Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ६—“आम्ही त्याचा तारा पाहिला”

    मत्तय २.

    “हेरोद राजाच्या दिवसांत यहूदीयातील बेथलहेमांत येशू जन्मल्यानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमास येऊन विचारूं लागले की यहूद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो.’DAMar 36.1

    पूर्वेकडून आलेले मागी लोक तत्त्वज्ञानी होते. ते जन्मतः कुलीन घराण्यांत समाविष्ट असलेल्या मोठ्या व वजनदार वर्गातील होते, आणि राष्ट्रातील धनसंपन्न व विद्यासंपन्न लोकांत समाविष्ट होते. त्यांच्यात असे अनेक लोक होते की त्यांना श्रद्धाळू लोकांत बसवण्यात आले होते. इतर साधे सरळ, निसर्गातील इश्वरी चिन्हांचा अभ्यास केलेले आणि प्रामाणिकपणा व बुद्धिमत्ता याबाबत सन्मानित होते. येशूच्या भेटीला आलेले मागी लोक या प्रकारचे होते.DAMar 36.2

    इतर धर्मतत्त्वांच्या अंधाऱ्या जगतात देवाचा प्रकाश नेहमीच चमकत आला आहे. जेव्हा त्या मागी लोकांनी तारांगणाचा अभ्यास केला आणि ताऱ्यांच्या तेजस्वी मार्गांत दडलेल्या गूढांचा थांग लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवाचे तेजस्वी वैभव त्यांच्या दृष्टीस पडले. अधिक स्पष्ट ज्ञान मिळविण्यासाठी ते इब्री शास्त्रवचनाकडे वळले. खुद त्यांच्या देशांत स्वर्गीय गुरूच्या आगमनाविषयीची भाकीते वर्तविणाऱ्या भविष्यसूचक लिखाणांचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. बलाम एके काळी देवाचा संदेष्टा असला तरी तो जादुगार वर्गातील होता; पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्याने इस्राएलाची भरभराट व मशीहाचे आगमन याविषयी भविष्य कथन केले होते; आणि त्याची भाकीतें आख्यायीकाद्वारे शतको शतकी सांगण्यात येत होती. तथापि जुन्या करारात तारणाऱ्याच्या आगमनाबाबत अधिक स्पष्टपणे प्रगट करण्यात आले होते; त्याचे आगमन अगदी नजीकच्या काळात होणार होते, आणि सर्व पृथ्वी देवाच्या गौरवी ज्ञानाने पूर्णपणे व्यापली जाणार होती हे मागी लोकांनी सहर्षे समजून घेतले होते.DAMar 36.3

    ज्या रात्री मागी लोकांना आकाशामध्ये तेजस्वी प्रकाश चमकताना दिसला होता, त्या रात्री बेथलहेमाच्या टेकड्यावर देवाच्या तेजस्वी गौरवाचा वर्षाव होत होता. तो प्रकाश नाहीसा झाल्यानंतर एक तेजःपुंज तारा प्रकट होऊन, आकाशांत तळपत राहीला. तो तारा खरेच तारा किंवा ग्रह नव्हता. तरी त्या देखाव्याच्या दृशामुळे मने उद्दीपित झाली होती. तो तारा म्हणजे दूरवर असलेल्या तेजस्वी दूतांचा घोळका होता, त्याविषयी मागी लोक अगदीच अजाण होते. तरी सुद्धा, तो त्यांच्यासाठी फार अर्थपूर्ण तारा होता. त्यांनी त्याबद्दल याजक व तत्वज्ञानी यांच्याबरोबर विचारविनिमय केला, प्राचीन काळातील नोंदणीच्या गुंडाळ्या धुंडाळून पाहिल्या. बलामाच्या भविष्यवाणीने वर्तविले होते, की, “याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून राजदंड निघेल” गणना २४:१७. हा नवा तारा वनचदत्त व्यक्तीची माहिती पुरविण्यासाठी पुढे पाठविलेला दूत असू शकेल का? मागी लोकांनी देवाने प्रगट केलेल्या सत्य प्रकाशाचे स्वागत केले होते, त्यानंतर त्यांना अधिक प्रखर प्रकाश देण्यात आला. त्यांनी जाऊन नवीन जन्मलेल्या राजकुमाराचा शोध करावा असे स्वप्नाद्वारे त्यांना सांगण्यात आले होते.DAMar 36.4

    “आपण कोठे जातो हे ठाऊन नसताही” (इब्री ११:८); देवाच्या पाचारणाचा स्वीकार करून आब्राहाम विश्वासाने निघून गेला. इस्राएल लोक वचनदत्त देशास जाण्यास विश्वासाने मेघस्तंभामागून चालले होते. अगदी त्याचप्रमाणे ते इतर धर्माचे लोक वचनदत्त तारकाचा शोध करण्यास विश्वासानेच निघाले होते. (त्या काळी) पौर्वात्य देशांत मौल्यवान वस्तूंची मुबलकता होती, त्यामुळे निघताना मागी लोक रिक्त हस्ते निघाले नाहीत. राजे रजवाडे किंवा श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्तींचा मान करण्यासाठी सन्मानिय कृती म्हणून त्यांना भेट वस्तू देण्याची प्रथा होती. त्यानुसार ज्याच्याद्वारे सकल भूतलावरील सर्व घराणी आशिर्वादीत करण्यात येणार होती त्याला त्या देशाच्या कुवतीनुसार अति मौल्यवान भेटी देण्यात आल्या होत्या. तो तारा दृष्टीक्षेपांत असावा म्हणून रात्रीच्याच वेळी प्रवास करणे अगत्याचे होते; तरी सुद्धा ते प्रवाशी ज्याच्या शोधार्थ निघाले होते; त्याच्याविषयी पारंपारिक म्हणी व भविष्यसूचक गाणी (ओव्या) गात स्वतःची करमणूक करून घेत होते. विश्रांतीच्या प्रत्येक मुक्कामाच्यावेळी ते भाकीते शोधून पाहात होते. त्यामुळे त्यांना दैवी मार्गदर्शन मिळते अशी त्यांची पूर्ण खातरी झाली होती. बाह्य चिन्ह म्हणून जसा तारा त्यांच्यापुढे होता, तसेच अंतर्गत चिन्ह म्हणून त्यांच्या हृदयावर ठसा उमठविणारा पवित्र आत्मा त्यांच्या संगती होता. प्रवास जरी प्रदीर्घ होता तरी आनंददायक होत होता.DAMar 37.1

    ते इस्राएलाच्या प्रदेशांत येऊन पोहंचले होते, आणि ऑलिव्ह डोंगराच्या उतरणीवर खाली उतरत होते, तो येरुशलेम त्यांना दिसू लागले होते, तो पाहा काय चमत्कार! त्यांना त्यांच्या खडतर कंटाळवाण्या प्रवासात मार्गदर्शन करणारा तारा मंदिराच्यावर येऊन थांबला, आणि काही वेळाने त्यांच्या डोळ्यापुढून नाहीसा झाला. मशीहाच्या जन्माची हर्षमय बातमी हरेकाच्या मुखी असेल अशा नितांत अपेक्षेने ते पुढे पुढे जात होते. पण छे! त्यांच्या सर्व चौकशा निष्फळ ठरल्या! पवित्र नगरात पोहचल्यानंतर ते आश्रयासाठी मंदीराकडे गेले, आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण नव राजाच्या जन्माची माहिती असलेला त्यांना कोणीही आढळला नाही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे (केलेल्या चौकशीमुळे) आनंदाच्या छटा उमटलेल्या दिसल्या नाहीत, परंतु खरेच सांगायचे तर तिटकारामिश्रित आश्चर्याचा व भीतीचा भावच दिसला होता.DAMar 37.2

