Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ३४—आमंत्रण

    मत्तय ११:२८-३०.

    “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांति देईन.”DAMar 279.1

    मनाचे मोठे समाधान करणारे हे शब्द येशूने त्याच्या मागे आलेल्या प्रचंड लोकसमुदायाला उद्देशून काढले होते. तारणाऱ्याने सांगितले होते की केवळ त्याच्याद्वारेच लोकांना देवाविषयीचे ज्ञान मिळू शकते. स्वर्गीय गोष्टीविषयीचे ज्ञान त्याच्या शिष्यांना देण्यात आले होते असे त्याने त्याच्या शिष्याविषयी सांगितले होते. तथापि त्याचा आश्रय व त्याचे प्रेम यापासून लोकांना वंचित करण्यात आले होते असा विचार कोणाच्याही मनात त्याने येऊ दिला नव्हता. जे कष्ट करतात व भाराक्रांत झालेले आहेत ते सर्व येशूकडे येऊ शकतात.DAMar 279.2

    धार्मिक विधिच्या आचरणाकडे कटाक्षाने लक्ष पुरविणारे शास्त्री व धर्मगुरू यांच्या गरजा तपश्चर्येच्या विधिने कधीच समाधान न होणाऱ्या होत्या. जकातदार व पापी लोक विषयायुक्त व ऐहिक सुखाने समाधान मिळत असल्याचा अविर्भाव करीत होते, परंतु अंतर्यामात ते अविश्वासू व धास्तावलेले होते. जे लोक त्रस्त झाले होते, जेरीस आले होते, त्यांच्या आशा नष्ट झाल्या होत्या, आणि आत्म्याची भूक ऐहिक सौख्याने भागविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्यावर येशूने आपली नजर फिरविली, आणि त्याने त्या सर्वांना विश्रांति, मिळवण्यासाठी त्याच्याकडे आमंत्रण दिले.DAMar 279.3

    काबाडकष्ट करणाऱ्या लोकांना अगदी मायाळूपणाने त्याने आज्ञा केली, “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व मजपासून शिका, म्हणजे तुमच्या जिवास विश्रांति मिळेल.”DAMar 279.4

    या वचनाद्वारे ख्रिस्त हरएक व्यक्तीबरोबर बोलत आहे. प्रत्येकाला कल्पना असो अगर नसो, प्रत्येकजन थकलेला आहे, ओझ्याने वाकला आहे आणि ज्या ओझ्याच्या भाराने मानव दबलेला आहे तो भार केवळ ख्रिस्तच कमी करू शकतो. आपण जे जास्तीत जास्त वजनदार ओझे वाहत आहोत ते पापाचे ओझे आहे आणि हे ओझे फक्त आपणच वाहू लागलो तर आपला चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु निष्पाप अशा एकाने आपली जागा घेतली आहे. “आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले.’ यशया ५३:६. आमच्या पापाचा भार त्याने वाहीला आहे. तो आमच्या अवघडलेल्या खांद्यावरून ओझ्याचा भार आपल्या खांद्यावर घेईल. तो आम्हाला विश्रांति देईल. तो आपली चिंता व आपली दु:खे यांचे ओझेसुद्धा वाहून नेईल. आपण आपली सर्व काळजी त्याच्यावर टाकावी असे तो आम्हाला आमंत्रण देतो; कारण तो आम्हाला त्याच्या हृदयाच्या कोंदणातील लोक आहोत असे मानतो.DAMar 279.5

