Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ३६—विश्वासपूर्ण स्पर्श

    मत्तय ९:१८-२६; मार्क ५:२१-४३; लूक ८:४०-५६.

    गदरेकरांच्या प्रदेशांतून येशू, जेव्हा सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर आला, तेव्हा त्याला भेटण्यासाठी लोकांचा मोठा जमाव जमला होता असे त्याला आढळले आणि त्यांनी सहर्षे त्याचे स्वागत केले. काही वेळ तो त्याच ठिकाणी लोकांना शिक्षण देत व रोग बरे करीत राहिला आणि नंतर लेवी मत्तयाच्या घरी भोजनासाठी जमलेल्या जकातदारांना भेटण्यासाठी गेला. तेथे सभास्थानाचा अधिकारी याइर त्याला भेटला.DAMar 293.1

    यहूदी लोकांचा हा वडील, मोठ्या चिंताग्रस्तावस्थेत येशूकडे आला आणि त्याच्या पाया पडून म्हणाला, “माझी कन्या मरावयास टेकली आहे; ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण तिजवर हात ठेवावे.”DAMar 293.2

    येशे तत्काळ त्या अधिकाऱ्याबरोबर त्याच्या घरी जाण्यास निघाला. जरी येशूच्या शिष्यांनी त्याची अनेक कृपामय कृ] पाहिली होती तरी त्या गर्विष्ठ अधिकाऱ्याच्या विनवणीला येशूने दिलेल्या मान्यतेविषयी त्यांना आश्चर्य वाटले. तरीपण ते त्याच्यासंगती निघाले, आणि उत्कंठित व अधिर जमावही त्यांच्या संगती गेला.DAMar 293.3

    त्या अधिकाऱ्याचे घर तेथून फार दूर अंतरावर नव्हते, परंतु येशूच्या सभोवती प्रचंड लोकसमुदायाने गर्दी केल्यामुळे, येशू व त्याचे सर्व सोबती अगदी मंद गतीने वाटचाल करीत होते. येशूच्या येण्यास विलंब झाल्यामुळे उत्कंठतापूर्वक वाट पाहाणारा तो पिता अधिक चिंतातूर झाला; परंतु येशू दुःखीताचा दुःख परिहार व त्रस्त जनाचे समाधान करण्यास अधून मधून मध्येच थांबत होता.DAMar 293.4

    ते सर्वजन वाटचाल करीत असताना गर्दीतून वाट काढून एक निरोप्या, याइराची कन्या मरण पावल्याची बातमी घेऊन त्याच्याकडे आला, आणि प्रभूला विनाकारण त्रास देणे योग्य होणार नाही असे म्हणाला. हे शब्द येशूने ऐकले आणि तो म्हणाला, “भिऊ नको, विश्वास मात्र धर म्हणजे ती बरी होईल.”DAMar 293.5

    याइर येशूच्या अधिक नजीक गेला आणि ते मिळून लगबगीने सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी गेले. त्या आधीच विलाप करणारे भाडोत्री लोक व आकांत करणारे लोक तेथे रडत होते व त्यामुळे रडक्या आवाजाने सर्व वातावरण भरून गेले होते. रडणाऱ्या व आकात करणाऱ्या लोकांकडे पाहून येशूचे अंतःकरण हेलावून गेले. तरीही त्याने त्या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, “तुम्ही कशाला गलबला करिता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” येशूचे हे शब्द ऐकून लोकांना राग आला. कारण ती मुलगी मरण पावली होती हे त्यांनी पाहिले होते, त्यामुळे त्यांनी त्याची थट्टा केली व ते उपहासपूर्वक त्याला हसले. येशूने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईवडील, आणि पेत्र, याकोब व योहान यांना घेऊन तो मुलीचे प्रेत होते त्या खोलीत गेला.DAMar 294.1

    येशू त्या मुलीच्या अगदी नजीक गेला, तिचा हात स्वतःच्या हातात घेऊन तिच्या मातृभाषेत अगदी मृदू आवाजात म्हणाला “तलीथा कूम;” याचा अर्थ “मुली मी तुला सांगतो, ऊठ.’DAMar 294.2

    तत्क्षणी तो अचेतन देह कंपायमान झाला. हृदय धडधडू लागले, चेहऱ्यावर मंद स्मित दिसू लागले. निद्रावस्थेतून जागे झाल्याप्रमाणे डोळे खडखडीत उघडले आणि ती तरुण मुलगी सभोवारच्या लोकांकडे आश्चर्याने टकमक पाहू लागली. ती उभी राहिली आणि तिच्या आईवडीलांनी तिला अलिंगन दिले व आनंदाश्रू ढाळले.DAMar 294.3

    येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी जात असताना रस्त्यांत गर्दीतील १२ वर्षाच्या आजाराने पिडलेल्या एका स्त्रीला भेटला होता. आजारातून मुक्त होण्यासाठी तिने वैद्यावर व औषधोपचारावर स्वतःजवळचा होता नव्हता तो पैसा कामी लावला होता. परंतु येशूने अनेक रोग बरे केले हे ऐकल्यानंतर तिच्या आशाना पालवी फुटली. तिला केवळ त्याची भेट घेता आली तर ती निश्चित रोग-मुक्त होणार अशी तिची मनोमन खात्री झाली होती. खंगलेल्या व व्यथीत अवस्थेत ती येशू ज्या समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देत होता तेथे गेली, आणि भरगच्च गर्दीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू लागली; पण छे, कशाचे काय, सर्व काही व्यर्थ. पुन्हा तिने लेवी मत्तयाच्या घरापासून त्याचा पाठलाग केला, तरीसुद्धा ती त्याच्याजवळपास पोहचू शकली नाही. ती अतिशय निराश झाली. परंतु अगदी त्याच वेळी येशू स्वतःहून गर्दीतून वाट काढीत तिच्याकडे गेला.DAMar 294.4

    सुवर्ण संधि चालूनच आली होती. महान वैद्याच्या अगदी समोरच ती उभी होती! परंतु त्या भयंकर गोंगाटामुळे ती त्याच्याशी बोलू शकली नाही, किंवा त्याच्या ओझरत्या दर्शनाशिवाय तिला कसलाच लाभ झाला नाही. बरे होण्याची एकमेव संधि गमविली जाण्याच्या भीतीने “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन’ असे स्वतःशीच पुटपुटत तिने स्वतःची सर्व शक्ती एकवटून स्वतःला गर्दीतून पुढे रेटले आणि ती पुढे सरकत असतानाच थोडीशी झुकली व केवळ त्याच्या वस्त्राच्या किणारीला स्पर्श करण्यात यशस्वी झाली. परंतु अगदीच त्याच क्षणी ती बरी झाल्याचे तिला समजून आले. केवळ त्या एकमेव स्पर्शात तिच्या आयुष्याची निष्ठा एक झाली होती आणि तत्काळ तिच्या वेदना व अशक्तपणा यांची जागा चैतन्यमय परिपूर्ण आरोग्यदायी शक्तीने घेतली.DAMar 294.5

    त्यानंतर अगदी कृतज्ञ अंतःकरणाने त्या गर्दीतून बाहेर पडण्याचा तिने प्रयत्न केला; परंतु अकस्मात येशू तेथेच थबकला आणि त्याच्यासह सर्व लोकही थांबले. नंतर सभोवर नजर फिरवून, तशा गोंगाटामध्येसुद्धा ऐकू जाईल अशा स्पष्ट आवाजात येशूने विचारले, “माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला? लोकांनी या चौकशीचे उत्तर आश्चर्यकारक नजरेने दिले की, सर्व बाजूने प्रचंड गर्दी झालेली आहे, भयंकर चेंगराचेंगरी होत आहे, अशा वेळी असा प्रश्न विचित्र वाटत नाही काय?DAMar 295.1

    बोलण्यात उतावळा असलेला पेत्र चटकन म्हणाला, “लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणता?’ त्यावर येशू म्हणाला, “कोणी तरी मला शिवलेच; माझ्यातून शक्ती निघाली, हे मला समजले” तारणारा त्या गर्दीमुळे बेपरर्वाईने झालेला सर्वसाधारण स्पर्श आणि विश्वासाने केलेला स्पर्श यातील फरक समजू शकत होता. अशा विश्वासपूर्ण स्पर्शाची प्रशंसा न करता सोडून देणे उचित नव्हते. येशूच्या उद्गाराने त्या स्त्रीच्या आनंदाला उमाळे फुटतील, त्याचप्रमाणे शेवटल्या काळातील त्याच्या अनुयायाना ते आशीर्वादाचे ठरतील.DAMar 295.2

    त्या स्त्रीवर आपली नजर रोखून, त्याला कोणी शिवले हे जाणून घेण्याची त्याने आग्रही भूमिका घेतली. लपवा-छपवी व्यर्थ आहे असे समजून येताच ती थरथर कांपत समोर आली आणि तिने स्वतःला त्याच्या चरणाशी झोकून दिले. कृतज्ञ वृत्तीने अश्रू ढाळीत तिने तिच्या दुःखमय त्रासाचा आणि त्या त्रासातून तिची कशी सुटका झाली याविषयीचा वृत्तांत सांगितला. त्यावर येशू अगदी मायाळूपणे तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; सुखरूप जा.”DAMar 295.3

    ख्रिस्तासभोवती गर्दी केलेल्या त्या थक्क झालेल्या लोकांना त्या दिव्य शक्तीपासून काहीच साध्य करता आले नाही. परंतु जेव्हा त्या दुःखी स्त्रीने ती बरी होईल या विश्वासाने येशूला शिवण्यासाठी तिचा हात पुढे केला, तेव्हा ती रोगमुक्त झाली आहे असे तिला समजले. आध्यात्मिक बाबीतही तसेच आहे धर्माविषयी केवळ वरकरणी बाता करणे, अंतर्यामाची तळमळ (भूक) व खरा विश्वास नाही अशा स्थितीत प्रार्थना करणे काहीच उपयोगाचे किंवा फायद्याचे नाही. येशू हा जगाचा तारणारा आहे असे केवळ मान्य करणारा सर्व साधारण विश्वास मानवाला कधीच बरे करू शकत नाही. तारणदायी विश्वास म्हणजे तत्त्वाला, सत्यतेला दिलेला केवळ बौद्धिक होकार नव्हे. विश्वासाने चालण्यापूर्वी जो कोणी सर्वंकष ज्ञानाची प्रतिक्षा करतो त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. ख्रिस्ताविषयी फक्त आत्मियता बाळगणे पुरेशे नाही; आपण त्याच्यावर सर्वस्वी विश्वास ठेवला पाहिजे. येशू हा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करणारा, व त्याचा चांगुलपणा आपल्या कामी लावणारा विश्वासच केवळ आपल्या फायद्याचा होईल. अनेक लोक विश्वास हा एक ऐच्छिक अभिप्राय किंवा मत मानतात. तारणदायी विश्वासाद्वारे, जे येशूचा स्वीकार करतात ते कराराच्या बंधनाने देवाशी एक होतात. अस्सल विश्वास म्हणजे एक जीवन आहे. खरा (जिवंत) विश्वास हा वाढीव चैतन्य शक्ति, अढळ श्रद्धा आहे; ज्याच्याद्वारे आत्मा (मानव) विजयश्री मिळविणारी शक्ती बनतो.DAMar 295.4

    त्या स्त्रीने बरे केल्यानंतर, तिने, तिला मिळालेल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशी येशूने अपेक्षा बाळगली. सुवार्तेद्वारे मिळणाऱ्या देणग्या ह्या लपवून ठेवण्यासाठी किंवा खाजगीरित्या उपभोगण्यासाठी नसतात. आपण त्याच्या दयाळूपणाचे साक्षीदार बनावे म्हणून प्रभु आम्हाला पाचारण करतो. “तुम्ही माझे साक्षी आहा व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो.” यशया ४३:१२.DAMar 296.1

    त्याच्या खरेपणाविषयी आमची साक्ष, ही जगाला ख्रिस्त प्रगट करण्याचे देवाने निवडलेले एक माध्यम आहे. प्राचीन काळातील सद्भक्ताद्वारे आपल्याला कळविलेल्या कृपेचा आपण स्वीकार केला पाहिजे, तथापि आपल्या स्वानुभवाची साक्षच अधिक प्रभावी होईल. जेव्हा आपण देव प्रेरित कार्य करतो तेव्हा आपण त्याचे साक्षीदार बनतो. व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणून प्रत्येकाचे जीवन भिन्न, एकाचे दुसऱ्यापेक्षा वेगळे, आणि म्हणून एकमेकाचे अनुभवही निरनिराळे. आपापल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा असलेली भक्ती देवाकडे जावी अशी तो अपेक्षा बाळगतो आणि जेव्हा त्याच्या कृपेच्या मोठेपणाच्या गौरवाचा स्वीकार ख्रिस्तवत जीवनावर आधारला जातो, तेव्हा मानवाच्या तारणासाठी प्रतिबंध न करता येणारी शक्ती कार्य करते.DAMar 296.2

    जेव्हा दहा कुष्ठरोगी बरे होण्यासाठी ख्रिस्ताकडे आले तेव्हा त्याने त्यांना याजकाकडे जाऊन स्वतःला दाखवण्याची आज्ञा दिली. जाता जाता रस्त्यातच ते बरे झाले, परंतु त्याचे उपकार मानण्यासाठी त्यांच्यापैकी फक्त एकजनच परत आला. आणि इतर, ज्याने त्यांना बरे केले होते त्याला विसरून जाऊन ते आपल्या मार्गाने निघून गेले. अजूनही किती लोक अगदी तसेच करीत आहेत! DAMar 296.3

    मानवाच्या फायद्यासाठी प्रभु सतत कार्य करीत असतो. तो सतत आशीर्वादाचा वर्षाव करीत असतो. तो रोग्यांना बरे करतो. तो लोकांना त्यांच्या स्वप्नात नसलेल्या संकटाना संरक्षण देतो, संकटापासून सुटका करतो. तो त्यांना आपत्तितून सोडविण्यासाठी व “काळोखात फिरणारी मरी” आणि “भर दोन प्रहरी नाश करणारी पटकी,” यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी स्वर्गातील देवदूताना आज्ञा करतो; इतके करूनही त्यांच्या अंतःकरणावर काहीच परिणाम होत नाही. त्यांच्या तारणासाठी त्याने स्वर्गातील सर्व दौलत खाली केली, इतके करूनही ते त्याच्या अपरिमित प्रेमाची पर्वा करीत नाहीत. त्यांच्या अकृतज्ञ वृत्तीने ते देवाच्या कृपेसाठी स्वतःच्या अंतःकरणाची दारे बंद करतात. वाळवंटातील झुडपाप्रमाणे त्यांचेही कल्याण कधी होईल हे त्यांना समजत नाही, आणि त्यांचे आत्मे ओसाड प्रदेशातील खडखडीत जागी वस्ती करून राहातात.DAMar 296.4

    देवाची प्रत्येक देणगी आपल्या स्मरणात ठेवणे आपल्यासाठी हितावह आहे. अशाने विश्वास जाहीर करण्यास व जास्तीत जास्त प्राप्त करून घेण्यास अधिक बळकटी येते. इतरांच्या विश्वासाचे व अनुभवाचे सर्व वृतांत वाचून आम्हाला मिळणाऱ्या प्रोत्साहनाहून अधिक प्रोत्साहन देवाने आम्हा स्वतःला दिलेल्या थोडक्या आशीर्वादाने मिळते. देवाच्या कृपेला प्रतिसाद देणारा आत्मा पाणी दिलेल्या बागेसारखा टवटवीत असतो. त्याचे आरोग्य सत्वर सुधारते; त्याचा प्रकाश दुर्बोध अंधाराच्या ठिकाणी चमकतो, आणि त्याच्यामध्ये देवाचे वैभव दिसून येते. म्हणून आपण देवाचे वात्सल्य व देवाची विपुल कृपा स्मरणात ठेवू या. इस्राएल लोकांप्रमाणे, आपण साक्षीची स्मारके (स्तंभ) उभा करू या, आणि त्यावर, देवाने आपल्यासाठी काय केले याविषयीचे मोलवान वृत कोरून ठेवू या. तो आपल्या इह लोकीच्या प्रवासात आपल्याबरोबर कसा वागला-वर्तला याची उजळणी करीत असताना कृतज्ञतेने द्रवून गेलेल्या अंतःकरणाने आपण म्हणू या की, “परमेश्वराने मजवर केलेल्या उपकाराचा मी कसा उतराई होऊ? मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.’ स्तोत्र. ११६:१२-१४.DAMar 297.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents