Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ६८—बाहेरील अंगणात

    योहान १२:२०-४३.

    “सणात उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते; त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज, येशूला येऊन भेटावे असे आमच्या मनात आहे. फिलिप्पाने येऊन आंद्रियाला सांगितले आणि आंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले.” DAMar 542.1

    ह्या वेळेस ख्रिस्ताचे काम अपयशी झाल्यासारखे वाटत होते. याजक व परूशी यांच्याशी झालेल्या संघर्षात तो विजेता राहिला, परंतु मशिहा म्हणून त्याचा ते केव्हाही स्वीकार करणार नव्हते. अखेरचा विरह येऊन ठेपला. शिष्य हताश झाले होते. परंतु ख्रिस्त त्याच्या कार्याच्या पूर्णतेप्रत आला होता. यहदी राष्ट्रासाठीच नाही तर सर्व जगासाठी महान घटना घडण्याच्या बेतात होती. उत्कंटतेने केलेली विनंती “येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे’ ख्रिस्ताने ऐकल्यावर त्याचा चेहरा प्रकाशमान झाला आणि त्याने म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.” हेल्लेणी लोकांनी केलेल्या विनंतीमध्ये त्याच्या महान यज्ञाची परिणति त्याने पाहिली.DAMar 542.2

    प्रारंभी ज्ञानी लोक पूर्वेकडून जसे आले होते तसे पश्चिमेकडून हे लोक त्याच्या जीवनाच्या शेवटी उद्धारकाला पाहाण्यासाठी आले होते. ख्रिस्त जन्माच्या वेळेस यहूदी लोक स्वतःच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये इतके तल्लीन झाले होते की त्यामुळे त्याच्या आगमनासंबंधी ते अजाण राहिले. पूर्वेकडील विधर्मी देशातून मागी लोक भेट घेऊन उद्धारकाला नमन करण्यासाठी गाईच्या गोठ्याकडे आले. जगातील राष्ट्र, वंश व भाषा याचे प्रतिनिधीत्व करणारे हे हेल्लेणी लोक येशूला पाहाण्यासाठी आले. म्हणून सर्व राष्ट्रांतील व सर्व युगांतील लोक तारणाऱ्याच्या वधस्तंभाद्वारे आकर्षिले जातील. “पूर्वेकडून पश्चिमेकडून बहुत लोक येतील आणि आब्राहाम, इसाक व याकोब यांजबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील.” मत्तय ८:११.DAMar 542.3

    यरुशलेमात येशूचा जयोत्सवाने झालेल्या प्रवेशाविषयी ह्या हेलेणी लोकांनी ऐकिले होते. अनुमान करून काहींनी बातमी पसरविली की, त्याने याजक व अधिकारी यांना मंदिरातून पिटाळून दिले आणि तो दावीदाच्या गादीवर बसून इस्राएलाचा राजा म्हणून राज्य करणार होता. त्याच्या कार्याविषयी माहीती करून घेण्यास हेल्लेणी अति उत्सुक झाले होते. त्यांनी म्हटले, “येशूला भेटावे असे आमच्या मनात आहे.” त्यांची विनंती मान्य केली. येशूपुढे ही विनंती सादर केली तेव्हा ज्या भागात त्याच्याबरोबर फक्त यहूदी लोक हजर होते त्या मंदिराच्या भागात तो होता. तो मंदिराच्या बाहेरच्या अंगणात हेल्लेणी लोकांना भेटण्यासाठी गेला.DAMar 542.4

    ख्रिस्ताचा गौरव होण्याची वेळ आली होती. तो वधस्तंभाच्या छायेत होता आणि हेल्लेणी लोकांनी केलेली विचारणा पाहून त्याला वाटले की त्याच्या यज्ञापर्णाद्वारे पुष्कळ पुत्र व कन्या देवाकडे ओढले जातील. त्यांच्या ध्यानी मनी आले नाही अशा स्थितीमध्ये ते त्याला पाहातील हे त्याला समजले. जो चोर व खुनी बरब्बा याच्या ताजव्यात त्याला तोललेले व त्यातून देवपुत्रा ऐवजी बरब्बाची निवड केलेली ते पाहातील. निवड करण्यासाठी लोकांना याजक व अधिकारी यांनी प्रोत्साहन दिले होते ते पाहातील. “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?’ ह्या विचारलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर “त्याला वधस्तंभावर खिळून टाका’ असे होते. मत्तय २७:२२. लोकांच्या पापासाठी केलेल्या ह्या सांत्वनपर आराधनाने त्याचे राज्य परिपूर्ण होऊन सर्व जगात विस्तारेल हे ख्रिस्ताला माहीत होते. त्याचे कार्य पुनर्स्थापनेचे राहील आणि त्याचा आत्मा ते सफल करील. क्षणासाठी त्याने भविष्याकाळाकडे दृष्टी फेकली आणि पृथ्वीवरील सर्व भागातून आलेली घोषणा त्याने ऐकिली, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा.” योहान १:२९. ह्या परकी लोकामध्ये मोठ्या हंगामाची प्रतिज्ञा त्याने पाहिली. यहूदी आणि यहूद्येतर (हेल्लेणी) यांच्यामधील आडभींत ढासळेल आणि सर्व राष्ट्र, वंश व भाषा तारणाचा संदेश ऐकतील. ह्याची अपेक्षा आणि ह्या आशेची पूर्णता पुढील शब्दात व्यक्त केली आहे, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. कोणत्या पद्धतीने हे गौरव होईल हा विचार ख्रिस्ताच्या मनात नेहमी वसत होता. त्याचा मृत्यू जवळ आल्यावर विधांना गोळा करणे होईल. केवळ त्याच्या मरणाने जग तारले जाईल. गव्हाच्या दाण्याप्रमाणे मानवपुत्राला भूमीत गाढले पाहिजे, मेले पाहिजे आणि पुरले पाहिजे; परंतु तो पुन्हा जीवंत होणार होता.DAMar 543.1

    शिष्यांना समजावे म्हणून ख्रिस्ताने आपले भविष्य निसर्गातील उदाहरणाने सादर केले. त्याच्या कार्याची खरी फलनिष्पती त्याच्या मृत्यूने होणार होती. त्याने म्हटले, “गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहातो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.’ गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेल्यावर त्याला अंकूर फुटतात व फळ येते. त्याप्रमाणेच ख्रिस्ताच्या मरणाचा परिणाम देवाच्या राज्याच्या फळनिष्पतीमध्ये होईल. उद्भिज्जासंबंधीच्या नियमाप्रमाणे त्याच्या मृत्यूची परिणति जीवनात होणार होती.DAMar 543.2

    जमिनीची मशागत करणाऱ्यांच्या समोर हे उदाहरण सतत पुढे आहे. निवडक भाग फेकून दिल्याने मनुष्य आपला धान्याचा साठा वर्षानवर्षे राखून ठेवितो. प्रभूने देखरेख करण्यासाठी काही दिवस तो नांगराच्या चरीत झाकून ठेविला पाहिजे. त्यानंतर त्याला अंकूर फुटून पाने येतात, नंतर कणीस व कणसातील दाणा. परंतु दाणा जमिनीत पुरून सर्वांच्या दृष्टीआड केल्याशिवाय ही वाढ होऊ शकत नाही.DAMar 544.1

    जमिनीत बी पेरल्यावर फळ येते, आणि पुन्हा त्याची पेरणी करण्यात येते. अशा रीतीने कापणीचा हंगाम मुबलक होतो. तसेच कॅलव्हरीवरील वधस्तंभाच्या ख्रिस्त मरणाने अनंत काळासाठी फळनिष्पति होईल. ह्या निस्वार्थी यज्ञावर गंभीर विचार करण्याने अनंतकालिक जीवन जगणाऱ्यांचे, निष्पन्न झालेले फळ म्हणून, गौरव होईल.DAMar 544.2

    गव्हाचा दाणा जसाच्या तसाच राहिल्यास त्याला फळ येत नाही. तो एकटाच राहातो. मरणापासून ख्रिस्ताने स्वतःचा बचाव केला असता तर तोही तसाच एकटा राहिला असता. देवाकडे त्याने एकही पुत्र व कन्या आणिले नसते. स्वतःचे जीवन देण्याद्वारेच तो मानवतेला जीवन देऊ शकला. जमिनीत पडून मरण पत्करल्यामुळेच तो त्या अफाट हंगामासाठी बी बनू शकला. प्रत्येक राष्ट्र, वंश व लोक यांच्यातून आलेला मोठा समुदाय देवाची मुक्ती पावू शकला. DAMar 544.3

    ह्या सत्याच्याद्वारे ख्रिस्त स्वार्थत्यागाचा पाठ सर्वांना शिकण्यासाठी ठेवितोः “जो आपल्या जीवावर प्रीती करितो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करितो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.’ ख्रिस्ताचे सहकामदार ह्या नात्याने फलनिष्पति साधण्यासाठी प्रथम ते जमिनीत पडून मेले पाहिजेत. जगाच्या गरजा भागविण्यासाठी आपल्या जीवाचे समर्पण करण्यासाठी तयार झाले पाहिजे. स्वहित व अहंमन्यता नष्ट झाली पाहिजे. स्वार्थत्यागाचा नियम स्वसंरक्षणाचा नियम आहे. शेतकरी बी पेरल्यामुळे ते राखून ठेवितो. माणसाच्या जीवनाचे तसेच आहे. देणे म्हणजे जगणे होय. देव व मानव ह्यांच्या सेवेसाठी खर्ची घातलेले जीवन सुरक्षित राहील. ह्या जगात ख्रिस्त सेवेसाठी स्वार्थत्याग करणारे आपले जीवन शाश्वत काळासाठी राखून ठेवतात.DAMar 544.4

    स्वार्थी जीवन खाऊन टाकलेल्या धान्यासारखे आहे. ते अदृश्य होते पण तेथे वाढ, वृद्धि नाही. स्वतःसाठी मनुष्य पाहिजे तेवढे गोळा करू शकतो; स्वतःचाच विचार करून स्वतःसाठी योजना आखून जीवन जगू शकतो; परंतु तो मेल्यावर त्याला कसलाच लाभ नाही, तो रिक्त होतो. स्वःसेवा किंवा आत्मसेवा याचा नियम आत्मघाताचा नियम आहे.DAMar 544.5

    येशूने म्हटले, “जर कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुसरावे; म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान करील.” ख्रिस्ताबरोबर ज्यांनी त्याचा स्वार्थत्यागाचा वधस्तंभ वाहिला आहे ते त्याच्या गौरवाचे भागीदार होतील. ख्रिस्ताच्या अपमानाच्या व दुःखाच्या प्रसंगी त्याच्या शिष्यांचा त्याच्याबरोबर झालेला गौरव हा त्याच्या आनंदाचा क्षण होता. त्याच्या आत्मत्यागाचे ते फळ आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्याचा शीलस्वभाव व चैतन्य कार्यरत होणे हे त्याचे पारितोषिक असून त्याचा आनंद निरंतरचा होईल. त्यांच्या कष्टाचे व आत्मत्यागाचे फळ म्हणून ते त्याच्याबरोबर त्यांचा आनंद उपभोगतात आणि तो दुसऱ्यांच्या अंतःकरणात व जीवनात दिसून येतो. ते ख्रिस्ताबरोबर सहकामगार आहेत आणि पिता जसे पुत्राचे गौरव करितो तसेच तो त्यांचे गौरव करील.DAMar 544.6

    विधर्त्यांना जींकण्याच्या संदेशाप्रमाणे हेल्लेणी लोकांच्या संदेशाने ख्रिस्ताचे संपूर्ण कार्य त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. स्वर्गात तारणाची योजना आखल्यापासून ते पुढे ठाकलेल्या मरणापर्यंतचे उद्धार कार्य त्याच्या समोर आले. रहस्यमय मेघाने देवपुत्राला आच्छादून टाकल्यासारखे वाटले. त्याच्या नजीक असलेल्यांना त्याची उद्विग्नता जाणवली. तो विचारामध्ये पूर्ण मग्न होता. अखेर खिन्न वाणी त्याच्या मुखातून बाहेर आली, ती म्हणाली, “आता माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर.’ अटकळ बांधून ख्रिस्त अगोदरपासूनच कडू प्याला प्राशन करीत होता. त्याचा त्याग केलेल्या घटकेपासून त्याच्या मानवतेने कच खाली. देवसुद्धा त्याचा नाकार करील आणि तो त्याच्यावर प्रहार करील, पीडा देईल असे सर्वांना वाटले. लोकांच्यासमोर यायला, अत्यंत वाईट गुन्हेगाराला मिळणारी वागणूक स्वीकारण्यास आणि मानहानीचे मरण पत्करण्यास तो कच खात होता, चपापत होता. दुष्ट शक्तीशी लढा देण्याचे भाकीत, मनुष्यांच्या पापांचे भयंकर ओझे आणि पापामुळे पित्याचा क्रोध यांच्यामुळे येशूचा आत्मा क्षीण व कमकुवत झाला होता.DAMar 545.1

    नंतर पित्याची आज्ञा दिव्य नम्रतेने मानण्यात आली. त्याने म्हटले, “मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे; हे पित्या, तू आपल्या नामाचे गौरव कर.’ फक्त ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे सैतानाच्या राज्याचा पाडाव होऊ शकतो. केवळ त्याद्वारेच मानवाचा उद्धार होईल आणि देवाचे गौरव होईल. दुःख पेलण्यासाठी व यज्ञ होण्यासाठी ख्रिस्ताने संमति दिली. स्वर्गातील सार्वभौम याने पापवाहक होण्यास संमति दिली. त्याने म्हटले, “हे पित्या तू आपल्या नावाचे गौरव कर.’ ख्रिस्ताने हे शब्द उद्गारल्यावर त्याच्या डोक्यावर हवेत तरंगत असलेल्या मेघातून प्रत्युत्तर आले: “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.’ ख्रिस्ताच्या सबंध आयुष्यात, गायीच्या गोठ्यापासून हे शब्द उच्चारण्यात आले तोवर देवाचे गौरव करण्यात आले; आणि आगामी कसोटीच्या वेळी होणाऱ्या दुःख प्रसंगी निश्चीतच पित्याच्या नावाचे गौरव होईल. DAMar 545.2

    वाणी ऐकताच मेघातून प्रकाश द्रुत गतीने बाहेर पडला आणि अनंत शक्तीच्या हस्ताने त्याच्याभोवती अग्नीची भिंत घातली तसे त्याने ख्रिस्ताच्या सभोवती वेढा दिला. हे दृश्य पाहून भयभीत होऊन लोक आश्चर्य करू लागले. सर्वजण स्तब्ध राहिले आणि सर्वांचे लक्ष येशूवर खिळून गेले. पित्याने साक्ष दिल्यावर, मेघ वर उचलला जाऊन आकाशांत पसरून गेला. काही काळ पिता व पूत्र यांच्यामधील दृश्य दळणवळण बंद पडले होते.DAMar 545.3

    “तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली; दुसरे म्हणाले त्याच्याबरोबर देवदूत बोलला.” परंतु चौकशी करणाऱ्या हेल्लेणी लोकांनी मेघ पाहिला, वाणी ऐकिली, त्याचा त्यांना अर्थबोध झाला आणि ख्रिस्त त्यांना समजून आला. तो देवाने पाठविलेला होता असा त्याला प्रगट केला.DAMar 546.1

    सेवाकार्याच्या आरंभी बाप्तिस्म्याच्या वेळी आणि पुन्हा रूपांतराच्या डोंगरावर देवाची वाणी ऐकण्यात आली होती. आता सेवाकार्याच्या शेवटी, विचित्र परिस्थितीत मोठ्या समुदायाने तिसऱ्या वेळी ही वाणी ऐकिली. यहूदी लोकांच्या परिस्थितीविषयी येशूने गंभीर सत्य बोलून टाकिले. त्याने शेवटचे आर्जव्य त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांचा नाश जाहीर केला. देवाने पुन्हा पुत्राच्या कार्यावर शिक्का मारिला; इस्राएल लोकांनी ज्याचा त्याग केला त्याला त्याने मान्यता दिली. येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली.” तो मशिहा असल्याबद्दल तो अत्युच्च पुरावा होता, ख्रिस्त खरे बोलला आणि तो देवपुत्र होता ह्याविषयी पित्यापासून आलेली ती खूण होती.DAMar 546.2

    ख्रिस्त पुढे म्हणाला, “आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकिला जाईल; आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्पूण घेईन. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरिता तो असे बोलला.’ जगातील ही आणीबाणी आहे. मी मानवाच्या पापासाठी आराधना करणारा झालो तर जग प्रकाशीत होईल. मानवावरील सैतानाचे वर्चस्व नाहीसे होईल. मानवामधील डागळलेली देवाची प्रतिमा पुनर्स्थापित केली जाईल आणि श्रद्धावंत संत अखेर स्वर्गीय निवासाचे वारस बनतील. ख्रिस्ताच्या मृत्युची ही परिणति आहे. त्याच्यासमोर उभे राहिलेल्या विजयाच्या दृश्यात उद्धारक निमग्न झाला होता. निष्ठूर, लज्जास्पद, भयानक, वैभवाने तेजस्वी झालेला वधस्तंभ तो पाहातो.DAMar 546.3

    वधस्तंभाद्वारे साध्य झालेले मानवाच्या उद्धाराचे कार्य संपूर्ण नाही. देवाचे कार्य विश्वाला प्रगट करण्यात आले आहे. जगाच्या अधिपतीला खाली टाकण्यात आले. सैतानाने देवाविरुद्ध केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले. त्याने स्वर्गावर ठेवलेला ठपका कायमचा खोड्न काढण्यात आला. दिव्यदूत तसेच मनुष्य उद्धारकाकडे आकर्षिले गेले. त्याने म्हटले, “मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकषून घेईन.”DAMar 546.4

    हे बोलत असता ख्रिस्ताच्या सभोवती पुष्कळ लोक होते. एकाने म्हटले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? ह्यावरून येशू त्यास म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हास अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हाला प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाला प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.’DAMar 546.5

    “परंतु त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यानी त्यांच्यावर विश्वास ठेविला नाही.” त्यांनी एकदा उद्धारकाला विचारिले, “असे कोणते चिन्ह आपण दाखविता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा?” योहान ६:३०. अगणित चिन्हे दाखविली परंतु त्यांनी तिकडे डोळेझाकपणा केला आणि अंतःकरण कठोर केले. आता पिता स्वतः बोलला आणि अधिक चिन्हांची त्यांनी विचारणा केली नाही, तरी विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला. DAMar 547.1

    “असे असूनही अधिकाऱ्यातून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेविला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यामुळे ते तसे कबूल करीत नव्हते. कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला. दोष व निंदा यापासून बचाव करून घेण्यासाठी त्यांनी ख्रिस्ताचा नाकार केला आणि अनंतकालिक जीवनाचा त्याग केला. सर्व शतकातून कितीजण तसेच करीत आहेत! त्या सर्वांना तारणाऱ्याचे शब्द लागू पडतातः “जो आपला जीव राखतो तो त्याला गमावील.” येशूने म्हटले, “जो मला अव्हेरितो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारा एक जण आहे; जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील.’ योहान १२:४८.DAMar 547.2

    त्यांच्यावर येणाऱ्या दैवी आपत्तीविषयी जे अजाण राहातात त्यांची हाय हाय! दुःखाने व मंदगतीने ख्रिस्ताने मंदिराचे अंगण कायमचे सोडिले.DAMar 547.3