Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
युगानुयुगांची आशा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ८७—“माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे”

    लूक २४:५०-५३; प्रेषित १:९-१२.

    ख्रिस्ताला पित्याच्या सिंहासनाकडे जाण्याची वेळ आली होती. जयचिन्हासहित दिव्य विजेता म्हणून स्वर्गीय दरबाराकडे परतण्याच्या तयारीत तो होता. मरणाअगोदर त्याने आपल्या पित्याला स्पष्ट सांगितले होते, “जे काम तू मला करावयास दिले ते मी समाप्त केले आहे.” योहान १७:४. पुनरुत्थानानंतर पुनरुत्थित व वैभवशील झालेल्या शरीराशी शिष्यांना परिचय व्हावा म्हणून तो ह्या पृथ्वीवर थोडे दिवस थांबला. आता तो सोडून जाण्यास सज्ज होता. तो जीवंत उद्धारक आहे ही सत्य गोष्ट त्याने सिद्ध केली होती. त्याच्या शिष्यांनी त्याचा संबंध थडग्याशी जोडायचा नव्हता. स्वर्गीय विश्वापुढे तो गौरवी झाला हा विचार त्यांच्यापुढे राहायाचा होता.DAMar 718.1

    लोकांच्याबरोबर राहात असताना आपल्या उपस्थितीने जे स्थळ पवित्र केले होते त्या स्थळाची निवड त्याने आपल्या स्वर्गारोहनासाठी केली होती. दाविदाचे नगर, शियोन पर्वत किंवा मंदिराच्या आसपासची जागा, मोरया पर्वत यांचा सन्मान अशा प्रकारे करायचा नव्हता. त्या ठिकाणी ख्रिस्ताची थट्टा कुचेष्टा करून त्याचा त्याग करण्यात आला होता. तेथे दयचे प्रवाह आणि प्रीतीच्या लहरी कठीण खडकासारख्या निर्दय हृदयावर आपटून मागे परतत होत्या. तेथून थकलेला व भारावलेला ख्रिस्त विश्रांतीसाठी जैतूनाच्या डोंगरावर गेला. पहिल्या मंदिरातून पवित्र शेकेना निघून, जणू काय नाखुषीने पवित्र नगर सोडून जाण्यासाठी, पूर्वेकडील डोंगरावर उभे राहिला. त्याचप्रमाणे खूप आतुरतेने यरुशलेमनगराकडे पाहात ख्रिस्त जैतूनाच्या डोंगरावर उभा राहिला. त्याच्या अधुंनी आणि प्रार्थनेने डोंगरावरील उपवने व लहान सहान दऱ्या पवित्र केल्या होत्या. लोकांनी त्याला राजा केल्याच्या विजयी घोषणेचा प्रतिध्वनि कड्यावरून घुमत होता. त्याच्या उतरणीवर बेथानी येथे लाजारसाचे घर होते. त्याच्या पायथ्याशी गेथशेमाने बागेत त्याने विव्हळ होऊन प्रार्थनेत वेळ घालविला होता. ह्या डोंगरावरून त्याचे स्वर्गारोहन होणार होते. तो पुन्हा येईल तेव्हा त्याचे पाय ह्याच्या शिखराला लागतील. दुःखी मानव म्हणून नाही परंतु गौरवी व विजयी राजा म्हणून जैतूनाच्या डोंगरावर तो उभा राहील. त्याच वेळेस इब्री हालेल्या विधर्म्याच्या होसान्नामध्ये मिसळून जाऊन आणि उद्धारलेल्या अफाट समुदायाची वाणी जयघोषाने प्रशंसोद्गार काढून म्हणेल, सर्वांच्या प्रभूचा राजमुकुट घालून अभिषेक करा!DAMar 718.2

    आता आकरा शिष्याबरोबर येशू डोंगराकडे गेला. यरुशलेमाच्या वेशीतून जात असताना, काही आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांनी ज्याला मरणदंडाची शिक्षा देऊन वधस्तंभावर खिळिले होते त्याच्याबरोबर लहानशी टोळी जात असतांना पाहून पुष्कळांनी आश्चर्य केले. त्याच्या प्रभूबरोबर ही शेवटची मुलाखत होती हे शिष्यांना समजले नव्हते. त्यांच्याशी संवाद, बातचीत करण्यात आणि पूर्वीच्या शिक्षणाची पुनरावृत्ती करण्यात येशूने आपला वेळ घालविला. गेथशेमाने बागेजवळ आल्यावर त्या रात्री प्राणांतिक दुःखाच्या अनुभवातून जात असतांना दिलेल्या पाठांचे त्यांना स्मरण व्हावे म्हणून तो तेथे थोडा वेळ थांबला. पुन्हा त्याने वेलीकडे दृष्टी लावली व त्याद्वारे मंडळी व तो आणि पिता यांच्या संघटनेचा पाठ त्यांच्यापुढे आणला. त्याच्यासभोवर एकतर्फी प्रेमाचे स्मरण करून देणाऱ्या गोष्टी होत्या. त्याचे जीवलग शिष्यसुद्धा त्याची मानखंडना होत असताना त्याला दूषण देऊन सोडून गेले.DAMar 719.1

    तेहतीस वर्षे ख्रिस्ताने जगभर प्रवास केला; त्याने चेष्टाकुचेष्टा, उपहास आणि नालस्ती सहन केली; शेवटी त्याचा त्याग करून त्याला वधस्तंभावर खिळिले. आता गौरवी सिंहासनाकडे आरोहन होत असतांना, ज्या लोकांचा उद्धार करण्यास आला त्यांच्या कृतघ्न कृतींचे समालोचन करून तो त्यांच्यापासून आपली सहानुभूती आणि प्रीती माघारी घेणार नाही काय? जेथे त्याचे गुण ग्रहण होते आणि जेथे दिव्यदूत त्याची आज्ञा पाळण्यास सज्ज राहातात तेथेच तो लक्ष केंद्रित करणार नाही काय? नाही; त्याच्या प्रियकरांना ह्या पृथ्वीवर सोडून जाताना तो अभिवचन देतो की, “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.’ मत्तय २८:२०.DAMar 719.2

    येशू जैतूनाच्या डोंगरावर पोहंचल्यावर शिखरावरील बेथानीच्या आसपास आला. तेथे तो थांबल्यावर शिष्य त्याच्यासभोवती जमले. तो त्यांच्याकडे प्रेमाने पाहात असताना त्याच्या चेहऱ्यावर प्रकाशाचे किरण चमकत असलेले दिसले. त्यांचे अपराध आणि अपयश यामुळे त्याने त्यांना मुक्त केले नव्हते. त्यांच्या प्रभूच्या मुखातून निघालेले शेवटचे गंभीर मायाळू शब्द त्यांच्या कानावर पडले. जणू काय संरक्षणाच्या हमीने आशीर्वाद देण्यासाठी हात पसरत असलेला असा तो त्यांच्यापासून हळूहळू वर घेतला गेला. तो वर जात असताना धाक बसलेले शिष्य त्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी डोळेफोड करीत होते. गौरवी मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले; देवदूतांच्या मेघाच्छादित रथाने त्याचा स्वीकार केल्यावर वाणी निनादली की, “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.” त्याच वेळी दिव्यदूतांच्या गायक समूहाचे मधुर व गोड गीत त्यांच्या कानावर पडले.DAMar 719.3

    शिष्य आकाशाकडे टक्क लावून पाहात असतांना भारदस्त संगीताप्रमाणे वाणी झाली. वळून पाहिल्यावर त्यांना दोन दूत पुरुष्यांच्या वेषात दिसले. ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले, तसाच येईल.’DAMar 719.4

    येशूला स्वर्गीय गृहाकडे घेऊन जाण्यासाठी थांबलेल्या दूतसमूहातील हे दूत होते. प्रतिष्ठित दिव्यदूतातील हे दोन दूत होते. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या समयी ते कबरेकडे आले होते, पृथ्वीवरील त्याच्या सबंध आयुष्यात ते त्याच्याबरोबर होते. पापाने शापीत झालेल्या जगातील त्याच्या रेंगाळण्याचा शेवट होण्याची, सबंध स्वर्ग अति उत्सूकतेने वाट पाहात होता. स्वर्गीय विश्वाने त्याच्या राजाचा माननीय स्वीकार करण्याची घटिका आली होती. येशू ख्रिस्ताचे स्वागत करणाऱ्या हर्षभरीत समुदायात ह्या दोन दूतांना सामील व्हावयाचे नव्हते काय? सोडून गेलेल्यावरील प्रीती व सहानुभूती यामुळे त्यांचे समाधान करण्यासाठी ते मागे थांबले. “ते सर्व वारशाने तारणप्राप्ती होत असलेल्यासाठी सेवा करावयास पाठविलेले असे परिचारक आत्मे नाहीत काय?’ इब्री १:१४.DAMar 720.1

    मनुष्याच्या रूपात ख्रिस्त गेला आहे. मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केलेले शिष्यांनी पाहिले होते. जो त्यांच्याबरोबर बोलून चालून प्रार्थना करीत होता; ज्याने त्यांच्याबरोबर भाकर मोडली होती; सरोवरावरील मचव्यात त्यांच्याबरोबर जो होता; आणि जैतूनाच्या डोंगरावर त्यांच्याबरोबर चढण्यास जो कष्ट करीत होता तोच येशू आता पित्याच्या सिंहासनात भाग घेण्यासाठी वर गेला आहे. दूतांनी त्यांना खात्री दिली होती की, स्वर्गात जातांना त्यांनी ज्याला पाहिले, तोच येशू जसा त्याला जातांना पाहिले तसाच तो पुन्हा येईल. तो “मेघासहित येईल आणि प्रत्येक डोळा त्याला पाहील.” “कारण प्रभु स्वतः आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनि होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.” “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल.” प्रगटी. १:७; १ थेस्स. ४:१६; मत्तय २५:३१. अशा प्रकारे प्रभूने स्वतः शिष्यांना दिलेल्या आश्वासनाची परिपूर्ति होईल. “मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन; यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.” योहान १४:३. प्रभूच्या पुन्हा येण्याच्या आशेमध्ये शिष्यांना हर्ष होईल.DAMar 720.2

    शिष्य परत यरुशलेमाकडे गेल्यावर लोक त्यांच्याकडे आत्यंतिक आश्चर्याने पाहू लागले. ख्रिस्ताची चौकशी व वधस्तंभावरील मरण यानंतर ते खिन्न व ओसाळल्यासारखे दिसतील असे त्यांना वाटले होते. त्यांच्या चहेऱ्यावर पराजयाची व ख्रिन्नतेची छाया पाहाण्यास त्यांचे शत्रू थांबले होते. परंतु त्याच्याऐवजी ते आनंदीत व विजयी दिसले. त्यांचे चेहरे स्वर्गीय समाधानाने तेजस्वी दिसले. निराशा झाल्यामुळे ते शोक करीत बसले नाहीत परंतु ते देवाचे आभार मानीत व स्तुतीस्त्रोते गात होते. हर्षाने त्यांनी ख्रिस्ताचे पुनरुत्थान व स्वर्गारोहन यांची अद्भुतजन्य गोष्ट सांगितली आणि त्यांची साक्ष पुष्कळांनी स्वीकारली.DAMar 720.3

    यापुढे शिष्य भविष्याविषयी साशंक नव्हते. येशू स्वर्गामध्ये होता व त्याची सहानुभूती अद्याप त्यांच्यासाठी होती हे त्यांना माहीत होते. देवाच्या सिंहासनाजवळ त्यांचा मित्र आहे आणि येशूच्या नावामध्ये पित्याला ते आपल्या विनंती सादर करण्यास उत्कंठित होते हे त्यांना माहीत होते. गांभीर्याने त्यांनी प्रार्थना केली व हमीचा पुनरुच्चार केला, “तुम्ही पित्याजवळ काही मागाल ते तो तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.” योहान १६:२३, २४. भक्कम मुद्यासहित त्यांनी आपल्या श्रद्धेचा हात उंच उंच केला, “ख्रिस्त मेला इतकेच नाही तर तो मेलेल्यातून उठविला गेला, तो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी विनंती करितो.” रोम ८:३८. ख्रिस्ताच्या आश्वासनाप्रमाणे कैवाऱ्याच्या समक्षतेत पन्नासाव्या दिवशी त्यांच्या आनंदाची परिपूर्ति झाली.DAMar 721.1

    सर्वश्रेष्ठ राजदरबारात उद्धारकाचे स्वागत करण्यासाठी सबंध स्वर्ग वाट पाहात होता. त्याच्या उत्थानाच्या वेळी त्याच्या पुनरुत्थानाच्या समयी मुक्त केलेल्या बंदिस्तांचा मोठा घोळका त्याच्या मागून गेला. स्तुतीस्तोत्रे गात व गौरव करीत जयघोषाच्या निनादत स्वर्गीय सेना सामील झाली.DAMar 721.2

    देवाच्या नगराजवळ पोहंचण्याच्या वेळी संरक्षक दिव्यदूतांच्या दलाने आव्हान दिले आहे, -DAMar 721.3

    “अहो वेशींनो, उन्नत व्हा;
    पुरातन द्वारांनो, उंच व्हा;
    म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल.”
    DAMar 721.4

    हर्षाने अपेक्षा करणारे पहारेकरी प्रत्युत्तर देतात, -
    “हा प्रतापशाली राजा कोण?”
    DAMar 721.5

    तो कोण आहे ह्याविषयी ते अजाण आहेत म्हणून ते विचारत नाहीत तर प्रसंशनीय उत्तर ऐकण्याच्या अपेक्षेने विचारतात, -DAMar 721.6

    “बलवान व पराक्रमी परमेश्वर
    युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच,
    अहो वेशीनो उन्नत व्हा;
    पुरातन द्वारानो उंच व्हा;
    म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल.’
    DAMar 721.7

    पुन्हा आव्हान ऐकिले, “हा प्रतापशाली राजा कोण?” त्याच्या नावाचे स्तुती वर्णन ऐकण्यास दिव्यदूतांना थकवा येत नाही. संरक्षक देवदूत उत्तर देतात, -DAMar 721.8

    “सेनाधीश परमेश्वर,
    हाच प्रतापशाली राजा.”
    DAMar 722.1

    स्तोत्र २४:७-१०.

    त्यानंतर देवाच्या नगरीचे दरवाजे खुले करण्यात आले आणि दिव्यदूतांचा समुदाय जल्लोष करीत आत शिरला.DAMar 722.2

    तेथे राजासन आहे आणि राजासनाभोवती आश्वासनाचा मेघधनुष्य आहे. तेथे करूब व सराफीम आहेत. तेथे दिव्यदूतांचे सेनापती, देवाचे पुत्र आणि अपतित जगांचे प्रतिनिधी जमलेले आहेत. ज्या मंडळासमोर लुसीफराने देव व येशू यांच्यासमोर आरोप केला होता ते दिव्य मंडळ, ज्या पापविरहीत राज्यावर त्याने प्रभुत्व गाजविण्याचा निर्धार केला होता त्यांचे प्रतिनिधी उद्धारकाचे स्वागत करण्यासाठी सर्व हजर आहेत. त्याचा जयोत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या राजाचे गौरव करण्यासाठी ते अति उत्सुक आहेत.DAMar 722.3

    परंतु तो हात हालवून म्हणतो, आताच नाही. तो राज्याभिषेकाचे गौरव व राजाचा झगा आताच स्वीकारू शकत नाही. तो पित्यासमोर जातो आणि शीरावरील जखमा, भोसकलेली बाजू, खराब झालेले पाय आणि हात वर करून खिळ्यांचे वण दाखवितो. त्याच्या विजयश्रीची खूण दाखवितो. पुनरुत्थानाच्या वेळी त्याच्याबरोबर कबरेतून उठलेले तो देवाला पहिल्या उपजाची पेंढी म्हणून सादर करितो. त्याच्या द्वितियागमनाच्या वेळी मोठा समुदाय कबरेतून उठेल त्यांचे ते दर्शक आहे. पृथ्वीचा पाया घालण्याअगोदर पिता व पुत्र यांच्यामध्ये करार करण्यात आला होता. सैतानाला मनुष्य बळी पडला तर त्याचा उद्धार करायचा. मानवजातीच्या उद्धारकार्यात ख्रिस्ताने जामीनाची भूमिका पार पाडायची. ही प्रतिज्ञा ख्रिस्ताने पूर्ण केली. वधस्तंभावर असताना मोठ्याने आरोळी मारून पित्याला उद्देशून म्हटले, “पूर्ण झाले आहे.” हे माझ्या देवा, मी तुझी आज्ञा पाळली आहे. उद्धार कार्य मी समाप्त केले आहे. तुझ्या न्यायाचे समाधान झाले असल्यास “तू जे मला दिलेले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे मजजवळ असावे.” योहान १९:३०; १७:२४.DAMar 722.4

    न्यायाचे समाधान झाले आहे ही देवाची वाणी ऐकण्यात आली. सैतान पराभूत झाला आहे. पृथ्वीवरील ख्रिस्ताचे पराकष्ट व धडपड “अत्यंत दयेमध्ये स्वीकारण्यात आली आहेत.’ इफिस. १:६. स्वर्गीय देवदूतासमोर आणि पतित जगांच्या प्रतिनिधीसमोर त्याचे समर्थन करण्यात आले आहे. जेथे तो आहे तेथे त्याची मंडळी आहे. “दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; न्यायत्व व शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.” स्तोत्र. ८५:१०. पित्याने पुत्राला अलिंगन दिले आणि म्हटले, “देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत.” इब्री १:६.DAMar 722.5

    अधिकारी, राज्य व सत्ता यांनी अतिशय हर्षाने जीवनाच्या अधिपतीचे सर्वश्रेष्ठत्व मान्य केले. दूतांच्या समुदायाने त्याच्यासमोर दंडवत घालून त्याची उपासना केली आणि त्याच वेळी स्वर्गातील दरबार शुभ संदेशाने दुमदुमून गेला आणि म्हटले, “वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती ह्यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे.’ प्रगटी. ५:१२.DAMar 723.1

    विजयश्रीची गीते आणि दिव्यदूतांच्या तंतूवाद्यांचा निनाद यांच्या मिलापाने स्वर्ग आनंदाने व स्तुतीने दुमदुमून निघाला. हरलेले ते सापडले. स्वर्ग मोठ्याने घोषणा करितो, “राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव, व सत्ता ही युगानुयुग असोत.” प्रगटीकरण ५:१३.DAMar 723.2

    स्वर्गीय आनंदाच्या प्रसंगातून ख्रिस्ताच्या मुखातून निघालेल्या अद्भुत वाणीचा प्रतिध्वनि पृथ्वीवर कानी आदळतो, “जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” योहान २०:१७. स्वर्गातील कुटुंब आणि पृथ्वीवरील कुटुंब एक आहेत. आमच्यासाठी प्रभु जीवंत आहे, तो वर गेला आहे. “ह्यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यास हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जीवंत आहे.” इब्री ७:२५.DAMar 723.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents