Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ३७—पहिले सुवार्तिक

    मत्तय १०; मार्क ६:७-११; लूक ९:१-६.

    प्रेषित येशूच्या कुटुंबाचे घटक होते, आणि जेव्हा येशूने गालील प्रदेशातून पायी प्रवास केला तेव्हा ते त्याच्याबरोबर गेले होते, त्याच्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगात व दुःखात ते सहभागी झाले होते. त्याचे उपदेश त्यांनी ऐकले होते, ते देवाच्या पुत्राबरोबर फिरले होते, त्यांच्याशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद केला होता, आणि त्याच्या दररोजच्या मार्गदर्शनाद्वारे मानवाला उन्नत दर्जापर्यंत नेण्यासाठी कसे कार्य करावयाचे याविषयी ते शिकले होते. ज्यावेळी येशू त्याच्या सभोवती जमलेल्या प्रंचड लोकसमुदायाची सेवा करण्यात गर्क असे, त्यावेळी त्याचे शिष्य तो सांगले ते किंवा जे काही बंधनकारक असेल ते करण्यास व त्याचे ओझे हलके करण्यास नेहमीच तत्पर असत. लोकांची व्यवस्था करणे, दुःखीतांना तारणाऱ्याकडे आणणे, सर्वांचे समाधान करण्यात साहाय्य करणे अशा कार्यांत ते त्याला साहाय्य करीत असत. ते आस्थेवाईक लोकाकडे लक्ष पुरवीत असत, त्यांना शास्त्रवचन स्पष्ट करून सांगत असत आणि अनेक प्रकारे ते त्यांच्या आध्यात्मिक फायद्यासाठी कार्य करीत असत. येशूकडून जे काही ते शिकले होते ते शिकवीत असत, त्यामुळे त्याचा अनुभव समृद्ध होत असे. तथापि एकटे कार्य करण्याचा अनुभव घेण्याचे त्यांना आवश्यक होते. म्हणून अजूनही त्यांना अधिक मार्गदर्शनाची मोठ्या धिराची व सौम्यपणाच्या शिक्षणाची गरज होती. चालू घडीला तो जातीने त्यांच्या चुका दाखविण्यासाठी, त्यांना सल्ला देण्यासाठी आणि त्यांची कानउघडणी करण्यासाठी त्यांच्यात असतानाच तारणाऱ्याने त्यांना त्याचे प्रतिनिधी म्हणून पाठविले.DAMar 298.1

    येशूच्या सान्निध्यात असतानासुद्धा, शिष्य अनेक वेळा याजक व परूशी यांच्या शिकवणीमुळे गोंधळून जात असत, परंतु तो सर्व गुंता घेऊन ते येशूकडे जात असत. प्रथा व रूढी यांच्या विरोधात येशूने पवित्र शास्त्रातील सत्य त्यांच्यासमोर ठेवले होते. अशा प्रकारे त्याने देवाच्या वचनावरील त्यांचा भरवसा बळकट केला होता आणि मोठ्या प्रमाणात त्यांना शास्त्राच्या व त्यांच्या परंपरेच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते. शिष्यांच्या प्रशिक्षणात केवळ धर्मतत्त्वाच्या शिकवणीपेक्षा येशूच्या जीवनाचा कित्ता फारच परिणामकारक ठरला होता. जेव्हा ते त्यांच्यापासून विभक्त झाले तेव्हा त्याचा दृष्टीक्षेप, त्याच्या बोलण्याची ढब, आणि त्याचा शब्द हे सर्व त्यांच्यासमोर येऊ लागले. अनेक वेळा, जेव्हा सुवार्तेच्या शत्रूबरोबर झगडताना त्यांनी येशूच्या शब्दांचा पुनरोच्चार केला, तेव्हा त्यांना असे दिसून आले की लोकांवर त्यांचा सुपरिणाम झालेला आहे, आणि त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. DAMar 298.2

    बारा शिष्यांना स्वतःजवळ बोलावून घेऊन, येशूने दोघा दोघांची जोडी करून त्यांना खेडोपाडी व गावोगावी जाण्यास सांगितले. केवळ एकट्याला कोणालाही पाठविले नव्हते. तथापि भावा संगती भाऊ, मित्रासोबत मित्र अशा जोड्या केल्या होत्या. यामुळे ते एकमेकाला मदत करू शकत होते, एकमेकाला सल्ला देऊ शकत होते, प्रोत्साहन देऊ शकत होते. एकमेकाबरोबर प्रार्थना करू शकत होते. कठीण प्रसंगी प्रत्येकजन एकमेकाला आधार होऊ शकत होते. आणि त्यानंतरही येशूने अशाच पद्धतीने सत्तरांना पाठविले. अशा पद्धतीने पाठविण्यामागे तारणाऱ्याचा मुख्य हेतू असा होता की, सुवार्ता सांगणाऱ्या सुवार्तिकाचा परस्पराबरोबर असाच संबंध जोडला जावा. आपल्या आजच्या काळात या पद्धतीचा लक्षपूर्वक अवलंब केला गेला असता तर आपण सुवार्तेच्या कार्यात कितीतरी पटीने यशस्वी झालो असतो.DAMar 299.1

    बाप्तिस्मा करणारा योहान व खुद्द ख्रिस्त यांचा जो संदेश होता तोच शिष्यांचाही होताः “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” नासरेथकर येशू हा मशीहा होता की नाही या वितंडवादात त्यांना पडायचे नव्हते; परंतु जी दयेची सत्कर्मे त्याने केली होती त्याच प्रकारची कामे त्यांना त्याच्या नांवाने करावयाची होती. येशूने त्यांना सांगितले, “रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठ्यांस शुद्ध करा, भूते काढा, तुम्हास फुकट मिळाले आहे, फुकट द्या.”DAMar 299.2

    त्याच्या सेवाकार्याच्या काळात, येशूने उपदेश करण्याऐवजी रोग्याचे रोग बरे करण्यासाठी अधिक काळ अर्पण केला होता. त्याचे चमत्कार, तो मारावयास नाही तर तारावयाला आला या त्याच्या शब्दातील सत्येतेची साक्ष देतात. त्याची उदात्त गुणवता त्याच्यापुढे जात असे, आणि प्रभूचे वैभव त्याच्या पाठीशी राहात असे. जेथे कोठे तो जात असे तेथे तो पोहचण्यापूर्वी त्याच्या चांगुलपणाची वार्ता पोहंचत असे. ज्या भागातून तो प्रवास करीत असे त्या भागातील कृपा पावलेले लोक, त्याचे भोक्ते, रोगमुक्त होऊन सुदृढ अवस्थेत आनंद करीत असत; त्यांना नव्याने लाभलेली शक्ती कसोटीला लावत असत. त्याचा आवाज त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी लोक त्याच्याभोवती गर्दी करीत होते. त्याचे नांव त्यांच्या मुखातून निघालेला पहिलाच शब्द होता, त्याचा चेहरा हा त्यांनी पाहिलेला पहिलाच चेहरा होता. मग त्यांनी येशूवर का प्रेम करू नये. त्याचे गौरव का गाऊ नये? जयजयकार का करू नये? जेव्हा तो शहरा-शहरातून व गांवागांवातून प्रवास करीत असे तेव्हा त्या त्या ठिकाणी जीवन व चैतन्यदायी शक्ती पसरून जात असे.DAMar 299.3

    येशूने ज्या पद्धतीने कार्य केले त्याच पद्धतीने त्याच्या अनुयायांनी केले पाहिजे. आपण भूके कंगाल लोकांना अन्न दिले पाहिजे, उघड्या वाघड्यांना वस्त्रे दिली पाहिजेत, आणि दुःखी व पीडीत लोकांचे सांत्वन केले पाहिजे. त्याचप्रमाणे निराश झालेल्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे आणि हताश झालेल्यांना हर्षित केले पाहिजे. असे केल्यामुळे आपल्याविषयी केलेले, “तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल,’ हे भाकीत पूर्ण होईल. दुष्टांची सुधारणा करण्याचे कार्य, तरवार किंवा न्यायालय यापेक्षा निस्वार्थ सेवेद्वारे प्रगट केलेले येशूचे प्रेम अधिक परिणामकारक होईल. नियमभंग करणाऱ्यांसाठी असे करणे आवश्यक आहे, तथापि दयाळू सेवक (मिशनरी) याहून अधिक काही करू शकतो. शब्द प्रहाराने (दोष काढण्याने) अनेक वेळा अंतःकरण कठीण होते; परंतु ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे ते द्रवून जाते. ख्रिस्त सेवक शारीरिक आजारच केवळ बरे करू शकत नाही, तर तो पाप्याला महान वैद्याकडे नेऊ शकतो. तो वैद्य आत्म्याचा पापरूपी कुष्ठरोग बरा करू शकतो. देवाची योजना अशी आहे की, त्याच्या सेवकाद्वारे, दुखणेकरी, अभागी, भूतबाधा झालेले यांना त्याचा संदेश ऐकविला जावा. त्याच्या मानवजातीच्या हस्तकाकरवी, आजवर जगाने पाहिलेला नाही असा सांत्वनदाता होण्याची तो अपेक्षा बाळगतो.DAMar 300.1

    शिष्यांना त्याच्या सेवेच्या पहिल्या फेरीच्या वेळी फक्त “इस्राएलाच्या घरची जी हरवलेली मेंढरे” होती त्यांच्याकडे जावयाचे होते. यावेळी त्यांनी जर विदेशी किंवा शोमरोनी यांना सुवार्ता सांगितली असती तर यहूदी लोकावरचा त्याचा प्रभाव कमी झाला असता. परूशांच्या प्रतिकूल मताला चेतावनी देऊन त्यांनी त्यांच्या कार्याच्या सुरूवातीलाच त्यांना निराश करू शकणाऱ्या वितंडवादाच्या भोवऱ्यात स्वतःला अडकवून घेतले असते. जगातील सर्व राष्ट्रात सुवार्ता गाजवावयाची होती हे शिष्यांच्यासुद्धा लक्षात येण्यास वेळ लागला होता. ही वस्तुस्थिती त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या लक्षात घेतल्याशिवाय ते इतर धर्मिय लोकांत कार्य करू शकत नव्हते. जर यहूदी लोकांनी सुवार्तेचा स्वीकार केला असता तर त्यांनाच इतर धर्मीय लोकांत त्याचे संदेशवाहक करण्याचा देवाचा उद्देश होता. म्हणून प्रथम त्यांनाच सुवार्ता ऐकविली जावयाची होती.DAMar 300.2

    ख्रिस्ताच्या सर्व कार्य क्षेत्रातील लोक त्यांच्या गरजेबाबत, उणीवेबाबत जागृत होऊन सत्यासाठी भूकेले व तहानेले झाले होते. या उत्कंठित आत्म्यांना त्याच्या प्रीतीविषयीची सुवार्ता सांगण्याचा समय आला होता. अशा प्रकारे विश्वासकांनी ते (शिष्य) देवाकडून नेमण्यात आले होते असे समजून घ्यावयाचे होते, जेव्हा ख्रिस्त त्यांच्यातून घेतला जाणार होता तेव्हा ते शिक्षकाशिवाय राहणार नव्हते हेही त्यांनी समजून घावयाचे होते.DAMar 300.3

    या पहिल्या फेरीच्या वेळी शिष्यांना, येशू त्यांच्यापूर्वी ज्या ठिकाणी गेला होता, आणि त्याने मित्र केले होते, त्याच ठिकाणी जावयाचे होते. त्यांच्या फेरीच्या प्रवासाची तयारी अगदीच साधीसुधी असायची होती. त्यांच्या महान व महत्त्वाच्या कार्यापासून त्यांची मने विचलित करणाऱ्या अगर इतरत्र वळविणाऱ्या, किंवा कोणत्याही प्रकारे विरोधाला प्रज्वलित करून कार्याची दारे बंद करणाऱ्या कोणत्याच गोष्टीला वाव देण्यात येणार नव्हता. त्यांनी त्यांचा पेहराव धर्मगुरूच्या पोषाखासारखा करावयाचा नव्हता, किंवा ते साध्यासुध्या, नम्र ग्रामस्थापासून कोणीतरी वेगळे आहेत असे दाखविणारा वेषही त्यांनी करावयाचा नव्हता. त्यांनी यहूदी लोकांच्या मंदिरात जाऊन तेथे लोक जमा करून सामुदायीक सभा भरवावयाची नव्हती; तर घरोघरी भेटी घेऊन परिश्रमपूर्वक कार्य करावयाचे होते. निरर्थक मान-सन्मान देण्या-घेण्यात त्यांनी वेळ व्यर्थ घालवावयाचा नव्हता, किंवा फक्त जीव रंजविण्यासाठी घरोघरी जाऊन वेळ वाया जाऊ द्यावयाचा नव्हता. तथापि ज्या ठिकाणी योग्य लोक असतील, आणि जे त्यांचा पाहुणचार करताना जसे काही ते ख्रिस्ताचाच पाहुणचार करीत आहेत अशा भावाने पाहुणचार करीत असतील अशाच ठिकाणी त्यांनी पाहुणचाराचा स्वीकार करावयाचा होता. “या घरात शांति असो’ असे मन प्रसन्न करणारे उद्गार उच्चारून त्यांनी घरात प्रवेश करावयाचा होता. त्यांच्या प्रार्थना, उपकारस्तुतीची त्यांची गीते आणि शास्त्रवचनाचा अभ्यास यामुळे त्या घरातील कुटुंब आशीर्वादीत व्हावयाचे होते.DAMar 300.4

    ते शिष्य सत्याचे सुवार्तिक असणार होते, त्यांना त्यांच्या प्रभूच्या येण्याचा मार्ग तयार करावयाचा होता. त्यांना जो संदेश द्यावयाचा होता तो सार्वकालिक जीवनाविषयीचा होता, त्या संदेशाचा स्वीकार किंवा नाकार करण्यावर लोकांचे भवितव्य अवलंबून होते. त्याचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी येशूने शिष्यांना सांगितले “जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही, व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरांतून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झाडून टाका. मी तुम्हास खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा यांच्या प्रवेशाला सोपे जाईल.”DAMar 301.1

    नंतर येशूने त्याची दृष्टी भविष्यकाळावर टाकली; त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांना ज्या विभागात त्याच्याविषयी सुवार्ता सांगावयाची होती ते विस्तीर्ण क्षेत्र त्याला दिसते. त्याची भविष्यात्मक नजर, प्राचीन काळापासून ते थेट त्याच्या द्वित्तियागमनाच्या काळापर्यंतच्या त्याच्या सर्व सेवकाचे अनुभव लक्षात घेते. तो त्याच्या अनुयायाना तोंड द्यावे लागणारे झगडे दाखवितो; तो त्यांना त्या झगड्याचे स्वरूप व योजना उघड करून दाखवितो. तोंड द्यावे लागणारे धोके, आणि करावा लागणारा स्वनाकार तो त्यांना स्पष्ट करतो. अकस्मितपणे सैतानाकडून त्यांच्यावर हल्ला होऊ नये म्हणून त्यांनी त्याची किंमत मोजावी अशी तो अपेक्षा बाळगतो. त्यांचे युद्ध हे रक्तमांसाबरोबर नाही, “तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्मासमूह ह्याबरोबर आहे.” इफिस. ६:१२. त्यांना जगातील महासत्तेबरोबर युद्ध करावयाचे आहे, तथापि त्यांना स्वर्गीय मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या मदतीत स्वर्गातील सर्व बुद्धिवंत सैन्यदलाचा समावेश आहे. ते सर्वजन देवदूतापेक्षा वरच्या दर्जाचे आहेत. प्रभूच्या देवदूताच्या पुढाऱ्यांचा प्रतिनिधी, पवित्र आत्मा, युद्धात मार्गदर्शन करण्यासाठी खाली येणार आहे. आपल्यात अनेक दुर्बलता असतील, आपली पापे भयंकर स्वरूपाची असतील, चुका उग्र स्वरूपाच्या असतील; परंतु जे अनुतप्त अंतःकरणाने देवाच्या दयेचा, शोध करतात त्या सर्वांसाठी ती उपलब्ध आहे.DAMar 301.2

    येशू म्हणाला, “पाहा, लांडग्यामध्ये मेंढरास तसे मी तुम्हास पाठवितो; यास्तव तुम्ही सापासारिखे चतुर व कबुतरासारिखे साळसूद व्हा.’ ख्रिस्ताने स्वतःहून सत्याचा एकही शब्द दाबून टाकला नव्हता; परंतु तो प्रत्येक शब्द नेहमीच अगदी प्रेमाने उच्चारत असे. लोकांबरोबर बोलताना, त्याने मोठे कौशल्य, कल्पकता, सहृदय लक्ष यांचा उपयोग केला. तो कधीच उद्घट वागला नाही, विनाकारण निष्ठूरपणे बोलला नाही, हळव्या माणसाला निष्कारण त्याने कधीच मानसिक दुःख दिले नाही. त्याने मानवी दौर्बल्याची निंदा केली नाही. त्याने ढोंगीपणा, अविश्वास व अनीती यावर निर्भिडपणे प्रखर हल्ला चढविला, परंतु तशा प्रकारचे खरमरीत भाष्य करताना त्याच्या डोळ्यात अश्रूयेत असत. त्याला प्रिय असलेल्या, परंतु जो मार्ग सत्य व जीवन होता त्याचा स्वीकार करण्यास नकार दिलेल्या यरुशलेमासाठी तो रडला. त्यांनी त्याचा म्हणजे तारणाऱ्याचा अव्हेर केला, तरीसुद्धा त्याने त्यांना इतक्या वात्सल्यमय व तीव्र दुःखीत अंतःकरणाने वागविले की त्यामुळे त्याचे अंतःकरण फुटले. त्याच्या दृष्टीने प्रत्येक आत्मा मोलवान होता. त्याने स्वतः नेहमीच दैवी मोठेपणा धारण केला होता, तरी तो देवाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबरोबर नम्रपणे आदरबुद्धीने वागत असे. ज्याचे तारण करणे त्याचे काम होते, असा आत्मा त्याला सर्व पतित मानवात दिसला होता.DAMar 302.1

    ख्रिस्ताच्या सेवकांनी नैसर्गिक (मानवी) मनाच्या हुकूमावरून कृती करू नये. त्यांनी देवाबरोबर अगदी आपुलकीचा सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर चेथावणीमुळे मीपणा जागा होतो, मग ते न शोभेल अशा शब्दांचा भडिमार करतात. ते शब्द कोमेजून गेलेल्या रोपाना टवटवी आणणारे दंव बिंदू किंवा पावसाच्या सरी नसतात. त्यांनी असेच करावे अशी सैतानाची इच्छा आहे; कारण ह्या पद्धती त्याच्या आहेत. रागावणारा अजगर होता. क्रोध व दोषारोप करणे याद्वारे प्रगट केलेली वृत्ती ही सैतानी वृत्ती आहे. परंतु देवाच्या सेवकांनी त्याचे प्रतिनिधी असले पाहिजे. जे सत्य त्याची प्रतिमा व त्याची मुद्रा धारण करते, त्या स्वर्गीय चलनाप्रमाणे त्यांनी व्यवहार करावा अशी तो त्यांच्याकडून अपेक्षा करतो. ज्या सामर्थ्याद्वारे त्यांना सैतानावर विजय मिळवावयाचा आहे ते ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे. ख्रिस्ताचे गौरव हे त्यांचे बळ आहे. ख्रिस्ताच्या सुंदर-प्रसन्न चेहऱ्यावर त्यानी त्यांची दृष्टी एकाग्र केली पाहिजे. तरच ते दैवी कौशल्याने व सौजन्याने सुवार्ता गाजवू शकतील. प्रक्षुब्ध परिस्थितीत लीनता धारण केलेली वृती सत्याविषयी कोणत्याही वादविवादापेक्षा अधिक परिणामकारक भाष्य करू शकते.DAMar 302.2

    सत्याच्या शत्रूबरोबर झगडा करण्यासाठी ज्यांना आणलेले असते त्यांना केवळ मानवाशीच मुकाबला करावयाचा नसतो, तर सैतान व त्याचे हस्तक यांच्याशीही करावा लागतो. त्यांना ख्रिस्ताचे, “पाहा लांडग्यामध्ये कोकरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवितो’ हे शब्द लक्षांत ठेवू द्या. लूक १०:३. त्यांना देवाच्या प्रीतिवर विसंबून राहू द्या. अशाने व्यक्तीवाचक गैरवर्तनाच्या वेळीसुद्धा त्यांचा आत्मा शांतीत राहील. देव त्यांच्या अंगावर दिव्य चिलखत चढवील. त्याचा पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणावर व मनावर प्रभाव पाडील, यासाठी की त्यांचे शब्द कोल्हेकुईमध्ये मिसळून जाणार नाहीत.DAMar 303.1

    शिष्यांना मार्गदर्शन करण्याचे काम पुढे चालू ठेवताना ख्रिस्त म्हणाला, “मनुष्याविषयी जपा.’ जे देवाला ओळखीत नव्हते त्यांच्यावर त्याच्या शिष्यांनी निखालस श्रद्धा ठेवावयाची नव्हती, आणि त्यांनी त्यांच्याकडून सल्ला मसलत घ्यावयाची नव्हती; अशाने सैतानाच्या हस्तकाना सुसंधि मिळाली असती. मानवाचे नवे शोध देवाच्या योजनाच्या विरूद्ध कार्य करतात. ज्यांना प्रभूचे मंदिर बांधावयाचे आहे, त्यांनी पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे, दैवी नमुन्यासदृश्य बांधावे. जे लोक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालत नाहीत, त्यांच्याकडून जेव्हा त्याचे (देवाचे) सेवक त्यांच्या सल्ल्यावर विसंबून राहातात तेव्हा देवाचा अवमान होतो व सुवार्तेचा विश्वासघात होतो. देवाला जगिक ज्ञान मूर्खपणाचे आहे. त्यावर जे विसंबून राहातात, भरवसा ठेवतात, ते खचीत चूक करतात.DAMar 303.2

    “ते तुम्हास न्यायसभाच्या स्वाधीन करतील... आणि देशाधिकारी व राजे यांस व विदेश्यास साक्ष पटावी म्हणून तुम्हास त्याजपुढे माझ्यामुळे नेतील.’ मत्तय १०:१७, १८. छळामुळे प्रकाश पसरेल. ख्रिस्ताच्या सेवकांना जगाच्या अधिकाऱ्यापुढे नेले जाईल, आणि असे झाले नाही तर त्यांना सुवार्ता कधीच ऐकावयास मिळणार नाही. या लोकांना विपरीत प्रकारे सत्य सांगण्यात येते. ख्रिस्ताच्या शिष्यांच्या विश्वासाविषयी त्यांनी चुकीचे आरोप ऐकलेले असतात. अनेक वेळा अशा आरोपाचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी त्यांच्यासाठी एकमेव साधन म्हणजे त्यांनी त्यांच्या विश्वासाच्या चौकशीच्यावेळी दिलेली साक्ष होय. चौकशीच्या वेळी त्यांनी प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक असते, आणि त्यांच्या न्यायाधिशानी त्यांनी दिलेली साक्ष ऐकून घेणे आवश्यक असते. आणिबाणीच्या प्रसंगी तोंड देण्यास देवाच्या सेवकांना देवाची मदत पुरवण्यात येते. येशू म्हणतो, “तुम्ही काय बोलावे याची त्याच घटकेस तुम्हास प्रेरणा होईल. बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या बापाचा आत्मा हाच तुम्हामध्ये बोलणारा आहे.” जेव्हा देवाचा आत्मा त्याच्या सेवकांची मने प्रकाशित करतो तेव्हा सत्य, त्याचे दैवी सामर्थ्य व सौंदर्य यांच्यानिशी सादर केले जाते. जे सत्याचा अव्हेर करतात ते शिष्यावर दोषारोप करतात आणि त्यांना अन्यायाने वागवितात. तथापि नुकसान झाले, किंवा संकटे कोसळली, किंवा मरणसुद्धा ओढवले, तरीसुद्धा देवाच्या लोकांनी त्यांच्या दैवी लीनतेचा नमुना प्रगट केला पाहिजे. अशा प्रकारे सैतानाचे हस्तक व ख्रिस्ताचे प्रतिनिधी यांच्यातील फरक दिसून येईल, आणि जगिक अधिकारी व लोक यांच्यापुढे तारणारा उंचावला जाईल.DAMar 303.3

    अशा प्रकारच्या ध्यैर्याची उणीव होती तोपर्यंत धर्मवीराचे अवसान आणि सहनशक्ती ही शिष्यांना देण्यात आली नव्हती. परंतु लोक व योहान यांनी जेव्हा सान्हेद्रिन धर्मसभेपुढे साक्ष दिली तेव्हा लोकांनी ते “अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून आश्चर्य केले.” स्तेफनाविषयी असे लिहिले आहे की, “धर्मसभेत बसलेले सर्व त्याजकडे निरखून पाहत असता त्यांस त्याचे मुख देवदूतासारिखे दिसले.” “तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलला त्यास त्यांच्याने तोंड देववेना.’ प्रेषित. ६:१५, १०. कैसराच्या कोर्टात साक्ष देतांना पौलाने स्वतःच्या चौकशीविषयी असे लिहिले आहे की, “माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या पक्षाचा कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडिले... तरी प्रभु माझ्या पक्षाचा होता; मजकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व विदेशी लोकांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि सिंहाच्या मुखांतून सोडविले.” २ तिमथ्य. ४:१६, १७.DAMar 304.1