    आपल्या वंशातील आपला वडील भाऊ स्वर्गातील अनंतकालिक आसनाजवळ आहे. तो आपला तारणारा आहे असे मानून जे कोणी त्याच्याकडे वळतात त्या सर्वांवर तो आपले लक्ष ठेवतो. मानवाची कमकुवता काय आहे, मानवाच्या गरजा काय आहेत, आणि मोहाचे बळ कशात आहे हे त्याने स्वतःच्या अनुभवावरून ओळखून घेतले होते; कारण जसे आपण सर्व प्रकरे मोहात पाडले जातो तसेच तोही सर्व प्रकारच्या मोहात पाडला गेला होता, तरी तो निष्पाप राहिला होता. लटपटत चालणाऱ्या बाळावर जसे लक्ष ठेवण्यांत येते तसेच तो लटपटणाऱ्या ‘आम्हावर’ लक्ष ठेवतो. तुम्ही मोहात सापडला आहात काय? तो तुमची सुटका करील. तुम्ही दुर्बल आहात का? तो तुम्हाला बलवंत करील. तुम्ही अज्ञानी आहात काय? तो तुम्हाला ज्ञान संपन्न करील. तुमचे मन दुःखावले गेले आहे काय? तो तुमचे सांत्वन करील. प्रभु, “ताऱ्यांची गणती’ करणारा देव आहे, तरीपण “तो भग्नहृदयी जनास बरे करितो; तो त्यांच्या जखमास पट्ट्या बांधितो.” स्तोत्र. १४७:४, ३. “तुम्ही सर्व मजकडे या’ असे त्याचे आमंत्रण आहे. तुमच्या चिंता व तुमच्यावर आलेली संकटे कोणत्याही प्रकारची असोत, सर्व गोष्टी त्याच्यापुढे मांडा. सर्व काही सहन करण्यासाठी तुमची सहनशक्ती बळकट करण्यात येईल. अडथळे व अडचणी यातून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला मार्ग मोकळा करून देण्यात येईल. तुम्ही जितके अधिक दुर्बल व अधिक सहाय असाल तर त्याच्या सामर्थ्याद्वारे तुम्ही त्यापेक्षाही अधिक बलवान व सक्षम व्हाल. तुमच्या ओझ्याचा भार फारच असेल तर ते वजनदार ओझे, ओझे-वाहणाऱ्यावर टाकल्यानंतर तुम्हास अधिक आराम वाटेल. ख्रिस्त देऊ करितो ती विश्रांति अटीवर अवलंबून आहे, या अटींचा स्पष्टपणे नामनिर्देश करण्यात आला हे. त्या अटी अशा आहेत की त्या सर्वांना स्वीकारणे किंवा मान्य करणे शक्य होऊ शकते. ती त्याची विश्रांति कशी मिळवावी हे ते आम्हांस सांगतो.DAMar 280.1

    येशू सांगतो, “माझे जू आपणावर घ्या.” जूं हे सवेचे एक साधन आहे. काम करून घेण्यासाठी गुरे जूला जुपली जातात. त्यांना योग्य प्रकारे काम करता येण्यासाठी जू हे अत्यंत आवश्यक साधन आहे. या उदाहरणाद्वारे येशू आपल्याला हे शिकवित आहे की आपल्या जिवांत जीव असेपर्यंत आपल्याला सेवा करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, आणि आपण त्याचे जू आपणावर घ्यायचे आहे, यासाठी की आपण त्याचे सहकामगार व्हावे.DAMar 280.2

    त्याच्या सेवेसाठी आम्हाला जुंपणारा जू म्हणजे देवाचे नियमशास्त्र, देवाच्या आज्ञा होय. एदेन बागेत प्रदर्शित केलेले, सिनाय पर्वतावर घोषीत केलेले, आणि नव्या कराराद्वारे अंतःकरणावर लिहिलेले महान प्रीतिचे नियमशास्त्र, मानवी कामगाराला देवाच्या इच्छेबरोबर बांधून ठेवते. जर आम्हाला आमच्या मनाच्या इच्छेनुसार, मार्ग दिसेल तिकडे जाण्यास मोकळे सोडले असते, तर आपण सैतानाचे अनुयायी झालो असतो व त्याचे गुणस्वभाव आम्ही अंगिकारिले असते. म्हणून परमेश्वर आपल्याला त्याच्या उच्च, उदात आणि उन्नत इच्छेला जखडून ठेवतो. आपण धिराने व समजसपणे सेवेचे कार्य आपल्या शिरावर घ्यावे अशी तो अपेक्षा बाळगतो. मानव या नात्याने ख्रिस्ताने सेवेचे जू स्वतःवर घेतले होते. तो म्हणाला, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.’ स्तोत्र ४०:८. “कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” योहान ६:३८. देवावरील प्रेम, त्याच्या गौरवाची आस्था (कळकळ) आणि पतित मानवावरील प्रीति यांनी, येशूला दुःख सोसण्यास व मरण्यास या जगात आणले होते. त्याचे जीवन नियंत्रित करणारी हीच शक्ती होती. हेच तत्त्व आपण अंगिकारावे अशी तो आपल्याला आज्ञा करतो. DAMar 281.1

    जगिक दर्जा गाठण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांची अंतःकरणे चिंतेच्या भाराने कण्हत आहेत. त्यांनी जगाची चाकरी करण्याचे पसंत केले आहे, जगाच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा स्वीकार केला आहे, जगाच्या पारंपारिक रूढीचा स्वीकार केला आहे. अशा त-हेने त्यांचे शील भ्रष्ट-कलंकित झाले आहे, आणि जीवन कष्टमय बनले आहे. महत्वाकांक्षा व भौतिक अपेक्षाची भूक भागविण्यासाठी ते विवेकाला जखमी करतात व स्वतःवर दु:खाचे अधिक ओझे ओढवून घेतात. सतत पिच्छा करणारी चिंता त्यांची जीवनशक्ती क्षीण करीत आहे, झिजवून टाकीत आहे. त्यांनी दास्याचे जू झुगारून टाकावे अशी प्रभूची इच्छा आहे. त्यांनी त्याचे जू आपणावर घ्यावे यासाठी तो त्यांना आमंत्रण देतो. तो म्हणतो, “माझे जू सोईचे व माझे ओझे हलके आहे.” तो त्यांना आधी देवाचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवा अशी आज्ञा करतो. असे केले तर त्याचे अभिवचन असे आहे की, नंतर जीवनाश्यक सर्व गोष्टी त्यांना पुरविल्या जातील. चिंता अंधळी असते. तिला भविष्यकाळातील गोष्टी दिसू शकत नाहीत. परंतु येशूला आदीपासून अंतापर्यंत सर्व गोष्टी दिसतात. प्रत्येक अडचणीत दुःखपरिहार करण्यासाठी त्याचे मार्ग तयार असतात. आमच्या गरजा भागविण्यासाठी आमच्या कल्पनेतही नसतील असे हजारो मार्ग आपल्या स्वर्गीय पित्याजवळ आहेत. जे लोक देवाचा सन्मान व सेवा करण्याच्या एकमेव तत्त्वाला श्रेष्ठता-प्राधान्य देण्याचे मान्य करतात, त्यांना असे दिसून येईल की या जगातील आणिबाणीची सर्व परिस्थिती नाहीशी झालेली आहे आणि त्यांच्यापुढे सुशांत व सुलभ मार्ग आहे.DAMar 281.2

    तो म्हणतो, “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या... मजपासून शिका, म्हणजे तुमच्या जिवास विश्रांति मिळेल.” सौम्यता व लीनपणा याविषयीचे त्याच्याकडून शिक्षण संपादन करण्यासाठी आपल्याला ख्रिस्ताच्या पाठशाळेत प्रवेश घ्यावा लागेल. तारण ही अशी एक प्रक्रिया आहे की, ज्यामुळे स्वर्गात प्रवेश करण्यासाठी व्यक्तीला प्रशिक्षण मिळते. हे प्रशिक्षण म्हणजे येशूविषयीचे ज्ञान. हे प्रशिक्षण म्हणजे कुकल्पना, निरूपयोगी सवयी, आणि अंधाराचा राजपुत्र सैतान याच्या पाठशाळेत गिरविलेल्या अनिष्ट रूढीपासून सुटका. देवावरील निष्ठेच्या विरूद्ध असलेल्या सर्व गोष्टींपासून मानवाची सुटका केली गेली पाहिजे.DAMar 282.1

    ख्रिस्ताच्या अंतःकरणात, देव व तो यांच्यामध्ये परिपूर्ण ऐक्य वसत होते. त्याच्या अंतःकरणात नितांत शांती वास करीत होती. गौरवोद्गाराने तो कधीच शेफारला नव्हता, किंवा अपेक्षाभंग वा निराशा यामुळे उदास झाला नव्हता. प्रखर विरोध व अतिशय क्रूर वागणूक या काळांत तो धीर-उदात्त वृत्तीने वागला होता. परंतु स्वतःला त्याचे अनुयायी म्हणविणारे अनेक लोक मनातून चिंतातूर व त्रस्त असतात, कारण ते स्वतःहून देवाशी सुसंबंध ठेवण्यास भितात. ते पूर्णपणे त्याच्या अधीन होत नाहीत, पूर्णपणे स्वतःला त्याला समर्पित करीत नाहीत; कारण अशा समर्पणांतर्गत काही परिणामाना तोंड द्यावे लागेल म्हणून ते त्यापासून माघार घेतात. परंतु त्यांनी स्वतःचे समर्पण केल्याशिवाय त्यांना मन शांती मिळू शकणार नाही.DAMar 282.2

    स्वतःवरील अत्यांतिक प्रेम हेच मनांत अशांतता निर्माण करते. पण जर स्वर्गापासून आपला जन्म झाला असेल तर ख्रिस्तामध्ये जी चित्तवृत्ती होती ती आमच्यामध्ये असेल, आमच्या तारणासाठी ज्या चित्तवृत्तीने त्याला नम्र केले ती. असे झाले तर आपण उच्च पदाच्या पाठीमागे लागणार नाही. आपण येशूच्या चरणाजवळ बसून राहण्याची मनीषा बाळगू, आणि त्याच्याविषयी माहिती घेऊ. आपल्याला हे समजून येईल की आपल्या सेवेचे मोल ह्या जगांत प्रदर्शन किंवा घोषणा करणे आणि स्वबळावर कार्यरत व आवेशी असणे यात समावलेले नाही. ज्या प्रमाणात पवित्र आत्म्याचा सहभाग असतो त्याप्रमाणात कार्याची महति होते. देवावरील श्रद्धा शुद्ध गुणांची अंतःकरणे निर्माण करते यासाठी की आपण सोशिकपणाने आपल्या आत्माचा मालक बनावे.DAMar 282.3

    बैलांना ओझे ओढण्यास, व ओझ्याचा भार कमी करण्यास मदत व्हावी म्हणून त्यांच्या मानेवर जू ठेवण्यात येते. अगदी तेच ख्रिस्ताच्या जू बाबत आहे. जेव्हा आपली इच्छा देवाच्या इच्छेत, मिसळली जाते आणि त्याने दिलेली दाने आपण इतरांना आशीर्वादीत करण्यासाठी उपयोगात आणतो, तेव्हा जीवनाच्या ओझ्याचा भार कमी झालेला आपल्याला आढळून येईल. जो कोणी देवाच्या आज्ञानुसार चालतो तो येशूबरोबर चालत असतो आणि त्याच्या प्रीतित अंतःकरणाला विश्रांति मिळते. जेव्हा मोशेने “मला तुझे मार्ग दाखीव, म्हणजे तुझी मला ओळख घडेल,’ अशी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “मी प्रत्यक्ष येईन आणि तुला विश्रांति देईन.” संदेष्ट्याद्वारे संदेश दिला होता की, “परमेश्वर म्हणतो, चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा; सन्मागाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांति मिळेल.” निर्गम ३३:१३, १४; यिर्मया ६:१६. आणि तो म्हणतो, “तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती” यशया ४८:१८.DAMar 282.4

    जे कोणी ख्रिस्ताचा शब्द शिरोधार्य मानतात, आणि त्यांचे सर्वस्व त्याच्या हाती देतात, त्यांचे जीवन त्याच्या आज्ञानुसार जगतात, त्यांना शांति व स्वस्थता मिळेल. जेव्हा येशू त्याच्या समक्षतेने त्यांना उल्हासीत करतो तेव्हा जगातील कोणतीही गोष्ट किंवा ताकत त्यांना दुःखी करू शकत नाही. पूर्ण श्रद्धा-संमति असते तेव्हा पूर्ण शांती लाभते, विश्रांति मिळते. प्रभु म्हणतो, “ज्याचे मन तुझ्याठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांति देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो.” यशया २६:३. आपली जिवीते म्हणजे एक गुंता असल्यासारखा भासते; परंतु जेव्हा आपण स्वतःला त्या सुज्ञ कुशल कारागिराच्या स्वाधीन करू तेव्हा तो जीवनाचा व शीलाचा असा नमुना घडवील की त्याद्वारे त्याचे गौरव होईल. जी व्यक्ती ख्रिस्ताचे गौरवशील-प्रदर्शित करते तिलाच स्वर्गाच्या राज्यात स्वीकारले जाईल. हा पूर्ववत सुधारणा केलेला वंश (लोक) शुभ्र वस्त्र परिधान करून त्याच्याबरोबर चालील, कारण तो लायक आहे.DAMar 283.1

    जेव्हा आपण येशूच्याद्वारे विश्रांति मिळवितो तेव्हा येथेच स्वर्ग राज्याची सुरवात होते. मजकडे या, आणि मजपासून शिका या आमंत्रणाचा आपण स्वीकार करतो, आणि अशा त-हेने येऊन आपण आपल्या शाश्वत जीवनाची सुरूवात करतो. स्वर्ग हा ख्रिस्ताद्वारे देवाकडे जाण्याचा निरंतरचा मार्ग आहे. परमसौख्य असलेल्या स्वर्गात आपण जास्तीत जास्त काळपर्यंत राहू तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त गौरव प्रगट केले जाईल; आणि देवाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळाल्यावर आपल्याला परमोच्च सौख्याचा आनंद मनमुराद उपभोगता येईल. या जीवनात जेव्हा आपण ख्रिस्ताबरोबर फेरफटका मारू तेव्हा आपण त्याच्या प्रीतिने भरले जाऊ व त्याच्या समक्षततेने समाधान पावू. मानव जे काही उत्पन्न करतो, ते आम्हाला येथेच मिळेल, परंतु त्यांची तुलना स्वर्गातील गोष्टींशी कशी होऊ शकेल? “यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करितात; आणि राजासनावर बसलेला त्याजवर आपला मंडप करील. ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत; व तान्हेलेही होणार नाहीत; त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही; कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेढपाळ होईल व जीवनी पाण्याच्या झऱ्याजवळ त्यांस नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रु पुसून टाकील.” प्रगटी. ७:१५-१७.DAMar 283.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents