Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १५—लग्न सोहळ्याच्या प्रसंगी

    योहान २:१-११.

    यरुशलेमातील सान्हेंद्रिन सभेत एकादा मोठा चमत्कार करून येशूने त्याच्या सेवाभावी कार्याची सुरूवात केली नाही. तर गालीलातील एका लहानशा खेडे गांवातील कौटुंबिक मेळाव्याच्यावेळी विवाह सोहळ्यातील मेजवानीच्या प्रसंगांत त्याचे सामर्थ्य कामी आले होते. ह्या प्रकारे त्याने त्या लोकांवरील त्याची सहानुभूतीयुक्त भावना आणि त्यांना समाधान मिळवून देण्याची मनिषा प्रदर्शित केली होती. अरण्यांत मोहाच्या प्रसंगी त्याने स्वतः दुःखाच्या प्याल्यातून दुःखाचे घोट घेतले होते. आता तो त्याच्या आशीर्वचनाद्वारे, मानवांना आशीर्वादाचा प्याला देऊन मानवी जीवनाशी असलेले त्याचे संबंध पवित्र करण्यास आला होता.DAMar 107.1

    येशू यानेहून गालीलात परत आला होता. त्याचवेळी नासरेथापासून अगदी जवळ असलेल्या काना या लहानशा गावांत एक विवाह सोहळा होता. या दोन्हीकडील पक्षाच्या कुटुंबियातील लोक योसेफ व मरीया यांच्या नाते संबधातील होते; येशूलाही या प्रसंगाची माहिती असल्यामुळे तोही त्याच्या शिष्यासह तेथे गेला होता. त्याला व त्याच्या शिष्यांना तसे निमंत्रणही होते.DAMar 107.2

    बऱ्याच दिवसापासून स्वतःच्या आईपासून विभक्त झालेला येशू त्यावेळी पुन्हा तिला भेटला. यार्देनेवर त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी घडलेल्या सर्व घटनांचा वृतांत मरीयेच्या ऐकण्यात आला होता, आणि ही वार्ता संपूर्ण नासरेथभर पसरविण्यात आली होती. अनेक वर्षांपासून जे देखावे तिच्या अंतःकरणातच लपून राहीले होते ते सर्व देखावे नव्याने तिच्या मनापुढे आले. इतर इस्राएल लोकांप्रमाणेच मरीयासुद्धा योहानाच्या कार्यामुळे मनोमन प्रभावित झाली होती. त्याच्या जन्माच्या वेळी केलेल्या भाकीताची तिला आठवण झाली. आता येशूबरोबर असलेल्या त्याच्या संबंधामुळे तिच्या आशा नव्याने फुलून आल्या. तथापि अरण्यात गुप्तपणे येशूच्या जाण्याविषयीची वार्ताही मरीयेच्या कानावर पडली होती, आणि त्यामुळे ती विचलित झाली होती.DAMar 107.3

    नासरेथातील तिच्या घरामध्ये देवदूताने तिला निवेदन केलेल्या दिवसापासून येशू हा मशीहा आहे याविषयीचे सर्व पुरावे तिने आपल्या मनात साठवून ठेवले होते. त्याच्या सुशील आणि निस्वार्थी जीवनाने तिला अशी शाश्वती दिली होती की तो पाठविलेला होता त्याच्यावाचून दुसरा कोणी नव्हता. तरी सुद्धा शंका आणि निराशा तिच्या मनाच्या गाभाऱ्यात घर करीत होत्या. त्याचे तेजस्वी वैभव कधी प्रगट केले जाईल याची ती आतुरतेने वाट पाहात होती. येशूच्या जन्माचे गूढ ज्याला माहीत होते त्या योसेफापासून मरणाने तिला विभक्त केले होते. आता ती तिचा उमेद आणि तिची भीती उघड करून सांगण्यास असे तिच्यासाठी कोणी उरले नव्हते. गेले दोन महिने तिला अतिशय दुःखाचे गेले. ज्याच्या सहानुभूतीमुळे ती समाधान पावत होती त्या येशूपासून ती अलग झाली होती; त्यामुळे, “तुझ्या स्वतःच्या जिवांत तरवार भोसकून जाईल” (लूक २:३५); हे शिमोनाचे शब्दच तिच्या मनात घोळू लागले. येशू हरवला होता तेव्हा तो कायमचा हरवला असे तिला वाटत होते, आणि ती त्याच्या परत येण्याची उत्कंठापूर्वक वाट पाहत होती त्या तीन दिवसांची तिला आठवण झाली.DAMar 107.4

    लग्नमेजवानीच्या वेळी त्या कोमल आणि कर्तव्यदक्ष मुलाला भेटली. परंतु तो होता तसाच राहीला नव्हता, त्याच्या चर्येत फरक झाला होता. अरण्यात झालेल्या संघर्षाच्या त्याच्या चेहऱ्यावर छटा दिसत होत्या, त्याचप्रमाणे चेहऱ्यावर व्यतित होणारे सामर्थ्य व थोरपणा हे त्याच्या स्वर्गीय कार्याचे पुरावे सादर करीत होते. त्यांच्या संगती तरुणांचा असा एक घोळका होता की त्यांच्या डोळ्यातून त्याच्याविषयी पूज्यभाव ओसंडत होता आणि ते त्याला गुरू असे संबोधित होते. त्या सोबत्यांनी बाप्तिस्म्याच्या प्रसंगी व इतर वेळी काय पाहिले व ऐकले याचा सविस्तर वृत्तांत मरीयेला सांगितला. “ज्याविषयी मोशाने नियमशास्त्रांत लिहिले व संदेष्ट्यानी लिहिले तो, म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर, आम्हास सांपडला आहे” (योहान १:४५), असे त्यांनी जाहीर केले.DAMar 108.1

    पाहुणे एकत्र जमले असतांना अनेकजन कोणत्यातरी चित्तवेधक विषयांत विचारमग्न झाले होते. दडपून टाकलेला मनःक्षोभ त्या घोळक्यात पसरला होता. लहान लहान घोळके करून लोक एकमेकांत अधिरतेने पण हळू आवाजात कुजबूज करीत होते आणि त्याच वेळी आश्चर्यकारक नजरेने येशूकडे पहात होते. जेव्हा मरीयेने शिष्यांच्या तोंडून येशूविषयीची साक्ष ऐकली तेव्हा अनेक दिवसापासून तिने मनांत बाळगलेली आशा निरर्थक होणार नाही या आत्मविश्वासाबद्दल तिचे अतःकरण आनंदाने भरून आले होते. तथापि त्या सोज्वळ आनंदात मातेच्या स्वाभाविक गर्वाचा अंश मिसळला नसतां तर ती मानवापेक्षा अधिक उच्च ठरली असती. अनेकांच्या नजरा येशूवर खिळलेल्या आहेत असे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा येशू हा देवाची खरोखरच सन्मानित व्यक्ती होता असे त्याने त्या लोकांच्यासाठी सिद्ध करून दाखवावे अशी तिची उत्कट इच्छा होती. त्या लोकांना एकादा चमत्कार करण्याची त्याला संधि मिळेल अशी तिला आशा वाटत होती.DAMar 108.2

    लग्न सोहळा अनेक दिवस साजरा करण्याची त्या काळची प्रथा होती. त्या वेळी मेजवानी संपण्यापूर्वीच द्राक्षारस संपुष्टात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेथे तारांबळजनक व खेदजनक परिस्थिती उद्भवली. मेजवानीमध्ये द्राक्षारस वाढणे ही प्रतिष्ठेची बाब असे, द्राक्षारसाचा तुटवडा म्हणजे आदरातिथ्याची न्यूनता असल्याचे चिन्ह मानले जात होते. दोन्ही पक्षाची नातेवाईक या कारणाने मरीयेने मेजवानीची सर्व व्यवस्था करण्यासाठी सहाय्य केले होते, आणि ती येशूला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशूने ती गरज भागवावी असाच त्या शब्दांचा अर्थ होता. परंतु येशूने उत्तर दिले “बाई, माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”DAMar 108.3

    ते उत्तर, आम्हाला, एकदम तुटक असे वाटत असले तरी ते मायारहित असभ्यतेचे नव्हते. आईशी बोलण्याची येशूची पद्धत पौर्वात्य पद्धतीला धरूनच होती. ज्या व्यक्तीला आदरभाव दाखवायचा असतो त्या व्यक्तीसाठी असाच शब्द प्रयोग केला जात असे. या पृथ्वीवरील येशूची प्रत्येक कृती त्याने दिलेल्या नियमाशी सुसंबंधीत होती. “आपला बाप व आपली आई यांचा मान राख.” निर्गम २०:१२. अगदी शेवटच्या घटकेला त्याच्या आईला त्याचा मायाळूपणा प्रदर्शित करतांना येशूने अगदी त्याच प्रकारचा शब्दप्रयोग केला. लग्न मेजवानी आणि वधस्तंभ या दोन्हीही वेळी त्याच्या शब्दातील हेल, त्याची नजर आणि पद्धत यांनी त्याचे प्रेम प्रगट केले.DAMar 109.1

    बालपणी जेव्हा त्याने मंदिराला भेट दिली होती, आणि जेव्हा त्याच्या जीवनकार्याचे गूढ उघड करून त्याला दाखवण्यात आले होते, त्यावेळी ख्रिस्त मरीयेला म्हणाला होता, “जे माझ्या बापाचे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” लूक २:४९. त्याच्या या शब्दांनी त्याच्या संपूर्ण जीवनाची व सेवाकार्याची मुख्य कल्पना सादर केली आहे. तारण करण्याचे जे महान कार्य करण्यासाठी तो या जगांत आला होता त्यासाठी इतर सर्व गोष्टी तात्पुरत्या तहकूब करण्यात आल्या होत्या. यावेळी पुन्हा त्याने कानउघाडणी केली. मरीयेचा येशूशी असलेल्या नातेसंबंधामुळे तिने येशूवर हक्काचा, आणि त्याच्या कार्यांत मार्गदर्शन करण्याच्या अधिकाराचा दावा करणे हे धोक्याचे होते. तीस वर्षे तो तिच्याशी प्रेमाने वागणारा आणि तिच्या आज्ञेत राहणारा मुलगा होता, आणि त्याच्या प्रेमात यत्किंचितही फरक झाला नव्हता; पण आता त्याला त्याच्या पित्याचे कार्य करायचे होते. परात्पर देवाचा पुत्र व जगाचा तारक म्हणून कोणतेही जगिक बंधन त्याला त्याच्या कामापासून आवरू शकत नव्हते. देवाचे कार्य करण्यासाठी तो अगदी बंधमुक्त असणे आवश्यक होते. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अगदीच मोकळा असणे जरूरीचे होते. यात आपल्यासाठी एक धडा आहे. देवाचे हक्क मानवी नातेसंबंधाहन अधिक वरचड आहेत. ज्या मार्गाने जाण्याची तो आम्हाला आज्ञा करतो त्या मार्गापासून आमचे पाऊल कोणत्याही जगिक प्रलोभनाने इतरत्र वळवू नयेत.DAMar 109.2

    पतित मानवाच्या तारणाची आशा केवळ ख्रिस्तच आहे. मरीयेलासुद्धा केवळ देवाच्या कोकऱ्याद्वारेच तारणप्राप्ती होऊ शकते. खुद्द तिच्यात कोणतीच पात्रता नव्हती. येशूशी असलेल्या तिच्या नातेसंबंधामुळे येशूने तिला इतरापेक्षा कोणत्याही आध्यात्मिक नात्याने स्वतःशी जोडलेले नाही. तारकाच्या शब्दाद्वारे हे अगदी स्पष्ट करण्यात आले आहे. मानवाचा पुत्र व देवाचा पुत्र या नात्याने त्याच्या व तिच्या नातेसंबंधातील भेद तो अगदी स्पष्ट करतो. त्यांच्यातील नातेसंबंधाने तिला कोणत्याही प्रकारे त्याच्या बरोबरीचे केलेले नाही.DAMar 109.3

    “माझी वेळ अजून आली नाही’ येशूचे हे शब्द एका वास्तवाचे निर्देशक आहेत, या पृथ्वीवरील येशची प्रत्येक कृती प्रारंभापासून अस्तित्वात असलेल्या देवाच्या योजना पूर्ण करणारी कृती होती. येशू या जगात येण्यापूर्वीच तारणाच्या योजनेचा आराखडा, सर्व बारकाव्यासह त्याच्यापुढे ठेवण्यात आला होता. तथापि तो लोकांत वावरत असतांना देवपित्याच्या, संकल्पानुसार, पावलोपावली त्याचे मार्गदर्शन करण्यात येत होते. ठरविण्यात आलेल्या वेळी योग्य कृती करण्यास त्यानेही (येशूने) मागेपुढे पाहिले नाही. त्याच नम्रतेने तो ठरलेल्या वेळेची प्रतिक्षा करीत राहिला. DAMar 110.1

    माझी वेळ अजून आली नाही असे मरीयेला सांगत असतांना, येशू तिच्या मनांत घोळत असलेल्या विचारांचे उत्तर देत होता, - इतर लोकाप्रमाणेच तिच्याही अपेक्षा होत्या त्याचे उत्तर तो देत होता. खुद्द तोच मशीहा आहे असे प्रकट करून इस्राएलाचे राज्यासन घेईल अशी ती आशा बाळगत होती. पण ती वेळ आली नव्हती. अर्थांत राजा म्हणून येण्याची वेळ नव्हे तर, “क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला... पुरुष.’ म्हणून.DAMar 110.2

    मरीयेला येशूच्या कार्याविषयीची यथायोग्य कल्पना नव्हती, तरीसुद्धा ती त्याच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवित होती. मरीयेच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी आणि त्याच्या शिष्यांचा विश्वास बळकट व्हावा म्हणून तो पहिला चमत्कार करण्यात आला होता. शिष्यांना अविश्वासासारख्या अनेक व मोठ्या मोहाना तोंड द्यावे लागणार होते. येशू हाच मशीहा होता हे भाकीतांनी निशंकोचपणे त्यांना सिद्ध करून दाखविले होते. धर्म पुढाऱ्यांनी त्यांच्याहीपेक्षा (शिष्यापेक्षा) अधिक खातरीने येशूचा स्विकार करावा अशी त्यांची अपेक्षा होती. येशूची चमत्कृत्ये आणि येशूच्या कार्यावरील त्यांचा विश्वास याविषयी त्यानी सर्व लोकांत प्रसिद्धी केली होती. परंतु याजक व धर्मगुरू लोकांनी येशूविषयी दाखविलेला अविश्वास, दुराग्रह व कटू वैमनस्य पाहून ते आश्चर्यचकित व भयंकर निराश झाले होते. येशूने सुरूवातीला केलेल्या चमत्कारानी शिष्यांना विरोधाला तोंड देण्यास समर्थ बनविले होते.DAMar 110.3

    येशूच्या त्या शब्दामुळे कोणत्याही प्रकारे गोंधळून न जाता मरीया चाकरास म्हणाली, “हा जे काही तुम्हास सांगेल ते करा.” अशा प्रकारे ख्रिस्ताच्या कार्याचा मार्ग तयार करण्यासाठी तिला जे काही करता येण्यासारखे होते ते तिने केले होते.DAMar 110.4

    दाराजवळ सहा मोठे मोठे दगडी रांजण ठेवलेले होते ते पाण्याने काठोकाठ भरण्याची येशूने चाकरांना आज्ञा केली. चाकरांनी तसेच केले. नंतर येशू त्यांस म्हणाला, “आता त्यातून काढून जेवणकारभाऱ्याकडे न्या.” आणि पाहा काय चमत्कार! ते रांजण पाण्याऐवजी द्राक्षारसाने तोंडोतोंड भरलेले आढळले. त्यामुळे द्राक्षारस संपला होता हे मालकाला व पाहुण्यानाही समजू शकले नव्हते. चाकरांनी आणलेला द्राक्षारस चाखून पाहिल्यानंतर, कारभाऱ्याला असे आढळले की नंतर दिलेला द्राक्षारस पहिल्यापेक्षा अधिक स्वादिष्ट होता. तेव्हा मेजवानीचा कारभारी वराला म्हणाला, “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढितो, आणि लोक येथेच्छ प्याल्यावर मग नीरस वाढितो; तुम्ही तर चांगला द्राक्षारस अजूनपर्यंत ठेविला आहे.”DAMar 110.5

    जसे वाढपी प्रथम स्वादिष्ट द्राक्षारस वाढतात व नंतर नीरस वाढतात, जगही देणग्या देण्याबाबत अगदी तसेच करते. जगाच्या देणग्या प्रथम डोळ्यास आनंद देणाऱ्या आणि इंद्रियाना संतुष्ट करणाऱ्या असतात परंतु शेवटी त्या खरे समाधान देणाऱ्या ठरत नाहीत. द्राक्षारसाचे कडवटपणात व आनंदाचे औदासीन्यात रूपांतर होते. ज्याची सुरूवात रंगेलपणात होते त्याचा शेवट तिटकारा व थकवा यात होतो. परंतु येशूच्या देणग्या सदा सतेज व नाविन्यपूर्ण असतात. मानवाला तो जी मेजवानी देतो ती समाधान व संतोष देण्यास कधीच चुकत नाही. प्रत्येक नवी देणगी प्रभूच्या आशीर्वादाचा आनंद उपभोगण्याची व गुणवता जाणण्याची क्षमता वाढवते. प्रभु कृपेसाठी कृपा प्रदान करतो. त्याच्या पुरवठ्यात कधीच खंड पडत नाही. सत्य गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यात राहाता (जगता) तेव्हा तुम्हास आज लाभणारी उत्तम देणगी उद्याच्या उत्कृष्ट देणगीच्या लाभाची नक्की शाश्वती देते. येशूने नथनेलापुढे काढलेले उद्गार विश्वासक लोकांबरोबरचा देवाचा व्यवहारिक नियम व्यक्त करतात. त्याच्या प्रेमाच्या प्रत्येक आविष्काराद्वारे तो जाहीर करतो की, “तूं विश्वास धरितोस काय? याहून मोठ्या गोष्टी पाहशील.” योहान १:५०.DAMar 111.1

    येशूने लग्न मेजवानीला दिलेले त्याचे बक्षीस हे एक प्रतीक (दर्शक) होते. त्याच्या मरणातील बाप्तिस्मा हा पाण्याद्वारे दर्शविला गेला होता; द्राक्षारस हा जगाच्या पापांसाठी सांडल्या जाणाऱ्या त्याच्या रक्ताचे दर्शक होता. कुंभ भरण्यासाठी आणलेले पाणी मानवाकडून आणले गेले होते, परंतु केवळ ख्रिस्ताचे शब्दच त्या पाण्यांत जीवनदायी शक्ती निर्माण करू शकत होते. अगदी तेच तारकाच्या मरणाचा निर्देश करणाऱ्या विधीबाबत आहे. विश्वासाद्वारे कार्य करणाऱ्यांना केवळ ख्रिस्ताच्या सामर्थ्याने स्वतःचे पोषण करण्याचे सामर्थ्य मिळते.DAMar 111.2

    येशूच्या शब्दामुळे मेजवानीसाठी मुबलक सामुग्री मिळाली. माणसांच्या पापांचा कलंक पुसून काढण्यासाठी व त्यांना पुन्हा नवीन करण्यासाठी येशूच्या कृपेचा भरपूर साठा उपलब्ध आहे.DAMar 111.3

    येशूने शिष्यासह हजर राहिलेल्या पहिल्या मेजवानीच्या वेळी त्यांच्या तारणासाठी कराव्या लागणाऱ्या (येशूच्या) त्याच्या कार्याचे प्रतीक असलेला प्याला त्यांना “तो येईपर्यंत दिला.” १ करिंथ. ११:२६. त्याच्या मरणाची आठवण करून देणाऱ्या पवित्र विधीची स्थापना केली त्या शेवटल्या भोजनाच्या वेळी येशूने पुन्हा तो प्याला शिष्यांना दिला. जेव्हा येशू म्हणाला, “मी आपल्या पित्याच्या राज्यांत तुम्हाबरोबर नवा पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षीचा हा उपज पिणारच नाही.” मत्तय २६:२९. तेव्हा येशूपासून विभक्त व्हावे लागणार होते म्हणून दुःखी झालेले शिष्य, पुन्हा एकत्र येणार या अभिवचनामुळे समाधानी झाले. DAMar 111.4

    मेजवानीसाठी पुरविलेला द्राक्षारस, आणि खुद्द स्वतःच्या रक्ताचे प्रतीक म्हणून शिष्यांना येशूने दिलेला द्राक्षारस हा द्राक्षापासून काढलेला शुद्ध रस होता. नव्या द्राक्षारसाविषयी लिहितांना यशया संदेष्टा असे सांगतो. “द्राक्षांच्या घोसांत नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता त्यात लाभ आहे म्हणून त्याचा नाश करूं नका.” यशया ६५:८.DAMar 112.1

    जुन्या करारात खुद्द ख्रिस्तानेच इस्राएल लोकांना इशारा दिला होता की, “द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.’ नीति. २०:१. त्याने स्वतः कसल्याही प्रकारचे मादक द्रव्य पुरविले नाही. सैतान लोकांना त्यांची विचारशक्ती कमकुवत होईल, आध्यात्मिक ग्रहणशक्ती बधिर होईल अशा प्रकारच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या मोहात पाडतो, परंतु ख्रिस्त निच्च प्रवृत्तीला कह्यांत ठेवण्याची शिकवण देतो. त्याचे संपूर्ण जीवन स्वनाकाराचे एक उत्तम उदाहरण होते. भूकेचे सामर्थ्य मोडून काढण्यासाठी मानवाला टिकाव धरता आला नसता अशा प्रकारच्या प्रखर कसोटीला त्याने आमच्यासाठी तोंड दिले. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला द्राक्षारस किंवा मद्य प्राशन करू नये म्हणून ख्रिस्तानेच मार्गदर्शन केले होते. ख्रिस्तानेच मानोहाच्या पत्नीला मित्ताहार करण्याची आज्ञा केली होती. शेजाऱ्याच्याDAMar 112.2

    ओठाला मद्याची बाटली लावणाऱ्याला त्याने शापीत घोषित केले होते. ख्रिस्त स्वतःच्या शिकवणी विरूद्ध कधीच गेला नाही. लग्नाच्या मेजवानीत त्याने पुरविलेला न आंबलेला (शुद्ध) द्राक्षारस पौष्टिक व तरतरीत करणारा होता. त्याच्या प्रभावामुळे रुचि व आरोग्यदायी भूक यांच्यात मेळ साधावयाचा होता. DAMar 112.3

    मेजवानीला जमलेल्या पाहुण्यांनी द्राक्षारसाच्या दर्जाची जेव्हा वाखाणणी केली, तेव्हा त्या चमत्काराच्या माहितीविषयी चाकराकडून चौकशी करण्यात आली. ज्याने ते आश्चर्यकारक काम केले होते त्याच्याबद्दल लोक थक्कच झाले होते. बराच वेळ त्याचा शोधाशोध केल्यानंतर शेवटी असे आढळून आले की तो तेथून गुपचुपपणे निघून गेला होता. तो निघून गेल्याची शिष्यांनाही गंधवार्ता नव्हती.DAMar 112.4

    यावेळी सर्व समुहाचे लक्ष शिष्याकडे लागले होते. त्यांचा येशूवर विश्वास असल्याचे कबूल करण्याची संधि त्यांना पहिल्यांदाच मिळाली होती. यार्देनेवर त्यांनी काय पाहिले व ऐकले होते ते त्यांनी सांगितले, देवाने त्याच्या लोकांकरिता तारणारा पाठविला होता म्हणून अनेकांच्या अंतःकरणात आशा प्रज्वलित झाली होती. चमत्काराविषयीचा वृत्तांत सर्व प्रांतात पसरला गेला होता, यरुशलेमातही पोहंचला होता. याजक व वडील यानी नव्या आस्थेने येशूच्या आगमनाचा निर्देश करणाऱ्या भाकीतांचा अभ्यास (शोध) केला होता. अगदी साधेपणाने लोकात अवतरलेल्या त्या नव्या गुरूच्या कार्याविषयी माहिती करून घेण्याची उत्कंठापूर्ण अपेक्षा केली जात होती.DAMar 112.5

    येशूची सेवा यहूदी वडीलाच्याहून लक्षनिय विरोधी पद्धतीची होती. प्रथा व शिष्टाचारपालन विषयीच्या त्यांच्या पूज्यबुद्धीमुळे सर्व वैचारिक किंवा कृती स्वातंत्र्याचा नाश झाला होता. ते निरंतर भ्रष्ट प्रभावाच्या भयाखाली वावरत होते. “अशुद्ध” ते चा संबंध टाळण्यासाठी ते केवळ विधर्मियापासून दूर राहिले नाहीत, तर बहुसंख्य स्वकिय लोकांपासूनही दूर राहिले. त्याद्वारे स्वतःचा कांही फायदा झाला नाही किंवा इतरांची मैत्री संपादन करता आली नव्हती. सतत त्याच त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, त्यांनी त्यांचे विचार खुजे बनविले, आणि जीवनाचा परीघ संकुचित केला. त्याच्या उदाहरणामुळे सर्व थरातील लोकात अहंकार व असहिष्णुता यांना प्रोत्साहन दिले गेले.DAMar 113.1

    सहानुभूतीपूर्ण भावनेने लोकांमध्ये समरस होऊन ख्रिस्ताने धर्मसुधारणेच्या कार्याला प्रारंभ केला. देवाच्या नैतिक नियमांचा अत्यांतिक आदर व्यक्त करीत असतानाच, त्याने परुशी लोकांच्या वरपंगी धर्मनिष्ठेचा कडक शब्दांत निषेध (धिक्कार) केला, आणि लोकांना बंदिस्त केलेल्या निरर्थक नियमापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. समाजातील भिन्न वर्गांतील लोकांना एकमेकांपासून अलग करणारे अडथळे दूर करण्याचा तो प्रयत्न करीत होता, अशासाठी की तो सर्व लोकांना एकाच कुटुंबातील मुले म्हणून एकत्र आणू शकला असता. मेजवानीच्या प्रसंगी त्याची उपस्थिती या योजनेच्या कार्यवाहितील एक पाऊल होते.DAMar 113.2

    देवाने योहानाला निर्जन भागांत राहण्यास सांगितले होते, यासाठी की, याजक व धर्मगुरू यांच्या प्रभावापासून त्याचे संरक्षण होईल व महत्त्वाच्या कार्यासाठी तो सिद्ध होऊ शकेल. अर्थात त्याचे तपस्वी व एकांतवासी जीवन लोकासाठी कित्तामय जीवन असावयाचे नव्हते. खुद्द योहानाने त्याच्या श्रोत्यांना दैनंदिन जबाबदाऱ्यापासून दूर राहण्यास सांगितले नव्हते, देवाने लोकांना ज्या ठिकाणाहून पाचारण केले होते तेथे राहूनच त्यांनी देवावरचा विश्वास प्रगट करण्यासाठी पश्चातापाचा पुरावा दाखवावा अशी त्याने लोकांना आज्ञा केली होती.DAMar 113.3

    येशूने सर्व प्रकारच्या आत्म-प्रौढी वृत्तीचा प्रखर निषेध केला होता. तरीपण तो स्वतः स्वाभाविकतः समानप्रिय होता. सर्व थरातील लोकांच्या आदरातिथ्याचा त्याने स्वीकार केला, गरीबांच्या तसेच श्रीमंताच्या, सुशिक्षितांच्या तसेच अशिक्षितांच्या दारीदारी जाऊन त्यांच्या भेटी घेत होता. जीवनातील सर्व साधारण गोष्टीपासून ते आध्यात्मिक व शाश्वत गोष्टीपर्यंत त्यांचे विचार उन्नत करण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याने क्षुल्लक गोष्टींना मान्यता दिली नव्हती. त्याने गैरवर्तनाला मान्यता दिली नव्हती व अविवेकपणाने त्याचे वर्तन कलंकीत झाले नव्हते; तरी सुद्धा तो साध्या-स्वच्छ सुखासमाधानात आनंद मानत होता, आणि त्याच्या हजेरीमुळे सामाजिक संमेलने मान्यता पावली होती. यहूदी विवाह विधी हा भव्य प्रसंग होता, तेथील आनंदोत्सव देवपुत्राला नाखूष करणारा ठरला नव्हता. लग्न सोहळ्याला हजर राहून लग्न विधि ही दैवी संस्था आहे असे त्याने सन्मानित केले.DAMar 113.4

    जुन्या व नव्या करारात विवाह विधी हा ख्रिस्त व त्याचे लोक यांच्यात असलेला कोमल व पवित्र ऐक्यसंबंध दाखवण्यासाठी करण्यात आला आहे. या लग्न सोहळ्यातील आंनदोत्सवाने पुढील काळी एका दिवशी अशाच प्रकारे जेव्हा तो त्याची वधू पित्याच्या घरी घेऊन येईल आणि तारण पावलेले लोक तारणाऱ्याबरोबर कोकऱ्याच्या लग्न सोहळ्याच्या मेजवानीसाठी बसतील त्यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात येणाऱ्या दिवसाचे चित्र येशूला दिसले. तो म्हणतो, “नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.” “यापुढे तुला सोडिलेली म्हणणार नाहीत... तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद)... म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस.” “तो तुजविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुजविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.’ यशया ६२:४, ५; सफन्या ३:१७. जेव्हा प्रेषित योहानाला दृष्टांत दिला होता तेव्हा त्याने लिहिले की, तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जलप्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनाची वाणी मी ऐकली; ती म्हणालीः हालेल्या; कारण सर्वसत्ताधारी आमचा प्रभु देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्लास करूं व त्याचे गौरव करू; कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे; ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला; हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला: ही देवाची सत्य वचने आहेत.’ प्रगटी. १९:६-९.DAMar 114.1

    ज्याला त्याच्या राज्याचे आमंत्रण द्यायलाच पाहिजे अशी व्यक्ती प्रभूला प्रत्येक व्यक्तीत दिसत होती. लोकांच्या हिताची इच्छा बाळगणारा या नात्याने त्यांच्यामध्ये वावरूनच तो त्यांच्या अंतःकरणापर्यंत भिडला. त्याने त्यांचा हमरस्त्यावर, खाजगी घरांत, जहाजावर मंदिरांत, सरोवराच्या काठी आणि लग्नाच्या मेजवानीच्या ठिकाणी शोध केला. त्याच्या फावल्या वेळात तो त्यांना भेटला. त्यांच्या सामाजिक बाबीत आस्था दाखविली. त्याच्या पवित्र सानिध्याच्या प्रभावाखाली त्याने अनेक कुटुंबांना त्याच्या स्वतःच्या घरात जमवून त्याने त्याची शिकवण सर्व कुटुंबियापर्यंत पोहचविली. त्याच्या सहानुभूतीमुळे त्याला लोकांची हृदये जिंकण्यास मदत झाली. बहुतेक वेळा तो प्रार्थना करण्यासाठी डोंगर टेकड्यांचा आश्रय घेत होता. पण हे सर्व, तो उद्योगी जीवनांत गर्क असलेल्या लोकांत त्याचे कार्य करण्याची पूर्व तयारी करीत होता. त्यानंतर तो रोग्यांना निरोगी करण्यासाठी, अज्ञानी लोकांना ज्ञानी बनविण्यासाठी आणि सैतानाच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून त्याच्या कैद्यांना मुक्त करण्यास पुढे सरसावला होता.DAMar 114.2

    वैयक्तिक सहवासाने व संबंधाने येशूने त्याच्या शिष्यांना प्रशिक्षित केले होते. काही वेळा डोंगर उतारावर त्यांच्या समावेत बसून त्यांना शिकविले होते. काही वेळा समुद्राच्या किनारी किंवा वाटेने चालता चालता त्याने देव-राज्याचे गूढ उलघडून दाखविले. आज लोक जसे उपदेशाचे घोट पाजतात, तसे त्याने केले नाही. जेथे कोठे देवाच्या संदेशासाठी अंतःकरणे उघडण्यात आली होती तेथे तेथे त्याने तारणाच्या मार्गाविषयीची सत्ये उलघडून दाखविली होती. तो आपल्या शिष्यांना, तुम्ही हे करा किंवा ते करा अशा आज्ञा सोडीत बसला नाही, तर, “माझ्या मागे या,’ केवळ इतकेच बोलला. गावोगावी, नगरोनगरी प्रवासाला जाताना तो शिष्यांना संगती घेत होता, यासाठी की तो लोकांना कशा प्रकारे शिक्षण देतो हे त्यांनी पाहून घ्यावे. त्याने स्वतःच्या आस्था त्यांच्या आस्थेशी जोडल्या होत्या, आणि ते त्याच्या कार्यांत त्याच्याबरोबर एक झाले होते.DAMar 115.1

    ख्रिस्ताच्या वचनाची सुवार्ता सांगणाऱ्यांनी, आणि त्याच्या कृपेची सुवार्ता ज्यांना मिळाली आहे त्या सर्वांनी, मानवाच्या कल्याणार्थ स्वतःला गुंतवून घेणाऱ्या ख्रिस्ताचा कित्ता गिरवला पाहिजे. आपण सामाजिक संख्यसंबंध तोडले पाहिजेत असे नाही. आपण इतरांपासून अलिप्त राहू नये. आपल्याला सर्व थरातील लोकांपर्यंत पोहंचता यावे म्हणून जेथे कोठे ते राहतात तेथे जाऊन आपण त्यांची भेट घेतली पाहिजे. ते स्वतःहून क्वचितच आपल्याला शोधत फिरतील. केवळ व्यासपिठावरून सांगितलेल्या दैवी सत्याद्वारे लोकांची अतःकरणे हेलावून जातीलच असे नाही. व्यासापिठाव्यतिरिक्त दुसरेही कार्यक्षेत्र मोकळे आहे. साधे आहे, पण फार एका नम्र कुटुंबाचे घर, मोठ्या धनाड्याचा प्रासादतुल्य बंगला, दवाखाना चालविणारे मंडळ, आणि साधी सामाजिक संमेलने, आदिकरून ही क्षेत्रे आहेत.DAMar 115.2

    ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने आपण केवळ भोगविलासाठी जगाशी समरस होऊ नये, आणि भोगविलासासाठी एक होणे मुर्खपणाच आहे. अशा संबंधाचा परिणाम म्हणजे फक्त नुकसान. आपण आपल्या शब्दाने, कृतीने, आपल्या मुग्धतेने किंवा उपस्थितीने पापाला कदापि मंजुरी देऊ नये. आपण जेथे कोठे जातो तेथे आपण आपल्या ख्रिस्ताला संगती घेऊन गेले पाहिजे; संगती न्यावयाचे यासाठी की, आपल्याला आपल्या तारणाऱ्याचा चांगुलपणा इतरांना प्रगट करता येईल. पण जे त्यांचा धर्म सांभाळून ठेवण्याकरिता स्वतःला दगडी भिंतीच्या आत लपवून ठेवतात ते सत्कर्म करण्याची उत्तम, व महत संधि दवडून बसतात. सामाजिक संबंधाद्वारे, ख्रिस्ती धर्माचा जगाबरोबर संपर्क जोडला जातो. ज्याला ज्याला देवाचा प्रकाश मिळाला आहे त्या प्रत्येकाने, ज्यांना जीवनी प्रकाशाची माहिती नाही त्यांचा मार्ग प्रकाशीत केला पाहिजे.DAMar 115.3

    आपण सर्वांनी ख्रिस्ताचे साक्षीदार झाले पाहिजे. ख्रिस्ताच्या कृपेने शुद्ध झालेल्या सामाजिक शक्तीचा तारणाऱ्यासाठी आत्मे जिंकण्याकरिता सदुपयोग केला पाहिजे. स्वार्थीपणाने आम्ही आमच्याच आस्थामध्ये तल्लीन झालो नाही, तथापि इतरांनी आमच्या आशीर्वादाचे व हक्काचे वाटेकरी व्हावे अशी अपेक्षा आपण बाळगतो हे जगाला पाहू द्या. आमचा धर्म आम्हाला सहानुभूतीशून्य किंवा जुलमी (कडक) बनवीत नाही हे त्यांना दिसू द्या. ख्रिस्त मिळाला आहे असे कबूल करणाऱ्या सर्वांनी त्याने जशी लोकांच्या हितासाठी सेवा केली तशी करावी.DAMar 115.4

    ख्रिस्ती लोक दुःखी, असमाधानी लोक आहेत अशी खोटी कल्पना आपण जगाला कधापि देऊ नये. जर आपण आपली नजर येशूवर खिळून ठेविली तर त्या ठिकाणी आपल्याला आपला दयाळू तारणारा दिसेल, आणि त्याच्या चेहऱ्यावरील तेज आपल्या दृष्टीस पडेल. जेथे जेथे त्याच्या आत्म्याचे साम्राज्य असते तेथे तेथे त्याची सुशांती नांदते. देवावर शांत, निष्ठावंत श्रद्धा असल्यामुळे, तेथे संतोषही असतो. DAMar 116.1

    ख्रिस्ताचे अनुयायी हे मानवी स्वभावाचे असूनसुद्धा ते दैवी स्वभाव धर्माचे अंश (भागीदार) आहेत असे जेव्हा ते दाखवितात तेव्हा ख्रिस्ताला त्यांच्याबद्दल आनंद वाटतो. ते निर्जीव पुतळे नाहीत, तर सचेतन स्त्रीया आणि पुरुष आहेत. दैवी कृपेच्या तुषाराने टवटवीत झालेली अतःकरणे, धार्मिकतेच्या सूर्यापुढे उमलली जातात व विस्तार पावतात. त्यांना मिळालेला प्रकाश ते ख्रिस्ताच्या प्रीतीच्या तेजस्वी कृत्याद्वारे परावर्तित करतात.DAMar 116.2