Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ११—बाप्तिस्मा

    मत्तय ३:१३-१७; मार्क १:९-११; लूक ३:२१-२२.

    अरण्यातील संदेष्ट्याची सुवार्ता आणि त्याची आश्चर्यकारक घोषणा सर्व गालील प्रांतात दुमदुमली. घोषणेतील संदेश दूरगामी असलेल्या डोंगर टेकड्यावरील नगरातील शेतकऱ्यांच्या कानावर पडला, समुद्राच्या काठावर वसाहत केलेल्या कोळ्यापर्यंत पोहचला. तेथील रहिवाशांच्या उत्सुक आणि साध्या अंतकरणात त्या संदेशाने घर करून घेतले. नासरेथ गावातील योसेफ सुताराच्या दुकानात हे सांगण्यात आले होते आणि एकाने त्या पाचारणाला मान्यता दिली. त्याची वेळ आली होती. दररोजचे काबाडकष्ट बाजूला ठेविले, आपल्या मातोश्रीला निरोप दिला आणि तो नागरिकाबरोबर यार्देन नदीकडे निघून गेला.DAMar 76.1

    येश आणि बाप्तिस्मा करणारा योहान मावस भावंडे असून त्यांच्या जन्माच्या परिस्थितीमुळे त्यांचा अगदी जीवलग संबंध होता; तथापि त्यांचा प्रत्यक्षात परस्पर संबंध आला नव्हता. गालील प्रांतातील नासरेथ गावी येशूचे आयुष्य गेले आणि योहानाचे आयुष्य यहूदा प्रातांतील अरण्यात गेले. अगदी भिन्न वातावरणातील एकांतवासात त्यांनी दिवस काढिले आणि परस्परांचा संबंध कधी आला नाही. ही ईश्वरी करणी होती. दोघांनी संगनमताने परस्पराला पुष्टी देण्याचे ठरविले या आरोपाला दुसऱ्या कशानेही दुजोरा मिळत नव्हता.DAMar 76.2

    येशूच्या जन्माविषयीच्या घटना योहानाला ज्ञात होत्या. बालवयात यरुशलेमाला दिलेल्या भेटीविषयी आणि यहूदी धर्मशास्त्र शिकविण्याच्या शाळेत काय घडले याविषयी त्याने ऐकले होते. त्याच्या निष्कलंक जीवनाविषयी त्याला माहिती होती, आणि तो मशीहा आहे असा विश्वास होता; परंतु ह्याविषयी त्याची पक्की खात्री नव्हती. खरी वस्तुस्थिती म्हणजे पुष्कळ वर्ष येशूच्या जीवनाला कधी प्रसिद्धी दिली नव्हती, त्याच्या कार्याविषयी विशेष पुरावे सादर केले नव्हते, उलट तो आश्वासीत आहे किंवा काय याविषयी शंका करण्यास जागा दिली. देव आपल्या वेळेप्रमाणे सर्व काही स्पष्ट करील अशा विश्वासाने बाप्तिस्मा करणारा योहान वाट पाहात होता. मशीहा त्याच्या हातून बाप्तिस्मा घेईल आणि त्यावेळेस त्याच्या दैवी स्वभावाची लक्षणे देण्यात येतील ह्याचे प्रगटीकरण योहानाला करण्यात आले होते. अशा प्रकारे त्याला तो लोकांच्या पुढे सादर करणार होता.DAMar 76.3

    बाप्तिस्मा घेण्यासाठी जेव्हा येशू आला तेव्हा त्याने त्याच्या स्वभावातील अपूर्व पावित्र्य पाहिले. तसले पावित्र्य आतापर्यंत त्याला दुसऱ्या कोणामध्ये दिसले नाही. त्याच्या समक्षतेतील वातावरण पवित्र आणि दरायचे होते. यार्देन नदीवर जो घोळका जमला होता त्यामध्ये गुन्हेगार आणि अपराधी तसेच पापाच्या ओझ्याने वाकलेले लोक होते. परंतु ज्या मानवी व्यक्तीचा प्रभाव दैवी होता अशा व्यक्तीचा संबंध त्याला कधी आला नव्हता. मशीहाविषयी योहानाला जे प्रगट केले होते त्याच्याशी ते सर्व समरस होते. तथापि येशूची विनंती मान्य करण्यास तो माघार घेत होता. पापी मनुष्य निष्पाप्याचा बाप्तिस्मा कसा करू शकेल? ज्याला पश्चात्तापाची गरज नाही त्याने पापांगिकार करून शुचिर्भूत होणाऱ्या संस्काराला शरण का जावे?DAMar 77.1

    येशूने स्वतःचा बाप्तिस्मा करण्याविषयी विचारल्यावर योहानाला आचंबा वाटला आणि म्हटले, “मी आपणापासून बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण मजकडे येता काय?” त्यावर येशूने त्याला ठाम उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण या प्रकारे सर्व धर्म पूर्णपणे पाळणे हे आपणाला योग्य आहे.” योहानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे उद्धारकाला यार्देन नदीत नेऊन बुडवून बाप्तिस्मा दिला. बाप्तिस्मा घेतल्यावर “येशू पाण्यातून लागलाच वर आला आणि पाहा, आकाश उघडले, तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणावर येताना पाहिला.”DAMar 77.2

    स्वतःच्या अपराधाची कबुली देऊन येशूने बाप्तिस्मा घेतला नाही. जे पाऊल आम्ही उचलायला पाहिजे ते घेऊन आणि जी कृती आम्ही करायला पाहिजे ती करून तो पापी लोकांशी एकरूप झाला. बाप्तिस्म्यानंतरचे त्याचे दुःखी, व्यथित जीवन आणि सहनशीलतेची चिकाटी आम्हाला उदाहरण होते. DAMar 77.3

    पाण्यातून वर आल्यावर नदीच्या किनाऱ्यावर येशूने लवून प्रार्थना केली. त्याच्यासमोर इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड उघडा झाला होता. आता त्याचे जीवन विस्तारलेल्या पातळीवर आले होते. या ठिकाणी त्याला जीवनातील विरोधाला, झगड्याला तोंड द्यावे लागणार होते. तो जरी शांतीचा अधिपती होता, त्याचे आगमन म्यानातून तरवार बाहेर काढल्याप्रमाणे होते. जे राज्य तो स्थापन करण्यास आला होता ते यहूदी लोकांच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध होते. इस्राएल लोकांच्या संस्काराचा आणि अर्थपद्धतीचा तो मूळ पाया असून त्याच्याकडे शत्रू आणि विध्वंशक म्हणून पाहाण्यात आले. ज्याने सिनाय पर्वतावरून नियम घोषीत केले त्याला त्याची पायमल्ली करणारा म्हणून दोषी ठरविले. जो सैतानी सत्ता मोडायला आला त्यालाच बालजबूब म्हणून दोष दिला. ह्या भूतलावरील कोणालाही त्याच्याविषयी समज झाला नाही, आणि त्याच्या सेवाकार्यात त्याला एकटेच राहावे लागले. त्याच्या सबंध आयुष्यात त्याची माता आणि बंधू यांना त्याचे कार्य समजले नाही. त्याच्या शिष्यांनासुद्धा त्याचा अर्थबोध झाला नाही. देवाबरोबर असल्याप्रमाणे निरंतरच्या प्रकाशात तो राहिला परंतु त्याचे पृथ्वीवरील जीवन एकांतवासातले होते. DAMar 77.4

    आम्हाशी एकरूप असल्यामुळे त्याला आमचे अपराध, दोष, आणि अनर्थ अरिष्टे वाहायाचे होते. निष्पाप्याला पापाच्या कलंकाचा अनुभव आला पाहिजे. शांतीप्रिय लोकांना भांडखोर व्यक्तीबरोबर राहावे लागले, सत्य असत्याबरोबर आणि पावित्र्य अधमाबरोबर राहिले पाहिजे. स्वैरवर्तनामुळे, आज्ञाउलंघनामुळे आलेले प्रत्येक पाप, प्रत्येक बेबनाव, प्रत्येक भ्रष्ट वासना त्याच्या आत्म्याला तीव्र वेदना देत होत्या. DAMar 78.1

    एकट्यानेच त्याला मार्गक्रमण करायचे होते; एकट्यानेच त्याला ओझे वाहायाचे होते. ज्याने आपले वैभव बाजूला ठेवले आणि मानवतेचा कमकुवतपणा स्वीकारला त्याच्यावर जगाचा उद्धार अवलंबून होता. त्याने ते पाहिले आणि त्याचा अनुभव घेतला, परंतु त्याचा उद्देश खंबीर, निश्चल राहिला. त्याच्या बाहूवर पतित मानवजातीचा उद्धार अवलंबून होता, आणि सर्वशक्तीमान प्रेममय देवाचा हात पकडण्यासाठी त्याने आपला हात पुढे केला.DAMar 78.2

    अंतःकरणपूर्वक प्रार्थना करीत असतांना उद्धारकाचा ओझरता दृष्टिक्षेप जणू काय स्वर्गात प्रवेश करीत होता. पापामुळे मनुष्याची मने कशी कठोर झाली आहेत आणि त्याच्या कार्याची ओळख करून घेऊन उद्धारदानाचा स्वीकार करणे किती मुष्कील आहे हे त्याला अवगत होते. त्यांच्या अविश्वासावर विजय मिळण्यासाठी, ज्या बंधनाने सैतानाने त्यांना बंदिस्त करून ठेवले आहे त्यातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी संहारकाचा पराभव करण्यासाठी तो पित्याजवळ कळकळीची याचना करितो. त्याच्या पुत्राच्या वतीने (पुत्रामध्ये) देव मानवतेचा स्वीकार करतो त्या साक्षीसाठी तो विनवणी करितो.DAMar 78.3

    आतापर्यंत दूतांनी अशी प्रार्थना केव्हाही ऐकली नव्हती. समाधानाचा, दुःखपरिहाराचा व खात्रीचा संदेश आपल्या प्रिय अधिपतीला देण्यासाठी ते उत्सुक आहेत. परंतु तसे नाही. पिता स्वतः आपल्या पुत्राच्या प्रार्थनेचे उत्तर देईल. प्रत्यक्ष राजासनापासून त्याच्या गोरावाचे तेज प्रसृत होते. आकाश उघडले आणि उद्धारकाच्या माथ्यावर कबुतरासारखा शुद्ध, पवित्र प्रकाश उतरला, - सौम्य आणि नम्र असलेल्याचे ते अनुरूप आणि साजेसे चिन्ह होते.DAMar 78.4

    यार्देन नदीवर जमलेल्या मोठ्या जमावापैकी योहानाला सोडून थोड्यांनाच स्वर्गीय दृष्टांताचे आकलन झाले. तथापि दैवी समक्षतेच्या गांभीर्याचा प्रभाव सर्वावर पडला. लोक शांत उभे राहून ख्रिस्ताकडे टक लावून पाहात होते. देवाच्या सिंहासनाभोवती सतत असलेल्या प्रकाशाने त्याला घेरले होते. वर केलेला त्याचा चेहरा वैभवाने प्रफुल्लीत झाला होता. आतापर्यंत त्यांनी मनुष्याचा असा चेहरा पूर्वी कधी पाहिला नव्हता. आकाश उघडले आणि वाणी ऐकली. ती म्हणाली, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय, याजवर मी संतुष्ट आहे.”DAMar 78.5

    त्या स्थळी हजर असलेल्या लोकांचा विश्वास दृढ व्हावा आणि कार्यासाठी उद्धारकाला पष्टी द्यावी म्हणून त्या घोषणेचे समर्थन करण्यात आले होते. अपराधी जगाचे पाप ख्रिस्तावर लादलेले असतांना आणि पतित मानवी स्वभाव धारण करून मानहानी पत्करली असतानासुद्धा आकाशातील वाणीने तो सनातन देवपुत्र आहे अशी घोषणा केली.DAMar 79.1

    पित्याचा मान्यतेसाठी येशू अगदी कळकळीने डोळ्यात अश्रू आणून नम्रतेने प्रार्थना करीत असलेला पाहून योहानाचे मन भरून आले होते, त्याच्या भावना उद्दीपित झाल्या होत्या. देवाचे वैभव त्याच्याभोवती प्रकाशत होते आणि आकाशातून वाणी ऐकली तेव्हा देवाने दिलेल्या आश्वासनाचे योहानाला आकलन झाले. जगाच्या उद्धारकाचा बाप्तिस्मा त्याने केला हे त्याला कळले. त्याच्यावर पवित्र आत्मा आला आणि येशूकडे हात करून मोठ्याने म्हणाला, “हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा.”DAMar 79.2

    “देवाचा कोकरा’ ह्या शब्दाच्या गर्भितअर्थाचा उमज कोणालाही झाला नाही, वक्त्यालासुद्धा नाही. मोरिया पर्वतावर आब्राहामाने आपल्या मुलाचा प्रश्न ऐकला, “बाबा, होमबलीसाठी कोकरू कोठे आहे?’ बापाने उत्तर दिले, “बाळा, देव स्वतः होमबलीसाठी कोकरू पाहून देईल.” उत्पत्ति २२:७, ८. देवाने पुरविलेला एडका याच्यामध्ये जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा याचे दर्शक आब्राहामाने पाहिले. तो त्यांच्या पापासाठी मरणार होता. यशया संदेष्ट्याच्याद्वारे पवित्र आत्म्याने उद्धारकाविषयी भाकीत केले. “वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे त्याला आणिले,” “आणि आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले.’ यशया ५३:६, ७. परंतु त्यातील अर्थ, धडा इस्राएल लोकांना समजला नाही. पुष्कळांनी विधर्मी लोकाप्रमाणेच होमबली अर्पणाचा अर्थ लावून घेतला - म्हणजे अशा यज्ञाद्वारे ते स्वतःच देवाची आराधना करून त्याचे सांत्वन करू शकतात. ह्यामध्ये देवाला धडा शिकवायचा होता की, त्याच्या स्वयंस्फूर्त प्रेम प्रेरणेने प्राप्त झालेल्या दानाने लोकांचा स्वतःशी समेट घडून येतो.DAMar 79.3

    “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याजवर मी संतुष्ट आहे,’ ख्रिस्ताला बोललेले हे उद्गार मानवतेचा स्वीकार करितात. आमचा प्रतिनिधी म्हणून देवाने ख्रिस्ताला संबोधिले. आमच्यामध्ये पाप आणि व्यंग दोष कितीही असले तरी आम्हाला निरूपयोगी टाकाऊ म्हणून बाजूला सारले नाही. “त्याने आपल्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता आगाऊ नेमिले.” इफिस. १:६. ख्रिस्ताचे झालेले गौरव आम्हावरील देवाची प्रेमप्रतिज्ञा होती. प्रार्थनेचे सामर्थ्य त्यामध्ये सांगितले आहे, - आमची याचना देवाच्या कानी कशी पडते, आणि आमची विनवणी स्वर्गीय दरबारात कशी मान्य करण्यात येते याविषयी सांगितले आहे. पापामुळे पृथ्वी स्वर्गापासून दुरावली आणि स्नेहसंबंध तुटला; परंतु येशूने प्रभावलयाने पुन्हा ती जोडली. त्याच्या प्रेमाने मनुष्याला घेरले आणि ते अगदी उंच स्वर्गाला भिडले. आमच्या उद्धारकाच्या मस्तकावर उघड्या द्वारातून जो प्रकाश चमकला तोच प्रकाश मोहावर विजय मिळविण्यास प्रार्थना करीत असतांना आम्हावर येईल. येशूला बोललेली वाणी प्रत्येक भक्ताला म्हणते, हे माझे परमप्रिय मूल आहे, याजवर मी संतुष्ट आहे.DAMar 79.4

    “प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहो, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही; तरी आपणाला हे माहीत आहे की तो प्रगट झाल्यावर आपण त्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.” १ योहान ३:२. आमच्या उद्धारकाने मार्ग मोकळा केला आहे त्यामुळे अतिशय पापी, अतिशय गरजवंत कंगाल, तुच्छ लेखलेला आणि व्यथित झालेला, या सर्वांना पित्यासमोर जाण्यास प्रवेश मिळेल. येशू जागा तयार करण्यास गेला आहे तेथे सर्वांना राहाण्यास स्वतःचे घर मिळेल: “जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करीत नाही आणि जो बंद करितो आणि उघडीत नाही... पाहा, मी तुजपुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही.’ प्रगटी. ३:७, ८.DAMar 80.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents