Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १९—याकोबाच्या विहीरीवर

    योहान ४:१-४२.

    येशू गालीलाकडे परत जाण्यास निघाला असतांना शोमरोन प्रदेशातून वाटचाल करीत होता. अगदी भरदुपारच्या वेळी तो शखेम गांवाच्या खोऱ्यापर्यंत येऊन पोहंचला. त्या दरीच्या मुखाजवळ याकोबाची विहीर होती प्रवासाने शिणलेला येशू विश्रांतीच्या विरंगुळ्यासाठी त्या विहीरीवर बसून राहिला आणि त्याचे शिष्य अन्न विकत आणण्यासाठी गेले.DAMar 142.1

    यहूदी लोक व शोमरोनी लोक परस्पराचे कटु वैरी होते, म्हणून शक्य होईल तितके ते एकमेकाबरोबर व्यवहार करण्याचे टाळत होते. तरी पण अनिवार्य परीस्थितीमध्ये शोमरोनी लोकांबरोबर व्यवहार करणे गुरूजनाकडून कायदेशीर मानले जात होते. यहूदी शोमरोनीकडून काहीच उसनेपासने घेऊ शकत नव्हता, किंवा दयेचा स्वीकार करून शकत नव्हता, भाकरीच्या एका तुकड्याचा किंवा पाण्याचा एक प्यालासुद्धा स्वीकार करू शकत नव्हता. अन्न विकत घेण्याबाबत, शिष्य, त्याच्या राष्ट्राच्या प्रथेप्रमाणे कृती करीत होते. शोमरोनीकडून मेहरबानीची याचना करण्याचे किंवा कोणत्याही प्रकारे त्यांचा फायदा साधण्याचा प्रयत्न करण्याचे ख्रिस्ताच्या शिष्यांच्यासुद्धा मनात आले नव्हते.DAMar 142.2

    भूकेने व तहानेने व्याकूळ होऊन, येशू त्या विहीरीवर बसला होता. सकाळपासून प्रदीर्घ प्रवास झाला होता, आणि आता रखरखीत उन्हाची किरणे येशूवर मारा करीत होती. थंडगार आणि तरतरी आणणारे पाणी त्याच्या अगदी जवळ होते, पण ते त्याला मिळू शकत नव्हते या विचाराने त्याची तहान अधिकच प्रखर झाली; कारण त्याच्याकडे पाण्याचा पोहरा आणि ओढण्यासाठी दोर नव्हता. त्यांत विहीरही फार खोल होती. येशू पूर्णपणे मानवी स्वभावाचा होता. आणि म्हणून त्याला कोणी तरी पाणी काढून द्यावे यासाठी तो कोणाची तरी प्रतीक्षा करीत होता.DAMar 142.3

    तेवढ्यांत पाणी भरण्यासाठी (ओढण्यासाठी) एक शोमरोनी स्त्री विहीरीवर आली. येशू तेथे होता याविषयी ती अजाण होती असे भासवून तिने भरभर पाणी ओढून स्वतःचा घडा पाण्याने भरला. परत जाण्यासाठी मागे वळाली तेव्हा ख्रिस्ताने पाण्यासाठी तिच्याकडे विनंती केली. अशा प्रकारची मेहरबानी करण्यास कोणतीही पौर्वात्य व्यक्ती मागेपुढे पाहाणार नाही. पौर्वात्य देशात पाण्याला “देवाचे दान’ मानण्यात येत होते. तहानलेल्या पथिकाला पिण्यास पाणी देणे इतके पवित्र कार्य मानण्यात येत होते की ते पार पाडण्यासाठी वाळवंटातील अरब कोणतेही आड वळण घेण्यास तयार असत. यहूदी आणि शोमरोनी यांच्यातील “कळसाला पोहचलेल्या” द्वेषभावनेने येशूला दया दाखवण्यास त्या स्त्रीला मज्जाव केला; परंतु ख्रिस्त तिच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्याचा मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करीत होता, आणि दैवी प्रीतीतून उद्भवलेल्या व्यवहार चातुर्याने ख्रिस्ताने तिला विचारले, दया दाखवण्याची तयारी दर्शविली नाही. देऊ केलेल्या दयेला कदाचित धुडकावण्यात आले असते. परंतु श्रद्धा श्रद्धेला चेतना देते. स्वर्गाचा राजा त्या बहिष्कृत व्यक्तीकडे आला आणि तिच्यापासून सेवेची मागणी करू लागला. ज्याने समुद्र उत्पन्न केला, जो जलाशयावर नियंत्रण ठेवतो, ज्याने झुळझुळ वाहणारे झरे उत्पन्न केले, तो थकून भागून याकोबाच्या विहीरीवर विश्रांति घेत होता, आणि पिण्याच्या पाण्याच्या दानासाठी अनोळखी व्यक्तीच्या दयेवर अवलंबून राहीला.DAMar 142.4

    येशू यहूदी होता हे स्त्रीने ओळखले. आश्चर्यचकित झाल्यामुळे येशूच्या विनंतीनुसार त्याची मागणी पूर्ण करण्याचे ती विसरून गेली, आणि त्या विनंतीचे कारण शोधण्याचा तिने प्रयत्न केला. ती त्यास म्हणाली, “आपण यहूदी असता मजसारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयास पाणी कसे मागता?”DAMar 143.1

    येशूने तिला उत्तर दिले. “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयाला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण, हे तुला कळले असते तर तू त्याजजवळ मागितले असते, आणि त्याने तुला जीवंत पाणी दिले असते.” मी तुझ्याकडे तुझ्या जवळ असलेल्या विहीरीतील एक क्षुल्लक मेहरबानी म्हणून थोडेसे पाणी मागितले म्हणून तुला नवल वाटले. तू मजकडे मागितले असतेस, तर मी तुला सार्वकालिक जीवनाचे पाणी प्यावयास दिले असते.DAMar 143.2

    त्या स्त्रीला येशूच्या त्या शब्दांचे आकलन झाले नाही, तरी त्यांचे गांभीर्य तिला जाणवले होते. तिच्या अस्थिर व उपहासक वृत्तीत बदल होऊ लागला होता. त्यांच्या समोरच असलेल्या विहीरीविषयीच बोलत होता असे समजून ती म्हणाली, “महाराज पाणी काढावयास आपणाजवळ पोहरा नाही व विहीर खोल आहे; तर ते जीवंत पाणी आपणाजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली; तो स्वतः... हिचे पाणी पीत असत, त्यापेक्षा आपण मोठे आहांत काय?” तिने तिच्यासमोर, तहानेने व्याकूळ झालेले, थकलेला आणि धुळीने माखलेला असा एक फक्त प्रवाशी पाहिला. मनातल्या मनात तिने त्याची तुलना सन्मान्य कुलाधिपती याकोब याच्याशी केली. तिच्या अंतःकरणात तिने एक भावना बाळगली होती, आणि ती भावना स्वाभाविक होती, की पूर्वजांनी दिलेल्या विहीरीबरोबर इतर कोणतीही विहीर बरोबरी करू शकत नव्हती. ती मागे वळून पूर्वजाकडे नजर लावीत होती आणि पुढे मशीहाच्या आगमनावर (जन्मावर) लक्ष केंद्रित करीत होती. पण खुद्द मशीहाच तिच्यासमोर होता आणि त्याची तिला ओळख नव्हती. आजही असे किती तरी तहानेने व्याकूळ झालेले लोक अगदी जीवनी पाण्याच्या झऱ्याजवळ आहेत, पण ते जीवनी पाण्याच्या झऱ्यासाठी दूर कुठेतरी पाहात आहेत! “तू आपल्या मनांत म्हणू नको की उर्ध्वलोकी कोण चढेल (अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास) किंवा अधोलोकी कोण उतरेल? (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास.). .. तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या तोंडात व तुझ्या अंतःकरणात आहे; जे विश्वासाचे वचन आम्ही गाजवितो तेच हे आहे; जर तू आपल्या मुखाने येशू प्रभु आहे असे स्वीकारशील, आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ति होईल.” रोम. १०:६-९.DAMar 143.3

    येशूने त्याच्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर तात्काळ दिले नाही, परंतु अगदी प्रामाणिकपणे तो म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुनः तहान लागेल; परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याजमध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.”DAMar 144.1

    जो या जगातील झऱ्यांचे पाणी पिऊन तहान भागविण्याचा प्रयत्न करतो त्याला पुन्हा तहान लागेलच. या जगात सर्वत्र असमाधानाचे “साम्राज्य” आहे. सर्वत्र लोक असमाधानी आहेत. त्यांच्या आत्म्याची गरज भागवील अशा गोष्टीची ते अपेक्षा बाळगतात. ती गरज केवळ एक व्यक्ती भागवू शकते. सर्व जगाची गरज, अखिल जगताची आशा सर्व राष्ट्रांची आशा ती आशा म्हणजे ख्रिस्त होय. दैवी कृपा जी कृपा केवळ तोच देऊ शकतो, ती कृपा म्हणजेच जीवनी पाणी, स्वच्छ शुद्ध करणारे पाणी, तरतरी आणणारे पाणी, उत्साह वर्धक पाणी (अर्थात व्यक्तीचा उत्साह).DAMar 144.2

    येशूने अशी कल्पना दिलेली नाही की, जीवनी पाण्याचा केवळ एक थेंब, तो मिळणाऱ्यांची गरज भागवितो, तथापि जो कोणी ख्रिस्तप्रीतीचा स्वाद घेतो तो ती प्रीती अधिक प्राप्त करण्यासाठी सतत आतूर राहील. तो इतर दुसरे काही मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही. भौतिक धन दौलत, सन्मान आणि भोगविलास त्याला आकर्षित करीत नाहीत. त्याचे हृदय सतत फक्त त्याचाच धावा करते. जो व्यक्तीला त्याची गरज दाखवून देतो तो तिची तहान व भूक भागवण्याची वाट पाहात असतो. प्रत्येक मानवी साधन व आधार अपयशी ठरेल. सर्व हौद रिक्त होतील, सर्व तळी आटून जातील, परंतु आपला मुक्तिदाता हा एक न आटणारा झरा आहे. त्यातून आपण सतत पीत राहीलो तरी सुद्धा आम्हाला ताजा पुरवठा आणि तोही नेहमी राहील. ज्याच्यामध्ये ख्रिस्त वस्ती करतो तो स्वतः आशीर्वादाचा झरा, त्याच्या सर्व गरजा भागविण्यासाठी पुरेल इतके सामर्थ्य व कृपा ही उपसू शकतो.DAMar 144.3

    जेव्हा येशू जीवनी पाण्याविषयी बोलला, तेव्हा त्या स्त्रीने त्याच्याकडे अगदी मोठ्या नवलाईने लक्ष लावले (दिले). ज्या दानाविषयी तो बोलला होता त्या दानासाठी त्याने तिची आस्था उंचावून सोडली आणि मनिषा जागृत केली होती. तो ज्य पाण्याचा उल्लेख करीत होता ते पाणी म्हणजे याकोबाचे विहीरेचे नव्हते हे तिला समजले होते; कारण ते पाणी ती नेहमीच पीत होती आणि पुन्हा तिला तहान लागत होती. म्हणून ती म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व मला पाणी काढावयास येथवर येण्याचे पडू नये म्हणून ते पाणी मला द्यावे.’DAMar 145.1

    एकाएकी येशूने त्याचे संभाषण दुसरीकडे वळविले. तो जे दान देण्याचा प्रयत्न करीत होता, ते तिला मिळण्यापूर्वी तिला तिच्या पापाची व तारणाऱ्याची जाणीव करून देणे आवश्यक होते. म्हणून तो म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलाव आणि इकडे ये.’ त्यावर “ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही.” अशा प्रकारे त्या विषयावरील सर्व प्रश्नावली तेथेच थांबविण्याची तिने अपेक्षा केली. परंतु येशूने संभाषण पुढे चालू ठेवले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस कारण तुला पांच नवरे होते; आणि आता जो तुला आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे म्हटलेस.”DAMar 145.2

    हे सर्व ऐकणाऱ्या त्या स्त्रीचा थरकाप झाला. जे काही सर्वकाळ दडवून ठेवण्याची तिची अपेक्षा होती ते सर्व दृष्टोत्पतीस आणून एक अदृश्य हात तिच्या जीवनाच्या इतिहासाची पाने पालटत होता. तिच्या जीवनाची गुपिते वाचणारा असा तो कोण होता? मग, शाश्वत काळाचा, आणि आता दडविलेल्या सर्व गोष्टी जेव्हा उघड केल्या जातील त्या भविष्य काळातील न्यायनिवाड्याचा विचार तिच्या मनात आला. अशा प्रकारे, तिच्या जाणीवेला जागृत करण्यात आले होते.DAMar 145.3

    काहीच नाकबूल करता येणे तिला शक्य नव्हते; तथापि जो अगदीच नको असलेला (अप्रिय) विषय होता त्याचा इथंभूत उल्लेख टाळण्याचा तिने प्रयत्न केला आणि मनस्वी पूज्य भावनेने ती म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहांत हे मला आता समजले.’ नंतर दोषी असल्याचा न्यायनिवडा तेथेच थांबविण्याच्या इराद्याने, ती धार्मिक वितंडवादाच्या विषयाकडे वळली. हा जर खरेच संदेष्टा होता, तर खचीतच तो प्रदीर्घ काळपर्यंत ज्या बाबी वादाच्या भोवऱ्यात अडकून पडल्या होत्या त्या बाबीविषयी माहिती देऊ शकला असता.DAMar 145.4

    मोठ्या सहनशीलतेने येशूने तिला जसे हवे होते तसे संभाषण करण्याची मुभा दिली. मध्यन्तरीच्या वेळात तिच्या मनाला पुन्हा सत्य पटविण्यासाठी तो संधीची वाट पाहात होता. इतक्यात ती म्हणाली “आमच्या पूर्वजानी याच डोंगरावर उपासना केली; आणि तुम्ही म्हणता, उपासना ज्या स्थानी केली पाहिजे ते स्थान यरुशलेमात आहे.” तेथून गरिज्जीम पर्वत दिसत होता त्यावरील मंदिर पाडून टाकण्यात आले होते, फक्त वेदी शिल्लक राहीली होती. यहूदी व शोमरोनी या दोन्ही लोकांत उपासना स्थळ वादाचा विषय होता. शोमरोनी लोकांचे काही पूर्वज इस्राएल लोकांतले होते; परंतु त्यांच्या पापामुळे देवाने मूर्तिपूजक राष्ट्रे त्यांच्यावर विजय मिळवू शकतील असे केले आणि पिढ्यान पिढ्या ते त्यांच्यात मिसळून राहिले. क्रमाक्रमाने त्यांचाच धर्म भ्रष्ट झाला. त्यांच्या मूर्ती केवळ सर्व विश्वाचा अधिपती असलेल्या जीवंत देवाची आठवण करून देतात अशी त्यांची धारणा होती हे खरे होते. तथापि ते त्यांनी घडविलेल्या मूर्तीला पूज्य मानणारे बनले होते.DAMar 145.5

    जेव्हा एज्राच्या काळात यरुशलेमातील मंदिराची पुनः बांधणी करण्यात आली होती तेव्हा मंदिर उभारणीच्या कामात शोमरोनी लोकांना यहूदी लोकांत सहभागी होण्याची इच्छा दर्शविली होती. त्यावेळी त्यांना संधि देण्याचे नाकारण्यात आले होते, आणि या दोन्ही जमातीत तीव्र स्वरूपाचे वैमनस्य उत्पन्न झाले होते. म्हणून शोमरोनी लोकांनी गरिज्जीम डोंगरावर प्रतिस्पर्धा मंदिर बांधले. त्या मंदिरात ते मोशेच्या धर्मविधीनुसार उपासना करीत होते. त्यांनी मूर्तिपूजेचा सर्वस्वी त्याग केला नव्हता. त्याच्यावर भयंकर संकट कोसळले, त्यांच्या मंदिराचा त्यांच्या शत्रूनी नाश केला. तेव्हा त्यांच्यावर शापाचा घाला ओढवल्यासारखे भासत होते. असे असून सुद्धा ते त्यांच्या रुढीना व उपासना पद्धतीना बिलगून राहिले. यरुशलेमातील मंदिर हे देवाचे मंदिर आहे असे कबूल करीत नव्हते; यहूदी धर्म त्यांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ होता असे मान्य करीत नव्हते.DAMar 146.1

    आणखी पुढे त्या स्त्रीला उत्तर देताना येशू म्हणाला, “तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमातही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे माना. तुम्हास ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करितो; कारण यहूद्यातूनच तारण आहे.” येशूने प्रदर्शित केले की तो शोमरोनी लोकाविरूद्ध असलेल्या यहूदी पूर्वग्रहकलुषिततेपासून मोकळा होता. त्यावेळी त्या शोमरोनीची यहूदी लोकांविरूद्ध असलेली पूर्वग्रहकलुषितता मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. मूर्तिपूजेमुळे शोमरोनी लोकांचा विश्वास भ्रष्ट झाला होता या मुद्याचा उल्लेख करताना त्याने स्पष्ट सांगितले होते की तारणाविषयीची सर्व सत्ये यहूदी लोकांच्या स्वाधीन करण्यात आलेली होती, आणि मशीहा त्यांच्यातूनच निपजणार होता. पवित्र लिखानामध्ये (शास्त्रामध्ये) त्यांना देवाच्या शीलस्वभावाचे आणि त्याच्या राज्यशासनाच्या तत्त्वाचे स्पष्ट चित्र देण्यात आले होते. देवाने ज्याना स्वतःविषयी ज्ञान दिले होते त्या यहूदी लोकांत येशूने स्वतःची गणना केली होती.DAMar 146.2

    त्याच्या श्रोत्याचे विचार, वादग्रस्त प्रश्न व विधीसंस्कार या विषयाहून उंचावण्याची त्याने इच्छा बाळगली होती. तो म्हणाला, “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ आहे, किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”DAMar 146.3

    निकदेमाबरोबर संभाषण करताना येशूने, “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” योहान ३:३. हे जे तत्त्व (सत्य) निकदेमाला प्रदर्शित केले होते तेच सत्य येथेही उद्घोषित केले होते. पवित्र डोंगरावर किंवा पवित्र मंदिरात प्रार्थना केल्यामुळे लोकांना स्वर्गाशी सख्यसंबंध प्रस्थापित करता येत नाहीत. केवळ बाह्यत्कारी पद्धति आणि विधिमध्ये धर्माला बंदिस्त करण्यात येऊ नयेः देवापासून असलेला धर्मच केवळ देवाकडे घेऊन जातो. त्याची योग्यप्रकारे उपासना करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून आपला जन्म झाला पाहिजे. तो आम्हाला देवाची ओळख करून घेण्याची व त्याच्यावर प्रेम करण्याची क्षमता देऊन, हृदय शुद्ध आणि मन नवीन करील. तो त्याच्या आवश्यकतेनुसार आम्हाला आज्ञाकितपणा देईल. हीच खरी उपासना आहे. पवित्र आत्म्याच्या कार्याची ही फलश्रृत्ती आहे. कळकळीने केलेली प्रार्थना पवित्र आत्म्याद्वारे शब्दात मांडली जाते, आणि अशीच प्रार्थना देवाला स्वीकारनिय आहे. जेथे जेथे व्यक्ती देवाकडे हात पसरते तेथे पवित्र आत्म्याचे कार्य प्रगट केले जाते, आणि देव स्वतः त्याला प्रगट होईल. अशाच प्रकारच्या उपासकाचा तो शोध करीत असतो. तो त्यांचा स्वीकार करण्याचा व त्यांना त्याचे पुत्र व कन्या करण्याची प्रतिक्षा करतो.DAMar 147.1

    जेव्हा त्या स्त्रीने ख्रिस्ताबरोबर संवाद केला तेव्हा ती अतिशय प्रभावित झाली होती. अशा प्रकारच्या उच्च भावना व हेतू तिने तिच्या याजकाच्या किंवा यहूदी लोकांच्या तोंडून ऐकल्या नव्हत्या. जेव्हा तिच्या जीवनाचा भूतकाळ तिच्यापुढे उघड करण्यात आला होता तेव्हा तिला तिच्या मोठ्या उणीवतेची जाणीव करून देण्यात आली होती. तिला तिच्या आत्म्याला लागलेल्या तहानेची कल्पना आली होती, आणि ही तहान सूखार गांवातील विहीरीच्या पाण्याने कधीच भागली नसते हेही तिला समजून आले होते. आजवर तिच्या संपर्कात आलेल्या कशानेही तिला तिच्या मोठ्या उणीवेविषयी जागृत केले नव्हते. येशूने तिची खात्री पटविली होती की त्याने तिच्या जीवनातील सर्व गुप्त गोष्टी वाचल्या होत्या, आणि तरीसुद्धा तो तिच्यावर प्रीती करणारा आणि दया करणारा असा एक स्नेही होता असे तिला वाटले होते. जरी त्याच्या पवित्र समक्षतेने तिच्या पापाचा धिक्कार केला होता तरी त्याच्या मुखातून निंदाकारक एकही शब्द निघाला नव्हता उलट तिला त्याच्या कृपेविषयी सांगितले होते. त्यामुळे तिला त्याच्या स्वभावाविषयी खात्री पटू लागली. तिच्या मनात एक प्रश्न डोकावू लागला की ज्याची अनेक वर्षापासून वाट पाहिली गेली होती तो हा मशीहा तरी नसावा? ती त्याला म्हणाली, “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हास सर्व गोष्टी सांगेल.” त्यावर येशू तिला म्हणाला, “जो तुझबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.”DAMar 147.2

    जेव्हा त्या स्त्रीने ते शब्द ऐकले तेव्हा तिच्या मनात विश्वास उत्पन्न झाला. स्वर्गीय गुरूच्या ओठातून बाहेर पडलेल्या अद्भूत घोषणेचा तिने स्वीकार केला.DAMar 147.3

    ती स्त्री गुणवता ओळखण्याच्या मनःस्थितीत होती. ती महान प्रगटीकरणाचा स्वीकार करण्यास सिद्ध होती; कारण ती पवित्र शास्त्राविषयी आस्थेवाईक होती. जुन्या करारातील अभिवचनाचा तिने अभ्यास केला होता. “तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदातून माझ्यासारखा एक संदेष्टा तुजकरिता उत्पन्न करील, त्याचे तुम्ही ऐका.” अनुवाद १८:१५. हे भाकीत समजून घेण्यास ती उत्सुक होती. अगोदरच प्रकाश तिच्या अंतःकरणात चमकत होता. जीवनी पाणी, आध्यात्मिक जीवन, तहानलेल्या प्रत्येकाला ख्रिस्त जे देतो ते आध्यात्मिक जीवन तिच्या अंत:करणात उमलण्यास सुरूवात झाली होती. पवित्र आत्मा तिच्याबरोबर कार्य करीत होता.DAMar 148.1

    त्या स्त्रीजवळ ख्रिस्ताने जे स्पष्ट विधान केले होते ते स्वतःला सात्विक समजणाऱ्या यहूदी लोकाजवळ करता आले नसते. येशू त्यांच्याशी बोलताना जास्तीत जास्त अलिप्ततेने (दक्षतेने) बोलत होता. यहूदी लोकांना देण्याचे जे नाकारण्यात आले होते, आणि नंतर जे गुप्त ठेवण्याची शिष्यांना आज्ञा देण्यात आली होती ते त्या स्त्रीला प्रगट करण्यात आले. कारण येशूने हे पाहिले की त्याच्या कृपेची सुवार्ता सांगण्यास इतराना आणण्यासाठी ती तिच्या ज्ञानाचा उपयोग करील. DAMar 148.2

    जेव्हा शिष्य त्यांचे काम आटोपून परत आले, तेव्हा त्यांचा गुरू एका स्त्रीशी बोलत होता हे पाहून ते आश्चर्यचकित झाले. तो तहानेने व्याकूळ झाला असता तहान भागवून तरतरी आणणाऱ्या पाण्याचा थेंबही त्याने तोंडात घेतला नव्हता; आणि त्यांच्या शिष्यांनी आणलेल्या अन्नाचा कणही त्याने घेतला नाही. जेव्ही ती स्त्री निघून गेली तेव्हा त्यानी त्याला जेवण्याची विनंती केली. मनन करण्यात मग्न असल्यासारखा अगदी शांत असा तो त्यांना दिसला, त्याचा चेहरा तेजाने झळाळत होता, स्वर्गाशी (देवाबरोबर) होत असलेल्या त्याच्या दळणवळणात व्यत्यय आणण्यास त्यांना भय वाटले. तथापि त्यांना माहीत होते की त्याला ग्लानि आणि शीण आला होता, आणि त्याच्या शारीरिक गरजाची त्याला आठवण करून देणे ही त्यांची जबाबदारी होती असे त्यांना वाटत होते. येशूनेसुद्धा त्यांच्या आपुलकीच्या आस्थेची नोंद केली (समजून घेतली), आणि तो म्हणाला, “तुम्हास ठाऊक नाही असे अन्न मजजवळ आहे.”DAMar 148.3

    येशूला कोणीतरी अन्न आणून दिले की काय या संभ्रमात शिष्य पडले. ते ओळखून ख्रिस्ताने त्यांना स्पष्टपणे सांगितले, “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.” योहान ४:३४. त्याच्या शब्दाने त्या स्त्रीची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाली, तेव्हा तो आनंदीत झाला. जीवनी पाणी पिताना त्याने तिला पाहिले, आणि त्याचीच भूक व तहान भागली. जे कार्य करण्यासाठी त्याने स्वर्ग सोडला होता त्या कार्याच्या सिद्धीने तारणाऱ्याला त्याचे काम करण्यासाठी सक्षम केले, आणि मानवी गरजाहून त्याला अधिक उंच केले. सत्याची भूक व तहान लागलेल्या आत्म्याची सेवा करणे हे त्याला खाणे व पिणे याहून अधिक उपकारक वाटले. परोपकारबुद्धी हा त्याच्या जीवनाचा प्राण होता.DAMar 148.4

    आपल्या तारणाऱ्याला आपल्या परिचयाची भूक लागली आहे. ज्यांना त्याने स्वतःच्या रक्ताने विकत घेतले आहे त्यांच्या प्रेमाचा व सहानुभूतीचा तो भूकेला आहे. त्यांनी त्याच्याकडे यावे व जीवन प्राप्त करावे याची तो उत्सुकतेने वाट पाहातो. जशी माता तिच्या चिमुकल्या बाळाच्या परिचयाच्या स्मिताची, (जे स्मित त्या बाळाच्या समजबुद्धीला सुरूवात होत असल्याचे दर्शविते,) वाट पाहाते, तसेच ख्रिस्त, कृतज्ञतामय प्रेमभाव (जो भाव व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिक जीवनाची सुरूवात झाली आहे हे दर्शवितो) व्यक्त होण्याची वाट पाहातो.DAMar 149.1

    ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द ऐकल्यानंतर ती हर्षभरित झाली होती. अद्भूत आविष्करण जवळ जवळ यशस्वी झाले होते. तिची घागर तेथेच टाकून, ती, तो संदेश इतराना देण्यासाठी नगरात परत गेली. ती गावांत परत का गेली होती हे येशूला माहिती होते. घागर सोडून जाणे या तिच्या कृतीने स्पष्ट बोलून दाखविले की तो त्याच्या शब्दाचाच परिणाम होता. यामुळेच ती विहीरीवर पाणी भरण्यास आली होती ते विसरून गेली, ख्रिस्ताच्या तहानेविषयी आणि त्याला पाणी देण्याचे मनात ठरविले होते याविषयीही ती विसरून गेली. हर्षभरित अंतःकरणाने ती तिला मिळालेला अमोल्य प्रकाश इतराना देण्यासाठी दौडतच नगराकडे गेली.DAMar 149.2

    नगरात जाऊन नगरातील लोकांना ती सांगू लागली “चला, मी केलेले सर्व ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?” तिच्या शब्दांनी लोकांच्या अंतःकरणावर प्रभाव पाडला. तिच्या चेहऱ्यावर नवीन भाव उमटलेले दिसत होते, तिचे संपूर्ण स्वरूप बदलेले दिसत होते. “तेव्हा ते नगरातून निघून त्याजकडे येऊ लागले.” त्यांना येशूला पाहावयाचे होते.DAMar 149.3

    येशू अद्यापही विहीरीवर बसून होता. त्याच्यासमोर पसरलेल्या पिकाच्या शेतीवर त्याची नजर फिरत होती. त्या कोवळ्या पिकावर सूर्याची सोनेरी किरणे आपला वर्षाव करीत होती. त्याने तो देखावा शिष्यांना दाखविला आणि त्याने त्याचा रूपाकासारखा उपयोग केला. “चार महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हास म्हणतो, आपले डोळे वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.’ तो असे बोलत असतानाच विहीरीकडे येणारा लोकांचा जमाव त्याच्या दृष्टीस पडला. पिकाची कापणी करण्यासाठी अजून चार महिन्याचा अवधी होता, परंतु तेथे कापणी करणाऱ्यासाठी पीक तयार होते.DAMar 149.4

    पुढे तो म्हणाला, “कापणारा मजुरी मिळवीत आहे व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीत आहे; ह्यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरितो व एक कापितो, अशी जी म्हण आहे ती याविषयी खरी आहे.” येथे ख्रिस्त जे सुवार्तेचा स्वीकार करतात ते देवाच्या पवित्र सेवेचे ऋणी आहेत हे दाखवून देतो. त्यानी त्याचे साक्षात (जीवंत) मध्यस्थ (हस्तक) असले पाहिजे. तो प्रत्येकाच्या व्यक्तीगत सेवेची अपेक्षा करतो. मग आपण पेरणारे असू किंवा कापणी करणारे असू, आपण सर्वजन देवासाठी काम करीत असतो. एक बी पेरतो व दुसरा कापणी करतो. पेरणारा आणि कापणी करणारा या दोघानाही मजुरी मिळते. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना मिळालेल्या मोबदल्यामुळे एकत्रीपणे ते आनंद करतात.DAMar 149.5

    येशू शिष्याना म्हणाला “ज्यासाठी तुम्ही श्रम केले नाहीत ते कापावयाला मी तुम्हास पाठविले; दुसऱ्यानी श्रम केले आहेत व त्यांच्या श्रमाचे विभागी तुम्ही झाला आहा.” यावेळी तारणारा पुढे पन्नासाव्या दिवशी भरघोष पीक मिळवून देणाऱ्या कापणीवर आपले लक्ष केंद्रित करीत होता. ही फलश्रृती म्हणजे त्यांच्याच श्रमाचे श्रेय होते असे शिष्यांनी समजायचे नव्हते. ते दुसऱ्याच्या श्रमाचे भागीदार होणार होते. आदामाच्या पतनापासून ख्रिस्त त्याच्या वचनाचे बी मानवी अंतःकरणात पेरण्याचे काम निवडलेल्या सेवकावर सोपवून देत आला होता. त्याचप्रमाणे अदृश्य हस्तक, सर्व शक्तीमान सत्ता यांनीसुद्धा भरघोस पीकासाठी कार्य केले होते. देवाच्या कृपेचे दंव, पाऊस आणि सूर्यप्रकाश पुरवण्यात आले होते, यासाठी की सत्याचे बी रुजावे व तरारून वाढावे. ख्रिस्त स्वतःच्या रक्ताने त्याला (बी) पाणी देणार होता, त्याच्या शिष्यांनासुद्धा देवाबरोबर काम करण्यास संधी मिळाली होती. ते ख्रिस्त व पूर्वीचे सात्विक लोक यांचे सहकामदार होते. पन्नासाव्या दिवशी (पेंटकॉस्ट) होऊ घातलेल्या पवित्र आत्म्याच्या वर्षावाच्या वेळी एकाच दिवशी हजारो लोकांचे परिवर्तन व्हावयाचे होते. ख्रिस्ताच्या पेरणी करण्याच्या कार्याचे ते फळ होते, त्याच्या कामाची ती कापणी होती.DAMar 150.1

    विहीरीवर त्या स्त्रीबरोबर केलेल्या संभाषणाद्वारे चांगले बी पेरले गेले होते, आणि किती लवकर पीक हाताशी लागले होते. शोमरोनी लोक आले आणि येशूचे वचन ऐकून घेतले आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. विहीरीवर लोकांनी त्याच्या सभोवती तोबा गर्दी करून, त्याच्यापुढे प्रश्नाची रास रचली, आणि त्यांना दुर्बोधित असलेल्या अनेक गोष्टीच्या स्पष्टीरकरणाचा त्यानी मनापासून स्वीकार केला. ते ऐकत असताना त्यांच्या मनातील गोंधळ नाहीसा झाला. त्यांच्या जीवनात तो दिवस उगवेपर्यंत ते लोक गडद अंधारामध्ये प्रकाश किरणाचा शोध घेण्यासाठी चाचपडणाऱ्या लोकांसारखे होते. तथापि अल्पकाळ चाललेल्या त्या सभेमुळे ते समाधान पावले नव्हते. अधिक ऐकण्यासाठी ते उत्सुक होते, इतकेच नव्हे, तर त्या अद्भुत गुरूचे त्यांच्या इतर मित्रांनीसुद्धा ऐकावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी त्याला त्याच्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले, आणि त्यांच्यामध्ये राहाण्यास काकुळतीने विनंती केली. तो त्यांच्यामध्ये (शोमरोनात) दोन दिवस राहिला, त्यावेळी आणखी अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.DAMar 150.2

    परूशी लोक येशूच्या साधेपणाचा तिरस्कार करीत होते. त्यांनी त्याच्या चमत्काराकडे कानाडोळा केला आणि तो देवपुत्र असल्याची खात्री देणाऱ्या एकाद्या चिन्हाची हक्काने मागणी केली. परंतु शोमरोनी लोकांनी कसल्याच चिन्हाची मागणी केली नव्हती; आणि विहीरीवर त्या स्त्रीला तिच्या जीवनातील गुप्त गोष्टी दाखवण्याच्या चमत्काराव्यत्यारिक्त येशूने त्यांच्यात कसलाच चमत्कार केला नव्हता. तरीसुद्धा पुष्कळानी त्याचा स्वीकार केला होता. त्यांना मिळालेल्या ताज्या आनंदाने ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरितो असे नाही, कारण आम्ही स्वतः श्रवण केले असून हा खचीत जगाचा तारणारा आहे हे ओळखले आहे.”DAMar 151.1