    याजक लोक, कथा, सांप्रदाय यांचे अस्खलितपणे कथन करण्यात पटाईत होते. ते स्वतःच्या धर्माची आणि धार्मिकतेची मनापासून वाखाणणी करीत असत, पण त्याचवेळी ते ग्रीक व रोमी लोकांना इतरांपेक्षा महापापी मानीत होते. मागी लोक मूर्तिपूजक नाहीत; खरे म्हणजे देवाच्या दृष्टीने ते यहूदी लोकांपेक्षा किती उच्च दर्जाचे आहेत. ते देवाचे खरेखुरे उपासक होते, असे असूनहि त्यांना यहूदी लोकांकडून इतर धर्माचे गणण्यात येत होते. धर्म विधीच्या अभिषिक्त पाठीराख्यांना उत्कंठापूर्ण चौकशी करणाऱ्या मागी लोकांच्या विषयी सहानुभूती वाटली नव्हती.DAMar 38.1

    मागी लोकांच्या आगमनाची वार्ता सर्व यरुशलेमभर तत्काळ पसरली गेली. त्यांनी आणलेल्या नव्या वार्तेने सर्व लोकांत खळबळ उडविली. या बातमीने हेरोदाच्या राजमहालातही शिरकाव केला. प्रतिस्पर्ध्याच्या शक्यतेमुळे कपटी अदोमी जागृत झाला. राजासनावर स्थानापन्न होण्यापूर्वी त्याला बराच रक्तपात करावा लागला होता. ज्या लोकांवर तो सत्ता गाजवीत होता ते लोक त्याचा अतिशय तिरस्कार करीत होते. रोमची कृपाच केवळ त्याची संरक्षक ढाल होती. परंतु नव्या राजकुमाराला स्वर्गातून हक्क मिळाला होता.DAMar 38.2

    याजक या नवख्या लोकासंगती संगनमत करून लोकांमध्ये दंगल करण्यास लोकांना चितावनी देतील व त्याला (हेरोदाला) राज्यासनावरून पदच्युत करतील असा त्यांच्याविषयी त्याला संशय आला. तथापि, त्याने त्यांच्या वरचा अविश्वास गुप्त ठेवला, आणि त्यांच्याहीपेक्षा अधिक चातुर्याने त्यांची कारस्थाने (बेत) मोडून काढण्याचा निर्धार केला. शास्त्री व याजक यांना बोलावून घेऊन मशीहाच्या जन्मस्थानाविषयी त्यांच्या पवित्र ग्रंथांची शिकवण काय आहे याबद्दल त्याने त्यांना जाब विचारला.DAMar 38.3

    राज्यासन बळकावलेल्या व्यक्तिकडून आणि परदेशी लोकांच्या विनंतिवरून केल्या गेलेल्या चौकशीमुळे यहूदी गुरूंचा स्वाभिमान जबरदस्त डिवचला गेला होता. भाकिताविषयीच्या गुंडाळ्या ज्या बेपर्वाईने ते धुंडाळत होते त्याबद्दल तो जुलमी राजा अधिक संतप्त झाला होता. भाकिताबद्दलची त्यांना असलेली माहिती ते त्याच्यापासून लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्याला वाटले. त्याने बारकाईने शोध करून अपेक्षीत राजाच्या जन्मस्थळाची माहिती जाहीर करण्यास त्यांना फर्माविले. “ते त्याला म्हणाले, यहूदीयातील बेथलहेमात; कारण संदेष्ट्याच्याद्वारे असे लिहिले आहे,DAMar 38.4

    “हे बेथलहेमा, यहूदाच्या प्रांता,
    तू यहूदाच्या सर्व सरदारामध्ये
    कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही;
    कारण माझ्या इस्राएल लोकांस पाळील
    असा सरदार तुझ्यातून निघेल”
    DAMar 39.1

    खाजगिरित्या चौकशी करण्यासाठी हेरोदाने मागी लोकांना बोलावून घेतले. त्याच्या मनांत क्रोध व भयमिश्रित आग धुमसत होती. तरी त्याने बाहेरून शांत स्वरूप धारण केले आणि त्या प्रवाशी पाहुण्यांचे आदराने स्वागत केले. तो तारा त्यांच्या दृष्टीस कधी पडला याचा काळ व वेळ याविषयी चौकशी केली, आणि तोही ख्रिस्तजन्माच्या बातमीचा आनंदाने स्वीकार करील असे म्हणाला. “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा; व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.” असे सांगून त्या पाहुण्यांना त्याने बेथलहेमास पाठविले.DAMar 39.2

    यरुशलेमातील याजक व वडील, येशूच्या जन्माविषयी जितका खोटा बहाणा करीत होते तितके ते त्याविषयी अजाण नव्हते. मेंढपाळांना देवदूतांनी दिलेल्या भेटीचा वृतात येरुशलेमवाशीयापर्यंत येऊन पोहचला होता. परंतु तो गुरूजी लोकांनी अगदी दुर्लक्षणीय मानला होता. वास्तविक त्यांनी स्वतःच येशूला शोधून काढायला हवे होते व त्याच्या जन्मस्थळापर्यंत मागी लोकांना वाट दाखवायला हवे होते. परंतु त्यांच्याऐवजी मागी लोकच त्यांचे लक्ष मशीहाच्या जन्मस्थळाकडे वेधण्यासाठी त्यांच्याकडे आले; व विचारू लागले की, “यहूद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो.”DAMar 39.3

    या काळी गर्व व द्वेष यानी प्रकाशाविरूद्ध दरवाजा बंद केला होता. मेंढपाळ व मागी लोकांनी आणलेल्या वार्तेवर जर विश्वास ठेवण्यात आला असता तर त्यामुळे याजक व धर्मगुरू यांची अनिष्ट परिस्थिती झाली असती आणि देवाच्या सत्य वचनाचे स्पष्टीकरण करण्याचा हक्क त्यांचा आहे असे सांगणाऱ्यांचे खंडन झाले असते. ज्या (मागी व मेंढपाळ) लोकांना त्या विद्वान गुरूंनी विधर्मि अशी संज्ञा दिली होती अशा लोकांकडून माहिती घेण्याइतपत त्यांना कमीपणा घ्यायचा नव्हता. ते म्हणाले की, अशिक्षित मेंढपाळ व बेसुंती विधर्मि यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी देव त्यांना (याजक व गुरू) बाजूला सारून देतो, असे होणे शक्य नाही. हेरोद राजाला व सर्व यरुशलेमाला गोंधळात टाकणाऱ्या बातम्याबद्दल तिरस्कार (निषेध) व्यक्त करण्याचा त्यांनी निश्चय केला. या सर्व गोष्टी खऱ्या आहेतच हे पाहाण्यासाठी बेथलहेमाला जाण्याचीसुद्धा त्यांची तयारी नव्हती. येशूवर निष्ठा प्रकट करणे हा मनाचा शुद्ध खोटा धर्मवेढेपणाDAMar 39.4

    आहे अशी लोकांची त्यांनी समजूत करून दिली. या वेळेपासून याजक व गुरू यांनी येशूला नाकारण्यास सुरूवात केली होती. याच वेळेपासून त्यांचा गर्व व दुराग्रह वाढला व त्याचे रूपांतर येशूच्या द्वेषात होऊन तो द्वेष त्याच्या मनात घर करून बसला. जेव्हा देव इतरासाठी दार उघडीत होता, तेव्हा यहूदी पुढारी मात्र स्वतःसाठी दार बंद करीत होते.DAMar 40.1

    मागी लोक परस्पर दुसऱ्या मार्गाने निघून गेले. ते शहराच्या वेशीतून बाहेर पडत असतांना त्यांच्यावर संध्याछाया पसरत होती, त्यावेळी सुद्धा त्यांना मोठा आनंद मिळवून देणारी घटना घडली, त्यापूर्वीचा तो तारा त्यांना पुन्हा दिसू लागला, तो त्यांना बेथलहेमच्या वाटेवर मार्गदर्शन करीत होता. येशूच्या साध्याबाध्या रहाणीमानाची जी माहिती मेंढपाळांना देण्यात आली होती ती मागी लोकांना दिली नव्हती. प्रदीर्घ प्रवासानंतर तेथील यहूदी पुढाऱ्यांतील अनास्था पाहिल्यानंतर ते अतिशय निराश झाले होते, ते जितक्या खातरीने यरुशलेमाला आले होते त्यापेक्षा किती तरी कमी खात्रीने त्याच्या बाहेर पडले होते. बेथलेहेमात आल्यानंतर त्यांना तेथे जन्मलेल्या नव राजाचे संरक्षण करण्यास ठेवलेला बादशाही थाटाचा एक रक्षक दिसला नाही. जगातील सन्मानित लोकापैकी एकही येशूच्या भेटीला आला नव्हता. येशूला पाळण्यात घालून गोठ्यात ठेवण्यात आले होते. केवळ त्याचे अशिक्षीत आईवडीलच त्याचे रखवालदार होते. ज्याच्याविषयी असे लिहिले आहे: “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या रक्षिलेल्या लोकांस परत आणावे... मजकडून होणारे तारण तूं दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमितो.” यशया ४९:६. तो हाच असावा काय?DAMar 40.2

    “घरांत जाऊन त्यांनी बालकास त्याची आई मरीया इच्याजवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले.” (कारण) येशूच्या साध्या भोळ्या अवतारात देवाची समक्षता होती. त्यांनी त्याला त्यांचा तारणारा असे माणून आपली अतःकरणे समर्पित केली आणि त्यानंतर आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून “सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली.” काय हा त्यांचा विश्वास! “एवढा विश्वास मला इस्राएलांतहि आढळला नाही.” मत्तय ८:१०. असे जे उद्गार, नंतरच्या काळांत रोमी जमादाराबद्दल काढण्यात आले होते तेच उद्गार पूर्वेकडील मागी लोकांनाही लागू होण्यासारखे होते.DAMar 40.3

    मागी लोकांनी हेरोद राजाप्रमाणे येशूविषयी खोटा बहाणा करण्याचा विचार केला नव्हता. जेव्हा त्यांच्या प्रवासाच्या प्रयोजनाची पूर्तता झाली होती, तेव्हा यरुशलेमाला परत जाऊन हेरोद राजाला त्यांच्या यशाची हकीगत सांगण्याची त्यांची तयारी होती. परंतु त्यांनी राजाशी कसलाच संबंध ठेवू नये असा स्वप्नाद्वारे त्यांना दैवी संदेश देण्यात आला होता. त्यानुसार ते यरुशलेमाला न जाता स्वदेशी परत गेले.DAMar 40.4

    अगदी त्याच पद्धतीने योसेफास मरीया व बाळ यांच्याबरोबर मिसर देशास पळून जाण्यास सांगितले होते. प्रभूचा दूत त्याला म्हणाला, “मी तुला तेथून जाण्यास सांगेन तोपर्यंत तेथे ऐस; कारण बालकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे.” योसेफ विना विलंब, संरक्षण व्हावे म्हणून रातोरात तेथून प्रवासास निघाला.DAMar 41.1

    देवाने मागी लोकांद्वारे स्वपुत्राच्या जन्माकडे यहूदी राष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. यरुशलेमातील त्यांच्या चौकशीमुळे, सर्व लोकांत खळबळ माजली होती, आणि हेरोद राजाच्या मनांत द्वेष भावना उचंबळून आली होती. त्यामुळे याजक व गुरू यांना मशीहाविषयीच्या भाकीताकडे व नुकत्याच घडलेल्या महत्वपूर्ण घटनेकडे लक्ष पुरविणे भाग पडले होते.DAMar 41.2

    देवाच्या प्रकाशापासून जगाला दूर ठेवण्यासाठी सैतानाने कंबर कसली होती, आणि तारकाला ठार मारण्यासाठी त्याने त्याचे सर्व बुद्धिचातुर्य पणाला लावले होते. परंतु जो कधीही डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही तो त्याच्या प्रिय पुत्रावर नजर ठेवून होता. ज्याने इस्राएल लोकांसाठी स्वर्गीय मान्न्याचा आकाशातून वर्षाव केला होता, दुष्कर दुष्काळी काळांत अन्न पुरविले होते, त्यानेच परदेशात मरीया व येशूबाळ यांना आश्रय दिला होता. परप्रांतातील मागी लोकांच्या देणग्याद्वारे देवाने मिसर देशातील प्रवासात सर्व गोष्टींचा पुरवठा केला होता आणि परदेशी लोकांच्या प्रदेशांत तात्पुरत्या मुक्कामाची सोय केली होती. DAMar 41.3

    मुक्तिदात्याचे सुस्वागत करणारे मागी लोक सर्वांत पहिले होते. त्याच्या चरणी त्यानी वाहिलेल्या देणग्या सर्वांत पहिल्या देणग्या होत्या. त्या देणग्याद्वारे सेवा करण्याची किती महान संधी त्यांना लाभली होती! प्रेमळ अतःकरणाच्या देणगीचा तो आनंदाने स्वीकार करतो, आणि त्या देणगीला तो त्याच्या सेवेमध्ये (कार्यासाठी) अधिक प्राधान्य देतो. आपण जर आपली अतःकरणे येशूला वाहिली असतील तर, आपण आपल्या देणग्या त्याला दिल्या पाहिजेत. ज्याने आमच्यावर प्रीति केली, आणि आमच्यासाठी स्वतःला वाहून घेतले, त्याला आपण, आपले सोने व रूपे, आपली जगिक मौल्यवान मालमता आपली सर्वोत्तम मानसिक व आध्यात्मिक दाने त्याच्या चरणी मनापासून अर्पण केली पाहिजेत.DAMar 41.4

    हेरोद मागी लोकांच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात होता. बराच वेळ लोटला तरी ते कांही परतले नाहीत, त्यामुळे त्याचा संशय वाढला. मशीहाच्या जन्मस्थळाची माहिती देण्याची धर्मगुरूंची अनैच्छा म्हणजे त्याच्या (राजाच्या) कुटिल कारस्थानाचे आकलन त्यांना झाले असावे, आणि त्या मागी लोकांनी बुद्धीपुरस्सर त्याला टाळले असावे असे त्याला वाटू लागले होते. या विचाराने तो वेडापिसा झाला होता. त्याचे कारस्थान फसले होते; तरीपण दंडुकेशाहीच्या अवलंबनाचा मार्ग शिल्लक होता. या बाळराजाच्या बाबतीत मागील उदाहरणाची उजळणी करणे हाच पर्याय त्याच्या हाती होता. इतराला आसनारूढ करण्याच्या प्रयत्नांत त्यांचे काय होऊ शकते हे त्या ताठर यहूद्यांना दिसून यायला हवे होते.DAMar 41.5

    दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या बालकांना ठार मारण्याची सनद देऊन तत्काळ शिपायांना बेथलहेमाला पाठवण्यात आले. दावीदाच्या नगरांत सुशांतीचा अनुभव घेणाऱ्या कुटुंबातील लोकांना असा प्रकारच्या आकांताचा अनुभव चाखावा लागला होता. सहाशे वर्षापूर्वी हे चित्र संदेष्ट्याला दाखवण्यात आले होते. “रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यांत आला, राहेल आपल्या मुलांकरितां रडत आहे, आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”DAMar 42.1

    ही विपत्ति यहूदी लोकांनी स्वतःहून स्वतःवर ओढवून घेतली होती. जर ते देवापुढे विश्वासूपणे व विनम्रपणे चालत राहिले असते तर देवाने त्यांच्यासाठी एका इशाऱ्यासरसी राजाचा क्रोध निरूपद्रवी केला असता. परंतु त्यांनी स्वतःच्या पापामुळे स्वतःला देवापासून अलग करून घेतले होते व त्याची संरक्षक ढाल असलेल्या पवित्र आत्म्याला झिडकारले होते. देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याच्या हेतूने त्यांनी देवाच्या वचनांचे अध्ययन केले नव्हते. ज्या भाकीतांच्या स्पष्टीकरणाने त्याचे स्वतःचे मोठेपण वाढेल व देव इतर राष्ट्रांचा कसा तिरस्कार करतो हे दाखवून देईल अशा भाकीतांचा ते अभ्यास करीत होते. मशीहा हा त्यांच्या शत्रूवर विजय मिळविण्यासाठी व इतरांना त्याचा क्रोधाने पायदळी तुडविण्यासाठी एक राजा म्हणून येणार आहे अशी त्यांची फुशारकीची व गर्विष्ठ प्रवृत्ती होती. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या सत्ताधिशांचा द्वेष भडकविला होता. ख्रिस्ताच्या सेवाकार्याविषयीच्या त्यांच्या विपरित स्पष्टिकरणाद्वारे सैतानाने तारणाऱ्याचा नाश आवाक्यांत आणण्याची योजना केली होती; पण तसे घडण्याऐवजी उलटून सगळे त्यांच्या स्वतःच्या माथ्यावर आदळले.DAMar 42.2

    हेरोदाच्या राजवटीला काळिमा फासणाऱ्या त्याच्या अनेक क्रूर कृत्यापैकी हे आणखी एक कृत्य होते. निर्दोष बालकांची हत्या केल्यानंतर अल्पावधीत त्याला अशा प्रकारच्या कोपाला बळी पडणे भाग पडले की, त्याची त्यातून सुटका करणे शक्य झाले नव्हते. भयानक मरणाने तो मरण पावला.DAMar 42.3

    अद्यापि मिसर देशांत असलेल्या योसेफाला देवदूताने इस्राएल देशांत जाण्याची आज्ञा दिली. येशू दाविदाच्या तक्ताचा वारीस असल्यामुळे, बेथलहेमात स्थायिक होण्याची योसेफाची मनीषा होती. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहूदीयांत राज्य करीत होता, आणि ख्रिस्ताविरूद्ध तोच त्याच्या बापाच्या योजना आमंलात आणील अशी भीती योसेफाला वाटली. हेरोदाच्या सर्व पुत्रांच्यामध्ये अर्खेलाव हुबेहूब त्याच्या बापाच्या स्वभावाचा होता. अगोदरच यरुशलेमातील धामधूम, व रोमी शिपायाद्वारे हजारो यहूद्यांची झालेली कत्तल यामुळे वारसा हक्कामुळे त्याचे गादीवर बसणे लक्षात ठेवण्यासारखे झाले होते.DAMar 42.4

    योसेफाला सुरक्षित स्थळी जाण्यास पुन्हा सांगण्यात आले होते. तो नासरेथाला गेला. नासरेथ हे त्याचे मूळ गांव. येशू तेथे जवळ जवळ तीस वर्षे राहिला, “यासाठी की त्याला नासोरी म्हणतील हे जे संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.” गालील प्रांतावर हेरोदाच्या मुलाची राज्यसत्ता होती. परंतु तेथे बहुमिश्रित परदेशी रहिवाशांचा भरणा अधिक होता. त्यामुळे तेथे यहूद्यांच्या हक्काबाबत कमी आस्था होती, आणि येशूचे अधिकार (हक्क) सत्ताधाऱ्यामध्ये द्वेष चेतवितील हे कमी संभवनीय होते.DAMar 43.1

    जेव्हा मुक्तिदाता या भूतलावर आला त्यावेळी अशाप्रकारे त्याचे स्वागत करण्यात आले होते. त्या बाळ तारकाला राहाण्यासाठी ना घर, ना सुरक्षितता. देवाला मानवाच्या तारणाचे कार्य पुढे न्यावयाचे असतांनासुद्धा त्याला, आपल्या परमप्रिय मूलाला मानवाच्या हाती सोपवयाला नको होते. परमेश्वराला त्याचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण करता येईपर्यंत व ज्यांना तारण्यासाठी तो आला त्यांच्या हातून मारला जाईपर्यंत देवाने येशूचे संरक्षण करण्यासाठी व त्याची काळजी घेण्यासाठी त्याने देवदूतांना आज्ञा दिली होती.DAMar 43.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents