Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ७२—“माझ्या स्मरणार्थ”

    मत्तय २६:२०-२९; मार्क १४:१७-२५; लूक २२:१४-२३; योहान १३:१८-३०.

    “ज्या रात्री प्रभु येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली,; आभार मानून ती मोडिली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.’ १ करिंथ. ११:२३-२६.DAMar 571.1

    दोन युगाच्या आणि त्यांच्या दोन सणाच्या संक्रमणकाली ख्रिस्त उभे होता. तो देवाचा निष्कलंक कोंकरा असून पापार्पणासाठी अर्पिला जाऊन त्याच्या मरणाकडे अंगुलीनिर्देश करणारे चार हजार वर्षे चाललेल्या विधीसंस्काराची समाप्ती तो करणार होता. शिष्यांच्याबरोबर वल्हांडण सण साजरा करीत असतांना त्याची जागा घेणारा विधि त्याने प्रस्थापित केला आणि तो त्याच्या महान यज्ञाचे स्मारक राहाणार होता. यहूद्यांच्या राष्ट्रीय सणाचा शेवट लवकरच होणार होता. जो सेवाविधि ख्रिस्ताने प्रस्थापित केला तो त्याच्या अनुयायांनी सर्व देशात आणि सर्व युगात पाळावयाचा होता.DAMar 571.2

    मिसर देशाच्या पाडावपणातून इस्राएलाच्या झालेल्या मुक्तीचे स्मारक म्हणून वल्हांडण सण पाळण्यात आला. वर्षानुवर्षे ह्यामध्ये देवाने मार्गदर्शन केले. मुलाबाळांनी ह्या विधीचा अर्थ विचारल्यावर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात येत असे. अशा रीतीने अद्भुत मुक्तीची घटना सर्वांच्या मनात ताजी ठेवण्यात येत असे. ख्रिस्ताच्या मरणाने जी महान मुक्तता झाली त्याचे स्मारक म्हणून प्रभु भोजनाचा विधि देण्यात आला. गौरवाने व सामर्थ्याने तो दुसऱ्यांदा येईल तोपर्यंत हा विधि पाळण्यात येईल. ह्याच्याद्वारे त्याने आमच्यासाठी केलेले महान कार्य आमच्या मनात ताजे राहील.DAMar 571.3

    मिसर देशातून सुटका होण्याच्या वेळी इस्राएल लोकांनी वल्हांडण सणाची मेजवाणी कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन घाईघाईने खाल्ली आणि प्रवासाला तयार झाले. ज्या पद्धतीने हा विधि साजरा केला त्याचा मेळ त्यावेळच्या परिस्थितीशी बसला. कारण ते मिसर देशातून निघून अरण्यातील खडतर व कष्टमय प्रवासाला सुरूवात करणार होते. परंतु ख्रिस्ताच्या वेळची परिस्थिती बदलेली होती. आता त्यांना अपरिचित देश सोडून जायाचा नव्हता तर ते त्यांच्या स्वतःच्या देशाचे रहिवासी होणार होते. त्यांना देण्यात आलेल्या विसाव्याच्या संदर्भात लोक वल्हांडण सणात अंग टाकून रेलून भाग घेत होते. मंचक, कोच मेजाभोवती ठेवले होते. त्यावर बसून पाहुण्यांनी डावा हात टेबलावर टेकला होता व उजवा हात खाण्यासाठी मोकळा ठेवला होता. अशा परिस्थितीत पाहुणा आपले डोके जवळ बसलेल्याच्या छातीवर टेकू शकत होता. पाय कोचाच्या बाहेरच्या बाजूला धुतले जाऊ शकत होते.DAMar 571.4

    मेजावर वल्हांडण सणाचे भोजन ठेविले होते आणि ख्रिस्त अजून तेथेच टेबलावर होता. सणात वापरण्यात येणारी बेखमीर भाकरी त्याच्यासमोर होती. न आंबवलेला द्राक्षारसही मेजावर होता. हे प्रतीक ख्रिस्ताच्या निष्कलंक यज्ञाचे दर्शक होते हे ख्रिस्त दर्शवित होता. पाप व मरण यांच्याद्वारे काहीच भ्रष्ट झाले नव्हते ते “निष्कलंक व निर्दोष कोकरा’ यांचे दर्शक होते. १ पेत्र १:१९.DAMar 572.1

    “मग ते भोजन करीत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले. घ्या. खा. हे माझे शरीर आहे; आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुति करून तो त्यास दिला व म्हटले तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता ओतले जात आहे. मी तुम्हास सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.”DAMar 572.2

    ह्या विधीच्या समयी विश्वासघात करणारा यहूदा हजर होता. माराने इजा झालेले त्याचे शरीर व सांडलेले रक्त यांचे प्रतीक येशूपासून त्याला मिळाले. “हे माझ्या स्मरणार्थ करा’ हे उद्गार त्याने ऐकिले. देवाच्या कोकऱ्याच्या समक्षतेत बसून विश्वासघातकी आपल्या सूडबुद्धीच्या विचारात व दुष्ट उद्देशांत निमग्न होता.DAMar 572.3

    पाय धुण्याच्या समयी यहूदाचा स्वभाव ख्रिस्ताला समजला होता ह्याचा त्याने खात्रीदायक पुरावा दिला होता. त्याने म्हटले, “तुम्ही सगळेजण शुद्ध नाही.” योहान १३:११. ह्या उद्गाराने त्याची गुप्त योजना ख्रिस्ताला समजल्याची विश्वासघातकी शिष्याची खातरी झाली. आता ख्रिस्त स्पष्टच बोलला. मेजासभोवती बसल्यावर शिष्यांकडे पाहून म्हटले, “मी तुम्हा सर्वाविषयी बोलत नाही, जे मी निवडिले ते मला माहीत आहेत, तरी जो माझी भाकरी खातो त्याने माझ्यावर टाच उचलेली आहे.”DAMar 572.4

    अजून यहदाविषयी शिष्यांच्या मनात संशय आला नव्हता. पवित्र ख्रिस्त अस्वस्थ झालेला त्यांनी पाहिला. सर्वावर ढग स्थिरावला होता, ती भयानक विपत्तीची पूर्व सूचना होती. त्याचे हुबेहूब स्वरूप त्यांना समजले नाही. शांतपणे ते जेवत असताना येशूने म्हटले, “मी तुम्हाला खचित सांगतो तुम्हापैकी एकजण मला धरून देईल.” ह्या उद्गाराने त्यांना आश्चर्य वाटून त्यांची गाळण उडाली. त्यांच्या दिव्य गुरूजीशी त्यांच्यापैकी कोणी एकजण विश्वासघाताने कसा वागेल हे त्यांना समजेना. कोणत्या कारणाने ते विश्वासघात करतील? आणि कोणासाठी? कोणाच्या मनाला असली दुष्ट कल्पना सुचली? इतरापेक्षा त्याचे प्रवचन ऐकण्याची अधिक संधि ज्याना लाभली, त्याच्या प्रेमात जे सहभागी झाले आणि त्याच्या घनिष्ट संबंधात आणून आम्हावर प्रेमभाव दर्शविला त्या आम्हा त्याच्या मर्जीतल्या बाराजणापैकी खात्रीने कोणी एकजण नसणार!DAMar 572.5

    त्याच्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजल्यावर आणि त्याचे म्हणणे कसे सत्य आहे याचे स्मरण झाल्यावर त्यांना भीतीने घेरले व स्वतःविषयीच शंका वाटू लागली. त्यांच्या मनात त्यांच्या गुरूविषयी कुबुद्धी आहे की नाही यासंबधी स्वःमनाचा शोध घेऊ लागले. ते फार खिन्न झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला, “प्रभूजी, मी तर नाही ना?” परंतु यहूदा शांत बसला होता. अतिशय दुःखित होऊन योहानाने विचारिले, “प्रभूजी, तो कोण आहे?’ येशूने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.’ “प्रभूजी, मी आहे काय?’ असे जेव्हा शिष्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी एकमेकांचे चेहरे निरखून पाहिले. आता शांत बसलेल्या यहूदावर सर्वांचे डोळे रोखले. प्रश्नांच्या गोंधळात व आश्चर्यचकित होऊन काढलेल्या उद्गारात योहानाच्या प्रश्नाला येशूने दिलेले उत्तर यहूदाने ऐकिले नव्हते. परंतु शिष्यांची चौकशी टाळण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच त्यानेही विचारिले, “गुरूजी, मी तर नाही ना?” येशूने गांभीर्याने म्हटले, “होय, तूच.”DAMar 573.1

    त्याचे उद्दिष्ट उघड झालेले पाहन त्याला आश्चर्य वाटले व मनाचा गोंधळ होऊन यहदाने गडबडीने खोली सोडली. “मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक... मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.” ख्रिस्तापासून दूर गेल्यावर विश्वास घातक्याला रात्र निबिड अंधाराची झाली.DAMar 573.2

    ही पायरी ओलांडण्यापर्यंत यहृदाला अनुतप्त होण्याची शक्यता उपलब्ध होती. परंतु प्रभूची आणि त्याचे सहशिष्यवर्ग यांची समक्षता सोडून बाहेर पडला तेव्हाच अखेरचा निर्णय ठाम झाला. त्याने सीमारेषा ओलांडली होती. DAMar 573.3

    मोहात पडलेल्या व्यक्तीला येशूने दिलेली सहिष्णुतीची वागणूक वाखाणण्यासारखी होती. यहूदाच्या उद्धारासाठी जे करायला पाहिजे होते ते सर्व केले होते. त्याच्या प्रभूचा दोन वेळा विश्वासघात करण्याची प्रतिज्ञा केल्यानंतरही येशूने त्याला अनुताप करण्यास संधि दिली होती. विश्वासघातक्याच्या अंतःकरणातील गुप्त योजना समजल्यावर ख्रिस्ताने यहदाला त्याच्या देवत्वाचा अखेरचा खात्रीदायक पुरावा दिला होता. ह्या नकली, अप्रामाणिक शिष्याला पश्चात्ताप करण्यासाठी दिलेले अखेरचे पाचारण होते. त्यामध्ये कसलीही कसूर करण्यात आली नव्हती. हट्टी, दुराग्रही, अहंकाराने दयेच्या लहरी मागे हटविल्या होत्या तरी विनम्र प्रेमलाटा उग्र स्वरुपात परत आल्या होत्या. परंतु त्याच्या गुन्ह्याच्या जाणीवेने जरी त्याला भयप्रद आश्चर्य वाटले तरी यहूदा अधिक निश्चयी व करारी बनला. प्रभु भोजनाच्या विधीनंतर विश्वासघातकी कृत्य करण्यास तो बाहेर पडला.DAMar 573.4

    यहूदावरील अनर्थाची घोषणा करण्यात शिष्यावरील दयेचा उद्देश ख्रिस्ताने व्यक्त केला. त्याच्या अभिषिक्तपणाचा स्पष्ट श्रेष्ठ पुरावा त्याने सादर केला. त्याने म्हटले, “हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.’ त्यावेळेस त्याच्यावर येणाऱ्या गोष्टीविषयी तो शांत राहिला असता तर त्यांना वाटले असते की गुरूजीला दिव्य दूरदृष्टी नाही आणि त्याचे आश्चर्य वाटून ते खूनी, प्राणघातकी जमावाच्या हाती लागले असते. एक वर्षापूर्वी येशूने शिष्यांना सांगितले होते की त्याने बाराजणांना निवडिले होते आणि त्यातील एक सैतान होता. त्याचे विश्वासघातकी कृत्य गुरूजीला पूर्णपणे ज्ञात आहे ह्याविषयी यहूदाला बोललेले शब्द ऐकून त्याच्या मानहानीच्या प्रसंगी खऱ्या अनुयायांचा विश्वास दृढ होईल आणि यहूदाचा प्राणघातक शेवट झाल्यावर त्याने विश्वास घातक्याविषयी काढलेल्या अनर्थाच्या बोलाची त्यांना आठवण होईल.DAMar 574.1

    तारणाऱ्याचा आणखी एक ह्यामध्ये हेतू होता. तो विश्वासघातकी आहे असे समजल्यावरसुद्धा त्याने त्याच्याकडून सेवाकार्य काढून घेतले नव्हते. पाय धुण्याच्या वेळेस त्याने काढिलेले शब्द “तुम्ही सगळेजण शुद्ध नाही,” आणि मेजावर बसल्यावर उद्गारलेले शब्द “जो माझी भाकरी खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचलली आहे.” योहान १३:११, १८. ह्या शब्दांचे शिष्यांना आकलन झाले नव्हते. परंतु नंतर त्याचा अर्थबोध झाल्यावर गंभीर चुका करणाऱ्याशी देव कसा सहिष्णुतीने व सदयतेने वागतो हा विचार त्याच्या मनात घोळत होता.DAMar 574.2

    प्रारंभापासून येशू यहूदाला ओळखीत होता तरी येशूने त्याचे पाय धुतले. ह्या विधीमध्ये ख्रिस्ताबरोबर एकजीव होण्यास विश्वासघातक्याला संधि मिळाली होती. उद्धारकाचा स्वीकार करावा, अनुतप्तदग्ध व्हावे आणि पापाच्या सर्व अमंगलतेपासून शुद्ध व्हावे ह्याकरिता सहिष्णु उद्धारक पाप्यापुढे सर्व प्रकारच्या उत्तेजनाच्या गोष्टी सादर करीत होता. आम्हासाठी हे उदाहरण आहे. एका व्यक्तीने मोठी चूक केली आहे असे समजल्यावर आपण त्या व्यक्तीपासून दूर राहू नये. निष्काळजीपणाने त्याला अलिप्त ठेवून त्याला मोहाचे भक्ष्य होण्यास सैतानाच्या भूमीवर हुसकून लावू नये. ही ख्रिस्ताची पद्धत नाही. शिष्य चुका करीत होते आणि ते अपराधी होते आणि त्याने त्यांचे पाय धुतले आणि एकटा सोडून बाकीच्या सर्वांनी पश्चात्ताप केला.DAMar 574.3

    ख्रिस्ताच्या उदाहरणावरून प्रभुभोजनाच्या वेळी कोणालाही वगळून टाकू नये. अर्थात हे खरे आहे की उघड पाप अपराध्याला वगळून टाकिते. ही पवित्र आत्म्याची स्पष्ट शिकवण आहे. १ करिंथ. ५:११. हे सोडून इतर बाबतीत न्याय करीत बसू नये. ह्यामध्ये कोणी भाग घ्यावा हे माणसाच्या कक्षेत देवाने ठेविले नाही. कारण अंतःकरण कोण जाणतो? निधन आणि गहू ह्यामधील फरक कोण जाणतो? “म्हणून माणसाने आत्मपरिक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.” “ह्यास्तव जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल.” “कारण त्या शरीराचे मर्म ओळखिल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.” १ करिंथ. १९:२८, २७, २९.DAMar 575.1

    विधिसंस्कार साजरा करण्यासाठी श्रद्धावंत एकत्र जमतात तेव्हा अदृश्य संदेशवाहक तेथे हजर असतात. जमावामध्ये यहूदा हजर असेल त्यावेळी अंधकाराच्या अधिपतीचे संदेशवाहक तेथे हजर राहातात कारण पवित्र आत्म्याची सत्ता झुगारून देणाऱ्यांच्या सेवेसाठी ते असतात. दिव्य दूतसुद्धा हजर असतात. हे अदृश्य अतिथी अशा प्रकारच्या सर्व प्रसंगी हजर असतात. सत्य व पावित्र्य यांचा ध्यास न लागलेले त्या जमावात असू शकतील आणि विधीमध्ये भाग घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना प्रतिबंध करू नये. शिष्यांचे आणि यहूदाचे पाय येशूने धुतल्याचे ज्यांनी पाहिले ते साक्षीदार तेथे हजर असू शकतील. हे दृश्य मानवापेक्षा दिव्य गणाने पाहिले.DAMar 575.2

    हा विधि शिक्कामोर्तब करण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे ख्रिस्त तेथे हजर असतो. खात्री करून नम्र बनविण्यासाठी तो तेथे असतो. डोळ्यात दिसणारा भाव आणि पश्चात्तापाचा विचार त्याच्या दृष्टिक्षेपातून निसटत नाही. कारण अनुतप्तदग्ध आणि हृदयभंग झालेल्यांची तो अपेक्षा करितो. अशा व्यक्तींचा स्वीकार करण्यास सर्व काही सज्ज असते. ज्याने यहूदाचे पाय धुतले तो प्रत्येकाच्या अंतःकरणाचे पापक्षालन करण्यास उत्कंठित आहे. DAMar 575.3

    जमावात कोणी अपात्र आहेत म्हणून कोणी विधीमध्ये भाग घेण्याचे रहित करू नये. प्रत्येक शिष्याने उघडपणे त्यामध्ये भाग घेऊन व्यक्तिवाचक तारणारा म्हणून ख्रिस्ताचा स्वीकार केल्याची ग्वाही द्यावी. ज्याचे हात व अंतःकरण स्वच्छ नाही अशी व्यक्ती हा विधि चालवू शकते तथापि त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी ख्रिस्त तेथे उपस्थित असतो त्याच्यावर विश्वास ठेवून येणारे सर्वजण आशीर्वाद होतात. पण ह्या द्विव्य प्रसंगाकडे दुर्लक्ष करणारे देवाच्या आशीर्वादाला मुकतात. त्यांच्या संबंधी “तुम्ही सर्व शुद्ध नाही’ हे विधान उचित आहे.DAMar 575.4

    भाकर व द्राक्षारस यांच्या विधीमध्ये, ख्रिस्ताने शिष्याबरोबर भाग घेऊन तो त्यांचा उद्धारक असल्याची प्रतिज्ञा व्यक्त केली. त्याने त्याना नवा करार दिला त्याद्वारे त्याचा स्वीकार करणारे त्याची मुले व ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस बनतात. ह्या कराराद्वारे ह्या जीवनात व येणाऱ्या जीवनात स्वर्गातून लाभणारा प्रत्येक कृपाप्रसाद त्यांचा होतो. ह्या कराराची कृती ख्रिस्तरुधिराने पूर्ण करण्यात आली. अखिल मानवजातीसाठी केलेल्या महान बलीदानाचा हा विधि एक वैयक्तिक भाग आहे असे शिष्यांच्या समोर ठेविले पाहिजे.DAMar 575.5

    प्रभुभोजनाचा विधि दुःख करण्याचा प्रसंग नाही. हा त्याचा उद्देश नाही. त्याच्या मेजाभोवती त्याचे शिष्य गोळा झाल्यावर त्यांनी त्यांच्या चुकांचे व दोषांचे स्मरण करून शोक करीत बसायचे नाही. त्यांचा भूतकाळातील अनुभव, सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून बसायचे नाही. परस्परातील दुजाभावाची आठवण त्यांनी करायची नव्हती. प्रारंभिक विधीमध्ये हे सर्व आले आहे. आत्मपरिक्षण, पाप कबुली मतभेदाचा समेट ही सर्व करण्यात आली आहेत. आता ते ख्रिस्ताला भेटण्यासाठी येतात. त्यांना वधस्तंभाच्या छायेत राहायचे नाही तर त्याच्या तारणदायी प्रकाशात. धार्मिकतेच्या सूर्य प्रकाशाच्या मोल्यवान रुधिराने शुचिर्भूत होऊन, त्याच्या अदृश्य समक्षतेत त्यांना ते वचन ऐकायचे आहे, “मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही.” योहान १४:२७. DAMar 576.1

    आमचा प्रभु म्हणतो, पापाची खात्री झाल्यावर स्मरण ठेवा की मी तुमच्यासाठी मरण पावलो. माझ्यासाठी आणि सुवार्तेसाठी तुम्हाला निष्ठुरतेने वागवून तुमचा क्लेशदायक छळ करतील तेव्हा तुम्ही माझ्या प्रेमाचे स्मरण ठेवा. ते इतके महान आणि अपरिमित आहे की तुमच्यासाठी मी प्राण दिला. जेव्हा तुमचे कर्तव्य कडक व करारी आणि ओझे वाहाण्यास फार भारी दिसते तेव्हा लज्जा तुच्छ मानून तुमच्यासाठी मी वधस्तंभ वाहिला याची आठवण ठेवा. कठीण कसोटीला तोंड देतांना तुमचे अंतःकरण अंकुचन पावते तेव्हा तुमचा उद्धारक तुमच्यासाठी मध्यस्थी करण्यास जीवंत आहे ह्याची आठवण करा.DAMar 576.2

    प्रभुभोजनाचा विधि ख्रिस्ताचे द्वितियागमन सूचित करितो. शिष्यांच्या मनात ही आशा ठळक ठेवण्यासाठी ह्याची योजना केली होती. त्याचे मरण साजरे करण्यासाठी जेव्हा जेव्हा ते एकत्र आले तेव्हा तेव्हा त्यांनी सविस्तर सांगितले, “आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुति करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता ओतले जात आहे. मी तुम्हास सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.प्रभूच्या द्वितियागमनाच्या आशेने त्यांच्या क्लेशात त्यांचे समाधान झाले, “कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.” १ करिंथ. ११:२६. हा विचार त्यांना वर्णनातीत मोल्यवान होता.DAMar 576.3

    ह्या गोष्टींचे आम्हाला केव्हाही विस्मरण व्हायला नको. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरिते हा विचार आम्ही आमच्या स्मरणात ताजा ठेविला पाहिजे. आमच्या वतीने व्यक्त केलेल्या देवाच्या प्रेमाचा प्रभाव आमच्या ज्ञानेंद्रियावर व्हावा म्हणून ख्रिस्ताने हा विधि प्रस्थापित केला. ख्रिस्ताविना देव व आमचा आत्मा यांच्यात एकीकरण नसणार. येशूच्या प्रेमाने बांधवामधील परस्पर प्रेम व एकीकरण घट्ट सांधून त्याला अनंत रूप दिले पाहिजे. केवळ ख्रिस्ताच्या मरणानेच त्याचे प्रेम आमच्या जीवनात गुणकारी ठरेल. केवळ त्याच्या मरणामुळेच आम्ही त्याच्या दुसऱ्या आगमनाकडे हर्षाने पाहू शकतो. त्याचा यज्ञ आमच्या आशेचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यावर आम्ही आमच्या आशा स्थिर, निश्चित केल्या पाहिजेत.DAMar 576.4

    आमच्या प्रभूची मानखंडना आणि क्लेश दर्शविणारे विधिसंस्कार केवळ रूप किंवा आकार असल्याचे समजले जाते. विशिष्ट हेतूसाठी त्यांची स्थापना करण्यात आली होती. देवभक्तीचे रहस्य आकलन होण्यासाठी आमची ज्ञानेंद्रिय प्रज्वलित झाली पाहिजेत. प्रायश्चितासाठी ख्रिस्ताने भोगलेल्या क्लेशाचे पूर्ण आकलन करून घेण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. “जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१४, १५. कॅलव्हरीवरील वधस्तंभावर मरणाऱ्या तारणाऱ्याचे दर्शन घेऊ या. आमचे अनंत कुतुहल ख्रिस्तावर विश्वास दर्शविण्याची मागणी करीते. DAMar 577.1

    आमच्या प्रभूने म्हटले, “तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही... कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे.” योहान ६:५३-५५. आमच्या स्वाभाविक स्वभावाविषयी हे खरे आहे. ख्रिस्ताच्या मरणाला आमचे ऐहिक जीवन ऋणी आहे. जी भाकर आपण खातो ती त्याच्या मोडलेल्या शरीराची खरेदी आहे. जे पाणी आम्ही पितो ते त्याच्या सांडलेल्या रक्ताने विकत घेतलेले आहे. संत असो की पापी असो त्यांचे पोषण ख्रिस्ताचे शरीर व त्याचे रक्त यांच्याद्वारे होते. प्रत्येक पावावर कॅलव्हरीच्या वधस्तंभाचा शिक्का मारलेला आहे. पाण्याच्या प्रत्येक झऱ्यामध्ये ते प्रतिबिंबीत झाले आहे. त्याच्या महान यज्ञाच्या नेमून दिलेल्या प्रतीकामध्ये ख्रिस्ताने हे सर्व शिकविले आहे. माडीवरील प्रभूभोजनाच्या विधीपासून चमकणाऱ्या प्रकाशाने आमच्या जीवनाचा अन्न पुरवठा पवित्र होतो. कुटुंबाचा मेज प्रभूचा मेज होतो आणि प्रत्येक भोजन प्रभूभोजन होते.DAMar 577.2

    आमच्या आध्यात्मिक स्वभावाविषयी ख्रिस्ताने काढलेले शब्द कसे खरे ठरतात. त्याने घोषीत केले, “जो माझा देह खातो व रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.” कॅलव्हरीवरील वधस्तंभावर समर्पण केलेल्या जीवनाचा स्वीकार केल्याने आम्ही पवित्र जीवन जगू शकतो. त्याच्या वचनाचा स्वीकार केल्याने, त्याने आज्ञापिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने आम्हाला ते जीवन लाभते. अशा प्रकारे आम्ही त्याच्याशी एकजीव होतो. त्याने म्हटले, “जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहातो व मी त्याच्यामध्ये राहातो. जसे जीवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.’ योहान ६:५४, ५६, ५७. हे शास्त्रवचन खऱ्या अर्थाने प्रभूभोजनाच्या विधीला लागू पडते. प्रभूच्या महान यज्ञावर विश्वासाने जसे चिंतन करितो तसे आत्मा ख्रिस्ताच्या आध्यात्मिक जीवनाशी एकरूप होतो. प्रत्येक सख्यसंबंधाद्वारे आत्म्याला आध्यात्मिक बळ प्राप्त होईल. सेवेद्वारे जीवंत संबंध जडतो आणि त्यामुळे श्रद्धावंत ख्रिस्ताशी निगडीत होतो व पर्यायाने पित्याशी घट्ट बांधिला जातो. विशेष अर्थाने परावलंबी मानव व देव यांचा घनिष्ट संबंध होतो.DAMar 577.3

    जेव्हा आम्ही ख्रिस्ताचे शरीर व सांडलेले रक्त यांचे दर्शक म्हणून प्रभूभोजनाच्यावेळी भाकर व द्राक्षारस घेतो तेव्हा आम्ही काल्पनिकदृष्ट्या माडीवरील खोलीतील प्रभूभोजनाच्या विधीत भाग घेतो. जगाचे पाप वाहून त्याच्या प्राणांतिक दुःखाने पवित्र कार्यासाठी वाहून दिलेल्या बागेतून आम्ही जात आहोत असे आम्हाला वाटते. ज्या प्रयासाने देवाशी आमचा समेट घडवून आणिला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. वधस्तंभावर खिळिलेला ख्रिस्त आम्हापुढे ठेवलेला आहे.DAMar 578.1

    वधस्तंभावरील तारणाऱ्यावर दृष्टिक्षेप करून चिंतन केल्यास स्वर्गातील परात्पराने केलेल्या महान यज्ञाचा सखोल अर्थ व महत्त्व यांचे पूर्णपणे आकलन होते. आमच्यासमोर तारणाच्या योजनेचा गौरव करण्यात आला आहे आणि कॅलव्हरीच्या विचाराने आमच्या अंतःकरणात जीवंत व पवित्र भावना जागृत होतात. आमच्या अंतःकरणात व ओटावर देव व कोकरा याच्यासाठी स्तुती स्तोत्रे राहातील; कारण ज्यांच्या स्मरणात कॅलव्हरीचा देखावा ताजा तवाना राहातो त्या आत्म्यामध्ये अहंकार व स्वयंपूजा वृद्धी पावू शकत नाही.DAMar 578.2

    जो उद्धारकाचे अतुल्य प्रेम निरखून पाहातो त्याचे विचार भारदस्त होतील, त्याचे अंतःकरण पवित्र होईल, त्याच्या शीलस्वभावाचे रूपांतर होईल. तो जगात प्रकाशमान होईल आणि अगम्य प्रेमाचे काही अशी प्रतिबिंब पाडील. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जितके अधिक चिंतन आणि मनन करू तितक्या अधिक प्रमाणात प्रेषिताची भाषा आत्मसात करू. त्याने म्हटले, “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.” गलती. ६:१४.DAMar 578.3