Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ७३—“तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये”

    योहान १३:३१-३८; १४-१७.

    दिव्य प्रीतीने आणि कोमल सहानुभूतीने ख्रिस्ताने आपल्या शिष्याकडे पाहिले आणि म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्या ठायी देवाचे गौरव झाले आहे.’ माडीवरच्या खोलीतून यहूदा निघून गेला होता आणि ख्रिस्त आकराजनाबरोबर एकटाच होता. त्यांच्यापासून लवकरच होणाऱ्या वियोगाविषयी तो बोलणार होता परंतु ते करण्याअगोदर त्याने आपल्या कार्याच्या उद्दिष्टाकडे त्यांचे मन वेधले. हे त्याने आपल्या डोळ्यासमोर नित्य ठेविले. त्याला मिळालेल्या अनुचित वागणुकीने आणि दुःखाने त्याच्या पित्याचे गौरव होणार हा त्याचा आनंद होता. ह्याच्याकडे त्याने आपल्या शिष्यांचे लक्ष वेधले.DAMar 579.1

    त्यानंतर त्याने आपुलकीने व प्रेमाने म्हटले, “मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल, आणि जसे मी यहूद्यांना सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हासही आता सांगतो.”DAMar 579.2

    हे ऐकून शिष्यांना बरे वाटले नाही. ते भयभीत होऊन उद्धारकाला चिकटून बसले. त्यांच्या स्वतःच्या जीवनापेक्षा त्यांचा प्रभु आणि मालक, त्यांचा जीवलग शिक्षक आणि मित्र हा अति प्रिय होता. अडीअडचणीच्या वेळी त्यांनी त्याच्याकडून मदतीची आणि दुःखाच्या व निराशाच्या प्रसंगी समाधानाची अपेक्षा केली. आता तो एकाकी, आश्रीत टोळीपासून विभक्त होणार होता. पुढे आपत्ति येणाऱ्या भावनेने त्यांची अंतःकरणे भरून गेली होती.DAMar 579.3

    परंतु उद्धारकाचे बोल त्यांना फार आज्ञादायक वाटले. शत्रूचा त्यांच्यावर हल्ला होणार होता आणि संकटानी खिन्न झालेल्यावर सैतानाचे फसवे कसब प्रभावी बनणार हे त्याला माहीत होते. म्हणून त्याने त्यांचे लक्ष “दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लाविले.” २ करिंथ ४:१८. पृथ्वीवरील हद्दपारीपासून त्याने त्यांचे विचार दिव्य गृहाकडे वळविले.DAMar 579.4

    त्याने म्हटले, “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहाण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हास सांगितले असते; मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन; यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास ठाऊक आहे.” तुमच्यासाठी मी जगात आलो. तुमच्यासाठी मी काम करीत आहे. मी गेल्यावर तुमच्यासाठी कळकळीने काम करीन. तुमचा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून स्वतःचे प्रगटीकरण करण्यासाठी मी ह्या जगात आलो. तुमच्यासाठी पित्याला सहकार्य करण्यास मी त्याच्याकडे जातो. शिष्यांच्या मनात जी भीती होती त्यापेक्षा निराळाच उद्देश ख्रिस्त वियोगामध्ये होता. तो काही अखेरचा वियोग नव्हता. त्यांच्यासाठी जागा तयार करावयास तो जात होता आणि त्यांना आपल्या जवळ घेण्यासाठी तो पुन्हा येणार होता. त्यांच्यासाठी तो जागा तयार करीत होता त्याचवेळी त्यांना ईश्वर सादृश्य आपला शीलस्वभाव बनवायचा होता.DAMar 579.5

    अद्याप शिष्य बावरून गेले होते. सदैव संशयाने गोंधळलेल्या थोमाने म्हटले, “प्रभु, आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही; मग आम्हास मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जात नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; येथून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.”DAMar 580.1

    स्वर्गाला जाण्याचे अनेक मार्ग नाहीत. प्रत्येकजन आपापला मार्ग निवडू शकत नाही. ख्रिस्त प्रतिपादितो, “मी मार्ग आहे... माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जात नाही.” एदेन बागेत पहिलाच नीतिपर उपदेश देण्यात आला त्यावेळी घोषीत करण्यात आले होते की, स्त्रीची संतति सर्पाचे डोके फोडील आणि त्याद्वारे ख्रिस्ताला मार्ग, सत्य व जीवन म्हणून उन्नत केले. आदामाच्या काळात तो मार्ग होता. उद्धारकाच्या रुधिराचे दर्शक म्हणून हाबेलाने देवाला कोकऱ्याचे रक्त अर्पिले. संदेष्टे व कुलपती यांच्या उद्धारकार्यात ख्रिस्त मार्ग होता. केवळ त्याच्याद्वारेच आम्ही पित्याकडे जाऊ शकतो.DAMar 580.2

    ख्रिस्ताने म्हटले, “मी कोण आहे हे तुम्ही ओळखिले असते तर माझ्या पित्यालाही ओळखिले असते; आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखिता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. परंतु अद्याप शिष्यांना ते उमजले नाही. फिलिप्प उद्गारला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे.”DAMar 580.3

    त्याच्या मंद आकलनशक्तीचे आश्चर्य वाटून ख्रिस्ताने दुःखाने विचारिले, “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? माझ्याद्वारे त्याने केलेल्या कामामध्ये पिता तुला दिसत नाही हे शक्य आहे काय? पित्याची साक्ष देण्यासाठी मी आलो आहे असा तुझा विश्वास नाही काय? “तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस?” “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.’ मानव बनल्यावरसुद्धा ख्रिस्त देव म्हणून राहिला. त्याने नम्र होऊन मानवता धारण केल्यावरही देवत्व त्याच्याठायी होते. मानवतेला देवाचे प्रतिनिधीत्व केवळ ख्रिस्ताद्वारे होऊ शकले, आणि तीन वर्षे हे प्रतिनिधीत्व पाहाण्याची संधि शिष्यांना मिळाली.DAMar 580.4

    “मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना.” मनुष्याने स्वतःहून अजूनपर्यंत जे काम केलेले नाही आणि पुढेही करू शकणार नाही असे केलेल्या ख्रिस्ताच्या कामावर ते निश्चितपणे विश्वास ठेऊ शकतात. ख्रिस्ताच्या कामाने त्याच्या देवत्वाची साक्ष दिली. त्याच्याद्वारे पिता प्रकट करण्यात आला.DAMar 581.1

    पिता व पुत्र यांच्या महत्त्वाच्या निकटच्या नात्यावर शिष्यांचा जर विश्वास असता तर नाश पावणाऱ्या जगाचा उद्धार करीत असताना जे दुःख व मरण सोसावे लागले ते पाहून ते हतबल झाले नसते. ह्या अल्प विश्वासातून सावरून त्यांना त्याच्याविषयी खरी जाणीव झाल्यावर येणाऱ्या अनुभवाप्रत नेण्याचा ख्रिस्त प्रयत्न करीत होता - मानवी देहात देव होता. त्यांच्या विश्वासाने त्यांना देवाची जाणीव झाली पाहिजे ही त्याची इच्छा होती. लवकरच त्यांच्यावर येणाऱ्या मोहाच्या झंझावाताला तोंड देण्यासाठी उद्धारक आपल्या शिष्यांची तयारी अगदी कळकळीने व चिकाटीने करीत होता. त्यांनी त्याच्याबरोबर देवामध्ये लपावे अशी त्याची इच्छा होती.DAMar 581.2

    ख्रिस्त हे शब्द बोलत असताना त्याच्या मुद्रेवर देवाचे वैभव चमकत होते आणि मन लावून ऐकत असतांना सर्व श्रोतेजनावर पवित्र वचक बसली. त्यांची अंतःकरणे त्याच्याकडे निःसंशय आकर्षिली गेली; आणि ते ख्रिस्ताकडे अधिक प्रेमाने आकर्षिल्यामुळे ते परस्पर जवळीक करू लागले. स्वर्ग फार नजीक असल्याचे त्यांना वाटले आणि ऐकलेली वाणी स्वर्गीय पित्याची असल्याचे त्यांनी समजून घेतली. DAMar 581.3

    त्याने म्हटले, “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील.’ त्याचे देवत्व मानवतेशी संघटीत झाल्याचा उद्देश शिष्यांना समजून यावा ही उद्धारकाची उत्कट इच्छा होती. देवाचे गौरव प्रदर्शित करण्यासाठी तो ह्या जगात आला. त्यामुळे त्याच्या पुनर्स्थापनेच्या शक्तीने मानव उन्नत व्हावा. त्याच्यामध्ये देव व्यक्त करण्यात आला अशासाठी की त्यांच्यामध्ये त्याला व्यक्त करण्यात येईल. त्याच्यावरील विश्वासाच्याद्वारे मानवाला साध्य करता येणार नाहीत असे गुण आणि सामर्थ्य येशूने प्रगट केले नाहीत.DAMar 581.4

    “त्यापेक्षा मोठी कृत्ये तो करील, कारण मी पित्याकडे जातो.” त्याचा अर्थ ख्रिस्ताने असा केला नाही की शिष्यांचे काम गुणवतेच्या दृष्टीने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे होईल परंतु ते विस्तारलेले असेल. ह्यामध्ये त्याने चमत्कार प्रेरणेने साध्य झालेले सर्व कार्य त्यामध्ये होते.DAMar 581.5

    प्रभूच्या स्वर्गारोहनानंतर त्याच्या आश्वासनाची पूर्ती झालेली शिष्यांनी पाहिली. ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहन त्यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष अनुभवायला येणारी वस्तुस्थिती होती. भाकीताची अक्षरशः पूर्णता झालेली त्यांनी पाहिली. त्यांनी शास्त्रशोध करून त्याची शिकवण आणि पूर्वी अज्ञात असलेली खात्री विश्वासाने स्वीकारली. घोषीत केल्याप्रमाणे त्यांचा दैवी गुरूजी आहे हे त्याना माहीत झाले. त्यांनी आपले अनुभव निवेदन केल्यावर आणि देवाच्या प्रेमाची प्रतिष्ठा केल्यावर मनुष्यांची अंतःकरणे द्रवून नम्र झाली आणि समुदायाने येशूवर विश्वास ठेविला.DAMar 581.6

    शिष्यांना दिलेले अभिवचन अंत काळातील मंडळीसाठीही आहे. मानवाच्या उद्धारकार्यासाठी योजलेल्या देवाच्या कार्याचा परिणाम अर्थशून्य, क्षुद्र व्हावा ही देवाची धारणा नव्हती. स्वतःच्या कार्यशक्तीवर विश्वास ठेवून नाही तर देव त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी करणाऱ्या कार्यावर श्रद्धा ठेवून जे कार्याला लागतात त्यांना त्याच्या आश्वासनाची परिपूर्ति झाल्याचे समजून येईल. त्याने म्हटले, “त्यापेक्षा मोठी कृत्ये तो करील, कारण मी पित्याकडे जातो.”DAMar 582.1

    अद्याप शिष्यांना उद्धारकाच्या अफाट शक्तीचा व तरणोपायाचा अनुभव आला नव्हता. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही.” योहान १६:२४. त्याच्या नामामध्ये सामर्थ्य व कृपा यांची मागणी करण्यामध्ये त्यांच्या यशाचे रहस्य आहे हे त्याने स्पष्ट केले. त्यांच्यासाठी विनंती करण्यास तो पित्यासमोर हजर असेल. प्रार्थना करणाऱ्या विनम्र भाविकांची विनंती आपली म्हणून तो त्यांच्या वतीने सादर करील. कळकळीने मनापासून केलेली प्रत्येक प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येते. कदाचित ती अस्खलित भाषेत व्यक्त केली नसेल परंतु ती आत्मीयतेची असेल तर येशू सेवा करीत असलेल्या ठिकाणी ती जाईल आणि ती तो पित्याला न अडखळता सुलभ व अचूक भाषेत धूपाप्रमाणे सादर करील.DAMar 582.2

    प्रामाणिकपणा व खरेपणा यांचा मार्ग अडवणुकीशिवाय नाही परंतु प्रत्येक अडथळ्यात प्रार्थनेचे आवाहन आहे. देवापासून सामर्थ्य न लाभलेली कोणीही व्यक्ती नाही आणि सामर्थ्याचा उगम अति कमजोर मनुष्याला उपलब्ध आहे. येशूने म्हटले, “पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.” DAMar 582.3

    “माझ्या नावाने’ प्रार्थना करण्यास ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले. ख्रिस्ताच्या नांवात त्याच्या अनुयायांनी देवासमोर उभे राहायाचे आहे. त्यांच्यासाठी केलेल्या यज्ञाच्या मूल्यामुळे प्रभूच्या दृष्टीने ते मोल्यवान बनले आहेत. ख्रिस्ताची धार्मिकता त्यांच्या नावे केल्यामुळे ते मोल्यवान ठरले आहेत. ख्रिस्तासाठी त्याचे भय धरणाऱ्यांची तो क्षमा करितो. त्यांच्यामध्ये तो पाप्याचा अधमपणा पाहात नाही. ज्या पुत्रावर त्याची श्रद्धा आहे त्याच्यासमान त्यांना तो ओळखतो.DAMar 582.4

    त्याचे लोक स्वतःला हीन, हलके समजतात तेव्हा प्रभूची निराशा होते. त्याने त्यांचे ठरविलेल्या मूल्याप्रमाणे त्याच्या निवडलेल्या वारसदारांनी स्वतःची किंमत ठरवावी. देवाला त्यांची गरज होती, नसती तर त्याने त्यांच्या उद्धारासाठी आपल्या पुत्राला ह्या भारी कामावर पाठविले नसते. त्यांचा त्याला उपयोग आहे आणि त्याच्याकडे जेव्हा ते हक्काने भारी मागणी करितात तेव्हा त्याला समाधान वाटते, त्यामुळे त्याच्या नावाचे गौरव होते. त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवल्यास ते मोठ्या गोष्टींची अपेक्षा करतील.DAMar 583.1

    परंतु ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करणे हे भारी आहे. म्हणजे ख्रिस्ताचा गुण स्वभाव अंगिकारणे, त्याचा मनोभाव व्यक्त करणे आणि त्याचे कार्य करणे होय. उद्धारकाचे आश्वासन शर्तीवर आहे. तो म्हणतो, “तुम्ही मजवर प्रीती करता तर माझ्या आज्ञा पाळा.” पापामध्ये नव्हे तर पापापासून तो त्यांचे तारण करितो; आणि त्याच्यावर प्रेम करणारे आपल्या आज्ञापालनाद्वारे प्रेम व्यक्त करतात.DAMar 583.2

    खरे आज्ञापालन अंतःकरणातून उद्भवते. ख्रिस्ताच्या दृष्टीने ते मनापासूनचे काम आहे. आम्ही त्याला संमति दिल्यावर तो आमच्या विचाराशी आणि ध्येयाशी एकरूप होईल, त्याच्या इच्छेबरहुकूम तो आमची मने व अंतःकरणे यांच्याशी एकजीव होईल आणि त्याच्या आज्ञापालनात आम्ही आमच्या प्रेरणा व प्रबळ इच्छा अंमलात आणू. त्याची सेवा करण्यात पवित्र व सुसंस्कृत इच्छाशक्तीला अत्यानंद व सुख वाटेल. प्रसंग मिळाल्यास देवाविषयीचे ज्ञान संपादन केल्यावर आमचे जीवन अखंड आज्ञापालनाचे राहील. ख्रिस्ताच्या स्वभावाचे गुणग्रहण केल्याने आणि देवाशी जीवलग सख्यसंबध ठेवल्याने पाप तिरस्करणीय वाटेल.DAMar 583.3

    मानवतेमध्ये ख्रिस्ताने आज्ञापालन केले तसेच, आपणही शक्तिमान देवावर सामर्थ्यासाठी विसंबून राहू तर आज्ञापालन करू. आपल्या कर्तव्याची जबाबदारी दुसऱ्यावर टाकायची नाही आणि दुसऱ्यांच्या सूचनेसाठीही आम्हाला थांबायचे नाही. सल्लामसलतीसाठी मानवावर आम्ही विसंबून राहू शकत नाही. आमच्या कर्तव्याविषयी देव दुसऱ्यासारखे आम्हालाही खुशीने प्रबोधन करील. त्याच्याकडे आम्ही विश्वासाने आल्यावर तो आम्हाला व्यक्तीशः त्याच्या रहस्याविषयी सांगेल. हनोखाप्रमाणे आमच्याशी हीतगूज करण्यास तो सन्निद्ध आल्यावर आमच्या मनाला चुरचुर लागेल. देवाचे मन नाखूष होणाऱ्या गोष्टी करण्यापासून अलिप्त राहातील त्यांना इष्ट गोष्टी करण्यासाठी ज्ञान प्राप्त होईल. त्यांना सूज्ञपणा व सामर्थ्य लाभेल. ख्रिस्ताच्या आश्वासनाप्रमाणे आज्ञापालनासाठी आणि सेवाकार्यासाठी त्यांना सामर्थ्य देण्यात येईल. पतित मानवाची गरज भागविण्यासाठी ख्रिस्ताला जे प्रदान केले होते ते तो मानवतेचा प्रमुख व प्रतिनिधी म्हणून दिले होते. “आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळितो, व त्याला जे आवडते ते करितो.” १ योहान ३:२२.DAMar 583.4

    स्वतःला स्वनाकाराचा यज्ञ म्हणून सादर करण्याअगोदर आपल्या अनुयायांना बहाल करण्यासाठी अति आवश्यक आणि परिपूर्ण दान देण्याचे ख्रिस्ताने ठरविले. त्या दानाद्वारे त्यांच्या आवाक्यात येणारा कृपेचा अमर्याद साधन साठा उपलब्ध करून दिला. त्याने म्हटले, “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहात नाही अथवा त्याला ओळखीत नाही; तुम्ही त्याला ओळखिता, कारण तो तुम्हाबरोबर राहातो व तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हास अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन.” योहान १४:१६-१८.DAMar 584.1

    पूर्वी हा आत्मा जगामध्ये होता. उद्धारकार्याच्या आरंभापासून तो मानवी मनावर परिणाम घडवून आणीत होता. परंतु पृथ्वीवर खिस्त असताना त्याच्याशिवाय शिष्यांनी दुसऱ्या कशाच्या मदतीची अपेक्षा केली नव्हती. त्याच्या सहवासाला ते पारखे झाल्यानंतर त्यांना आत्म्याची गरज भासली आणि तो उपलब्ध झाला.DAMar 584.2

    पवित्र आत्मा ख्रिस्ताचा प्रतिनिधी आहे, परंतु मानवतेच्या व्यक्तिमत्त्वाविना तो स्वतंत्र आहे. मानवतेमुळे ख्रिस्त व्यक्तिशः प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नव्हता. म्हणून त्यांच्या कल्याणासाठी पित्याकडे जाणे आणि त्याचा कैवारी म्हणून पवित्र आत्मा पाठविणे त्याला इष्ट होते. पवित्र आत्म्याद्वारे तारणारा सर्वांच्यासाठी उपलब्ध होता. ह्या अर्थाने तो पूर्वीपेक्षा त्याच्या अधिक नजीक होता. DAMar 584.3

    “जो माझ्यावर प्रीती करितो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईन.” येशूने त्याच्या शिष्यांचे भवितव्य ओळखले. एकाला फासावर देण्यास, एकाला वधस्तंभाकडे, एकाला समुद्रकाठावरील निर्जन खडकावर हद्दपार केलेले आणि दुसऱ्यांना छळ करण्यास व मृत्यूदंड देण्यास आणिलेले त्याने पाहिले. हरएक कसोटीच्या प्रसंगी तो त्यांच्याबरोबर असेल ह्या आश्वासनाने त्यांना त्याने उत्तेजन दिले. त्या आश्वासनातील जोर, प्रभाव किंचितही गमावला नव्हता. त्याच्यासाठी तुरुंगात बंदिवान झालेले किंवा निर्जन बेटावर हद्दपार केलेले त्याचे श्रद्धावंत शिष्य यांच्याविषयी प्रभूला सर्वस्वी माहीत आहे. स्वतःच्या उपस्थितीने त्यांचे तो सांत्वन करितो. सत्यासाठी श्रद्धावंताला अधर्मी न्यायासभेपुढे उभे राहावे लागते तेव्हा ख्रिस्त त्याच्या बाजूला उभे राहातो. त्याला लावलेले सर्व दूषण ख्रिस्ताला लावण्यात येते. शिष्याद्वारे ख्रिस्ताला पुन्हा गुन्हेगार ठरविण्यात येते. एकाद्याला तुरुंगात टाकल्यावर ख्रिस्त आपल्या प्रेमाने त्याचे अंतःकरण आनंदित करितो. त्याच्यासाठी एकाद्याला मरण पत्करावे लागते तेव्हा ख्रिस्त म्हणतो, “मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जीवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.’ प्रगटी. १:१८. माझ्यासाठी बळी दिलेले जीवन अनंत वैभवासाठी सुरक्षित ठेविले आहे.DAMar 584.4

    सर्वदा आणि सर्वत्र, दु:खात आणि क्लेशात, पुढे येणाऱ्या गोष्टीतील रागरंग उदास व दुःखी वाटतो आणि आम्हाला असहाय्य व एकाकी वाटते तेव्हा विश्वासाने केलेल्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून कैवारी पाठविण्यात येईल. परिस्थितीने जगातील मित्रापासून आमचा विरह होईल परंतु कसलीही परिस्थिती आणि अंतर आम्हाला दिव्य कैवाऱ्यापासून विभक्त करू शकणार नाही. आम्ही कोठेही असू आणि कोठेही जाऊ तो आम्हाला उत्तेजन देण्यासाठी, पोषण करण्यासाठी, आधार देण्यासाठी, उल्हासित ठेवण्यासाठी नेहमी आम्हाबरोबर आहे.DAMar 585.1

    आध्यात्मिक दृष्ट्या ख्रिस्ताने काढलेले उद्गार शिष्यांना उमजू शकले नाहीत म्हणून त्याने त्याचा अर्थ पुन्हा समजाऊन सांगितला. त्याने म्हटले आत्म्याच्याद्वारे तो त्यांना प्रगट होईल. “माझ्या नामामध्ये पिता कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवील आणि तो तुम्हाला सर्व काही शिकवील.” मला आकलन होत नाही असे तुम्ही म्हणू शकणार नाही. आरशात अस्पष्ट दिसते असे यापुढे तुम्ही म्हणू शकणार नाही. “तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तीमान व्हावे.’ इफिस. ३:१८, १९.DAMar 585.2

    ख्रिस्ताचे जीवन व त्याचे कार्य यांची साक्ष शिष्यांना द्यावयाची होती. त्यांच्या वाणीद्वारे तो पृथ्वीवरील अखिल जनतेशी बोलणार होता. परंतु ख्रिस्ताची मानहानी आणि मृत्यू यामध्ये त्यांना अपार दुःख व निराशा सहन करावी लागली. ह्या अनुभवानंतर त्यांचे बोल अचूक राहातील. येशूने वचन दिले की कैवारी “मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल.”DAMar 585.3

    त्याने पुढे म्हटले, “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुम्हाला त्या सोसवणार नाहीत; तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तरी जे काही ऐकेल, तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवील. तो माझे गौरव करील; कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळवील.” येशूने शिष्यांच्यासमोर सत्याचा विशाल भाग खुला करून ठेविला होता. परंतु सांप्रदाय आणि शास्त्री व परूशी याच्या नीतिवचनापासून त्याने दिलेले पाठ अलिप्त ठेवणे फार कष्टाचे होते. धार्मिक पुढाऱ्यांनी दिलेले शिक्षण देवाची वाणी म्हणून स्वीकारावे असे त्यांना सांगण्यात आले होते आणि त्याचा प्रभाव अजून त्यांच्या मनावर होता आणि तशी प्रतिक्रिया होती. त्यांच्या विचारसरणीत अजून जगीक कल्पना व क्षणीक गोष्टीला प्राधान्य होते. वारंवार त्याने त्याचे स्पष्टीकरण केले होते तरीपण त्यांना ख्रिस्तराज्याचे आध्यात्मिक गुणधर्म उमजले नव्हते. त्यांची मने गोंधळून गेली होती. ख्रिस्ताने सादर केलेल्या शास्त्रवचनाचे मूल्य त्यांना आकलन झाले नव्हते. त्याने दिलेल्या वचनाचा खरा अर्थ त्यांना समजला नाही हे ख्रिस्ताने पाहिले. दयार्द अंतःकरणाने त्याने आश्वासन दिले की पवित्र आत्मा ह्या प्रबोधनाची त्यांना आठवण करून देईल. शिष्यांना त्यांचा समज होणार नाही म्हणून त्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या नव्हत्या. त्यांचा खुलासासुद्धा पवित्र आत्मा करील. पवित्र आत्मा त्यांची आकलनशक्ती प्रज्वलित करील आणि त्याद्वारे दिव्य गोष्टींचे त्यांना मूल्य समजून येईल. येशूने म्हटले, “तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.’DAMar 585.4

    कैवाऱ्याला “सत्याचा आत्मा’ म्हटले आहे. सत्याची व्याख्या करणे व ते अबाधित राखणे हे त्याचे काम आहे. आरंभीच तो अंतःकरणात सत्याचा आत्मा म्हणून वास करितो आणि अशा प्रकारे तो कैवारी बनतो. सत्यामध्ये सुख शांती राहाते परंतु असत्यामध्ये खरी सुख शांती मिळणार नाही. खोट्या तात्त्विक भूमिका आणि सांप्रदाय यांच्याद्वारे सैतान मनावर ताबा मिळवितो. मनुष्यांना खोट्या प्रमाणाची दिशा दाखवून त्याच्या शीलस्वभावाला विपरीत आकार देतो. शास्त्रवचनाद्वारे पवित्र आत्मा माणसाच्या मनाशी बोलतो व त्याच्या अंतःकरणावर सत्याचा प्रभाव पाडितो. अशा रीतीने चुकी उघड करून ती काढून टाकितो. देवाच्या वचनाद्वारे कार्य करून सत्याच्या आत्म्याने ख्रिस्त आपल्या निवडलेल्या लोकांना वश करून घेतो. DAMar 586.1

    पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी स्पष्टीकरण करून येशूला ज्याच्याद्वारे प्रेरणा झाली त्याद्वारे त्याच्या शिष्यांना हर्षाने आणि आशेने प्रेरित करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या मंडळीला विपुल सहाय्य केल्याबद्दल त्याला आनंद झाला. त्याच्या लोकांना उच्च स्थानाप्रत नेण्यासाठी पित्याकडून मिळविलेले पवित्र आत्म्याचे दान सर्व दानात सर्वश्रेष्ठ आहे. नव चैतन्य (नवा जन्म) देण्यासाठी आत्मा देण्यात येतो आणि ह्याच्या शिवाय ख्रिस्ताचा यज्ञ निरर्थक होईल. दुरात्म्याची शक्ती शतकानुशतके मजबूत होत आहे आणि ह्या सैतानी बंधनाला लोक बळी पडत आहेत हे आश्चर्याचे आहे. देवत्वातील केवळ तिसऱ्या व्यक्तीच्या शक्तिवान साधनाद्वारे पापाचा प्रतिकार करून त्यावर विजय संपादन करणे शक्य आहे. जगाच्या तारणाऱ्याने जे काही घडवून आणलेले आहे ते परिणामकारक आणि गुणकारी पवित्र आत्म्याद्वारे होते. आत्म्याच्या द्वारे अंतःकरण शुद्ध करण्यात येते. आत्म्याच्याद्वारे श्रद्धावंत दिव्य शीलस्वभावाचा सहभागी बनतो. आनुवंशिक आणि संपादित केलेला अधर्माकडील ओढा याच्यावर विजय मिळण्यासाठी आणि त्याच्या मंडळीवर त्याच्या शीलस्वभावाचा प्रभाव पाडण्यासाठी ख्रिस्ताने त्याच्या आत्म्याला दिव्य सामर्थ्य दिले आहे.DAMar 586.2

    आत्म्यासंबंधी येशूने म्हटले, “तो माझे गौरव करील.’ प्रेम प्रदर्शनाद्वारे पित्याचे गौरव करण्यासाठी उद्धारक आला; आणि जगाला त्याची कृपा प्रगट करून आत्मा ख्रिस्ताचे गौरव करणार होता. देवाची प्रतिमा मानवतेमध्ये पुन्हा उत्पन्न करायची आहे. त्याच्या लोकांच्या परिपूर्ण शीलस्वभावामध्ये पित्याचा व ख्रिस्ताचा आदर, मान, प्रतिष्ठा सामावलेली आहे. DAMar 586.3

    “तो (सत्याचा आत्मा) येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी करील.” पवित्र आत्म्याची नितांत समक्षता आणि सहाय्य यांच्याशिवाय शास्त्रवचनाचा उपदेश करीत बसणे निरर्थक ठरेल. तोच केवळ दिव्य सत्याचा परिणामकारक शिक्षक आहे. सत्य वचनाला आत्म्याची साथ लाभते तेव्हाच विवेक जागृत होतो किंवा जीवनाचे परिवर्तन होते. एखादा देवाच्या वचनाचे यथार्थ प्रगटीकरण करील, त्याला सर्व आज्ञा व आश्वासने अवगत असतील; परंतु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांचा अंतःकरणावर प्रभाव पडणार नाही तर कोणाच्याही मनाचे रूपांतर होणार नाही. शिक्षणाच्या कितीही पदव्या संपादन केल्या, कितीही मोठा फायदा झाला तरी देवाच्या आत्म्याच्या सहकार्याशिवाय कोणीही प्रकाशाचे साधन बनणार नाही. स्वर्गीय दंवाने बी रूजून, अंकुर फुटून जीवनाची पालवी फुटल्याशिवाय सुवार्तेचे पेरलेले बी फलदायी होणार नाही. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर नवा करारातील पहिले पुस्तक लिहिण्याअगोदर, पहिले सवार्ता प्रवचन करण्याअगोदर प्रार्थनेत दंग असलेल्या शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. त्यानंतर शत्रूची साक्ष ही होती: “तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे.” प्रेषित. ५:२८.DAMar 587.1

    ख्रिस्ताने मंडळीला पवित्र आत्म्याच्या दानाचे आश्वासन दिले आहे आणि पहिल्या शिष्यासारखेच हे आश्वासन आमच्यासाठीही आहे. इतर आश्वासानाप्रमाणे हे देखील शर्तीवर आहे. अनेकजन त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मालकी हक्क सांगतात; ते ख्रिस्ताविषयी आणि पवित्र आत्माविषयी बोलत राहातात तरी त्यांना काहीच फायदा होत नाही. दैवी प्रतिनिधीच्या मार्गदर्शनासाठी व संयमनासाठी ते स्वतःला समर्पित करीत नाहीत. आम्ही पवित्र आत्म्याचा वापर करू शकत नाही तर पवित्र आत्म्याला आमचा वापर करायचा आहे. पवित्र आत्म्याद्वारे देव त्याच्या लोकामध्ये “इच्छा करणे व सत्संकल्पासाठी कृती करणे हे साधून घेतो.” फिलि. २:१३. परंतु अनेकजन हे मान्य करणार नाहीत तर स्वतःचेच चालवून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांना दिव्य देणगी मिळत नाही. विनम्रपणे देवावर अवलंबून राहाणाऱ्यांना व कृपेची व त्याच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करणाऱ्यांनाच केवळ पवित्र आत्मा देण्यात येतो. त्यांची मागणी आणि स्वीकार यांची प्रतीक्षा देवाचे सामर्थ्य करिते. विश्वासाने मागणी केलेल्या ह्या कृपाप्रसादामुळे इतर कृपाप्रसाद प्राप्त होतात. ख्रिस्त कृपेच्या समृद्धी प्रमाणे हे देण्यात येते; आणि सामावून घेण्याच्या शक्तीप्रमाणे प्रत्येकाला देण्यासाठी तो तयार आहे.DAMar 587.2

    शिष्यांना दिलेल्या प्रवचनात येशूने आपल्या व्यथा व मरण यांचा शोककारक उल्लेख केला नाही. त्याने त्यांना दिलेला अखेरचा वारसा शांतीचा होता. त्याने म्हटले, “मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो; जसे जग देते तसे मी देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.”DAMar 587.3

    माडीवरील खोली सोडण्याअगोदर उद्धारकाने शिष्यांबरोबर स्तुती स्तोत्रे गाईली. विलापाने व्याकूळ झालेल्या स्वरात नाही तर वल्हांडण सणाला अनुसरून इशस्तवनासाठी गाईलेल्या आनंदी स्वरात त्याचा आवाज ऐकिलाःDAMar 588.1

    “अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा;
    अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा.
    कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे
    आणि परमश्वराचे सत्य सनातन आहे.
    परमेश्वराचे स्तवन करा.”
    DAMar 588.2

    स्तोत्र ११७

    गीत संपल्यावर ते निघून गेले. रस्त्याच्या गर्दीतून त्यांनी मार्गक्रमण केले आणि वेशीतून बाहेर पडल्यावर जैतूनाच्या डोंगराकडे वळले. प्रत्येकजन विचारमग्न होऊन संथपणे चालू लागले. उतरणीवरून डोंगराकडे जात असताना अति दु:खाने व्याकूळ होऊन येशूने म्हटले, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.मत्तय २६:३१. शिष्यांनी दु:खी होऊन आश्चर्याने ते बोल ऐकिले. कपर्णहूमातील मंदिरामध्ये येशूने स्वतः जीवनी भाकर असल्याचे ध्वनित केल्यावर अनेकांच्या मनाला ते लागले आणि ते त्याला सोडून गेले ह्याचे स्मरण त्यांना झाले. परंतु बारा जणांनी बेईमानी दाखविली नाही. आपल्या बांधवाच्या वतीने पेत्राने ख्रिस्तावरील एकनिष्ठता जाहीर केली. मग उद्धारकाने म्हटले, “तुम्ही बारा जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे.” योहान ६:७०. माडीवरच्या खोलीत येशूने म्हटले होते की तुम्हातील एकजण मला धरून देईल आणि पेत्र त्याचा नाकार करील. परंतु आता त्याने सर्वांना गोवले होते.DAMar 588.3

    आता जोरदार विरोध करताना पेत्राचा आवाज ऐकिला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.’ माडीवरील खोलीत त्याने प्रतिपादिले, “आपल्यासाठी मी माझा प्राण देईन.” येशूने त्याला इशारा देऊन सांगितले की त्याच रात्री तू तुझ्या उद्धारकाला नाकारशील. ख्रिस्ताने इशाऱ्याचा पुनरुच्चार केलाः “आज म्हणजे ह्याच रात्री, कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.’ परंतु पेत्राने आवेशाने म्हटले, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही; सर्वजण तसेच म्हणत होते.” मार्क १६:२९, ३०, ३१. माहीत असणाऱ्याचे वारंवार उच्चारलेले विधान ते नाकारीत होते. कसोटीसाठी त्यांची तयारी नव्हती. मोहजाळ्यात अडकल्यावर त्यांची दुर्बलता त्यांना कळून घेईल.DAMar 588.4

    प्रभूसाठी तुरुंगात जावे लागले आणि मरावे लागले हे पेत्राने काढलेले उद्गार अगदी मनापासून होते; परंतु तो स्वतःविषयीच अजाण होता. त्याच्या अंतःकरणात दुष्टाई लपलेली होती आणि परिस्थितीने ती जीवनात डोके वर काढील. ह्या धोक्याची कल्पना त्याला दिली नाही तर त्याद्वारे त्याचे निरंतरचे नुकसान होईल. उद्धारकाने त्याच्याठायी अहंमन्यता आणि ख्रिस्ताविषयी असलेले प्रेमसुद्धा दडपून टाकण्याची खात्री पाहिली. नैतिक दुर्बलता, इंद्रियदमन न करण्याचे पाप, बेदरकारपणा, असात्त्विक संताप, मोहपाशासंबधी गैरसावध ही सर्व त्याच्या ह्या अनुभवात प्रगट करण्यात आली होती. ख्रिस्ताचा इशारा हृदय संशोधनासाठी होता. स्वतःवर अवलंबून न राहाता पेत्राने ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे होता. विनम्रतेने इशाऱ्याकडे लक्ष दिले असते तर मेंढरे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने मेंढपाळाजवळ विनंती केली असती. गालीली समुद्रावर असताना तो बुडण्याच्या बेतात होता तेव्हा तो ओरडून म्हणाला, “प्रभु, मला वाचीव.” त्याचा हात पकडण्यासाठी ख्रिस्ताने हात पुढे केला. तसेच आता माझ्यापासून माझे संरक्षण कर म्हणून हाक मारली असती तर तो वाचला असता. परंतु त्याने विश्वास गमावला होता असे पेत्राला वाटले आणि ते फार निष्ठूर, निर्दय त्याला वाटले. अगोदरच त्याचे मन दुखावले होते आणि तो आत्मविश्वासात हेकेखोर बनला.DAMar 589.1

    येशू आपल्या शिष्यावर दया दाखवितो. येशू आपल्या शिष्यांना कसोटीपासून अलिप्त ठेवू शकत नाही परंतु तो त्यांना गैरसोईमध्ये राहू देत नाही. तो त्यांना कबरेची बंधने तोडण्याची खात्री देतो आणि त्यांच्यावरील त्याचे प्रेम अटळ राहील. त्याने म्हटले, “मी उठविला गेल्यानंतर तुमच्या आधी गालीलात जाईन.’ मत्तय २६:३२. नाकार करण्याअगोदर त्यांना पापक्षमेची खात्री होती. त्याचे मरण व पुनरुत्थानंतर त्यांची पापक्षमा झाल्याची त्यांना जाणीव झाली आणि ते ख्रिस्ताच्या अधिक सान्निद्यात आले.DAMar 589.2

    जैतून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गेथशेमाने बागेच्या वाटेवर येशू आणि शिष्य होते. हे ठिकाण प्रशांत असून प्रार्थना व मनन करण्यासाठी त्याने वारंवार त्याला भेट दिली होती. जगातील त्याच्या कार्याविषयी आणि त्याच्याशी असलेल्या त्याच्या आध्यात्मिक नातेसंबंधाविषयी तो स्पष्टीकरण करीत होता. उदाहरण देऊन तो धडा स्पष्ट करीत होता. तेजस्वी चंद्र प्रकाशात बहरलेला द्राक्षाचा वेल त्याने पाहिला. त्याच्याकडे शिष्यांचे लक्ष वेधन ते प्रतिकात्सक म्हणून त्याचा वापर करितो.DAMar 589.3

    त्याने म्हटले “मी खरा द्राक्ष वेल आहे.” डौलदार ताड, उंच देवदार किंवा मजबूत ओक जातीच्या झाडाऐवजी येशूने स्वतःचे प्रतीक म्हणून बारीक मूळाने पांगोऱ्याला बिलगून राहिलेल्या द्राक्षवेलीचे उदाहरण घेतो. ताडाचे झाड, देवदारु वृक्ष आणि ओक झाड स्वतंत्रपणे राहातात. त्यांना दुसऱ्याच्या आधाराची गरज नसते. परंतु द्राक्षवेली जाळीदार ताट्यांच्या आधारावर वर चढतात. मानवी देहात ख्रिस्त दिव्य शक्तीवर अवलंबून होता. त्याने म्हटले, “मला स्वतः होऊन काही करिता येत नाही.” योहान ५:३०. DAMar 589.4

    “मी खरा द्राक्षवेल आहे.” द्राक्षवेल उत्तम वनस्पती असून शक्तीवान, उत्कृष्ट आणि फलदायी यांचा नमुना आहे अशी धारणा यहूदी लोकांची होती. आश्वासित भूमीत देवाने लावलेली द्राक्षवेल इस्राएलाचे दर्शक होते. इस्राएलाशी असलेल्या घनिष्ठ संबंधावर यहूदी लोकांच्या तारणाची आशा अवलंबून होती. परंतु मी खरा द्राक्षवेल आहे असे येशू म्हणतो. इस्राएलाशी असलेल्या संबंधाद्वारे ईश्वर जीवनाचे तुम्ही भागीदार होणार आणि त्याच्या आश्वासनाचे वारीसदार होणार ही संकल्पना तुमच्या मनाला शिवायला नको असे येशूने म्हटले. तो पुढे म्हणतो केवळ माझ्याद्वारे आध्यात्मिक जीवन प्राप्त होते.DAMar 590.1

    “मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.’ पॅलस्ताईनच्या टेकडीवर आमच्या स्वर्गीय पित्याने ही द्राक्षवेल लावली होती आणि तो स्वतः माळी होता. ह्या द्राक्षलतेकडे अनेकजन आकृष्ट झाले होते आणि त्याचा उगम स्वर्गीय असल्याचे घोषीत केले. परंतु इस्राएलाच्या पुढाऱ्यांना त्याचे मूळ कोरड्या भूमीत असल्याचे वाटले. त्याने ते रोपटे घेतले, कुसकरून आपल्या अशुद्ध पायाखाली चिरडून टाकिले. ते कायमचे समूळ नाश करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु स्वर्गीय माळ्याने त्याच्याकडे किंचितही दुर्लक्ष केले नाही. लोकांना वाटले की ते मरून सुकून गेले परंतु त्याने ते घेऊन भींतीच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा लावले. यापुढे द्राक्षवेलीचा बुंधा दृश्यमान राहाणार नव्हता. माणसांच्या हल्ल्यापासून तो लपविला होता. परंतु द्राक्षवेलीच्या फांद्या भींतीवरून लोंबकळत होत्या. त्यांना वेलीचे प्रतिनिधीत्व करावयाचे होते. केलेले कलम त्यांच्याद्वारे वेलीशी एकजीव होऊ शकेल. त्यावर फळे येतील आणि वाटसरू त्यांची तोडणी करू शकतील.DAMar 590.2

    “मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा.’ असे ख्रिस्ताने शिष्यांना म्हटले. त्यांच्यापासून त्याला विभक्त करण्यात येणार होते तरी त्याच्याशी असलेला आध्यात्मिक एकसंघीपणा बदलणार नव्हता. फांदीचा वेलीशी असलेला संबंध म्हणजे माझ्याशी असलेला तुमचा संबंध असे त्याने म्हटले. अंकुर जीवंत वेलीत कलम करण्यात येतो आणि शीरा शीरेशी व तंतु तंतूशी एकजीव होऊन वेलीच्या बुंध्यात वाढायला लागतो. वेलीचे जीवन फांदीचे जीवन बनते. त्याचप्रमाणे स्वैर वर्तनी व पापी व्यक्तीला ख्रिस्ताच्या संबंधाद्वारे जीवन लाभते. तो वैयक्तिक तारणारा आहे ह्या विश्वासाने एकीकरण होते. पापी आपली दुर्बलता ख्रिस्ताच्या सामर्थ्याशी, त्याचा पोकळपणा ख्रिस्ताच्या परिपूर्णतेशी, त्याचा नाजूकपणा ख्रिस्ताच्या टिकाऊ शक्तीशी एकजीव करितो. ख्रिस्ताची मानवता आमच्या मानवतेशी स्पर्श करिते आणि आमची मानवता देवपणाशी स्पर्श करिते. अशा रीतीने पवित्र आत्म्याद्वारे मनुष्य दिव्य शीलस्वभावाचा सहभागी बनतो. प्रियजनात त्याचा स्वीकार करण्यात येतो.DAMar 590.3

    ख्रिस्ताबरोबर केलेले हे एकीकरण टिकून ठेविले पाहिजे. ख्रिस्ताने म्हटले, “तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही देता येणार नाही.” हा काही सहजगत्या घडलेला स्पर्श नव्हे किंवा अधून मधून येणारा संबंध नव्हे. फाटा वेलीचा भाग बनतो. मूळापासून फाट्याला होणारा जीवनाचा, शक्तीचा आणि फलदायीत्वाचा संबंध सततचा व बिनविरोध राहील. वेलीपासून विभक्त झालेला फाटा जीवंत राहू शकत नाही. येशूने म्हटले, माझ्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. माझ्यापासून तुम्हाला लाभलेले जीवन अखंड संबंधामुळे टिकून राहील. माझ्याविना तुम्हाला एकाही, पापावर किंवा मोहावर विजय मिळविता येत नाही. DAMar 591.1

    “तुम्ही माझ्यामध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन.’ ख्रिस्तामध्ये राहाणे म्हणजे सतत पवित्र आत्म्याचा स्वीकार करणे आणि त्याच्या सेवाभावी कार्यासाठी जीवन वाहून देणे होय. मनुष्य व त्याचा देव यांच्यामधील संबंधाचे माध्यम सतत खुले असले पाहिजे. जसा फाट्याला जीवंत वेलीपासून जीवन रस-सत्व सतत मिळत राहाते तसेच ख्रिस्तापासून विश्वासाने आम्हाला शक्ती आणि त्याचा परिपूर्ण शीलस्वभाव लाभण्यासाठी आम्ही येशूला बिलगून राहिले पाहिजे. DAMar 591.2

    मूळातून फांदीद्वारे डाहाळीला जीवनसत्व मिळते. त्याचप्रमाणे ख्रिस्त आध्यात्मिक सामर्थ्य प्रत्येक श्रद्धावंताला पुरवितो. जोपर्यंत आत्मा ख्रिस्ताशी संघटीत झाला आहे तोपर्यंत तो वाळून किंवा कुजून जाण्याचा धोका नाही. DAMar 591.3

    फांदीवरील सुवासिक फळामध्ये वेलीचे जीवन व्यक्त करण्यात येईल. येशूने म्हटले, “जो माझ्यामध्ये राहातो आणि मी त्याच्यामध्ये राहातो तो पुष्कळ फळ देतो; कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही.’ देवपुत्रावरील विश्वासाने जीवन जगल्यास आमच्या जीवनात आध्यात्मिक फळे दृष्टोत्पतीस येतील; त्यातील एकही हरवणार नाही.DAMar 591.4

    “माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो.” वेलीवर बाहेरच्या बाजूने सहजरित्या कलम केल्यास एकजीव होणार नाही आणि त्याची वाढ होणार नाही आणि फळेही येणार नाहीत. तेथे ख्रिस्ताबरोबरचा बरकरणी संबंध दिसेल आणि विश्वासाद्वारे असणारे एकीकरण असणार नाही. मंडळीमध्ये धर्माचा पुरस्कार करणारे लोक आहेत परंतु त्यांचा शिलस्वभाव आणि वर्तणूक यांच्यावरून ख्रिस्ताशी असलेला त्यांचा संबध उघड होता. त्यांना काही फळे येत नसल्यास ते खोटे फाटे आहेत. ख्रिस्तापासून विरह झालेल्यांचा संपूर्ण नाश सुकलेल्या फांदीसम आहे. “कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकितात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकितात व ते जळून जातात.”DAMar 591.5

    “फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करितो.” निवडलेल्या बारापैकी एकाला सुकलेल्या फांदीप्रमाणे काढून टाकण्यात येणार होते आणि राहिलेल्यांची चाकूने-कडक कसोटीने काटछाट करायची होती. येशूने विनयशीलपणे माळ्याचा उद्देश समजाऊन सांगितला. काटछाट करतांना वेदना होतील परंतु पिता चाकू चालवितो. तो स्वच्छंदी किंवा बेपवाई अंतःकरणावर कार्य करीत नाही. काही फाटे जमिनीवर फरफटत आहेत; त्यांचा जमिनीवरील आधार तोडण्यासाठी त्यांना कापून टाकिले पाहिजे. त्यानी आपली दृष्टी वर लावून आपला आधार देवामध्ये शोधला पाहिजे. फळावर परिणाम करणाऱ्या भरमसाठ पानाच्या झुबक्याची काटछाट केली पाहिजे. धार्मिकतेच्या सूर्य किरणाने आरोग्य संवर्धन होण्यासाठी फाजील वाढीची काटछाट केली पाहिजे. विपुल आणि सकस फळ येण्यासाठी माळी घातक वाढ छाटून टाकितो. DAMar 592.1

    “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते.” तुमच्याद्वारे देव पावित्र्य, परोपकारबुद्धी, ममता आणि स्वतःचा शीलस्वभाव प्रगट करण्याची इच्छा करितो. तथापि फलदायी होण्यासाठी शिष्यांना कष्ट करण्यास उद्धारक सांगत नाही. त्याच्यामध्ये निवास करण्यास तो सांगतो. तो म्हणतो, “तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल.” वचनाद्वारे ख्रिस्त त्याच्या अनुयायामध्ये वस्ती करितो. हे महत्त्वाचे एकीकरण त्याचे मास खाणे व त्याचे रक्त पिणे यामध्ये व्यक्त केले आहे. ख्रिस्ताचे वचन जीवन व आत्मा आहे. त्याचा स्वीकार केल्याने तुम्हाला वेलीतील जीवन प्राप्त होते. “परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तुम्ही जगता.” मत्तय ४:४. तुम्हामधील ख्रिस्ताचे जीवन त्याच्या जीवनातील फळे देते. ख्रिस्तामध्ये राहिल्याने, त्याच्याशी एकनिष्ठ राहिल्याने, त्याच्या उत्तेजनाने, त्याच्याद्वारे पोषण झाल्याने ख्रिस्तसारखेच फळ तुम्ही देता. DAMar 592.2

    शिष्यांबरोबरच्या ह्या शेवटच्या भेटीसमयी त्याने जशी त्यांच्यावर प्रीती केली तशीच त्यांनी एकमेकावर प्रीती करावी अशी अपेक्षा ख्रिस्ताने केली. ह्याविषयी त्याने वारंवार उद्गार काढिले. त्याने पुन्हा म्हटले, “जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.” माडीवरच्या खोलीत असताना त्याने शिष्यांना प्रथमच ताकीत देऊन म्हटले होते की, “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी.” शिष्यांना ही आज्ञा नवीन होती कारण ख्रिस्ताने त्यांच्यावर जशी प्रीती केली तशी त्यांनी एकमेकावर प्रीती केली नव्हती. नव्या संकल्पना, नव्या प्रेरणा यांचा प्रभाव त्यांच्यावर झाला पाहिजे; नव्या तात्त्विक भूमिकेचे त्यांनी पालन केले पाहिजे असे त्याला वाटले. त्याचे जीवन व मरण यांच्याद्वारे त्यांना त्याच्या प्रीतीची नवी संकल्पना लाभायची होती. त्याच्या आत्मसमपर्णाच्या संदर्भात एकमेकावर प्रीती करा ह्यामध्ये नवीन अर्थ सामावलेला होता. संपूर्ण कृपाकार्य म्हणजे अखंड प्रेमसेवा, स्वार्थत्याग, स्वसुखत्याग परिश्रम होय. पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या मुक्कामात प्रत्येक तासाला त्याच्यापासून देव प्रीतीचे दुर्दम्य झरे वाहात होते. त्याच्या आत्म्याने भरलेले सर्वजन त्याने जशी प्रीती केली तशी ते प्रीती करतील. ख्रिस्ताला ज्या तत्त्वाने प्रोत्साहन मिळाले त्याच तत्त्वाने एकमेकावर प्रीती करण्यास प्रोत्साहन मिळेल.DAMar 592.3

    प्रीती त्यांच्या शिष्यत्वाचा पुरावा आहे. येशूने म्हटले, “तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” जुलूमाने किंवा स्वार्थाने नव्हे परंतु प्रीतीने लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यावर मानवी शक्तीऐवजी निराळ्या शक्तीचा प्रभाव पडल्याचे ते दर्शवितात. ऐक्यभावाचे अस्तित्व जेथे दिसते तेथे देवाची प्रतिमा मानवामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेली दिसते, तेथे जीवनाचे नवीन नीतितत्त्व अंमलात आलेले असते. ह्यावरून दुष्टाईच्या अद्भुत शक्तीला तोंड देण्यास दिव्य स्वभावात सामर्थ्य आहे हे स्पष्ट होते आणि नैसर्गिक अंतःकरणात भरलेल्या स्वार्थावर विजय मिळविण्यास देवाची कृपा समर्थ आहे हेही दिसून येते. DAMar 593.1

    मंडळीमध्ये ही प्रीती व्यक्त केल्यास सैतानाचा क्रोध भडकेल. ख्रिस्ताने शिष्यांच्यासाठी सुलभ मार्ग आखून ठेविला नाही. त्याने म्हटले, “जग तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत हे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडिले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करिते. दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यानी माझे वचन पाळिले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठविले त्याला ते ओळखीत नाहीत.’ संकट, धोका, भय, विरोध, कष्ट यांच्यामध्ये युद्ध पातळीवर सुवार्ता प्रसार उत्साहाने, जोमाने केला पाहिजे. असे हे काम करणारेच प्रभूच्या पावलावर पाऊल टाकून चालतात.DAMar 593.2

    जगाचा उद्धारक या नात्याने ख्रिस्ताला सतत निराशेला तोंड द्यावे लागत होते. जगाला दयेचा संदेश देणाऱ्याच्या हातून उन्नतीचे व उद्धाराचे कार्य फार थोडके होत आहे असे वाटले. त्याच्या कार्याला विरोध करणारे सैतानी प्रयत्न जारीचे होते. परंतु तो निराश होत नव्हता. यशयाच्या भाकीताद्वारे तो घोषीत करितो, “मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ व्यर्थ व निरर्थक वेचिले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे... जरी इस्राएलाला एकत्र जमविले नाही तरी परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व माझा देव माझे सामर्थ्य झाला.” हे आश्वासन ख्रिस्ताला देण्यात आले, “ज्याला माणसे तुच्छ लेखितात, ज्याला लोक अमंगल मानितात, जो अधिपतीचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभु जो परमेश्वर तो म्हणतो... परमेश्वर म्हणतोः... देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करितो व लोकांच्या करारा प्रीत्यर्थ तुला नेमितो. तू बंदीत असलेल्यास म्हणावे, बाहेर या; अंधारात आहेत त्यांस म्हणावे, उजेडात या... त्यांस तहान भूक लागणार नाही; झळई व ऊन यांची बाधा त्यास होणार नाही; कारण त्याजवर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झऱ्यावर तो त्यास नेईल.’ यशया ४९:४, ५, ७-१०.DAMar 593.3

    ह्या वचनावर येशू विसंबून राहिला आणि सैतानाला त्याचा लाभ होऊ दिला नाही. येशूची मानहानी करण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यात आला, दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळला तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “जगाचा अधिकारी येतो, तरी माझ्यामध्ये त्याचे काही नाही.” “ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे.” आता त्याला बाहेर टाकण्यात येईल. योहान १४:३०; १६:११; १२:३१. भाकीताच्या दृष्टीकोनातून पाहून शेवटच्या संघर्षात घडणाऱ्या देखाव्यांची रूपरेषा येशूने काढिली. “पूर्ण झाले आहे’ ही घोषणा केल्यावर संपूर्ण स्वर्ग विजश्रीने जल्लोष करील हे त्याला माहीत होते. दूरवरचा संगिताचा निनाद आणि स्वर्गीय दरबारातील विजयाचा गजर यांच्या ध्वनी त्याच्या कानावर आदळल्या होत्या. सैतानाच्या साम्राज्याच्या नाशाचा घंटानाद होईल आणि सबंध विश्वातील जगांच्यामध्ये ख्रिस्तनामाच्या गजराचा जयघोष होईल हे सर्व त्याला माहीत होते.DAMar 594.1

    त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक त्याने आपल्या अनुयायासाठी केले म्हणून ख्रिस्ताला अत्यानंद झाला. जग निर्माण करण्याअगोदर सर्व शक्तिमान हुकूमनामा काढण्यात आला होता हे जाणून तो खात्रीपूर्वक बोलला. पवित्र आत्म्याच्या अनंत शक्तीने सत्य सशस्त्र झाल्याने दुष्टाईविरुद्धच्या लढ्यात निश्चितच विजयी होईल; आणि रक्ताने डागळलेला झेंडा अनुयायांच्यावर जयघोषाच्या निनादात फडकावला जाईल हे त्याला ज्ञात होते. त्याच्या श्रद्धावंत शिष्यांचे जीवन त्याच्यासारखे असणार हे त्याला माहीत होते. त्यांचे जीवन व्यत्ययाविना विजयीश्रीच्या मालिकेने भरलेले असणार. आता ते तसे दिसणार नाही, परंतु येणाऱ्या जीवनात ते तसे ओळखण्यात येईल.DAMar 594.2

    त्याने म्हटले, “माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून ती तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकिले आहे.” ख्रिस्त अपयशी झाला नाही आणि निराशही झाला नाही आणि त्याच्या शिष्यांनीही तसाच टिकाऊ स्वभावाचा विश्वास प्रगट केला पाहिजे. त्याच्या जीवनक्रमाप्रमाणे ह्यांचा जीवनक्रम असला पाहिजे आणि त्याच्यासारखेच ह्यांनी काम केले पाहिजे कारण आदर्श महान कामगार म्हणून ते त्याच्यावर अवलंबून राहातात. धैर्य, शक्ती आणि चिकाटी त्यांच्याठायी असली पाहिजे. त्यांच्या मार्गावर संभाव्य अडखळणे आली तरी त्याच्या कृपेने त्यांनी पुढे वाटचाल करीत राहिले पाहिजे. अडचणी पाहून शोक करीत बसण्याऐवजी त्यांचे निवारण करायल्या पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता आशावादी बनले पाहिजे. देवाच्या सिंहासनाला अप्रतिम प्रेमाच्या सुवर्ण श्रृंखलाने ख्रिस्ताने त्यांना बांधून टाकिले आहे. सर्व सामर्थ्याच्या उगमापासून उद्भवलेला विश्वातील अत्युच्च प्रभाव त्यांचा व्हावा हा त्याचा उद्देश आहे. दुष्टाईचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्याठायी असावे. पृथ्वी, मरण आणि नरक यांचा त्यांच्यावर प्रभाव होणार नाही असे सामर्थ्य आणि ख्रिस्त विजयी झाला त्याप्रमाणे ते विजयी होण्यास समर्थ करणारे सामर्थ्य त्यांना लाभावे अशी त्याची इच्छा होती. DAMar 594.3

    पृथ्वीवर त्याच्या मंडळीमध्ये स्वर्गीय सुव्यवस्था, शासनपद्धतीसाठी स्वर्गीय योजना, स्वर्गातील दिव्य ऐक्य असावे असा ख्रिस्ताचा उद्देश आहे. अशा रीतीने त्याच्या लोकांमध्ये त्याचे गौरव होईल. त्यांच्याद्वारे धार्मिकतेचा सूर्य जगापुढे प्रकाशाने चमकेल. उद्गार पावलेल्या आणि खरेदी केलेल्यांच्याद्वारे त्याचे अधिक गौरव व्हावे म्हणून ख्रिस्ताने त्याच्या मंडळीला पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी त्याची स्वतःची ताकद प्रदर्शित करण्यासाठी त्याने त्याच्या लोकांना कार्यक्षमता व कृपाप्रसाद ही बहाल केली आहेत. ख्रिस्ताची धार्मिकता देण्यात आलेली मंडळी सुरक्षतेचे कोठार आहे. त्यामध्ये त्याच्या दयेची संपत्ति, त्याची कृपा आणि त्याची प्रीती यांचे प्रदर्शन विपुलतेने झाले पाहिजे. त्याच्या मानखंडनेचे पारितोषिक आणि त्याच्या वैभवाची जादा पुरवणी म्हणून ख्रिस्त आपल्या लोकांमध्ये पावित्र्य व परिपूर्णता यांची अपेक्षा करितो. ख्रिस्त महान मध्यबिंदू-केंद्र असून त्याच्यापासून वैभवाचे किरण उत्सर्जित होतात. DAMar 595.1

    उद्धारकाने आपल्या प्रबोधनाची सांगता भरीव आणि आशादायक वचनाने केली. नंतर त्याच्या शिष्याविषयीचे ओझे त्याने आपल्या प्रार्थनेत व्यक्त केले. स्वर्गाकडे दृष्टी लावून त्याने म्हटले, “हे माझ्या बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वास त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”DAMar 595.2

    दिलेले काम ख्रिस्ताने संपविले. पृथ्वीवर त्याने देवाचे गौरव केले. त्याने पित्याचे नाम प्रगट केले. लोकांमध्ये त्याचे काम पुढे चालू ठेवणारे त्याने एकत्र केले. त्याने म्हटले, “त्यांच्या ठायी माझे गौरव झाले आहे. ह्यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यानी एक व्हावे.” “मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवितात त्यांच्यासाठीही विनंती करितो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.”DAMar 595.3

    ज्याल दिव्य अधिकार आहे त्याच्या भाषेत ख्रिस्ताने निवडलेली मंडळी पित्याला समर्पित केली. अभिषिक्त प्रमुख याजक या नात्याने तो त्याच्या लोकांकरिता मध्यस्थी करितो. विश्वसनिय मेषपाल म्हणून तो त्याचा कळप परात्पराच्या छायेत मजबूत व खात्रीदायक आसऱ्यासाठी एकत्र करितो. त्याच्यासाठी सैतानाचा अखेरचा लढा वाट पाहात असतो आणि त्याला तोंड देण्यासाठी तो जातो.DAMar 596.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents