Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ४४—खरे चिन्ह

    मत्तय १५:२९-३९; १६:१-१२; मार्क ७:३१-३७; ८:१-२१.

    “नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापली प्रांतातून गालील समुद्राकडे परत आला.” मार्क ७:३१.DAMar 350.1

    दकापली भागातच अशुद्ध आत्मा लागलेल्या गरसेकर येथील माणसाला बरे केले होते. येथे डुकरांची वाताहात झाल्यामुळे लोकांनी ते ठिकाण सोडून जाण्यास सांगितले होते. परंतु पाठीमागे त्याने आपला संदेशवाहक ठेविला होता आणि त्याचे ऐकून त्याला पुन्हा पाहाण्यास ते फार उत्सूक होते. त्या भागात तो पुन्हा आल्यावर मोठा लोकसमूदाय त्याच्याभोवती जमला आणि एक बहिरा आणि तोतरा मनुष्य त्याच्याकडे आणिला. त्याच्या प्रघाताप्रमाणे येशूने त्याला आपल्या केवळ शब्दाने बरे केले नाही. त्याला लोकापासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि त्याच्या जीभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून सत्य ऐकण्यास त्याचे कान अजून तयार नाहीत आणि जीभेने उद्धारकाला ओळखण्यास नकार दिला म्हणून त्याने उसासा टाकिला. “मोकळा हो” ह्या शब्दाने त्या माणसाची वाणी पूर्ववत झाली. हे कोणाला सांगू नको असे निक्षूण सांगितले असतानासुद्धा बरे झाल्याची कथा त्याने जाहीर केली. DAMar 350.2

    नंतर येशू डोंगरावर गेला आणि तेथे लोकांच्या झुंडी त्याच्याभोवती जमा झाल्या. त्यांच्याबरोबर त्यांनी आजारी, लंगडे आणिले आणि त्याच्या चरणाजवळ ठेविले. त्या सर्वांना त्याने बरे केले आणि त्या असंस्कृत मूर्तिपूजक लोकांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले. तीन दिवस ते एकसारखे ख्रिस्ताभोवती घोळका करीत होते. रात्री ते उघडण्यावर झोपत असे आणि दिवसा उत्कंठतेने त्याचे वचन ऐकत असे व केलेले काम पाहात असे. तीन दिवसाच्या अखेरीस त्यांचे सर्व खाद्य पदार्थ संपले होते. येशू त्यांना न जेवता पाठवून देणार नव्हता. त्यांना जेवण देण्यास त्याने शिष्यांना सांगितले. पुन्हा शिष्यांनी आपला अविश्वास प्रगट केला. बेथसैदा या ठिकाणी ख्रिस्ताच्या कृपाप्रसादाने मोठ्या समुदायाला कसे जेवण पुरविण्यात आले होते हे त्यांनी पाहिले होते. त्यांनी ते सर्व आपल्याबरोबर आणिले नव्हते, ख्रिस्ताच्या आशीर्वादाने ते सर्वांना पुरे झाले होते. बेथसैदा येथे जेवणारे यहूदी होते; आणि हे हेल्लेणी आणि असंस्कृत मूर्तिपूजक होते. यहूद्यांची दुराग्रह वृत्ती शिष्यांच्या अंतःकरणात अजून जोरदार होती, आणि त्यांनी येशूला उत्तर दिले, “एवढा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कोठून असणार?” तरी त्याचे ऐकून त्यांच्याजवळ असलेल्या सात भाकरी आणि दोन मासळी आणिल्या. लोकसमुदाय जेवून तृप्त झाला आणि उरलेल्या तुकड्यांनी सात मोठ्या टोपल्या भरल्या. स्त्रिया व मुले सोडून जेवणारे चार हजार पुरुष होते. त्यानंतर येशूने त्यांना आनंदाने उपकृत करून पाठविले.DAMar 350.3

    नंतर येशू आपल्या शिष्यासहित बोटीने गनेसरत पठाराच्या दक्षिणेस असलेले सरोवर ओलांडले. सोर आणि सिदोन यांच्या सरहद्दीवर सुरफुनीकी बाईच्या विश्वासाने येशूला हुशारी वाटली. दकापलीस येथील मूर्तिपूजक लोकांनी त्याचे आनंदाने स्वागत केले. आता पुन्हा तो गालीली प्रांतात उतरला. ह्या ठिकाणी त्याचे सामर्थ्य लक्षात भरेल ह्या रीतीने प्रगट करण्यात आले होते, बहुतेक दयेची कामे येथे उरकण्यात आली होती आणि प्रबोधनही करण्यात आले होते. परंतु आता त्याच्यावर तिरस्कारयुक्त अश्रद्धा दाखविली.DAMar 351.1

    परूश्यांच्या प्रतिनिधीमंडळात धनवान, उच्च सदूकी, याजकीय पक्ष, नास्तिक वादी आणि राष्टातील अमीर उमरावांचे प्रतिनिधी सामील झाले होते. दोन पंथ कट्टर वैरी होते. आपला दर्जा आणि अधिकार अभंग राखण्यासाठी सदूकी लोकांनी राज्यकारभार चालविणाऱ्या पक्षाचा सदभाव मिळविला. उलट पक्षी रोमी सरकाराविरूद्ध परूश्यांनी द्वेष बुद्धी बाळगिली, आणि त्यांचे जू केव्हा धुडकावण्यात येईल याची अपेक्षा केली. परंतु परूशी आणि सदूकी ख्रिस्ताच्या विरूद्ध एकत्र आले. सारख्याला सारखेच मिळते; आणि वाईट चांगल्याच्या नाशासाठी वाईटाशी संगनमत करिते.DAMar 351.2

    आता परूशी व सदूकी यांनी येऊन आम्हास आकाशातून काही चिन्ह दाखवावे अशी येशूकडे मागणी केली. यहोशवाच्या काळात इस्राएल लोक अमोरी लोकाशी बेथहोरेन येथे लढा देत असतांना विजय प्रात होईपर्यंत पुढाऱ्याच्या हुकुमाप्रमाणे सूर्य स्थिर राहिला होता आणि त्यांच्या इतिहासात अशाच प्रकारची अनेक अद्भुते घडली होती. तशा प्रकारचे अद्भुत कृत्य येशूने करावे अशी त्यांची मागणी होती. परंतु यहूद्यांना अशा चिन्हांची आवश्यकता नव्हती. केवळ बाह्यात्कारी पुराव्यांना त्यांना लाभ होणार नव्हता. त्यांना बौद्धीक ज्ञानप्रकाशाची गरज नव्हती तर आधात्मिक सुधारणेची होती.DAMar 351.3

    येशूने म्हटले, “अहो, ढोंग्यानो, आभाळाकडे पाहून तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, हवामान सांगता येते, पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखिता येत नाहीत काय?” ख्रिस्ताचे स्वतःचे शब्द पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उच्चारण्यात आले होते आणि त्याद्वारे त्यांना त्यांच्या पापाची जाणीव करून देण्यात आली होती. त्यांच्या तारणासाठी देवाने दिलेले हे चिन्ह होते. ख्रिस्ताचे सेवाकार्य सिद्ध करण्यासाठी हे चिन्ह स्वर्गातून देण्यात आले होते. मेंढपाळांच्यासाठी देवदूतांनी गाईलेले गीत, मागी लोकांना मार्गदर्शन करणारा तारा, आणि त्याच्या बाप्तिस्म्याच्या समयी त्याच्यावर आलेला कबुतरासारखा पवित्र आत्मा आणि त्याच वेळी स्वर्गातून झालेली वाणी, ही सर्व त्याची साक्ष होती.DAMar 351.4

    “तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते?” “ह्या पिढीला योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.” योना जसा माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता तसेच ख्रिस्त “भूमिच्या पोटात’ तितकी वेळ राहाणार होता. योनाचा उपदेश निनवे लोकासाठी होता तसेच ख्रिस्ताचा उपदेश त्याच्या पिढीसाठी चिन्ह होता. परंतु त्याच्या वचनाचे स्वागत करण्यात किती तफावत दिसत होती! देवाची इशाऱ्याची वाणी ऐकून बड्या मूर्तिपूजक शहरातील लोक थरथर कापत होते. राजे आणि सरदार विनम्र झाले आणि उच्च व निच सर्वांनी मिळून स्वर्गीय देवाजवळ विनवणी केली, त्याची करुणा त्यांना प्राप्त झाली. ख्रिस्ताने म्हटले, “निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून इला दोषी ठरवितील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.” मत्तय १२:४०, ४१.DAMar 352.1

    ख्रिस्ताने केलेला प्रत्येक चमत्कार त्याच्या देवत्वाचे चिन्ह होता. मशीहाविषयी भाकीत केलेले काम तो करीत होता; परंतु ही करुणेची कार्ये परूश्यांना मोठा गुन्हा वाटत होता. यहूदी पुढारी मनुष्यांच्या दु:खाकडे निर्दयतेने पाहात होते. पुष्कळ बाबतीत त्यांचा स्वार्थ, छळ आणि जुलूम ह्यांच्यामुळे पीडा, क्लेश झाला होता आणि ख्रिस्ताने त्यांतून मुक्त केले होते. अशा रितीने त्याच्या चमत्कारांनी त्यांना दूषण दिले होते.DAMar 352.2

    ज्या कार्यामुळे यहूद्यांनी ख्रिस्ताचा नाकार केला ते त्याच्या देवत्वाचा सर्वश्रेष्ठ पुरावा होता. त्याच्या चमत्कारांचे महत्त्व म्हणजे ते मानवतेच्या कल्याणासाठी होते. तो देवापासून आलेला आहे याचा पुरावा हा आहे की त्याच्या जीवनामध्ये त्याने देवाचा शीलस्वभाव प्रगट केला. त्याने देवाचे कार्य केले आणि देवाचे वचन सांगितले. अशा प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे.DAMar 352.3

    सद्या जेव्हा सत्य संदेश सादर करण्यात येतो तेव्हा यहूद्यासारखे चिन्ह मागणारे अनेकजन आहेत. आमच्यासाठी चमत्कार करा. परूश्यांच्या मागणीप्रमाणे ख्रिस्ताने चमत्कार केला नव्हता. सैतानाच्या अप्रत्यक्ष सूचनेप्रमाणे त्याने अरण्यामध्ये चमत्कार केला नव्हता. स्वतःच्या समर्थनार्थ किंवा अश्रद्धा आणि अंहकार यांची मागणी पुरी करण्यास तो आम्हाला शक्ती देत नाही. परंतु सुवार्ता दैवी मूळ चिन्हाशिवाय नाही. सैतानाचे दास्यत्व झुगारून देणे हा चमत्कार नाही काय? सैतानाबरोबर वैर करणे हे मनुष्याला स्वाभाविक नाही; ते देवाच्या कृपेने मनात बिंबविलेले असते. जेव्हा एकाद्या हट्टी स्वच्छंदी मनुष्याला मुक्त करण्यात येते आणि देवाच्या स्वर्गीय प्रतिनिधीला तो अंतःकरणपूर्वक शरण जातो तेव्हा चमत्कार घडतो, तसेच एकाद्या व्यक्तीला पक्क्या संभ्रमणाखाली असताना नैतिक सत्य समजून येते तेव्हा चमत्कार घडतो. जेव्हा एकाद्या व्यक्तीच्या मनाचे परिवर्तन होते आणि ती देवाच्या आज्ञा पाळते व त्याच्यावर प्रेम करण्यास शिकते तेव्हा देवाचे अभिवचन पूर्ण होते. “मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन.” यहज्के. ३६:२६. मनुष्याच्या अंतःकरणातील बदल, मानवी स्वभावातील परिवर्तन हा चमत्कार असून त्याद्वारे आत्म्यांची मुक्तता करणाऱ्या उद्धारकाचे प्रगटीकरण करिते. देवाच्या वचनाची घोषणा करताना पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने श्रोतेजनांच्या जीवनात आध्यात्मिक नवचैतन्य प्राप्त होते. देवपुत्राच्या दिव्य कार्याची ही जगासमोर दिलेली देवाची साक्ष आहे.DAMar 352.4

    येशूपासून चिन्ह मागणाऱ्यांचे अंतःकरण अश्रद्धेने इतके कठोर झाले होते की त्यांना त्याच्या स्वभावात देवाचा सारखेपणा दिसला नव्हता. त्याचे सेवाकार्य शास्त्रवचनाची फलश्रूती होते हे त्यांना दिसले नव्हते. श्रीमंत मनुष्य आणि लाजारस ह्या दाखल्यात येशूने परूश्यांना म्हटले, “ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.’ लूक १६:३१. स्वर्गांत किंवा पृथ्वीवर कोणतेही चिन्ह दिले तर त्यांना फायदा होणार नव्हता.DAMar 353.1

    येशू आत्म्यात विव्हळ होऊन भीड मुरवत न पाळणाऱ्या लोकांना सोडून पुन्हा मचव्यात बसून शिष्याबरोबर निघून गेला. अगदी शांतपणे ते पुन्हा सरोवर ओलांडून गेले. जेथून ते गेले होते तेथे ते परत आले नव्हते, परंतु पांच हजारांना जेथे जेवण दिले होते त्याच्याजवळ म्हणजे बेथसैदा येथे ते पोहंचले. येशूने त्यांना म्हटले, “परूशी व सदूकी यांच्या खमीराविषयी जपा व सावध राहा.’ वल्हांडणसणाच्या वेळी घरातून खमीर काढून टाकण्याची प्रथा मोशेच्या काळापासून यहूदी लोकांत होती आणि ते पापाचे दर्शक आहे असे त्यांना शिकविण्यात आले होते. तथापि येशूचे म्हणणे शिष्यांना समजले नव्हते. एकाएकी मचव्यात बसून मगदाला पासून प्रवासाला सुरूवात केली होती आणि त्यांच्याबरोबर भाकरी घ्यायला ते विसरले होते. त्यांच्याजवळ फक्त एकच भाकरी होती. ह्या परिस्थितीला उद्देशून ख्रिस्ताचे बोल होते म्हणून परूशी किंवा सदूकी यांच्यापासून भाकरी विकत घेऊ नका असे ख्रिस्ताने सांगितले असे त्यांना वाटले. त्यांची अश्रद्धा आणि आध्यात्मिक अंतर्याम जाणण्याची अक्षमता ह्याच्यामुळे वारंवार त्याच्या वचनावर गैरसमज झाला होता. ज्याने काही मासळी व जवाच्या भाकरीने हजारो लोकांना जेवण दिले त्याने, शिष्यांनी ऐहिक खाद्याचा विचार केला म्हणून त्यांना दोष दिला. सदूकी व परूशी यांच्या धूर्त कावेबाज विचारसरणीने त्याच्या शिष्यांना ते अश्रद्धने भ्रष्ट करतील आणि त्यामुळे ख्रिस्ताच्या कामाकडे ते हलक्या विवेकशून्य बुद्धीने पाहातील हा धोका होता.DAMar 353.2

    स्वर्गातील चिन्ह दाखविण्याच्या मागणीला त्याच्या प्रभूने मान्यता द्यायची असती अशा विचारसरणीकडे शिष्य झुकत होते. हा चमत्कार करण्यास तो समर्थ होता असा त्यांचा पूर्णपणे विश्वास होता आणि त्याद्वारे त्यांच्या शत्रूचे तोंड बंद झाले असते. ह्या कदर न करणाऱ्या लोकांचा दांभिकपणा त्यांना समजून आला नव्हता.DAMar 354.1

    काही महिन्यानंतर “लोकांची गर्दी इतकी झाली की ते एकमेकास तुडवू लागले,” आणि येशूने पुन्हा तीच शिकवण दिली. “तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यास सांगू लागला, तुम्ही आपणास परूश्यांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा.’ लूक १२:१.DAMar 354.2

    जेवणात खमीर घातल्यावर न दिसता हळूच आपले काम करते आणि स्वतःच्या गुणधर्माप्रमाणे सर्व काही बदलून टाकिते. त्याचप्रमाणे दांभिकपणा मनात ठेविला तर तो झिरपून स्वभाव व जीवन यांच्यामध्ये शिरतो. परूश्यांच्या ढोंगीपणाचे ठळक उदाहरण देऊन ख्रिस्ताने “कुर्बान” ह्या घोषणेचे खंडन केले होते. येथे मंदिराविषयी औदार्य दाखवून मातापित्यावरील निष्ठा दाखविण्याच्या कर्तव्यावर पांघरून टाकण्यात आले होते. सदूकी आणि परूशी युक्तीप्रयुक्तीने फसवी तत्त्वे सूचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या तत्त्वातील खरा रोख ते लपवून ठेवून प्रत्येक प्रसंगी धूर्तपणे श्रोतजनांच्या मनावर ठसविण्याचा ते प्रयत्न करीत होते. एकदा ह्या खोट्या तत्त्वांना मान्यता दिली म्हणजे ते अन्नातील खमीराप्रमाणे कार्य करून आत शिरून स्वभावाचे परावर्तन करिते. ह्या फसव्या शिकवणीमुळे लोकांना ख्रिस्ताच्या वचनाचा स्वीकार करणे फार कठीण झाले होते. DAMar 354.3

    त्याच प्रभावी शक्ती आजही कार्यरत आहेत. त्या देवाच्या नियमांचे स्पष्टीकरण स्वकृतीच्या समर्थनार्थ देणाऱ्यांच्याद्वारे कार्य करीत आहेत. हा वर्ग नियमावर प्रत्यक्ष आघात करीत नाही परंतु तर्कावर अधिष्ठित सिद्धांत मांडून त्याच्या तत्त्वाला सुरूंग लावतात. त्याचा प्रभाव नष्ट करण्यासाठी ते त्याचे स्पष्टीकरण करतात.DAMar 354.4

    परूश्यांचे ढोंग स्वार्थ साधूपणाचे फळ होते. स्वतःची प्रौढी मिरविणे हा त्यांच्या जीवनाचा उद्देश होता. ह्यामुळे ते शास्त्रवचनाचा विपर्यास करून चुकीचा अर्थ सांगत होते आणि ख्रिस्ताच्या सेवाकार्याविषयी त्यांना अंधळे करून टाकिले होते. ही मार्मिक दुष्टाई शिष्यसुद्धा अंतःकरणात जतन करून ठेवतील हा धोका होता. जे ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून घोषीत करीत होते परंतु त्यांनी शिष्य होण्यासाठी सर्वांचा त्याग केला नव्हता आणि त्यांच्यावर परूश्यांच्या विचारसरणीचा प्रचंड पगडा पडला होता ते विश्वास आणि अश्रद्धा यांच्यामध्ये वारंवार हेलकावे खात होते आणि ख्रिस्तामध्ये लुप्तप्राय असलेल्या सुज्ञपणाच्या खजीन्याचा त्यांना समज आला नव्हता. त्याच्या शिष्यांनीसुद्धा, जरी ख्रिस्तासाठी बाह्यरित्या सर्व काही सोडिले होते तरी स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांच्या अंतःकरणात लालसा होती. ह्या लोभवृत्तीमुळे कोण मोठा असणार ह्यावर जोरात वितंडवाद चालू होता. हीच वृत्ती ख्रिस्त व त्यांच्यामध्ये आली आणि त्यामुळे त्याच्या स्वार्थत्यागी सेवाकार्यासाठी त्यांच्याकडून फारशी सहानुभूती लाभली नाही आणि त्यांना तारणाच्या रहस्याचे आकलन होण्यास बराच वेळ लागला. खमीराचे काम पूर्ण होण्यास अवधि दिला तर त्याद्वारे भ्रष्टता व कुजणे हा परिणाम होतो, तसेच स्वार्थनिष्ठावृत्ती बळावली तर त्याचा परिणाम आत्म्याची भ्रष्टता व नाश ठरलेलाच आहे.DAMar 354.5

    प्रभूच्या अनुयायामध्ये आज, पूर्वीसारखेच हे मार्मिक व फसवे पाप किती पसरलेले आहे? ख्रिस्तसेवा आणि परस्पर सख्यसंबंधावर ह्या आत्मप्रतिष्ठेच्या पापाचा किती दुष्परिणाम होतो! स्वतःचे अभिनंदन व्हावे आणि मानवी मान्यता लाभावी ह्यासाठी आपण किती उत्कंठित असतो! आत्मप्रेम (स्वतःवरील प्रेम) आणि देवाने आज्ञापिलेला मार्ग सोडून सोपा सुलभ मार्ग धरल्यामुळे देवाच्या आज्ञांच्या जागी मानवी सिद्धांत आणि सांप्रदाय यांना स्थान देण्यात येते. स्वतःच्या शिष्यांना ख्रिस्ताने इशाऱ्याचे शब्द उच्चारिले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर याविषयी जपून राहा.”DAMar 355.1

    ख्रिस्ताचा धर्म खरेपणात आहे. खरेपणाच हा त्याचा धर्म आहे. देवाच्या गौरवासाठी आस्था पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लाभते; आणि केवळ पवित्र आत्म्याच्या सार्थ कृतीने ही प्रेरणा अंतःकरणात बिंबविली जाते. केवळ देव सामर्थ्यानेच स्वार्थनिष्ठा आणि दांभिकपणा मनांतून काढून टाकण्यात येईल. हा बदल त्याच्या आत्म्याच्या कामाचे चिन्ह आहे. विश्वासाचा अंगिकार केल्याने ढोंग, बतावणी, स्वार्थीपणा नष्ट होतात. जेव्हा आम्ही स्वतःचा मोठेपणा नाही तर देवाचे गौरव मिळविण्याचा प्रयत्न करितो तेव्हा ते इष्ट आहे असे आम्हाला कळते. “हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर’ (योहान १२:२८), हे ख्रिस्ताच्या जीवनातील मुख्य तत्त्व होते, आणि आम्ही जर त्याचे अनुकरण करतो तर आमच्या जीवनासाठी तेच मुख्य तत्त्व राहील. त्याने आम्हाला आज्ञा दिली की, “तो जसा चालला तसे आम्हीही चालले पाहिजे;” आणि “त्यावरून आपणास कळून येते की, आपण त्याच्या आज्ञा पाळिल्या तर आपण त्याला ओळखितो.” १ योहान २:६, ३.DAMar 355.2