    शोमरोनी लोकांचा विश्वास होता की तारणारा म्हणून मशीहा येणार होता, तो केवळ यहूदी लोकांच्याच तारणासाठी नव्हे, तर सर्व जगाच्या. पवित्र आत्म्याने मोशेद्वारे त्याच्याविषयी भविष्य कथन केले होते की तो देवाने पाठविलेला संदेष्टा असा असेल. याकोबाद्वारे जाहीर करण्यात आले होते की तो लोकांना एकवट करील; अब्राहामाद्वारे सांगितले होते की त्याच्याद्वारे सर्व राष्ट्रे धन्य होतील. या वचनानुसार शोमरोनी प्रातातील लोकांनी त्यांचा विश्वास मशीहावर आधारभूत केला होता. सत्य गोष्ट ही की यहूदी लोकांनी ख्रिस्ताच्या द्वितियागमनाच्या वैभवाचा संबंध पहिल्या आगमनाशी जोडून नतंरच्या संदेष्ट्याच्या पवित्र लिखानाचा अर्थ विपरीत केला होता. यामुळे शोमरोनी लोक मोशेच्या लिखानाव्यत्यरिक्त इतर सर्व पवित्र लिखाण गाळून टाकण्यास प्रवृत्त झाले होते. परंतु तारणाऱ्याने ती सर्व विपरीत अर्थाची स्पष्टीकरणे अगदी साफ करून टाकल्यामुळे अनेकांनी देवाच्या राज्याविषयीचे नंतरच्या संदेष्ट्यानी केलेले पवित्र लिखाण आणि खुद्द ख्रिस्ताचे शब्द याचा स्वीकार केला.DAMar 151.2

    येशूने यहूदी व यहूदेतर (विदेशी) यांच्यामधली आडभींत पाडून टाकण्यास व जगाला तारणाची सुवार्ता सांगण्याच्या कामाला प्रारंभ केला होता. जरी तो यहूदी होता तरी त्याच्या देशाच्या परुशी परंपरांचा अवमान करून तो शोमरोनी लोकांमध्ये अगदी मुक्तपणे मिळूनमिसळून राहात होता. त्यांच्या प्रतिकूल मनाची पर्वा न करता तो तुच्छ गणलेल्या त्या लोकांच्या पाहणचाराचा स्वीकार करीत होता. तो त्यांच्या छप्पराखाली झोपत होता. त्यांनी स्वहस्ते बनविलेले जेवण तो त्यांच्यासह बसून खाण्यात सहभागी होत होता. त्यांच्या गल्लीत जाऊन त्यांना शिक्षण देत होता, आणि तो त्यांना अत्यंत मायेने व आदराने वागवित होता.DAMar 151.3

    यरुशलेमातील मंदिराचे बाहेरील अंगण एका ठेगण्या भीतीने पवित्र मंदिराच्या इतर सर्व भागापासून वेगळे केले होते. याच भीतीवर यहूदी लोकाशिवाय या मर्यादेपलीकडे जाण्यास कोणालाही परवानगी नाही अशी अक्षरे वेगवेगळ्या भाषेत कोरलेली होती. एकाद्या विदेशी व्यक्तीने आतील भागांत प्रवेश करण्याचे धाडस केलेच तर त्याने ते मंदिर भ्रष्ट केले असे मानण्यात येत होते आणि त्या व्यक्तीला मरण दंडाचीच शिक्षा ठरलेली होती. परंतु येशू, तो मंदिराच्या व त्यातील विधींचा संस्थापक होता. त्याने मानवी ममतेच्या बंधनाने विदेशी लोकांना स्वतःकडे ओढून घेतले होते. जे तारण यहृद्यांनी त्यांना देण्याचे नाकारले होते ते त्यांना त्याच्या दैवी कृपेने मिळवून दिले होते.DAMar 151.4

    येशूचा शोमरोनातील मुक्काम, जे त्याचे शिष्य अद्यापही यहूदी धर्मवेढ्या प्रभावाखाली होते त्या शिष्यांना आशीर्वाददायक व्हावा यासाठी आखण्यात आला होता. शिष्याची समजूत होती की, त्यांना त्यांच्या देशाबरोबर एकनिष्ठ राहाण्यासाठी शोमरोनी लोकांबरोबर वैरभाव बाळगणे आवश्यक होते. येशूच्या वर्तणूकीचे त्यांना आश्चर्य वाटले होते. येशूचे अनुकरण करणे ते नाकारू शकले नाहीत, शोमरोनातील त्या दोन दिवसाच्या कालावधित त्याच्यावरील निस्सीम भक्तीने त्यांच्या प्रतिकूल मतांना नियंत्रणाखाली ठेवले होते; तरी अंतःकरणात ते समेट न केलेले म्हणजे प्रतिकूल मताचे होते. त्यांच्या अंतःकरणातील तिरस्कार व द्वेष यांची जागा दया व सहानुभूती याना द्यावयला पाहिजे होती हे शिकण्यास (समजून घेण्यास) ते अतिशय मंद होते. तथापि प्रभूच्या स्वर्गारोहणानंतर त्याची शिकवण त्यांना नव्या अर्थाने प्रगट होऊ लागली होती. पवित्र आत्म्याच्या वर्षावानंतर त्याना येशूचे स्वरूप, त्याचे शब्द, आणि त्या तूच्छ गणलेल्या विदेशाकडे दयाळूपणे व आदरभावाने पाहाण्याचा कल याची आठवण होऊ लागली होती. जेव्हा पेत्र शोमरोनात सुवार्ता सांगण्यास गेला होता तेव्हा त्याने त्याच प्रवृत्तीने काम केले होते. जेव्हा योहानाला स्मुर्णा व इफिस या ठिकाणाचे पाचारण आले होते तेव्हा त्याला शखेमच्या अनुभवाची आठवण झाली होती आणि त्याबद्दल त्यांनी त्याचे मनापासून उपकार मानिले. कारण पुढे येणाऱ्या अडचणीला तोंड देण्यासाठी स्वतःच्या उदाहरणाने सहाय्य केले होते.DAMar 152.1

    येशूने त्यावेळी जसे त्या रात्रीला स्वतःहून जीवनी पाणी देऊन कार्य केले तसेच तारणारा अजूनही त्याच प्रकारचे कार्य पुढे नेत आहे. जे स्वतःला त्याचे अनुयायी समजतात ते कदाचित, बहिष्कृतांना तुच्छ लेखतील व त्यांना दूर लोटतील; परंतु कोणतेही कूळ, राष्ट्रीयत्व किंवा कोणतीही परिस्थिती, त्याच्या प्रेमाला मानवाच्या संततीपासून दूर ठेवू शकत नाही. प्रत्येक आत्म्याला मग तो कितीही पापी असला तरी, येशू म्हणतो, जर तू माझ्याकडे मागीतले असतेस तर मी तुला जीवनी पाणी दिले असते.DAMar 152.2

    सुवार्तेची कार्यकक्षा संकुचित करण्यात येऊ नये, आणि निवडक थोडक्या लोकांना सुवार्ता सादर करू नये. त्याचप्रमाणे जर त्या थोडक्यानी सुवार्तेचा स्वीकार केल्यावर आपला सन्मान होईल असे आपल्याला वाटत असेल तर त्यासाठीच केवळ त्यांना सुवार्ता सांगू नये. सुवार्ता सर्वांना सांगण्यात आली पाहिजे. सत्याचा स्वीकार करण्यास ज्यांची अंतःकरणे खुली आहेत त्यांना शिकविण्यास ख्रिस्त तयार आहे. तो त्यांना, सर्वाची अंतःकरणे जाणणारा देव जो पिता व त्याला ग्रहणीय असलेली उपासना प्रगट करतो. अशा लोकांबरोबर बोलताना तो कोणत्याही दाखल्याचा उपयोग करीत नाही, तर “जो तुजबरोबर बोलत आहे ती मी तोच आहे’ असे जे त्या स्त्रीला त्या विहीरीवर म्हणाला तो अगदी सरळ स्पष्ट त्यांच्याशी बोलतो.DAMar 152.3

    जेव्हा येशू त्या विहीरीवर विश्रांति घेत बसला होता, तेव्हा तो यहूदा प्रांतातून आला होता, तेथे त्याच्या कार्याला फारच अल्प फळ आले होते. याजक व गुरूजनानी त्याचा अव्हेर केला होता, इतकेच नव्हे तर त्याचे अनुयायी म्हणणारे शिष्यसुद्धा त्याचे दैवी शील समजून घेण्यात अपयशी झाले होते. तो थकव्याने गळून गेला होता, तरीसुद्धा त्याने त्या अनोळखी, इस्राएलाला परकी असलेली आणि साक्षात पापी जीवन जगणाऱ्या स्त्रीबरोबर बोलण्याची संधि दुर्लक्षिली नव्हती.DAMar 153.1

    मोठा जमाव जमण्याची येशूने कधीच वाट पाहिली नव्हती. बहुधा त्याच्या सभोवती जमलेल्या थोड्याच लोकांना संदेश देण्यास तो सुरूवात करीत होता, परंतु त्या बाजूने जाणारेयेणारे अनेक लोक तेथे थांबत व त्यामुळे तेथे मोठा समुदाय तयार होत होता व तो समुदाय देवाने पाठविलेल्या गुरूकडून देवाचे वचन मोठ्या उत्सुकतेने व अचंबा करीत ऐकत होते. येशूच्या कामदाराने असे समजूच नये की तो मोठ्या लोकासमुदायासमोर जितक्या उत्सुकतेने बोलू शकतो जितक्या उत्सुकतेने लहान लोकसमुदायापुढे बोलू शकत नाही. संदेश ऐकण्यास कदाचित केवळ एकच आत्मा असेल, परंतु संदेशाचा परिणाम त्याच्यावर किती मोठा होईल हे कोणाला माहीत आहे? जगाच्या तारणाऱ्याने केवळ एका शोमरोनी स्त्रीसाठी वेळ खर्ची घालवावा ही गोष्ट शिष्यानासुद्धा क्षुल्लक वाटली होती, तथापि तो राजे, सभापती आणि मुख्य याजक यांच्यापेक्षा तिच्याशी अधिक मनापासून व परिणामकारकरित्या बोलला होता. त्याने त्या स्त्रीला दिलेल्या शिकवणीची पुनरावृत्ति जगाच्या कोनाकोपऱ्यांत होत राहिली आहे.DAMar 153.2

    शोमरोनी स्त्रीला तारणारा भेटल्याबरोबर तिने इतराना त्याच्याकडे आणले. ती त्याच्या शिष्यापेक्षा अधिक प्रभावी कार्यकर्ती (मिशनरी) होती हे तिने सिद्ध केले. शोमरोन हे एक उत्साहवर्धक क्षेत्र होते असे प्रदर्शित करणाऱ्या शिष्यांना शोमरोनात काहीच दिसले नव्हते. पुढील काळात मोठे कार्य करावयाचे होते त्यावर त्यांचे विचार स्थिरावले होते. त्यांना हे दिसले नव्हते की त्यांच्या आजूबाजूला कापणीसाठी भरपूर पीक तयार होते. परंतु त्यांनी ज्या स्त्रीचा तिरस्कार केला होता तिच्याद्वारे तारणाऱ्याचा संदेश ऐकण्यासाठी सर्व शहरच्या शहर आणण्यात आले होते. तिने तिच्या नगरवासीयाना ताबडतोब प्रकाश दिला होता.DAMar 153.3

    ती स्त्री ख्रिस्तावरील कृतीशील विश्वासाच्या कामकऱ्याचे दर्शक आहे. देवाच्या राज्यात जन्माला आलेला प्रत्येक खरा शिष्य मिशनरी असतो. कोणी जीवनी पाणी पितो तो जीवनाचा झरा बनतो. स्वीकारणारा तो दाता बनतो. ख्रिस्ताची कृपा ही सर्वांना तरतरीत करण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वाळवंटातील झऱ्यासारखी आहे.DAMar 153.4