    देवाच्या सेवकांना जेव्हा चौकशीसाठी आणण्यात यावयाचे होते तेव्हा त्यांनी साक्ष देण्यासाठी म्हणून कोणत्याच प्रकारच्या ठराविक भाषणाची तयारी ठेवावयाची नव्हती. प्रतिदिनी देवाच्या वचनाविषयीच्या मौल्यवान सत्यतेची साठवण, आणि त्यांचा विश्वास बळकट व्हावा म्हणून प्रार्थना याद्वारे त्यांनी तयारी ठेवावयाची होती. जेव्हा त्यांची चौकशीची साक्ष घेण्यात येत असे तेव्हा पवित्र आत्मा त्यांना आवश्यक सत्यतेची आठवण करून देत असे.DAMar 304.2

    देवाची व त्याने पाठविलेल्या येशू ख्रिस्ताची ओळख करून घेण्याद्वारे आत्म्याला सामर्थ्य व कार्यक्षमता मिळू शकते. पावित्र वचनाचा मनापासून अभ्यास करण्याद्वारे मिळविलेले ज्ञान समयोचित वेळी लक्षात येऊ शकते. परंतु जर कोणी ख्रिस्ताच्या वचनाचा परिचय करून घेण्यास दुर्लक्ष केले असेल आणि त्यांच्या संकटाच्यावेळी त्यांनी कधीच त्याच्या कृपेच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला नसेल तर त्यांना पवित्र आत्मा त्याच्या वचनाची आठवण करून देईल अशी आशा त्यांनी बाळगू नये. प्रतिदिनी त्यांनी एकनिष्ठेने देवाची सेवा करायला हवी होती आणि मगच त्यांनी त्याच्यावर श्रद्धा ठेवायला हवी होती.DAMar 304.3

    सुवार्तेविरूद्ध इतके कटू वैमनस्य असेल की त्याद्वारे या पृथ्वीवरील अत्यंत मायेची नाती तुटली जातील. ख्रिस्ताच्या शिष्यांना त्याच्या घरच्या माणसाद्वारेच विश्वासघाताने ठार मारतील. येशूने सांगितले की, “माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील, तरी शेवटपर्यंत टिकून राहणाराच तेवढा तरेल.” मार्क १३:१३. परंतु छळ होईल असे स्वतःहून काहीच निरर्थक ‘कार्य’ करू नये असे त्याने शिष्यांना सांगितले. तो स्वतः त्याचा प्राण घेणाऱ्या लोकापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अनेक वेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे. जेव्हा नाझरेथमध्ये त्याला नाकारण्यात आले होते आणि त्याच्या गांवकऱ्यानीच त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो कपर्णहमला गेला. त्याठिकाणी तेथील लोक त्याच्या शिकवणीमुळे थक्क झाले; “कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.’ लूक ४:३२. त्याचप्रमाणे त्याच्या सेवकांनी छळामुळे निराश व्हावयाचे नव्हते, तर लोकांच्या तारणासाठी कार्य करता येईल असे दुसरे ठिकाण शोधून काढायचे होते.DAMar 304.4

    गूरूपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. स्वर्गाच्या राजपुत्राला बालजबूब संबोधण्यात आले होते. अगदी त्याचप्रमाणे शिष्याचाही अप्रस्तुत नामोल्लेख केला जाईल. परंतु कसलाही धोका असला तरी ख्रिस्ताच्या अनुयायानी त्यांची तत्वे उघडपणे बोलून दाखविली पाहिजेत. त्यानी खरी गोष्ट लपवून ठेवणे तुच्छ मानले पाहिजे. सत्य स्वीकारण्याबाबत, संरक्षण मिळेपर्यंत ते वचनबद्ध न होता अलिप्त राहू शकत नाहीत. लोकांना त्यांच्यावर येणाऱ्या धोक्याचा इशारा देण्यासाठी त्यांना रखवालदार म्हणून नेमण्यात आले आहे. ख्रिस्तापासून मिळालेले सत्य सर्वांना जाहीरपणे व उघडपणे दिले पाहिजे. येशू म्हणाला, “जे मी तुम्हाशी अंधारात बोलतो ते उजेडात सांगा, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून गाजवा.”DAMar 305.1

    येशूने तडजोड करून शांती खरेदी केली नाही. सर्व मानवजातीसाठी त्याचे अंतःकरण प्रीतीने पुरेपूर भरले होते, तथापि त्याने त्यांच्या पापाला कधीच गोजारले नव्हते. त्याने जे आत्मे त्याच्या रक्ताने खरेदी केले होते - ते आत्मे त्याचा नाश करणाऱ्या मार्गाच्या मागे लागले होते, तेव्हा तो स्तब्ध राहन खऱ्या मित्रपेक्षाही अधिक जबाबदारीने वागला. मानवाने स्वतःशी प्रामाणिक राहावे, त्याच्या उच्च व सार्वकालिक निष्ठेशी प्रामाणिक असावे यासाठी त्याने श्रम उपसले. ख्रिस्ताच्या सेवकांना तेच कार्य करण्यासाठी पाचारण केलेले आहे, त्यांनी सावधगिराने राहिले पाहिजे, नाहीतर बेबनावाला रोखण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात ते स्वतःच सत्यापासून वंचित होतील, सत्य गमावून बसतील. त्यांनी “जेणकरून शांति... होईल अशा गोष्टीच्या मागे... लागावे.” रोम १४:१९. तथापि सत्य तत्त्वांना तिलांजली देऊन किंवा अस्सल तत्त्वासाठी तडजोड करून अस्सल शांति कधीच साध्य करता येत नाही. परंतु विरोधाला जागृत केल्याशिवाय कोणत्याही मनुष्याला तत्त्वाशी एकनिष्ठ राहता येणे शक्य नाही. एकनिष्ठ राहू शकत नाही. आध्यात्मिक स्वरूपाच्या ख्रिस्तीत्वाला (ख्रिस्ती धर्माला) आज्ञाभंजकाच्या संततीकडून विरोध केला जाईल परंतु त्याबाबत ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला, “जे शरीराला वधितात, पण आत्म्याला वधावयास समर्थ नाहीत त्यास भिऊ नका.’ जे देवाबरोबर एकनिष्ठ आहेत, त्यानी मानवी सत्तेला (अधिकाऱ्यांना) किंवा सैतानाच्या वैमनश्याला भिण्याची गरज नाही. ख्रिस्तामध्ये त्याचे सार्वकालिक जीवन अबाधित आहे. ज्या सत्यामुळे देवाने त्यांना सन्मानित केले त्या सत्याचा त्यांच्याकडून त्याग केला जाऊ नये आणि त्या सत्याचा त्यांच्याकडून विश्वासघात होऊ नये याचीच त्यांनी केवळ भीती बाळगावी.DAMar 305.2

    मानवाच्या अंतःकरणात संशय कल्लोळ माजविणे हा सैतानाचा उद्योग आहे. देव हा एक कठोर न्यायाधीश असे समजण्यास तो लोकांना प्रवृत करतो. प्रथम तो त्यांना पाप करण्याच्या मोहात पाडतो व नंतर ते त्यांच्या स्वर्गीय पित्यासमीप जाण्यास किंवा त्याची दया स्वीकारण्यास ते अगदीच अधम आहेत असे त्यांना भासवितो. हे सर्व सैतानी उपद्व्याप परमेश्वर समजून घेतो. येशू त्याच्या शिष्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी व दुर्बलपणात देवाच्या सहानुभूतीची शाश्वती देतो. दुःखाचा एकही सुस्कार, पिडा देणारी एकही वेदना, अंतःकरण घायाळ करणारा एकही शोक असा नाही की ज्यामुळे पित्याचे अंतःकरण कंपायमान झाल्यावाचून राहत नाही.DAMar 306.1

    पवित्र शास्त्र देव त्याच्या उच्च पवित्र स्थानी निष्क्रिय, शांत व निवान्त अवस्थेत असलेला देव प्रगट करीत नाही, तर त्याच्या इच्छेनुसार करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व अब्जावदी स्वर्गीय देवदूतांच्या समावेत असलेल्या देवाला प्रदर्शित करते. तो त्याच्या राज्यक्षेत्रातील सर्व भागाबरोबर, आपल्याला न दिसणाऱ्या मार्गामार्फत दळणवळणाचे त्याचे कार्य करतो. परंतु या जगातील ज्या पापी लोकांच्या तारणासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला त्या जगावर त्याची आस्था व सर्व स्वर्गाची आस्था केंद्रित झाली आहे. जुलूमाखाली दडपून गेलेल्या आत्म्याचा आक्रोश ऐकून घेण्यासाठी देव त्याच्या राजासनावरून लक्ष पुरवतो. प्रत्येक प्रामाणिक प्रार्थनेचे तो उत्तर देतो, “हा मी आहे” असे तो म्हणतो. विपत्तीत सापडलेल्या प्रत्येकाला तो आधार देतो, छळामुळे दबून गेलेल्या प्रत्येकाला तो उचलून धरतो. आमच्या दुःखाच्या त्याला वेदना होतात. प्रत्येक मोहावर विजय मिळविण्यासाठी व संकटातून आमची सुटका करण्यासाठी त्याचा दूत आमच्या समीप असतो.DAMar 306.2

    पित्याच्या आज्ञेशिवाय एकही चिमणी भूमीवर पडत नाही. देवाविषयी सैतानाच्या मनात असलेला द्वेष, तिटकारा त्याला तारणाऱ्याच्या प्रत्येक व्यक्तीचा द्वेष करण्यास प्रेरित करतो. तो देव निर्मित प्रत्येक गोष्ट कलंकित करतो, तो मुक्या प्राण्याचा नाश करण्यात आनंद मानतो. केवळ देवाच्या संरक्षक कृपेमुळे त्यांच्या मंजूळ आवाजाने आमची अंतःकरणे आनंदीत करण्यासाठी सर्व पक्षी सुरक्षीत राहिले आहेत. तो एकही चिमुकल्या चिमणीला विसरत नाही. “यास्तव भिऊ नका; बहुत चिमण्याहून तुमचे मोल अधिक आहे.”DAMar 306.3

    येशू पुढे म्हणतो की, जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारील त्याला मीही आपल्या पित्यासमोर व पवित्र देवदूतासमोर स्वीकारीन. या जगात तुम्ही माझे साक्षीदार व या जगाला माझी आरोग्यदायी कृपा पुरविणारे माध्यम आहात. म्हणून मी तुमचा स्वर्गातील प्रतिनिधी असेन. पिता तुमच्या कलंकित शीलाकडे पाहात नाही, तर तो तुम्हाला माझ्या पूर्णतेने वेष्टिलेले असे पाहील. माझ्याद्वारेच तुम्हाला स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त होतील आणि पाप्यासाठी मी केलेल्या अर्पणाची सुवार्ता सांगण्याने जे माझा स्वीकार करतात, त्यांचा तारलेल्या लोकांच्या आनंदातील व गौरवातील भागीदार म्हणून स्वीकार केला जाईल.DAMar 307.1

    जो कोणी ख्रिस्ताचा स्वीकार करीतो, त्याच्या ठायी ख्रिस्ताचा निवास असला पाहिजे. त्याला जे प्राप्त झालेले नाही, ते तो इतरांना देऊ शकत नाही. ख्रिस्ताचे शिष्य धर्मतत्त्वाविषयी अस्खलितपणे बोलू शकतील, ते खुद्द ख्रिस्ताचे शब्द जसेच्या तसे तोंडपाठ बोलून दाखवू शकतील, परंतु त्यांनी ख्रिस्तवत लीनता व प्रीति धारण केली नसेल तर त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे असे मुळीच होत नाही. ख्रिस्ताविरोधी प्रवृत्ती ख्रिस्ताचा नाकार करते. लोक, निंदा करण्याद्वारे, मूर्खपणाचे भाष्य करण्याद्वारे, असत्य किंवा निर्दयपणाचे शब्द उच्चारण्याद्वारे ख्रिस्ताचा नाकार करू शकतात. ते जीवनातील जबाबदारीचे ओझे टाळून, पापी लालसेचा पाठलाग करून ख्रिस्ताचा स्वीकार करणे नाकारू शकतात. ते जगाबरोबर एकरूप होऊन, असभ्य वर्तन करून, स्वमताचा अभिमान बाळगून, आत्मसमर्थन करून, संशयी वृत्ती धारण करून आणि अंधकारात राहून ख्रिस्ताचा नाकार करू शकतात. या सर्व प्रकाराद्वारे ते असे जाहीर करतात की ख्रिस्त त्यांच्यात निवास करीत नाही आणि म्हणून तो म्हणाला, “जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.”DAMar 307.2

    सुवार्तेबरोबरच्या शत्रूत्वावर विजय मिळेल, आणि कालान्तराने तिच्याबरोबरचा विरोध नाहीसा होईल अशी त्यांनी आशा बाळगू नये असे तारणाऱ्याने त्याच्या शिष्यांना सांगितले. तो म्हणाला, “मी शांतता नव्हे, तर तरवार चालवावयास आलो आहे.” अर्थात ही अशी निर्माण होणारी झगड्याची परिस्थिती म्हणजे सुवार्तेचा परिणाम नव्हे, तर तिला विरोध केल्यामुळे मिळणारे प्रतिफळ आहे. सर्व झगड्यामध्ये कुटुंबातील वितंडवाद, व स्नेहभावाचा अभाव असलेला झगडा हा सहन करण्यास कठीण असलेला झगडा आहे. तथापि येशू प्रतिपादन करतो, “जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीति करितो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलग्यावर किंवा मुलीवर अधिक प्रीति करितो तो मला योग्य नाही, आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही.”DAMar 307.3

    ख्रिस्ताच्या सेवकाचे कार्य हे अति सन्मान्य व पवित्र कार्य आहे. तो म्हणतो, “जो तुम्हास स्वीकारितो तो मला स्वीकारितो, आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो.” त्याच्या नावाने त्यांना दाखविलेली प्रेमाळूपणाची कोणतीही कृती मान्यता पावण्यास व बक्षिसपात्र ठरण्यास चुकणार नाही. अगदी त्याच मायाळू भावनेने तो देवाच्या कुटुंबातील अति दुर्बल व विनम्र यांचा त्याच्या मान्यतेमध्ये समावेश करतोः “ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून तो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळालाDAMar 307.4

    मुकणार नाही.”DAMar 308.1

    अशा प्रकारे तारणाऱ्याने त्याचे मार्गदर्शनवर शिक्षण देण्याचा समोरोप केला. आणि जसा तो “दीनास सुवार्ता सांगण्यास... धरून नेलेल्याची सुटका व अंधळ्यास दृष्टी ही विदित करावयास, ठेचलेल्यास मोकळे करावयास, गेला होता, तसे ते निवडलेले बाराजन गेले. लूक ४:१८, १९.DAMar 308.2