकावरील प्रेमामुळे ख्रिस्त मरण पावला म्हणजे स्वार्थाला वधस्तंभावर खिळणे होय. जो देवाचा माणूस आहे त्याने आतापासून स्वतःला, जगाच्या उद्धारासाठी खाली सोडलेल्या श्रृंखलातील एक कडी आहे, तारणाच्या योजनेतील ख्रिस्ताचा जोडीदार आणि हरवलेल्यास शोधण्यासाठी त्याच्याबरोबर बाहेर पडणारा असे समजले पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीने देवाला वाहून दिले आहे, आणि आपल्या स्वभाव वागणूकीत ख्रिस्ताला जगापुढे प्रगट केले पाहिजे, हे सतत जाणले पाहिजे. ख्रिस्ताच्या जीवनात व्यक्त झालेला आत्मत्याग, सहानुभूती आणि प्रीती देवाच्या कामगारामध्ये पुनश्च दिसली पाहिजे.DAMar 363.1

    “जो कोणी आपला जीव वाचवू पाहातो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल.” स्वार्थीपणा हे मरण आहे. शरीरातील कोणताही अवयव स्वतःचीच सेवा करीत राहून जीवंत राहू शकत नाही. हृदयाच्याद्वारे जीवनावश्यक रक्त पुरवठा हात आणि डोके यांना होणार नाही तर लगचेच ते त्यांची शक्ती गमावतील. आमच्या जीवनावश्यक रक्ताप्रमाणे ख्रिस्ताच्या प्रीतीचे अभिसरण त्याच्या गूढार्थक शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये झाले पाहिजे. आम्ही एकमेकांचे सभासद आहोत आणि जी व्यक्ती आपला अंश देण्याचा नाकार करिते त्या व्यक्तीचा नाश होईल. येशूने म्हटले, “मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार?”DAMar 363.2

    सांप्रत दारिद्र आणि अपमान, मानखंडना सोडून त्याने शिष्यांचे लक्ष त्याच्या होणाऱ्या वैभवी आगमनाकडे वेधले. हे वैभव पृथ्वीवरील सिंहासनाचे ऐश्वर्य नव्हते तर देव आणि स्वर्गातील गण यांचे वैभव होते. त्यानंतर त्याने म्हटले, “तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.” त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता त्याने आश्वासन दिले, “मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यामध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहातील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.’ परंतु त्याचे हे बोल शिष्यांना उमगले नव्हते. हे वैभव फार दूर असल्याचे भासत होते. त्यांचे नेत्र नजीकच्या दृश्यावर स्थीर झाले होते - दारिद्र, दुःख, अपमान यांनी भरलेले पृथ्वीवरील जीवन. भडक शब्दात व्यक्त केलेल्या मशीहाच्या राज्याविषयीच्या अपेक्षा सोडून द्याव्या काय? दावीदाच्या सिंहासनावर आरूढ होणाऱ्या त्याच्या स्वामीला ते पाहाणार नव्हते काय? गरीबीचे घराविना भटके, तुच्छ मानिलेले, मनुष्यांनी टाकिलेले आणि शेवटी वधलेले जीणे ख्रिस्ताला जगायचे होते काय? त्यांच्या प्रभूवर त्यांचा अति जीव होता आणि त्यामुळे त्यांची अंतःकरणे दुःखानी भारावली होती. देवपुत्राला अशा कठोर मानहानीला तोंड द्यावे लागणार ही गोष्ट दुर्बोध, अतळ असल्याचे समजून त्यांची मने शंकाकुशंकेने हैराण झाली होती. त्याने सांगितलेली गैरवागणूक अनुभवण्यासाठी त्याने स्वखुषीने यरुशलेमेला का जावे हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. अशा ह्या भयंकर परिणामाच्या गोष्टीला तो कसा काय मान वाकवितो, आणि त्याने व्यक्त करण्याच्या अगोदर जी त्यांची गोंधळाची स्थिती होती त्यापेक्षा अधिक अंधारात आम्हाला कसा काय सोडतो?DAMar 364.1

    फिलिप्पाच्या कैसरीयाच्या भागात ख्रिस्त हेरोद आणि कयफा याच्या आटोक्याबाहेर आहे असे शिष्यांना वाटले. यहूद्यांचा द्वेष मत्सर किंवा रोमी अधिकाऱ्यांची सत्ता यांची भीती त्याला नव्हती. परूश्यापासून दूर राहून तेथेच का काम करू नये? विनाकारण मरणाला सामोरे जाण्याची गरज आहे काय? जर त्याला मरायचे आहे तर ज्याच्याविरुद्ध अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही असे मजबूत राज्य कसे प्रस्थापित होईल? खरोखर शिष्यांच्यापुढे ही एक मोठी गूढ गोष्ट होती.DAMar 364.2

    खरे पाहिले तर ते आता गालीली समुद्राच्या किनाऱ्यावरून प्रवास करून जेथे त्यांच्या आकांक्षा चिरडून जमीनदोस्त होतील त्या नगरीकडे चालले होते. त्यावर ख्रिस्ताला कडक विरोध करण्यास ते धजले नाहीत, परंतु त्यांच्या भविष्यकाळाचे काय होईल ह्याविषयी परस्परात दुःखाने कुजबूजत होते. ह्या विचाराच्या मनातील गोधळातसुद्धा एक विचार पुढे आला आणि वाटले की, आगाऊ कल्पना नसलेल्या एकाद्या घटनेने प्रभूवर येणारा विनाश टळू शकेल. अशा प्रकारे सहा दिवस त्यांनी दुःख केले, संशय व्यक्त केला, आशा धरली आणि घाबरून गेले.DAMar 364.3

    जागे झाल्यावर शिष्यांनी डोंगर गौरवाने प्रकाशीत झालेला पाहिला. ते भयभीत व चकीत होऊन त्यांनी प्रभूला प्रकाशासारिखे तेजस्वी पाहिले. थोड्या वेळाने पाहिल्यावर येशू तेथे एकटाच दिसला नाही. त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेल्या दोन स्वर्गीय व्यक्ती दिसल्या. सिनाय पर्वतावर ज्याच्याशी देव संभाषण करीत होता तो एक मोशे होता. दुसरा, मरणाच्या अधिकाराखाली कदापी येणार नाही असा मान लाभलेला एलीया होता. DAMar 365.1

    पंधरा शतकापूर्वी पिसगाच्या शिखरावर उभे राहून मोशे आश्वासित भूमीकडे टक लावून पाहात होता. परंतु मेरीबा येथील त्याच्या पापामुळे त्याला तेथील प्रवेश नाकारला होता. इस्राएल लोकांना त्यांच्या पित्यांच्या वतनात घेऊन जाण्याचा आनंद त्याला इतका नव्हता. व्यथा देणारी त्याची विनंती “तर मला पार उतरून जाऊ दे आणि यार्देन पलीकडे असलेला तो उत्तम देश, तो उत्तम पर्वत आणि लबानोन ही माझ्या दृष्टीस पडू दे” (अनुवाद ३:२५) नाकारली होती. चाळीस वर्षे अरण्यात भ्रमण करण्याच्या अंधारी अनुभवाचा प्रकाशात रूपांतर होण्याची आशा नाकारण्यात आली. तितक्या वर्षांच्या कष्टांचे आणि मनापासून वाहिलेल्या काळजीचे साध्य अरण्यातील कबर होती. परंतु “आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करितो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने” (इफिस ३:२०) ह्या बाबतीत त्याच्या दासाची विनवणी ऐकली. मोशे मरणाच्या अधिपत्यातून मुक्त झाला, त्याला कबरेत राहायाचे नव्हते. स्वतः ख्रिस्ताने त्याला जीवनदान दिले. भुलविणाऱ्या सैतानाने पापामुळे मोशेच्या शरीरावर हक्क सांगितला; परंतु उद्धारक ख्रिस्ताने त्याला कबरेतून बाहेर काढिले. यहूदा ९.DAMar 365.2

    रूपांतर झालेल्या डोंगरावर पाप व मरण यावरील ख्रिस्ताचा विजय याविषयी मोशे साक्षीदार होता. धार्मिकांच्या पुनरुत्थानाच्या वेळेस कबरेतून बाहेर येणाऱ्यांचे मोशेने प्रतिनिधित्व केले. ख्रिस्ताच्या द्वितियागमनाच्या समयी पृथ्वीवर जीवंत असणाऱ्याचे आणि “जे क्षणात, निमिषात शेवटल्या करण्याच्या वेळेस बदलून जातील आणि जे विनाशी ते अविनाशीपण परिधान करतील व जे मर्त्य ते अमरत्व परिधान करतील त्यांचे प्रतिनिधित्व एलीयाने केले. १ करिंथ. १५:५१-५३. द्वितियागमनाच्या वेळी तारणासाठी पापविरहित येईल त्या वेळेसारखी ख्रिस्ताने स्वर्गीय प्रकाशाची शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. कारण तो “पवित्र देवदूतांच्या आणि आपल्या पित्याच्या गौरवाने येईल.” इब्री ९:२८; मार्क८:३८. उद्धारकाने शिष्यांना दिलेले आश्वासन आता पूर्ण झाले होते. डोंगरावर भावी गौरवी राज्याची लहान प्रतिकृति प्रगट करण्यात आली होती - ख्रिस्त राजा, पुनरुत्थीत संतांचे दर्शक मोशे आणि मरणाचा अनुभव न घेता उद्धारलेल्यांचे दर्शक एलीया.DAMar 365.3

    शिष्यांना ह्या दृश्याचा सुगावा लागला नव्हता; परंतु तो नम्र, सहनशील, सौम्य गुरूजी आणि असहाय्य स्थितीत इकडे तिकडे फिरणारा परका, अपरिचीत याचे स्वर्गातील चाहात्यांनी सन्मान केलेला पाहून त्यांना हर्ष झाला. मशीहा राजाची घोषणा करण्यासाठी आणि ह्या पृथ्वीवर ख्रिस्त आपले राज्य प्रस्थापीत करणार आहे हे घोषीत करण्यासाठी एलीया आला आहे असा त्यांचा विश्वास होता. त्याद्वारे त्यांची भीती आणि निराशा याचे स्मरण एकदाचे नाहीसे होणार होते. येथे देवाचे गौरव प्रगट करण्यात आले होते आणि तेथे ते राहाण्यास आतूर होते. प्रेत्राने म्हटले, “गुरूजी, आपण येथे असावे हे बरे आहेः तर आम्ही तीन मंडप करू या; आपणासाठी एक, मोशासाठी एक व एलीयासाठी एक.” त्यांच्या गुरूजीच्या संरक्षणार्थ आणि राजा या नात्याने त्याची सत्ता प्रस्थापीत करण्यासाठी मोशे आणि एलीया यांना पाठविले आहे असा शिष्यांचा ठाम विश्वास होता.DAMar 366.1

    परंतु राजारोहनाच्या अगोदर वधस्तंभाचा अनुभव आला पाहिजे. ख्रिस्ताबरोबरच्या बैठकीत त्याच्या राज्याभिषेकाचा नाही तर यरुशलेमात घडून येणाऱ्या त्याच्या मृत्यूबद्दल विचारविनिमय करण्यात आला. मानवतेची दुर्बलता अंगिकारून आणि त्यांची व्यथा व अधर्म यांचे ओझे ख्रिस्ताला एकट्यालाच वाहावे लागले. येणाऱ्या कसोटीची तीव्रता गडद काळोखासारखी झाली तेव्हा तो एकाकीपणामुळे आत्म्यात उद्विग्न झाला आणि जगाने त्याला ओळखले नाही. स्वतःचेच दुःख, संशय व महत्वाकांक्षी आशा यांच्यामध्ये रमून गेल्यामुळे त्याच्या प्रिय शिष्यांना त्याच्या कार्याचे रहस्य उकलेले नाही. स्वर्गातील प्रेम व संगत सोबत यांच्यामध्ये तो राहिलेला होता परंतु स्वतः निर्माण केलेल्या जगात तो एकांतवासात होता. आता स्वर्गाने येशूकडे आपले निरोपे पाठविले होते; दूत नाही, परंतु ज्यांनी दुःख व व्याधी सहन केल्या होत्या आणि पृथ्वीवरील जीवनात कसोटीच्या समयी ख्रिस्ताला सहानुभूती दाखवतील अशी माणसे पाठविली होती. मोशे आणि एलीयाने ख्रिस्ताबरोबर काम केले होते. लोकांच्या उद्धारासाठी तो किती उत्कंठित आहे ह्याची कल्पना त्यांना होती. इस्राएल लोकांसाठी मोशेने काकळुतीने विनंती केली होतीः “तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर; न करशील तर तूं लिहिलेल्या वहीतून मला काढून टाक.’ निर्गम ३२:३२. आत्म्याची उद्विग्नता एलीयाने अनुभवली होती कारण साडे तीन वर्षांच्या दुष्काळाच्या काळात राष्ट्राचा द्वेष व त्याच्या व्यथा त्याने अनुभवल्या होत्या. कार्मेल पर्वतावर देवासाठी तो एकाटाच होता. निराशा व मनोवेदना यामुळे ओसाड अरण्यात त्याला एकट्यालाच पळावे लागले. सिंहासनाभोवतालचे सर्व दूत सोडून ख्रिस्ताला सहन कराव्या लागणाऱ्या व्याधीविषयी हितगूज करून दिव्य सहानुभूतीची खात्री देऊन त्याचे समाधान करण्यास ही माणसे आली होती. जगाची आशा, प्रत्येक मानवाचा उद्धार हा त्यांच्या मुलाखतीचा मुख्य भाग होता.DAMar 366.2

    शिष्य झोपेत असल्यामुळे ख्रिस्त आणि स्वर्गीय निरोपे यांच्यामधील संवाद त्यांनी पुसट पुसट ऐकिला. जागृत राहा व प्रार्थना करा यामध्ये ते अपयशी झाल्यामुळे ख्रिस्ताच्या दुःखाविषयीचे व त्यानंतर येणारे गौरव यांचे ज्ञान त्यांना मिळाले नाही. हे ज्ञान त्यांना देण्याची देवाची इच्छा होती. त्याच्या स्वार्थत्यागाचे भागीदार होण्याद्वारे मिळणारा कृपाप्रसाद याला ते पारखे झाले. हे शिष्य विश्वास ठेवण्यास अंतःकरणाचे मंद होते. त्यांना समृद्ध करणाऱ्या स्वर्गाच्या दानाविषयी गुणग्राहकता दाखविण्यास ते कमी पडले.DAMar 367.1

    तथापि त्यांना महान प्रकाश मिळाला. ख्रिस्ताच्या नाकार करण्यातील यहूदी राष्ट्राच्या पापाविषयी संपूर्ण स्वर्ग ज्ञात होता याची त्यांना खात्री दिली. उद्धारकाच्या कार्याविषयी त्यांना पूर्ण ज्ञान देण्यात आले होते. मनुष्याला आकलन न होणाऱ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष कानांनी ऐकल्या व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. ते “त्याचे वैभव प्रत्यक्ष पाहाणारे होते” (२ पेत्र १:१६), कुलपती व संदेष्टे यांनी साक्ष दिलेला आणि सबंध स्वर्गाने तसा मान्य केलेला असा हा येशू खरोखर मशीहा होता असे त्यांना स्पष्ट कळले.DAMar 367.2

    डोंगरावरील दृश्याकडे ते टक लावून पाहात असताना “तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झालीः हा माझा पुत्र, मला परम प्रिय आहे, याजवर मी संतुष्ट आहे; याचे तुम्ही ऐका.” अरण्यामध्ये इस्राएल लोकांच्यापुढे जाणाऱ्या मेघस्तंभापेक्षा तेजस्वी असलेला मेघस्तंभ त्यांनी पाहिला; आणि डोंगर कंप पावणारी देवाची भव्य ऐश्वर्याची वाणी जशी त्यांनी ऐकली तसे शिष्य जमिनीवर पालथे पडले व फार भयभीत झाले. ते तसेच पडून राहिले व त्यांचे चेहरे झाकले गेले. नंतर येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श केला आणि “उठा, भिऊ नका’ ह्या सर्व परिचित शब्दांनी त्याने त्यांची भीती काढून टाकिली. डोळे वर करून पाहाताना दिव्य तेजस्वी गौरव नाहीसे झाले होते, मोशे व एलीया यांच्या आकृती अदृश्य झाल्या होत्या. ते केवळ येशू बरोबर डोंगरावर एकटेच होते.DAMar 367.3