Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ९—संघर्ष काळ

    सुरूवातीपासून यहुदी मुलांना धर्मगुरूंनी लावून दिलेले नियम पाळावे लागत असे. जीवनातील प्रत्येक बारीक सारीक कृतीला कडक नियम घालून दिले होते. मंदिरातील शिक्षकांच्या हाताखाली तरुणांना असंख्य नियमांचे अध्ययन करावे लागे आणि कट्टर यहूदी या नात्याने त्यांना ते पाळावे लागे. परंतु येशूने अशा गोष्टीत गोडी घेतली नाही. बाळपणापासून तो धर्मगुरूंच्या नियमाव्यतिरिक्त स्वतंत्र जीवन जगला. जुना कराराचा तो सतत अभ्यास करीत असे आणि “प्रभु असे म्हणतो” हे उद्गार सर्वदा त्याच्या मुखात (ओठावर) होते.DAMar 58.1

    लोकांची परिस्थिती जसजशी त्याला समजू लागली तसतसे त्याला समजून आले की समाजाचे नियम आणि देवाचे नियम परस्पर विरोधात होते. देवाचे वचन बाजूला सारून स्वतःने शोध लावलेल्या तात्त्विक भूमिकेचा ते उदोउदो करीत होते. सद्गुणांचा अभाव असलेल्या पारंपारिक चालत आलेल्या विधींचे ते पालन करीत होते. त्यांचा विधि म्हणजे नेहमीचा परिपाठ होता. त्यातील सत्य उपासकापासून गुपित ठेवण्यात आले होते. श्रद्धाहीन विधीतून त्यांना शातीचा लाभ होत नव्हता हे त्याच्या लक्षात आले. देवाची सत्याने केलेल्या आराधनेतून आत्म्याला मोकळीक लाभते हे त्यांना माहीत नव्हते. देवाची आराधना करणे म्हणजे काय हे शिकविण्यासाठी ख्रिस्त आला होता, आणि मनुष्यांचे नियम दिव्य नियमात मिसळण्यास तो मान्यता देऊ शकत नव्हता. विद्वान शिक्षकांच्या रूढी प्रघातावर त्याने हल्ला केला नाही; परंतु त्याच्या साध्या चालीरीतीमुळे त्याला दोष तिला तेव्हा त्याने स्वःसमर्थनार्थ देवाचे वचन सादर केले.DAMar 58.2

    संबधित आलेल्याच्याशी तो नम्रतेने आणि सौम्यतेने वागून त्यांना संतुष्ट ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. तो सौम्य व विनम्र असल्यामुळे शास्त्री आणि वडील यांना वाटले की त्यांच्या शिकवणीने त्याच्यावर सहजरित्या प्रभाव पाडू. प्राचीन धर्मगुरूपासून पारंपारिकरित्या चालत आलेले नीतीवचन आणि संप्रदाय यांचा स्वीकार करण्यास ते त्याला आग्रह करू लागले; परंतु त्याने त्यांना पवित्र शास्त्रातून त्यासाठी आधार देण्यास सांगितले. देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचे तो पालन करीत होता परंतु मनुष्याच्या शोधक बुद्धीतून निघालेल्या कल्पना त्याने बाजूला सारल्या. येशूला देवाचे वचन प्रारंभापासून ते शेवटपर्यंत ज्ञात होते आणि त्याने त्याचा खरा अर्थ सांगितला. लहान मुलाचे शिक्षण ऐकून धर्मगुरू खजील झाले होते. धर्मवचनाचा अर्थ सांगणे धर्मगुरूंचा अधिकार आहे आणि त्यांनी सांगितलेला अर्थ त्याने स्वीकारला पाहिजे असे ते म्हणत होते. त्यांना विरोध केल्यामुळे त्यांना त्याची चीड येत होती.DAMar 58.3

    धर्मशास्त्रामध्ये त्यांच्या संप्रदायाला आधार मिळणार नाही हे त्यांना माहीत होते. आध्यात्मिक ज्ञानांत ख्रिस्त त्यांच्यापेक्षा अधिक सरस आहे ह्याची त्यांना जाणीव झाली. तरी त्याने त्यांची आज्ञा मानली नाही म्हणून ते क्रोधाविष्ट झाले. त्याच्यापुढे त्यांचे काही चालले नाही म्हणून त्यांनी योसेफ आणि मरीया याच्याकडे तो ऐकत नाही म्हणून कागाळी केली. त्यामुळे त्याला बोलणे खावे लागले.DAMar 59.1

    लहानपणापासून स्वतःचे शीलसंवर्धन स्वतंत्रपणे करण्याचा त्याने प्रयत्न केला. मातापित्यावर असलेले प्रेम आणि सन्मानसुद्धा देवाच्या वचनाच्या आज्ञापालनापासून त्याला विचलीत करू शकले नाही. प्रत्येक कृती “शास्त्रात असे लिहिले आहे” यावर अवलंबून होती त्यामुळे ती घरगुती रूढी, प्रथा ह्यात बसत नसे. परंतु धर्मगुरूंच्या प्रभावाने त्याचे जीवन कडवट बनले. तरुणपणामध्येसुद्धा त्याला सहिष्णुता आणि सहनशक्ती यांचे पाठ गिरवावे लागले.DAMar 59.2

    योसेफाचे पुत्र, त्याचे बंधु धर्मगुरूंना पाठिंबा देत होते. देवाची आज्ञा समजून संप्रदायाचे पालन केलेच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. देवाच्या वचनापेक्षा मनुष्याचे नियम पाळले पाहिजे अशा विचाराचे ते होते आणि सत्य व असत्यातील भेद दाखविल्यामुळे येशूला ते अति त्रास देत होते. देववचनाचे कडक आज्ञापालन हा दुराग्रह आहे असे समजून त्याला ते दोष देत असे. धर्मगुरूंना दिलेल्या उत्तरातील त्याचे ज्ञान आणि शहाणपणा पाहून त्यांना आचंबा वाटला. विद्वानाकडून त्याचे शिक्षण झाले नाही हे त्यांना ज्ञात होते तरी तो त्यांचा शिक्षक होता हे त्यांनी ओळखले. त्यांच्यापेक्षा ह्याचे शिक्षण श्रेष्ठ दर्जाचे होते हे त्यांना समजले. परंतु ज्या जीवनाच्या वृक्षापासून आणि ज्ञानाच्या उगमापासून त्याला हे सर्व लाभत होते त्याविषयी ते अजाण होते.DAMar 59.3

    ख्रिस्त अलिप्त (वेगळा) नव्हता आणि कडक शिस्तीच्या नियमापासून परुशी ढळल्यामुळे त्याने परुशी लोकांना दोष दिला होता. अलिप्ततेच्या भीतीचे कुंपण धर्मक्षेत्राला घातले असल्याचे त्याच्या दृष्टीस आले. ते दररोजच्या जीवनासाठी फार पवित्र आहे अशी त्यांची भावना होती. ह्या भीती त्याने उलधून टाकल्या. मनुष्यांच्या संबंधात त्याने त्यांचा पंथ, धर्म कोणता असे विचारले नाही. कोणत्या चर्चचे तुम्ही आहा असेही विचारले नाही. गरज असलेल्या सर्वांना त्याने मदतीचा हात पुढे केला. दिव्यस्वभाव प्रगट करण्यासाठी तो एकाकी वैरागी जीवन जगत नव्हता. मानवतेसाठी त्याने कळकळीने कष्टाचे जीवन घालविले. शरीराला क्लेश देणे बायबल धर्मात अंतर्भूत नाही हे तत्त्व त्याने मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. पवित्र आणि अदृष्य धर्म ठराविक वेळेसाठी आणि विशेष प्रसंगासाठी नाही ह्याचे शिक्षण त्याने दिले. सर्व स्थळी आणि सर्व वेळी त्याने मानवावरील प्रेम व्यक्त केले आणि स्वतःसभोवती आनंदाचे वातावरण निर्माण केले. हे सर्व परुशांना धमकी होती. स्वार्थामध्ये धर्म नाही, आणि स्वहितार्थ रोगीट विकृत भक्ती खऱ्या भक्तीपासून फार दूर आहे हे त्याने दाखविले. ह्यामुळे येशूविषयीचा त्यांचा वैरभाव उचंबळून आला आणि त्यांच्या नियमाशी त्याने मान्यता देण्यास त्याच्यावर जुलूम केला.DAMar 59.4

    क्लेशाने व्यथित झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा येशूने दुःख परिहार केला. देण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते परंतु स्वतःचे भोजन देऊन गरजूंची नड भागविली. त्याचे वजन त्यांच्याविरूद्ध आहे असे त्याच्या भावाना वाटले. त्याच्याठायी असलेले कौशल्य त्यांच्यापैकी एकाजवळही नव्हते. गरीबाशी खडसावून बोलून त्यांची मानहानी ते जेव्हा करीत असे त्याच वेळी ख्रिस्त त्यांना उत्तेजनाचे शब्द बोलत असे. गरजवंताना थंड पाण्याचा प्याला देऊन त्यांच्या हातात तो स्वतःचे जेवण देत असे. त्यांचे दुःख परिहार करीत असतांना जे सत्य त्याने त्यांना शिकविले ते त्यांच्या स्मरणात पक्के राहिले. कारण ती करुणेची कृती होती.DAMar 60.1

    हे सर्व त्याच्या भावांना आवडले नाही. येशूपेक्षा ते मोठे असल्यामुळे त्याने त्यांचे ऐकले पाहिजे असे त्यांना वाटले. स्वतः कोणीतरी त्यांच्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे आणि शिक्षक, याजक आणि लोकांचे अधिकारी याच्यापेक्षा तो सरस आहे असे समजतो म्हणून त्याला दोष देत होते. ते वारंवार धमकी देऊन त्याला दटावत होते; परंतु देववचनाच्या मार्गदर्शनाने तो पुढे जात असे.DAMar 60.2

    आपल्या भावावर येशूचे प्रेम होते आणि तो त्यांच्याशी सदयतेने वागत असे; परंतु ते त्याचा द्वेष करून त्याचा फार अपमान करीत असे. त्याची वर्तणूक त्यांना समजत नव्हती. येशूमध्ये त्यांना मोठी विसंगतता दिसत होती. तो देवपुत्र होता आणि तो असहाय्य बालकही होता. जगांचा निर्माणकर्ता, पृथ्वी त्याच्या मालकीची तथापि पत्येक थराला त्याच्या जीवनातील गरीबीचे दर्शन घडत होते. जगातील अहंमपणा व डामडौल यांच्या ऐवजी त्याच्या ठायी सभ्यपणा व उदात व्यक्तिमत्व होते. जगातील मोठेपणा मिळविण्यासाठी त्याने खटाटोप केला नाही आणि कोणत्याही कमी दर्जाच्या स्थानी तो समाधानी होता. हे पाहून त्याचे भाऊ फार क्रोधाविष्ट झाले. त्याची कसोटी व वागवणूक होत असतांनासुद्धा तो नित्य प्रसन्नचित कसा राहातो हे त्यांना उमगत नव्हते. आमच्यासाठी तो दरिद्री झाला “यासाठी की, त्याच्या दारिद्राने तुम्ही धनवान व्हावे.” २ करिंथ. ८:९. इयोबाच्या मित्रांना जसे त्याचा अपमान आणि क्लेश यांचा उकल झाला नाही त्याचप्रमाणे त्यांना त्याच्या कार्याचे रहस्य अजमावले नाही.DAMar 60.3

    येशू त्याच्या भावाप्रमाणे नव्हता म्हणून त्यांचा त्याच्याविषयी गैरसमज झाला होता. त्याचे राहाणी प्रमाण त्यांच्यासारखे नव्हते. देवाला सोडून माणसाकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टिकोण होता आणि त्यांचे जीवन त्याच्या सामर्थ्याविना होते. ते पाळत असलेल्या धर्मपद्धतीने स्वभावाचे परिवर्तन होऊ शकत नव्हते. “त्यांनी पुदिना, शेप व जिरे यांचा दशांश दिला होता परंतु नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी, म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या त्यांनी सोडल्या होत्या.” मत्तय २३:२३. येशूचा आदर्श त्यांना नित्याचा संताप झाला होता. जगातील फक्त एकाच गोष्टीचा म्हणजे पापाचा द्वेष त्याने केला. चुकीच्या कृती पाहून त्याच्या मनाला फार दुःख होत होते, परंतु ते तो लपवू शकत नव्हता. धर्मपालनाच्या औपचारिकतेने (शिष्टाचार) पापाराधनेवर पांघरून टाकणारे आणि देवाच्या गौरवासाठी सतत असलेला सर्वश्रेष्ठ उत्साह दर्शविणारे यांच्यातील फरक ठळक दिसत होता. कारण येशच्या जीवनाने दृष्टाईचा निषेध केला. आणि त्याला घरात व बाहेरही विरोध करण्यात आला. त्याचा निस्वार्थीपणा आणि एकनिष्ठता यांच्यावर उपहासाने ते टोमणा मारीत होते. त्याचा संयम, सहनशिलता व कनवाळूपणा त्याच्या भीत्रेपणाची लक्षणे समजली गेली.DAMar 60.4

    मानवावर येणारा प्रत्येक कडू अनुभव खिस्ताने चाखला होता. गरीबीमध्ये झालेल्या जन्माबद्दल त्याचा अनादर व हेटाळणी करणारे लोक होते आणि त्याच्या बालवयात त्यांच्या निदात्मक दृष्टीला आणि दुष्ट कुजबुजण्याला त्याला तोंड द्यावे लागले. ह्या वेळेस त्याने उत्तरादाखल उतावीळपणाने शब्द किंवा दृष्टी वापरली असती आणि चुकीच्या एका शब्दाने आपल्या भावांचे खरे मानून मान्यता दिली असती तर तो आदर्श नमुना राहिला नसता. अशा रीतीने उद्धाराची योजना सफल करण्यास तो अपयशी झाला असता. पापासाठी निमित्त आहे असे त्याने कबूल केले असते तर सैतानाला जय मिळून जगाचा नाश झाला असता. ह्या कारणास्तव सैतान त्याचे जीवन अति कष्टमय करून त्याला पापात पाडण्याचा प्रयत्न करीत होता.DAMar 61.1

    परंतु प्रत्येक मोहाच्या वेळी “असे लिहिले आहे’ ऐवढे एकच उत्तर त्याच्याजवळ होते. भावांच्या चुकाबद्दल क्वचीतच त्याने त्यांची कानउघाडणी केली पण देवाचे शब्द तो त्यांना सांगत असे. निषीद्ध कृतीमध्ये तो त्यांच्याशी सामील होत नाही म्हणून त्याच्यावर भित्रेपणाचा आरोप ते करीत असत. त्यावर त्याचे उत्तर हे होतेः “प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय. दुष्टतेपासून दूर राहाणे हेच सुज्ञान होय.” ईयोब २८:२८.DAMar 61.2

    त्याच्या सहवासात शांती लाभते म्हणून त्याच्याबरोबर राहाण्याचा काहीजन प्रयत्न करीत होते, परंतु त्याचे निष्कलंक जीवन त्यांना बोचत होते म्हणून अनेकजन त्याचा सहवास टाळत होते. त्याने आपल्यासारखे वागावे म्हणून त्याचे तरुण सोबती आग्रह करीत होते. तो आनंदी व तरतरीत होता; त्याच्या सहवासाने त्यांना आनंद वाटत होता, आणि त्याच्या सूचनांचे ते स्वागत करीत होते; परंतु तो नैतिक संकेत अतिकाटेकोरपणे पाळीत असल्यामुळे ते अधीर व उतावीळ होत असे आणि तो कोत्या मनाचा आहे असे त्याला संबोधित असे. येशूने म्हटले, असे लिहिले आहे की, “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनाप्रमाणे सावध राहाण्याने.” “मी तुझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे.” स्तोत्र. ११९:९, ११.DAMar 61.3

    तू विचित्र, विलक्षण राहन आम्हापासून वेगळे का वागतोस? असा प्रश्न त्याला वारंवार विचारण्यात आला. त्याने म्हटले, असे लिहिले आहे की, “धन्य ते जन, जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. धन्य ते जन, जे त्याचे निर्बध पाळून त्याला मनःपूर्वक शरण जातात. ते काही अधर्माचरण करीत नाहीत; तर त्याच्या मार्गाने चालतात.” स्तोत्र. ११९:१-३.DAMar 62.1

    नासरेथ येथील तरुणांच्या खेळात, गंमतीत तू का भाग घेतला नाहीस असा प्रश्न विचारल्यावर त्याने म्हटले, असे लिहिले आहे की, “तुझ्या निबंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करितो. मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी सुख पावेन; मी तुझे वचन विसरावयाचा नाही.” स्तोत्र. ११९:१४-१६. DAMar 62.2

    येशू आपल्या हक्कासाठी झगडत नव्हता. तो राजी व तक्रार न करणारा असल्यामुळे विनाकारण त्याचे काम वारंवार तीव्र, असह्य करण्यात येत होते. तथापि तो निराश झाला नाही किंवा त्याला अपजय मिळाला नाही. देवाच्या मुखप्रकाशात असल्याप्रमाणे त्याने ह्या सर्व समस्यावर मात केली. उद्धटपणे जरी त्याला वागविले तरी त्याबद्दल टोल्याला टोला म्हणून त्याने सूड घेतला नाही, परंतु त्याने अपमान निमूटपणे सहन केला.DAMar 62.3

    तुझे भाऊसुद्धा तुच्छतेने तुला वागणूक देत असताना, तू गप्प का राहातोस असा प्रश्न त्याला वारंवार विचारला गेला? तो उद्गारला, असे लिहिले आहे की, “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको; तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडोत; त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव; त्यास आपल्या हृदयपटावर लिहून ठेव; म्हणजे तुला देव व मनुष्य याजकडून अनुग्रह व सुकिर्ती ही प्राप्त होतील.’ नीतिसूत्रे ३:३-४.DAMar 62.4

    येशूचा मंदिरात शोध केल्यापासून त्याच्या आईबापाला त्याचे वागणे गूढ गोष्ट असल्याचे वाटू लागले. तो वितंडवादात पडत नसे तथापि त्याचे उदाहरण नित्याचा धडा होता. विशेष कार्यासाठी त्याला निवडिले आहे असे त्याला वाटत होते. निसर्ग आणि देव यांच्यामध्ये रममान झाल्याने त्याला अति सुखसमाधान वाटत होते. जेव्हा संधि मिळत असे तेव्हा तो काम बाजूला सोडून शेतात जात असे व हिरव्यागार दरीमध्ये चिंतनात गर्क होत असे, आणि डोंगरमाथ्यावर किंवा गर्द झाडीत देवाशी हितगुज करीत असे. प्रातःकाळी एकांत स्थळी जाऊन नेहमी तो देववचनाचे अध्ययन करून त्यावर ध्यान व प्रार्थना यामध्ये वेळ घालवी. निवांत ठिकाणाहून घरी परतल्यावर घरातील कष्टाच्या कामाला हात घाली व अशा प्रकारे तो आदर्श होई.DAMar 62.5

    ख्रिस्त आपल्या मातेला मायेने आणि सन्मानाने वागवीत होता. तिच्या पोटी जन्मलेला पवित्र पुत्र आश्वासित मशीहा होता असा मरियेचा खात्रीदायक विश्वास होता परंतु तसे ती दर्शवीत नव्हती. त्याच्या पृथ्वीवरील सबंध जीवनातील व्यथा आणि क्लेश यांची ती वाटेकरी होती. त्याच्या बालपणात व तारुण्यात त्याच्यावर आलेले दुःख व संकटे तिने प्रत्यक्ष पाहिले होते. तिच्या समजूतीप्रमाणे त्याच्या वागणूकीतील सत्याचे समर्थन करण्याद्वारे तिला कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले. शीलसंवर्धनासाठी गृहातील सहवास आणि मातेने डोळ्यात तेल घालून घेतलेली मुलांची काळजी फार महत्त्वाची आहेत. योसेफाच्या पुत्र आणि कन्यांना हे माहीत होते आणि स्वतःच्या प्रमाणाप्रमाणे (मोजमाप) येशूच्या संवयीमध्ये सुधारणा करण्याचा ते प्रयत्न करीत होते आणि त्यामुळे मातेच्या धास्तीत भर टाकीत होते.DAMar 62.6

    मरीया वारंवार येशूजवळ तक्रार करीत होती आणि धर्मगुरूंचे ऐकायला व मान्य करायला सांगत होती. देवाच्या वचनावर मन केंद्रित करण्यापासून आणि मनुष्यांचे किंवा मुक्या प्राण्यांचे दुःख परिहार करण्यापासून त्याला कोणी विचलीत करू शकत नव्हते. ख्रिस्तावर निर्बंध आणण्यासाठी याजक आणि शिक्षक मरीयेच्या मदतीची अपेक्षा करीत होते तेव्हा ती अगदी बेचैन होई; परंतु आपल्या आचरणाच्या समर्थनार्थ जेव्हा तो शास्त्रवचन सादर करीत असे तेव्हा तिला बरे वाटून मन शांत होई. DAMar 63.1

    एकादे वेळी येशू आणि त्याचे बंधू यांच्यामधील विचाराने ती घोटाळ्यात पडे. तो देवाने पाठविला होता असा विश्वास भावांचा नव्हता; परंतु तो दिव्य व्यक्ती होता याविषयी भरपूर पुरावे होते. दुसऱ्याच्या कल्याणाकरिता तो स्वार्थत्याग करीत होता हे तिने पाहिले. त्याच्या सहवासाने गृहात शुद्ध वातावरण निर्माण होत असे आणि त्याचे जीवन समाजामध्ये खमीराप्रमाणे कार्य करीत होते. निरूपद्रवी आणि निष्कलंक असा तो अविचारी, असभ्य व असंस्कृत लोकांमध्ये, अन्यायी जकातदार, बेफिकीर, उधळपट्टी करणारे, अधार्मिक शोमरोनी, विधर्मी सैनिक, आडदांड शेतकरी आणि मिश्र समुदाय यांच्यामध्ये तो वावरत होता. थकले भागलेल्यांना पाहून आणि त्यांचे भारी ओझे हलके करण्यासाठी सहानुभूतीचे शब्द तो सर्वत्र बोलत होता. त्याने त्यांचे ओझे वाहिले आणि निसर्गामध्ये शिकलेले प्रेमाचे, दयाळूपणाचे आणि देवाच्या चांगुलपणाचे धडे त्याने त्यांना सांगितले.DAMar 63.2

    प्रत्येकाला अमुल्य देणगी लाभलेली आहे असे समजून त्यांनी वागले पाहिजे असे त्याने त्यांना सांगितले. त्या देणगीचा योग्य उपयोग केल्यास त्यांना अनंत दौलत लाभू शकते. त्याने सर्व निरर्थक गोष्टी आपल्या जीवनातून पार काढून टाकिल्या, आणि प्रत्येक क्षणाची निष्पति अनंतकालिक आहे हे त्याने स्वतःच्या उदाहरणाने शिकविले. तो मोल्यवान खजिना म्हणून अंतःकरणात साठवून ठेवावा व त्याचा विनियोग पवित्र कार्यासाठी करावा असे सांगितले. निकामी व्यक्ती म्हणून त्याने कुणाकडे पाहिले नाही परंतु त्यांना मुक्ती प्राप्त देण्याचा त्याने प्रयत्न केला. कोणत्याही मंडळीच्या सहवासात तो आला तेव्हा वेळ आणि परिस्थिती पाहून त्याने त्यांना उचित पाठ दिला. निरूपद्रवी व अदृष्य बनण्याची खात्री देऊन, जे आडदांड व होतकरू नसलेले त्यांना आशा देऊन प्रेरित केले व हे गुण प्राप्त झाल्याने ते देवाची मुले बनतील असे सांगितले. सैतानाच्या सत्तेखाली गेलेले व त्याच्या कचाट्यातून सुटण्यास असमर्थ असलेले लोक त्याला वारंवार भेटले. अधिर, आजारी, मोहात गुरफटलेले आणि पराभूत अशांना येशू आवश्यक व समजणारे दयेचे शब्द बोलत असे. हरएक घटकेला सैतानाशी झडगणारे त्याला भेटले. यशाची खात्री देऊन त्यांना चिकाटी न सोडण्यास उत्तेजन दिले कारण दिव्यदत त्यांच्या बाजूने असून ते त्यांना विजय प्राप्त करून देतील. अशा प्रकारे मदत मिळणाऱ्यांची खात्री झाली की ज्याच्यावर पूर्ण भरवसा व भीस्त टाकू शकतो अशी एकच व्यक्ती आहे. त्याच्यापुढे मांडलेल्या गुप्त गोष्टींच्या संदर्भात तो विश्वासघात करणार नव्हता.DAMar 63.3

    येशू शरीराची दुःखणी बरे करणारा व आत्म्याच्या व्यथा शमविणारा होता. हरएक प्रकारचे क्लेश त्याच्या दृष्टीतून निसटले नाहीत, आणि क्लेशाने जर्जर झालेल्या प्रत्येकाला त्याने आराम दिला. त्याचे दयाळू बोल त्यावर रामबाण औषध होते. त्याने चमत्कार केला असे कोणीही बोलू शकले नाही; परंतु सद्गुण - रोग बरे करण्याची प्रेममय शक्ती- त्याच्यातून रोगी आणि पिडितांमध्ये गेला. अशा प्रकारे बाळपणापासून अडखळण न होता लोकांच्यासाठी काम केले. ह्यामुळेच जेव्हा त्याने सार्वजनिक कार्याला सुरूवात केली तेव्हा पुष्कळ लोक ऐकण्यासDAMar 64.1

    आले.DAMar 64.2

    तथापि बाळपणात, तारुण्यात आणि प्रौढावस्थेत त्याने आपले जीवन एकट्यानेच घालविले. त्याने एकट्यानेच द्राक्षकुड तुडविले आणि लोकांतले त्याच्याबरोबर कोणी नव्हते. मनुष्याच्या उद्धाराच्या जबाबदारीचे भारी ओझे त्याने वाहिले. मानवजातीचे हेतू आणि तात्त्विक भूमिका यांच्यामध्ये स्पष्ट व निश्चित बदल झाल्याविना सर्वजन नाश पावतील हे त्याला ज्ञात होते. त्याच्या जीवावरचे हे मोठे ओझे होते आणि कोणालाही त्याची किंमत वाटत नव्हती. विशिष्ट उद्दिष्ट मनात ठेवून तो स्वतः मानवजातीचा प्रकाश होण्यासाठी त्याने आपल्या जीवनाला आकार दिला.DAMar 64.3